Ads

30 July 2020

लघु ग्रहांचा पट्टा

● मंगळ व गुरु या दोन ग्रहांच्या दरम्यान काही अवकाशस्थ दगड व ग्रहसदृश अवकाशीय वस्तू आहेत.
परंतु त्यांचे वस्तुमान व कक्षा या ग्रहांसारख्या नसल्यामुळे त्यांना लघुग्रह असे म्हणतात.

● या लघुग्रहांना एकत्रितपणे लघुग्रहांचा पट्टा असे संबोधतात.

● ४.६ अब्ज वर्षांपूर्वी, सूर्यमालेच्या निर्मितीच्यावेळी ग्रह न होऊ शकलेले गुरू अणि मंगळाच्या कक्षांमधल्या रिकाम्या जागेत फिरत असणाऱ्या अशनींना लघुग्रह म्हणतात.

● ९४५ कि.मी. व्यासाचा सेरेस हा सर्वांत मोठा लघुग्रह आहे. १०० कि.मी.पेक्षा अधिक व्यास असलेले एकूण ७ लघुग्रह आहेत.

●आतापर्यंत सुमारे ७,८९,०६९ शोधले गेले आहेत.

●सर्व लघुग्रहांचे मिळून एकूण वस्तुमान पृथ्वीच्या चंद्राइतके आहे.

युव्हेंटसचे सलग नववे विजेतेपद- सेरी-ए फु टबॉल स्पर्धा


🔰ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या अप्रतिम कामगिरीमुळे युव्हेंटसने सलग नवव्यांदा सेरी-ए फु टबॉल स्पर्धेच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

🔰युव्हेंटसने रविवारी सॅम्पडोरियाचा 2-0 असा पाडाव करत दोन सामन्यांआधीच जेतेपदावर मोहोर उमटवली.

🔰पाच वेळा ‘बलॉन डीऑर’ या प्रतिष्ठेच्या पुरस्कारावर नाव कोरणाऱ्या रोनाल्डोने करोनाच्या विश्रांतीनंतर सलग 11 सामन्यांत गोल करण्याचा विक्रम आपल्या नावावर के ला.

🔰 त्याचबरोबर इटलीतील दुसऱ्या मोसमात 30 सामन्यांत 30 गोलचा टप्पा त्याने ओलांडला.

🔰रोनाल्डोला आता सेरी-ए स्पर्धेत युव्हेंटसतर्फे सर्वाधिक गोलचा विक्रम आपल्या नावावर करण्यासाठी एका गोलची गरज आहे.

🔰1933-34मध्ये फे लिस बोरेल यांनी हा विक्रम नोंदवला होता.

केंद्र सरकार 23 सार्वजनिक उपक्रमांमधून निर्गुंतवणूक करणार.

🔰अर्थमंत्रालयाने 23 सार्वजनिक उपक्रमांमधून निर्गुंतवणूक करण्याची योजना तयार केली असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी केली आहे.

🔰प्रस्तावानुसार, सार्वजनिक क्षेत्रातल्या 23 सरकारी कंपन्यांच्या भागभांडवलांची खासगी क्षेत्राला विक्री केली जाणार आहे. यासाठी मंत्रिमंडळाने आधीच मान्यता दिली आहे.

🔰2020-21 या आर्थिक वर्षात केंद्र सरकारने 2.10 लक्ष कोटी रुपयांच्या निर्गुंतवणुकीचे लक्ष्य ठेवले आहे. त्यापैकी 1.20 लक्ष कोटी रुपये सार्वजनिक क्षेत्रातल्या उपक्रमांमधून तर 90 हजार कोटी रुपये वित्तीय संस्थांमधील सरकारी हिस्सेदारीच्या विक्रीतून मिळतील.

🔴निर्गुंतवणूक म्हणजे काय?

🔰निर्गुंतवणूक म्हणजे सरकारच्या मालकी हक्कातल्या सार्वजनिक क्षेत्रातले उपक्रम, प्रकल्प किंवा इतर मालमत्तेची विक्री करणे होय. सरकारी तिजोरीवरील आर्थिक भार कमी करण्याच्या किंवा विशिष्ट आवश्यकता पूर्ण करण्यासाठी निधी उभा करण्याच्या उद्देशाने ही प्रक्रिया चालवली जाते. आणि प्राप्त निधीतून इतर नियमित स्रोतांकडून होणाऱ्या महसुलातली तूट भरून काढता येते.

भारतीय भुदलात महिला अधिकाऱ्यांच्या परमनेन्ट

🔴 कमिशनसाठी सरकारची मान्यता

🔰भारतीय भुदलात महिला अधिकाऱ्यांच्या परमनेन्ट कमिशनसाठी केंद्र सरकारच्यावतीने औपचारीक मान्यता देण्यात आली आहे. केंद्र सरकारने 23 जुलै 2020 रोजी एक स्वीकृती पत्र जाहीर केले. भारतीय भुदलातल्या विविध पदांवर आता महिलांची नेमणूक केली जाऊ शकते.

🔴परमनेन्ट कमिशन म्हणजे काय?

🔰परमनेन्ट कमिशनचा अर्थ असा होतो की जोपर्यंत निवृत्त होत नाही तोपर्यंत दलात रुजू असणार. म्हणजेच परमनेन्ट कमिशनमार्फत एखाद्याची निवड झाल्यानंतर ती व्यक्ती त्याच्या निवृत्ती-वयाच्या कालावधीपर्यंत देशाची सेवा करू शकते.

🔴घेतलेला निर्णय

🔰शॉर्ट सर्विस कमिशन (SSC) मधील महिला अधिकाऱ्यांचा भारतीय भुदलातल्या सर्व दहाही विभागांमध्ये परमनेन्ट कमिशनसाठी मान्यता देण्यात आली आहे.

🔰महिलांना आर्मी एयर डिफेन्स, सिग्नल, इंजीनियर, आर्मी एव्हिएशन, इलेक्ट्रॉनिक्स, मॅकेनिकल इंजीनियरिंग, आर्मी सर्विस कॉर्प्स, आर्मी ऑर्डिनंन्स कॉर्प्स आणि इंटेलिजेंस कॉर्प्स या विभागांमध्ये परमनेन्ट कमिनश मिळू शकणार. यासोबतच जज अँड एडवोकेट जनरल, आर्मी एज्युकेशनल कॉर्प्स यांमध्येही सुविधा मिळणार.

🔰निवड मंडळाकडून सर्व SSC महिलांना सर्व कागदोपत्री कारवाई पूर्ण केल्यानंतर पुढील प्रक्रिया चालू केली जाणार आहे. दरम्यान, या नियुक्त्या लढाई मोहीमांमध्ये होणार नाहीत.

🌺पार्श्वभूमी

🔰फब्रुवारी महिन्यात झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने परमनेन्ट कमिशन बनविण्यासाठी केंद्र सरकारला तीन महिन्यांचा कालावधी दिला होता.

नवं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण:-

● देशाचं नवं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर करण्यात आलं असून अनेक अमूलाग्र बदल करण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली पार पडलेल्या बैठकीत नव्या शिक्षण धोरणाला मंजुरी देण्यात आली. महत्त्वाचं म्हणजे गेल्या ३४ वर्षात शिक्षण धोरणात कोणताही बदल झाला नव्हता. नव्या शैक्षणिक धोरणात दहावी-बारावी बोर्डाचे महत्त्व कमी करण्यात आलं आहे. तसंच इयत्ता पाचवीपर्यंत मातृभाषेला शिक्षणाचे माध्यम केले जाणार आहे. 

● महत्त्वाचे मुद्दे –
- १०+२ ऐवजी ५+३+३+४ अशी शैक्षणिक व्यवस्था असणार आहे. पाचवीपर्यंत मातृभाषेला शिक्षणाचं माध्यम केलं जाणार असून सहावीपासून व्यावसायिक शिक्षणाचा समावेश सुरु होणार
- देशातील प्रमुख आठ भाषांमध्ये ई-कोर्सेस विकसित करणार
– एम फीलची डिग्री कायमची बंद होणार
– व्यावसायिक आणि शैक्षणिक आणि अभ्यासक्रम आणि अतिरिक्त-अभ्यासक्रम यांच्यातील सर्व विभक्तता दूर केली जाणार
– उच्च शिक्षणासाठी एकच नियामक संस्था असणार
– खासगी आणि सार्वजनिक उच्च शिक्षण संस्थांना समान नियम लागू होणार
– पाचवीपर्यंत मातृभाषा शिक्षणाचं माध्यम
– बोर्ड परीक्षांचं महत्त्व कमी करुन पाठांतराऐवजी ज्ञानाला प्राधान्य दिलं जाणार
– रिपोर्ट कार्डमध्ये फक्त मार्क आणि शेरे दिले जाणार नसून त्यामध्ये कौशल्ये आणि क्षमतांचाही विचार केला जाणार
– शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत वयोमर्यादेत वाढ
– विद्यार्थी एकत्रितपणे दोन शाखांचा अभ्यास करु शकतात
– कला, क्रीडा, संगीत, योग, समाज सेवा या विषयांना अभ्यासक्रमातच समाविष्ट करण्यात येणार
– शालेय शिक्षण आणि उच्च शिक्षणासह कृषी शिक्षण, कायदा शिक्षण, वैद्यकीय शिक्षण आणि तांत्रिक शिक्षणही याच कक्षेत आणलं गेलं आहे
– दिव्यांग विद्यार्थ्यांना अनुकूल शैक्षणिक सॉफ्टवेअरची निर्मिती
– राष्ट्रीय शिक्षण आयोगाची स्थापना करण्याची शिफार,
– खासगी शाळांना अनियंत्रित फी वाढविण्यापासून रोखण्याचीही शिफारस
– सेमिस्टर पॅटर्नवर असणार भर

याआधी १९८६ मध्ये शैक्षणिक धोरण तयार करण्यात आलं होतं. यामध्ये १९९२ मध्ये बदल करण्यात आले. त्यानंतर आता ३४ वर्षांनी शैक्षणिक धोरण तयार करण्यात आलं आहे. योसाबतच मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे नाव बदलून शिक्षण मंत्रालय असं करण्यात आलं आहे

देश आणि देशांची चलने

जगातील विविध देशांची चलने पुढील प्रमाणे आहेत. जगातील विविध देशांची चलने पुढील प्रमाणे आहेत.

अफगाणिस्तान - अफगाणी

आयरीश रिपब्लीक - आयरीश पौंड

ऑस्ट्रेलिया - ऑस्ट्रेलियन डॉलर

र्जॉडन - दिनार

ऑस्ट्रिया - शिलींग

इटली - लिरा

बोटसवाना - रॅंड

कुवेत - दिनार

बंगलादेश - टका

जपान - येन

बेल्जियम - फ्रॅंक

केनिया - शिलींग

बुरुंडी - फ्रॅंक

लिबिया - दिनार

ब्रिटन - पौंड

लेबनॉन - पौंड

बर्मा - कॅट

नेदरलॅंड - गिल्डर

क्युबा - पेसो

मेक्सिको - पेसो

कॅनडा - डॉलर

नेपाळ - रुपया

सायप्रस - पौंड

पाकिस्तान - रुपया

चीन युआन

न्यूझीलंड - डॉलर

झेकोस्लाव्हिया - क्रोन

पेरु - सोल

डेन्मार्क - क्लोनर

नायजेरिया - पौंड

फिनलॅंड - मार्क

फिलिपाईन्स - पेसो

इथोपिया - बीर

नॉर्वे - क्लोनर

फ्रान्स - फ्रॅंक

पोलंड - ज्लोटी

घाना - न्युकेडी

पनामा - बल्बोआ

जर्मनी - मार्क

पोर्तुगाल - एस्कुडो

गियान - डॉलर

रुमानिया - लेवू

ग्रीस - ड्रॅक्मा

सॅल्वेडॉर - कॉलन

होंडुरा - लेंपिरा

सौदी अरेबिया - रियाल

भारत - रुपया

सोमालिया - शिलींग

युगोस्लाव्हिया - दिनार

सिंगापुर - डॉलर

आइसलॅंड - क्रोन

स्पेन - पेसेटा

इराक - दिनार

साउथ आफ्रिका - रॅंड

इंडोनेशिया - रुपिया

श्रीलंका - रुपया

इस्त्रायल - शेकेल

सुदान - पौंड

इराण - दिनार

स्वित्झर्लंड - फ्रॅंक

जमैका - डॉलर

स्वीडन - क्रोन

सिरिया - पौंड

टांझानिया - शिलींग

थायलंड - बाहत

टुनीशीया - दिनार

युगांडा - शिलींग

यु.के. - पौंड

त्रिनिदाद आणि टॉबेगो - डॉलर

टर्की - लिरा

रशिया - रूबल

अमेरीका - डॉलर

युनायटेड अरब प्रजासत्ताक

व्हिएतनाम - दौग

झांबीया - क्वाच्छा

भारताचा परकीय चलन साठा

(foreign Exchange Reserves in India).

🅾परकीय चलन साठा हा देशाच्या व्यवहार तोलाचा महत्वाचा घटक असतो आणि त्यावरून देशी अर्थव्यवस्थेच्या बाह्य स्थितीचा अंदाज येत असतो.

🅾देशाच्या परकीय चलन साठयामध्ये पुढील महत्वाच्या बाबीचा समावेश होतो.

1) RBI कडील परकीय चलन मालमत्ता

2) RBI कडील सोन्याचा साठा

3) SDRs (Special Drawing Rights)

4) IMF कडील आरक्षित निधी (Reserve Tranche Position (RTP) in the IMF)

🅾भारताच्या परकीय चलन साठयाचा स्तर मुख्यत: रिझर्व्ह बँकेने परकीय चलन बाजारात केलेल्या हस्तक्षेपाचा परिणाम असतो. हा हस्तक्षेप मुख्यत: रूपयाच्या विनिमय दराच्या चढउतारावर नियंत्रण ठेवण्यासाठी केला जात असतो. अशा हस्तक्षेपासाठी अमेरिकन डॉलर व युरो या दोन चलनांचा वापर केला जातो. रिझर्व्ह बँकेच्या ताब्यातील परकीय चलन मालमत्ता अमेरिकन डॉलर, युरो, पाउंड स्टर्लिंग, ऑस्ट्रेलियन डॉलर, जपानी येन यांसारख्या प्रमुख चलनांमध्ये ठेवली जाते. मात्र परकीय चलन साठा केवळ अमेरिकन डॉलरच्या संदर्भातच मोजला जातो व व्यक्त केला जातो.

🅾भारताचा परकीय चलन साठा मार्च 1991 अखेर केवळ 5.8 अब्ज डॉलर इतका घसरला होता. त्यानंतर मात्र उदारीकरणाच्या प्रक्रियेमुळे भारताकडे परकीय चलनाचा ओघ वाढू लागला. भारताचा परकीय चलन साठा 19 डिसेंबर 2003 रोजी 100 अब्ज डॉलर बनला. 6 एप्रिल 2007 रोजी संपलेल्या आठवडयात परकीय चलन साठयाने 200 अब्ज डॉलरचा टप्पा पार केला.

🅾29 फेब्रुवारी, 2008 रोजी संपलेल्या आठवडयात भारताच्या परकीय चलनाच्या साठयाने 300 अब्ज डॉलर्सचा टप्पा पार केला. मे 2008 च्या शेवटी भारताचा परकीय चलन साठा आतापर्यंतचा सर्वाधिक म्हणजे 314.6 अब्ज डॉलर इतक्या उच्चांकी स्तरावर पोहोचला होता.

🅾त्यानंतर मात्र जागतिक वित्तीय मंदीमुळे भारताकडे येणार्यात गुंतवणुकीच्या ओघ कमी झाल्याने भारताचा परकीय चलन साठा कमी होवून डिसेंबर 2009 अखेरीस 283.5 अब्ज डॉलरपर्यंत घसरला. मात्र त्यात पुन्हा वाढ होत जाऊन 2011 अखेर परकीय चलन साठा पुन्हा 303.482 अब्ज डॉलर्स इतका बनला. 2012 मध्ये मात्र मंदीमुळे त्यात पुन्हा घट घडून आली आहे.

🅾ऑक्टोबर, 2012 मध्ये भारत हा जगातील 9 व्या क्रमांकाचा सर्वाधिक परकीय चलन साठा असलेला देश (युरोझोन व हाँगकाँग वगळता) ठरला. परकीय चलनाचा सर्वाधिक साठा असलेले देश पुढीलप्रमाणे : 1) चीन- 3,285 अब्ज डॉलर्स 2) जपान- 1 ,274 अब्ज डॉलर्स 3) सौदी अरेबिया- 614 अब्ज डॉलर्स 4) स्वित्झरलँड- 530 अब्ज डॉलर्स  

 🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

Online Test Series

29 July 2020

दहावीचा निकाल जाहीर

९५.३०% राज्याचा एकूण निकाल
कोकण- ९८.७७%
कोल्हापूर - ९७.६४%
पुणे - ९७.३४%
मुंबई- ९६.७२%
अमरावती - ९५.१४%
नागपूर- ९३.८४%
नाशिक - ९३.७७%
लातूर - ९३.०९%
औरंगाबाद- ९२.००% 
९६.९१% विद्यार्थिनी तर ९३.९०% विद्यार्थी उत्तीर्ण 
परीक्षेला नोंदणी केलेले एकूण विद्यार्थी - १७ लाख ६५ हजार ८९८,
परीक्षेला बसलेले एकूण विद्यार्थी - १७ लाख ९ हजार २६४,
एकूण उत्तीर्ण विद्यार्थी - १५ लाख १ हजार १०५,
यशस्वी विद्यार्थी विद्यार्थिनींचे आणि पालकांचे अभिनंदन!  विद्यार्थी विद्यार्थिनींच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

राज्यपाल



🅾  राज्यपाल च्या भारतातील राज्यांमध्ये की राज्य पातळीवर समान अधिकार आणि कार्ये आहेत भारताचे राष्ट्रपती केंद्रीय स्तरावर.

🅾 राज्यपाल अस्तित्वात राज्यांमध्ये लेफ्टनंट राज्यपाल किंवा प्रशासक अस्तित्वात असताना केंद्रशासित प्रदेश समावेश दिल्ली राष्ट्रीय राजधानी प्रदेश . 

🅾राज्यपाल हे नाममात्र प्रमुख म्हणून काम करतात तर खरी सत्ता राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची आणि त्यांच्या / तिच्या मंत्र्यांच्या परिषदेची असते.

🅾 केंद्रशासित प्रदेशांमध्ये वास्तविक सत्ता लेफ्टनंट गव्हर्नर किंवा प्रशासकाची असते, दिल्ली, पुडुचेरी आणि जम्मू-काश्मीर वगळता मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या मंत्रिमंडळात तो / ती सत्ता सामायिक करतो.

💠💠राज्यपाल💠💠

🅾 भारतात केंद्रशासित प्रदेशाचा प्रभारी लेफ्टनंट गव्हर्नर असतो. तथापि, हा पद फक्त अंदमान आणि निकोबार बेटे , लडाख , जम्मू-काश्मीर , दिल्ली आणि पुडुचेरी या केंद्रशासित प्रदेशात अस्तित्त्वात आहे (इतर प्रदेशात प्रशासक नेमलेला आहे, जो सामान्यत: आयएएस अधिकारी किंवा कोर्टाचा सेवानिवृत्त न्यायाधीश असतो). तथापि, पंजाबच्या राज्यपालपदी प्रशासक म्हणून काम करते चंदीगड . लेफ्टनंट गव्हर्नर प्राधान्यक्रमात एखाद्या राज्याच्या राज्यपालपदाइतके पद मानत नसले तरी.

🅾गव्हर्नर आणि लेफ्टनंट गव्हर्नर यांची नेमणूक पाच वर्षांच्या मुदतीसाठी अध्यक्ष करतात.

पात्रता 

🅾लेख 157 आणि कलम 158 च्या भारतीय संविधानाच्या राज्यपाल पदासाठी पात्रता आवश्यकता निर्देशीत करा. ते खालीलप्रमाणे आहेतः

🅾राज्यपालांनी हे करायला हवेः

🅾[भारताचे नागरिक] व्हा.

🅾कमीतकमी 35 वर्षे वयाचे असावेत.

🅾संसदेच्या कोणत्याही सभागृहाचे किंवा राज्य विधिमंडळाच्या सभासदाचे सदस्य होऊ नका .

🅾नफ्याचे कोणतेही पद घेऊ नका.

शक्ती आणि कार्ये.

🅾राज्यपालांचे मुख्य कार्य म्हणजे राज्य घटनेच्या कारभारामध्ये भारतीय राज्यघटनेच्या कलम १9 under अन्वये त्यांच्या शपथविधीमध्ये समाविष्ट असलेल्या घटनेचे आणि कायद्याचे जतन करणे, संरक्षण करणे आणि त्यांचे संरक्षण करणे हे आहे . 

🅾राज्यातील कार्यकारी आणि विधायी घटकांवरील त्याच्या सर्व क्रिया, शिफारसी आणि पर्यवेक्षण अधिकार (कलम 167 सी, अनुच्छेद 200, कलम 213, अनुच्छेद 355 इ.) संविधानाच्या तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी वापरल्या जातील. या संदर्भात, राज्यपालाकडे अनेक प्रकारची शक्ती आहेत:

🅾प्रशासनाशी संबंधित कार्यकारी अधिकार , नेमणुका आणि काढण्याबाबत.

🅾विधिमंडळ आणि राज्य विधानमंडळाशी संबंधित वैधानिक अधिकार , म्हणजे राज्य विधानसभा (विधानसभा) किंवा राज्य विधान परिषद (विधान परिषद),

🅾स्वेच्छाधीन अधिकार राज्यपाल ठरवण्याचा अधिकार त्यानुसार चालते जाऊ

कार्यकारी अधिकार.

🅾राज्यघटना राज्यपाल मध्ये याबाबतचे अंतिम अधिकार मा सर्व राज्य सरकारच्या कार्यकारी शक्ती. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांची नेमणूक केली , ज्यांना राज्य विधानसभेत बहुमताचा पाठिंबा आहे. राज्यपाल मंत्री परिषदेच्या इतर सदस्यांची नेमणूक करतात आणि मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार त्यांना विभागणी वाटप करतात.

🅾राज्यपालांच्या इच्छेनुसार मंत्रीपरिषद सत्तेत राहते, परंतु खर्‍या अर्थाने विधानसभेत बहुमत मिळवण्याच्या आनंदाचा अर्थ होतो. जोपर्यंत राज्य विधानसभेतील बहुमत सरकारला पाठिंबा देत नाही तोपर्यंत मंत्रीमंडळ बरखास्त करता येणार नाही.

🅾राज्यपाल एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांची नेमणूक करतात . तसेच she डव्होकेट जनरल आणि राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांची नेमणूकही करतात. त्याशिवाय राज्य निवडणूक आयुक्तांची नेमणूकही राज्यपालांमार्फत केली जाते (राष्ट्रपतींनी काढून टाकली असती तरी). 

🅾अध्यक्ष न्यायाधीश नियुक्ती राज्यपाल consults उच्च न्यायालये आणि राज्यपाल जिल्हा न्यायालयात न्यायाधीश म्हणून नेमणूक करते. सर्व प्रशासन त्याच्या किंवा तिच्या नावावर चालविले जाते, त्याला किंवा तिच्यातही भारतीय राज्यघटनेनुसार इयत्ता एक आणि वर्ग चौथीच्या कार्यकाळात कर्मचारी नियुक्त करण्याचे सामर्थ्य आहे.

🅾राज्यपालांचे राज्यपाल हे त्यांच्या कार्यकाळातील बहुतेक विद्यापीठांचे कुलपती आहेत . कुलपती कार्यालयाची प्रतिष्ठा आणि निःपक्षपातीपणा यामुळे राज्यपालांना विद्यापीठांच्या स्वायत्ततेचे रक्षण आणि त्यांना अयोग्य राजकीय हस्तक्षेपापासून वाचविण्याच्या बाबतीत अनन्य स्थान दिले जाते. 

🅾विद्यापीठाचे कुलपती म्हणून राज्यपाल हे सिनेटचे अध्यक्ष म्हणूनही काम करतात. राज्यपालांना विद्यापीठाच्या व त्या संलग्न महाविद्यालयांच्या प्रत्येक घटकाची प्रत्यक्ष तपासणी करण्याचे अधिकार आहेत, चौकशीच्या निकालावर योग्य ती कारवाई करावी लागेल. कुलपती भेटी शोध समिती नियुक्ती कुलगुरू. 

🅾राज्यपालांनी सिनेटच्या शिफारशीनुसार पदांच्या वॉरंटची आणि डिग्री मागे घेण्यास किंवा भिन्नतेस मान्यता देण्यास मान्यता दिली. राज्यपाल सिनेटने मंजूर केलेले कायदे मंजूर किंवा नाकारले व संबंधित समित्यांच्या शिफारसीच्या आधारे विद्यापीठाच्या शिक्षकांची नेमणूक केली.

वैधानिक अधिकार.

🅾राज्य प्रमुख राज्य विधानसभेच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन बोलावतात व त्यांची पूर्तता करतात. राज्यपाल राज्य विधानसभेचे विघटन करू शकतात. हे अधिकार औपचारिक असतात आणि राज्यपालांनी हे अधिकार वापरताना मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिपरिषदेच्या सल्ल्यानुसार कार्य केले पाहिजे.

🅾राज्यपालांनी विधानसभेच्या निवडणुकीनंतर आणि दरवर्षी पहिल्या अधिवेशनाच्या सुरूवातीला राज्य विधानसभेचे उद्घाटन (समर्पित करण्यासाठी) केले. 

🅾या प्रसंगी राज्यपालांच्या संबोधनात राज्य सरकारच्या नवीन धोरणांची रूपरेषा असते. राज्य विधानसभेने हे विधेयक मंजूर केले, हे राज्यपालांच्या मान्यतेनंतरच कायदा होऊ शकते. राज्यपालांनी राज्य विधीमंडळाला हे पैसे विधेयक नसल्यास पुन्हा विचारासाठी विधेयक परत देऊ शकतात . 

🅾तथापि, राज्य विधिमंडळाने ती पुन्हा राज्यपालांकडे दुसर्‍यांदा पाठविल्यास राज्यपालांनी त्यास मान्यता देणे आवश्यक आहे. राष्ट्रपतींकडे काही विधेयके राखून ठेवण्याचे अधिकार राज्यपालाकडे असतात.

🅾जेव्हा राज्य विधिमंडळ अधिवेशनात नसते आणि राज्यपाल कायदा असणे आवश्यक मानतात, तर राज्यपाल अध्यादेश काढू शकतात. हे अध्यादेश पुढील अधिवेशनात राज्य विधिमंडळात सादर केले जातात. पूर्वीच्या मंजुरीशिवाय राज्य विधिमंडळ पुन्हा तयार होण्याच्या तारखेपासून ते सहा आठवड्यांपेक्षा जास्त काळ वैध राहतील. 

🅾कलम १ 192 under अन्वये राज्य विधानसभेच्या सभासदाला अपात्र ठरविण्यास राज्यपाल यांना अधिकार देण्यात आला आहे जेव्हा निवडणूक आयोगाने शिफारस केली आहे की आमदार यापुढे अनुच्छेद १ 1 १ च्या तरतुदींचे पालन करीत नाहीत.

🅾अनुच्छेद 165 आणि 165 Per नुसार राज्यपाल महाधिवक्ता यांना राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाजात उपस्थित राहण्यास सांगू शकतात आणि काही बेकायदेशीर कामकाज करण्यास कळवू शकतात.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

28 July 2020

Online Test Series

फकीरांचे बंड

कालखंड :- इ.स. 1776 ते 1800

नेतृत्व :- मजनुन शहा, चिराग अली.

मुख्य ठिकाण :- उत्तर बंगाल, नेपाळमधील तराईचा प्रदेश

  🖍 बंगालमधील मजनुन शहा नावाच्या फकीराने बंगालमधील फकीरांना एकत्रित करुन इंग्रजांच्या गोदामावर  तसेच पोलिस ठाण्यांवर छापे मारण्यास सुरूवात केली व आपले केंद्र नेपाळच्या तराई भागात ठेवले.

🖍  मजनुन शहाच्या मृत्युनंतर त्याचा मुलगा चिराग अलीने उत्तर बंगालमध्येब्रिटिशांविरुध्द लढा सुरूच ठेवला.

🖍   इंग्रजांनी शेतकऱ्यांना जादा सारा लावून त्यांची पिळवणूक केल्यामुळे महसूल अधिकारी, पोलीस यांच्याशी त्यांच्या नेहमी चकमकी चालत असे.

🖍  या इंग्रजांविरोधी लढ्यात राजपूत देखील सामील असे व भवानी पाठक, देवी चौधुराणी हे त्यांचे सहकारी होत.

सन्याशांचे बंड

कालखंड :- इ.स. 1763 ते 1800

🖍  इंग्रजांनी भारतात अापली सत्ता प्रथम बंगालमध्ये स्थापन केल्यामुळे इंग्रजांविरोधी उठाव देखील प्रथम बंगाल व नंतर बिहार, ओरीसा या भागात झाले.

🖍 बंगालमधील सन्याशी हे गिरी संप्रदायाचे असून मूळ शंकराचाऱ्यांचे अनुयायी व लढावू वृत्तीचे लोक होते.

🖍  मी कासीमच्या वतीने बक्सारच्या लढाईत जवळपास 5000 सन्याशी इंग्रजांविरुध्द लढले होते.

🖍  हे लोक जमिनदारांच्या शेतीवर हल्ला करुन पिके लुटून नेणे तसेच सावकरांच्या घरांवर हल्ले करुन लुटमार करणे हे मुख्य काम करीत असे.

🖍   1763 पासून हे लोक इंग्रजांच्या ठाण्यांवर व व्यापारी केंद्रावरही हल्ले करुन पळून जात असत व सुमारे 1800 पर्यंत हा लढा चालला.

🖍   सन्याशांच्या या विध्वंसक हल्ल्यांमुळे इंग्रज अधिकारी देखील त्रस्त झाले होते.

  🖍 बकीमचंद्र चॅटर्जींच्या ‘आनंदमठ’ या कांदबरीत या लढ्याचे चित्रण पहावयास मिळते.