Wednesday 20 March 2024

क्रियाशील फ्लोरीन


◆ ज्ञात मूलद्रव्यात फ्लोरीन मूलद्रव्य सर्वात क्रियाशील असून सेंद्रिय, असेंद्रिय, कार्बन, धातू, काच व सिरॅमिक अशा बहुतेक सर्व प्रकारच्या पदार्थावर प्रक्रिया करतो. 


◆ हायड्रोजन आणि फ्लोरीनचे हायड्रोफ्लोरीक आम्ल हे संयुग काचसुद्धा विरघळवते.


◆ फ्लोरीनच्या विषारी गुणामुळे व त्याच्या हाताळणीत होण्याऱ्या जखमांमुळे फ्लोरीनचे रसायनशास्त्र उलगडण्याची प्रगती अतिशय संथ गतीने झाली. 


◆ दुसऱ्या महायुद्धापर्यंत फ्लोरीनचे उत्पादन व्यावसायिक स्तरावर होत नव्हते. जसे रसायनशास्त्रात संशोधन होत गेले तसे काही वर्षांनी फ्लोरीन, क्लोरीन आणि कार्बन यांच्या क्लोरोफ्लुरो कार्बन या संयुगाचा शोध लागला. 


◆ या संयुगाचा वापर वातानुकूलित यंत्रे व रेफ्रिजरेटरमध्ये शीतक म्हणून केला जायचा. जवळपास साठ वर्षे क्लोरोफ्लुरो कार्बन अजिबात धोकादायक नाही अशी खात्री होती.


◆ पण क्लोरोफ्लुरो कार्बनमुळे पृथ्वीभोवती असणारा ओझोन वायूचा थर नष्ट व्हायला सुरुवात झाली.


◆ १९८७ मध्ये झालेल्या ‘मॉट्रिअल करारानुसार’ ओझोन वायूचा थर नष्ट करणाऱ्या क्लोरोफ्लुरो कार्बनसारख्या रसायनांचे उत्पादन आणि वापर थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 


◆ सध्या त्याच्याऐवजी हायड्रोफ्लुरो कार्बन वापरण्यात येतो. पर्यावरण संरक्षणासाठी घेतलेल्या या निर्णयाचे चांगले परिणाम दिसून आले आहेत. कारण ओझोनच्या आवरणात सुधारणा होत असल्याचे दिसते. 


◆ फ्लोराईडयुक्त टुथपेस्ट वापराव्यात अशा जाहिराती आपण बघतो. क्षार आणि खनिजांच्या स्वरूपात आढळणारा फ्लोराईड हा फ्लोरीनचा आयन. 


◆ दातांच्या व हाडांच्या मजबुतीसाठी फ्लोराईड आवश्यक असल्याने पिण्याच्या पाण्यात सोडियम फ्लोराईड मिसळले जाते.


◆ फ्लोराईड वापरताना त्याचे प्रमाण मात्र योग्य असावे लागते. उच्च तापमानाला टिकणारे प्लास्टिक तयार करण्यासाठी फ्लोराईड मिसळले जाते. 


◆ सगळ्यांचे लक्ष वेधून घेणारे आणि गृहिणींचे लाडके उत्पादन म्हणजे टेफ्लॉन. 


◆ पदार्थ न चिकटणाऱ्या, न जळणाऱ्या या टेफ्लॉनच्या निर्मितीसाठी कार्बन आणि फ्लोरीनचे मजबूत बंध असलेल्या फ्लोरोबहुवारीकाचा उपयोग केला जातो. 


◆ ऊष्णता वाहून नेणे, विद्युतरोधक, पाणी न शोषणारा, घर्षण कमी करणारा, न गंजणारा या फ्लोरोबहुवारीकाच्या विविध गुणधर्मामुळे औद्योगिक क्षेत्रात याचा वापर केला जातो. 


◆ विद्युत वाहक तारांच्या बाह्य़ लेपनासाठी, विमानांच्या आणि वाहनांच्या भागांना लेपन करण्यासाठी फ्लोरोबहुवारीकाचा वापर केला जातो. 


◆ आण्विक ऊर्जा केंद्रासाठी लागणाऱ्या इंधनातील युरेनियम २३८ पासून युरेनियम २३५ वेगळा करण्यासाठी युरेनियम हेक्झाफ्लोराईड हे फ्लोरीनचे संयुग वापरतात.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 27 मार्च 2024

◆ भारत सरकारने हिंसाचारग्रस्त हैतीमध्ये अडकलेल्या भारतीयांना शेजारच्या डोमिनिकन रिपब्लिकमध्ये स्थलांतरित करण्यासाठी 'ऑपरेशन इंद्रावती&#...