Wednesday 20 March 2024

चालू घडामोडी :- 20 मार्च 2024

◆ विक्रम साराभाई स्पेस सेंटर (VSSC) ने गगनयान मोहिमेवर अंतराळवीरांना मदत करण्यासाठी "सखी" बहुउद्देशीय ॲप विकसित केले आहे.


◆ ओडिशाचे मुख्यमंत्री पटनायक यांनी भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियममध्ये भारतातील पहिले इनडोअर ॲथलेटिक्स स्टेडियम आणि जलचर केंद्राचे अनावरण केले.


◆ भारताचा दिग्गज खेळाडू पंकज अडवानीचा चीनच्या शंगराओ सिटी येथील जागतिक बिलिर्डस संग्रहालयातील हॉल ऑफ फेममध्ये समावेश झाला आहे.


◆ NVIDIA ने Humanoid रोबोट्‌ससाठी प्रोजेक्ट GROOT फाउंडेशन मॉडेल जाहीर केले.


◆ शास्त्रज्ञांनी मंगळावर 29,600 फूट उंच आणि 450 किलोमीटर रुंद पसरलेल्या 'नोक्टिस ज्वालामुखी या प्रचंड ज्वालामुखीचा शोध लावला आहे.


◆ विनय कुमार, 1992 बॅचचे IFS अधिकारी, यांची रशियामधील भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


◆ 1997 च्या बॅचचे IFS अधिकारी टी. आर्मस्ट्राँग चांगसान यांची क्युबातील भारताचे पुढील टराजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


◆ झारखंडचे टराज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्याकडे तेलंगणाचे राज्यपाल आणि पुद्दुचेरीचे नायब राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.


◆ 'जागतिक चिमणी दिन' दरवर्षी 20 मार्च रोजी साजरा केला जातो.


◆ ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी भुवनेश्वरमधील 'कलिंगा स्टेडियम' येथे भारतातील पहिल्या इनडोअर ॲथलेटिक्स आणि जलतरण केंद्रांचे उद्घाटन केले.


◆ भारत आणि अमेरिका यांच्यातील संयुक्त लष्करी सराव ‘एक्स टायगर ट्रायम्फ-24’ सुरू झाला आहे.


◆ गयानाने भारतीय बनावटीचे डॉर्नियर विमान खरेदी करण्याचा करार केला आहे.


◆ भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी विवेक सहाय यांची पश्चिम बंगालचे नवे महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


◆ निवडणूक आयोगाने ‘नो युवर कॅन्डीडेट’ ॲप लाँच केले आहे.


◆ IQAIR च्या अहवालानुसार बिहारचे बेगुसराय हे जगातील सर्वात प्रदूषित शहर ठरले आहे.


◆ नेपाळ सरकारने अधिकृतपणे पोखरा ही देशाची पर्यटन राजधानी म्हणून घोषित केली आहे.


◆ ‘इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्ट्स’ ने आपला 37 वा स्थापना दिवस साजरा केला.


◆ कुमार व्यंकटसुब्रमण्यम हे P&G इंडियाचे नवे सीईओ बनले आहेत.


◆ मल्याळम भाषेतील प्रसिद्ध कवयित्री ‘प्रभा वर्मा’ यांना सरस्वती सन्मानाने सन्मानित करण्यात येणार आहे.


◆ ‘नॉर्थ ईस्ट गेम्स 2024’ ची तिसरी आवृत्ती नागालँडमध्ये सुरू झाली आहे.


◆ उत्तर प्रदेश पोलिसांनी ‘त्रिनेत्र 2.0’ हा डिजिटल प्लॅटफॉर्म लॉन्च केला आहे.


No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...