29 October 2020

मिरजेच्या पारंपरिक तंतुवाद्यांना नवे रंगलेपन



🔰सांगली : तंतुवाद्यांचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध असलेल्या मिरजेतील तरुण कारागिरांनी बदलत्या काळाची मागणी ओळखून आता या पारंपरिक वाद्यांना बहुरंगी बनविले आहे. तंबोरे, सतारीच्या या नव्या रूपाला देश-परदेशातील कलाकारांचीही पसंती मिळत आहे.


🔰लाखेऐवजी आता ‘मेटॅलिक’ रंगाचा वापर करून मिरजेची सतार बहुरंगी बनवत असताना तिच्यातील स्वरामध्ये कोणताही बदल होणार नाही याची दक्षताही घेतली आहे.


🔰मिरज शहर दीडशे वर्षांहून अधिक काळ तंतुवाद्य निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे. येथून परदेशातही तंतुवाद्यांची निर्यात केली जाते. येथे बनवलेल्या तंबोरा, सतार, दिलरुबा, सारंगी, ताऊस, रुद्रवीणा यांसारख्या वाद्यांना नामांकित कलाकारांकडून मागणी असते. 


🔰पारंपरिक पद्धतीमध्ये मिरजेतील तंतुवाद्य निर्मितीच्या प्रारंभीच्या काळात पानाचा विडा कुटून त्यात थोडे पाणी मिसळून त्याचा लाल रंग तयार करून तो तंतुवाद्यांना देण्यात येत असे. नंतरच्या काळात लाखेच्या रंगाचा वापर करण्यात येऊ लागला. बत्ताशी आणि पत्रीलाख पातळ करून त्यात स्पिरीट मिसळून पिवळा, तपकिरी, जांभळा यांसारखे रंग देण्यात येऊ लागले. हे रंग देण्यात काही विशिष्ट कारागिरांनी हातखंडा मिळविला होता. गेली अनेक वर्षे  स्पिरीटमिश्रित रंगांतील वापर तंतुवाद्यांसाठी होत होता.

भारतीय निवडणूक आयोग



- संवैधानिक संस्था

- कलम 324

- स्थापना: 25 जानेवारी 1950

- निवडणुका: राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, संसद, राज्य विधिमंडळ

- पहिले मुख्य निवडणूक आयुक्त: सुकुमार सेन

- मुख्य आयुक्तांची नियुक्ती राष्ट्रपती करतात: 6 वर्षे किंवा वयाची 65 वर्षे ते पदावर राहतात

----------------------------------------


 राज्यसभा

- संसदेचे उच्च सभागृह

- भारताचे उपराष्ट्रपती पदसिद्ध अध्यक्ष असतात

- एकूण जागा: 250: 238 राज्ये आणि केंद्र शासित प्रदेश + 12 राष्ट्रपती नियुक्त

- सध्या जागा: 245: 233 राज्ये आणि केंद्र शासित प्रदेश + 12 राष्ट्रपती नियुक्त (कलम 80 नुसार ही नियुक्ती)

- महाराष्ट्रात राज्यसभेच्या 19 जागा

- मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालॅड, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, पाॅडेचरी, गोवा या राज्यांना राज्यसभेवर प्रत्येकी 1 जागा

----------------------------------------

● लोकसभा

- एकूण जागा: 552 (कलम 81 & 331 नुसार)

- पहिल्या लोकसभेची स्थापना: 2 एप्रिल 1952

- 16 वी लोकसभा स्थापना: 4 जून 2014

-------------------------------------------


लोकसभा निवडणूक 2014

- 16 वी लोकसभा निवडणूक

- 7 एप्रिल ते 12 मे या कालावधीतील 10 दिवस भारतभरात मतदान

- 16 मे रोजी निकाल आणि 4 जून 2014 रोजी लोकसभेची स्थापना

- एकूण मतदारसंघ: 543

- एकूण मतदान केंद्र: 927553

- सहभागी राजकीय पक्ष: 464 (2009-363)

राष्ट्रीय- 342, राज्य- 182, नोंदणीकृत- 16, अपक्ष- 3

- एकूण उमेदवारांची संख्या: 8251 पैकी 668 महिला उमेदवार (पैकी 62 निवडून आल्या)

---------------------------------------


 पक्षीय बलाबल

- भारतीय जनता पक्ष: 282

- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस: 44

- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष: 06

- कम्युनिस्ट पक्ष: 01

- कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी): 09

- राज्यस्तीय पक्ष: 182

- नोंदणीकृत पक्ष: 16

- अपक्ष: 03

----------------------------------------


 वैशिष्ट्ये

- EVM वर NOTA हा पर्याय भारतभर पहिल्यांदाच वापरण्यात आला. 

- नोटाचा सर्वाधिक वापर पाॅडेचरी (3.01%), सर्वात कमी वापर नागालॅड (0.26%) करण्यात आला

- 28,527 तृतीयपंथी मतदारांपैकी 1968 जणांनी मतदानाचा अधिकार बजावला. 

- 13,039 (पुरूष 12234, स्त्री 804) भारताबाहेरील भारतीयांपैकी 10 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. 

- एकूण निवडणूक खर्च: 3,87,0354,56,024 रूपये

--------------------------------------

• महाराष्ट्र: लोकसभा निवडणूक 2014

- 48 मतदारसंघासाठी 90386 मतदान केंद्रे. 

- 6 मतदान केंद्रावर फेर मतदान घेण्यात आले. 

- 32 मतदारसंघात 16 पेक्षा जास्त उमेदवार उभा होते.

- एकूण मतदानापैकी 0.89% लोकांनी NOTA हा पर्याय वापरला

आचारसंहिता म्हणजे नेमकं काय? पक्ष, उमेदवारांवर बंधनं काय?*



 *आचारसंहिता म्हणजे नेमकं काय?* : निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्ष आणि त्यांच्या उमेदवारांनी काय करावं आणि काय करू नये, असे नियम त्यांना घालून देण्यात आले. हे Do's And Dont's म्हणजेच निवडणूक 'आचारसंहिता' होय.


 *पक्ष, उमेदवारांवर काय असतात बंधनं?* : 


▪️ पक्षाने आपल्या प्रचारामध्ये असं कोणतंही भाषण, प्रचार सामग्री, घोषणा अथवा आश्वासन देऊ नयेत ज्यामुळं समाजातील जाती, धर्म, वंश, बोलीभाषा इत्यादींमध्ये फुट पडेल तसंच त्यांच्यात वाद निर्माण होतील.


▪️ कोणत्याही पक्षाला त्याच्या प्रतिपक्षावर टीका करण्याचा अधिकार आहे, मात्र त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल, त्यांच्या धर्माबद्दल, जातीबद्दल बोलता येणार नाही. असं केल्यास त्यास आचारसंहितेचा भंग समजण्यात येतो.


▪️ निवडणूकीच्या प्रचारात  मतांसाठी लोकांमध्ये पैसे वाटणं, महागड्या वस्तू देणं, मतदारांना अमिष दाखवणं, लालूच दाखवणं अशा बाबींना आचारसंहितेमध्ये गैरप्रकार म्हटलं आहे. 


▪️ कोणताही प्रचार रात्री 10 च्या आतच संपवणं, थांबवणं बंधनकारक आहे. तसंच नागरिकांच्या खासगी इमारतीचा, मालमत्तेचा अथवा जमिनीचा वापर परवानगीशिवाय कोणत्याही पक्षाला करता येत नाही.


▪️ कोणत्याही पक्षाला त्याच्या प्रतिस्पर्धी पक्षाच्या प्रचाराध्ये अडथळा आणण्याचा अधिकार नाही, असे केल्यास त्या उमेदवाराची उमेदवारी रद्द करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाकडे आहे.


▪️ कोणत्याही पक्षाला, उमेदवाराला परवानगीशिवाय प्रचार, भाषण करता येणार नाही. याकरिता उमेदवारानं आपल्या सभांसाठी प्रशासनाचं स्वीकृतीपत्र मिळवणं आवश्यक आहे. तसंच संबंधीत बाबींची पोलीस ठाण्यात माहिती देणं आवश्यक आहे. 


▪️ आचारसंहितेच्या काळात कोणत्याही पक्षाला अथवा सरकारला आर्थिक लाभाच्या, मनोरंजनात्मक योजनांची घोषणा तसेच अमंलबजावणीही करता येत नाही. 


▪️ आचारसंहितेच्या काळात कोणत्याही पक्षाला सरकारी वाहने, विमाने, हेलिकॉप्टर इत्यादी वाहनांचा निवडणूकीच्या प्रचारासाठी वापर करता येत नाही. असं केल्यास याला आचारसंहितेचा भंग मानण्यात येतो.


▪️ आचारसंहिता केवळ निवडणूकीत उभे राहणाऱ्या उमेदवारांपुरतीच मर्यादीत नसून ही आचारसंहिता मंत्र्यांवरही लागू असते. 


▪️ निवडणूकीवर प्रभाव टाकणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्यांची बदली आपल्या आवडीच्या ठिकाणी करता येत नाही. यापैकी कोणतंही काम केल्यास ते थांबवण्याचा संपूर्ण हक्क निवडणूक आयोगाला असतो.


*सोशल मीडियावरही आचारसंहिता* : इतिहासात पहिल्यांदाच सोशल मीडियावरही आचारसंहिता लागू झाली आहे. सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्वर आचारसंहिते दरम्यान राजकीय पक्षांना जाहिरात पोस्ट करण्याआधी निवडणूक आयोगाला माहिती द्यावी लागणार आहे. निवडणूक आयोगाच्या परवानगीनंतर ते जाहिरात पोस्ट करू शकणार आहेत. 


 *तक्रारींसाठी मोबाईल अ‍ॅप्स* : 'समाधान' या वेब पोर्टलवर सामान्य जनता निवडणूक आणि प्रक्रियेबाबत आपल्या प्रतिक्रिया देऊ शकणार आहेत. 


तसेच एक असेही अ‍ॅप लॉन्च करण्यात आले आहे ज्याद्वारे मतदाता आचारसंहितेचा भंग होत असल्याचे ती घटना रेकॉर्ड करून निवडणूक आयोगाकडे पाठवू शकेल. यात तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे. तसेच सुविधा नावाचे अ‍ॅप राजकीय पक्षांसाठी लॉन्च करण्यात आले असून याद्वारे उमेदवार, प्रतिनिधी निवडणुकीसाठी लागणार विविध परवानगी अर्ज करू शकणार आहेत.


 *दिव्यांगांसाठी विशेष अ‍ॅप* : दिव्यांग मतदारासाठी इलेक्शन कमीशनने पर्सन विद डिसेब्लिटी (PWD) नावाचे अ‍ॅप लॉन्च केले आहे. याद्वारे मतदान केंद्रावर अशा लोकांना वाहन सेवा, पाणी, रँप सेवा, व्हिलचेअर सेवा आणि ब्रेल बॅलेट पेपर आणि ब्रेल वोटर स्पिल अशा सुविधा पुरवण्यात येईल.

कलम 371 :- मध्ये विविध राज्यांकरिता विशेष तरतुदी दिलेल्या आहेत.



📌 या कलमांतर्गत  राज्यपालास राष्ट्रपतीच्या निर्देशानुसार काही विशेष जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. त्याबाबतीत राज्यपालास जरी मंत्रिमंडळाचा सल्ला घेण्याची गरज असली तरी तो अंतिमतः स्वच्छेने कृती करू शकतो. 


📌 या जबाबदाऱ्या पुढीलप्रमाणे आहेत


● क- 371     :-  महाराष्ट्र & गुजरात


● क- 371 A :-  नागालँड


● क- 371  B :- आसाम 


● क- 371  C :-  मनिपुर 


● क- 371  D :- } आंध्रप्रदेश & तेलंगणा

● क- 371  E :- }


● क- 371  F :-  सिक्कीम 


● क- 371  G :- मिझोरम


●  क- 371  H :- अरुणाचल प्रदेश


●  क- 371  I :-  गोवा 


 ● क- 371  J :- कर्नाटक


 Note : 371 D, E, G व I मध्ये दिलेल्या विशेष तरतुदींमध्ये राज्यपालाच्या स्वेच्छाधीन अधिकारांचा समावेश होत नाही

पचायत राज


💢परस्ताविक


भारतीय संघराज्य व्यवस्थेमंधे तीन पातळ्यांवर शासनाचे कार्य चालते. 


1) संघराज्य 

2) घटकराज्य 

3) स्थानिक 


स्थानिक शासन संस्था म्हणजे स्थानिक भागातील जनतेचे स्वत:चे प्रश्न सोङविण्यासाठी निवडून दिलेल्या प्रतिनीधीच्या शासन संस्था होय.  साधारणत: राज्य पातळीखालील सर्व शासनसंस्था म्हणतात. 


💢 सथानिक जनतेला स्थानिक पातळीवरील सार्वजनिक व्यवहाराची व्यवस्था पाहण्याच्या कार्यात सहभागी करून घेणे हा स्थानिक शासनसंस्थेचा प्रमुख हेतु आहे. तसेच त्याचे कार्यही अशा कायद्याचा तरतुदींनुसार चालते. मात्र त्यांच्या दैनंदिन कारभारात राज्यशासन हस्तक्षेप करीत नाही. आपल्याला आधिकारक्षेत्रात त्या स्वायत्त असतात आणि त्यांना बरेच निर्णयस्वातंत्रही असते.  भारतात सर्वत्र स्थानिक शासनसंस्थेला "स्थानिक स्वराज्यसंस्था"असे म्हणण्याचा प्रघात आहे. 


💢 भारतात स्थानिक स्वराज्यसंस्थाचे प्रमुख दोन प्रकार आहेत: ग्रामीण व शहरी.

73 व्या घटनादुरूस्ती कायद्यात विविध पातळ्यांवरील ग्रामीण स्वराज्य संस्थांना "पंचायत "या सामान्य नावाने संबोधले आहे,तर 74 व्या घटनादुरूस्ती कायद्यात विविध प्रकारच्या शहरी स्थानक स्वराज्य संस्थांना "नगरपालिका "या सामान्य नावाने संबोधले आहे. 


💢 गरामीण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या व्यवस्थेला "पंचायतराज " असेही संबोधले जाते. कलम 243 अन्वये, "पंचायत "म्हणजे ग्रामीण भागासाठी ग्राम पातळीवर, मधल्या पातळीवर व जिल्हा पातळीवर स्थापन करण्यात आलेली स्वराज्य संस्थां होय, 


26 October 2020

धरणांची पाणी क्षमता



धरणातील पाणी आवक जावक मापे बघा, किती पाणी येते वा जाते माहिती आहे कां ???


1) टीएमसी ( TMC) म्हणजे काय ??

2) क्युसेक (Cusec )म्हणजे काय ??

3) क्युमेक (Cumec ) म्हणजे काय??


सध्या सर्वदूर चांगला पाऊस होतो आहे, धरणे भरत आहेत, काही धरणांतून पाणीही सोडल्या जात आहे.इतके टीएमसी पाणी जमा झाले, तितके क्युसेक पाणी सोडले असे आपण पेपर मधून वाचतो. पण या संज्ञांचा नेमका अर्थ काय ???


आपणास फक्त "लिटर" ही संज्ञा माहित आहे; तर या लिटर संज्ञेप्रमाणे यांचा अर्थ समजून घेवूया.


▪️पाणी मोजण्याची एकके


● स्थिर पाणी मोजण्याची एकके – 


1) लिटर 

2) घनफूट 

3) घनमीटर  


▪️धरणातील पाणी मोजण्याचे एकक – टीएमसी  TMC (Thousand Million Cubic Feet) (अब्ज घनफूट)


● एक टीएमसी म्हणजे one thousand millions cubic feet म्हणजे एकावर नऊ शुन्य (01 अब्ज) इतके घन फूट.


1 टीएमसी  = 28,316,846,592 लिटर्स


2) वाहते पाणी मोजण्याची एकके-


1) 1 क्यूसेक ( Cusec )– एका सेकंदास एक घनफूट पाण्याचा प्रवाह म्हणजे एक क्यूसेक होय. या प्रमाणात एक सेकंदात 28.3 लिटर पाणी बाहेर पडते. 


2) 1 क्युमेक (Cumec) - एका सेकंदास एक घनमीटर पाण्याचा प्रवाह म्हणजे एक क्युमेक होय. या प्रमाणात एक सेकंदात 1,000 लिटर पाणी बाहेर पडते. 


● उदा.

पुण्याच्या खडकवासला धरणाची क्षमता 1.97 टीएमसी आहे.

म्हणजेच त्यामध्ये 1.97 x 28.317 अब्ज लिटर्स पाणी मावते.


● याच धरणातून सध्या 500 क्युसेक पाणी नदीत सोडले जातआहे.


● म्हणजेच 500 x 27.317 लिटर प्रति सेकंद या विसर्गाने पाणी सोडल्या जात आहे.


◆ महाराष्ट्रातील क्षमतेने मोठी असलेली 06 धरणे


1)उजनी  117.27 टीएमसी 

2)कोयना  105.27 टीएमसी 

3)जायकवाडी 76.65 टीएमसी  ( पैठण )

4)पेंच तोतलाडोह  35.90 टीएमसी 

5) वारणा  34.40 टीएमसी

6) पूर्णा येलदरी  28.56 टीएमसी

बारा ज्योतिर्लिंगे



१) सोमनाथ -

सोरटी सोमनाथ- काठेवाडचे दक्षिणेस असलेल्या वेरावळ बंदराला समुद्रमार्गाने आणि रेल्वेने जातां येते. वेरावळहून प्रभासपट्टण तीन मैल लांब आहे. प्रभासपट्टमला सोमनाथाचें देऊळ आहे. क्षय नाहींसा होण्याकरितां सोमानें (चंद्राने) लिंग स्थापून पूजा केली, म्हणून ते सोमनाथ या नावाने प्रसिद्ध झाले.


२) मल्लिकार्जुन -

गुंटकल बेसवाडा - या छोट्या लाइनवर नंद्याळ स्टेशन आहे. तेथून 28 मैलांवर असलेल्या आत्माकुमार गांवाला मोटारीने जावें लागतें. आत्माकुरहून मल्लिकार्जुन 43 मलै श्रीशैल्यपर्वतावर आहे. रागावून गेलेल्या कुमार कार्तिकेयाला भेटण्याक‍िरतां (मल्लिका) पार्वती व अर्जुन (शंकर) येथें आले म्हणून मल्लिकार्जुन या नावाने प्रसिद्ध झाले. मल्लिकार्जुनाच्या पलीकडे पांच मैलांवर पाताळगंगा (कृष्णा) आहे.


३) महाकाळेश्वर -

 उज्जयिनीस प्रसिद्ध आहे. शिवशंभोचे 'महाकाल'रूप आहे.


४) अमलेश्वर -

 ओंकारमांधाता. उज्जयिनी-खंडवा रस्त्यावर मोरटक्का स्टेशनापासून दहा मैलांवर नर्मदेच्या-कांठीं आहे. हें नर्मदेच्या दुभंग झालेल्या बेटांत डोंगरावर आहे. तेथेच गौरी सोमनाथ व भैरवशीला ही स्थानें आहेत. दुसरें ॐकार या नांवाचें लिंग नर्मदेच्या दक्षिण तीरावर आहे. हा सर्व भाग ॐकारच्या आकाराचा आहे, म्हणून यास ओंकारअमलेश्वर असें म्हणतात.


५) वैद्यनाथ -

 शिवपुराणांतील श्लोकाप्रमाणें 'वैद्यनाथं चिता भूमौ' असा पाठ आहे. संथाल परगण्यांत पूर्व रेल्वेवरील जसीडोह स्टेशनापासून तीन मैल दूर ब्रँच लाइनवर वैद्यनाथ आहे. तेथील शिवालय प्रशस्त आहे. या स्थानीं कुष्ठरोगापासून मुक्त होण्याकरितां पुष्कळ रोगी येतात. बहुतेक विद्वानांच्या मतें हें ज्योतिर्लिगाचें स्थान आहे. दक्षिणेंत बारा ज्योतिर्लिगाच्या श्लोकांत 'वैद्यनाथ चिता भूमौ' याऐवजी 'परल्यां वैजनाथं' असा पाठ आहे. परळीवैजनाथयाचें स्थान मराठवाड्यांत परभणी स्टेशनापासून चोवीस मैल दक्षिणेस आहे.


६) भीमाशंकर -

 भीमाशंकर - खेड- जुन्नरद्दून थेट भीमाशंकराच्या देवळापाशीं रस्ता जातो. कर्जतवरून आणि खेड-चासहून रस्ते आहेत. भीमानें राक्षसाचा वध केल्यामुळें भीमाशंकर नांव प्रसिद्ध झाले. आसाम प्रांतांत कामरूप जिल्ह्यांत उत्तर-पूर्व रेल्वेवर गौहत्तीजवळ ब्रह्मपूर नांवाचा पहाड आहे. त्या पहाडवरील लिंगाला कांहीं लोक भीमाशंकर म्हणतात. नैनीताल जिल्ह्यांत उज्जनक येथें एका विशाल मंदिरांत मोठ्या घेराचें आणि दोन पुरुष उंचीचें लिंग आहे. त्यालाच कांहीं लोक भीमाशंकर म्हणतात.


७) रामेश्वर -

 दक्षिण भारतांत प्रसिद्धच आहे. रामचंद्राने याची स्थापना केल्यामुळें याला असें नांव पडलें.


८) नागेश्वर -

 श्लोकांतील पाठ, 'नागेश दारुकावने' असा आहे आणि त्याप्रमाणें द्वारकेजवळचें लिंग तें हेंच ज्योतिर्लिग होय, असें बर्‍याच लोकांचे म्हणणें आहे. गोमती द्वारकेपासून थेट द्वारकेला जाणार्‍या रस्त्यावर बारा-तेरा मैलांवर पूर्वोत्तर रस्त्यावर हें स्थान आहे. औंढ्या नागनाथ हेंच नागेश ज्योतिर्लिंग होय, असें दक्षिणेतील लोकांचे म्हणणें आहे. मराठवाड्यांत पूर्णा-हिंगोली ब्रँचवर चौडी स्टेशन लागतें. तेथून पश्चिमेस चौदा मैलांवर हें स्थान आहे. आल्मोडापासून सतरा मैलांवर उत्तर-पूर्वेस योगेश (जागेश्वर) शिवलिंग आहे. त्यालाच कांहीं लोक नागेश ज्योतिर्लिंग म्हणतात.


९) काशीविश्वेश्वर -

 वाराणशीस (काशीस) प्रसिद्धच आहे. जगाच्या प्रलयकालांत शंकर ही नगरी त्रिशूलावर धारण करतो. शिवशंभोचे 'काशी विश्वेश्वर' रूप आहे.


१०) केदारेश्वर -

 हिमालयावर हरिद्वारहून केदार 150 मैल आहे. केदारनाथाचें देऊळ वैशाख ते आश्विन उघडें असतें. नंतर कार्तिकापासून चैत्रापर्यंत तें बर्फांत बुडालेलें असल्यामुळे बंद असतें.


११) घृष्णेश्वर -

 (घृश्मेश्वर) दौलताबाद स्टेशनापासून दहा मैलांवर घृष्णेश्वर आहे. शेजारी शिवकुंड (शिवालय) नांवाचें सरोवर आहे. घृष्णेच्या (घृश्मेच्या) प्रार्थनेवरून शंकर येथें स्थिर झाले म्हणून घृणेश्वर (घृश्मेश्वर) म्हणतात.


१२) त्र्यंबकेश्वर -

नाशिकहून बीस मैलांवर पश्चिमेस गौतम ऋषिच्या विनंतीवरून गंगा येथें आली व शंकर लिंगरूपानें आले. जप मंत्र - ओम त्र्यंबकम यजामहे ,सुगन्धिम पुष्टी वर्धनम। ऊर्वारुकमीव बंधनात मृत्योर्मुक्षीय मामृतात।।


दामोदर नदी :



बिहार आणि प. बंगाल राज्यांतील खनिजसमृद्ध प्रदेशातून वाहणारी गंगेची उपनदी. लांबी सु. ६२५ किमी. जलवाहनक्षेत्र २०,७०० चौ.किमी. ही छोटा नागपूर पठारातील रांची पठारावर पालामाऊ जिल्ह्याच्या तोरी परगण्यात रांचीपासून ५६ किमी., रांची–लोहारडागा रस्त्यावरील कुरू गावाच्या पूर्व ईशान्येस १६ किमी. वर, समुद्रसपाटीपासून सु. ६१० मी. उंचीवर उगम पावते. तिचा दुसरा उगमप्रवाह हजारीबाग जिल्ह्यातील तोरी–समारिया रस्त्यावरील बालुमाथ गावाच्या दक्षिणेस सु. ३ किमी. वरून निघून पहिल्या मुख्य प्रवाहाला सु. २० किमी. वर मिळतो. सुरुवातीला दामोदर सु. ४२ किमी. डोंगराळ भागातून वाहते. नंतर ती पठारावरील विभंगद्रोणीतून करणपुरा व रामगढ कोळसाक्षेत्रांतून सु. ७५ किमी. पूर्वेकडे गेल्यावर ईशान्येस सु. २३ किमी. जाते व पुन्हा सामान्यतः पूर्वेकडे वाहू लागते. बोकारो कोळसाक्षेत्रातून आलेली गोमिया व उत्तरेकडून आलेली कोनार यांचा संयुक्त प्रवाह तिला गोमिया व बेर्मो यांदरम्यान मिळतो. जमुनिया व इतरही अनेक प्रवाह तिला दोन्ही बाजूंनी येऊन मिळतात. धनबाद जिल्ह्यातील झरिया कोळसाक्षेत्रातून गेल्यावर राणीगंज कोळसाक्षेत्राच्या पश्चिम भागात तिला तिची उत्तरेकडील सर्वांत महत्त्वाची व मोठी उपनदी बराकर मिळते. येथून ती आग्नेय वाहिनी होऊन प. बंगाल राज्यात शिरते. येथून ती नौसुलबही होते. बरद्वानजवळून गेल्यावर सु. २० किमी. वर ती एकदम दक्षिण वाहिनी होते. नंतर बरद्वान व हुगळी जिल्ह्यांतून जाऊन ती कलकत्त्याच्या नैर्ऋत्येस ५६ किमी. वरील फाल्टा येथे हुगळी या गंगेच्या फाट्यास मिळते. 


सुरुवातीच्या सु. २०० किमी. भागात नदीप्रवाहाचा उतार दर किमी.ला १·९ मी., नंतरच्या सु. १६० किमी. भागात दर किमी.ला ०·५७ मी. व अखेरच्या सु. १५० किमी. भागात तो दर किमी.ला फक्त ०·१९ मी. आहे. यामुळे सुरुवातीच्या भागात दामोदर वेगाने वाहते आणि पठाराची झीज करून पुष्कळच दगडमाती आपल्या प्रवाहाबरोबर वाहून नेते. पुढे वेग कमी झाल्यावर पात्रात व आजूबाजूला गाळ साचू लागतो. बरद्वानच्या आधीच्या सु. १०० किमी. भागात नदीच्या पात्रात ठिकठिकाणी वाळू साचते व प्रवाहाला त्यातून मार्ग काढावा लागतो. अखेरच्या भागात प्रदेश इतका सपाट आहे की, प्रवाहाला फाटे फुटून त्या प्रदेशाला त्रिभुज प्रदेशाचे स्वरूप येते.


दामोदरचे वैशिष्ट्य म्हणजे तिला येणारे विनाशकारी पूर. दामोदरच्या खोऱ्यात पडणाऱ्या पावसाचे पाणी तिच्यातून व तिच्या उपनद्यांतून जलाभेद्य स्फटिकी खडकांवरून येते व त्यामुळे पावसाळ्यात नद्या खूपच फुगतात. हे सर्व पाणी आसनसोलजवळच्या निरुंद भागातून पुढे जाते व बरद्वान आणि हुगळी जिल्ह्यांच्या सपाट प्रदेशात एकदम पसरते. या प्रदेशाचे अशा पुरांमुळे फारच नुकसान होत आले आहे. जंगलतोड व भूपृष्ठाची झीज यांमुळे हे पूर अधिकच विध्वंसक ठरले आहेत. काही वेळा दामोदरच्या पुराचे पाणी दक्षिणेकडे पसरून रूपनारायण नदीलाही मिळते. पूर्वी दामोदर कलकत्त्याच्या वरच्या बाजूस सु. ६२ किमी. वर नया सराई येथे हुगळीला मिळत असे. परंतु अठराव्या शतकात पुराचे पाणी व नदीचे पात्र दक्षिणेकडे सरकू लागले. १७७० मध्ये पुरामुळे बरद्वान शहर पार उद्ध्व‌स्त झाले. नदीकाठचे बांध मोडून गेले व मोठा दुष्काळ पडला. पुढे एकोणिसाव्या शतकातही पुरांमुळे अनेक वेळा नुकसान झाले. चालू विसाव्या शतकात भारत स्वतंत्र झाल्यावर या पुरांचे नियंत्रण करण्यासाठी व वीजउत्पादन, वाहतूक इ. इतर हेतूंसाठी दामोदर खोरे निगमाची स्थापना होऊन बहूउद्देशीय योजना कार्यान्वित झाली. दामोदर व तिच्या उपनद्यांच्या खोऱ्यांतून लोहमार्ग व सडका यांना सुलभ मार्ग उपलब्ध झाले आहेत.


दामोदर व तिच्या दक्षिणेची कासई या नद्यांदरम्यानचा भूप्रदेश संथाळ लोकांची पवित्र भूमी होय. ते दामोदरला समुद्रच मानतात आणि त्यांच्या मृतांच्या शरीराचा काही जळका भाग त्या नदीत टाकल्यावरच त्याचे और्ध्वदेहिक पुरे होते. तो भाग पुढे महासागरात जातो असे ते मानतात.


 दामोदर खोऱ्याच्या विकास योजनेमुळे तो प्रदेश भारतातील एक अग्रेसर औद्योगिक विभाग बनला आहे. तेथील लोकवस्ती फार दाट (दर चौ.किमी. स ३८४ लोक) आहे.


दामोदर खोऱ्याची भौगोलिक रचना : दामोदर खोऱ्यात अनेक उंचसखल भाग समाविष्ट आहेत. हजारीबाग आणि गया जिल्ह्यांत सु. ३८० मी. उंचीचे कोडार्मा पठार असून ते गिरिदिहकडे विस्तारले आहे. या पठारावर दामोदरची प्रमुख उपनदी बराकर उगम पावते. हजारीबाग पठाराच्या ईशान्य कोपऱ्यात १,३६५·५ मी. उंचीचा पारसनाथचा डोंगर आहे. सिंगभूम, पुरूलिया व रांची यांच्या सीमेवर डास्मा डोंगररांग असून यातून सुवर्णरेखा नदी मार्ग काढते. याच्या दक्षिणेस सिंगभूमच्या सपाट प्रदेशात अनेक अवशिष्ट शैल व माथ्यावर जांभा दगडांचा थर असलेली छोटी पठारे आहेत. चक्रधरपूर व चैबासा यांच्या पश्चिमेस छोटानागपूर पठाराची कड आहे. या पठारावर अनेक उपपठारे असून त्यांपैकी रांची पठार सु. ६१० मी. उंच आहे. ते पश्चिमेस ३१४ मी. पर्यंत उंच होत गेले असून त्यालाही अनेक अवशिष्ट शैल व कटक आहेत. रांची पठाराच्या उत्तरेस हजारीबाग पठार असून दोहोंच्या दरम्यान दामोदर नदी विभंग दरीतून वाहते. 


दामोदर खोऱ्यात हुगळीला मिळणारी दामोदर, बंगालच्या उपसागरास मिळणाऱ्या सुप्रसिद्ध शोण नदीला मिळणारी उत्तर कोएल व महानदीस मिळणारी दक्षिण कोएल या प्रमुख नद्या असून त्यांच्या अनेक उपनद्या आहेत. नद्यांना येणाऱ्या पुरांमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी पूरनियंत्रण हा दामोदर खोरे प्रकल्पाचा एक प्रमुख उद्देश आहे.

शिवालिक नदी :




उत्तर भारतातील जलोत्सारण प्रणालीच्या (नदीनाल्यांच्या) रचनेत अनेक मोठे बदल तृतीय कल्पानंतर (सु. ६·५ ते १·२ कोटी वर्षांपूर्वीच्या काळानंतर) घडून आले. यामुळे तेथील मोठ्या नद्या अगदी उलट दिशेने वाहू लागल्या. हिमालयाच्या पायथ्याशी ⇨ शिवालिक संघाच्या खडकांचा लांब पातळ पट्टा तयार होऊन तो पश्चिमेकडे अधिक रुंद झाला. हे खडक वायव्येकडे वाहणाऱ्या एका मोठ्या नदीच्या पूरभूमीत साचलेले आहेत, असे मानतात. आसाम (पोटवार पठाराच्या पूर्वेकडील ब्रह्मपुत्रा खोरे) ते पंजाबच्या सर्वांत वायव्येकडील कोपऱ्यापर्यंत (पाकिस्तानातील बन्नू मैदानापर्यंत) ही नदी वाहत होती. या बन्नू मैदानात ती दक्षिणेकडे वळून सावकाशपणे आटत असलेल्या मायोसीन (सु. २ ते १·२ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळातील समुद्राला मिळाली होती. जी. ई. पिलग्रिम यांनी गंगा व यमुना नद्यांच्या दरम्यान असलेल्या शिवालिक टेकड्यांवरून या नदीला शिवालिक नदी हे नाव दिले, तर ई. एच्. पॅस्को यांनी सिंधू, गंगा व ब्रह्मपुत्रा यांच्या एकत्रित प्रवाहावरून हिचे इंडोब्राह्म असे नामकरण केले. हिमालयाच्या मुख्य उत्थानानंतर समुद्राच्या अवशिष्ट अरुंद पट्ट्यांतून ही नदी निर्माण झाली, असे मानतात. या नदीच्या त्रिभूज प्रदेशाच्या आक्रमणाने समुद्राचा हा पट्टा सावकाशपणे मागे हटत गेला. येथील विस्तृत द्रोणीत मुरी शिवालिक निक्षेपांचे जाड थर साचले. शिवालिक संघाच्या काळानंतर (सु. १·२ कोटी वर्षांपूर्वी) वायव्य पंजाबात भूकवचात झालेल्या हालचालींनी ही जलोत्सारण प्रणाली भंग पावून सिंधू, तिच्या पाच उपनद्या, गंगा व तिच्या उपनद्या या तीन जलोत्सारण उपप्रणाल्या निर्माण झाल्या. सुमारे १·२ कोटी ते ६ लाख वर्षांपूर्वीच्या प्लाइस्टोसीन हिमयुगात शिवालिक नदी नाहीशी झाली. वायव्य आसामात आढळलेल्या नदीमुखामुळे बंगाल-आसाममधील शिवालिक नदीच्या अस्तित्वाविषयी शंका घेतली जाते. शिवालिक नदीत प्रवेश करणाऱ्या हिमनद्यांमार्फत पंजाबातील पाहुणे पाषाण त्यांच्या सध्याच्या ठिकाणी वाहून आले असल्याचे ए. एल्. कूलसन यांचे मत आहे.

सरमा नदी :

 


भारत व बांगला देशातून वाहणारी व मेघना नदीचा शीर्षप्रवाह असलेली एक नदी. लांबी सु. ९०२ किमी. मणिपूर टेकड्यांमध्ये माओसोंगसंगच्या दक्षिणेस २५० २८' उत्तर अक्षांश व ९४० १८' पूर्व रेखांश यांदरम्यान या नदीचा उगम आहे. ही नदी उत्तर मणिपूर टेकड्यांमधून पश्चिमेकडे वाहत जाऊन मणिपूर राज्याच्या पश्चिम सीमेवर तिपाईमुख येथे उत्तराभिमुख होऊन आसाम राज्यात प्रवेश करते व काचार भागातून वेड्यावाकड्या वळणांनी सुरमा खोऱ्यातून पश्चिमेकडे वाहत जाते. सुरमा खोऱ्यात सिद्घेश्वर (सारसपूर) टेकड्या असून त्यांची सस.पासूनची उंची १८३ मी. ते ६१० मी. दरम्यान आहे. काचारच्या पश्चिम सरहद्दीजवळ सुरमा दोन शाखांत विभागली गेली आहे. तिची दक्षिण शाखा प्रथम कुशियारा नावाने प्रसिद्घ आहे. पुढे तिचे पुन्हा दोन फाटे बराक व बिबियाना नावांनी बांगला देशातून वाहतात. हे पुढे सुरमा नदीच्या उत्तर प्रवाहास मिळतात. सुरमा नदीचा विभागलेला उत्तरेकडील दुसरा प्रवाह सुरमा नावाने खासी टेकड्यांमधून बांगला देशातील सिल्हेट व चाटाक शहरांतून वाहत जातो व सुनामगंजजवळ एकदम दक्षिणेस वाहत जाऊन पुढे ब्रह्मपुत्रेच्या जुन्या प्रवाहास भैरब बाझार येथे मिळतो. तद्नंतरचा हा संयुक्त प्रवाह मेघना नदी या नावाने ओळखला जातो.


सुरमा नदीस उत्तरेकडून जिरी, जटिंगा, बोगापानी, जादूकता, तर दक्षिणेकडून सोनाई, ढालेश्वरी, सिंग्ला, लोंगाई, मनू, खोवाई या महत्त्वाच्या उपनद्या येऊन मिळतात. वरच्या भागात नदी दऱ्याखोऱ्यांतून वाहते. त्यामुळे पुराचे पाणी लगतच्या प्रदेशात क्वचितच पसरते; मात्र हिचा खालचा भाग त्यामानाने उथळ असल्याने पुराचे वेळी पाणी लगतच्या भागात पसरुन काही प्रमाणात नुकसान होते.

 

सुरमा नदीस दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्व असून आसाम-बंगाल लोहमार्ग होण्यापूर्वी या नदीतून जलवाहतूक होत असे. त्या वेळी ती या भागातील दळणवळणाचा प्रमुख मार्ग होती. तुडुंबी, कारग, तिपाईमुख, सिल्वर, बदरपूर, करीमगंज, सिल्हेट, मनुमुख, हबीगंज, बालागंज, सुनामगंज इत्यादी सुरमा नदीकाठावरील काही प्रमुख शहरे होत.

माण नदी :



 महाराष्ट्र राज्यातील भीमा नदीची उजव्या तीरावरील प्रमुख उपनदी. आंधळी धरणाच्या योजनेमुळे हिला महत्त्व प्राप्त झाले असून नदीची लांबी सु. १६० किमी., पैकी सोलापूर जिल्ह्यातील लांबी सु. ८० किमी. आहे. सातारा जिल्ह्याच्या माण तालुक्यात, फलटणजवळच्या डोंगरात हिचा उगम होतो. सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागातून आग्नेय दिशेस वाहत जाऊन पुढे ती सांगली जिल्ह्याच्या खानापूर तालुक्यात प्रवेश करते. सांगली जिल्हाच्या उत्तर भागातून आग्नेय दिशेने थोडे अंतर वहात गेल्यावर ती सोलापूर जिल्ह्याच्या सांगोला तालुक्यात प्रवेशते. सांगोला तालुक्यातून प्रथम पूर्वेस व नंतर ईशान्येस वाहत जाते. पुढे काही अंतर पंढरपूर-मंगळवेढे तालुक्यांच्या सरहद्दीवरून वाहत जाऊन पंढरपूरच्या आग्नेयीस १७ किमी. वर असलेल्या सरकोलीजवळ भीमेला मिळते. नदीचे काठ सपाट व कृषियोग्य असून नदीपात्रात रेती आढळते. बेलवण, खुर्डू, सानगंगा व वांकडी हे प्रवाह माण नदीला मिळत असून ते कोरड्या ऋतूत पूर्ण आटतात. माण तालुक्यातील बोडके गावाजवळ या नदीवर आंधळी धरण बांधावयाची योजना आज अनेक वर्षे रेंगाळत आहे. दहिवडी, म्हसवड, दिघंची, सांगोला ही माण नदीकाठीवरील प्रमुख गावे आहेत.

मांजरा नदी :



महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेश या राज्यांतून वाहणारी गोदावरी नदीची एक प्रमुख उपनदी. वांजरा या नावानेही ती ओळखली जाते. सुमारे ६१६ किमी. लांबीची ही नदी महाराष्ट्र राज्यातील बीड जिल्ह्याच्या पाटोदा तालुक्यात, बालाघाट डोंगररांगेत उगम पावते. सुरुवातीच्या भागात ही पूर्ववाहिनी असून बीड-उस्मानाबाद तसेच बीड-लातूर या जिल्ह्यांची सरहद्द बनली आहे. कासारखेडजवळ ही नदी लातूर जिल्ह्यात प्रवेश करते व जिल्ह्याच्या माध्यातून आग्नेयीस वाहत जाऊन निलंगा गावाजवळ कर्नाटक राज्यात व पुढे बीदरच्या पूर्वेस आंध्र प्रदेश राज्यात जाते. आंध्र प्रदेशातील संगरेड्डीपेटजवळ मांजरा नदी एकदम वळण घेऊन वायव्य दिशेने वाहू लागते. निझामाबाद जिल्ह्यात या नदीवर धरण बांधण्यात आले असून (१९३१) प्रसिद्ध निझामसागर तलाव तयार करण्यात आला आहे. पुढे ही नदी पुन्हा महाराष्ट्र राज्याच्या सरहद्दीपर्यंत येऊन नांदेड जिल्ह्यातील शेळगावपासून ईशान्येस, राज्याच्या सरहद्दीवरून वाहत जाते व याच जिल्ह्यातील कुंडलवाडी गावाजवळ गोदावरी नदीस उजवीकडे मिळते. तेरणा, कारंजा, तावरजा, लेंडी व मन्याड या मांजरा नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत. या नदीस तेरणा नदी लातूर जिल्ह्याच्या सरहद्दीवर निलंग्याच्या पूर्वेस, तर कारंजा नदी आंध्र प्रदेश राज्यात मिळते, लेंडी व मन्याड या नद्या नांदेड जिल्ह्याच्या सरहद्दीवर या नदीला डावीकडून मिळतात.

 

 

मांजरा नदीचा उपयोग प्रामुख्याने जलसिंचनासाठी केला जातो. नदीखोरे सुपीक असल्याने येथील लोकांचा शेती हाच प्रमुख व्यवसाय आहे. या नदीच्या वरच्या खोऱ्यात मुख्यत्वे कापसाचे पीक घेतले जाते, तर खालच्या खोऱ्यात ज्वारी, कडधान्ये, तेलबिया यांचे उत्पादन होते. बहुतेक ठिकाणी नदीकाठ मंद उताराचे असल्याने या नदीचा फेरी वाहतुकीसाठीही थोड्याफार प्रमाणात उपयोग होतो.

काटेपूर्णा नदी :



अकोला जिल्हयाच्या मध्य भागातून वाहणारी पूर्णा नदीची उत्तरवाहिनी उपनदी. लांबी सु.९७किमी.; नदीखोऱ्याचे क्षेत्रफळ १,१६० चौ.किमी. ही वाशिम तालुक्यातील काटा या गावाजवळ अजिंठ्याच्या पर्वतराजीत उगम पावून मंगरुळ, अकोला आणि मुर्तिजापूर या तालुक्यांतून वाहत जाऊन भटोरी गावाजवळ पूर्णेस मिळते. अकोल्यापासून आग्नेयीकडे ३५ किमी. वरील वास्तापूर या गावानजीक या नदीवर मातीचे धरण बांधून अंदाजे २४,००० हेक्टर जमिनीचे क्षेत्र ओलत करण्याची योजना आहे.

भवानी नदी :



 द. भारतातील कावेरी नदीची प्रमुख उपनदी. ही केरळ राज्यातील पालघाट (पालक्काड) जिल्ह्याच्या वेल्लुवनाड तालुक्यात, साइलेंट व्हॅलीच्या जंगल भागात उगम पावते. या पूर्ववाहिनी नदीची लांबी सु. १६९ किमी. आहे. ही नदी पुढे तमिळनाडू राज्याच्या कोईमतूर जिल्ह्यात प्रवेश करीत पूर्व दिशेने वाहत जाऊन भवानी गावाजवळ कावेरी नदीस मिळते. धन्यकोट्टैजवळ मिळणारी मोयार ही भवानी नदीची प्रमुख उपनदी असून कोरंगपल्लम्, कुंदा, पेरिङ्‌गपलम्, सिरुवनी, कूनूर या अन्य नद्याही तिला मिळतात. नैऋत्य मोसमी पर्जन्यकाळात या नदीस मोठे पूरही येतात.


जलसिंचनाच्या दृष्टीने भवानी नदीस महत्त्व आहे. या नदीवर मोयार नदी-संगमाच्या खालील बाजूस सु.२ किमी. व सत्यमंगलमपासून सु. ७ किमी. अंतरावर लोअर भवानी प्रकल्पातील धरण बांधण्यात आले आहे. या धरणापासून ८३,८७० हे. क्षेत्रास पाणीपुरवठ्याची सोय उपलब्ध झालेली आहे. त्यामुळे कोईमतूर जिल्ह्यात कापूस व अन्नधान्याच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेणे शक्य झाले आहे.

महीनदी :



(माही नदी). मध्य प्रदेश, राजस्थान व गुजरात या तीन राज्यांतून वाहणारी नदी. मही नदीची लांबी ५३३ किमी. असून मध्य प्रदेश राज्याच्या धार जिल्ह्यात विंध्य पर्वतात ६१७ मी. उंचीवर ती उगम पावते. या राज्यातून वायव्य दिशेने ती १६० किमी. अंतर वाहत जाते. पुढे राजस्थान राज्यातील डूंगरपूर या जिल्ह्याच्या उत्तरेकडील मेवाड टेकड्यांमुळे ती नैर्ऋत्यवाहिनी होऊन डूंगरपूर व बांसवाडा या जिल्ह्यांच्या सीमेवरून वाहत जाऊन गुजरात राज्याच्या गोध्रा जिल्ह्यात प्रवेशते व पुढे खंबायतच्या आखाताला मिळते. या नदीचे एकूण पाणलोट क्षेत्र ३४,८४२ चौ. किमी. आहे. डाव्या तीरावरील अनास व पानम आणि उजव्या तीरावरील सोम या तिच्या प्रमुख उपनद्या होत. उधानाच्या भरतीच्या वेळी मही नदीमुखातून आत सु. ३२ किमी. पर्यंत पाणी येते.

 

पूर्वीपासून महापूर, खोल दऱ्या व उंच काठ यांसाठी प्रसिद्ध असलेल्या मही नदीवरील जलसिंचन प्रकल्पांमुळे तिला महत्त्व प्राप्त झाले असून राजस्थान व गुजरात राज्यांतील शेतीच्या दृष्टीने ती जास्त उपयुक्त ठरली आहे. गुजरात राज्यात या नदीवर ‘मही प्रकल्प’ ही दोन टप्प्यांची योजना असून पहिल्या टप्प्यात वनकबोरी गावजवळ ७९६ मी. लांब व २०·६ मी. उंचीचा चिरेबंदी बंधारा बांधण्याची योजना आहे. याच्या उजव्या कालव्यामुळे (७४ किमी. लांब) सु. १·८६ लक्ष हे. जमिनीस पाणीपुरवठा होईल. दुसऱ्या टप्यात कडाणाजवळ १,४३० मी. लांब व ५८ मी. उंचीचे माती-काँक्रीटचे संयुक्त धरण बांधलेले असून त्यामुळे ८९,००० हे. क्षेत्रास पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट आहे. यांशिवाय राजस्थान राज्यातील या नदीवरील प्रकल्पांमुळेही त्या राज्याला जलसिंचनाचा लाभ मिळाला आहे.

 

मही नदीचा उल्लेख महाभारतात व पुराणांतही आढळतो. पुराणांत तिला ‘मनोरमा’ असे म्हटले आहे. गुजरात राज्यात मही नदीच्या काठावर नवनाथ, ८४ सिद्ध व इतर देवता यांची मंदिरे आहेत. मिंग्रड, फाझिलपूर, अंगद, मसपूर ही कोळी लोकांची पवित्र स्थळे मही नदीच्या काठावरच आहेत. ‘महिसागर संगम’ या नावाने ओळखले जाणारे खंबायतच्या आखातातील या नदीचे मुख हे पवित्र तीर्थक्षेत्र मानेल जाते.

कदा नदी :



निलगिरीत उगम पावणारी तमिळनाडू राज्यातील नदी. लांबी सु. ११९ किमी. ऊटकमंडच्या आग्नेयीस सु. २४ किमी. वर देवबेट्टा, कौलिनबेट्टा, करायकुडी, पोर्थिमुंड इ. शिखरांच्या १,७०० मी. पेक्षा अधिक उंचीच्या पर्वतप्रदेशात उगम पावणाऱ्या अ‍ॅवलांच व एमेरल्ड या प्रवाहांनी मिळून कुंदा नदी झालेली आहे. तिच्या व दक्षिणेकडील अपर भवानीच्या


कुंदा नदीप्रकल्प


खोऱ्यादरम्यान निलगिरी पठाराच्या नैर्ऋत्येस कुंदा पर्वतरांग आहे. तिच्यात अ‍ॅवलांच, बेअरहिल, माकुर्ती ही २,५०० मी. हून अधिक उंचीची शिखरे असून, त्या भागात नैर्ऋत्य व ईशान्य मान्सूनचा पाऊस दरवर्षी सु. ४०० सेंमी. पडतो. ते पाणी भवानीला आणि कुंदेला मिळते. सिल्लाहल्ला, कनारहल्ला, पेंगुबहल्ला इ. उपनद्यांचे पाणी घेऊन कुंदा अपर भवानीला मिळते. या दोन्ही नद्या मग भवानी या नावाने कावेरीला मिळतात. निलगिरीच्या उभ्या उतारांवरून कुंदा वेगाने खाली येते. मंडनायूजवळ तिला सु. ६६ मी. उंचीचा एक धबधबा आहे. कुंदेच्या परिसरातील वनश्री अत्यंत नयनरम्य आहे.


कुंदेचे पाणी आणि तिचा वेग व शक्ती यांचा उपयोग करून कुंदा योजना किंवा लोअर भवानी योजना १९५६ मध्ये सुरू झाली. या योजनेत लहानमोठी बारा धरणे, यांना जोडणारे सु. ४० किमी. लांबीचे बोगदे, विद्युत्‌गृहे, कालवे इ. असून, चौथ्या पंचवार्षिक योजनेअखेर ११० मेगॅवॉट वीज उत्पादनाचे उद्दिष्ट आहे. पूरनियंत्रण, ७९,००० हे. शेतीला पाणीपुरवठा तसेच अ‍ॅल्युमिनियम, कॉस्टिक सोडा, सिमेंट, कागद इ. उद्योगांना आणि शेकडो खेड्यांना घरगुती वापरासाठी व छोट्या उद्योगधंद्यांसाठी वीजपुरवठा, हे या योजनेचे उद्देश असून, कोलंबो योजनेनुसार या प्रकल्पासाठी कॅनडाचे मोठे साहाय्य झालेले आहे.

सीना नदी :



 भीमा नदीची एक उपनदी. लांबी सु. ३७५ किमी. पाणलोट क्षेत्र सु. १२,७४२ चौ. किमी. महाराष्ट्र राज्याच्या अहमदनगर जिल्ह्यात अहमदनगर शहराच्या उत्तरेस ही नदी उगम पावते. हिचे तीन शीर्षप्रवाह मानले जातात. त्यांपैकी एक अहमदनगर शहराच्या पश्चिमेस जामगावजवळ, तर दुसरे दोन प्रवाह शहराच्या ईशान्येस जेऊर आणि पिंपळगाव उजनीजवळ उगम पावतात. त्यांचा एकत्रित प्रवाह सीना नदी या नावाने ओळखला जातो. सुरुवातीच्या टप्प्यात अहमदनगर शहरापर्यंत ही नदी दक्षिणवाहिनी आहे. तेथून पुढे ती आग्नेयवाहिनी बनते. या टप्प्यात या नदीमुळे अहमदनगर व बीड या जिल्ह्यांची सु. ५५ किमी. लांबीची नैसर्गिक सरहद्द बनली आहे. पुढे अहमदनगर जिल्ह्यातील चोंडी या ऐतिहासिक ठिकाणाजवळ ही नदी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करते. या जिल्ह्यातील खांबेवाडी गावापासून पुढे या नदीमुळे सोलापूर-उस्मानाबाद जिल्ह्यांची सरहद्द बनली आहे. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील म्हैसगावपासून हिचा प्रवाह याच जिल्ह्यातून पुढे वाहत जातो. कर्नाटक राज्य आणि सोलापूर जिल्हा यांच्या सरहद्दीवर कुडल गावाजवळ ही नदी भीमा नदीस मिळते. सीना नदीचे पात्र उथळ असून उन्हाळ्यामध्ये बऱ्याच ठिकाणी ते कोरडे पडते.


मेहेक्री ही सीना नदीची प्रमुख उपनदी असून ती बीड जिल्ह्यामध्ये सांगवीजवळ सीना नदीला डावीकडून मिळते. याशिवाय तलवार, इंचाना, कामुही, भेंडी, नल्की, चांदली इ. तिच्या उपनद्या आहेत. सीना-निमगाव व सीना-कोळेगाव हे या नदीवरील प्रकल्प असून, सीना-कोळेगाव योजनेमुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील सु. ९,३०० हे. क्षेत्र ओलिताखाली आले आहे. चोंडी ( अहमदनगर जिल्हा ), मोहोळ, वडवळ, कुडल (सोलापूर जिल्हा) इ. या नदीवरील महत्त्वाची ठिकाणे आहेत.

लुशाई टेकड्या



लुशाई टेकड्या ईशान्य भारताच्या पर्वतीय प्रदेशातील डोंगर टेकड्या. यांचा विस्तार प्रामुख्याने मिझोराम राज्यात असून त्यांना ‘मिझो टेकड्या’ असेही म्हणतात. आराकान योमा या पर्वतश्रेणीचा हा उत्तरेकडील भाग होय. उत्तर-दक्षिण दिशेत परस्परांना समांतर पसरलेल्या या टेकड्या मुख्यत: तृतीयक कालखंडातील वालुकाश्म व शेल खडकांपासून तयार झाल्या आहेत. या घडीच्या टेकड्यांच्या दक्षिणेस पातकई टेकड्या आहेत. लुशाईच्या पश्र्चिमेस त्रिपुरा सरहद्दीपासून पूर्व सरहद्दीपर्यंत लहानलहान आठ रांगा व दऱ्या आहेत.


जलप्रवाहांच्या खनन कार्यामुळे या टेकड्यांमध्ये तीव्र उताराच्या खोल दऱ्या, घळ्या वव काही ठिकाणी लहान मैदानी द्रोणी प्रदेश तयार झालेले आहेत. या टेकड्यांचे पश्र्चिमेकडील उतार हे पूर्वेकडील उतारांपेक्षा अधिक तीव्र स्वरूपाचे आहेत. पश्चिमेकडे जलप्रवाहांची खोरी रुंद व पूर्वेस अरुंद आढळतात. या प्रदेशात १,३७१ मी. उंचीवर टेकड्यांनी वेढलेली सुपीक गाळाची मैदाने आहेत. मैदानामध्ये चांफाई हे मोठे मैदान (लांबी सु. ११ किमी. व रुंदी ५ किमी.) आहे. गाळाने भरून गेलेल्या पूर्वीच्या सरोवराच्या जागी हे मैदाने तयार झाली असावीत.


या टेकड्यांची सस.पासून सरासरी उंची पश्र्चिमेस ९१४ मी. पासून पूर्वेस १,२१८ मी. पर्यंत आढळते; परंतु काही ठिकाणी मात्र ती १,६७५ मी. पर्यंत वाढत जाते. दक्षिण भागात‘ब्लू मौंटन’ वा ‘फ्वंगपूरी’ (२,१६५ मी.) येथे सर्वाधिक उंची आढळते.


या प्रदेशातील जलप्रणाली गुंतागुंतीची आहे. उत्तरेस सुरमा नदीची उपनदी बराक, दक्षिणेस कलदन व पश्र्चिमेस कर्णफुली या नद्यांनी हा प्रदेश व्यापलेला आहे. उत्तर भागात ढालेश्र्वरी, सोनई व तुइव्हावल या बराक नदीच्या, तर दक्षिण भागात पूर्वेस मट, तुईचुंग, त्याओ, तुईपाई या कलदन नदीच्या आणि पश्र्चिमेकडील जलप्रणालीमध्ये चितगाँगजवळ तुईचंग, कओ, देह फायरंग व तुईलिपनुई या कर्णफुली नदीच्या मुखालगत येऊन मिळणाऱ्या उपनद्या आहेत.


या टेकड्यांच्या प्रदेशातील हवामान मानवी जीवनास प्रतिकूल आहे. खोल दऱ्यांमधून रोगट हवामानामुळे मलेरियाचा प्रादुर्भाव होतो. मार्च-एप्रिलमध्ये वायव्येकडून येणाऱ्याभयानक स्वरूपाच्या वादळी वाऱ्यांचा प्रादुर्भाव होतो. पावसाचे प्रमाण जास्त असल्याने कोरडा दुष्काळ पडत नाही. उतारावर घनदाट सदारहित जंगले, बांबूंची वने व इतर उपयुक्त वृक्ष आहेत. खोलगट भागात पाम व माथ्यावरील भागात ओक, फर, चेस्टनट इ. वृक्ष आढळतात. या प्रदेशात हत्ती, गेंडा, हरिण, वाघ, अस्वले इ. प्राणीही आढळतात. या प्रदेशात बहुतांश आदिवासी लोक रहात असून ते ‘झूम शेती’ करतात. शेतीतून भात, तीळ, ऊस, तंबाखू व संत्री इ. उत्पादने घेतली जातात.


यूनेस्को की विश्व विरासत में शामिल भारतीय धरोहर



1. ताजमहल - उत्तर प्रदेश [1983]


2. आगरा का किला - उत्तर प्रदेश [1983]


3. अजंता की गुफाएं - महाराष्ट्र [1983]


4. एलोरा की गुफाएं - महाराष्ट्र [1983]


5. कोणार्क का सूर्य मंदिर - ओडिशा [1984]


6. महाबलिपुरम् का स्मारक समूह -तमिलनाडू [1984]


7. काजीरंगा राष्ट्रीय उद्यान - असोम [1985]


8. मानस वन्य जीव अभयारण्य - असोम [1985]


9. केवला देव राष्ट्रीय उद्यान - राजस्थान [1985]


10. पुराने गोवा के चर्च व मठ - गोवा [1986]


11. मुगल सिटी, फतेहपुर सिकरी - उत्तर प्रदेश [1986]


12. हम्पी स्मारक समूह - कर्नाटक [1986]


13. खजुराहो मंदिर - मध्यप्रदेश [1986]


14. एलीफेंटा की गुफाएं - महाराष्ट्र [1987]


15. पट्टदकल स्मारक समूह - कर्नाटक [1987]


16. सुंदरवन राष्ट्रीय उद्यान - प. बंगाल [1987]


17. वृहदेश्वर मंदिर तंजावुर - तमिलनाडू [1987]


18. नंदा देवी राष्ट्रीय उद्यान - उत्तराखंड [1988]


19. सांची का बौद्ध स्मारक - मध्यप्रदेश [1989]


21. हुमायूँ का मकबरा - दिल्ली [1993]


22. दार्जिलिंग हिमालयन रेल - पश्चिम बंगाल [1999]


23. महाबोधी मंदिर, गया - बिहार [2002]


24. भीमबेटका की गुफाएँ - मध्य प्रदेश [2003]


25. गंगई कोड़ा चोलपुरम् मन्दिर - तमिलनाडु [2004]


26. एरावतेश्वर मन्दिर - तमिलनाडु [2004]


27. छत्रपति शिवाजी टर्मिनल - महाराष्ट्र [2004]


28. नीलगिरि माउंटेन रेलवे - तमिलनाडु [2005]


29. फूलों की घाटी राष्ट्रीय उद्यान - उत्तराखंड [2005]


30. दिल्ली का लाल किला - दिल्ली [2007]


31. कालका शिमला रेलवे -हिमाचल प्रदेश [2008]


32. सिमलीपाल अभ्यारण्य - ओडिशा [2009]


33. नोकरेक अभ्यारण्य - मेघालय [2009]


34. भितरकनिका उद्यान - ओडिशा [2010]


35. जयपुर का जंतर-मन्तर - राजस्थान [2010]


36. पश्चिम घाट [2012]


37. आमेर का किला - राजस्थान [2013]


38. रणथंभोर किला - राजस्थान [2013]


39. कुंभलगढ़ किला - राजस्थान [2013]



40. सोनार किला - राजस्थान [2013]


41. चित्तौड़गढ़ किला - राजस्थान [2013]


42. गागरोन किला - राजस्थान [2013]


43. रानी का वाव - गुजरात [2014]


44. ग्रेट हिमालय राष्ट्रीय उद्यान - हिमाचल प्रदेश [2014]


भारतातील लोकनृत्ये:



🔸महाराष्ट्र* --- लावणी, कोळी नृत्य


🔶 *तामिळनाडू* --- भरतनाट्यम


🔶 करळ --- कथकली


🔶 *आंध्र प्रदेश* --- कुचीपुडी, कोल्लतम


🔶 *पंजाब* --- भांगडा, गिद्धा


🔶 *गुजरात* --- गरबा, रास


🔶 *ओरिसा* --- ओडिसी


🔶 *जम्मू आणी काश्मीर* --- रौफ


🔶 *आसाम* --- बिहू, जुमर नाच


🔶 *उत्तरखंड* --- गर्वाली


🔶 *मध्य प्रदेश* --- कर्मा, चार्कुला


🔶 *मेघालय* --- लाहो


🔶 *कर्नाटक* --- यक्षगान, हत्तारी


🔶 *मिझोरम* --- खान्तुंम


🔶 *गोवा* --- मंडो


🔶 *मणिपूर* --- मणिपुरी


🔶 *अरुणाचल प्रदेश* --- बार्दो छम


🔶 *झारखंड*---- कर्मा


🔶 *छत्तीसगढ* --- पंथी


🔶 *राजस्थान* --- घूमर


🔶 *पश्चिम बंगाल* --- गंभीरा


🔶 *उत्तर प्रदेश* --- कथक


जागतिक वारसा स्थळ



युनोची संघटना यूनेस्को सांस्कृतिक अथवा निसर्ग वारसा यादी तयार करते, सध्या जगत 1031 वारसा स्थळे यादीत आहेत, जगात 

इटली (51), चीन (48), 

स्पेन (48), फ्रांस (41), 

जर्मनी (40), मेक्सिको (33), 

भारत (32), जगात भारत सातव्या क्रमांकावर आहे. आशियात चीनमध्ये सर्वात जास्त स्थळे आहेत.

  

वारसा स्थळे घोषित करण्यामागे त्या स्थळांचे संरक्षण आणि संवर्धन करणे आणि पुढच्या पिढ्यापर्यंत हा अमुल्य वारसा सुपूर्द करणे ही उद्दिष्टे आहे.

  

भारतात सर्वप्रथम 1983 मध्ये आगर्‍याचा किल्ला व अजंठा लेणी या दोन स्थळाचा यादीत समावेश करण्यात आला, सध्या भारतात 32 स्थळे यादीत आहेत. त्यापैकी 25 सांस्कृतिक वारसा स्थळ आहेत, तर 7 निसर्गस्थळे आहेत.

  

महाराष्ट्रात सर्वाधिक चार स्थळे आहेत. (अजंठा व वेरूळ लेणी (1983), घारापुर लेणी (1987), छत्रपती शिवाजी टर्मिनल स्टेशन (मुंबई) 2004)

  

दिल्लीमध्ये कुतुबमिनार, हुमायुचा मकबरा, लाल किल्ला ही स्थळे आहे.

  

मध्य प्रदेशमध्ये भीम बेरकांच्या अश्मकालीन गुफा, सांचीचा स्तूप खजुराहोची मंदिरे आहेत.

  

राजस्थानमध्ये केवलदआ राष्ट्रीय उद्यान, जंतरमंतर खगोल प्रयोगशाळा चित्तोड, गाग्रोन, जैसलमेर कुंभलगड, अंबर, रणथंबोर हे किल्ले आहे.  

  

उत्तर प्रदेशमध्ये आगर्‍याचा किल्ला, फतेहपूर सिक्री, ताजमहल ही स्थळे आहे.

  

आसाममध्ये काझीरंगा, मानसा अभयारण्य ही स्थळे आहेत.

  

गुजरातमध्ये रानी की वाव, चंपानेर-पावागड पुरातत्व परिसर ही स्थळे आहे.

  

कर्नाटकमध्ये विजयनगर साम्राज्याची राजधानी हम्पी, पट्टडकल येथील चालुक्यांची मंदिरे ही स्थळे आहे.

  

तामीळनाडूमध्ये तंजावर गंगाईकोंड चोल पूरम व दोरयसम येथील मंदिर, महाबलीपूरम ही स्थळे आहे.

भारतातील प्रमुख जमाती



जमात                  राज्य


अबोर                  अरुणाचल प्रदेश

आपातनी             अरुणाचल प्रदेश

आओ                  नागाल्यांड

अंगामी                 नागाल्यांड

कोल                   छत्तीसगढ

कोटा                   तामिळनाडू

मुंडा                    झारखंड 

कोलाम                आंध्र प्रदेश

छुतीया                आसाम

चेंचू                     आंध्र प्रदेश

गारो                    मेघालय, आसाम, नागाल्यांड

बैगा                     छत्तीसगढ,झारखंड

भिल्ल                    राजस्थान, छत्तीसगढ

बदगा                   निलगिरी पर्वत तामिळनाडू

भोट                    हिमाचल प्रदेश

लेपचा                  सिक्कीम

वारली                  महाराष्ट्र

चकमा                  त्रिपुरा

गड्डी                     हिमाचल प्रदेश

जयंती                  मेघालय

बोदो                    आसाम

खासी                  आसाम, मेघालय, नागाल्यांड

गोंड                     महाराष्ट्र, झारखंड, छत्तीसगढ

लुशिया                 त्रिपुरा

मोपला                  केरळ

भुतिया                  उत्तरांचल

जारवा                   छोटे अंदमान

कुकी                    मणिपूर

कुरुख                  झारखंड, ओरीसा

अका,मिश्मी,         अरुणाचल प्रदेश

डाफला                अरुणाचल प्रदेश

कोरबा                 छत्तीसगड, महारष्ट्र

हो                       छोटा नागपूर

मुरीया                  बस्तर छोटा नागपूर

संथाल                  वीरभूम,झारखंड

गुज्जर                  हिमाचल प्रदेश

खोंड                     ओरिसा

मिकिर                  आसाम

उरली                  केरळ

मीना                    राजस्थान

ओरेओन              पश्चिम बंगाल, झारखंड

तोडा                    निलगिरी पर्वत तामिळनाडू


भारतातील महत्वाचे जलविद्युत प्रकल्प



* मुचकुंदी प्रकल्प 

मुचकुंदी नदीवरील आंध्रप्रदेश व ओरिसा या राज्यांचा संयुक्त प्रकल्प. जलपुत येथे मुचकुंदी नदीवर धारण. मुख्य उद्देश वीजनिर्मिती.


* श्रीशैलम प्रकल्प

आंध्र प्रदेश कृष्ण नदीवर मुख्य उद्देश वीजनिर्मिती.


* बियास प्रकल्प

पंजाब, हरियाना व राजस्थान यांचा संयुक्त प्रकल्प. यामध्ये बियास सतलज जोड कालवा व बियास नदीवरील पोंग येथील धरणाचा समावेश होतो.


* भाक्रा-नानगल

पंजाब, हिमाचल प्रदेश, राजस्थान व हरियाना यांचा संयुक्त प्रकल्प. सतलज नदीवर हिमाचल प्रदेशात ' भाक्रा व पंजाब मध्ये नानगल अशी दोन धरणे भारताची सर्वात मोठी बहुददेशीय योजना. भाक्रा हे देशातील सर्वात उंच धरण आहे. उंची २२६ मीटर.


* दामोदर खोरे योजना

पश्चिम बंगाल व विभाजनापूर्वी बिहारमधील संयुक्त प्रकल्प. जलसिंचन, वीजनिर्मिती, पूरनियंत्रण, इत्यादी, या प्रकल्पाचे व्यवस्थापन दामोदर खोरे महामंडळ तर्फे केले जाते. अमेरिकेतील प्रसिद्ध टेनेसी व्हाली च्या धर्तीवर रचना.

 

* फराक्का योजना 

हि योजना पश्चिम बंगालमध्ये राबविली जात असून या योजनाअंतर्गत गंगा नदीवर फराक्का येथे व भागीरथी नदीवर जांगीपूर येथे धरणे बांधली आहेत. हुगळी नदीचा प्रवाह कायम राखणे व कोलकाता बंदराची व्यवस्था राखणे हे या योजनेमागचे उद्देश आहेत.

 

* हिराकूड 

प्रकल्प ओरिसा राज्यात आहे. संबळपूरजवळ महानदीवर जगातील सर्वाधिक लांबीचे धरण बांधले जाते. धरणाची लांबी २५.४०  कि मी आहे.


* चंबळ योजना

हि मध्य प्रदेश व राजस्थान ची संयुक्त योजना असून या योजनेंतर्गत चंबळ नदीवर रानाप्रतापसागर व जवाहरसागर कोटा दोन धरणे राजस्थान व गांधीसागर हे धरण मध्य प्रदेशात बांधले आहे. मुख्य उद्देश वीजनिर्मिती आहे.


* उकाई प्रकल्प

तापी नदीवरील गुजरात राज्यातील बहुद्देशीय प्रकल्प होय.

 

* कोसी प्रकल्प

विभाजनापूर्वी बिहार व नेपाळ सरकारची संयुक्त संस्था. गंडकी नदीवर वाल्मिकी नदीवर धरण.


* नागार्जुनसागर

आंध्रप्रदेशात कृष्णा नदीवर नंदिकोंडा येथे धरण.

वारणा नदी



सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांच्या सीमेवरून वाहणारी कृष्णा नदीची महत्त्वाची उपनदी. या नदीचा उगम सह्याद्री पर्वतातील पथरपुंज पठाराजवळ प्रचितगडावर सस. पासून ९१४ मी. उंचीच्या प्रदेशात होतो. प्रथम वारणा नदी वायव्येकडून आग्नेयीकडे व नंतर पूर्वेकडे वाहते.

ती  कृष्णा नदीस सांगली शहराच्या नैर्ऋत्येस सु. दीड किमी. अंतरावर सस. पासून ५८४ मी. उंचीच्या प्रदेशात हरिपूर येथे मिळते. संगमाजवळ वारणा नदीचे पात्र ७० मी. रुंद आहे.

काडवी व मोरणा या वारणेच्या प्रमुख उपनद्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील काडवी नदीचा उगम सह्याद्री पर्वतात आंबा घाटाजवळ सु. ७०० मी. उंचीच्या प्रदेशात होतो.

सुमारे ३५.४ किमी. वाहून काडवी नदी सागाव जवळ वारणा नदीस मिळते. काडवी नदी मिळाल्यावर तिचा प्रवाह बराच विस्तारित होतो. काडवी नदी वारणा नदीस जवळजवळ समांतर वाहते. पोटफुगी, आंबरडी, अंवीर व कांद्रा हे प्रमुख ओढे काडवी नदीस मिळतात.

सांगली जिल्ह्यातील मोरणा ही वारणेची दुसरी महत्त्वाची उपनदी. या नदीचा उगम धामवडे टेकडीजवळ होतो. ही नदी दक्षिणेस व आग्नेयीस वाहते. या नदीची लांबी सु. २७.३५ किमी. आहे. तिच्या खोऱ्यात विस्तृत पानमळे आढळतात. शिराळा तालुक्यातील मांगळे गावाजवळ मोरणा नदी वारणेस मिळते. उजव्या बाजूने कानसा नदी उदगिरीपासून २० किमी. वाहत जाऊन पन्हाळा तालुक्यात माळेवाडी-जवळ वारणेस मिळते. शाली व अंबार्डी या वारणेच्या इतर उपनद्या होत.

वारणा खोऱ्याचा विस्तार सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यांत झाला असून त्याचा अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार अनुक्रमे १६०४७' उ. ते १७०१५' उ. आणि ७३०३०' १५" पू. ते ७४०३०' पू. यांदरम्यान आहे. या खोऱ्याची लांबी १४९ किमी., सरासरी रुंदी २१ किमी. व एकूण क्षेत्र २,०९५ चौ. किमी. आहे. वारणा खोऱ्यात शिराळा, वाळवा, मिरज (जि. सांगली), शाहूवाडी, पन्हाळा, हातकणंगले, शिरोळ (जि. कोल्हापूर), पाटण (जि.सातारा) या आठ तालुक्यांचा समावेश होतो.

भूवैज्ञानिक दृष्ट्या वारणा खोरे दख्खन ढाली प्रदेशात वायव्य भागात येते. वारणा नदीच्या खोऱ्यात विविध प्रकारची भूरूपे असल्याने येथील स्थलाकृती अत्यंत गुंतागुंतीची आहे. पश्चिमेकडे कोकण व पूर्वेकडे दख्खन पठार यांदरम्यानच्या संक्रमण पट्ट्यात वारणा खोरे असल्याने दोन्ही प्राकृतिक विभागांतील गुणधर्म वारणेच्या खोऱ्यात आढळतात. खोऱ्यातील पश्चिमेकडील प्रदेश पूर्वेकडील प्रदेशापेक्षा जास्त उंचसखल  आहे.

वारणेचे खोरे पश्चिम घाटामुळे पर्जन्यछायेच्या प्रदेशात येते, त्यामुळे पाऊस कमी पडतो. मॉन्सून काळात पाऊस पडतो, परंतु इतर कालावधी कोरडा असल्याने वारणेच्या खोऱ्यातील नद्यांना पावसाळा वगळता इतर काळात पाणी फारच कमी असते.

वारणा नदीचे खोरे सुपीक आहे. भात, ज्वारी, ऊस, भुईमूग ही महत्त्वाची पिके या खोऱ्यात होतात. शाहूवाडी तालुक्यात आंबोळी येथे वारणा नदीवर एक मोठा प्रकल्प आणि सांगली जिल्ह्यात चांदोली व शिराळा तालुक्यात वारणा पाटबंधारे हा मोठा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. मोरणा नदीवर शिराळा तालुक्यातील प्रकल्प, तर शाहूवाडी तालुक्यात पोटफुगी नदीवर काडवी प्रकल्प पूर्ण करण्याची योजना आहे.

यांशिवाय वारणेच्या खोऱ्यात अनेक कोल्हापूरी बंधारे व काही लघू पाटबंधारे प्रकल्प पूर्ण झालेले आहेत, तसेच वारणानगर (कोडोली) सारखी गावे उद्योगधंद्यांमुळे विकास पावली आहेत. या खोऱ्यातील खेड्यांना जोडणारे अनेक पक्के रस्ते, जिल्हा प्रमुख रस्ते व ग्रामीण रस्ते आहेत. परंतु या खोऱ्यात लोहमार्ग व हवाई वाहतूक यांची सोय नाही. कोल्हापूर, मिरज, सांगली ही या खोऱ्यातील लोकांना जवळची रेल्वेस्थानके आहेत.