Ads

31 January 2021

बीबी का मकबरा

◾️हा मोगल सम्राट औरंगजेबचा मुलगा, आजम शहा याने आपल्या आईच्या स्मरणार्थ बांधलेला मकबरा आहे. 


◾️औरंगाबाद येथे बांधलेल्या एका भव्य महालात औरंगजेबाची पत्नी राबिया दुर्रानी (दिलरास बानो बेगम) हिची कबर आहे.


◾️ बीबी का मकबरा यास सन्मानाने मराठवाड्याचा ताजमहाल म्हणतात.


◾️आजम शाहने 1679  मध्ये बांधला. हा लाल आणि काळ्या दगडांबरोबर, संगमरवर आणि काही पांढऱ्या मातीपासून बनविलेला आहे. या मिश्रणास स्टको प्लॅस्टर (Stucco Plaster) असे म्हणतात.


◾️मधोमध बेगम राबियाची कबर आहे. कबरीच्या चारही बाजूने संगमरवरी जाळ्या बसवल्या आहेत. त्या कबरीवर छतांच्या खिडक्यांतून दिवसा सूर्याची किरणे आणि रात्री चंद्र प्रकाश पडेल, अशी रचना केली आहे मकबऱ्याच्या घुमटाला संगमरवरी दगड वापरला आहे.


◾️राबिया दुर्रानीची कबर 28 नोव्हेंबर 1951 रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आली


(बांधकामाच्या तारखेबद्दल संभ्रम आहे)

साक्षरतेमध्ये केरळचा पहिला नंबर तर महाराष्ट्र सहाव्या स्थानी

✔️ देशात साक्षरतेमध्ये केरळने पहिला क्रमांक कायम ठेवला आहे. तर आंध्र प्रदेश हे राज्य देशात साक्षरतेमध्ये सर्वात पिछाडीवर आहे.


✔️आंध्र प्रदेशात साक्षरतेचे प्रमाण 66.4 टक्के आहे. बिहारपेक्षाही आंध्र प्रदेश साक्षरतेमध्ये मागे आहे. बिहारमध्ये साक्षरतेचे प्रमाण 70.9 टक्के आहे.


🔰आकडेवारी काय सांगते?


✔️ नशनल स्टॅटिस्टिकल ऑफीसने शिक्षणासंदर्भातील रिपोर्ट जाहीर केला. त्यातून ही माहिती समोर आली आहे. 


✔️साक्षर राज्यांमध्ये महाराष्ट्र सहाव्या स्थानावर आहे. महाराष्ट्रात एकूण साक्षरतेचे प्रमाण 84.8 टक्के आहे. 


✔️ परुष आणि महिला साक्षरतेच्या प्रमाणात तब्बल 12.3 टक्क्यांचे अंतर आहे. पुरुष 90.4 टक्के तर महिला 78.4 टक्के साक्षर महिला आहेत. 


✔️ पहिल्या पाच सर्वाधिक साक्षर राज्यांमध्ये केरळ, दिल्ली, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि आसाम या राज्यांचा नंबर लागतो.


✔️ दरम्यान, साक्षरतेचे प्रमाण कमी असलेल्या शेवटच्या पाच राज्यांमध्ये उत्तर प्रदेश,तेलंगण, बिहार, राजस्थान आणि आंध्र प्रदेश ही राज्ये आहेत.

विविध योजना -

1) प्रधानमंत्री जन-धन योजना — 28 ऑगस्ट 2014

2) मेक इन इंडिया — 25 सप्टेंबर 2014

3) स्वच्छ भारत मिशन — 2 ओक्टोबर 2014

4) संसद आदर्श ग्राम योजना — 11 ऑक्टोबर 2014

5) श्रमेव जयते — 16 ऑक्टोबर 2014 

6) जीवन प्रमाण पत्र योजना — 10 नोव्हेंबर 2014

7) मिशन इंद्रधनुश — 25 डिसेंबर 2014

8) नीती आयोग ची सुरूवात — 1 जानेवारी 2015

9) पहल  योजना — 1 जानेवारी 2015 

10) बेटी बचाओ , बेटी पाढाओ योजना — 22 जानेवारी 2015

11) सुकन्या समृद्धी योजना — 22 जानेवारी 2015 

12) मृदा स्वास्थ्य कार्ड — 19 फेब्रुवारी 2015 

13) प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना — 20 फेब्रुवारी 2015 

14) प्रधानमंत्री जीवन ज्योती याजना — 9 मे 2015

15) प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना — 9 मे 2015

16) अटल पेन्शन योजना — 9 मे 2015

17) उस्ताद योजना — मे 2015

18) कायाकल्प योजना — मे 2015

19) D D किसान वाहिनी — मे 2015

20) डिजिटल इंडिया — 1 जुलै 2015

जाणून घ्या देशातील 10 अस्वच्छ शहरे

नागरी स्वच्छता अभियानातील कामगिरीत सातत्य राखत महाराष्ट्राने या वर्षीच्या स्वच्छ सर्वेक्षण राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये देशात सर्वाधिक चार, तर अन्य विभागांतील 13 असे एकूण 17 पुरस्कार मिळवून ‘हॅट्ट्रिक’ साधली आहे. 


तर दुसरीकडे सर्वाधिक अस्वच्छ शहरांच्या यादीत अव्वल दहापैकी सहा शहरे बिहारमधील असल्याची माहिती समोर आली आहे. 


🛑 10 लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या सर्वात अस्वच्छ शहरांची यादी


🔟 अस्वच्छ शहरांच्या यादीमध्ये दहाव्या स्थानी आहे बिहारमधील साहारसा हे शहर.


9️⃣ बिहारमधीलच बिहार शरीफ शहर नवव्या स्थानी आहे. 


8️⃣ आठव्या स्थानी आहे नागालँण्डमधील दिमापूर एमसी हे शहर. 


7️⃣ अरुणाचल प्रदेशमधील इटानगर हे या यादीमध्ये सातव्या स्थानी आहे. 


6️⃣ मघालयमधील शिलाँग शहर अस्वच्छ शहरांच्या यादीमध्ये सहाव्या स्थानी आहे. 


5️⃣ अस्वच्छ शहरांच्या यादीमध्ये पाचव्या स्थानी आहे परसा बाजार. हे शहर बिहारमध्ये आहे.


4️⃣ चौथ्या स्थानी बिहारमधील भागलपूर शहर आहे.


3️⃣ तिसऱ्या स्थानी पंजाबमधील अबोहार शहर आहे. 


2️⃣ दसऱ्या स्थानी बिहारमधील बक्सर शहर आहे.


1️⃣ सर्वात अस्वच्छ शहरांच्या यादीमध्ये बिहारमधील गया शहर अव्वल स्थानी आहे.


✅ विशेष : अस्वच्छ शहरांच्या यादीमध्ये अव्वल दहामध्ये महाराष्ट्रातील एकही शहर नाही आहे.

विभक्ती

नाम, सर्वनाम किंवा तत्सम विकारी शब्द यांचे वाक्यातील क्रीयापादशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात. त्यांना विभक्ती म्हणतात.


वाक्यातील एकमेकांशी असलेले संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात, त्या विकारांना विभक्ती म्हणतात. 

शब्दांना जी अक्षरे जोडली जातात, त्यांना विभक्तीचे प्रत्यय म्हणतात.

जी काही क्रिया घडलेली असते, ती सांगितलेली असते. म्हणून वाक्यातील क्रियापद सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुख्यपद मानले जाते. त्या मानाने इतर पदे 


असतात. यावरून विभक्ती व विभक्तीचे अर्थ याबद्दल साधारणपणे असे म्हणतात.


विभक्त्यार्थ दोन प्रकार 


१) कारकार्थ - कारक व कारकार्थ

२) उपपदार्थ - कर्ता, करण, कर्म


विभक्तीची आठ नावे


१) प्रथमा 

२) द्वितीया 

३) तृतीया 

४) चतुर्थी  

५) पंचमी 

६) षष्ठी 

७) सप्तमी  

८)  संबोधन 


विभक्तीतीचे प्रत्यय - नी, ट, चा


विभक्ती  -  (एकवचन)  -  (अनेकवचन)


१) प्रथमा  -  प्रत्यय नाही  -  प्रत्यय नाही       

२) द्वितीया  -  स, ला, ते  -  स, ला, ना, ते    

३) तृतीया  -  ने, ए, शी  -  नी, शी, ही     

४) चतुर्थी  -  स, ला, ते  -  स, ला, ना, ते     

५) पंचमी  -  ऊन, हून  -  ऊन, हून     

६) षष्ठी  -  चा, ची, चे  -  चे, च्या, ची   

७) सप्तमी  -  त, ई, आ  -  त, ई, आ   

८) संबोधन  -  प्रत्यय नाही  -  नो


विभक्तीतील रूपे


विभक्ती  -  (एकवचन)  -  (अनेकवचन)


१) प्रथमा -  फूल  -  फुले 

२) द्वितीया  -  फुलास, दुलाला  -  फुलांस, फुलांना

३) तृतीया  -  फुलाने, फुलाशी  -  फुलांनी, फुलांशी

४) चतुर्थी  -  फुलास, फुलाला  -  फुलांस, फुलांना

५) पंचमी  -  फुलातून, फुलाहून  -  फुलांतून, फुलांहून

६) षष्ठी  -  फुलाचा, फुलाची, फुलाचे  -  फुलांचा, फुलांची, फुलांचे

७) सप्तमी  -  फुलात  -  फुलांत

८) संबोधन  -  फुला  -  फुलांनी


भारतीयांकडून प्रभावी हायड्रोजन उत्क्रांतीसाठी कार्यक्षम व स्वस्त असे उत्प्रेरक विकसित.

🔰बगळुरू येथील सेंटर फॉर नॅनो अँड सॉफ्ट मॅटर सायन्सेस (CENS) या केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागांतर्गत असलेल्या स्वायत्त संस्थेच्या संशोधकांनी ‘पॅलाडिअम Pd(II)’ आयन-युक्त नव्या प्रकारचे कॉर्डिनेशन पॉलिमर (COP) संश्लेषित केला आहे, जो H-अ‍ॅडसॉरप्शन आणि बेनेझ टेट्रामाईन (BTA) यांच्या सक्रीय स्थळांचा स्रोत म्हणून कार्य करतो. 


🔰दोन्ही मिळून द्वीमितीय (2D) Pd(BTA) पत्र्याच्या माध्यमातून H-बंध परस्परसंवाद निर्माण करतात. संशोधकांनी द्वीमितीय 2D Pd(BTA) पत्रा देखील तयार केला आहे.


🔰हायड्रोजन (H2) इव्होल्यूशन रिअॅक्शन (HER) यासाठी लागणाऱ्या इलेक्ट्रो उत्प्रेरकाची कार्यक्षमता मुख्यत्वे त्याचा टिकाऊपणा, इलेक्ट्रोकेमिकल अभिक्रियेची क्षमता कमीतकमी करण्यावर आणि संश्लेषण (उत्पादन) याच्या किंमतीवर अवलंबून असते. 


🔰उद्योगांमध्ये वापरण्यात येणारे प्लॅटीनम (Pt) / कार्बन (C) कार्यक्षम उत्प्रेरक आहेत, परंतु ते किंमतीत महाग आहेत आणि दीर्घकाळ वापरल्यास मेटल आयनवर काम करीत नाहीत. त्यातच पृथ्वीवर प्लॅटीनम धातूचे साठे अल्प आहेत.


🔴या शोधाचे महत्व...


🔰हवामानातले बदल यांच्या विरोधात असलेल्या लढ्यासाठी जीवाश्म इंधनांऐवजी पुढील पिढीचे कमी कार्बनयुक्त इंधन म्हणून हायड्रोजन ओळखले जाते. इंधन म्हणून हायड्रोजनच्या वापराचे भवितव्य हायड्रोजन तयार करण्यासाठी पाण्याचे इलेक्ट्रोकेमिकल विभाजन सुलभ करण्यासाठी लागणाऱ्या कार्यक्षम इलेक्ट्रोकॅटिलिस्टच्या रचनेमध्ये आहे.


🔰हायड्रोजन तयार करण्यासाठी पाण्याचे विभाजन करण्याचे कार्यक्षम साधन विकसित करणे हा या शोधामागचा हेतु आहे.

अशुद्ध शब्द - शुद्ध शब्द

1) चाह - चहा 

2) छपर - छप्पर 

3) जागार - जागर 

4) जागर्त - जागृत 

5) ज्यादुगार - जादूगार 

6) जीज्ञासू - जिज्ञासू 

7) ज्योस्त्ना - ज्योत्स्ना 

8) तिर्थरूप - तीर्थरूप 

9) त्रीभूवन - त्रिभुवन 

10) ततसम - तत्सम 

11) जागतीक - जागतिक 

12) हूंकार - हुंकार 

13) हिंदू - हिंदु 

14) हारजित - हारजीत

15) तरून - तरुण 

16) तांत्रीक - तांत्रिक 

17) तरका - तारका 

18) बंकेश्वर - त्र्यंबकेश्वर 

19) थाठ - थाट 

20) थेरला - थोरला 

21) दिर्घ - दीर्घ 

22) दाण - दान 

23) दागीना - दागिना 

24) दक्षीणा - दक्षिणा 

25) दूसरा - दुसरा 

26) दिलगीरी - दिलगिरी 

27) दरारोज - दररोज 

28) दिर्घोद्योग - दीर्घोदयोग 

29) दत्पर - दप्तर 

30) धिकार - धिक्कार 

31) धण - धन 

32) धनूष्य - धनुष्य 

33) धुर्त - धूर्त 

34) धोपटर्माग - धोपटमार्ग 

35) ध्यानधारना - ध्यानधारणा 

36) धारीष्ट - धारिष्ट 

37) नोर्झर - निर्झर

38) नीष्कारण - निष्कारण

39) नियूक्त - नियुक्त

T20 World Cup 2021 चे यजमानपद भारताकडेच

🔰T20 World Cup 2021 चे यजमानपद भारताकडेच राहणार असल्याची माहिती मिळत आहे. पुढील दोन वर्षांत होणाऱ्या दोन ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धाच्या आयोजनाविषयीचा निर्णय घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कार्यकारी मंडळाची शुक्रवारी बैठक झाली.


🔰वहिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून झालेल्या बैठकीत २०२१ आणि २०२२च्या टी-२० विश्वचषकाच्या यजमानपदाबद्दल निर्णय घेण्यात आला. त्यानुसार २०२१चा टी-२० विश्वचषक भारतातच होणार असून २०२२चा टी-२० विश्वचषक ऑस्ट्रेलियात खेळवण्यात येणार असल्याचे वृत्त टाईम्सनाऊने दिले आहे. याशिवाय २०२१मध्ये न्यूझीलंडमध्ये होणारा महिला वन डे विश्वचषकदेखील पुढे ढकलण्यात आला आहे.


🔰महिलांचा २०२१ एकदिवसीय विश्वचषक तसेच पुरुषांचे पुढील दोन टी-२० विश्वचषक यांच्या आयोजनाविषयी या बैठकीत चर्चा झाली. ऑस्ट्रेलियातील ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२०मध्ये होणारा टी-२० विश्वचषक पुढे ढकलण्यात आल्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलिया २०२१च्या यजमानपदासाठी आग्रही होते. त्यामुळे भारताला २०२१ऐवजी २०२२च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद मिळू शकते असे बोलले जात होते. पण अखेर २०२१च्या टी-२० विश्वचषकाचे यजमानपद भारताकडेच कायम असून २०२२चा टी-२० विश्वचषक ऑस्ट्रेलियात खेळवण्यात येणार आहे.

खाडी

🟢 नदी जेथे समुद्राला जाऊन मिळते, तेथील पाण्याच्या साठ्याला खाडी असे म्हणतात. 


🟢 भरतीचे पाणी नदीच्या मुखामध्ये जिथपर्यंत येते त्या भागास “खाडी”असे म्हणतात. कोकणचा किनारा अनेक खाड्यांनी बनलेला आहे.


▪️कधीकधी किनाऱ्याचा सखल भूभाग खचून किंवा समुद्राच्या पाण्याची पातळी वाढल्यानेसुद्धा समुद्री खाडी तयार होते. 


▪️खाडी जर बऱ्यापैकी मोठी असेल तर तिला आखात म्हणतात.


▪️बगालचा उपसागर हा देखील एका अखाताचाच प्रकार आहे.


▪️महाराष्ट्राच्या पश्चिम समुद्रकिनाऱ्याला अशा अनेक खाड्या आहेत. तिथली बहुतेक बंदरे खाडीच्या आश्रयाने बनली आहेत.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


🛑 खाड्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडील क्रम खालीलप्रमाणे आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


१) डहाणूची खाडी, जि. ठाणे


२) दातीवऱ्याची खाडी, जि. ठाणे


३) वसईची खाडी, जि. ठाणे


४) धरमतरची खाडी, जि. रायगड


५) रोह्याची खाडी, जि. रायगड


६) राजापुरीची खाडी, जि. रत्नागिरी


७) बाणकोटची खाडी, जि. रत्नागिरी


८) दाभोळची खाडी, जि. रत्नागिरी


९) जयगड, जि. रत्नागिरी


१०)विजयदुर्ग, जि. सिंधुदूर्ग


११)तेरेखोलची खाडी, सिंधुदूर्ग


ओझोन चे संरक्षण कवच

🔰 वातावरणाच्या स्थितांबर या थराच्या खालच्या भागात ओझोन वायूचा थर आढळतो. 


🔰ओझोन  वायूचा सजीवांना जगण्यासाठी प्रत्यक्ष उपयोग नसला तरी खूप उंचीवर पृथ्वीभोवती ओझोनचा थर असणे  सजीवांसाठी फार महत्त्वाचे आहे. 


🔰सर्यापासून येणारी अतिनील किरणे सजीवांसाठी हानिकारक असतात. ही 

किरणे ओझोन वायू शोषून घेतो. त्यामुळे पृथ्वीवरील  सजीवांचे रक्षण होते. 


🔰वातानुकूलन यंत्रे, रेफ्रिजरेटर्स यांमध्ये हवा थंड  करण्यासाठी वापरला जाणारे 

📌 कलोरोफ्लुरोकार्बन्स तसेच  

📌 कार्बन टेट्राक्लोराईड हे रासायनिक वायू हवेत मिसळल्यास  ओझोनच्या थराचा नाश होतो.  


🔰ओझोनचे महत्त्व सर्वांच्या लक्षात यावे यासाठी  १६ सप्टेंबर हा दिवस जगभर ‘ओझोन संरक्षण दिन’  म्हणून मानला जातो.

ग्राहक संरक्षण कायदा, 2019 लागू

• ' संरक्षण कायदा, 2019' 20 जुलै 2020 पासून लागू झाला. हा नवीन कायदाग्राहकांना सक्षम करेल आणि आणि त्यांच्या हक्कांच्या संरक्षणास मदत करेल.



📚 या कायद्यातील प्रमुख तरतुदी 


• या कायद्यात ग्राहकांच्या हक्कांना प्रोत्साहन, संरक्षण देऊन ग्राहक संरक्षणाचीअंमलबजावणी करण्यासाठी केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाची स्थापनाकरण्याचा समावेश आहे. 


• केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाला ग्राहकांच्या हक्कांचे उल्लंघन तपासणे आणितक्रारी / खटला चालवणे, असुरक्षित वस्तू व सेवा परत मागवणे, अन्यायकारकव्यापार पद्धती बंद करवणे व दिशाभूल करणार्‍या जाहिरातींवर दंड आकारणे आदीअधिकार देण्यात येतील. 


• ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरील अनुचित व्यापार रोखण्यासाठीचे नियमही या कायद्यांतर्गतसमाविष्ट आहेत.


• या कायद्यांतर्गत प्रत्यके ई-कॉमर्स घटकाला वस्तू परत केल्यास, परतावा, वस्तूबदलून घेतली असल्यास, वारंटी आणि गॅरंटी, वस्तूची डिलेव्हरी आणि शिपमेंट, देयकाचे प्रकार, तक्रार निवारण पद्धती, देयक प्रदान पद्धती, देयक पद्धतीचीसुरक्षितता, परताव्यावरील शुल्क या सर्व बाबींची माहिती द्यावी लागणार आहे. 


• ग्राहकांना वस्तू घेतानाच तपशील समजून घेण्यासाठी वस्तू कोणत्या देशातील आहे, याची माहिती द्यावी लागणार आहे. 


• ई-कॉमर्स कंपन्यांना ग्राहकांच्या तक्रारीची पोहोच 48 तासांत द्यावी लागेल आणि याकायद्यानुसार पोहोच मिळाल्यापासून एक महिन्याच्या आत तक्रारीचे निवारण करावेलागणार आहे. 


• नवीन कायदा उत्पादनाच्या उत्तरदायित्वाची संकल्पना आणतो आणि नुकसानभरपाईच्या कोणत्याही दाव्यासाठी, वस्तू उत्पादक, उत्पादन सेवा प्रदाता आणिउत्पादन विक्रेता यांना आपल्या कार्यकक्षेत आणतो.


• नवीन कायद्यांतर्गत ग्राहक आयोगामधील ग्राहक विवाद निवाडा प्रक्रिया सुलभकरण्याची तरतूद आहे, ज्यात राज्य व जिल्हा आयोगाचे सबलीकरण करण्याचासमावेश आहे.


• नवीन कायद्यात मध्यस्थीसंदर्भात पर्यायी विवाद निराकरण यंत्रणेची तरतूद केलीआहे. यामुळे निवाडा प्रक्रिया सुलभ होईल.


• ग्राहक विवाद निवारण आयोगाच्या नियमांनुसार 5 लाख रुपयांपर्यंतच्या तक्रारीसाठीकसलेही शुल्क आकारले जाणार नाही. तसेच इलेक्ट्रॉनिक पद्धतीने तक्रारी दाखलकरण्याची तरतूद आहे.


• केंद्रीय ग्राहक संरक्षण व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण खात्याच्या मंत्र्यांच्याअध्यक्षतेखाली केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण नियमांची तरतूद करण्यात आलीआहे. 


• यात राज्यमंत्री उपाध्यक्ष असतील आणि विविध क्षेत्रांतील 34 सदस्यांचासमावेश असेल.

नेत्रयोग (Eye Disease)

 १) रंग आंधळेपणा (Colour Blindness):

अनुवांशिक व बरा न होणारा रोगसर्व रंग दिसतात. मात्र, त्यातील फरक जाणवून येत नाही. विशेषतः लाल व हिरवा रंगातील फरक समजून येत नाही . फक्त पुरुषांनाच होतो.


२) मोतीबिंदू (Cataract)

डोळ्यातील प्रथिनांच्या रंगातील बदलामुळे नेत्रभिंग धूसर किंवा अस्पष्ट बनतो, कमी प्रकाशात चांगले तर जास्त प्रकाशात कमी दिसते. उपाय: भिंगारोपण, बहिरवर्क भिंगाचे रोपण केले जाते. मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाल्यावर कधी कधी नवीन बसविलेल्या भिंगाच्या मागे पुन्हा मोतीबिंदू तयार होते. यासाठी काही महिने ते काही वर्षे असा कालावधी असू शकतो. YAG लेसर वापरून हा द्वितीयक मोतीबिंदू काढता येतो.


३) काचबिंदू (Glaucoma):

हि व्यथा वयाच्या ४० ते ५० वर्षाच्या दरम्यान होते. नेत्रजलाच्या निचऱ्यामध्ये बिघाड झाल्यास ते डोळ्यात साठू लागते. त्यामुळे डोळ्याच्या आतील दाब (अंतर्दाब) वाजवीपेक्षा जास्त वाढतो व डोळा टणक बनतो. त्यामुळे बुबुळ घासले गेल्याने काचेसारखे चकचकीत होते. म्हणून त्याला काचबिंदू असे म्हणतात. काचबिंदूची परिणीती आंधळेपणात होऊ शकते. डोळ्याचा अंतर्दाब टोनोमीटरच्या साहाय्याने मोजला जातो.


४) शुष्कता (Xerophtalmia/xerosis):

व्हिटॅमिन ए च्या अभावामुळे होतो. डोळे कोरडे पडून पुढे रातांधळेपणा होऊ शकतो.


५) डोळे येणे (Conjuctivitis)

विषाणूच्या संसर्गामुळे होणारा रोग डोळे लाल होऊन खूप लागतात व चिकट पाणी येते.


६) खुपरी (Trachoma)

संसर्गजन्य रोग, घाणेरडया वस्तीत, दूषित हवेत, दूर व धुळीत राहणाऱ्यांना होतो. प्रथम पापण्यांचा आतील भाग खरखरीत होतो व नंतर त्यावर साबुदाणाच्या आकाराचे उंचवटे येतात. डोळ्याच्या उघटझापीमुळे ते बुबुळावर घासले गेल्याने बुबुळावर फुले पडतात. त्यामुळे कायमचे अंधत्व येऊ शकते.


७) रांजणवाडी (Meibomian Cyst)

पापण्यांच्या केसांच्या मुळाशी असलेल्या सूक्ष्मस्रावक ग्रंथींमधून नेहमी एक प्रकारचा चिकट द्रव बाहेर पडत असतो.

या ग्रंथी धूलिकण, केसातील कोंडा इत्यादी कारणांमुळे बंद झाल्यास द्रव बाहेर न पडल्याने सुजतात. त्यालाच रांजणवाडी असे म्हणतात.


विविध राज्यांनी मुलींसाठी सुरु केलेल्या योजना

🔰 राजश्री योजना : राजस्थान 


🔰 कन्याश्री योजना : पश्चिम बंगाल 


🔰 भाग्यलक्ष्मी योजना : कर्नाटक


🔰 लाडली लक्ष्मी योजना : मध्य प्रदेश 


🔰 पख अभियान : मध्य प्रदेश 


🔰 लाडली : दिल्ली व हरियाणा


🔰 मख्यमंत्री लाडली योजना : उत्तर प्रदेश 


🔰 मख्यमंत्री कन्या सुरक्षा योजना : बिहार


🔰 किशोरी शक्ति योजना : ओडिशा 


🔰 ममता योजना : गोवा 


🔰 सरस्वती योजना : छत्तीसगढ


🔰 माझी कन्या भाग्यश्री योजना : महाराष्ट्र


🔰 नदा देवी कन्या योजना : उत्तराखंड .

देशभरात विशेष पल्स पोलिओ अभियान.....

राष्ट्रीय लसीकरण दिवसाची सुरुवात 17 जानेवारीपासून होणार होती. मात्र 16 जानेवारीपासून कोविड-19 लसीकरण अभियान सुरु झाल्याने पोलिओ लसीकरण मोहिमेला स्थगिती दिली. 


भारताच्या राष्ट्रपती कार्यालयाशी सल्लामसलत करून आरोग्य मंत्रालयाने पोलिओ लसीकरण दिन 31 जानेवारीपासून सुरु करण्याचा निर्णय घेतला. 


हा दिवस राष्ट्रीय लसीकरण दिवस किंवा पोलिओ संडे म्हणून देखील ओळखला जातो.


🎯 महत्त्वाच्या बाबी : 


• 0 ते 5 वर्षांच्या मुलांना पोलिओ ड्रॉप्स दिले जातील.


• 31 जानेवारीपासून सुरु होणारे अभियान 2 फेब्रुवारीपर्यंत चालणार.


• ज्या रविवारी लसीकरण अभियान सुरु होते, त्या दिवसाला राष्ट्रीय लसीकरण दिवस म्हणून मानले जाते.


• 1995 पासून जागतिक आरोग्य संघटनेच्या ग्लोबल पोलिओ निर्मूलन उपक्रमाच्या पुढाकाराने भारताने पल्स पोलिओ लसीकरण कार्यक्रम सुरू केला.


• पोलिओ लसीकरण अभियान वर्षातून दोनदा आयोजित केला जातो.


• कोविड-19 संकटाच्या काळात पोलिओ लसीकरण अभियान राबवण्यात येत आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना लसीकरण शिबिरात न घेण्याचा सल्ला दिला आहे.

भारताची पहिली स्वदेशी 9 mm मशीन पिस्तूल विकसित

डीआरडीओ आणि भारतीय लष्कराने संयुक्तपणे देशाची पहिली स्वदेश निर्मित 9 mm मशीन पिस्तूल विकसित केले आहे.


इन्फंट्री स्कूल, महू आणि डीआरडीओच्या शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास संस्था(एआरडीई), पुणे यांनी हे पिस्तूल विकसित केले आहे.


पिस्तूलाचे नाव “अस्मि” असे ठेवण्यात आले आहे

IMP QUESTION

१)  भारताच्या कोणत्या माजी पंतप्रधनाचां उल्लेख आधुनिक भारताचे चाणक्य असा केला जातो.

१. चरणसिंग

२. व्ही.पी.सिंग

३. अटलबिहारी वाजपेयी

४. पी.व्ही.नरसिंहराव🔶


२) सचिन तेंडूलकरने आपले १०० वे शतक कोणत्या मैदानवर झळ\कावले होते.

१. वानखेडे स्टेडीयम

२. ईडन गार्डन

३. लॉर्डस

४. शेर- ए - बांगला स्टेडीयम🔶


३) २०१८ च्या प्रारंभी कोणत्या राज्यात राष्ट्रीय कर्करोग संस्था स्थापन करण्यात आली.

१. राजस्थान

२. पंजाब

३. हरियाणा🔶

४. हिमाचल प्रदेश


४) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमात आपले पहिले भाषण खालीलपैकी कोणत्या वर्षी दिले होते.

१. ऑक्टोंबर १४🔶

२. ऑक्टोंबर १५

३. ऑगस्ट १४

४. सप्टेंबर १४


५)  खालीलपैकी भारताच्या कोणत्या पंतप्रधनांनी संसदेत मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची घोषणा केल्यानंतर त्याला देशव्यापी विरोध झाला होता.

१. राजीव गांधी

२. व्ही.पी. सिंग🔶

३. चौथरी चरणसिंग

४. चंद्रशेखर


६) १९८३ मध्ये कन्याकुमारी ते दिल्लीतील राजघाटापर्यंत पदयात्रा काढणारे नेते खालीलपैकी कोण आहे?

१. चंद्रशेखर

२. लालकृष्ण अडवाणी🔶

३. रामविलास पासवान

४. व्ही. पी.सिंग


७) सर डॉन ब्रॅडमॅन यांच्यानंतर कसोटी क्रिकेट मध्ये सर्वात जलद २५ शतक झळकवणारा दुसरा फलंदाज ------------ हा आहे.

१. विराट कोहली

२. महेला जयवर्धने

३. केन विल्यम्सन

४. स्टीव्ह स्मिथ🔶


८)  ------------- हा देश ऑस्ट्रेलीया समुहाचा ४३ वां सदस्य देश ठरला.

१. चीन

२. पाकिस्तान

३. भारत🔶

४. ब्राझील


९)  युनेस्को द्वारा ----ते ------ पर्यंत युनेस्को वारसा सप्ताह साजरा केला जातो.

१. १४ ते २० नोव्हेंबर

२. २० ते २४ नोव्हेंबर

३. १९ ते २५ नोव्हेंबर🔶

४. ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर


१०) जागतिक व्यापार संघटनेने २०१९ या वर्षापासून ------- हा दिवस जागतिक कापूस दिवस म्हणून घोषित केले.

१. ७ ऑक्टोंबर🔶

२. १५ ऑक्टोंबर

३. ६ नोव्हेंबर

४. २६ नोव्हेंबर


११) अवयवदानात परिणामकारक चळवळ उभी करणाऱ्या ----------------- या राज्याला केंद्र सरकरने सर्वोत्तम राज्याचा दर्जा दिला.

१. गुजरात🔶

२. महाराष्ट्र

३. तामिळनाडू

४. आंध्र प्रदेश


१२) बाळाच्या नैसर्गिक संगोपनासाठी आणि आईच्या दुधाचे महत्व लक्षात घेऊन ---------- शहरामध्ये पहिलीह्युमन मिल्क बँक स्थापन करण्यात येणार आहे.

१. पुणे

२. नागपूर

३. औरंगाबाद

४. नाशिक🔶

 

१३)  ग्रीनपीस इंडिया नावाच्या स्वयंसेवी संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार ………….हे शहर भारतातील सर्वात प्रदूषित शहर आहे

१.      झरिया🔶

२.      धनबाद

३.      नोएडा

४.      गाज़ियाबाद – उत्तर प्रदेश

 


१४) 6 जानेवारी 2020 रोजी किसान विज्ञान कॉंग्रेस कोठे आयोजित केली गेली होती? 

१. नवी दिल्ली

२. बंगळुरू🔶

३. पुणे

४. मुंबई

 


१५) राज्यातील दुष्काळावर कायमस्वरूपी मात करता यावी म्हणून सर्व नदी खोऱ्यांचे एकत्रीकरण करण्यासाठी शासनाने जल आराखडा तयार केला आहे. असा एकात्मिक जल आराखडा तयार करणारे ............ देशातील पहिले राज्य ठरले.

१.     केरळ

२.     तामिळनाडू

३.     महाराष्ट्र

४.     आंध्र प्रदेश🔶


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आतापर्यंत प्राप्त आंतरराष्ट्रीय पुरस्कार

🏆 ऑर्डर ऑफ अब्दुल्लाझिझ अल सौद 

🔰 दश : सौदी अरेबिया


🏆 सटेट ऑर्डर ऑफ गाझी आमीर अम्मानुल्लाह खान 

🔰 दश : अफगाणिस्तान 


🏆 गरँड कॉलर ऑफ दी स्टेट ऑफ पॅलेस्टाईन पुरस्कार 

🔰 दश : पॅलेस्टाईन


🏆 ऑर्डर ऑफ झायेद 

🔰 दश : संयुक्त अरब अमिरात 


🏆 सियोल शांती पुरस्कार 

🔰 दश : दक्षिण कोरिया


🏆 य एन चँपियन्स ऑफ द अर्थ 

🔰 सस्था : संयुक्त राष्ट्र 


🏆 गलोबल गोलकीपर पुरस्कार 

🔰 सस्था : बिल और मेलिंडा गेट्स फाउंडेशन


🏆 किंग हमाद ऑर्डर ऑफ द रेनेसां

🔰 दश : बहरीन


🏆 निशान इज्जुद्दीन पुरस्कार

🔰 दश : मालदीव


🏆 ऑर्डर ऑफ सेंट एंड्रयू 

🔰 दश : रशिया


🏆 लीजन ऑफ मेरिट

🔰 दश : अमेरिका .

भूकंप

🔰भूकंप लहरी : 


» ज्या वेळी भूकंप होतो, त्या वेळी 

   भूकवचात मोठय़ा प्रमाणात हालचाली 

   होतात व मोठय़ा प्रमाणात कंप निर्माण 

   होतात. यांनाच ‘भूकंप लहरी’ असे 

   म्हणतात.


🔰नाभी (Focus) : 


» भूकंप झाल्यावर भूकवचातील ज्या 

   स्थानापासून उगम पावून सर्वदूर 

   पसरतात, त्या स्थानास भूकंप केंद्र किंवा 

   नाभी म्हणतात.


🔰 अधीकेंद्र (Epicentre) : 


» नाभीच्या अगदी वर क्षितिजाजवळच्या 

   लंब रेषेवर पृथ्वीच्या पृष्ठभागावर जो 

   बिंदू मिळतो, त्याला ‘अधीकेंद्र’ असे 

   म्हणतात. भूकंपकेंद्रापासून निघणाऱ्या 

   भूकंप लहरींचा सर्वात अधिक प्रभाव 

   अधीकेंद्राच्या निकट दिसून येतो. 

   अधिकेंद्रापासून जसजसे अंतर वाढत 

   जाते, तसेतसे भूकंपाची तीव्रता कमी 

   कमी होत जाते.


🔰 भूकंप अधिलेख (Seismogram):-

     

» भूकंप लहरींचा अभ्यास भूकंप            

   अभिलेखांवरून करता येतो. भूकंप 

   लहरींचे तीन प्रकार पडतात-  प्राथमिक 

   लहरी, दुय्यम लहरी, भूपृष्ठ लहरी.


🔰 भूकंप लहरींचे प्रकार :- 


■ प्राथमिक लहरी (P waves) : 


» प्राथमिक लहरींचा वेग इतर सर्व 

   लहरींपेक्षा जास्त असतो. 


» प्राथमिक लहरी या स्थायुरूप व द्रव्यरूप 

   पदार्थावरून प्रवेश करू शकतात. 


» प्राथमिक लहरी या ध्वनी लहरींप्रमाणे 

   असतात. 


» यात कणांचे कंपन लहरींच्या संचरण 

   दिशेने घडून येते.


■ दुय्यम लहरी (S waves) : 


» दुय्यम लहरी या प्रकाश लहरींप्रमाणे 

   असून यात कणांचे कंपन संचरण 

   दिशेशी समलंब दिशेने घडून येते. 


» दुय्यम लहरी या घनपदार्थापासून जाऊ 

   शकतात; परंतु द्रवरूप पदार्थातून त्या 

   जाऊ शकत नाहीत. 


» सर्व साधारणपणे त्यांचा वेग प्राथमिक 

   लहरींच्या वेगापेक्षा निम्मा असतो.


■ भूपृष्ठ लहरी (L waves) : 


» भूपृष्ठ लहरी या भूपृष्ठांवरूनच सागरी 

   लहरींप्रमाणे प्रवाहित होतात. 


» सर्व भूकंप लहरींमध्ये भूपृष्ठ लहरी या 

   अधिक विनाशक असतात. 


» भूपृष्ठांवरून अधिक खोलवर या लहरी 

   प्रवास करू शकत नाही. 


» भूपृष्ठ लहरी पृथ्वीपासून आरपार न 

   जाता पृथ्वीगोलाला फेरी मारतात. 


» भूकंप अभिलेखावर या लहरींची नोंद 

   सर्वात शेवटी होते.


🔰 रिश्टर स्केल (Richter Scale) : 


» अमेरिकन भूकंप शास्त्रज्ञ चार्ल्स रिश्टर 

   यांनी १९३५ साली भूकंपाच्या लहरींची 

   तीव्रता मोजण्यासांठी रिश्टर प्रमाण 

   शोधून काढले. 


» याच्या साह्य़ाने भूकंपाच्या तीव्रतेची 

   सातत्याने नोंद केली जाते. याच्या कक्षा 

   एक ते नऊ या दरम्यान असतात.


🌍 भूकंपाचे जागतिक वितरण 

     

■पॅसिफिक महासागराचा पट्टा : 


» जगातील ६५% भूकंप प्रदेश पॅसिफिक 

   महासागराच्या सभोवतालच्या पट्टय़ात 

   आढळतो. 


» याला प्रशांत महासागरातील पट्टा किंवा 

   अग्निकंकण (Rings of Fire) असे 

   म्हणतात. 


» यात इंडोनेशिया, फिलिपाइन्स, जपानची 

   बेटे, कामचटका द्वीपकल्प व पूर्व 

   सबेरियातील काही भाग येतो. 


» भूकंपाचा हा पट्टा उत्तर अमेरिकेत 

   आल्प्सपासून रॉकीज पर्वत दक्षिण 

   अमेरिकेत अँडीज पर्वताला अनुसरून 

   पुढे अंटाक्र्टिका खंडापर्यंत गेलेला आहे. 


» या भागातच असलेल्या जपानच्या हांशू 

   बेटांवर जगातील सर्वात जास्त विद्धंसक 

   भूकंप होतात.


■ मध्य अटलांटिक पट्टा  : 


» या पट्टय़ात अटलांटिक महासागरातील 

   मध्य अटलांटिक रिझ आणि 

   रिझजवळील काही बेटांचा समावेश 

   होतो. 


» येथे सर्वसाधारणपणे मध्यम तीव्रतेच्या 

   भूकंपाची नोंद झालेली आहे.


■ भूमध्य सागरीय पट्टा : 


» या पट्टय़ाचा विस्तार अटलांटिक 

   महासागरातील जलमग्न पर्वतरांगेपासून 

   होऊन भूमध्य समुद्राभोवती पसरलेला 

   आहे.

एकात्मिक व संघराज्यीय प्रणाली

◆एकात्मिक प्रणाली


1. ब्रिटन

2. फ्रांस

3. जपान

4. चीन

5. इटली

6. बेल्जियम

7. नॉर्वे

8. स्वीडन

9. स्पेन


◆संघराज्यीय प्रणाली


1. अमेरिका

2. स्वित्झर्लंड

3. ऑस्ट्रेलिया

4. कॅनडा

5. रशिया

6. ब्राझील

7. अर्जेंटिना


30 January 2021

Online Test Series

आधुनिक भारताच्या इतिहासात घडलेल्या सर्वप्रथम व एकमेव महत्वाच्या घटना



◾️भारतात रेलवे सुरु करण्याची पहिली योजना ही भारतात कोणी आखली?

- लॉर्ड हार्डींग्ज पहिला


◾️इग्रजी भाषेत सुरु करण्यात आलेले मुंबईतिल प्रथम वृत्तपत्र कोणते?

- बॉम्बे हेराॅल्ड.


◾️भारतातील पहिली जातीय संघटना कोणती?

- मुस्लिम लीग


◾️ टिपू सुलतानाने कोणत्या लढाईत इंग्रजांविरुद्ध सर्वप्रथम रॉकेट चा वापर केला?

- 1780 ची पाल्लुतुरची लढाई 


◾️भारतीय संस्थानिकांना सनद देऊ करणारा प्रथम इंग्रज अधिकारी?

- लॉर्ड कॅनिंग 


◾️ निळीचा उठाव हा सर्वप्रथम कोठे घडून आला?

- बंगाल प्रांतात


◾️1858च्या कायद्यान्वये नियुक्त झालेला पहिला भारतमंत्री?

- लॉर्ड स्टैनले


◾️1857च्या उठावाची पहिली ठिणगी ही सर्वप्रथम कोणत्या रेजिमेंटमध्ये पेटली?

- 34वी एन. आय. रजिमेंट 


◾️इग्रजी भाषेतून उच्च शिक्षण उपलब्ध करुन देणारे प्रथम कॉलेज कोणते?

- कलकत्ता विद्यालय

भारत आणि शाश्वत विकास उद्दिष्टे



🌻सर्वेक्षणात नमूद केले आहे की एसडीजींना सरकारच्या धोरण, योजना आणि कार्यक्रमांमध्ये मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भारताने अनेक सक्रिय पावले उचलली आहेत.


🌻कोविड -19 महामारीच्या अभूतपूर्व संकटामुळे उद्भवलेल्या आव्हानांचा उल्लेख या सर्वेक्षणात आहे. तसेच  शाश्वत विकास हा भारतीय विकास रणनीतीमधील गाभा असल्याचे यात म्हटले आहे.


🌷हवामान बदल🌷


🌻आर्थिक सर्वेक्षणानुसार भारत हा अनेक सक्रिय हवामानविषयक उपक्रम राबवित आहे.


🌻 तयात हवामान बदलावरील राष्ट्रीय कृती योजना (एनएपीसीसी), जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय सौर अभियान (जेएनएनएसएम), हवामान बदल कृती योजना (सीसीएपी), हवामान बदलावरील राष्ट्रीय अनुकूलन निधी तसेच भारतात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर आणि उत्पादनासाठी त्वरित अंमलबजावणी यासारख्या सरकारच्या महत्वाकांक्षी उपक्रमांचा उल्लेख करण्यात आला आहे. 


🌹शाश्वत हवामान वित्तपुरवठा


🌻समाज कल्याणकारी उद्दीष्ट साकार करण्यासाठी कार्यरत असलेल्या सामाजिक उपक्रमांद्वारे भांडवल उभारण्यासाठी सेबीच्या नियामक तत्वाखाली भारत एक सामाजिक शेअर बाजार (एसएसई) उभारण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे.


🌻या सर्वेक्षणात चीननंतर उभरत्या बाजारात भारत दुसर्‍या क्रमांकाचा हरित बॉन्ड मार्केट असल्याचे नमूद केले आहे. 2017 मध्ये, भारतातील ग्रीन बॉन्ड्सच्या चलनास पाठबळ देण्यासाठी सेबीने भारतीय शेअर बाजारात हरित बॉन्डच्या यादीसह हरित बाँडसंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी केली. 24 डिसेंबर 2020 पर्यंत भारतात आठ ईएसजी म्युच्युअल फंड सुरू झाले आहेत.


🌷आतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा पुढाकार


🌻विकासाचे शाश्वत मॉडेल विकसित करण्यासाठी आणि आपत्ती निवारक पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी जागतिक स्तरावर भारताने घेतलेल्या पुढाकारांचा सर्वेक्षणात उल्लेख आहे.


🌻1. आंतरराष्ट्रीय सौर युती (आयएसए) ने नुकतीच जागतिक स्तरावर सौर ऊर्जा क्रांती घडवून आणण्यासाठी ‘वर्ल्ड सोलर बँक’ आणि ‘वन सन वन वर्ल्ड वन ग्रिड इनिशिएटिव्ह’ या दोन नवीन उपक्रमांची सुरूवात केली आहे. 


🌻आयएसए सचिवालयानं नुकतीच जागतिक सार्वजनिक आणि खासगी कंपन्यांचा समावेश असलेल्या ‘शाश्वत हवामान उपक्रमांसाठी युती’ सुरू केली आहे.


🌻 सदर देशांना कला आणि अद्ययावत सौर तंत्रज्ञानाचे प्रदर्शन करण्याच्या उद्देशाने सप्टेंबर 2020 मध्ये त्यांनी प्रथम जागतिक सौर तंत्रज्ञान परिषदेचे (डब्ल्यूएसटीएस) आयोजन केले होते.


🌻2. आपत्ती निवारण पायाभूत सुविधांसाठी युती: राष्ट्रीय सरकारद्वारे सर्वसमावेशक बहु-भागधारक व्यासपीठ म्हणून युती कार्य करते, जिथे आपत्ती निवारणाच्या पायाभूत सुविधांचे विविध पैलू जाणून घेऊन त्यांची देवाणघेवाण केली जाते.


🌷 सीडीआरआय ऊर्जा आणि वाहतूक क्षेत्राची लवचीकता वाढविण्यावर काम करीत असून सर्व खंडातील देश आणि विविध स्तरातील विकास आणि जोखीम यात या देशांना समाविष्ट करण्यासाठी आपली सदस्यता वाढविण्याच्या विचारात आहे.


महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट



१) पहिली 

- 17 फेब्रुवारी ते 8 जून 1980 

- राज्यपाल -: सादिक अली 

- राष्ट्रपती -: नीलम संजीव रेड्डी 


२) दुसरी 

- 28 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2014

- राज्यपाल -: सी विद्यासागर राव 

- राष्ट्रपती -: प्रणव मुखर्जी 

- एकूण 32 दिवस राजवट लागू होती


3) तिसरी 

- 12 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर 2019 

- राज्यपाल -: भगतसिंग कोशारी 

- राष्ट्रपती -: रामनाथ कोविंद 

- एकूण 12 दिवस राजवट लागू होती 


🔰 सर्वाधिक वेळा मणिपूर मध्ये राजवट लागू 

🔰 छत्तीसगड व तेलंगणा मध्ये एकदाही लागू नाही . 


15 वा वित्त आयोग



अध्यक्ष:एन के सिंग, =  सचिव: अरविंद मेहता 

स्थापना:नोव्हेंबर 2017 =अहवाल : नोव्हेंबर 19

 


» मुख्य शिफारस - राज्यांचा वाटा 42% वरून 41 % करावा


» करातील वाट्यानुसार राज्ये 

१. उत्तरप्रदेश - 17.9%

२. बिहार 10%

३. मध्यप्रदेश 7.9

४. पश्चिम बंगाल 7.5

५. महाराष्ट्र - 6.1( 5.5 वरून 6.1) (0.6 ची वाढ झाली )


» सर्वात शेवटचे राज्य - सिक्कीम - 0.388


» करातील वाटा ठरवण्यासाठी खालील आधार ठरवण्यात आले

१. लोकसंख्या : 15%

२. क्षेत्रफळ     : 15%

३. वने आणि पर्यावरण : 10%

४. उत्पन्न तफावत : 45 %

५. लोकसंख्या कामगिरी : 12.5%

६. कर प्रयत्न : 2.5 %

राष्ट्रीय सागरी कासव कृती योजना.



🔰समुद्रात मोठ्या प्रमाणावर असलेल्या विविध प्राण्यांचे आणि सागरी कासवांचे संवर्धन करण्याची गरज लक्षात घेऊन केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्यावतीने ‘सागरी महा प्राणी संपत्ती मार्गदर्शक तत्वे’ आणि ‘राष्ट्रीय सागरी कासव कृती योजना’ जाहीर करण्यात आली आहे.


🔴ठळक बाबी....


🔰भारताला 7500 किलोमीटर लांबीचा सागरी किनारा लाभला आहे. समुद्रामध्ये समृद्ध जैवविविधता आहे. त्यामध्ये रंगबिरंगी मासे पासून शार्क, देवमासे, वेगवेगळ्या प्रकारची कासवे, महाकाय सस्तन प्राणी, डॉल्फिन, चमकदार प्रवाळ अशा असंख्य प्रकाराच्या सागरी प्रजाती भारतामध्ये आहेत. सागरी प्राण्यांमुळे मानवी आरोग्यासाठीही आवश्यक साधनसामुग्री मिळते.


🔰सागरी व्यापार आणि वाहतूक, अन्न, खनिज स्रोत, सांस्कृतिक परंपरा, त्याचबरोबर अध्यात्मिक मूल्ये आणि विश्वभरातल्या पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या सागरी किनाऱ्यांच्या स्रोतांवर लक्षावधी लोकांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे.


🔰भारतामध्ये सागरी अधिवासांला आर्थिक, पर्यावरणीय महत्व आणि सांस्कृतिक मूल्ये असूनही सागरातल्या महा प्राणी संपत्तीला आणि सागरी कासवांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

 

🔰अशा आव्हानात्मक परिस्थितीमध्ये त्यांच्या संवर्धनासाठी नागरिकांच्या सहभागाबरोबरच समन्वय साधून कृती करण्याची आवश्यकता आहे. यामुळे सागरी प्रजाती आणि त्यांचा अधिवास सुरक्षित ठेवण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी मदत मिळू शकणार आहे.


🔰कती योजनेमध्ये सागरी प्राणी संपत्ती संवर्धनासाठी आंतर-क्षेत्रीय कार्यक्रमाला चालना मिळणार आहे, तसेच सागरी सस्तन प्राण्यांच्या संवर्धनातल्या समस्या सोडविण्यासाठी सरकार आणि समाज तसेच संबंधित भागधारक यांच्यामध्ये सुसंवाद निर्माण करणे शक्य होणार आहे.