03 April 2022

लॉर्ड कर्झन (1899 - 1905).

●लाॅर्ड कर्झन म्हणजे भारतातील सर्वात वादग्रस्त व्हाइसराॅय....

●1899 मध्ये भारतासाठी चांदी ऐवजी सुवर्ण परिमाण लाॅर्ड कर्झन याने अवलंबिले.

●1901 मध्ये काश्मिर व पंजाब यांचा काही भाग मिळुन वायव्य सरहद्द प्रांत निर्माण केला.

●1901 मध्ये भारतीय राजपुत्रांना उच्च शिक्षण देण्यासाठी लाॅर्ड कर्झन याने Imperial Cadet Core  ची स्थापना केली.

●23 जानेवारी 1901 रोजी महाराणी व्हिक्टोरीया हिचे निधन झाले. पुढे 1921 मध्ये महाराणी व्हिक्टोरिया हिच्या स्मरणार्थ कलकत्ता येथे व्हिक्टोरिया हॉल बांधण्यात आला.

●1902 मध्ये सर थॉमस रॅले यांच्या अध्यक्षतेखाली 'युनिव्हर्सिटी कमिशन' नेमण्यात आले.

●1902 मध्ये सर अँन्ड फ्रेजर यांच्या अध्यक्षतेखाली पोलिस खात्याची समिती नेमण्यात आली. यानुसारच criminal investigation bureau ची सुरुवात झाली.

●1902 रोजी कर्झनने दुष्काळ निवारणासाठी 'मॅकडोनाल्ड दुष्काळ आयोग' स्थापन केला.

●1903 मध्ये लाॅर्ड कर्झन याने दिल्ली येथे भव्य दरबार भरवुन राणीच्या वारसाला भारत सम्राट घोषित केले.

●1903 मध्ये सर ॲन्ड्र्यु फ्रेजर यांनी बंगालच्या फाळणीची योजना तयार केली.

●1904 मध्ये पहिला सहकारी कायदा पारित करण्यात आला.

●1904 मध्ये प्राचीन स्मारक संरक्षण कायदा पारीत केला.

●लाॅर्ड कर्झन याने व्यापार व उद्योगधंदे खाते निर्माण केले.

●1901 मध्ये बंगालमध्ये पुसा येथे कृषी संशोधन संस्थेची स्थापना लाॅर्ड कर्झन यांनी केली.

●लाॅर्ड कर्झनच्या काळात DSP व Dysp यांची थेट नेमणूक सुरु झाली.

●ब्रिटीश शासनासोबत झालेल्या मतभेदांमुळे (कर्झन - किचनर विवाद) कर्झन 1905 मध्ये मायदेशी परतला.

●कर्झन याने रेल्वे कारभाराच्या चौकशी साठी सर रॉबर्टसन यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली.

● भारतात रेल्वेचे विस्तृत जाळे पसरविण्याचे श्रेय कर्झन कडे जाते.

●लाॅर्ड कर्झन याने टाटा इंस्टिट्युट ऑफ सायन्स, बेंगलोर येथील संशोधन कार्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या संस्थेला देणगी दिली.

●19 आॅगस्ट 1905 रोजी केसरी वृत्तपत्रामध्ये लिहिलेल्या आपल्या लेखात लोकमान्य टिळकांनी कर्झनची कारकीर्द औरंगजेबाची प्रतिकृती होती असे म्हटले होते.

●लोकमान्य टिळक आणि नामदार गोखले यांनी लाॅर्ड कर्झन याची तुलना औरंगाजेबाशी केली.

●कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर लिखित  'किचकवध' नाटकात किचक ची तुलना कर्झन सोबत केली गेली.

●कर्झनची कारकीर्द आपल्या दुष्कृत्यामुळे खुप गाजली. लंडन मध्ये मदनलाल धिंग्रा याने कर्झनला मारण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.

● 'व्हाइसराॅय पदाचा राजीनामा  दिल्यानंतर कलकत्त्याचा महापौर होण्यास मला आवडेल' असे कर्झन म्हणत.

1857 पूर्वीचे उठाव

1. रामोशांचा उठाव

०१. सासवडच्या सत्तू नाईकच्या नेतृत्वाखाली सर्वप्रथम रामोशी समाज एकत्रित आला. सत्तू नाईक, साताऱ्याचा चित्तूरसिंग नाईक व पुरंदरचा उमाजी नाईक हे रामोशांचे प्रमुख नेते होते. पुण्याच्या आग्नेय भागात रामोशांची जास्त दहशत होती.

०२. सत्तू नाईकच्या नेतृत्वाखाली उमाजी नाईक व त्याचा भाऊ अमृता नाईक यांनी पुण्याजवळ भांबूर्ड्याचा लष्करी खजिना १९२४-२५ साली लुटला. पुण्यातून रामोशांच्या हकालपट्टीसाठी ब्रिटिशांनी जवाहरसिंग रामोशी यास सासवडचा अंमलदार बनविले. पण उमाजी व सत्तू नाईकाने जवाहरसिंग व त्याच्या मुलाच्या मुसक्या आवळल्याने त्याने इंग्रजांची नोकरी सोडून दिली.

०३. सत्तू नाईकनंतर रामोशांचे नेतृत्व उमाजी नाईककडे आले. भूजाजी, येसाजी, कृष्णाजी व अमृता हे उमाजीचे विश्वासू साथीदार होते. उमाजी स्वतःला राजे म्हणवून घेत असे. पुण्यातील पुरंदर तालुक्यातील भिवरी या गावी १७९१ साली उमाजीचा जन्म झाला होता.

०४. ब्रिटीश काळात रामोशांची संख्या १८००० होती. दरम्यानच्या काळात उमाजीने एका यात्रेत तलवारीने कोतवालाचे तुकडे करून पोलिसांत दहशत पसरविली. उमाजीला पकडण्यासाठी ब्रिटिशांनी १८२६ साली पहिला जाहीरनामा काढला. यानुसार उमाजी व त्याचा साथीदार पांडुजी यांना पकडून देणाऱ्यास १०० रु. इनाम जाहीर केले. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही.

०५. सरकारने पुन्हा जाहीरनामा काढून इनामाची रक्कम १२०० रु केली. आणि जाहीरनाम्यात असे म्हटले कि, सरकारला मदत नाही केलीत तर बंडवाल्यात सामील झालात असे समजण्यात येईल. यावेळी उमाजीस पकडून देण्याचा विडा उचलणाऱ्या शिवनाक महारास रामोशांनी ठार केले.

०६. त्यावेळी उमाजीचा धाक पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, जेजुरी, सासवड व मराठवाड्याच्या काही भागात होता. यावेळी पुण्याचा कलेक्टर एच.डी. रॉबर्टसन याने वेळोवेळी जाहीरनामा काढून उमाजीला पकडण्याचे ठरविले. कोणीच गद्दारी न केल्यामुळे त्यांच्या हाती काहीच आले नाही.

०७. रॉबर्टसनने दरम्यान कोकणावर वचक बसविण्यासाठी बंडखोरांची माहिती देणाऱ्यासाठी खास बक्षीस जाहीर केले. या काळात उमाजीने ठाणे व रत्नागिरी जिल्ह्यातील लोकांनी ब्रिटीशांकडे महसूल न भरता उमाजींकडे द्यावा असे जाहीर केले. याच्या परिणामस्वरूप भोर संस्थानातील १३ गावांनी उमाजीकडे महसूल भरला.

०८. शेवटी ब्रिटिशांनी उमाजीची बायको, दोन मुले व एक मुलगी यांना अटक केली. त्यामुळे कुटुंबाखातर उमाजी ब्रिटिशांना शरण आला. ब्रिटिशांनी त्याचे सर्व गुन्हे माफ करून त्याला सरकारी नोकरी दिली. पुणे व सातारा जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्याचे काम उमाजीकडे देण्यात आले. पण पुढे नंतर १३ गावांच्या महसुलावरून उमाजी व ब्रिटीश यांच्यात वाद सुरु झाला.

०९. १८३१ साली ब्रिटिशांनी जाहीरनामा प्रसिद्ध करून उमाजीला पकडण्याची जबाबदारी कॅप्टन अलेक्झांडर व कॅप्टन मैकिन्तोश यांच्याकडे सोपविली.उमाजी, येसाजी, मुंजाजी व कृष्णाजी यांना पकडून देणाऱ्यास ५००० रुपये व २ बिघा जमीन बक्षीस देण्याचे जाहीर केले. त्यापैकी एकट्या उमाजीस पकडून देणाऱ्यास २५०० रुपये व १ बिघा जमीन जाहीर करण्यात आली.

१०. बक्षिसाच्या आमिषाला बळी पडून एकेकाळचे त्याचे जवळचे साथीदार काळू रामोशी व नाना रामोशी यांनी गद्दारी केली. उमाजीचा जुना शत्रू बापूसिंग यानेही त्यांना मदत केली. १५ डिसेंबर १८३१ रोजी कॅप्टन मैकिन्तोशने पुण्याच्या मुळशी तालुक्यातील अवळस येथे उमाजीला अटक केली. ३ फेब्रुवारी १८३२ रोजी उमाजीला फाशी देण्यात आली.

११. उमाजी नाईकनंतर रामोशांनी दौलतराव नाईक याच्या नेतृत्वाखाली लढा सुरु ठेवला. सह्याद्रीच्या खोऱ्यात येसूबाईच्या डोंगरात दौलतराव नाईक व मेजर डैनियल यांच्यात चकमक झाली त्यात नाईक व त्याचे सहकारी मारले गेले. मारताना नाईकांनी फडकेंना विनंती केली कि, रामवंशी (रामोशी) पुढे स्वार्थासाठी दरोडे घालणार नाहीत याची दक्षता घ्या.

१२. त्यानंतर नाशिक व अहमदनगर भागात राघू भांगरे याने ब्रिटिशाविरुद्ध लढा दिला. २० सप्टेंबर १८४४ रोजी राघू भांगरेनी एका पोलिस अधिकाऱ्यासह ७ पोलिसांना ठार केले. ब्रिटिशांना सहाय्य करणाऱ्या पाटलांची नाके त्याने कापली. त्याच्या बंदोबस्तासाठी ब्रिटिशांनी ५००० रुपयाचे बक्षीस जाहीर केले. त्याला पकडण्याची जबादारी पाटील व कुलकर्ण्यावर सोपविली.

2. कोळ्यांचा उठाव

०१. १८२८, १८३९, १८४४ ते १८४८ या दरम्यान महाराष्ट्रात कोळ्यांनी तीन टप्प्यात उठाव केला. रामजी भांगडिया, रघु भांगडिया, बापू भांगडिया, चिमणाजी जाधव व नाना दरबारे यांनी या उठावाचे नेतृत्व केले.

०२. १८२४ साली मुंबई भागात कोळ्यांनी नेटिव्ह इन्फ्रंटीकडून उठाव केला. ब्रिटिशांनी तो उठाव मोडून काढला. म्हणून १८२८ साली मुंबई पोलिसातील कोळी अधिकारी रामजी भांगडिया यांनी नोकरीचा राजीनामा देऊन त्या भागात कोळ्यांचे नेतृव केले. त्यांनी मुंबई भागात दोन वर्षे ब्रिटीशांशी लढा दिला. हा उठाव दडपून टाकण्यासाठी कॅप्टन अलेक्झांडर व कॅप्टन मैकिन्तोश आले व त्यांनी हा उठाव मोडून काढला.

०३. १८३९ साली कोळ्यांनी पुण्यात अचानक उठावास सुरुवात केली. त्यावेळी आता संपूर्ण राज्य कोळ्यांच्या ताब्यात आहे अशी घोषणा दिली. कोळ्यांनी दुसऱ्या बाजीरावास पेशवेपद देऊन मराठी राज्याची पुनर्स्थापना केली.

०४. यावेळी घोडनदी जवळील सरकारी खजिन्याला १५० कोळ्यांनी वेढा घातला. त्यावेळी पुण्याचा आसिस्टंट कलेक्टर रोज याने कोळ्यांच्या बंदोबस्तासाठी पुण्याहून सैन्य मागविले. यावेळी ५४ कोळ्यांवर खटले भरून २८ जणांना कमीअधिक प्रमाणात शिक्षा दिली व दोघांना फाशी देण्यात आली.

०५. १८४४ साली कोळ्यांनी शस्त्रास्त्रे व माणसे जमवून रघु भांगडिया व बापू भांगडिया यांच्या नेतृत्वाखाली पुणे, नाशिक, सातारा. नगर व पुरंदर याभागात परत उठाव केला.

०६. नाणे घाट व माळशेज घाट ताब्यात घेऊन कोळ्यांनी कोकणचा मार्ग अडविला. इंग्रज अधिकारी कॅप्टन जेलने या उठावाचा बंदोबस्त केला. १८४५ मध्ये ब्रिटिशांनी बापू भांगडियाला पकडले. १८५० पर्यंत ब्रिटिशांनी महाराष्ट्रातील कोळ्यांचा कायमचा बंदोबस्त केला.

 

3. भिल्लांचे उठाव

०१. १८१८ मध्ये ब्रिटिशांनी खानदेश ताब्यात घेतला. भिल्लांची वस्ती विशेषतः याच भागात असल्याने भिल्लांच्या मनात इंग्रजाबद्द्ल द्वेष निर्माण झाला. त्यामुळे त्यांनी इंग्रजांविरुद्ध उठाव केला. त्रिंबकजी डेंगळे, भिल्ल नाईक, दसरत व धानजी, हरिया (हिरा), निहाल, सेवाराम सोनार (घिसाडी), भागोजी नाईक, खर्जासिंग, भीमा नाईक, उचेतसिंग पवार यांनी या उठावाचे नेतृत्व केले.

०२. त्रिंबकजी ढेंगळे हा दुसऱ्या बाजीरावचा मित्र व मराठा सरदार होता. दुसऱ्या बाजीरावच्या पराभवानंतर डेंगळेला ठाण्याच्या तुरुंगात ठेवण्यात आले. तेथून तो पळाला व त्याने भिल्लांना इंग्रजांविरुद्ध बंड करण्यास चिथविले. त्याने उठावाची सूत्रे त्याचे पुतणे गोदाजी व महिपा डेंगळे यांच्यावर सोपविली. तत्कालीन कलेक्टर कॅप्टन ब्रिग्जने उठावाचा बंदोबस्त करण्यासाठी भिल्लांचे मुडदे पाडले व डोंगरातील वाटघाटांवर सैन्य ठेऊन त्यांची रसद बंद केली.

०३. पण याउलट मुंबईचा गवर्नर माउंट एल्फिन्सटन याने मात्र भिल्लांना पेन्शन व काम देऊन त्यांचा बंदोबस्त केला.त्यांची वेगळी तुकडी उभारून आडमाळावर त्यांना तैनात केले. नादीरसिंह या भिल्ल डाकुस त्याच्या सहकाऱ्यांच्या मदतीनेच पकडण्यात आले.

०४. नोकऱ्या देऊनही भिल्ल थंड झाले नाहीत. त्यांनी उठाव सुरूच ठेवला. इंग्रजांनी भिल्लांच्या बंदोबस्तासाठी त्यांना माफी देण्याची घोषणा केली. यावेळी भिल्लाचे नेतृत्व सातमाळ्याचा भिल्ल नाईक करत होता. कॅप्टन ब्रिग्ज ने भिल्ल नाईकास पकडून त्याला फाशी दिली यासोबत शेख सादुल्ला यास कठोर शिक्षा केली.

०५. डसरत व धानजी हे लासूरच्या भिल्लांचे प्रमुख होते. त्यांनी १८२० मध्ये विशेषतः सातपुडा प्रदेशात गावे व घरे बेचिराख करण्याचे सत्र चालविले. त्यांच्या टोळीत शेख दुल्ला हा पेंढारी सामील झाला. मेजर मोरीन याने १०० मैलांवरील महत्वाच्या जागा जिंकल्याने दक्षिण भिल्लांच्या प्रमुखाना शरणागती पत्करावी लागली.

०६. १८२२ मध्ये सातमाळ्याचा हरिया व सातपुड्याचा निहाल भिल्ल यांनी भिल्लांच्या उठावाचे नेतृत्व केले. यांच्या काळात अंदाधुंदी, बलात्कार व शोषणास मर्यादा राहिल्या नाहीत. यावेळी कॅप्टन रॉबिन्सन याने भिल्लांना यशस्वीरित्या दडपले.

०७. १८२५ मध्ये सेवाराम सोनारच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी उठाव केला. यावेळी राजकीय नेत्यांनीसुद्धा याला पाठींबा दिला. सेवारामने साताराच्या राजाच्या नावाने बनावट पत्रे तयार केली व ती राजाच्या आदेशानुसार बागलान तालुक्यातील भिल्लांना वाटली. ही पत्रे भिल्लांनी उठाव करण्यासंदर्भातील होती.

०८. त्यानुसार भिल्लांनी लुटालूट केली. त्यांनी उतारपूरवर हल्ला केला व तेथील लुट मुरली महाल या किल्ल्यात ठेवली. लेफ्टनंट औट्रम याने यातील काही लुट परत मिळविली व सेवाराम व त्याच्या सहकाऱ्यांना पकडले. सेवारामबाबत औट्रम ने मवाळ भूमिका घेतली व भिल्लांच्या जमिनी परत दिल्या.

०९. १८२८ पर्यंत भिल्लांचे उठाव कमी झाले पण संपले नव्हते. पानिपतच्या लढाईत मरण पावलेल्या पवारांचा पणतू उचेतसिंग पवार याने धारच्या पवारांकडून गादी मिळविण्यासाठी भिल्लांना सोबत घेऊन दोन वेळा हल्ला केला होता. दोन्ही वेळेस तो पराभूत झाला.

१०. मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्यात भिल्ल लोकांनी कोनारराव याच्या नेतृत्वाखाली इंग्रजांविरुद्ध बंड केले. पण सुसूत्रता नसल्याने इंग्रजांना बंड दडपून टाकणे सोपे ठरले.

११. काजरसिंग नाईक याने १८७५ च्या वेळी खानदेशात ब्रिटीशांविरुद्ध भिल्लाच्या उठावात नेतृत्व केले. तो पूर्वी ब्रिटीशांच्या पोलिस दलात होता. त्याने ब्रिटीशांचा ७ लाखाचा खजिना लुटला. १८५७ च्या अंबापाणी लढाईत भिल्लची ब्रिटीशांशी लढाई झाली. यात स्रियांचाही सहभाग होता.

4. गौंड जमातीतील उठाव

०१. १८१७-१८ च्या काळात नागपूरचे राजे अप्पासाहेब भोसले यांनी गौंड या आदिवासी जमातीच्या प्रमुखांच्या मदतीने इंग्रजांविरुद्ध उठाव केला. बेतूर येथे इंग्रजी फौजेचा त्यांनी पराभव केला. भोसलेंनी रणजीतसिंहासह अनेक हिंदी संस्थानिकांचे मन वळवून इंग्रंजांच्या विरुद्ध उठाव करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश आले नाही. शेवटी त्यांना इंग्रजांकडून पराभव पत्करावा लागला. १८४० मध्ये भोसलेंचा जोधपुर येथे मृत्यू झाला..

5. हटकरांचा उठाव

०१. मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यात हंसाजी नाईक हटकर यांचे छोटेसे राज्य होते. नोव्हाचा किल्ला हंसाजीचा प्रमुख आधार होता. त्यावेळी मराठवाडा हा इंग्रजांचा मांडलिक निजामच्या ताब्यात होता. हंसाजीने १८१९-२० मध्ये निजाम व इंग्रजांच्या विरुद्ध उठाव केला.

०२. मेजर पिटसन, कॅप्टन इव्हान्स डेविड, कॅप्टन मैडोज टेलर यांनी ४००० सैनिकांसह हंसाजीवर हल्ला केला. इंग्रजांनी नोव्हा किल्ल्यावर तोफा डागून तो किल्ला ताब्यात घेतला. तेव्हा हंसाजीने उमरखेड येथून इंग्रजांशी लढा दिला. इंग्रजांनी हंसाजी हटकर याचा पराभव केला व त्याचे राज्य ताब्यात घेतले.

6. धर्माजी प्रतापरावाचा उठाव

०१. बीड येथे धर्माजी प्रतापराव याने १८१८ मध्ये निजामाला विरोध केला. हा उठाव मोडण्यासाठी निजाम सरकारने ११ जुलै १८१८ रोजी नवाब मुर्तुजा यारजंग याला लेफ्टनंट जेम्स सदरलैंड याच्या नेतृत्वाखाली रवाना केले. ३० जुलै १८१८ रोजी सदरलैंडने धर्माजी लपून बसलेल्या दिवे गावातील किल्ल्याला वेढा घातला. त्यामुळे धर्माजी व त्याचा भाऊ कंपनीच्या हाती आले.

7. कोल्हापूरच्या गडकरींचा उठाव

०१. १ ऑक्टोबर १८१२च्या तहाने कोल्हापूर कंपनीचे मांडलिक झाले होते. १८२१ साली गादीवर बसलेले शहाजी बाबासाहेब इंग्रजद्वेष्टे होते. त्यांना राणी जिजाबाईपासून चौथा शिवाजी व राणी दिवणाबाईपासून चिमासाहेब अशी दोन अपत्ये होती.

०२. १८३८ मध्ये राजे शहाजीचा मृत्यू झाला. त्यांची दोन्ही मुले अल्पवयीन असल्याने राण्यांनी राज्यकारभार पाहिला. पण त्यांचे आपापसांत पटत नसल्याने इंग्रजांनी मध्ये हस्तक्षेप केला. इंग्रज सरकारने राज्यकारभार सुधारण्यासाठी दाजीकृष्ण पंडित यास दिवाण नेमले. हे धाकट्या राणीस व त्यांच्या समर्थकांस आवडले नाही.

०३. दाजी पंडितने शेतसारा वसूल करण्यासाठी मामलेदाराची नेमणूक केली. मामलेदार हे गडकरीपेक्षा कनिष्ट असल्याने गडकरींनी त्याकडे शेतसारा भरण्यास नकार दिला. सामानगडावर वसुलीसाठी आलेल्या मामलेदारांच्या माणसांना गाडकऱ्यांनी मारले. त्यामुळे दाजी पंडितने बेळगावहून सैन्य मागविले.

०४. कॅप्टन औट्रमच्या नेतृत्वाखालील १२०० सैनिकांनी सामानगडावर हल्ला केला व गडकऱ्यांचा पराभव केला. ऑक्टोबर १८४४ मध्ये बंडवाल्यांनी प्रतीसरकारची स्थापना केली व दाजी पंडितास पकडून कोल्हापूरचा ताबा घेतला. त्यासोबतच सामानगडही ताब्यात घेतला. पण गडकऱ्यांना पुढे कोल्हापूरहून मदत न मिळाल्यामुळे गडकरी शरण आले






 

महिलां विषयक कायदे

1. सतीबंदी कायदा -1829

2. विधवा पुनर्विवाह कायदा -1856

3. धर्मांतरीत व्यक्ती विवाह विच्छेद कायदा -1866

4.भारतीय घटस्फोट कायदा -1869

5. मानवी हक्क संरक्षण कायदा -1993

6. आनंदी विवाह कायदा -1909

7. मुस्लिम स्त्री घटस्फोट हक्क संरक्षण कायदा -1986

8. विशेष विवाह -1954

9. हिंदू दत्तक व निर्वाह कायदा -1956

10. विवाहित स्त्रियांचा संपत्तीचा कायदा -1959

11.अनैतिक ध्येय व्यापार प्रतिबंधक कायदा-1956

12. वैद्यकी व गर्भपात कायदा -1929

13. हुंडाप्रतिबंधक कायदा -1929

14. बालविवाह निर्बंध कायदा -1929

15. कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा -2005

16. महाराष्ट्र देवदासी प्रतिबंधक व निर्मूलन कायदा -2005

17. मातृत्व लाभासंबंधीचा कायदा -1961

18. समान वेतन कायदा -1976

19. बालकामगार कायदा -1980

20. अपंग व्यक्ती कायदा -1995

21. मानसिक आरोग्य कायदा -1987

22. कुटुंब न्यायालय कायदा - 1984

23. राष्ट्रीय महिला आयोग कायदा -1990

24. माहिती अधिकार कायदा -2005

25. बालन्याय कायदा - 2000

26. भिक्षा प्रतिबंधक कायदा -1959

27. अनाथालय व धर्मादाय कायदा - 1960

28. हिंदू विवाह कायदा -1955

29. कर्मचारी विमा योजना -1952

30. प्रसूती सुधारणा कायदा -1961

31. अंतरराज्यीय प्रवासी कामगार कायदा - 1979

32. वेश्या वृत्ती निवारण कायदा -1986

33. हुंडा निषेध कायदा - 1986


महत्वाचे प्रश्नसंच

🍁CURRENT AFFAIRS🍁

1. उड़ीसा के मुख्यमंत्री नवीन पटनायक ने सुंदरगढ़ जिले में 300 करोड़ रुपये की लागत वाले किस सिंचाई बांध परियोजना का हाल ही में उद्घाटन किया?
a.    हारून विशेष
b.    रुकुरा मध्यम
c.    जलविजय तीव्र
d.    अरुणोदय मध्यम

2. किस देश की महिलाओं की कंपाउंड तीरंदाजी टीम ने टीम श्रेणी में विश्व नंबर एक का स्थान प्राप्त कर इतिहास रच दिया है?
a.    चीन
b.    बांग्लादेश
c.    भारत
d.    श्रीलंका

3. फॉर्च्यून की 40 युवा प्रभावशाली लोगों की सूची में भारतीय मूल के कितने लोग शामिल हैं?
a.    04
b.    18
c.    25
d.    32

4. हाल ही में किस महिला क्रिकेटर ने 18 गेंदों में 50 रन बनाकर सबसे दूसरा सबसे तेज़ अर्धशतक लगाने का रिकॉर्ड बनाया?
a.    एलिस पेरी
b.    मिताली राज
c.    लिन्सी स्मिथ
d.    स्मृति मंधाना

5. किस देश ने भारत को सामरिक व्यापार प्राधिकरण-1 (एसटीए-1) देश का दर्जा देकर उसके लिए हाई-टेक प्रॉडक्ट्स की बिक्री के लिए निर्यात नियंत्रण में छूट प्रदान की?
a.    चीन
b.    इज़राइल
c.    रूस
d.    अमेरिका

6. आईसीसी ने हाल ही में किस क्रिकेट बोर्ड को खिलाड़ियों और स्टाफ के लोगों के बकाए का भुगतान करने के लिए फंड जारी किया है?
a. भारतीय क्रिकेट बोर्ड
b. ज़िम्बाब्वे क्रिकेट बोर्ड
c. श्रीलंका क्रिकेट बोर्ड
d. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड

7. कॉमनवेल्थ गेम्स की जैवलिन थ्रो (भाला फेंक) स्पर्धा का स्वर्ण जीतने वाले पहले भारतीय नीरज चोपड़ा ने फिनलैंड में आयोजित सावो गेम्स में 29 जुलाई 2018 को कौन सा पदक जीत लिया है?
a. स्वर्ण पदक
b. रजत पदक
c. कांस्य पदक
d. इनमें से कोई नहीं

   
8. अमेरिकी अंतरिक्ष एजेंसी नासा ने हाल ही में अपनी स्थापना के कितने वर्ष पूरे होने पर लोगो जारी किया है?
a. 40 वर्ष
b. 50 वर्ष
c. 60 वर्ष
d. 90 वर्ष

9. निम्न में से किस कंपनी ने टाटा कंसल्टेंसी सर्विसेज़ (टीसीएस) को पछाड़कर देश की सबसे मूल्यवान कंपनी बन गई?
a. रिलायंस इंडस्ट्रीज़ लिमिटेड
b. एचडीएफसी बैंक
c. हिंदुस्तान यूनिलीवर
d. आईटीसी

10. केंद्र सरकार ने चीन और किस देश से सोलर सेल के आयात पर 25% संरक्षण शुल्क लगाया है?
a. नेपाल
b. मलेशिया
c. जापान
d. इराक

11. विश्व मौसम विज्ञान संगठन ने एशियाई देशों के लिए फ़्लैश फ्लड चेतावनी प्रणाली विकसित करने का कार्य किस देश को सौंपता है?
a. भारत
b. नेपाल
c. चीन
d. जापान

12. हाल ही में किस राज्य सरकार ने सूखा प्रभावित इलाकों में पेयजल परियोजनाओं को पूरा करने के लिए 7,000 करोड़ रुपये से अधिक की राशि मंजूर की है?
a. बिहार सरकार
b. महाराष्ट्र सरकार
c. पंजाब सरकार
d. उत्तर प्रदेश सरकार

13. हाल ही में किस राज्य में ‘ऑनलाइन आवर सेवा का’ पोर्टल लांच किया गया है?
a.    बिहार
b.    उत्तर प्रदेश
c.    हरियाणा
d.    छत्तीसगढ़

14. केन्द्रीय मंत्रिमंडल ने हाल ही में किस भर्ती बोर्ड के पुनर्गठन को मंजूरी दी?
a.    शिक्षक भर्ती बोर्ड
b.    कृषि वैज्ञानिक भर्ती बोर्ड
c.    सेना भर्ती बोर्ड
d.    न्यायाधीश नियुक्ति बोर्ड

15. केन्द्रीय मंत्रिमंडल ने हाल ही में किस अधिनियम में संशोधन किये जाने के लिए मंजूरी प्रदान की?
a.    एससी/एसटी एक्ट
b.    धूम्रपान निषेध एक्ट
c.    कामकाजी महिला उत्पीड़न एक्ट
d.    अपराध रोकथाम एक्ट

Explain
👇👇👇👇👇👇👇👇

💁🏻‍♀ANSWER SHEET🍁

1.  b. रुकुरा मध्यम
विवरण: उड़ीसा के मुख्यमंत्री नवीन पटनायक ने सुंदरगढ़ जिले में 300 करोड़ रुपये की लागत वाले रुकुरा मध्यम सिंचाई बांध परियोजना का उद्घाटन किया.

2.  c. भारत
विवरण: भारत की महिलाओं की कंपाउंड तीरंदाजी टीम ने टीम श्रेणी में विश्व नंबर एक का स्थान प्राप्त कर इतिहास रच दिया है.

3.  a. 04
विवरण: फॉर्च्यून की 40 युवा प्रभावशाली लोगों की सूची में भारतीय मूल के 04 लोग शामिल हैं.

4.  d. स्मृति मंधाना
विवरण: भारतीय महिला क्रिकेट टीम की ओपनर स्मृति मंधाना ने 18 गेंद में अर्धशतक लगाया. उन्होंने इंग्लैंड में टी-20 'किया सुपर लीग' में यह उपलब्धि हासिल की.

5. d. अमेरिका
विवरण: अमेरिका ने भारत को सामरिक व्यापार प्राधिकरण-1 (एसटीए-1) देश का दर्जा देकर उसके लिए हाई-टेक प्रॉडक्ट्स की बिक्री के लिए निर्यात नियंत्रण में छूट प्रदान की.

6. b. ज़िम्बाब्वे क्रिकेट बोर्ड
विवरण: आईसीसी ने ज़िम्बाब्वे क्रिकेट बोर्ड को खिलाड़ियों और स्टाफ के लोगों के बकाए का भुगतान करने के लिए फंड जारी किया है. दरअसल, बोर्ड ने तय समय में भुगतान नहीं कर पाने के बाद आईसीसी से मदद मांगी थी.

7. a. स्वर्ण पदक
विवरण: कॉमनवेल्थ गेम्स की जैवलिन थ्रो (भाला फेंक) स्पर्धा का स्वर्ण जीतने वाले पहले भारतीय नीरज चोपड़ा (20) ने फिनलैंड में आयोजित सावो गेम्स में 29 जुलाई 2018 को स्वर्ण पदक जीत लिया.

8. c. 60 वर्ष
विवरण: नासा (नैशनल ऐरोनॉटिक्स ऐंड स्पेस ऐडमिनिस्ट्रेशन) की स्थापना भारत की आज़ादी के

करीब 11 वर्ष बाद 29 जुलाई, 1958 को हुई थी. नासा ने अपनी स्थापना के 60 वर्ष पूरे होने पर लोगो जारी किया है.

9. a. रिलायंस इंडस्ट्रीज़ लिमिटेड
विवरण: रिलायंस इंडस्ट्रीज़ लिमिटेड (आरआईएल) ने टाटा कंसल्टेंसी सर्विसेज़ (टीसीएस) को पछाड़कर देश की सबसे मूल्यवान कंपनी बन गई.

10. b. मलेशिया
विवरण: केंद्र सरकार ने चीन और मलेशिया से सोलर सेल के आयात पर 25% संरक्षण शुल्क लगाया है. इसका उद्देश्य घरेलु सोलर सेल निर्माता सेक्टर की सहायता करना है.

11. a. भारत
विवरण: विश्व मौसम विज्ञान संगठन ने एशियाई देशों के लिए फ़्लैश फ्लड चेतावनी प्रणाली विकसित करने का कार्य भारत को सौंपता है.

12. b. महाराष्ट्र सरकार
विवरण: महाराष्ट्र सरकार ने सूखा प्रभावित इलाकों में पेयजल परियोजनाओं को पूरा करने के लिए 7,000 करोड़ रुपये से अधिक की राशि मंजूर की है.

13. d. छत्तीसगढ़
विवरण: छत्तीसगढ़ में ‘ऑनलाइन आवर सेवा का’ पोर्टल लांच किया गया है.  इससे पेंशनभोगियों को ऑनलाइन पेंशन और भुगतान से संबंधित सभी जानकारियां उपलब्ध होंगी.

14. b. कृषि वैज्ञानिक भर्ती बोर्ड
विवरण: प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी की अध्यक्षता में केन्द्रीय मंत्रिमंडल ने कृ‍षि वैज्ञानिक भर्ती बोर्ड (एएसआरबी) के पुनर्गठन को मंजूरी प्रदान की. 

15. a. एससी/एसटी एक्ट
विवरण: केंद्रीय मंत्रिमंडल ने 01 अगस्त 2018 को अनुसूचित जाति एवं अनुसूचित जनजाति (अत्याचार निरोधक) अधिनियम में संशोधन को मंजूरी प्रदान की.