Wednesday 20 March 2024

अर्थव्यवस्था या विषयाची तयारी कशी करावी?


 #Combine #Prelims साठी भारतीय अर्थव्यवस्थेचे साधारणतः 12 उपघटकांचा अभ्यास करावे लागतात. त्यातील साधारणतः 6 घटकांचा आज आपण आढावा घेऊ.         


❇️ 1.मूलभूत संकल्पना -

यामध्ये अर्थव्यवस्था म्हणजे काय? विकसित,विकासनशील, अविकसित अर्थव्यवस्था म्हणजे काय?इ. संकल्पना clear करून घ्या.कोळंबे सरांच्या पुस्तकामध्ये छान दिल्या आहेत.


प्रश्न - शक्यतो येत नाही. पण या Topic च्या Concepts clear असल्याशिवाय पुढील अर्थव्यवस्था पण समजत नाही.


❇️ 2. राष्ट्रीय उत्पन्न - खूपच conceptual Topic आहे. यातील प्रत्येक concept जोपर्यत व्यवस्थित समजत नाही तोपर्यत खूप अवघड वाटतो. पण एकदा लक्षात आल की मग यासारखा सोपा घटक नाही. कोळंबे सरांच्या पुस्तकात छान cover केलाय.


प्रश्न - Gdp vs Gnp,

        Ndp vs Nnp,

       Gross vs Net

       Value Addition etc. संकल्पनावरती प्रश्न विचारला जातं असतो. अणखी Gdp चे base years चांगले करून ठेवा आणि या base years च्याच Gdp, Poverty, unempolyment etc साठी figure करत चला.


❇️ 3.आर्थिक नियोजन व पंचवार्षिक योजना - आर्थिक नियोजनाची पार्शवभूमी, भारतातील पंचवार्षिक योजना त्याचा कालावधी, वृद्धीची उद्दिष्ट्ये, प्रतिमान, Model, योजनेची काही ठळक वैशिष्ट्ये चांगली करून ठेवा.


प्रश्न - योजनेचा कालावधी, पंचवर्षिक योजना राबवत असताना राबविलेल्या महत्वाच्या योजना या बाबी चांगल्या करून ठेवा. हा Topic देसले सरांच्या पुस्तकातून चांगला cover होतो.


❇️ 4.दारिद्र्य व बेरोजगारी - Concepts आणि Facts याच मिश्रण असलेला घटक. दारिद्र्यचे प्रकार, Recall Periods,दारिद्र्य मोजमापच्या समित्या त्यांच्या शिफारशी यांचा अभ्यास करावा लागेल.दारिद्र्याच्या figures तोंडपाठ करा. हमखास प्रश्न येतोच.

बेरोजगारी मध्ये त्याच्या व्याख्या म्हणजे श्रम शक्ती कार्य शक्ती बेरोजगारीचा दर या व्यवस्थित करून ठेवा. बेरोजगारी मोजण्याच्या पद्धती पण चांगल्या करायला हव्यात. हा टॉपिक  कोळंबे सर आणि दिसले सरांच्या पुस्तकातून चांगला करा 


प्रश्न - साधारणता दारिद्र्याचे प्रकार, बेरोजगारीचे प्रकार, बेरोजगारीच्या व्याख्या, दारिद्र्य मापनाच्या समित्या  इ. घटकांवरती नियमित प्रश्न विचारले गेले आहेत.


❇️ 5. लोकसंख्या - यामध्ये लोकसंख्येच्या संख्यात्मक व गुणात्मक बाबींचा फॅक्च्युअल डाटा तोंडपाठ करून टाका. उदाहरणार्थ. लिंग गुणोत्तर,साक्षरता, लोकसंख्या वृद्धि, लोकसंख्या घनता इ. अलीकडे आयोग लोकसंख्येच्या धोरणांवरतीदेखील प्रश्न विचारत आहे. त्यामुळे 1976 आणि 20 00 लोकसंख्या धोरण चांगलं करून ठेवा.

 देसले सर भाग 2 मधून हा टॉपिक चांगला कव्हर होतो.


❇️ 6. Rbi व बँकिंग - यामध्ये आरबीआयची पार्श्वभूमी, कार्य, त्यामध्ये देखील संख्यात्मक व गुणात्मक साधने आणि एकंदरीत भारतीय वित्तव्यवस्थेमध्ये आरबीआयची असलेली भूमिका या घटकांचा बारकाईने अभ्यास करावा. यासाठी कोळंबे सरांचे पुस्तक वाचले तरी चालेल.


प्रश्न - आरबीआयची पार्श्वभूमी आरबीआयचे विविध कायदे उदा 1934 act, 1949 बँकिंग रेगुलशन act यावरती प्रश्न विचारले जातात. ते चांगले करा. Rbi ची संख्यात्मक साधने जसं की CRR, SLR, Repo Rate, Reverse Rapo Rate, Open Market Operations (Omos) etc चांगले करा.


 अशा पद्धतीने वरील सहा घटकांची आपण तयारी केली तर Combine Exam मध्ये आपल्याला या घटकांमध्ये नक्कीच चांगले मार्क्स मिळतील.



पण राहीलेले 6 उपघटक Cover करूयात.


❇️ 1. सार्वजनिक वित्त व कररचना -


 यामध्ये सार्वजनिक वित्ताची व्याप्ती, अर्थसंकल्प, FRBM कायदा, अर्थशंकल्पची रचना (महसूली व भांडवली )सार्वजनिक कर्ज, तुटीचे प्रकार, करांचे प्रकार, प्रत्येकाचा वाटा, करसुधारणेसाठी नेमलेल्या समित्या अणि वित्त आयोग विशेषतः 15 वा वित्त आयोग हे घटक चांगले करा.


प्रश्न - साधारणता 3-4 प्रश्न या उपघटका वरती विचारले जातात. दिवसेंदिवस प्रश्नांची depth वाढत असल्यामुळे आपल्याला deep level ला जाऊन Study करावा लागेल. Combine 20 मधील कर्जावरील प्रश्न तसेच Frbm प्रश्नावरून आपण भविष्यात प्रश्न किचकट येणार आहेत हे सांगू शकतो. यासाठी अगोदर कोळंबे सर अनि नंतर देसले सरांचे पुस्तक चांगले करून ठेवा.


❇️ 2.परकीय व्यापार व व्यवहारतोल -


 यामध्ये साधारणता आयात - निर्यात आकडेवारी, वस्तुगट, देशांचा क्रम, Fdi ची काही आकडेवारी, व्यवहारतोलाच्या Basic concepts चांगल्या करून ठेवा.आयात निर्यात धोरणनावर एक नजर टाकून घ्या.


प्रश्न - यावरती आयात - निर्यात वस्तूंचा क्रम, देशांचा क्रम यावरती प्रश्न विचारला जातोय. Combine 20 मध्ये अभियांत्रिकी वास्तुवर प्रश्न आला होता. यामध्ये logic असं होत की अभियांत्रिकी वस्तू हा अनेक वस्तूंचा समूह आहे किंवा group आहे. बाकीचे single वस्तू होत्या so answer अभियांत्रिकी वस्तू आल.


❇️ 3. कृषी उद्योग सेवा -


 यामध्ये 1950,1991,2011,2020 या वर्षांमध्ये कृषी, उद्योग अणि सेवा या तिन्ही क्षेत्राचा असलेला Gdp तील वाटा अणि रोजगारातील वाटा करून ठेवावा लागेल. हे chart स्वरूपात आपण लक्षात ठेवू शकतो. शक्य झाल्यास कृषी, उद्योग या घटकांच्या Basic scheme करून ठेवा.


प्रश्न - आकडेवारीवर थेट प्रश्न विचारला जातोय Gdp च्या base year चे आकडे चांगले करून ठेवा. उदा.1950,1990-91,199-2000,2004-05,2011-13,2017-18.


❇️ 4. शासकीय योजना, धोरणे, चालू घडामोडी -


 साधारणतः 2-3 प्रश्न या घटकावरती विचारले जातात.2014 पासून योजनांचा अभ्यास बारकाईने करा. 2014 पूर्वीच्या महत्त्वाच्या योजनांची पीडीएफ आपल्या ग्रुप वरती शेअर केली आहे ते एकदा पाहून घ्या. त्यामध्ये दिलेल्या योजना चांगल्या करून ठेवा.


प्रश्न - समाजातील दुर्बल घटक विशेषता महिला,बालक, वृद्ध, सामाजिक समावेशन अशा अनेक योजनांवर आयोग  जाणीवपूर्वक प्रश्न विचारतो. देसले सर भाग 2 मधून या योजना चांगले करून ठेवा


❇️ 5. LPG ( Liberalization, Privatization, Globalization )


 हा थोडा Conceptual घटक आहे. यासाठी तुम्हाला भारतीय नियोजनाचा एकंदरीत प्रवास माहित असायला हवा.1991 च्या आर्थिक संकटास कारणीभूत घटक अणि त्यावर मात करण्यासाठी भारताने कोणत्या उपाययोजना केल्या याचा सविस्तर आढावा घ्यावा लागेल. त्यामध्ये मग उदारीकरण, खाजगीकरण  आणि जागतिकीकरण या गोष्टी संकल्पना सहित समजून घ्याव्या लागतील.


प्रश्न -साधारणता एक प्रश्न या घटकावर विचारला जातो. या घटकासाठी PYQ चांगले करून ठेवा म्हणजे नवीन प्रश्न सोडवताना अडचण येणार नाही. यासाठी कोळंबे सरांचे पुस्तक ठीक राहील.


❇️ 6. किमती चलनवाढ व पैसा -


 या घटकावर ती आत्तापर्यंत एकच प्रश्न विचारला असून तो 2017 साली पैसा या घटकावर विचारण्यात आला होता. त्यानंतर या घटकावर ती प्रश्न विचारण्यात आला नाही. तरीही किमती व चलन वाढ हे घटक कोळंबे सरांच्या पुस्तकातून पैसा हा घटक देसले सरांच्या पुस्तकातून वाचून ठेवा.


 अशा पद्धतीने तुम्ही कम्बाईन पूर्व साठी अर्थव्यवस्था या विषयाची परिपूर्ण तयारी करू शकता.




No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...