२३ ऑक्टोबर २०२१

काही महत्वाचे सिध्दांत, वर्ष संशोधक

💐 मोजकेच पण महत्वाचे 💐

काही महत्वाचे सिध्दांत, वर्ष संशोधक

1) अणू सिध्दांत 1803 - जॉन डॉल्टन

2) उत्क्रांतीचा सिद्धांत 1858 - चार्ल्स डार्विन

3) गुरुत्वाकर्षणाचा सिध्दांत 1687 - आयझॅक न्यूटन

4) सापेक्षतः सिध्दांत 1905 - अल्बर्ट आईन्स्टाईन

5) भूखंड वाहनाचा सिध्दांत  1912 - आल्फ्रेड वेगणर

6) बिग - बँग सिध्दांत  1927 - जॉर्जेस जोसेफ लेमित्रे

पोलीस भरतीसाठी आजचे महत्त्वाचे प्रश्न

1) 39 व्या जागतिक कवी परिषदेचे उद्घाटन कुठे झाले?
उत्तर : भुवनेश्वर

2) पुर्णपणे विजेवर उडणारे NASA चे पहिले प्रायोगिक विमान कोणते?
उत्तर : X-57’s Mod II

3) ‘ईशान्य हातमाग आणि हस्तकला प्रदर्शनी 2019’ या कार्यक्रमाचे उद्घाटन कुठे झाले?
उत्तर : मिझोराम

4) भारतीय रिझर्व्ह बँकेनी एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकवर कधीपासून बंदी घातली आहे?
उत्तर : 5 ऑक्टोबर 2019

5) जागतिक अंतराळ सप्ताह ऑक्टोबर महिन्यात कधी साजरा केला जातो?
उत्तर : 4 ते 10 ऑक्टोबर

6) ‘गृह फायनान्स’ ही गृहनिर्माण कंपनी कोणत्या बँकेत विलीन होणार आहे?
उत्तर : बंधन बँक

7) अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये होणाऱ्या पहिल्या पर्वतीय युद्ध सरावाचे नाव काय?
उत्तर : 'हिम विजय'

8) “KAZIND-2019” नावाचा लष्करी सराव कोठे आयोजित करण्यात आला आहे?
उत्तर : उत्तराखंड

9) CISF ने कोणत्या जलविद्युत प्रकल्पावर पाळत ठेवण्याची घोषणा केली आहे?
उत्तर : बागलीहार जलविद्युत प्रकल्प

10) अमेरिकेने कोणत्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची नुकतीच चाचणी घेतली?
उत्तर : मिनिटेमन II|

मराठी व्याकरणाशी करूया मैत्री - पोलीस भरती स्पेशल

मराठी व्याकरण आपला मित्र होऊ शकतो...! तुम्ही असा विचार कधी केला आहे का ? आणि समजा मराठी व्याकरणाशी आपली मैत्री झाली तर...? परीक्षेत पैकीच्या पैकी मार्क्स मिळवण्या पासून आपणास कोणीच थांबवू नाही शकणार.

हा लेख लिहण्या मागील हेतू हाच आहे की, खरच आपली मराठी व्याकरणाशी मैत्री होऊ शकते का ? आणि मैत्री होऊ शकते तर ती आपण कशा प्रकारे करू शकतो.

मराठी व्याकरणाशी मैत्री करायची असेल तर सर्वात सुरवातीस मराठी विषयाची तुलना आपल्या दैनंदिन जीवनाशी करावी लागेल. आपण जर मराठी विषयातील घटकांची सांगड आपल्या दैनंदिन जीवनातील घटकांशी घातली तर ते अभ्यासातील घटक आपल्याला पाठ करण्याची किंवा लक्षत ठेवण्याची गरज लागणार नाही. ते सर्व घटक आपल्या कायमस्वरूपी लक्षात राहतील व अभ्यास पण एकदम मजेशीर स्वरूपात होऊन जाईल. जो अभ्यास तुम्हाला कंटाळवाणा वाटतो, तोच अभ्यास तुम्ही हसत खेळत कराल. मी माझ्या शॉर्टकट मराठी व्याकरण पुस्तकात सर्व आशा सर्व गोष्टी एकदम मजेशीर स्वरूपात लिहल्या आहेत, जेणे करून तुमचे हसत खेळत मराठी व्याकरण तोंडपाठ होईल.

चला तर मग, आपण पाहू की, मराठी घटकांची सांगड दैनंदिन जीवनातील घटकांशी कशी घातली जाऊ शकते.

वाक्य :- अर्थ पूर्ण शब्दांच्या समूहाला वाक्य म्हणतात.
असे समजा की वाक्य म्हणजे आपले कुटुंब आहे. जसे विविध शब्द एकत्र आले की वाक्य बनते, तसेच विविध माणसे एकत्र आले की कुटुंब बनते.

मराठीत पुढीलप्रमाणे शब्दांच्या आठ जाती आहेत, त्या जातींची तुलना आपण विविध व्यक्ती नुसार करू -

1. नाम ( Noun ) :- प्रत्येक्षात असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणवणाऱ्या वस्तुंना किंवा त्यांच्या गुणधर्माला नाम असे म्हणतात.  
ट्रिक्स - असे समजा की, नाम म्हणजे मुलगा. मुलगा जन्माला म्हणजे त्याचे काही तरी नाव ठेवावं लागते, त्यालाच नाम म्हणतात.
2. सर्वनाम ( Pronoun ) :-  नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. 
ट्रिक्स :- असे समजा की, सर्वनाम म्हणजे आत्या. नामाबद्दल वापरला जाणारा शब्द म्हणजे सर्वनाम, तसेच आत्या मुला बद्दल नाव ठेवत असते.
3. विशेषण ( Adjective ) :- नामाबद्दल विशेष माहिती सांगणार्याय शब्दास विशेषण असे म्हणतात.
ट्रिक्स - असे समजा की, विशेषण म्हणजे आई. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दास विशेषण म्हणतात, तसेच आई मुलाबद्दल विशेष माहिती सांगत असते.
4. क्रियापद ( Verb ) :- वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतात.
ट्रिक्स - असे समजा की, क्रियापद म्हणजे मुलगी. जसे क्रियापदा शिवाय वाक्य पूर्ण होत नाही, तसेच मुली शिवाय कुटुंब पूर्ण दिसत नाही.
5. क्रियाविशेषण अव्यय ( Adverb ) :- जे शब्द क्रियापदा बद्दल विशेष माहिती सांगतात, परंतु कर्त्याच्या लिंग, वचन व पुरुषानुसार बदलत नाहीत त्यांना क्रियाविशेषण अव्यय म्हणतात.
ट्रिक्स :- असे समजा की, क्रियाविशेषण म्हणजे वडील. जसे क्रियाविशेषण क्रियापदा बद्दल विशेष माहिती सांगते, तसेच वडील ( क्रियाविशेषण ) मुली ( क्रियापद ) बद्दल विशेष माहिती सांगत असतात.        
6. उभयान्वयी अव्यय ( Conjunction ) :- दोन किंवा अधिक शब्द अथवा दोन किंवा अधिक वाक्ये यांना जोडणाऱ्या शब्दाला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.
ट्रिक्स :- असे समजा की, उभयान्वयी अव्यय म्हणजे आजोबा. जसे उभयान्वयी अव्यय दोन शब्द किंवा दोन वाक्य यांना जोडण्याचे काम करते, तसेच आजोबा देखील कुटुंबातील माणसांना किंवा दोन कुटुंबांना जोडण्याचे काम करत असतात.
7. शब्दयोगी अव्यय ( Prepositions ) :- काही शब्द नामांना किंवा सर्वनामाना जोडून येतात व त्या वाक्यातील दुस‌या एखाद्या शब्दाशी संबंध दाखवतात अशा शब्दांना शब्दयोगी अव्यय म्हणतात.  
ट्रिक्स :-  असे समजा की, शब्दयोगी अव्यय म्हणजे मामा. जसे शब्दयोगी अव्यय म्हणजे नामांना किंवा सर्वनामांना जडून येणारे शब्द, तसेच मामा हे देखील मुलगा ( भाचा ) व आत्या ( बायको ) यांच्याशी जुडलेला असतो.
8. केवलप्रयोगी अव्यय ( Exclamatory Words ) :- मानवी मनातील भावना अचानक व्यक्त करण्यासाठी वापरला जाणारा शब्द  म्हणजे केवल प्रयोगी अव्यय.
ट्रिक्स :- असे समजा की, केवलप्रयोगी अव्यय म्हणजे मामाची मुलगी. भावना अचानक व्यक्त करण्यासाठी वापरला जाणारा शब्द  म्हणजे केवल प्रयोगी अव्यय, अशाच प्रकारे मामाच्या मुलीला पाहताच भावना अचानक  व्यक्त होतात.
" वाह....! किती छान ही मामाची मुलगी."

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) शरीर पिळदार व्हावे म्हणून मी व्यायाम करतो. – या वाक्यात गौण वाक्याचा प्रकार ओळखा.

   1) काळदर्शक क्रियाविशेषण वाक्य    2) नाम वाक्य
   3) कारणदर्शक क्रियाविशेषण वाक्य    4) विशेषण वाक्य

उत्तर :- 3

2) खालील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा.

     ‘समीप’

   1) करणवाचक    2) स्थलवाचक   
   3) संग्रहवाचक    4) यापैकी नाही

उत्तर :- 2

3) परिणामबोधक संयुक्तवाक्य बनविताना कोणत्या उभयान्वयी अव्ययांचा वापर होतो ?

   1) म्हणून, सबब    2) अथवा, किंवा   
   3) परी, पण    4) व, आणि

उत्तर :- 1

4) ‘हुडु !’ या अव्ययातून कोणता भाव व्यक्त होतो.

   1) तिरस्कार    2) विरोध     
   3) संबोधन    4) यापैकी नाही

उत्तर :- 1

5) ‘तो निजत असेल’ – या विधानातील काळ ओळखा.

   1) भूतभविष्य काळ    2) वर्तमानभविष्य काळ 
   3) भविष्यभविष्य काळ    4) यापैकी एकही नाही

उत्तर :- 2

6) ‘देवघर’ या शब्दाचे लिंग कोणते?

   1) स्त्रीलिंग    2) पुल्लींग   
   3) नपुंसकलिंग    4) यापैकी नाही

उत्तर :- 3

7) सर्वनामाची खालीलपैकी कोणती विभक्ती होत नाही.

   1) पंचमी    2) संबोधन   
   3) सप्तमी    4) षष्ठी

उत्तर :- 2

8) अबब ! केवढा हा उंचच उंच कडा. – वाक्याचा प्रकार सांगा.

   1) विधानार्थी    2) प्रश्नार्थी   
   3) उद्गारवाची    4) होकारार्थी

उत्तर :- 3

9) “हवा कोंदट असल्यास मनुष्याची प्रकृती बिघडते.”

     वरील वाक्यातील विधेय विस्तारक कोणते  ?

   1) हवा कोंदट असल्यास      2) मनुष्याची
   3) प्रकृती        4) बिघडते

उत्तर :- 1

10) पुढील पर्यायातू ‘भावे प्रयोग’ ओळखा.

   1) रामाने रावणास मारला      2) रामाकडून रावण मारला गेला
   3) राम रावणास मारील      4) रामाने रावणास मारले

उत्तर :- 4

२२ ऑक्टोबर २०२१

OnlineTest Series

काही जुन्या पण महत्त्वपूर्ण शब्दांचे अर्थ

🌷झूल

बेंदरा दिवशी बैलाच्या अंगावर रेशमी रंगीबेरंगी त्याच्या शरीराच्या मापाचे कापड असते. त्यावर वेगवगळ्या प्रकारची चित्र असतात. त्याला झूल म्हणतात.

🌷आंबवणी, चिंबवणी

शेतात कोणत्याही रोपाची कांदा, वांगी, कोबी,फ्लॉवर, ऊस, लागण करण्यापूर्वी शेताची खूप मशागत केलेली असते. त्यामुळे माती भुसभुशीत झालेली असते. रोप लावल्यानंतर पाणी दिले तरी ते आजूबाजूची माती पाणी शोषून घेते व रोपांना पाणी कमी पडते म्हणून दुसरे दिवशी पाणी दिले जाते त्याला आंबवणी व पुन्हा दोन दिवसांनी पाणी दिले जाते त्याला चिंबवणी म्हणतात.

🌷वाफा, सारा

कोणत्याही पिकाला पाणी देण्यासाठी वाफे किंवा सारे करतात. वाफा किंवा सारा म्हणजे त्याच्या एका बाजूला पाण्यासाठी पाट असतो व बाकी तिन्ही बाजूला उंचवटा केला जातो.जेणेकरून पाटाचे पाणी दिले की ते पाटाच्या बाहेर जाऊ नये. लहानआकाराचा असतो त्याला वाफा म्हणतात, तर मोठ्या आकाराचा असतो त्याला सारा म्हणतात.

🌷खांदमळणी

बैलांचा महत्त्वाचा सण बेंदूर. बेंदरापर्यंत बैलांची उन्हाळ कामं, खरीपाची पेरणी ही कामं उरकली जायची. बेंदरात बैलांचा सण असल्याने बेंदराच्या आदल्या दिवशी बैलांनी खूप कष्ट केलेले असतात. त्यांच्या मानेवर कायम जू असते. बैलाच्या मानेला साद हणतात. खांदाला त्रास झालेला असतो म्हणून खांदाला तेल, हळद, तूप लावून त्याचे मालीश केले जाते त्याला खांदमळणी म्हणतात.

🌷कंडा

बेंदरादिवशी प्रत्येक शेतकरी बैलाला गरम पाण्याने धुऊन चांगला सजवतो त्याच्या गळ्यात रंगबेरंगी धाग्याच्या गोलाकार कासरा बांधला जातो त्याला कंडा म्हणतात.

🌷चाळ

बैलाच्या मानेएवढा कातडी पट्टा घेऊन त्यात वेगवेगळ्या आकाराचे घुंगरू ओवले जातात त्याला चाळ म्हणतात.

🌷शेंट्या

बेंदराच्या अगोदरच बैलाची शिंग घोळली जातात. बेंदरा दिवशी शिंग रंगवून बेगड लावून शिंगाच्या वरच्या बाजूला लोखंडी किंवा पितळी शेंट्या बसवल्या जातात त्याला गोंडे जोडलेले असतात.

🌷आडणा

वाड्याच्या मुख्य दरवाजाला आतून एक आडवं लाकूड लावलं जायचं जेणेकरून दरवाजाचं दार जोरात ढकललं तरी उघडू नये.

🌷फण

कुरीच्या दिंडाला तीन किंवा चार चौकोनी भोकं असतात त्यात *फण* बसवला जातो. फणाला मध्येच एक पूर्ण बोगदा पाडलेला असतो. त्यात नळ जोडला जातो. हे नळ चाड्याला जोडले जातात. चाड्यातून बी पेरल्यानंतर ते जमिनीत समान अंतरावर पडतं. फण झिजू नये म्हणून जो भाग जमिनीत जातो त्यावर लोखंडी पट्टी बसवली जाते. त्याला फासळ म्हणतात.

🌷भूयट्या

जमीन भुसभुशीत असेल तर औत, कुळक, फरांदी, कुरी दिंडावर उभं न राहता मोकळी चालवली जाते. औताच्या पाठीमागे फक्त चालायचं. त्याला भूयट्या म्हणतात.

🌷रूमण

औत भूयट्या चालवताना दिंडाला मधोध एक भोक असतं त्यामध्ये एक दांडा उभा केला जातो व दांड्याच्य वरच्या बाजूला एक आडवं लाकूड लावलं जातं. त्यावर थोडा थोडा भार दिला जातो.त्याला रूमण म्हणतात.

🌷उभाट्या

जमीन कठीण असेल औत जमिनीत जास्त जात नसेल तर दिंडावर उभं राहून औत चालवलं जातं त्याला उभाट्या म्हणतात.

वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ


१】"खसखस पिकणे" या वाक्यप्रचाराचा अर्थ काय ?
     ~मोठ्याने हसणे .

२】"गंगेत घोडे न्हाने "या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?
     ~ योजलेले काम कसेबसे पार पाडणे .

३】"थुंकी झेलणे "या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?
     ~भलती खुशामत करणे.

४】" विडा उचलणे "या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?
     ~ प्रतिज्ञा करणे .

५】"रक्ताचे पाणी करणे "या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?
    ~ खूप कष्ट करणे .

६】"वाटाण्याच्या अक्षता लावणे "या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?
    ~ स्पष्ट शब्दात नकार देणे .

७】"अत्तराचे दिवे जाळणे "या वाक्यप्रचाराचा अर्थ काय ?
    ~भरपूर उधळपट्टी करणे.

८】" असतील शिते तर जमतील भुते" या म्हणीचा अर्थ काय?
    ~ आपल्या जवळ पैसे असल्यास आपल्याभोवती             खुशामतकऱ्यांची गर्दी जमते.

९】"काखेत कळसा आणि गावाला वळसा" या म्हणीचा अर्थ काय ?
   ~ वस्तू जवळ असूनही सर्वत्र शोधणे.

१०】" कुत्र्याची शेपूट नळीत घातली तरी वाकडी" या चा अर्थ काय ?
   ~एखाद्या व्यक्तीचा मूळ स्वभाव कोणत्याही प्रयत्नाने बदलू शकत नाही.

११】" गाढवाला गुळाची चव काय" याचा अर्थ काय?
    ~ मूर्ख माणूस आज चांगल्या गुणांची पारख नसते.

१२】" चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे" या म्हणीचा अर्थ काय?
   ~ प्रत्येकाला आयुष्यात गाजवण्याची संधी कधीतरी संधी चालून येते .

१३】"वरातीमागून घोडे "या म्हणीचा अर्थ काय?
   ~ वेळ निघून गेल्यावर कृती करणे.

१४】" पी हळद अन हो गोरी "चा अर्थ काय?
     ~एखाद्या गोष्टीपासून त्वरित लाभ मिळण्याची अपेक्षा.

१५】" डोंगर पोखरून उंदीर काढणे" या म्हणीचा अर्थ काय?
   ~ अफाट कष्ट नंतर शिल्लक लाभ पदरी पडणे.

१६】" ताकापुरती आजी" या म्हणीचा अर्थ काय ?
  ~आपले काम होईपर्यंत एखाद्याचे गुणगान करणे.

महराष्ट्रातील महत्त्वाच्या संताची समाधीस्थाने

1) गाडगे महाराज - अमरावती

2) समर्थ रामदास- सज्जनगड

3) संत एकनाथ - पैठण

4) गजानन महाराज - शेगाव

5) संत ज्ञानेश्वर - आळंदी

6) संत गोरोबा कुंभार - ढोकी

7) संत चोखा मेळा - पंढरपूर

8) मचिन्द्रनाथ - सप्तशृंगी

9) संत तुकडोजी  - मोझरी

10) संत तुकाराम - देहू

11) साईबाबा - शिर्डी

12) जनार्दन स्वामी - कोपरगाव

13) निवृत्तीनाथ - त्र्यंबककेश्वर

14) दामाजी पंत - मंगळवेढा

15) श्रीधरस्वामी - पंढरपूर

16) गुरुगोविंदसिंह - नांदेड

17) रामदासस्वामी - जांब

18) सोपानदेव - आपेगाव

19) गोविंदप्रभू - रिधपुर

20) जनाबाई - गंगाखेड

21) निवृत्तीनाथ - आपेगाव

22) नरसी - हिंगोली

गणित विषयातील महत्त्वाचे मुद्दे

समसंख्या :
ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो, त्या संख्येला सम संख्या म्हणतात.

विषमसंख्या :
ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जात नाही, त्या संख्येला विषमसंख्या म्हणतात.

विषम संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक येतात.

संख्यांचे प्राथमिक क्रियाविषयक नियम :

सम संख्या + सम संख्या = सम संख्या
सम संख्या + विषम संख्या = विषम संख्या
विषम संख्या – विषम संख्या = सम संख्या
सम संख्या x सम संख्या = सम संख्या
विषम संख्या x विषम संख्या = विषम संख्या
सम संख्या – सम संख्या = सम संख्या
सम संख्या – विषम संख्या = विषम संख्या
विषम संख्या + विषम संख्या = सम संख्या
सम संख्या x विषम संख्या = सम संख्या

मूळ संख्या :

ज्या संख्येस फक्त त्याच संख्येने किंवा 1 नेच पूर्ण भाग जातो, त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात.

उदा. 2, 3, 5, 7, 11, 13 इत्यादी.

(फक्त 2 ही समसंख्या मूळसंख्या आहे. बाकी सर्व मूळसंख्या ह्या विषम संख्या आहेत) 1 ते 100 संख्यांचा दरम्यान एकूण 25 मूळ संख्या आहेत, त्या खाली दिल्या आहेत.

नैसर्गिक संख्यामूळसंख्या
1 ते 10 2,3,5,7
11 ते 20 11,13,17,19
21 ते 30 23,29
31  ते 40 31,37
41 ते 50 41,43,47
51 ते 60 53,59
61 ते 70 61,67 
71 ते 80 71,73,79 
81 ते 90 83,89 
91 ते 100 97

जोडमुळ संख्या :

ज्या दोन मूळ संख्यात केवळ 2 च फरक असतो  त्यास जोडमुळ संख्या म्हणतात, अशा 1 ते 100 मध्ये एकूण आठ जोडमुळ संख्यांच्या जोडया आहेत.

उदा. 3-5, 5-7, 11-13, 17-19, 29-31, 41-43, 59-61, 71-73.

संयुक्त संख्या :

मूळ संख्या नसलेल्या नैसर्गिक संख्यांना संयुक्त संख्या म्हणतात.उदा. 4,6,8,9,12 इ.

अंकांची स्थानिक किंमत :

संख्येतील कोणत्याही अंकाची स्थानिक किंमत काढताना त्या अंकापुढे जेवढे अंक असतील तेवढे शून्य त्या अंकापुढे देतात.
उदा. 45123 या संख्येतील 5 ची स्थानिक किंमत 5000, तर 2 ची स्थानिक किंमत 20 होय.

एक अंकी एकूण संख्या 9 आहेत. तर दोन अंकी 90, तीन अंकी 900 आणि चार अंकी एकूण संख्या 9000 आहेत.

लहानात लहान – एक अंकी संख्या 1 आहे, तर दोन अंकी संख्या 10, तीन अंकी संख्या 100 आहे. याप्रमाणे 0 वाढवीत जाणे.

मोठयात मोठी – एक अंकी संख्या 9, दोन अंकी संख्या 99, तीन अंकी संख्या 999 आहे. पुढे याचप्रमाणे 9 वाढवीत जाणे.

कोणत्याही संख्येला 0 ने गुणले असता उत्तर 0 येते.

0 ते 100 पर्यंतच्या संख्यांत –
i) 2 पासून 9 पर्यंतचे अंक प्रत्येकी 20 वेळा येतात.
ii) 1 हा अंक 21 वेळा येतो
iii) 0 हा अंक 11 वेळा येतो.

1 ते 100 पर्यंतच्या संख्यांत –
अ. 2 पासून 9 पर्यंतचे अंक असलेल्या एकूण संख्या प्रत्येकी 19 येतात.
ब. दोन अंकी संख्यात 1 ते 9 या अंकाच्या प्रत्येकी 18 संख्या असतात.

त्रिकोणी संख्या :

दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या म्हणतात.

उदा : 1,3,6,10,15,21,28,36,45,55,66,78,91, इत्यादी

त्रिकोणी संख्या = n x(n+1)/2 या सूत्रात n = नैसर्गिक संख्या (1,2,3,4____)

जगातील भौगोलिक उपनाव व त्यांची टोपण नावे

  भौगोलिक उपनाव  -  टोपणनाव

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

1) ऑड्रियाटिकची राणी - व्हेनिस (इटली)

2) उगवत्या सूर्याचा प्रदेश - जपान

3) काळे खंड - आफ्रिका

4) कांगारूची भूमी - ऑस्ट्रेलिया

5) गगनचुंबी इमारताचे शहर - न्यूयॉर्क

6) चीनचे अश्रू - व्हंग हो नदी

7) गोर्‍या माणसाचे कबरस्तान - गिनीचा किनारा

8) जगाचे छप्पर - पामिराचे पठार

9) दक्षिणेकडील इंग्लंड - न्यूझीलंड

10) नाईलची देणगी - इजिप्त

11) पवित्र भूमी - पॅलेस्टाईन

12) पाचुचे बेट - श्रीलंका

13) पूर्वेकडील ब्रिटन - जपान

14) भूमध्य सागराची किल्ली - जिब्राल्टर

15) मध्यरात्रीच्या सूर्याचा प्रदेश - नॉर्वे

16) गव्हाचे कोठार - युक्रेन
______________________________

भूगोल प्रश्नसंच

1) वालुकामय मातीमध्ये असणारी एकूण रंध्र पोकळी (छिद्रांनी व्यापलेली जागा) ही .........................
   1) चिकणमातीपेक्षा जास्त असते      2) चिकणमातीपेक्षा कमी असते
   3) चिकणमाती इतकीच असते      4) वरीलपैकी एकही नाही
उत्तर :- 2

2) व्हर्टीसोलला .......................... असे म्हणतात.
   1) ॲल्यूव्हीएम      2) चेस्टनट    3) रेगूर      4) लॅटोसॉल्स
उत्तर :- 3

3) युनायटेड स्टेटस्‍ डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर यांच्याप्रमाणे मातीमधील मध्यम वाळू कणांचा व्यास ...................... मी.मी. होय.
   1) 0.5 ते 0.25      2) 0.05 ते 0.002    3) 2.00 ते 1.00    4) 1.00 ते 0.50
उत्तर :- 1

4) खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत ?
   अ) सतलज गंगा खो-यांमध्ये सुपीक गाळाची मृदा आढळते.
   ब) दख्खनच्या पठारावर खोल, मध्यम व उथळ थराची सुपीक काळी मृदा आढळते.
   क) पश्चिम किनारपट्टीला आर्द्र हवामानात जांभी मृदा आढळते.
   ड) व्दीपकल्पीय पठारावर लोहाचा अंश असणारी लाल, तांबूस व पिवळसर मृदा आढळते.
   1) अ आणि ब विधाने बरोबर आहेत.    2) क विधान बरोबर आहे.
   3) अ आणि क विधाने बरोबर आहेत.    4) वरील सर्व विधाने बरोबर आहेत.
उत्तर :- 4

5) खाली नमूद केल्यापैकी कोणती मृदा धुपेची कारणे संपूर्णत: मानव निर्मिती आहेत ?
   अ) भूप्रदेशाचा सर्वसाधारण उतार      ब) मृदेचे स्वरूप
   क) जंगलतोड          ड) गवताळ कुरणांचा वाजवी पेक्षा जास्त वापर
   इ) भटकी शेती
   1) वरील सर्व    2) ब, क आणि ड    3) अ, क आणि ड    4) क, ड आणि इ
उत्तर :- 4

1) खाली काही निसर्ग पर्यटन प्रकार आणि त्यांची स्थाने यांच्या जोडया दिल्या आहेत त्यातील अयोग्य जोडी ओळखा.
   1) नदी परिक्रमा – कोलाड    2) आदिवासी निवास – कडूस
   3) भू – भौतिक पर्यटन – सावंतवाडी  4) स्क्युबा ड्रायव्हिंग – तारकर्ली
उत्तर :- 3

2) महाराष्ट्र सरकारने 2006 साली पर्यटन धोरण विकसित केले. खालीलपैकी कोणते विधान या पर्यटन धोरणाचा भाग नाही ?
   अ) करमणूक करामधून सुट        ब) किनारी नियंत्रण कायद्यातून सूट
   क) पाणी आणि विजेचे दर औद्योगिक गटानुसार    ड) मालमत्ता करातून आणि अकृषि करातून सूट
   इ) अविकसित प्रदेशातून सूट
    योग्य पर्याय निवडा:
   1) अ, क आणि इ    2) ब आणि क    3) ब आणि ड    4) फक्त ब
उत्तर :- 4

3) राजीव गांधी खेळ अभियानाबाबत पुढील विधानांपैकी कोणते योग्य नाही ?
   अ) ती एक केंद्रीय पुरस्कृत योजना आहे.    ब) ती 2014 मध्ये सुरू करण्यात आली.
   क) तिने पंचायत युवा क्रिडा आणि खेळ अभियानाची जागा घेतली.
   ड) ‘युवकात खेळ आयुष्याचा एक मार्ग’ यास प्रोत्साहन देण्यास, खेळांच्या सुविधा सहज उपलब्ध करून देणे व खेळांच्या स्पर्धा
         भरविणे या बाबी सम्मीलित आहेत.
   इ) सर्वकष क्रीडा केंद्रे या योजनेत बांधली जातील.  फ) स्त्रीयांना स्वत:चे संरक्षण प्रशिक्षण यात सम्मीलित आहे.
   ग) विशेष वर्गासाठी खेळही आयोजित केले जातात असे की उत्तर – पूर्व क्षेत्र खेळ.
   1) इ      2) फ      3) ग      4) वरील तिन्हीपैकी एकही नाही
उत्तर :- 4

4) पुढील दोनपैकी कोणते विधान योग्य आहे ?
   अ) नेलोरी, बेलरी, गुरेजी, केशरी या भारतातील मेंढीच्या जाती आहेत.
   ब) भारतीय लोकर ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिकेच्या तुलनेत कमी प्रतीची समजली जाते व तिला जाडीभरडी कार्पेट लोकर
         म्हणतात.
   1) केवळ अ      2) केवळ ब      3) दोन्ही      4) एकही नाही
उत्तर :- 2

5) मलेरिया हा भारत तसेच महाराष्ट्रामध्ये प्रसार पावलेला रोग आहे. मलेरिया बाबत कोणते विधान असत्य आहे ?
   अ) मुंबई ही मलेरियाची राज्यातील राजधानी आहे.
   ब) गडचिरोली जिल्हा हा महाराष्ट्रातील दुस-या क्रमांकाचा मलेरिया ग्रस्त जिल्हा आहे.
   क) महाराष्ट्र हे देशात आठव्या क्रमांकाचे मलेरियाग्रस्त राज्य आहे.
   ड) ओरिसा हे भारतातील सर्वाधिक मलेरियाग्रस्त राज्य आहे.
   1) फक्त अ      2) अ, ब आणि ड      3) अ, ब आणि क    4) फक्त क
उत्तर :- 4

1) महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अजिंठा – वेरूळ लेणी आहेत ?
   1) पुणे      2) अहमदनगर   
   3) औरंगाबाद    4) लातूर
उत्तर :- 3

2) महाराष्ट्र राज्याची प्रशासकीय विभागात विभागणी झाली आहे.
   1) 6      2) 4     
   3) 7      4) 9
उत्तर :- 1

3) पर्जन्यछायेच्या प्रदेशामध्ये ......................... चे स्थान आहे.
   1) महाड    2) वाई     
   3) महाबळेश्वर    4) नाशिक
उत्तर :- 2

4) खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वत रांगेत आढळते ?
   1) लोणावळा    2) चिखलदरा   
   3) महाबळेश्वर    4) माथेरान
उत्तर :- 2

5) खालीलपैकी कुठल्या जिल्ह्याचा चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये समावेश होत नाही ?
   1) सांगली    2) सातारा   
   3) रायगड    4) रत्नागिरी
उत्तर :- 3