Wednesday 20 March 2024

धातू आणि अधातूंचे भौतिक गुणधर्म

(Physical Properties Of Metals & Non – Metals) :

▪️धातु

1) भौतिक अवस्था:
सामान्य तापमानाला धातु स्थायूरूप अवस्थेत आढळतात.
(अपवाद – पारा व गॅलियम)
उदा. ॲल्युमिनियम, लोह, तांबे, जस्त इ.

2) चकाकी (Lustre):
काही धातूंना चकाकी असते धातूंचा पृष्ठभाग गाजल्यानंतर घासल्यानंतर त्यावरून प्रकाशाचे परावर्तन होते धातू सहसा रुपेरी किंवा करड्या रंगाचे असतात ( अपवाद – सोने, तांबे.

उदा. प्लॅटिनम, सोने, चांदी इ.

3) द्रावणीयता (Solubility):
धातू द्रावकात सहसा विरघळत नाहीत.

4) काठिण्यता (Hardness):
बहुतेक धातू कठीण असतात.
(अपवाद – सोडिअम, पोटॅशिअम)

उदा. तांबे, लोह, ॲल्युमिनियम इ.

5) उष्णतामान (Conduction Of Heat):
धातु उष्णतेचे सुवाहक असतात. कारण धातूंमधील कणांची रचना खूप दाट असते.

उदा. चांदी, तांबे, ॲल्युमिनियम इ. (अपवाद – शिसे).


6) विद्युत वहन (Conduction Of Electricity):
धातु विजेचे सुवाहक असतात कारण धातूमध्ये मुक्त इलेक्ट्रॉन असतात. (अपवाद – शिसे)

उदा. चांदी, सोने, तांबे, ॲल्युमिनियम इ.

7) तन्यता (Ductility):
धातूंपासून तारा तयार करण्याच्या गुणधर्माला तन्यता असे म्हणतात.

उदा: सोने, चांदी, प्लॅटिनम, तांबे, टंगस्टन इत्यादी
एक ग्राम सोन्यापासून दोन किलोमीटर लांबीची तार बनते.


8) वर्धनीयता (Malleability):
धातूंपासून पत्रा तयार करण्याच्या गुणधर्माला वर्धनीयता असे म्हणतात.

उदा. सोने, चांदी, ॲल्युमिनियम इत्यादी

9) नादमयता (Sonorous):
कठीण पृष्ठभागावर आघात झाल्यामुळे कंपनातून ध्वनी निर्माण करण्याच्या गुणधर्माला नादमयता असे म्हणतात.

धातू नादमय असतात.
उदा. तांबे, लोह इ.

10) द्रवणांक आणि उत्कलनांक:
धातूंचा द्रवणांक आणि उत्कलनांक उच्च असतो.
(अपवाद – गॅलिअम, सोडिअम, पारा, पोटॅशियम)

11) घनता (Density):
धातूंची घनता उच्च असते.

(अपवाद – सोडिअम, पोटॅशिअम).


अधातू

1) भौतिक अवस्था:

सामान्य तापमानाला अधातू वायू स्थायू तसेच द्रवरूप अवस्थेत आढळतात उदा स्थायू कार्बन सल्फर phosphorus द्रव ब्रोमीन वायु ऑक्सिजन हायड्रोजन नायट्रोजन क्लोरीन फ्लोरीन .

2) चकाकी ( Lustre)
अधातूंना चकाकी नसते. काही अधातू रंगहीन तर काही अधातूंना वेगवेगळे रंग असतात.

(अपवाद – हिरा स्वरूपातील कार्बन)

3) द्रावणीयता (Solubility)
अधातू कोणत्याही द्रावकात विरघळू शकतात. तसेच त्या द्रावकाचे बाष्पीभवन करून विरघळलेला अधातू पुन्हा प्राप्त करता येतो.

4) काठिण्यता (Hardness):
अधातू ठिसूळ/मृदू असतात.

अपवाद: हिरा स्वरूपातील कार्बन

5) उष्णता वहन (Conduction Of Heat):
अधातू उष्णतेचे दुर्वाहक असतात.

6) विद्युत वहन (Conduction Of Electricity)
अधातू विजेचे दुर्वाहक असतात.
अपवाद – ग्रॅफाइट स्वरूपातील कार्बन, गॅस कार्बन

7) तन्यता ( Ductility):
अधातू पासून तारा तयार करता येत नाहीत.

8) वर्धनियता (Malleability):
अधातूंपासून पत्रा तयार करता येत नाही.

9) नादमयता (Sonorous):
अधातू अनादमय असतात.

10) द्रवणांक आणि उत्कलनांक
अधातूंचा द्रवणांक आणि उत्कलनांक कमी असतो.

अपवाद – कार्बन : द्रवणांक 3550¢ आणि उत्कलनांक 3825¢.

11) घनता (Density):
अधातूंची घनता कमी असते.

(अपवाद – हिरा स्वरूपातील कार्बन)

धातू आणि अधातूंचे रासायनिक गुणधर्म.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 18 एप्रिल 2024

🔖 प्रश्न.1) मा. दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान तर्फे दिला जाणारा दीनानाथ मंगेशकर पुरस्कार संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल कोणाला जाहीर झा...