Ads

06 April 2020

गोदावरी नदी

📌गोदावरीतील पाणी ऋतूप्रमाणे कमी-अधिक असते. नदीतून वाहणार्‍या पाण्यापैकी ८०% पाणी जुलै-ऑक्टोबर या चार महिन्यांतच वाहून जाते. नदीच्या प्रवाहाची रुंदी काही ठिकाणी २०० मीटर (पूर्व घाट पार करताना) तर काही ठिकाणी ६.५ कि.मी. (समुद्रास मिळण्याआधी) इतकी होते.

📌आपल्या पाण्यामुळे गोदावरीस महाराष्ट्र व आंध्र प्रदेशराज्यांची जीवनवाहिनी समजतात. ही नदी दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाते. त्याच सोबत नांदेड शहराला गोदावरीचे नाभी-स्थान म्हणून ओळखले जाते. नाशिकच्या कुंभमेळाव्याला नांदेड च्या नंदी तट, उर्वशी तट इत्यादी स्नानाचे महत्त्व आहे.

📌सह्याद्रीच्या कुशीत पश्चिम घाटात १,०६७ मीटर उंचीवर सुरू होणाऱ्या गोदावरीचा प्रवास मुख्यत्त्वे दख्खनच्या पठारावरूनसाधारणत: आग्नेय दिशेने होतो. आंध्रप्रदेशात भद्राचलम्‌नंतर गोदावरी पूर्वेच्या निमुळत्या डोंगर रांगांतून (पापी टेकड्या) पुढे सरकते. या ठिकाणी तिची रुंदी २०० मीटरपेक्षा कमी व खोली ६० फुटाच्या आत एवढीच असते.

📌गोदावरी खोरे ३,१२,८१२ चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापते. त्यांतील महाराष्ट्रात १,५२,१९९ चौरस किलोमीटर, आंध्र प्रदेश ७३,२०१ चौरस किलोमीटर, मध्य प्रदेश ६५,२५५ चौरस किलोमीटर, ओरिसात १७,७५२ चौरस किलोमीटर तर कर्नाटकात गोदावरीने व्यापलेले खोरे ४,४०५ चौरस किलोमीटर आहे.

📌गोदावरीचा त्रिभुज प्रदेश ५,१०० चौरस किलोमीटरचा असून अत्यंत सुपीक समजला जातो. तज्ज्ञांच्या मते या त्रिभुज प्रदेशाच्या उत्क्रांतीचे तीन मुख्य टप्पे असून शेवटच्या दोन टप्प्यांमध्ये गाळाचे प्रमाण जमिनींचा शेतीकरिता वाढता वापर व वाढत्या जंगलतोडीमुळे वाढल्याचे दिसून येते.

🌸इतर नद्यांशी तुलना

📌एकूण लांबीत गोदावरीचा जगात ९२वा क्रमांक आहे. ६,६९० किलोमीटर लांबी असलेली आफ्रिका खंडातील नाईल नदीप्रथम क्रमांकावर आहे. तर सिंधू नदी ३,१८० कि.मी. लांबीसह २१व्या क्रमांकावर आहे. ब्रह्मपुत्रा २,९४८ कि.मी.(२८वा क्रमांक), तर २,५१० कि.मी. वाहून गंगा ३९वा क्रमांकावर येते. यमुना १,३७६ कि.मी., सतलज १,३७० कि.मी. लांबीच्या आहेत व अनुक्रमे १०२ व १०३ क्रमांकांवर आहेत. कृष्णा १,३०० कि.मी. वाहून ११४व्या तर १,२८९ कि.मी. वाहून नर्मदा ११६व्या क्रमांकवर येते. १,००० कि.मी. पेक्षा अधिक लांबीच्या जगात सुमारे १६० नद्या आहेत.

🌸गोदावरी -उपनद्या आणि प्रकल्प🌸

✍ऊर्ध्व गोदावरी

दारणा नदी - दारणा धरण, कोळगंगा - वाघाड प्रकल्प, उणंद - ओझरखेड प्रकल्प, कडवा - करंजवन प्रकल्प, मुळा नदी [मुळा धरण] प्रवरा नदी- भंडारदरा जिल्हा अहमदनगर, निलवंडे धरण, म्हाळुंगी - म्हाळुंगी प्रकल्प (सोनेवाडी ता. सिन्नर), आढळा - आढळा प्रकल्प, मुळा - मुळा प्रकल्प, शिवणी - अंबाडी प्रकल्प

✍मध्य गोदावरी

कर्पुरा नदी, दुधना नदी, यळगंगा नदी, ढोरा नदी, कुंडलिका नदी, सिंदफणा नदी, तेरणा नदी, मनार नदी, तीरू नदी, सुकना नदी, माणेरू नदी, मंजिरा किन्नेरासानी नदी, पूर्णा नदी, मन्याड नदी, आसना नदी, सीता नदी, लेंडी नदी, वाण नदी, बिंदुसरा नदी

✍विदर्भ आणि मध्यप्रदेशातील वर्धेचे खोरे

📌मध्यप्रदेशातून येणारी
 वैनगंगा सातपुडा रांगांतून जवळपास ३६० मैलांचा प्रवास करून वर्धेस मिळते. वर्धा नदी मध्यप्रदेशात मुलताई येथे सातपुडा रांगांतून विदर्भात येते. तेथे तिचा संगम वैनगंगा आणि पैनगंगा या नद्यांशी होतो. नंतर गोदावरीस मिळेपर्यंत तिला प्राणहिता असे म्हणतात. मध्यप्रदेशातून येणारी इंद्रावती (इंद्रायणी) सातपुडा रांगांतून येऊन गोदावरीस मिळते.

📌खेक्रनाला - खेक्रनाला प्रकल्प, पेंच - पेंच प्रकल्प, बाग - बावनथडी (सागरा) प्रकल्प या विदर्भातून येणाऱ्या इतर उपनद्या आहेत.

📌नाग कोलार कन्हाण पेंच वैनगंगानाग कोलार कन्हाण पेंच वैनगंगा गोसीखूर्द प्रकल्प

✍कर्नाटकातून येणारी

📌कर्नाटक राज्यातील गोदावरीचे पाणलोट क्षेत्र १७०१ वर्ग मैल आहे. मांजरा आणि तिच्या उपनद्या तेरणा, कारंजा, हलदी, लेंडी, मन्नार मिळून एकूण पाणलोट क्षेत्र ११९०० वर्ग मैल आहे.

✍ओरिसातून येणाऱ्या नद्या

📌इंद्रावती नदी (काही ठिकाणी महाराष्ट्र राज्य व छत्तीसगड राज्य यांची सीमा इंद्रावती नदीने निश्चित होते.)

सिलेरु
शबरी नदी

✍आंध्रप्रदेशातून येणारी

तालिपेरू

🌸निसर्ग,शेती व आर्थिक

📌नांदुर-मधमेश्वर, जायकवाडी जलअभयारण्यात रोहित, करकोचा, सारस पक्षांच्या विभिन्न प्रजाती आढळून येतात. @anilkoltempsc

📌नैसर्गिकदृष्ट्या दख्खनच्या पठारावरील गोदावरीच्या सुरुवातीचा प्रदेश कमी पर्जन्यमानाचा असल्यामुळे मुख्यत्वे या प्रदेशात कापूस, ज्वारी ही पिके घेतली जातात. सिंचित क्षेत्रामध्ये मुख्यत्वे ऊस, कापुस व केळी ही पिके घेतली जातात. तेलंगण आणि आंध्रप्रदेशात साधारणपणे भाताची शेती केली जाते.

📌गोदावरी नदीत मुख्यत: गोड्या पाण्यातील Cyprinidae माशांच्या प्रजाती आढळून येतात.

📌गोदावरीच्या त्रिभुज प्रदेशात ऍव्हिसेनिआ प्रजातीच्या मॅंग्रोव्ह झाडांची जंगले आढळतात त्यांना स्थानिक तेलुगू लोक माडा अडावी असे म्हणतात. मॅंग्रोव्ह झाडांची जंगले जमिनीचे आणि परिसराचे नैसर्गिकरीत्या संरक्षण करतात.

🌸गोदावरीवरील सिंचन प्रकल्प🌸

📌नाशिक व मराठवाडा मिळून ६६ लाख हेक्टर शेतीयोग्य जमिनींपैकी १६ टक्के क्षेत्रास सिंचनाचा फायदा झाला आहे तर अधिकतम प्रलंबित क्षमता २९ टक्के एवढी आहे. 

📌पैठण येथील जायकवाडी प्रकल्पाने किमान १,३२,००० हेक्टर जमीन भिजणे प्रस्तावित होते, परंतु प्रत्यक्षात ४५,००० हेक्टर जमीनच सिंचनाखाली येऊ शकली. विष्णुपुरी उपसा जलसिंचन प्रकल्प (आशियातला सर्वांत मोठा उपसा जलसिंचन प्रकल्प - नांदेड) मराठवाडा विभागात सर्व प्रकल्प मिळून ४८,००,००० हेक्टर शेतजमिनींपैकी ८,००,००० हेक्टर जमीन सिंचनाखाली आहे. याशिवाय गोदावरीवर गंगापूर, नांदूर, मधमेश्वर (इ.स.१९०७), भावली (प्रस्तावित), वाकी (प्रस्तावित), भाम, मुकणे, अलिसागर - निझामाबाद पूरकालीन उपसा सिंचन प्रकल्प, श्रीरामसागर प्रकल्प - पोचमपाड, पोलावरम प्रकल्प (प्रस्तावित) इत्यादी प्रकल्प आहेत. 

✍उपनद्यांवरील बंधारे

📌जलापुट बंधारा मचकुंड नदीवर आंध्रप्रदेश-ओडिशा सीमेवर आहे. बालीमेला सिंचन प्रकल्प (ओरिसा), अप्पर इंद्रावती नदी प्रकल्प, मंजीरा नदीवर निजामसागर प्रकल्प, कड्ड्म प्रकल्प, मेहबूबनगर प्रकल्प, लोअर तेरणा प्रकल्प, पुर्णा प्रकल्प, अप्पर पैनगंगा प्रकल्प, लोअर दुधना प्रकल्प, भंडारा सिंचन प्रकल्प, मुळा प्रकल्प, अप्पर प्रवरा प्रकल्प, अप्पर वैनगंगा, गोदावरी कॅनॉल, मनार प्रकल्प - कंधार, ऊर्ध्व पैनगंगा - पुसद इत्यादी. 

✍बंधारे, पूल, नौकानयन

📌डौलेश्वर या गोदावरीच्या त्रिभुज प्रदेशातील बंधारा ब्रिटिश अभियंता सर आर्थर थॉमस कॉटन याने बांधून पूर्ण केल्यानंतर हे क्षेत्र भाताची शेती, नौकानयन व मासेमारी यामुळे संपन्न झाले. 

✍जलव्यवस्थापन

📌गोदावरीतील पाणी ऋतूप्रमाणे कमी-अधिक असते. नदीतून वाहणार्‍या पाण्यापैकी ८०% पाणी जुलै-ऑक्टोबर या चार महिन्यातच वाहून जाते. उर्वरीत काळात खोऱ्यात दुष्काळाची स्थितीही असू शकते. हे पाणी व्यवस्थित वापरले जावे, पुरांचा प्रश्न मिटावा व ज्या ठिकाणी नदी पोहचत नाही त्या भागात पाणी उपलब्ध व्हावे यासाठी गोदावरी खोऱ्यात अनेक पाटबंधारे प्रकल्पांची निर्मिती केली गेली आहे. 

📌नदी खोऱ्यातील विविध समूहांच्या गरजा वाढल्यामुळे इतर नद्यांप्रमाणेच गोदावरी नदीच्या पाणीवाटपाचे प्रश्न गंभीर झाले आहेत. नदीकाठांवर व कालव्यांवर असलेली अनेक खेडी, शहरे, राज्ये इत्यादी पिण्यासाठी, शेतीसाठी व औद्योगिक वापरांकरिता लागणार्‍या पाण्याकरिता परस्परांशी संघर्ष करीत असतात. पाण्याचा अपव्यय टळावा व योग्य पाणीव्यवस्थापन व्हावे यासाठी शासन प्रयत्न करत असल्याचा दावा करते. 

📌गोदावरीखोऱ्याचे पाणलोट क्षेत्र ३,१९,८१० कि.मी. असून भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या ९.५% भाग व्यापते. महाराष्ट्राकरिता गोदावरी खोऱ्यात १,७९८ टी.एम.सी. उपलब्ध पाण्यापैकी ७५% म्हणजे १,३१८ टी.एम.सी. भरवशाचे असले तरी आंतरराज्य निवाड्यानुसार महाराष्ट्राच्या वाट्यास अधिकतम १,०९७ टी.एम.सी. उपलब्ध होणार आहे. (कृष्णा खोरे १,२०१ टी.एम.सी., तापी खोरे ३२२ टी.एम.सी., नर्मदा खोरे २० टी.एम.सी. क्षमता असली तरी आंतरराज्य लवादानुसार सर्व खोरे मिळून एकूण १,८९० टी.एम.सी. पाणी महाराष्ट्रास उपलब्ध राहील.

📌आंध्र प्रदेश राज्यास किमान १,४८० टी.एम.सी. पाणी गोदावरी खोऱ्यातून मिळू शकते.

ओडिशा सरकारचा ‘मो प्रतिवा’ कार्यक्रम

- संयुक्त राष्ट्रसंघ बाल निधी (UNICEF) यांच्या सहकार्याने ओडिशा सरकारने 'मो प्रतिभा' नावाचा एक नवा कार्यक्रम सादर केला आहे.

- हा ऑनलाईन स्पर्धा कार्यक्रम आहे. कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर घरात अडकलेल्या विद्यार्थ्यांना विविध कल्पनात्मक कार्यांमध्ये गुंतवून ठेवण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. घरातूनच संगणकांच्या माध्यमातून भाग घेता येणार आहे.

▪️स्पर्धेविषयी

- स्पर्धांमध्ये घोषवाक्य लेखन, विविध कला, लघुकथा लेखन, भित्तिपत्रिका आणि काव्य लेखन अश्या कला-कौशल्यांचा समावेश आहे.

- या स्पर्धांमध्ये 5 ते 18 वर्ष या वयोगटातले विद्यार्थी भाग घेऊ शकतात. विजेत्यांना वयानुसार तीन गटांमध्ये विभाजित केले जाणार आहे. विजेत्यांबरोबरच इतर भाग घेणाऱ्यांना प्रोत्साहनपर प्रमाणपत्रांचे वाटप केले जाणार आहेत.

- या स्पर्धा दोन संकल्पनांवर आधारित आहेत - (i) संचारबंदीच्या काळात घरी राहणे आणि (ii) कोविड-19 महामारीच्या काळात तरुण नागरिक म्हणून माझी जबाबदारी.
---------------------------------------

2019 सातवे सर्वात उष्ण वर्ष

🔰आंतरराष्ट्रीय हवामान संस्थेने 7 जानेवारी 2020 रोजी 2019 साठी हवामान स्थिती अहवाल [ State of Climate Report] जाहीर केला.

🔰अहवालानुसार हवामान बदलामुळे 2019 या वर्षांमध्ये भारतात 1659 लोकांचा बळी गेला आहे .

🔰1901 पासून 2019 हे वर्ष भारतासाठी सातवे सर्वात उष्ण वर्ष ठरले आहे.

🔰1901 पासून IMD हवामानातील नोंद ठेवते.

🔰गेल्या 100 वर्षात भारतामध्ये 0.61 डिग्री सेल्सिअस तापमान वाढले आहे.

🔰कोपर्निकस हवामान बदल कार्यक्रम या युरोपियन हवामान संस्थेने 2019 हे दुसरे सर्वात उष्ण वर्ष होते असे नुकतीच घोषित केले.

🔰आतापर्यंत सर्वात उष्ण वर्ष
    [ सरासरीपेक्षा जास्त तापमान]

    ▪️2009 :-  +0.54°C
    ▪️2010 :-  +0.54°C
    ▪️2015 :-  +0.42°C
    ▪️2016 :-  +0.71°C
    ▪️2017 :-  +0.53°C

RBI ( ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ ) information

🔸दिनांक १ एप्रिल १९३५ रोजी म्हणजे ८५ वर्षांपूर्वी 'भारतीय रिझर्व्ह बँक' स्थापन झाली होती.

‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ ही देशातील सर्वोच्च वित्तीय संस्था असून तिच्यामार्फत द्रव्यविषयक धोरण राबवले जाते. १९२६ साली हिल्टन यंग यांच्या अध्यक्षतेखाली ‘दि रॉयल कमिशन ऑन इंडियन करन्सी अ‍ॅण्ड फायनान्स’ या नावाने एक आयोग स्थापन करण्यात आला. या आयोगाने एक स्वतंत्र अशी मध्यवर्ती बँक स्थापन करून तिला ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ असे नाव द्यावे, अशी शिफारस केली.

८ सप्टेंबर १९३३ रोजी राजकीय वर्चस्वापासून मुक्त अशा मध्यवर्ती बँकेच्या स्थापनेविषयीचे विधेयक कायदेमंडळात मांडण्यात आले. ६ मार्च १९३४ रोजी गव्हर्नर जनरलची त्याला संमती मिळाली. त्यामुळे हे विधेयक ‘आरबीआय अ‍ॅक्ट १९३४’ या नावाने स्वीकृत झाले. अशा रीतीने १ एप्रिल १९३५ रोजी ‘आरबीआय’ची स्थापना झाली.

सुरुवातीला ‘आरबीआय’ची स्थापना खासगी भागधारकांची बँक म्हणून झाली. तिचे अधिकृत भागभांडवल पाच कोटी रुपयांचे होते व प्रत्येक भागाची किंमत १०० रुपये होती. तिचा कारभार १६ सदस्यीय मध्यवर्ती संचालक मंडळाकडे सोपविण्यात आला.

‘आरबीआय’ची सत्ता काही व्यक्तींच्या हातात एकवटू नये, ‘आरबीआय’च्या व सरकारच्या धोरणात सुसूत्रता असावी आदी कारणांसाठी ‘आरबीआय’चे राष्ट्रीयीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. १ जानेवारी १९४९ पासून ‘आरबीआय’चे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. यासाठी (सार्वजनिक मालकीकडे हस्तांतरण) ‘आरबीआय कायदा १९४८’ संमत करण्यात आला. ‘आरबीआय’च्या राष्ट्रीयीकरणाबाबतचे विधेयक तत्कालीन अर्थमंत्री सी. डी. देशमुख यांनी मांडले.

* ‘आरबीआय’चे व्यवस्थापन *

गव्हर्नर हा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहतो. त्याची नेमणूक केंद्र सरकारमार्फत पाच वर्षांसाठी केली जाते. ‘आरबीआय’चे पहिले गव्हर्नर ऑसबॉर्न अर्कल स्मिथ होते. (१ एप्रिल १९३५ ते ३० जून १९३७) तर पहिले भारतीय गव्हर्नर सी. डी. देशमुख हे होते. त्यांच्या कालखंडातच भारत-पाकिस्तान फाळणी झाली. ‘आरबीआय’चे सध्याचे गव्हर्नर शक्तीकांत दास असून ते ‘आरबीआय’चे २५ वे गव्हर्नर आहेत. त्यांच्याआधी २४वे गव्हर्नर उर्जित पटेल होते.

भारतीय रिझर्व्ह बँकेचे लेखा वर्ष (अकाउंटिंग ईयर) आणि भारत सरकारचे वित्त वर्ष (फायनान्शियल ईयर) 2020-21 या वर्षापासून एकच करण्याची शिफारस समितीने केली आहे.

सध्या भारतीय रिझर्व्ह बँकेचे लेखा वर्ष 1 जुलै ते 30 जून असून, वित्त वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च असे आहे. या निर्णयानुसार, दोनही वर्षे जुळविल्यास रिझर्व्ह बँकेला अंतरिम लाभांश देण्याची गरज पडणार नाही.

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ही भारत सरकारने स्थापना केलेली व चालवलेली मध्यवर्ती पतपेढी आहे.

🔸 RBIची स्थापना दिनांक 1 एप्रिल 1935 रोजी करण्यात आली. त्याचे मुख्य कार्यालय मुंबई (महाराष्ट्र) येथे आहे. RBIचे 1949 साली भारत सरकारद्वारे राष्ट्रीयीकरण गेले आहे.

🔸 RBI वार्षिक तसेच तिमाही आर्थिकधोरण व पतधोरण जाहीर करते.

🔸 भारतीय रिझर्व बँकेचे प्रमुख उद्देश - भारतीय चलनी नोटांची छपाई गरजेनुसार करणे, भारताचा FDI प्रवाह (गंगाजळी) राखणे, भारताची आर्थिक स्थिती राखणे, भारतीय चलन आणि पत यांचे रक्षण करणे.

🔸 RBIने शैली आणि दृष्टीकोन डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या ‘दि प्राॅब्लम ऑफ रूपी: इट्स ओरीजीन अँड इट्स सोल्यूशन’ या पुस्तकातून घेतले.

🔸 सर ओस्बॉर्न स्मिथ हे RBIचे पहिले गव्हर्नर (1 एप्रिल 1935 ते 30 जून 1937) होते. सर चिंतामण द्वारकानाथ देशमुख हे पहिले भारतीय मूल निवासी गव्हर्नर (तिसरे गव्हर्नर) दि. 11 ऑगस्ट 1943 रोजी या पदावर विराजमान झाले.

🔸 वर्तमानात, शक्तीकांत दास गव्हर्नर आहेत. बी. पी. कानुंगो, एन. एस. विश्वनाथन, महेश कुमार जैन आणि मायकल पात्रा असे चार डेप्युटी गव्हर्नर आहेत.

* ‘आरबीआय’चे चलनविषयक धोरण *
(Monetary Policy of the RBI )
‘भारतीय रिझर्व्ह बँक’ ही भारताची मध्यवर्ती बँक आहे. या बँकेच्या विविध कार्यापकी पतनियंत्रण हे एक महत्त्वाचे कार्य आहे. भारतातील व्यापारी बँकांच्या ठेवी स्वीकारणे, कर्जे देणे किंवा पतपुरवठा करणे या आपल्या व्यवहारातून रिझव्‍‌र्ह बँक पतपेढीची निर्मिती करीत असते.

देशातील पसा आणि पतपसा यांचा एकूण पुरवठा अर्थव्यवस्थेच्या गरजेच्या प्रमाणात ठेवण्याची जबाबदारी रिझर्व्ह बँकेवर आहे; कारण पैसा, पतपैसा यांचा पुरवठा अर्थव्यवस्थेच्या गरजेच्या तुलनेत जास्त झाल्यास चलनवाढ आणि कमी झाल्यास चलनघट होण्याचा धोका असतो. त्यामुळेच भारतीय रिझर्व्ह बँक अधिनियम, १९३४ आणि भारतीय बँकिंग नियमन अधिनियम, १९४९ या दोन्ही कायद्यांन्वये व्यापारी बँकांच्या पतपैशावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार रिझर्व्ह बँकेला प्रदान करण्यात आला. या दोन्ही कायद्यांतील तरतुदींनुसार संख्यात्मक आणि गुणात्मक पतनियंत्रण साधनांचा उपयोग रिझर्व्ह बँक करू शकते..

सर्वाधिक लोकसंख्येचे प्रथम १० देश


____________________________________
▪️1) चीन (१८.२%)

▪️2) भारत (१७.५%)

▪️3) यु.एस.ए. (४.२८%)

▪️4) इंडोनेशिया (३.४६%)

▪️5) ब्राझिल (२.७४%)

▪️6) पाकिस्तान (२.६५%)

▪️7) नायजेरिया (२.५२%)

▪️8) बांग्लादेश (२.१६%)

▪️9) रशिया (१.९२% )

▪️10) जपान (१ ६५%)

__________________________________

उष्ण कटिबंधीय रुक्ष पानझडी वने

◾️ सातपुडा पर्वतरांगा आणि अजिठ डोंगररांग उष्ण कटिबंधीय रुक्ष पानझडी अरण्ये आढळतात

◾️घटमाथ्याच्या पूर्वेस पायथ्यालागत असणाऱ्या कमी उंचीच्या टेकड्यावरही ही अरण्ये पाहाव्यास मिळतात

◾️विदर्भाच्या डोंगररांळ भाग उष्ण कटिबंधीय रुक्ष पानझडी अरण्ये व्यापलेला आहे

🔰 वृक्षाचे स्वरूप
____________________________

◾️ वार्षिक पर्जन्य  80 ते 120 सेंमी असणाऱ्या प्रदेशात रुक्ष पानझडी अरण्ये आढळतात

◾️उष्ण कटिबंधीय रुक्ष पानझडी वृक्ष उंच असतात

◾️काही ठिकाणी कमी उंचीचे सुद्धा आढळतात

◾️पावसाळ्यात फक्त वनस्पती हिरव्यागार दिसतात

◾️कोरड्या हवामानात पाण्याच्या अभावामुळे बसरेसचे वृक्ष पर्णहीन  आढळतात

🔰 वृक्षाचे प्रकार 
____________________________

◾️सागवान,धावडा, शिसम, तेंदू पळस,बीजसाल लेंडी, हेडी, बेल, खैर, अंजन वैगरे

🔰 आर्थिक महत्व
____________________________

◾️उष्ण कटिबंधीय रुक्ष पानझडी अरण्ये मध्ये अनेक वनस्पती चा उपयोग टिंबर म्हणून केला जातो

◾️इंधन म्हणून लाकडाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो

◾️खैरसारख्या वनस्पतीच्या उवयोग "कात" निर्माण करण्यासाठी केला जातो

◾️ उष्ण कटिबंधीय रुक्ष पानझडी अरण्ये मध्ये मानवाचे अतिक्रमण मोठ्या प्रमाणात झालेले आहे, बरीचशी जमीन पिकाच्या लागवडीखाली आणण्यात आली आहे

____________________________

महत्त्वाचे सामान्य ज्ञान प्रश्नउत्तरे


१) पंचायत राज हे स्वप्न कोणाचे होते ?
-- महात्मा गांधी

२) स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते ?
-- लॉर्ड रिपण

३) स्थानिक स्वराज्य संस्था स्वीकारणारे पहिले राज्य ?
-- राज्यस्थान

४) पंचायत राज स्वीकारणारे नववे राज्य?
-- महाराष्ट्र

५) ग्रामपंचायती मध्ये एकूण किती विषय असतात?
-- ७९

६) आशिया खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायत कोणती आहे ?
-- अकलूज

७) महाराष्ट्रतील सर्वात जास्त उत्पन्न देणारी ग्रामपंचायत कोणती आहे ?
-- नवघर

८) महाराष्ट्रतील सर्वात जास्त ग्रामपंचायत असणार जिल्हा ?
-- सातारा

९) ग्रामपंचायत सदस्यांना काय म्हणतात ?
-- पंच

१०) सरपंचाची निवड थेट जनतेतून करणारे महाराष्ट्र हे कितवे राज्य आहे ?
-- तिसरे ( या आधी गुजरात व मध्यप्रदेश मध्ये होत होती)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

दांडी यात्रा आणि सत्याग्रह

⚪️मिठाच्या सत्याग्रहाची सुरुवात दांडी यात्रेने झाली. ही दांडी यात्रा (मोर्चा) साबरमती आश्रमापासून १२ मार्च १९३० रोजी सुरू झाली.

🔴गांधीजींच्या बरोबर त्यांचे ७८ निवडक अनुयायी होते. त्यात सरोजिनी नायडू, इला भट यांचा समावेश होता. यात्रा पुढे निघाली, तसतशी सहभागी लोकांची गर्दी वाढतच गेली. ही यात्रा २४ दिवस चालली आणि तिच्यातील लोक ३८५ कि.मी. पर्यंत पायी चालले.

🟡यात्रा दांडी येथे समुद्रकिनारी ६ एप्रिल १९३०ला पोहोचली. त्या दिवशी जेव्हा सकाळी साडे सहा वाजता गांधीजींनी चिमूटभर मीठ उचलून कायदेभंग केला, तेव्हा कायदेभंगाच्या मोठ्या प्रमाणावरील चळवळीची ती सुरुवातच ठरली. दांडीनंतर गांधीजी मीठ बनवत आणि सभांमध्ये भाषणे करत ते समुद्र किनाऱ्याने दक्षिणेकडे जात राहिले.

🟢दांडीच्या दक्षिणेला २५ मैलांवर असलेल्या धारासणा या ठिकाणी मिठाचा सत्याग्रह करण्याचे कॉंग्रेस पक्षाने ठरवले. पण त्यापूर्वीच ४-५ मे १९३० दरम्यानच्या रात्री गांधीजींना अटक करण्यात आली. दांडी यात्रा आणि धारासणा येथील सत्याग्रह यामुळे सर्व जगाचे लक्ष भारतीय स्वातंत्र्यलढ्याकडे वेधले गेले.

⚫️ मिठाचा सत्याग्रह म्हणजे असहकार चळवळीचा एक भाग होता. प्रत्यक्षात मिठावरचा कर हे केवळ निमित्त होते. गांधींना त्या मिषाने लोकसंघटन आणि लोकजागृती साधायची होती. मिठावरील कराच्या विरोधातील हे आंदोलन पुढे वर्षभर सुरू राहिले.

🟠गांधीजींची तुरुंगातून सुटका आणि लॉर्ड आयर्विन यांच्याशी दुसऱ्या गोलमेज परिषदेतील चर्चा झाल्यावर हे आंदोलन थांबले. मिठाच्या सत्याग्रहाच्या आंदोलनाच्या दरम्यान ६०,००० हून अधिक भारतीय तुरुंगात गेले.

🔺ओरिसातील मिठाचा सत्याग्रह 🔺

🟤दांडी येथील मिठाच्या सत्याग्रहापूर्वीच ओरिसात उत्पादित होणाऱ्या मिठावर ब्रिटिशांनी बसवलेल्या करामुळे तिथे १९२९ सालापासून आंदोलन सुरूच होते. तिथे मीठ तयार करण्यावर बंदी घालण्यात आल्यामुळे वातावरण तापलेले होते. गांधीजी दांडीला पोचण्यापूर्वीच ओरिसामधील लोकांनी मिठाचे उत्पादन सुरू ठेवण्याचा निर्धार केला.

🟣 कटक येथे ओरिसाच्या वेगवेगळ्या भागातून स्वयंसेवक जमा झाले. मिठाच्या सत्याग्रहाबद्दल जाहीर सभा घेण्यात आल्या. या सभेत भाषणे करणाऱ्यांना ब्रिटिश सरकारने अटक करून तुरुंगात टाकले.

🟡६ एप्रिलला गोपबंधू चौधरी आणि आचार्य हरिहर दास यांच्या नेतृत्वाखाली २१ सत्याग्रहींच्या तुकडीने स्वराज आश्रम, कटक येथून इंचुरी येथे मिठाच्या सत्याग्रह करण्यासाठी पायी जाण्यास सुरुवात केली.

🟣 ९ एप्रिलला चांडोल येथे गोपबंधू चौधरी यांना अटक झाली. तरी यात्रा सुरूच राहिली. १३ एप्रिलला इंचुरी येथे पोचलेल्या हजारो सत्याग्रहींनी मूठभर मीठ हातात घेऊन कायदेभंग केला. सत्याग्रहींच्या तुकड्या मीठ हातात घेऊन कायदा मोडत. पोलिस त्यांना अटक करत. मग सत्याग्रहींची पुढची तुकडी पुढे येत असे. सर्व तुरुंग भरून गेले तरी आंदोलनात नवीन लोक सहभागी होतच होते.

🟤इंचुरीमधील सत्याग्रहात महिलांची संख्या लक्षणीय होती. काही निदर्शने महिलांनी आयोजित केली होती. शेवटी सर्व सत्याग्रहींची तुरुंगातून सुटका झाली, तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी हजारो लोक जमले होते.

🟢मिठाच्या सत्याग्रहाने स्वातंत्र्य लढ्याला मोठे बळ मिळाले.जग बदलणाऱ्या १० महत्त्वपूर्ण आंदोलनात या सत्याग्रहाचा समावेश टाईम नियतकालिकाने केला आहे

Geographical Discoveries

• America - Columbus
• Australia - James Cook
• China - Marco Polo
• Planets - Johannes Kepler
• Solar System - Nicolaus Copernicus
• North Pole - Robert Peary
• South Pole - Roald Amundsen
• Sea route to India - Vasco-da-Gama

Police bharti question set

*MTDC चा अर्थ काय?*

A) महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट महामंडळ
B) महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ ✅✅
C) महाराष्ट्र टेलिफोन विकास महामंडळ
D) यापैकी नाही

*महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र _ आहे.*

A) पोलीस मित्र
B) जागर
C) दक्षता ✅✅
D) यापैकी नाही

*पवन उर्जेमध्ये भारताचे स्थान जगात  आहे.*

A) तिसरे
B) दुसरे
C) चौथे
D) पाचवे ✅✅

*भारतात नियमितपणे किती वर्षांनी जनगणना होत असते?*

A) १० ✅✅
B) ७
C) ५
D) ११

*भारताच्या कोणत्या दिशेला बंगालचा उपसागर आहे?*

A) आग्नेय ✅✅
B) ईशान्य
C) नैॠत्य
D) वायव्य

*भारतात सर्वप्रथम व्यापारानिमित्य कोण आले होते?*

A) पोर्तुगीज ✅✅
B) इंग्रज
C) डच
D) फ्रेंच

*मानवामध्ये  गुणसूत्रे असतात.*

A) ४६ ✅✅
B) ४४
C) ३२
D) ५२

*भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कोठे आहे?*

A) लक्षद्वीप
B) मालदीव
C) छागोस
D) अंदमान ✅✅

*‘झुमर’ लोकनृत्य _ राज्यात प्रसिद्ध आहे.*

A) कर्नाटका
B) राजस्थान ✅✅
C) बिहार
D) गुजरात

*आम्ल पदार्थाची चव कशी असते?*

A) खारट
B) आंबट ✅✅
C) तुरट
D) गोड

*नॅशनल केमिकल लॅबोरेटरी (NCL)  ठिकाणी स्थित आहे.*

A) मुंबई
B) औंरंगाबाद
C) पुणे ✅✅
D) नागपूर

*आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली?*

A) रासबिहारी बोस ✅✅
B) चंद्रशेखर आझाद
C) सुभाषचंद्र बोस
D) रामप्रसाद बिस्मिल

*भारतात कोणता दिवस राष्ट्रीय ग्राहक दिवस म्हणून ओळखला जातो?*

A) २४ डिसेंम्बर ✅✅
B) १५ मार्च
C) १ जुलै
D) २ आक्टोबर

*I.S.I. हि गुप्तहेर संघटना  देशाची आहे?*

A) भारत
B) पाकिस्तान ✅👌
C) अमेरिका
D) रशिया

*अक्षय उर्जा दिन : २० ऑगस्ट :: ? : २२ मार्च*

A) जागतिक जल दिन ✅✅
B) साक्षरता दिन
C) जागतिक महिला दिन
D) जागतिक एड्स दिन

*‘दोनदा जन्मलेला’ हा विग्रह कोणत्या सामासिक शब्दाचा आहे?*

A) द्वित
B) अग्रज
C) अनुज
D) द्विज ✅✅

*‘नांगर चषक’  खेळाशी संबधित आहे.*

A) गोल्फ
B) बुद्धिबळ
C) हाॅकि
D) बॅटमिंटन ✅✅

*भारतीय अवकाश संशोधनाचे अध्वर्यू कोणास म्हणतात?*

A) डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
B) विक्रम साराभाई ✅✅
C) सतीश धवन
D) माधवन नायर

*अंदमान – निकोबार बेटांंचे  राजधानीचे शहर कोणते आहे?*

A) विशाखापट्टणम
B) मालदीव
C) छागोस
D) पोर्ट ब्लेअर ✅✅

*‘सव्यापसव्य करणे’ या वाक्याप्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा?*

A) उसने अवसान आणणे
B) सतत त्रास होणे
C) यातायात करणे ✅✅
D) अतिशय काळजी घेणे

*कोणत्या कवीने ‘ गझल’ हा प्रकार मराठीत रूढ केला?*

A) शांताराम नांदगावकर
B) जोतीबा फुले
C) जगदीश खेबुडकर
D) सुरेश भट्ट ✅✅

*हिटलरच्या  आत्मचरित्रातून त्याच्या नाझीवादाचे स्वरूप स्पष्ट होते.*

A) माईन काम्फ ✅✅
B) दास कॅपिटल
C) तरुण तुर्क
D) आपला लढा

*‘भूल पडणे’ या वाक्याप्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा?*

A) भुरळ पडणे✅✅
B) बेशुद्ध पडणे
C) मती नष्ट होणे
D) हरवणे

*‘प्लेइंग’ इट माय वे’ हे प्रसिद्ध आत्मचरित्र  यांचे आहे.*

A) कपिल देव
B) सुनील गावसकर
C) सचिन तेंदुलकर ✅✅
D) अॅडम गिल ख्रिस्ट

*क्रेमलिन हे प्रमुख स्थळ  ठिकाणी आहे?*

A) वाॅशिंग्टन
B) रोम
C) न्यूयाॅर्क
D) माॅस्को ✅✅

चालू घडामोडी वन लाइनर्स, 05 एप्रिल 2020.


❇ 05 एप्रिल: 05 एप्रिल: आंतरराष्ट्रीय विवेक दिन

❇ रॉजर हटन यांची न्यूयॉर्कशायर अध्यक्ष म्हणून नियुक्ती

❇ नील हार्टले यांना न्यूयॉर्कशायरचे उपाध्यक्ष म्हणून नेमणूक केली

❇ कीर स्टाररने यूकेच्या लेबर पार्टीचे नवीन नेते निवडले

❇ एसबीआय म्युच्युअल फंड जाने-मार्चमधील भारतातील सर्वात मोठा एमएफ बनला

❇ ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांना पेटा पुरस्कार

❇ मिझोरम सरकारने "mCOVID-19" मोबाइल अ‍ॅप लाँच केले

❇ हरियाणा सरकारने 30 जूनपर्यंत च्यूइंग गम्सच्या विक्रीवर बंदी घातली

❇ हिमाचल प्रदेशात 30 जूनपर्यंत च्यूइंग गम्सच्या विक्रीवर बंदी

❇ गोवा बंदी अंडी, इतर राज्यातील कोंबडी

❇ तत्काळ प्रभावासह डायग्नोस्टिक किट्सची शासकीय बंदी

❇ आयओसी 29 जून 2021, टोकियो ऑलिम्पिकच्या पात्रतेच्या कालावधीसाठी नवीन अंतिम मुदत म्हणून सेट करते

❇ 'एनसीसी योगदान' व्यायामाअंतर्गत कोविड -19 शी लढा देण्यासाठी एनसीसीचे स्वयंसेवक कॅडेट्स

❇ यूएनजीए 'कोव्हीड -19' 'च्या ठरावाला लढा देण्यासाठी जागतिक एकता स्वीकारते

❇ डॉ जितेंद्रसिंग यांनी कोविड -19  राष्ट्रीय तयारी सर्वेक्षण 2020 जाहीर केले

❇ आयआयएससी बेंगळुरू स्वदेशी व्हेंटिलेटर प्रोटोटाइप विकसित करतो

❇ 20 नोव्हेंबर 2021 पासून आशियाई युवा खेळ चीनमध्ये होणार आहेत

❇ ओडिशा सरकार आणि युनिसेफने "मो प्रतिभाव" कार्यक्रम सुरू केला

❇ हांग्जो चीनमध्ये 19 वे आशियाई खेळांचे अधिकृत मास्कॉट्स अनावरण

❇ 19 वा आशियाई खेळ 2022 चीनमधील हांग्जो येथे होणार आहेत

❇ एनजीओ एआरएमएएमएएन ने सामाजिक उद्योजकता पुरस्कारासाठी स्लॉक अवॉर्ड जिंकला

❇ थायलंड, मलेशियाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये वेटलिफ्टिंगपासून बंदी घातली

❇ फिफा अंडर 17 विश्वचषक 2020, भारत पुढे ढकलला.