13 January 2020

खार्‍या पाण्यातल्या मत्स्यपालनाचा पहिला वैज्ञानिक प्रयोग भारतात यशस्वी

केंद्रीय समुद्री मत्स्य संशोधन संस्थेनी (CMFRI) कृत्रिम तलावांमध्ये इंडियन पोम्पेनो (पामलेट) या मत्स्यप्रजातीचे पालन करण्यासाठी एक संभाव्य वैज्ञानिक पद्धत विकसित केली आहे.

पोम्पेनो ही मत्स्यप्रजाती समुद्राच्या खार्‍या पाण्यात आढळते. या माश्याला सर्वाधिक मागणी आहे. तलावांमध्ये इंडियन पोम्पेनोचे पालन हे कोळंबीला एक चांगला पर्याय ठरतो.

ठळक बाबी

🔸वैज्ञानिक पद्धतीच्या यशस्वी शोधानंतर विशाखापट्टणम येथे तलावांमध्ये अधिकृतपणे मत्स्यपालन केले जाणार आहे. पोम्पेनो या मत्स्यप्रजातीच्या पालनासाठी वैज्ञानिक पद्धत विकसित करण्याचा हा भारतातला पहिलाच प्रयोग आहे.

🔸या पद्धतीमध्ये जवळपास 95 टक्के मासे जिवंत राहतात, असे आढळून आले आहे.

🔸या पद्धतीनुसार एकरामागे 3 टनचे उत्पादन होते आणि एकरामागे होणार्‍या उत्पादन खर्चाच्या 25-30 टक्क्यांपर्यंत नफा मिळू शकतो.

🔸या शोधकार्यासाठी राष्ट्रीय मत्स्यव्यवसाय विकास मंडळाने (NFDB) आर्थिक मदत केली.

भूगोल प्रश्नसंच

1) भारतामधील बहुतेक सिंचन (कमांड) क्षेत्रामध्ये सिंचनाने ......................... वाढली आहे.
   1) पाणथळ जमिनी    2) भूमिगत उच्चतम पाणी पातळी
   3) क्षारयुक्त जमीन    4) वरील सर्व
उत्तर :- 4

2) झाडांना मॅग्नेशियमचा पुरवठा केल्यास ....................... पुरविणा-या खतांची कार्यक्षमता वाढते.
   1) नत्र      2) स्फुदर     
   3) पालाश    4) वरीलपैकी सर्व
उत्तर :- 2

3) काही वनस्पतीमध्ये पानांच्या कडा किंवा टोक यामधून काही प्रमाणात थेंबांच्या स्वरूपात पाण्याचा –हास होतो. या प्रक्रियेला
     ................... म्हणतात.
   1) ॲबसॉर्पशन (शोषण)      2) ॲडसॉपर्शन
   3) ऑसमॉसीस (परासरण)    4) गटेशन
उत्तर :- 4

4) वनस्पतीमध्ये पाण्याचा ताण सहन करण्याचा क्षमता ........................ मुळे येते.
   अ) पाणी ग्रहण करणे    ब) पाण्याचे नुकसान कमी करणे
   क) जलसंचय      ड) वरीलपैकी कोणतेही नाही
   1) अ व ब फक्त    2) ब व क फक्त    3) अ, ब व क    4) ड फक्त
उत्तर :- 3

5) पाण्याच्या प्रवाहासोबत कितपत पाणी हे जमिनीत समप्रमाणात विभागले जाते ते .......................... दर्शविते.
   1) पाणी देण्याची कार्यक्षमता    2) पाणी वाटप कार्यक्षमता
   3) पाणी वाहन कार्यक्षमता      4) पाणी साठवण कार्यक्षमता
उत्तर :- 2

अस्मी आणि मानसला सुवर्णपदक

📌 खेलो इंडिया यूथ गेम्सच्या तिसऱया पर्वात महाराष्ट्राच्या अस्मी बडदे हिने रिदमिक जिम्नॅस्टिक्समध्ये तर मानस मनकवले याने पॉमेल हॉर्स प्रकारात सुवर्णपदक पटकावले आहे.

📌 महाराष्ट्राच्या श्रेया बंगाळे व सिद्धी हात्तेकर यांनी रौप्य पदकाला गवसणी घातली असून महाराष्ट्राच्याच मेघ रॉय व सलोनी दादरकर यांनीही कास्यपदकावर आपले नाव कोरले.

📌 सर्वसाधारण विभागात 17 वर्षांखालील गटात अस्मीने 43.80 गुणांची कमाई केली तर श्रेयाला 40.80 गुण मिळाले.

📌 दरम्यान, या दोन्ही खेळाडूंनी चेंडू व दोरीच्या सहाय्याने अप्रतिम कसरती सादर करत असतानाच उत्तम प्रकारे तोलही सांभाळला.

भारताची परकीय चलनाची गंगाजळी वाढली

📌 भारताची परकीय चलनाची गंगाजळी या महिन्याच्या पहिल्या सप्तांहात ३ पूर्णांक ६८९ अब्ज अमेरिकी डॉलर ने वाढून ४६१ पूर्णांक १५७ अब्ज अमेरिकी डॉलर इतकी झाली आहे. आर. बी आय. ने जारी केलेल्या पत्रकात ही माहिती दिली आहे. 

📌 परकीय चलन हे एकूण ठेवीचा महत्त्वाचा भाग असतो. तो ३ पूर्णांक १३ अब्ज अमेरिकी डॉलरने वाढून ४२७ पूर्णांक ९४९ अब्ज अमेरिकी डॉलर एवढा झाला आहे.

📌 आंतरराष्ट्रीय नाणे निधी मधून पैसे काढण्याचा भारताचा हक्क ७ दशलक्ष अमेरिकी डॉलर ने वाढून १ पूर्णांक ४४७ अब्ज अमेरिकी डॉलर झाला आहे. 

📌 भारताची एकूण राखीव ठेव ३ दशलक्ष अमेरिकी डॉलर ने वाढून ३.७०३ अब्ज अमेरिकी डॉलर ने वाढली आहे.    

महानोर यांच्या हस्ते साहित्य संमेलनाचे उद्घाटन

👉 ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन.

👉ठिकाण:उस्मानाबाद.

👉कालावधी:10, 11, 12 जानेवारी दरम्यान.

👉 संमेलनाचे उद्घाटक: पद्मश्री रानकवी ना. धों. महानोर .

👉९३ व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष: फादर फ्रान्सिस दिब्रिटो.

👉९२ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष: डॉ. अरुणा ढेरे.

👉९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन: यवतमाळ

👉93 व्या साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह: संत  गोरा कुंभार यांची हाती चिपळ्या घेऊन भक्तीरसात तल्लीन झालेली प्रतिमा.

👉वाद:संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या निवडीला ब्राह्मण महासंघ आणि हिंदुत्ववादी संघटनांचा सुरुवातीपासून विरोध.

👉अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष: प्रा. कौतिकराव ठाले- पाटील.

👉२००४ नंतर मराठवाड्याला साहित्य संमेलनाचा मान.

प्रवासी भारतीय दिन

◾️मागील 17 वर्षांपासून दरवर्षी 'प्रवासी भारतीय दिन' 9 जानेवारीला साजरा करण्यात येत आहे.

◾️या दिवसाची खास गोष्ट म्हणजे भारताबरोबरच परदेशात राहणारे भारतीय नागरिक देखील या दिवसाची खास वाट पाहत असतात. कारण बाहेर राहून देखील हे लोक देशाचे नाव उज्जवल करू शकतात

◾️. राष्ट्रपिता महात्मा गांधी हे दक्षिण आफ्रिकेवरून मायदेशात परतल्याच्या दिनाचे औचित्य साधून 2003 पासून दरवर्षी 9 जानेवारीला हा दिवस साजरा करण्यात येत आहे

◾️. याच दिवशी 1915 ला महात्मा गांधी आफ्रिकेवरून भारतात परतले होते.

◾️महात्मा गांधी जेव्हा 1893 ला दक्षिण आफ्रिकेच्या नटाल प्रांतात पोहचले, तेव्हा तेथे त्यांना वर्णभेदाचा सामना करावा लागला.

◾️महात्मा गांधी हे यावेळी गप्प न बसता त्यांनी याविषयी आवाज उठवला.

◾️गांधीजींना यात यश देखील आले. अखेर 22 वर्षानंतर ते 9 जानेवारी 1915 ला भारतात परतले. याच दिनानिमित्ताने 2003 पासून दरवर्षी प्रवासी भारतीय दिन साजरा केला जातो.

◾️ 2003 साली सर्वात प्रथम प्रवासी भारतीय दिवस हा नवी दिल्लीत साजरा करण्यात आला होता.

◾️ तर 2019 मध्ये हा दिवस काशी येथे साजरा करण्यात आला होता.

◾️2016 मध्ये काही कारणास्तव या दिनाचे आयोजन करण्यात आले नव्हते.

◾️हा दिवस साजरा करण्याचा उद्देश हा असतो की, परदेशात राहणाऱ्या भारतीय नागरिकांच्या समस्या जाणून घेणे व त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे.

◾️ त्यांच्यासाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे. जगभरातील भारतीय प्रवाशांचे नेटवर्क तयार करणे व गुंतवणूक वाढवणे.
   

इंटरनेटचा वापर हा मूलभूत अधिकार आहे: सर्वोच्च न्यायालय

'राज्यघटनेच्या कलम 19 नुसार इंटरनेट वापर हा मूलभूत अधिकार आहे,' अशी स्पष्टोक्ती देत जम्मू व काश्मीरमधले इंटरनेटवरचे निर्बंध हटविण्याबाबत आठवडाभरात निर्णय घेण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने 10 जानेवारी 2020 रोजी दिला.

हा निर्णय न्या. एन. व्ही. रमण, न्या. बी. आर. गवई आणि न्या. आर. सुभाष रेड्डी यांच्या खंडपीठाने दिला आहे.

खंडपीठाचे निर्णय

🔸काश्मीर खोऱ्यात गेले पाच महिने इंटरनेट सेवा बंद आहे. फौजदारी दंड संहितेमधले 'कलम 144' अन्वये प्रतिबंधात्मक आदेश मनमानी पद्धतीने नागरिकांचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि मतभिन्नता व्यक्त करण्याचा अधिकार दडपण्यासाठी करता येणार नाही, असे स्पष्ट केले गेले.

🔸प्रतिबंधात्मक आदेश लागू करताना न्यायदंडाधिकाऱ्यांनी (जिल्हाधिकारी) सारासार विवेक आणि प्रमाण (डॉक्टरीन ऑफ प्रपोर्शनलिटी) यांचा वापर करावा.

🔸हॉस्पिटल, शैक्षणिक संस्था अशा ठिकाणी तातडीने इंटरनेट सेवा सुरू करावी.

🔸इतर क्षेत्रे, तसेच सामान्य नागरिकांना इंटरनेट सेवा उपलब्ध करून देण्यासाठी कोणतीही कालमर्यादा न्यायालयाने निश्चित केलेली नाही.

🔸माध्यमांचे स्वातंत्र्य अमूल्य आणि पवित्र आहे.

प्रकरण

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये जम्मू व काश्मीर आणि लडाखचे विभाजन करून दोन वेगळे केंद्रशासित प्रदेश निर्माण केल्यानंतर केंद्र सरकारने काश्मीर खोऱ्यात अनेक निर्बंध लागू केले होते. त्यांना विरोध करणाऱ्या विविध याचिकांवरील एकत्र सुनावणी सध्या सुरू आहे.

इंटरनेटअभावी व्यापारी, व्यवसायिक, विद्यार्थी यांचे अतोनात नुकसान झाले. ही सेवा पूर्ववत झाल्यास राज्यातला तणाव निवळण्यास मदत होणार, अशी अपेक्षा आहे.

12 January 2020

शाळकरी मुलांच्या आईच्या खात्यात वर्षाला जमा होणार 15 हजार रुपये

🔰आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी दारिद्र्य रेषेखालील महिलांसाठी महत्त्वाकांक्षी ‘अम्मा वोडी’ योजना जाहीर केली आहे.
तर या योजनेअंतर्गत ज्यांची मुलं शाळेत शिकत आहेत अशा गरीब महिलांना आर्थिक मदत दिली जाणार आहे.

🔰तसेच या महिलांच्या खात्यात वर्षाला 15 हजार रुपये देण्याची सरकारची योजना असून मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी याची घोषणा केली आहे. हे पैसे वर्षाच्या सुरुवातीलाच जानेवारी महिन्यात लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा केले जाणार आहे.

🔰जोपर्यंत मुलांचं शालेय शिक्षण पूर्ण होत नाही तोपर्यंत ही मदत दिली जाणार आहे. या योजनेमुळे गरीब महिलांना आपल्या मुलांना शिक्षण देण्यासाठी आर्थिक पाठबळ मिळणार आहे.

सुचेता सतीशला २०२० चा ग्लोबल चाइल्ड प्रॉडीजी पुरस्कार प्राप्त

  🔸 २०२० चा ग्लोबल चाइल्ड प्रॉडीजी पुरस्कार सुचेता सतीशला प्राप्त

🔴 ओळख

  🔸 एका मैफिलीदरम्यान सर्वात जास्त भाषांमध्ये गाणी गायन
  🔸 मुलांची सर्वात मोठी लाइव्ह गायन मैफिल
  🔸 दुहेरी विश्व विक्रम

🔴 सुचेता सतीश बद्दल थोडक्यात

  🔸 १३ वर्षीय
  🔸 दुबई-स्थित भारतीय मुलगी
  🔸 १२० भाषांमध्ये गाणी गायन
  🔸 दुबई भारतीय हायस्कूलची नाइटिंगेल म्हणून ओळख

🔴 पुरस्कार सोहळा वेचक मुद्दे

  🔸 जगभरातील इतर १०० ग्लोबल चाइल्ड प्रॉडीजींचा विविध पुरस्कारांनी गौरव
  🔸 २ वर्षांपूर्वी दुबईमध्ये भारतीय वाणिज्य दूतावास सभागृहात विक्रमाची नोंद
  🔸 मैफिल दरम्यान १०२ भाषांमध्ये ६.२५ तास गायन

🔴 'ग्लोबल चाइल्ड प्रोडिजी पुरस्कार' बद्दल थोडक्यात

🔴 उद्देश

  🔸 मुलांची प्रतिभाशक्ती कौशल्ये आणि सामर्थ्ये साजरी करणे ज्ञ

🔴 समाविष्ट श्रेणी

  🔸 नृत्य
  🔸 मॉडेलिंग
  🔸 लेखन
  🔸 अभिनय
  🔸 नाविन्य
  🔸 विज्ञान
  🔸 क्रीडा
  🔸 संगीत
  🔸 कला

🔴 पुरस्कार समर्थन

  🔸 डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम आंतरराष्ट्रीय फाऊंडेशन
  🔸 संगीत निर्माता ए.आर. रहमान आणि इतर

जागतिक बँकेचा “ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट्स” अहवाल

जागतिक बँकेचा ताजा ‘ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट्स’ अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यामध्ये वर्तवविलेल्या अंदाजानुसार, आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये भारताच्या एकूण राष्ट्रीय उत्पादनाचा (GDP) वृद्धिदर हा 5 टक्क्यांवर सीमित राहणार.

अहवालातल्या ठळक बाबी

भारताविषयी

🔸जागतिक बँकेचा अंदाज खरा ठरल्यास भारतीय विकासदराचा तो 11 वर्षांतला नीचांक ठरणार.

🔸GDP दरातल्या घसरणीस कारणीभूत असणारे घटकही जागतिक बँकेने नमूद केले आहेत. भारतात खासगी क्षेत्रातून होणाऱ्या पतपुरवठ्यामध्ये सध्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. याशिवाय देशांतर्गत क्रयशक्तीही घटल्याचे दिसत असून त्याचाही विकासदरास फटका बसणार.

🔸पुढील आर्थिक वर्षात वृद्धिदर वेग धरणार व आर्थिक वर्ष 2020-21 अखेर हा दर 5.8 टक्क्यांवर पोहोचणार.

जागतिक

🔸वर्ष 2020 मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेची अंदाजित वाढ 2.5 टक्के राहणार असा अंदाज आहे.

🔸दक्षिण आशियाचा GDP वृद्धीदर 2019-20 या वर्षी 5.5 टक्क्यांपर्यंत राहण्याचे अपेक्षित आहे.

🔸2020 या वर्षी प्रगत अर्थव्यवस्थांचा एकत्रित वृद्धीदर 1.4 टक्क्यांपर्यंत खालावणार असा अंदाज आहे.

🔸उदयोन्मुख बाजारपेठ आणि विकसनशील अर्थव्यवस्थांचा वृद्धीदर यंदा 4.1 टक्क्यांपर्यंत वाढण्याचे अपेक्षित आहे.

भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची आज पुण्यतिथी.

◾️भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची आज पुण्यतिथी. समाजवादी देशभक्त आणि काँग्रेस नेते एवढीच त्यांची ओळख सर्वांना माहित आहे. मात्र, त्यापेक्षाही शास्त्रींचे देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतील योगदान खूप मोठे आहे. 

◾️2 ऑक्टोबर 1904 रोजी उत्तरप्रदेशमधील मुघलसराय प्रांतात रामदुलारी देवी आणि शारदा प्रसाद श्रीवास्तव यांच्या घरी या भारतरत्नाचा जन्म झाला.

◾️'मूर्ती लहान पण किर्ती महान' असं थोडक्यात वर्णन शास्त्रींचं केलं जातं. मवाळ आणि शांत स्वभावाचे शास्त्री स्वातंत्र्यलढ्यात ओढले गेले ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यामुळे.

◾️मात्र, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शास्त्रींना खरी ओळख मिळाली. 'जय जवान, जय किसान' अशी घोषणा देत शास्त्री भारतीय जनमानसाच्या गळ्यातील ताईत बनले. 

◾️ केंद्रीय मंत्रिमंडळात रेल्वे आणि गृह मंत्रालयाची जबाबदारी सोपविली गेली.

◾️जून 1964 मध्ये जवाहरलाल नेहरूंचे निधन झाल्यानंतर शास्त्री देशाचे दुसरे पंतप्रधान बनले. 

◾️'हरित क्रांती'चे जनक अशी त्यांची आणखी एक ओळख.

🔰शास्त्रींबद्दलच्या अशाच अनेक रंजक गोष्टींबद्दल जाणून घेऊयात. 

1⃣. लाल बहादूर यांचे मूळ आडनाव शास्त्री नव्हते. शास्त्रींचे मूळ नाव लाल बहादूर शारदा प्रसाद श्रीवास्तव होय. मात्र, 1925 मध्ये वाराणसीमधील काशी विद्यापीठात त्यांना 'शास्त्री' या पदवीने गौरविण्यात आल्यानंतर शास्त्री हेच आडनाव त्यांनी पुढे वापरले. काशी विद्यापीठात शास्त्र शाखेतील विद्वानांना 'शास्त्री' या पदवीने गौरविण्यात येत होते.

2⃣. लाल-बाल-पाल यामधील लाला लजपत राय यांनी स्थापन केलेल्या 'लोकसेवक' मंडळाचे ते आजीवन सदस्य होते. लोकांचे सेवक म्हणून शास्त्रींनी अनेक सामाजिक कामेही केली.

3⃣. त्याकाळातील इतर विद्यार्थ्यांप्रमाणेच शास्त्रींनी प्राथमिक शिक्षण मौलवींच्या हाताखाली घेतले होते. तेथे मुस्लीम धर्मगुरूंनी शास्त्रींना उर्दू आणि पर्शियन या भाषा शिकविल्या. इंग्रजी भाषा ही देशात अधिकृतपणे वापरायला अजून सुरवात झाली नव्हती. त्या अगोदर उर्दू आणि पर्शियन या भाषाच अनिवार्य भाषा म्हणून शिकविल्या जात होत्या. 

4⃣ देशाच्या पंतप्रधानपदी शास्त्री रुजू झाले. त्यानंतर 1965 मध्ये भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध झाले. त्यावेळी देशात अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झाला होता. तेव्हा शास्त्रींनी स्वत:चे मानधनही स्वीकारले नव्हते.  

5⃣. एकीकडे युद्धजन्य परिस्थिती तर दुसरीकडे देशात अन्नधान्याचा तुटवडा अशा दुहेरी संकटात पंतप्रधान शास्त्री अडकले होते. तेव्हा भारत-पाक युद्धावेळी भारतीय सैन्याचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी आणि देशातील शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांनी 'जय जवान, जय किसान'चा नारा दिला. आणि देशातील जनता आणि भारतीय सैन्यात नव्याने स्फूर्ती निर्माण झाली. 

6⃣. तत्पूर्वी, 1920 मध्ये लाल बहादूर शास्त्री हे भारतीय स्वातंत्रलढ्यात सहभागी झाले. गांधीजींनी सुरू केलेल्या असहकार चळवळीत त्यांनी सहभाग घेतला. 1930 मध्ये झालेल्या मिठाच्या सत्याग्रहामध्ये अटक झाल्यानंतर त्यांना दोन वर्षाहून अधिक काळ तुरुंगात शिक्षा भोगावी लागली होती. याच दरम्यान ते गांधी आणि नेहरूंचे एकनिष्ठ अनुयायी बनले. 

7⃣. शास्त्रींनी आपल्या पगारातील मोठा वाटा विविध गांधीवादी लोकांच्या कल्याणासाठी दान करत. आपल्या कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी त्यांनी मर्यादेत खर्च करण्यावर भर दिला. त्यामुळे पंतप्रधान असूनही इलेक्ट्रिक वस्तू, गाडी आणि इतर शासकीय गोष्टींचा ते क्वचितच वापर करत असत. 

8⃣पुढे केंद्रीय मंत्रिमंडळात गृहमंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर लाल बहादूर शास्त्रींनी भ्रष्टाचार रोखण्यासाठी देशातील पहिल्या समितीची स्थापना केली. 

9⃣ 1928 मध्ये शास्त्री हे अधिकृतपणे काँग्रेस पक्षाचे सदस्य झाले. आणि तेथून पुढील 20 वर्षात त्यांनी स्वतंत्र भारतासाठी सुरू असलेल्या चळवळीत सक्रिय सहभाग नोंदविला. परकीय राज्यकर्त्यांच्या तावडीतून देशाला स्वातंत्र मिळवून देण्यात त्यांनी यशस्वी भूमिका बजावली. 

◾️ 11 जानेवारी 1966 रोजी उझबेकिस्तानमधील ताश्कंद येथे त्यांचा रहस्यमय मृत्यू झाला.

◾️10 जानेवारी 1966 ला पाकिस्तानचे तत्कालिन अध्यक्ष अय्यूब खान यांच्यासोबत शांतता करारावर स्वाक्षरी केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांना कार्डियाक अॅटॅक आल्याचे सांगितले जाते. मात्र, देशाच्या दुसऱ्या पंतप्रधानाच्या रहस्यमय मृत्यूचे गूढ अद्यापही गूढच बनून राहिले आहे. 

◾️राजधानी दिल्लीत असणारे शास्त्रींचे समाधिस्थळ 'विजय घाट' म्हणून ओळखले जाते. आजही शास्त्रींचे हे समाधिस्थळ अनेकांसाठी स्फूर्तिदायी बनून राहिले आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

फवाद मिर्झाने संपवला भारताचा वनवास; घोडेस्वारीमध्ये मिळवले टोकियो ओलीम्पिकचे तिकीट.

भारताचा युवा घोडेस्वार फवाद मिर्झाने गेल्या दोन दशकांपासूनही भारताची प्रतीक्षा अखेरीस संपवली आहे. २०१८ साली आशियाई खेळांमध्ये तब्बल ३६ वर्षांनी घोडेस्वारी प्रकारात पदक मिळवणाऱ्या फवादला टोकियो ऑलिम्पिकचं तिकीट मिळालेलं आहे. याआधी भारताच्या इम्तियाज अनिस यांनी सिडनी ऑलिम्पिकमध्ये घोडेस्वारी (equestrian) मध्ये भारताचं नेतृत्व केलं होतं.

International Federation for Equestrian Sports तर्फे मंगळवारी फवादच्या ऑलिम्पिक तिकीटावर अधिकृतपणे शिक्कामोर्तब करण्यात आलं. २७ वर्षीय फवादने गेल्या काही स्पर्धांमध्ये आश्वासक कामगिरी केली आहे. 

South East Asia आणि Oceania गटात फवादने अव्वल स्थान पटकावलं होतं. सहा पात्रता फेऱ्यांमध्ये फवादने ६४ गुणांची कमाई केली होती. या कामगिरीच्या जोरावर फवादला टोकियो ऑलिम्पिकचं तिकीट देण्यात आलं आहे.

२०१९ साली फवादला भारतीय क्रीडा क्षेत्रातील मानाच्या अर्जुन पुरस्कारानेही गौरवण्यात आलं होतं. त्यामुळे फवाद ऑलिम्पिकमध्ये कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

ओबीसी जनगणना प्रस्ताव मंजूर

◾️ओबीसी नागरिकांची निश्‍चित आकडेवारी उपलब्ध नसल्याने आता होणाऱ्या जनगणनेच्या अर्जात जातीचा रकाना ठेवावा, अशी शिफारस राज्याच्या विधानसभा आणि विधान परिषदेने एकमताने केंद्र सरकारकडे केली.

◾️दोन्ही सभागृहात ओबीसी जनगणना प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला.

◾️जणगणना अर्जात जातीचा रकाना असावा, अशी शिफारस करणारा ठराव विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सभागृहात मांडला.

◾️ त्यावेळी अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली मते मांडली.

◾️विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी ओबीसी जनगणना प्रस्ताव मांडला.

◾️ मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीत काय कामकाज होणार आहे, याबाबत ठरले आहे.

◾️ छगन भुजबळ म्हणाले की, ओबीसींना स्वतंत्र निधी मिळाला पाहिजे.

◾️ लोकसंख्येची नेमकी आकडेवारी नाही. नव्याने जनगणना करण्याची गरज असून, जनगणनेत ओबीसींचा रकाना ठेवण्याची गरज आहे.

◾️स्व. गोपीनाथ मुंडे आणि शरद पवार यांनीही ठराव मांडला होता.

◾️ परंतु न्यायालयाच्या आदेशानुसार २७ टक्के आरक्षण देण्यास सांगण्यात आले. याबाबत चर्चा झाली तर ओबीसीचा रकाना त्यात समाविष्ट करून त्यांची निश्‍चित आकडेवारी उपलब्ध होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री व राज्यमंत्री यांच्या पालकमंत्री म्हणून जिल्हानिहाय नियुक्त्या केल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे...

1.पुणे- श्री. अजित अनंतराव पवार

2.मुंबई शहर- श्री. अस्लम रमजान अली शेख

3.मुंबई उपनगर- श्री. आदित्य उद्धव ठाकरे

4.ठाणे- श्री. एकनाथ संभाजी शिंदे

5.रायगड - श्रीमती आदिती सुनिल तटकरे

6.रत्नागिरी- ॲड. अनिल दत्तात्रय परब

7.सिंधुदुर्ग- श्री. उदय रविंद्र सामंत

8.पालघर- श्री. दादाजी दगडू भुसे

9.नाशिक- श्री. छगन चंद्रकांत भुजबळ

10.धुळे- श्री. अब्दुल नबी सत्तार

11.नंदुरबार- ॲड. के.सी. पाडवी

12. जळगाव- श्री. गुलाबराव रघुनाथ पाटील

13.अहमदनगर- श्री. हसन मियालाल मुश्रीफ

14 सातारा- श्री. शामराव ऊर्फ बाळासाहेब पांडुरंग पाटील

15. सांगली- श्री. जयंत राजाराम पाटील

16.सोलापूर- श्री. दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील

17.कोल्हापूर- श्री. विजय ऊर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात

18.औरंगाबाद- श्री. सुभाष राजाराम देसाई

19.जालना- श्री. राजेश अंकुशराव टोपे

20.परभणी- श्री. नवाब मोहम्मद इस्लाम मलिक

21.हिंगोली- श्रीमती वर्षा एकनाथ गायकवाड

22.बीड- श्री. धनंजय पंडितराव मुंडे

23. नांदेड- श्री. अशोक शंकरराव चव्हाण

24.उस्मानाबाद- श्री. शंकरराव यशवंतराव गडाख

25.लातूर- श्री. अमित विलासराव देशमुख

26 अमरावती- ॲड. यशोमती चंद्रकांत ठाकूर (सोनावणे)

27.अकोला- श्री. ओमप्रकाश ऊर्फ बच्चू बाबाराव कडू

28.वाशिम- श्री. शंभुराज शिवाजीराव देसाई

29.बुलढाणा- डॉ. राजेंद्र भास्करराव शिंगणे

30.यवतमाळ- श्री. संजय दुलीचंद राठोड

31 नागपूर- डॉ. नितीन काशिनाथ राऊत

32.वर्धा- श्री. सुनिल छत्रपाल केदार

33.भंडारा- श्री. सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील

34.गोंदिया- श्री. अनिल वसंतराव देशमुख

35.चंद्रपूर- श्री. विजय नामदेवराव वडेट्टीवार

36 गडचिरोली- श्री. एकनाथ संभाजी शिंदे

नवीन, उदयोन्मुख आणि धोरणात्मक तंत्रज्ञान (NEST)” : परराष्ट्र मंत्रालयातला नवा विभाग

भारत सरकारच्या केंद्रीय परराष्ट्र कल्याण मंत्रालयाने 1 जानेवारी 2020 रोजी घोषणा केली की नवी दिल्लीत मंत्रालयात “नवीन, उदयोन्मुख आणि धोरणात्मक तंत्रज्ञान (NEST)” नावाने एका नव्या विभागाची स्थापना करण्यात येणार आहे.

वेगाने वाढणार्‍या भारतीय अर्थव्यवस्थेत अश्या पुढाकाराने परकीय संबंधातून तंत्रज्ञान क्षेत्रात होणार्‍या गुंतवणुकीला आकर्षित करण्याला प्रोत्साहन मिळणार. सध्या भारत देशात 5G नेटवर्क तंत्रज्ञान आणण्यासाठी त्याच्या क्षेत्रात चाचण्यांमध्ये भाग घेण्यासाठी ह्यूवेई कंपनीसारख्या मोठ्या उद्योगांना परवानगी देण्याच्या विचारार्थ सरकार आहे.

ठळक बाबी:-

NEST विभाग नवीन व उदयोन्मुख तंत्रज्ञानाशी संबंधित मुद्द्यांकरिता मंत्रालयात एक केंद्र म्हणून काम करणार.
5G आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यासारख्या क्षेत्रांमध्ये परदेशी भागीदारांचे सहकार्य घेण्यामध्ये नवा विभाग मदत करणार.

स्थानिक भागधारक आणि परदेशी भागधारक यांच्यादरम्यान समन्वय ठेवण्यासाठी तसेच भारताच्या विकासाची प्राथमिकता आणि राष्ट्रीय सुरक्षा लक्षात घेऊन धोरणे ठरविण्यामध्ये या विभागाची मदत होणार आहे.

नवा विभाग नवीन व उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित संसाधनांविषयीची परकीय धोरणे आणि आंतरराष्ट्रीय कायदेशीर चौकट अश्या बाबींचे मूल्यांकन करणार आणि योग्य परकीय धोरण निवड करण्याविषयीची शिफारस करण्यास देखील मदत करणार आहे.