15 November 2020

अमेरिकेतील सहावीच्या अभ्यासक्रमात भारतीयाच्या जीवनावर आधारित धडा.




भारताचे वनपुरुष म्हणजेच ‘फॉरेस्ट मॅन ऑफ इंडिया’ म्हणून लोकप्रिय असणाऱ्या जादव यांनी एकट्याने संपूर्ण जंगल उभारलं आहे असं सांगितल्यास तुम्हाला आश्चर्य वाटेल. 


पायेंग यांच्या या कामाची दखल आता थेट पाश्चिमात्य देशांकडून घेण्यात येत आहे. नुकताच अमेरिकेतील एका अभ्यासक्रमामध्ये पायेंग यांच्या कार्याबद्दल माहिती देणाऱ्या एका धड्याचा समावेश करण्यात आला आहे.


कनेक्टीकटमधील ब्रिस्टोल येथील ग्रीन हिल्स स्कूलने सहावीच्या अभ्यासक्रमामध्ये पायेंग यांच्या कामासंदर्भातील धड्याचा समावेश केला आहे. इकोलॉजी म्हणजेच पर्यावरणशास्त्रामध्ये या धड्याचा समावेश करण्यात आला आहे. 


आता येथील मुलं पद्मश्री पुरस्कारप्राप्त पायेंग यांच्या कार्याबद्दल शिकणार आहेत.

जगभरामध्ये पर्यावरणासंदर्भात अनेक गोष्टी घडत असतानाच वातावरणातील बदलांसंदर्भात चिंता व्यक्त केली जात आहे.


पर्यावरणाबद्दल संवेदनशील राहण्यासंदर्भात लहान मुलांना शालेय वयामध्येच शिक्षण देण्याच्या उद्देशाने जगभरामध्ये प्रयत्न सुरु आहेत. अशा मुलांसमोर वयाच्या 16 वर्षापासूनच पर्यावरण संरक्षणाचे काम करणाऱ्या पायेंग यांच्यापेक्षा अधिक चांगले उदाहरण कोणाचे असू शकते. 


पायेंग यांच्या कार्याने मुलांनाही प्रेरणा मिळेल या उद्देशाने त्यांच्या आयुष्यावरील धड्याचा अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्यात आला आहे.


जादव यांनी एकट्याने उभ्या केलेल्या जंगलाला मोलाईचे जंगल असं म्हणतात. या जंगलाचा आकार न्यू यॉर्कमधील सेंट्रल पार्कपेक्षाही मोठा आहे. हे जंगला आता बंगाल टायगर, भारतीय गेंडे, वेगवेगळ्या प्रकारचे सरपटणारे प्राणी आणि 100 हून अधिक प्रजातीची हरणं आणि ससे यांचा अधिवास आहे.

केरळमध्येही आता सीबीआयला राज्यात सामान्य परवानगीला स्थगिती दिली आहे.


त्यामुळे राज्यात जर चौकशी करायची असल्यास सीबीआयला केरळ सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे. 


सीबीआयला विरोध करणारे  केरळ हे चौथं राज्य ठरले आहे


केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन


👇CBI ला विरोध करणारी 4 राज्ये:-


✔️पश्चिम बंगाल

 

✔️राजस्थान  


✔️महाराष्ट्रानंतर 


✔️ करळ

14 November 2020

MPSC बद्दल काही गोष्टी


📌 एकच पुस्तक 10 वेळा वाचा...... 


📌 जवढे जास्त question सोडवाल तेवढा जास्त result चे chance आहे


📌 आयोगाचे जुने झालेले सर्व Question  पेपर सोडवून घ्या( पाठ करा) कमीत कमी 20% तरी question दर वर्षी पुन्हा तेच येतात...


📌 पास होणारे व पास न होणारे  सर्वजण एकच books वापरत असतात त्यामुळे कोणी वेगळी पुस्तके वाचून पास होत नाही....


📌 जवढी जास्त revision कराल तेवढा विषय सोपा वाटू लागतो..


📌 इतिहास आणि विज्ञान जास्त Output देत नाहीत यांना जास्त वेळ देऊ नका कारण प्रश्न काहीही विचारतात...


📌 भगोल , polity आणि इकॉनॉमिक्स , current 4  विषय strong ठेवा


📌 अभ्यासात सातत्य नसेल तर पास होणारच नाही हे नेहमी लक्षात ठेवा..


📌 MPSC ची कोणती post कमी जास्त नाही सर्व चांगल्याच आहेत....


📌 पर्व परीक्षेत CSAT शिवाय पास होताच येत नाही.. त्याचा अभ्यास करत जा (combine साठी बुद्धिमत्ता)


📌 काही गोष्टी समजल्या नाही तर पाठ करा कारण paper objective आहे


📌 वाचून काही आठवत नसेल तर काही प्रॉब्लेम नाही परीक्षेत पर्याय पाहिलं की बरोबर उत्तर आठवत. .(यासाठी revision करा जास्त)


📌 Syllabus ची कॉपी नेहमी जवळ ठेवा.

लोणार सरोवर आता रामसर पाणथळ क्षेत्र म्हणून ओळखले जाणार




🔸लोणार सरोवर हे आता रामसर पाणथळ क्षेत्र म्हणून ओळखले जाणार असल्याची घोषणा राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली आहे. 


🔷महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात असलेले लोणार सरोवर राज्यातील सात आश्चर्यांपैकी मानले जाते. 


🔸लोणार सरोवर नेमके वय किती, यावरून मतमतांतरे आहे. सरोवराचे वय मोजण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरल्या गेल्या आहेत. एक म्हणजे थर्मोलोमिनेसेन्स विश्लेषण पद्धत. 


🔰यानुसार, लोणार सरोवर ५२ हजार वर्षे जुना आहे. परंतु, आजच्या काळात सर्वांत अचूक मानल्या जाणाऱ्या ऑर्गन डेटिंगनुसार, लोणार सरोवराची निर्मिती ही सुमारे ५ लाख ७० हजार वर्षांपूर्वी झाली असावी, असे सांगितले जाते. २०१० मध्ये यासंदर्भातील संशोधन करण्यात आले होते.

'प्लाझ्मा जेट'चा शोध; ३० सेकंदात होणार कोरोनाचा खात्मा


⚡️ कोरोना संकटातून लवकर मुक्तता होण्यासाठी जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोना प्रतिबंधक लस शोधण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. 


💁‍♂️ अनेक देशांमध्ये या लसींची चाचणी देखील सुरु आहे. त्यातील काही लसी चाचणीच्या अंतिम टप्प्यात आहे. हे संशोधन सुरु असतानाच वैज्ञानिकांनी कोरोनाचा विषाणू नष्ट करण्याची क्षमता प्लाझ्मा जेटमध्ये असल्याचा दावा केला आहे.


👉 अवघ्या ३० सेकंदांमध्ये प्लाझ्मा जेटच्या मदतीने कोरोना विषाणूचा खात्मा होत असल्याचा दावा वैज्ञानिकांनी केला आहे.


💫 अमेरिकेतील लॉस एन्जलिसमधील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियामध्ये करण्यात आलेल्या संशोधनामध्ये प्लाझ्मा जेटच्या मदतीने धातू, चामडे आणि प्लास्टिकवर असणारा कोरोना अवघ्या ३० सेकंदांमध्ये नष्ट करता येतो.


🎉 थरी-डी प्रिंटरच्या मदतीने हा प्लाझ्मा जेट संशोधकांनी तयार केला आहे. या प्लाझ्मा जेटची पहिली चाचणी यशस्वी ठरली आहे.


👀 पलाझ्मा जेटचा स्प्रे संशोधनामध्ये प्लास्टिक, धातू, कार्डबोर्ड आणि चामड्यावर मारण्यात आला. कोरोनाचा विषाणू हा यामध्ये तीन मिनिटांपेक्षा कमी कालावधीमध्ये नष्ट करण्यात यश आल्याचे दिसून आले.


📌 बहुतांश विषाणू हे ३० सेकंदांमध्ये नष्ट झाले. यासंदर्भातील संशोधनाचा अहवाल फिजिक्स ऑफ फ्लुएड्स नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्राप्त आंतरराष्ट्रीय पुरस्कार



🏆 ऑर्डर ऑफ अब्दुल्लाझिझ अल सौद 

🔰 दश : सौदी अरेबिया


🏆 सटेट ऑर्डर ऑफ गाझी आमीर अम्मानुल्लाह खान 

🔰 दश : अफगाणिस्तान 


🏆 गरँड कॉलर ऑफ दी स्टेट ऑफ पॅलेस्टाईन पुरस्कार 

🔰 दश : पॅलेस्टाईन


🏆 ऑर्डर ऑफ झायेद 

🔰 दश : संयुक्त अरब अमिरात 


🏆 सियोल शांती पुरस्कार 

🔰 दश : दक्षिण कोरिया


🏆 य एन चँपियन्स ऑफ द अर्थ 

🔰 सस्था : संयुक्त राष्ट्र 


🏆 गलोबल गोलकीपर पुरस्कार 

🔰 सस्था : बिल और मेलिंडा गेट्स फाउंडेशन


🏆 किंग हमाद ऑर्डर ऑफ द रेनेसां

🔰 दश : बहरीन


🏆 निशान इज्जुद्दीन पुरस्कार

🔰 दश : मालदीव


🏆 ऑर्डर ऑफ सेंट एंड्रयू 

🔰 दश : रशिया


🏆 टाईम्स पर्सन ऑफ द ईयर : २०१६ .

काही महत्त्वपुर्ण व्यक्ती व त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट



🔰 दगल : गीता - बबिता फोगाट 

🔰 अझहर : मोहम्मद अझरुद्दीन 

🔰 नीरजा : नीरजा भनोत 

🔰 सरबजीत : सरबजीत सिंह 

🔰 अलिगढ : डॉ श्रीनिवास सिरस 

🔰 मरी कॉम : मेरी कॉम 

🔰 मांझी : दशरथ मांझी 

🔰 भाग मिल्खा भाग : मिल्खा सिंह

🔰 बांदीत क्वीन : फुलन देवी

🔰 हरीशचंद्राची फॅक्टरी : दादासाहेब फाळके

🔰 मटो : सादत हसन मंटो

🔰 शाबाश मिठू : मिताली राज

🔰 शरशाह : कैप्टन विक्रम बत्रा

🔰 "८३ : कपिल देव

🔰 झलकी : कैलाश सत्यार्थी

🔰 सरमा : संदिप सिंह

🔰 मदान : सय्यद अब्दुल रहमान

🔰 थलाईवी : जे जयललिता

🔰 गल मकई : मलाला युसुफजाई .

online Test Series

भारत ‘या’ देशाला विकणार घातक ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्र.


🔶‘ब्रह्मोस’ हे भारताच्या ताफ्यातील सर्वात घातक क्रूझ क्षेपणास्त्र आहे.


🔶 भारत लवकरच हे क्षेपणास्त्र निर्यात करु शकतो. पुढच्यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फिलिपिन्सचे राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो ड्युटर्ट यांच्यात एक परिषद होणार आहे. त्यावेळी दोन्ही देशांमध्ये ‘ब्रह्मोस’च्या निर्याती संदर्भात महत्त्वाचा करार होऊ शकतो.


🔶तर हा करार प्रत्यक्षात आल्यास फिलिपिन्स हा ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्र विकत घेणारा भारताचा पहिला ग्राहक ठरेल.‘ब्रह्मोस’ हे भारत आणि रशियाने मिळून विकसित केलेले क्षेपणास् आहे. ब्रह्मोस एरोस्पेसची एक टीम पुढच्या महिन्यात डिसेंबरमध्ये या करारासंदर्भात मनिलाला जाऊ शकते.


🔶 तसेच दोन्ही देशांमध्ये हा करार होण्याआधी काही मुद्दे आहे, त्यावर तोडगा काढण्यासाठी ही टीम मनिलाला जाणार आहे. फिलिपिन्सच्या लष्कराला जमिनीवरुन जमिनीवर हल्ला करणाऱ्या ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्राच्या आवृत्तीचा पुरवठा करण्यात येईल.


🔶हवेतून जमिनीवर मारा करणारे ब्रह्मोस हे भारताचे सर्वात घातक क्रूझ क्षेपणास्त्र आहे. 300 किलो वॉरहेड वाहून नेण्याची क्षमता असलेले हे क्षेपणास्त्र हिंदी महासागरातील चिनी युद्धनौका तसेच तिबेट आणि शिनजियांगमधील चीनच्या धावपट्टया उद्धवस्त करु शकते.


🔶तर या क्षेपणास्त्राचे वैशिष्टय म्हणजे सुखोई Su-30 MKI या फायटर जेटमधूनही हे क्षेपणास्त्र डागता येते. त्यामुळे ब्रह्मोसमधून होणारा हल्ला अधिका घातक असेल. 


🔶 चीन बरोबर सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने लडाखमध्येही हे क्षेपणास्त्र तैनात केले आहे. “भारत आणि रशिया मिळून या क्षेपणास्त्राचा पल्ला वाढवण्यावर काम करत

13 November 2020

परसिद्ध व्यक्तींचे मृत्यू


🔴 महत्वाचे प्रश्न 🔴


❇️परश्न 1️⃣:- सुशांतसिंग राजपुतने अभिनयाची सुरुवात खालीलपैकी कोणत्या मालिकेतून केली?


१) किस देश मे है मेरा दिल✅✅

२)पवित्र रिस्ता

३) जरा जिके दिखा

४) यापैकी नाही


❇️परश्न 2️⃣:-अभिनेता इरफान खान यांचा पहिला चित्रपट कोणता?


१)हासिल

२) चाणक्य

३) सलाम बॉम्बे✅✅

४) बनगी आपनी बात


❇️परश्न 3️⃣:- रत्नाकर मतकरी यांनी खालीलपैकी कोणत्या बँक मध्ये काम केले होते?


१) बँक ऑफ बडोदा

२) बँक ऑफ महाराष्ट्र

३) बँक ऑफ इंडिया ✅✅

४) स्टेट बँक ऑफ इंडिया


❇️परश्न 4️⃣:-आत्मनेपदी हे मनोगत खालीलपैकी कोणाचे आहे?


१)रत्नाकर मतकरी✅✅

२) जयराम कुलकर्णी

३) पाटील संजय

४) यापैकी नाही


❇️परश्न 5️⃣:- चल रे लक्ष्या मुंबई ला हे नाटक कोणाचे आहे ?


१) रत्नाकर मत्कारी

२) जयराम कुलकर्णी ✅✅

३) अर्जुन गाडगीळ

४) उत्तम तुपे


❇️परश्न 6️⃣:-  ऋषी कपूर यांचा शेवटचा चित्रपट कोणता?


१) शर्माजी नमकीन

२) सलामत

३) अग्निपथ

४) द बॉडी✅✅


 ❇️परश्न 7️⃣ :- रणजी स्पर्धा मध्ये सर्वाधिक बळी कोनि मिळवले आहेत?


१) राजेंद्र गोयल✅✅

२) रणजित गोयल

३) जितेंद्र गोयल

४) यापैकी नाही



 ❇️परश्न 8️⃣:- प्रसिद्ध संगीतकार वाजीद खान यांचे शेवटचे गाणे कोणते?


१) तुमको चाहते है

२) हम आपके है

३) भाई भाई✅✅

४) यापैकी नाही


 ❇️परश्र 9️⃣ :- इरफान खान यांनी खालीलपैकी कोणत्या मालिकेतून सिनेसृष्टीत प्रवेश केला?


१) सलामत

२) भारत एक खोज

३) जय हनुमान

४) चाणक्य ✅✅


 ❇️परश्न १० :- अरुण जेटली यांनी खालीलपैकी कोणते पद भूषवले नाही?


१) कायदा व न्याय मंत्री

२) वित्त मंत्री

३) संरक्षण मंत्री

४) गृह मंत्री ✅✅


चालू घडामोडी चे 10 प्रश्न व उत्तरे


Q1) कोणत्या व्यक्तीची रोखे बाजारच्या आकडेवारीसाठी धोरणांची शिफारस करण्यासाठी SEBI संस्थेनी नेमलेल्या समितीच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली?

------- माधबी पुरी बुच


Q2) कोणत्या संस्थेच्यावतीने 'मेरी सहेली' उपक्रम चालवला जात आहे?

------ रेल्वे सुरक्षा दल


Q3) एशिया पॉवर इंडेक्स 2020’ यामधल्या सामर्थ्यशाली देशांच्या यादीत भारताचा क्रमांक कोणता आहे?

------- 4 था क्रमांक


Q4) कोणत्या व्यक्तीला वैद्यकीय संशोधनासाठी "आउटस्टँडिंग यंग पर्सन ऑफ द वर्ल्ड 2020" या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले?

-------  जाजिनी व्हर्गीस


Q5) भारतीय हवाई दलात सेवा दिलेल्या पहिल्या महिला अधिकारीचे नाव काय आहे, ज्यांचे नुकतेच निधन झाले?

------- विजयालक्ष्मी रामानन


Q6) कोणत्या मंत्रालयाच्यावतीने “लाइफ इन मिनीएचर” प्रकल्पाचा आरंभ करण्यात आला आहे?

-------- सांस्कृतिक मंत्रालय


Q7) कोणत्या संस्थेनी ‘स्टेट ऑफ द ग्लोबल एअर (SOGA) 2020’ अहवाल प्रसिद्ध केला?

--------  हेल्थ इफेक्ट इंस्टीट्यूट


Q8) मानवी शरीराच्या कोणत्या भागात “ट्युबरिअल सलायवरी ग्लॅंड” आहे?

---------  ग्रसनी यामध्ये


Q9) 'पोर्ट्रेट्स ऑफ पॉवर’ हे कोणत्या भारतीयाचे आत्मचरित्र आहे?

-------- एन. के. सिंग (15 व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष )


Q10) कोणत्या कंपनीची निवड NASA संस्थेनी चंद्रावर 4G सेल्युलर नेटवर्क तैनात करण्यासाठी केली?

--------  नोकिया


Q1) कोणत्या राज्य सरकारने जमीन व मालमत्ता-संबंधित सर्व माहिती ऑनलाइन मिळविण्यासाठी ‘धरणी’ संकेतस्थळ तयार केले?

------- तेलंगणा


Q2) कोणत्या व्यक्तीच्या स्मरणार्थ देशात ‘राष्ट्रीय एकता दिन’ साजरा केला जातो?

-------  सरदार वल्लभभाई पटेल


Q3) कोणत्या मंत्रालयाने “SERB-POWER” नावाच्या उपक्रमाचा आरंभ केला?

------- विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय


Q4) कोणत्या दलाने राजस्थानमध्ये 'फिट इंडिया वॉकथॉन' आयोजित केले?

-------- भारत-तिबेट सीमा पोलीस (ITBP)


Q5) कोणत्या संस्थेनी 'डूईंग बिझनेस इन इंडिया रिपोर्ट, 2020' हा अहवाल प्रसिद्ध केला?

------- UK-इंडिया बिझिनेस कौन्सिल


Q6) कोणत्या व्यक्तीची भारताचे नवीन मुख्य माहिती आयुक्त म्हणून नेमणूक झाली?

-------- यशवर्धन कुमार सिन्हा


Q7) कोणत्या कंपनीने डिजिटल कौशल्यासह 1 लक्ष महिलांना सक्षम करण्यासाठी NSDC संस्थेसोबत एक सहकार्य करार केला?

-------- मायक्रोसॉफ्ट


Q8) कोणते मंत्रालय NABCB कडून मान्यता प्राप्त झालेली राष्ट्रीय उत्पादकता परिषद नियमित करते?

--------- वाणिज्य व उद्योग मंत्रालय


Q9) कोणता ‘संयुक्त राष्ट्रसंघ अणुशस्त्रे प्रतिबंधक करार’ याला मान्यता देणारा 50वा देश ठरला?

------- होंडुरास


Q10) कोणत्या राज्यात वा केंद्रशासित प्रदेशात भारतातले पहिले ‘वालुधन्व उद्यान’ बांधले जाणार आहे?

-------- गोवा

यंदाचे हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत होणार.


🔰राज्यातील करोनाची परिस्थिती लक्षात घेता ७ डिसेंबर २०२० पासून नागपूर येथे होणारे हिवाळी अधिवेशन मुंबईत घेण्याचा निर्णय कामकाज सल्लागार समितीच्या बैठीकीमध्ये घेण्यात आला आहे. मुंबईत विधानभवनात दोन्ही सभागृहाच्या विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली.


🔰हिवाळी अधिवेशन नागपूर येथे आयोजित करण्यात येते, पण सध्याची राज्यातील करोनाची परिस्थिती पाहता, यंदा ते नागपूरऐवजी मुंबईत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, ७ डिसेंबर २०२० रोजी अधिवेशन घेता येईल का? किती दिवस घ्यायचे? याबाबतही या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पुन्हा कामकाज सल्लागार समितीची बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.


🔰बठकीत हिवाळी अधिवेशनासाठी लागणाऱ्या सुविधांचाही आढावा घेण्यात आला. अनेक विधिमंडळ सदस्यांनी नागपूर येथे कोविडच्या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशन घेणे उचित होणार नाही अशा सूचना यावेळी केल्या.


🔰या बैठकीस विधानपरिषद सभापती रामराजे निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे) संसदीय कार्यमंत्री ॲड. अनिल परब, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मंत्रिमंडळातील सदस्य, विधानसभा आणि विधानपरिषद सदस्य, विधान मंडळाचे सचिव राजेंद्र भागवत, संबंधित अधिकारी उपस्थित होते.

केंद्रीय कार्यालयांत मराठी भाषा आता सक्तीची


🔰केंद्र शासनाच्या सर्व कार्यालयांत इंग्रजी व हिंदीबरोबरच स्थानिक भाषा म्हणजेच मराठी भाषेचा वापर करणे बंधनकारक केले आहे.


🔰तर ते न करणारे कार्यालय जिल्ह्यात आढळल्यास त्याच्या प्रमुखास निमंत्रक करून त्यास पालकमंत्री, लोकप्रतिनिधी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी मराठीचा वापर करण्यास प्राधान्य देण्याचे लक्षात आणून देणे आवश्यक आहे.


🔰तसेच यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दर तीन महिन्यांनी भाषा संचालनालयास अहवाल देण्याचे आदेश राज्य शासनाने 6 नोव्हेंबर रोजी जारी केले आहेत.


🔰राज्यातील केंद्र शासनाच्या राजभाषा विभागाने हिंदी व इंग्रजीबरोबर प्रादेशिक मराठी भाषेचा वापर प्राधान्याने करण्याच्या सूचना दिल्या आहेत.


🔰यानुसार, राज्यासह जिल्ह्यातील केंद्रीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका, विमा कंपन्या, रेल्वे तसेच अन्य केंद्रीय आस्थापनांच्या कार्यालयांत मराठी भाषेचा वापर करण्यात येतो यावर लक्ष केंद्रित करून अहवाल तयार करण्याच्या कामासाठी जिल्हा व तालुका स्तरावर गट-ब च्या दर्जापेक्षा कमी नाही अशा अधिकाऱ्यांमधून एका समन्वय अधिकाऱ्याची नेमणूक आदेशही आता जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झाले आहेत.

भारतातील चक्रीवादळे व विविध देशांकडून दिलेली नावे (२०१९-२०२०)



🌀 फनी : ओडिशा , पश्र्चिम बंगाल 

✔️ नाव दिले : बांग्लादेश


🌀 वायु : भारत , पाकिस्तान

✔️ नाव दिले : भारत 


🌀 हिक्का : गुजरात

✔️ नाव दिले : मालदीव 


🌀 महा : ओमान , श्रीलंका , भारत 

✔️ नाव दिले : ओमान


🌀 बलबुल : बांग्लादेश , भारत

✔️ नाव दिले : पाकिस्तान


🌀 कयार : सोमालिया , भारत , येमन

✔️ नाव दिले : म्यानमार 


🌀 पवन : सोमालिया , भारत 

✔️ नाव दिले : श्रीलंका 


🌀 अम्फान : ओडिशा , पश्र्चिम बंगाल

✔️ नाव दिले : थायलंड


🌀 निसर्ग : महाराष्ट्र , गोवा , गुजरात

✔️ नाव दिले : बांग्लादेश .

भारतीय राज्यघटनेत घेतलेल्या गोष्टी


🔶 भारतीय संविधान अर्थात राज्यघटना हि जगातील सर्वांत मोठी लिखित राज्यघटना मानली जाते. 


🔶 भारतीय राज्यघटनेतील अनेक गोष्टी या इतर देशातील राज्यकारभाराच्या पद्धतीवरून प्रतिबिंबित केलेल्या आहेत. पाहुयात कोणत्या देशाकडून कोणती पद्धत संविधानात समाविष्ट करण्यात आली.


📚 सविधानात घेतलेल्या गोष्टी : देश📚


▪️ मलभूत हक्क : अमेरिका

▪️ नयायमंडळाचे स्वातंत्र्य : अमेरिका

▪️ नयायालय पुनर्विलोकन : अमेरिका

▪️ कायद्याचे अधिराज्य : इंग्लंड

▪️ ससदीय शासन पद्धती : इंग्लंड

▪️ मार्गदर्शक तत्वे : आयर्लंड

▪️ सघराज्य पद्धत : कॅनडा

▪️ शष अधिकार : कॅनडा'

▪️ सामूहिक जबाबदारीची तत्वे : इग्लंड

▪️ कायदा निर्मिती : इंग्लंड

▪️ लोकसभेचे सभापती पद : इंग्लंड

▪️ ससदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन : ऑस्ट्रेलिया

चालू घडामोडीचे प्रश्न व सविस्तर उत्तरे


1) भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद  यांनी पहिला विदेश दौरा कोणत्या देशाचा केला..

👉जिबूती ( द आफ्रिका) 


2) कर्नाटक राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे..

👉निलमनी राजू


3) भारत स्वतंत्र नंतर चे पहिले काँग्रेस अध्यक्ष कोण होते..

👉आचार्य कृपलानी सध्या चे आहे राहुल गांधी 18 वे


4) 7 व्या  आयोगाचे सचिव म्हणून कोनाची नियुक्ती करण्यात आली आहे ..

👉 मीना अग्रवाल


5) नुकतीच परकीय 100 चित्रपटाची यादी जाहीर करण्यात आली आहे त्या मध्ये कोणत्या भारतीय चित्रपटाचा समावेश आहे.

👉 जगातील सर्वोत्कृष्ट 100 चित्रपटांत सत्यजित रे यांचा बंगाली भाषेतील 'पाथेर पांचाली' 

भाषा - बंगाली  (100 चित्रपट मध्ये 15व्या स्थानी) 

 BBC :-  प्रथम स्थानी जपानी चित्रपट 'सेवन सामुराई'


6) ओडिशातिल झारसुगुडा विमानतळाचे नामांतर करून कोणते नाव देण्यात आले आहे .

👉वीर सुरेंद्र साई विमानतळ

(ओडिशातील स्वातंत्र्य सैनिक आहेत.)


7) FTII च्या अध्यक्ष पदाचा अनुपम खेर यांनी नुकताच राजीनामा दिला याची स्थापना कोणत्या वर्षी झाली.

👉 1960 या वर्षी


8) धर्म गार्डीयन -2018 "युध्दसराव कोणत्या दोन देशा  दरम्यान होत आहेत.

👉भारत × जपान ( मिझोराम)


9) इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस महानिरीक्षक पदी  कोणाची निवड करण्यात आली आहे.(ITBP) 

👉एस.एस. देवसाल आगोदर:- आर के पचानंदा ....स्थापना :- 24 ऑक्टोबर 1962


10) "हॉल ऑफ फेम "पुरस्काराने कोणत्या भारतीय खेळाडूला  सन्मानित करण्यात आले..

👉 राहुल द्रविड ( पाचवा भारतीय खेळाडू द वॉल म्हणून प्रसिद्ध )


1)  Indian Ocean Rim Association (IORA) च्या 18 वी परराष्ट्र मंत्री स्तरीय परिषद कोठे संपन्न झाली..

- डर्बन (दक्षिण आफ्रिका)


2) अवनी ची शिकार करणारा शार्पशूटर चे नाव काय आहे..

- असगर अली खान


3) भारतीय क्रिकेट संघात चायना मॅन म्हणून कोणत्या खेळाडूला ओळखतात..

- कुलदीप यादव


4) CBI चे संचालक कोण आहेत..

- अलोक वर्मा 


5) भारतीय अंतराळ संशोधन ( ISRO) मुख्यालय कोठे आहे.

- बंगरुळू


6) T20 मध्ये शतक झळकवणारी प्रथम भारतीय महिला कोण.

- हनप्रित कौर (कर्णधार )


7) ओडिशा या राज्याने शेतकऱ्यांसाठी कोणती योजना सुरु केली.

- सौर जल निधी योजना


8) केंद्रीय आदिवासी विद्यापीठ कोणत्या राज्यात उभारले जाणार आहे.( CTU ) 

- आंध्रप्रदेश 


9) भारतीय सैनिकाच्या सन्मानार्थ कोणत्या देशात स्मारक उभारण्यात आले.

- ब्रिटन ( नाव लायन्स ऑफ द ग्रेट  वॉर


10) लालन सारंग कोण होत्या ..

- बंडखोर अभिनेत्री  अशी त्यांची ओळख होती..


महाराष्ट्रातील महामंडळे


१) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ - दिनांक १ ऑगस्ट, १९६२


२) महाराष्ट्र राज्य औद्योगिक व गुंतवणूक महामंडळ - ३१ मार्च, १९६६


३) महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ - दिनांक १ एप्रिल, १९६२


४) महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळ - १९६२


५) महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन - १९७८


६) महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ - १९६२


७) महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ - १९७५


८) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ -१९६१


९) महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ (मर्यादित) - १९६३


१०) महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ - १९६५


११) मराठवाडा विकास महामंडळ - १९६७


१२) कोकण विकास महामंडळ (मर्यादित) - १९७०


१३) विदर्भ विकास महामंडळ (मर्यादित) - १९७०


१४) महाराष्ट्र कृष्ण खोरे महामंडळ - १९९६


१५) विदर्भ सिंचन विकास महामंडळ - १९९७


१६) कोकण सिंचन विकास महामंडळ - १९९७


१७) तापी सिंचन विकास महामंडळ - १९९७


१८) गोदावरी मराठवाडा सिंचन विकास महामंडळ - १९९८


१९) महात्मा फुले मागास वर्ग विकास महामंडळ - १९७८


२०) म्हाडा - १९७६


महाराष्ट्रातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग

 


🛣 राष्ट्रीय महामार्ग क्र.३.

🚍 मबई  〰️ आग्रा.



🛣 राष्ट्रीय महामार्ग क्र.४.

🚍 मबई  〰️ चन्नई.



🛣 राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ब.

🚍 नहावासेवा 〰️ पळस्पे.



🛣 राष्ट्रीय महामार्ग क्र.६.

🚍 धळे 〰️ कोलकत्ता.



🛣 राष्ट्रीय महामार्ग क्र.७.

🚍 वाराणसी 〰️ कन्याकुमारी.



🛣 राष्ट्रीय महामार्ग क्र.८.

🚍 मबई 〰️ दिल्ली .



🛣 राष्ट्रीय महामार्ग क्र.९.

🚍 पणे 〰️ विजयवाडा.



🛣 राष्ट्रीय महामार्ग क्र.१३.

🚍 सोलापूर 〰️चित्रदुर्ग.



🛣 राष्ट्रीय महामार्ग क्र.१६.

🚍 निझामाबाद〰️ जगदाळपूर.



🛣 राष्ट्रीय महामार्ग क्र.१७.

🚍 पणवेल 〰️ मगळूर.



🛣 राष्ट्रीय महामार्ग क्र.५०.

🚍 पणे 〰️ नाशिक .

मराठी व्याकरण


प्रश्न(१) 'दादा पायी चालत आले' या वाक्यातील 'पायी' या सप्तमी विभक्तीच्या रूपाचा कारकार्थ कोणता? 

१) अधिकरण

२) करण✅

३) अपदान

४) कर्ता

🍁🍁🍁🍁🍁🍁


प्रश्न(२) योग्य पर्याय निवडा

मृच्छकटीक 

१) मृच्छ + कटिक

२) मृत + छकटिक

3) मृत्+ शकटिक✅

४) मृच्च + कटिक

🍁🍁🍁🍁🍁🍁


प्रश्न(३) मराठी भाषेचा अभिजात दर्जा शोधण्यासाठी शाषणाने ---------- यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती.

१) शाम मनोहर

२) कोतिकराव ठाले पाटील

३) नरेन्द्र जाधव

४) रंगनाथ पठारे✅

🍁🍁🍁🍁🍁🍁


प्रश्न(४) 'अधोमुख' या शब्दाचा विरुद्ध अर्थ सांगा.

१) संमुख

२) उन्मुख✅

३) विमुख

४) दुर्मुख

🍁🍁🍁🍁🍁🍁


प्रश्न(५) 'अश्वत्थ' या शब्दाचा समान अर्थ -

१) वड

२) पिंपळ✅

३) कदंब

४) उंबर

🍁🍁🍁🍁🍁🍁


प्रश्न(६) योग्य शब्दाची निवड करा.

पिस्तुल पाहून साक्षीदाराला न्यायालयातच  ........... आली.

१) घेरी

२) चक्कर

३) मूर्च्छा✅

४) भोवळ

🍁🍁🍁🍁🍁🍁


प्रश्न(७) पद्याची रचना ज्या शास्त्राच्या आधाराने होत असते किंवा अनेक प्रकारच्या पद्यांवरून जे शास्त्र तयार झालेले आहे त्याचे नाव कोणते?

१) काव्यशास्त्र

२) साहित्यशास्त्र

३) टीकाशास्त्र

४) छंदशास्र ✅

🍁🍁🍁🍁🍁🍁


प्रश्न(८) " होते जनात अपकीर्ती निरक्षरांची" या काव्यातील वृत्ते ओळखा.

१) इद्रवज्रा

२) उपेंद्रवज्रा

३) भ्रांतिमान

४) वसंततिलिका✅

🍁🍁🍁🍁🍁🍁


प्रश्न(९) पुढील गण कोणत्या वृत्ताचे आहेत? 

म   स   ज   स   त   त   ग 

१) भुजंगप्रयात

२) वसंततिलिका

३) आर्या

४) शार्दूलर्विक्रीडित✅

🍁🍁🍁🍁🍁🍁


प्रश्न(१०) चुकीची जोडी ओळखा.

१) सलाम - मंगेश पाडगावकर

२) पैस - दुर्गा भागवत

३) झोंबी - आनंद गायकवाड✅

४) खूणगाठी - ना.घ. देशपांडे

🍁🍁🍁🍁🍁🍁

Online Test Series

12 November 2020

पदवीधर मतदान म्हणजे काय?


पदवीधर मतदार संघ निवडणूक 2020


आपल्याकडे ग्रामपंचायत पासून लोकसभेपर्यंत सर्वच निवडणुकांना महत्व आहे. परंतु दुर्दैवाने पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीकडे फारसं गांभीर्याने पाहिलं जात नाही. कित्येकांना तर अशी काही निवडणूक असते हेच मुळात माहीत नाही म्हणून हा माहिती देण्याचा प्रपंच… 


आपल्या महाराष्ट्र राज्यात विधानसभा आणि विधानपरिषद अशी दोन कायदेमंडळ गृहे आहेत हे आपण नागरिकशास्त्रात वाचले असेलच. महाराष्ट्रासह भारतातील एकूण सात राज्यात अशी द्विगृहात्मक कायदेमंडळ पद्धती अस्तित्वात आहे. त्यात उत्तर प्रदेश, बिहार, जम्मू काश्मीर, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा आणि महाराष्ट्राचा समावेश होतो. या सर्व राज्यांमध्ये विधानसभेसोबत विधानपरिषदेचेही कामकाज चालते. विधानसभेच्या सदस्यांना इंग्रजीत MLA म्हणतात तसे विधानपरिषदेच्या सदस्यांना MLC (Member of Legislative Council) असे संबोधले जाते. नुकतीच आपली विधानसभेची निवडणूक पार पडली आहे. त्यामुळे तिथले सदस्य कसे निवडले जातात हे सांगण्याची आवश्यकता नाही. परंतु विधानपरिषदेचे सदस्य कसे निवडले जातात याची थोडी कल्पना असणे गरजेचे आहे. 


महाराष्‍ट्र विधानपरिषदेत एकूण 78 सदस्य कार्यरत असतात. त्यापैकी 31 सदस्य विधानसभेतून, 21 सदस्य स्थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांमधून, 12 सदस्य राज्‍यपालांच्या नेमणूकीमधून, 7 सदस्‍य शिक्षक मतदार संघातून आणि 7 सदस्‍य 'पदवीधर' मतदार संघातून निवडले जातात. विधानपरिषदेच्या सदस्यांच्या निवडी एकाचवेळी होत नाहीत. विधान परिषद हे कायम सभागृह असते. त्‍यातील सदस्यांचा सहा वर्षाचा कार्यकाळ असतो आणि दर दोन वर्षानी एक तृतीयांश सभासद निवृत्त होत असतात व तितकेच नवीन नेमले जातात. आपल्या महाराष्‍ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत. त्यात सात पदवीधर मतदारसंघ मुंबई, पुणे, कोकण, औरंगाबाद, नागपुर, नाशिक आणि अमरावती याप्रमाणे विभागले गेले आहेत. 


आता येणाऱ्या काळात पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका आहेत. पण मी त्याबद्दल आजच का सांगतोय? कारण या निवडणुकीसाठी मतदार म्हणून नाव नोंदनी वेळ संपली आहे.  

लक्षात घ्या, सामान्य नागरिक म्हणून आपली जशी कर्तव्ये आणि अधिकार असतात तसेच अधिकार पदवीधर म्हणूनही असतात. ग्रॅज्युएट झाल्यावर घटनेने आपल्याला आपला प्रतिनिधी निवडायची संधी दिली असते. हा आपण निवडलेला प्रतिनिधी आपल्या समस्या सभागृहात मांडतो आणि त्याचा पाठपुरावा करतो. जर तो तसे करत नसेल तर त्याला जाब विचारण्याचा अधिकारही आपल्याला आहे. आपण अपेक्षेप्रमाणे कामे झाली नाही तर आमदाराला जाब विचारतोच ना? मग निवडून गेलेला पदवीधर प्रतिनिधी नेमकं काय करतोय हे ही जाणून घ्यायला हवंच की.  


● पदवीधर मतदार नोंदणीकरिता पात्रता:

१. तो भारताचा नागरीक असावा.

२. तो मतदार नोंदणीकरिता अर्हता दिनांकाच्‍या किमान ३ वर्षापूर्वी, मान्यताप्राप्त विद्यापीठाचा किंवा तत्‍सम विद्‍यापिठाचा पदवीधर असावा.

३. सर्वसाधारणपणे संबंधित मतदारसंघातील रहिवासी असावा

४. त्‍याने विहित कागदपत्रांसह फॉर्म क्र. १८ भरावा.

५. पदविका (Diploma) जर पदवीतूल्‍य असेल तरच पदवीधर गृहित धरण्‍यात येईल.  


● पदवीधर मतदार नोंदणीकरिता आवश्‍यक इतर कागदपत्रे:

१. रहिवासाचा पुरावा. (पासपोर्ट, वाहन अनुज्ञप्‍ती, टेलीफोन/विज बिल किंवा इतर मान्‍यताप्राप्‍त कागदपत्रांची साक्षांकित प्रत.)

२. मार्क लिस्‍टची साक्षांकित प्रत.

३. पदवी/पदविकेची साक्षांकित प्रत.

४. विवाहित महिलेने विवाहानंतर नाव बदलले असल्‍यास त्‍याबाबतचे राजपत्र, पॅन कार्ड, राजपत्र नसल्‍यास प्रतिज्ञापत्र.

५. प्रमाणपत्रांचे साक्षांकन संबंधित जिल्ह्यात कार्यरत तहसीलदार किंवा गट विकास अधिकारी, किंवा शासन मान्‍यता प्राप्‍त विद्‍यालयाचे प्राचार्य किंवा जिल्ह्यातील अन्‍य राजपत्रित अधिकार्‍यांकडून करून घ्‍यावे. 

६. ही कागदपत्रे आपण तहसीलदार कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय येथे जमा करू शकता. 


● मतदान पद्धत 

- पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी मतदान हे मतपत्रिकेवर होते.

- मतपत्रिकेवर नमुद उमेदवार क्रमांकानुसार, उमेदवारांना पसंती क्रमांक द्यायचा असतो.

- सर्वात पहिली पसंती असणा-या उमेदवारासमोर मराठी, इंग्रजी किंवा रोमन यापैकी एका भाषेतील आकडय़ांमध्ये अंक लिहिता येतो.

- पसंती क्रमांक लिहिताना तो एका भाषेतील आकडय़ांमध्येच लिहावा. उदाहरणार्थ (१, २, ३ असे मराठीत किंवा 1, 2, 3 असे इंग्रजीत पसंतीनुसार आकडे लिहिता येतील). 

- मतपत्रिकेवर पसंती क्रमांक सोडून दुस-या कसल्याही खाणाखुणा करू नयेत. 

- मतपत्रिकेवर पसंती क्रमांक लिहिताना स्वत:चा पेन किंवा पेन्सिल वापरण्यास परवानगी नाही. जांभळ्या रंगाचा स्केच पेन मतदान केंद्रावर मतदारांना दिला जातो, त्याचाच वापर मतदानासाठी करण्‍यात यावा. अन्‍यथा मत बाद ठरेल.  

- "वरीलपैकी कोणी पर्याय नाही" (नोटा) हा पर्याय मतपत्रिकेवर उपलब्ध असतो.

- 'नोटा' किंवा पसंती क्रमाने मत देता येते. यापैकी एकच पर्याय मतदारांनी वापरावा.

मी कधी असे आवाहन करत नाही, पण यावेळी करतो... पोस्ट जास्तीतजास्त शेअर करा... आपले मतदान अमूल्य असते

आपण सुशिक्षित मतदार आहात 

आपले मतदानाने योग्य उमेदवार निवडा

----- ------


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

11 November 2020

प्राण्यांच्या वर्गीकरणाबद्दल


🛑 असमपृष्ठरज्जू प्राणी 🛑


🔶प्रोटोझुआ- अमिबा , प्लाझामोडीयम, पॅरामेशियम इ.


🔶पोरीफेरा - सायकॉन , बाथस्पंज , हयलोनिमा


🔶 सिलेंटराटा - हायड्रा, फायसेलिया, सी-अनिमोन


🔶 प्लॅटीहेल्मिन्थीस - प्लॅनेरीया , लिव्हरफ्ल्युक , टेपवर्म


🔶 नेमॅटहेल्मिन्थीस - अॅस्कॅरिस , फायलेरीया , हुकवर्म


🔶 अॅनिलीडा- गांडूळ , लीच , नेरीस


🔶 आथ्रोपोडा - खेकडा , झुरळ , कोळी


🔶 मोलुस्का - शंख , शिंपला , गोगलगाय


🔶 इकायानोडर्माटा - तारामासा , सी - अर्चीन , सि - ककुंबर


🔶हेमिकॉर्डाटा - बेलॅनोग्लॉसस , सॅकोग्लॉसस

काकोरी कट (Kakori conspiracy)



🔰9 ऑगस्ट 1925🔰


🔰लखनौ ते सहारनपूर दरम्यान काकोरी


🔰सहभाग:- चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मिल, मन्मथनाथ गुप्ता, अशफाक उल्लाखान, राजेंद्रनाथ लाहिडी, रोशनलाल इत्यादी क्रांतिकारक अग्रणी होते. (एकून 10 जणांचा समावेश) 


🔰बरिटिशांच्याविरुद्ध सशस्त्र लढा देण्याच्या हेतूने काकोरी (उत्तर प्रदेश) येथे घडवून आणलेला प्रसिद्ध क्रांतिकारी कट.


🔰सरकारी पोस्ट कार्यालयांमध्ये जमा झालेला पैसा रेल्वे मार्गाने जाणार असल्याची माहिती क्रांतिकारकांना मिळाली


🔰लखनौ ते सहारनपूर मार्गावर लखनौपासून आठ मैल अंतरावर असलेल्या काकोरी या गावाजवळ सशस्त्र क्रांतिकारकांनी रेल्वे थांबवून त्यातील खजिना लुटावा अशी योजना आखली.


🔰 9 ऑगस्ट 1925 रोजी क्रांतिकारक सरकारी खजिना घेऊन जाणाऱ्या रेल्वेच्या डब्यात जाऊन बसले. रेल्वे आडवळणी अशा काकोरी स्थानकाजवळ येताच त्यांनी साखळी ओढून रेल्वे थांबविली


🔰रामप्रसाद बिस्मिल यांनी चैन खेचुन रेल्वे थांबवली


🔰कवळ दहा ते पंधरा मिनिटांमध्ये ही नियोजित लूट यशस्वी केली. या घटनेलाच ‘काकोरी कट’ असे म्हणतात.


🔰या कटात जवळपास 8000 रुपये लुटले


🔰काकोरी खटल्याचे कामकाज एप्रिल १९२७ पर्यंत चालले.


🔰यामधील रामप्रसाद बिस्मिल, अशफाक उल्लाखान, रोशनलाल व राजेंद्रनाथ लाहिडी यांना फाशी दिली


🔰कारस्थानांमध्ये सहभागी असलेले चंद्रशेखर आझाद ब्रिटिशांना गुंगारा देऊन भूमिगत राहिले.


🔰सशस्त्र क्रांती करण्याच्या उद्देशाने चंद्रशेखर आझाद यांनी ‘हिंदुस्थान रिपब्लिकन असोशिएशनʼ या जुन्या संस्थेचे ‘हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन असोशिएशनʼ असे नामकरण करून क्रांतिकार्य चालू ठेवले.

वाचा :- महराष्ट्रातील महत्त्वाच्या संताची समाधीस्थाने



1) गाडगे महाराज - अमरावती


2) समर्थ रामदास- सज्जनगड


3) संत एकनाथ - पैठण


4) गजानन महाराज - शेगाव


5) संत ज्ञानेश्वर - आळंदी


6) संत गोरोबा कुंभार - ढोकी


7) संत चोखा मेळा - पंढरपूर


8) मचिन्द्रनाथ - सप्तशृंगी


9) संत तुकडोजी  - मोझरी


10) संत तुकाराम - देहू


11) साईबाबा - शिर्डी


12) जनार्दन स्वामी - कोपरगाव 


13) निवृत्तीनाथ - त्र्यंबककेश्वर


14) दामाजी पंत - मंगळवेढा


15) श्रीधरस्वामी - पंढरपूर


16) गुरुगोविंदसिंह - नांदेड


17) रामदासस्वामी - जांब


18) सोपानदेव - आपेगाव


19) गोविंदप्रभू - रिधपुर


20) जनाबाई - गंगाखेड


21) निवृत्तीनाथ - आपेगाव

भारतीय क्षेपणास्त्रे




1. बराक 8 - भारत-इस्त्रायलच्या संयुक्त विध्यमाने, 70 किमी क्षमता, जमिनीवरून हवेत मारा.


2. निर्भय - 1000 किमी पल्ला, डिआरडिओ तर्फे विकसित.


3. पिनाका अग्निबाण प्रणाली 6 - अग्निबाण प्रक्षेपकांव्दारे 12 रॉकेटस 44 सेकंदांत प्रक्षेपित, 40 किमी पल्ला.


4. आकाश - एकामागोमाग एक तीन क्षेपणास्त्रे डागण्याची क्षमता, हवाई दलात तैनात. (जमिनीवरून हवेत मारा करणारे)


5. अस्त्र-सुखोई 30 - विमानांवर तैनात, स्वदेशी बनावटीचे, पल्ला 60 किलोमीटर (हवेतून हवेत मारा करणारे.)


6. पृथ्वी संरक्षण प्रणाली - हवामानाच्या थरांबाहेर 120 किलोमीटरवर शत्रूच्या क्षेपस्त्रांना उद्ध्वस्त करण्याची क्षमता. (जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे)


7. ब्राम्होस - पल्ला 300 किमी, गती 2.8 माक, आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र, अण्वस्त्रवहन क्षमता.


8. त्रिशूल - जमिनीवरून हवेत मारा करणार्या क्षेपणास्त्राविरोधी क्षेपणास्त्र.


9. नाग - रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र.


10. सूर्या - आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र.


11. सागरिका - पाण्याखालून मारा करणारे क्षेपणास्त्र. पाणबुडीवरून जमिनीवर मारा करणारे.


12. शौर्य - जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे.


13. धनुष - जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे.