25 November 2022

भूगोल प्रश्नसंच

1) धूपे बरोबर खालीलपैकी कोणते मुख्य अन्नद्रव्य जास्त प्रमाणात निघून जाते ?
   1) नत्र      2) पालाश   
   3) स्फुरद    4) लोह   
उत्तर :- 3

2) साधारणत: जमिनीची सच्छिद्रता किती असते ?
   1) 20 ते 30%    2) 30 ते 35%   
   3) 30 ते 60%    4) 60 ते 70%
उत्तर :- 3

3) खालीलपैकी कोणते पीक मृदा व पाणी संधारण साधण्यासाठी उपयुक्त आहे ?
   1) मका    2) ज्वारी     
   3) बाजरी    4) चवळी
उत्तर :- 4

4) जमिनीची धूप थांबविण्यासाठी पहिली पायरी म्हणजे.................. थांबविणे.
   1) पाण्याचा प्रवाह    2) वा-याचा वेग
   3) मातीचे विभक्तीकरण    4) झाडांची वाढ
उत्तर :- 3

5) कमी ते मध्यम पावसाच्या भागामध्ये समपातळीत बांध असलेल्या काळया जमिनीवर कोणत्या प्रकारच्या टेरेसिंगचा वापर
     करतात?
   1) झिंग टेरेसिंग      2) बेंच टेरेसिंग
   3) ग्रेडेड टेरेसिंग      4) वरील सर्व
उत्तर :- 1

1) ठाळीचे बांध कोणत्या ठिकाणी घेतले जातात ?
   अ) जमीन पाण्याच्या धुपेला कमी ग्रहणशील आहे तेथे    ब) मातीची पारगम्यता कमी आहे तेथे
   क) दलदलीच्या जमिनीत           ड) जास्त उताराच्या जमिनीत
उत्तर :- 3

2) मृदेची सच्छिद्रता (Porosity) जर 50% आहे तर छिद्र गुणोत्तर (void ratio) ......................... इतके असेल.
   1) 0.5      2) 1.0      3) 2.0      4) 5.0
उत्तर :- 2

3) पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?
   अ) जमिनीची वा-यामुळे होणारी धुप जमिनीची पारगम्यता बदलून गंभीर स्वरुपाची हानी घडवून आणते.
   ब) हिस्टोसोल्स यांनी नैसर्गिक / जैविक मृदा म्हणतात.
   1) केवळ अ    2) केवळ ब    3) दोन्ही      4) एकही नाही
उत्तर :- 2

4) पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?
   अ) लॅटरीटिक मृदा मोसमी हवामानाच्या प्रदेशात आढळते.
   ब) लॅटरीटिक मृदा लोह, ॲल्युमिनियम, पोटॅश व चुनखडीयुक्त आहेत.
   1) केवळ अ    2) केवळ ब    3) दोन्ही      4) एकही नाही
उत्तर :- 1

5) जमिनीचा उतार ................ टक्केपेक्षा जास्त असतो तेव्हा कंटूर चर तांत्रिकदृष्टया किंवा आर्थिकदृष्टया फायदेशीर ठरत नाहीत.
   1) 10      2) 15      3) 20      4) 25
उत्तर  :- 3

1) चांगल्या पोयटयाच्या मातीत पोयटयाचे प्रमाण साधारण ....................... टक्के असते.
   1) 10-20    2) 20-30   
   3) 30-50    4) 60-75
उत्तर :- 3

2) अपपर्णन हा खालीलपैकी कोणत्या विदारणाचा प्रकार आहे ?
   1) रासायनिक    2) कायिक/भौतिक   
   3) जैविक    4) भस्मीकरण
उत्तर :- 2

3) जास्तीत जास्त जीवाणूंची संख्या जमिनीच्या (मातीच्या) ‘अ’ थरामध्ये का असते ?
   1) मातीची ‘अ’ थरामध्ये जास्त अन्नद्रव्ये असतात.    2) मातीची ‘अ’ थरामध्ये सुपीकता अधिक असते.
   3) मातीची ‘अ’ थरामध्ये जलसंपृक्त असतो.      4) मातीची ‘अ’ थरामध्ये भरपूर सेंद्रीय पदार्थ असतात.
उत्तर :- 4

4) पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे  ?
   अ) विम्लधर्मीय आणि क्षारयुक्त विम्‍लधर्मीय जमिनी पुन:प्रापण करण्यासाठी (सुधारण्यासाठी) सल्फर वापरतात.
   ब) क्षारयुक्त जमिनीमध्ये विनिमयात्मक सोडियमची टक्केवारी 15 पेक्षा अधिक असते.
   1) केवळ अ    2) केवळ ब    3) दोन्ही      4) एकही नाही
उत्तर :- 1

5) ‍विधाने वाचून खालील पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा.
   अ) रेगूर मृदा ही मुख्यत्वे नद्यांच्या खो-यात, पठारी प्रदेशात सापडते.
   ब) जास्त पावसाच्या प्रदेशात तांबडी व जांभी मृदा तर किनारी प्रदेशात करडया रंगाची मृदा आढळते.
   1) विधान अ बरोबर    2) विधान ब बरोबर
   3) दोन्ही विधाने बरोबर    4) दोन्ही विधाने चूक
उत्तर :- 3 

1) माती (मृदा) तयार होण्याच्या प्रक्रियेमध्ये पदार्थ पाण्याबरोबर वाहत जाऊन जमा होतात ते म्हणजे
   अ) कोलूव्हियम    ब) लॅक्यूस्ट्राइन    क) ॲल्यूव्हीयम    ड) टिल
   1) अ      2) अ व ब    3) क      4) ड
उत्तर :- 3

2) वरून वाहणा-या पाण्यामुळे उताराच्या जमिनीमधून समप्रमाणात पातळ थरामध्ये माती निघून जाणे याला .................... असे
     म्हणतात.
   1) ओघळपाडी धूप  2) घळई धूप    3) सालकाढी धूप    4) शिंतोडे धूप
उत्तर :- 3

3) दरवर्षी आपल्या देशात अंदाजे किती मातीची धूप होते ?
   1) 12 अब्ज टन    2) 100 अब्ज टन    3) 329 अब्ज टन    4) 120 अब्ज टन
उत्तर :- 1

4) मातीचा .................... गुणधर्म कमी करण्यासाठी ऊसाची मळी मातीमध्ये मिसळली जाते.
   1) क्षार      2) विम्ल      3) अम्ल      4) वरीलपैकी एकही नाही
उत्तर :- 2

5) जमिनीमध्ये असणारे पर्याप्त सेंद्रीय पदार्थ किंवा ह्युमस हे जमिनीची ......................... वाढवितात.
   अ) जमिनीची पाणी धारण करण्याची क्षमता
   ब) अंतर्गलन (जमिनीत पाणी प्रवेश करण्याचा वेग/ दर)
   क) सच्छिद्रता
   1) अ आणि ब फक्त    2) ब आणि क फक्त
   3) अ आणि क फक्त    4) अ, ब आणि क
उत्तर :- 4

सराव प्रश्नसंच



१) विद्युत चुंबकीय पट्ट्यापैकी मानवी डोळ्याला दिसणारा प्रकाश ...... ते ....... तरंगलांबी असणारा आहे. 


   A. ३०००Å ते ७०००Å 

   B. २०००Å ते ६०००Å 

   C.४०००Å ते ८०००Å 

   D. ३५००Å ते ७५००Å 


A. ३०००Å ते ७०००Å

----------------------------------------

२) इन्फ्रा-रेड किरणांचा उपयोग खालीलपैकी कशासाठी होतो? 


अ) रंग सुकवण्याच्या कामात.

ब) कोंबडीच्या पिल्लांच्या जलद वाढीसाठी. 

क) स्नायू दुखी आणि सांधे दुखीवर उपाय म्हणून.

ड) टेलेव्हिजन, स्टिरीओ यांसारख्य साधनांसाठी वापरले जाणारे रिमोट कंट्रोल मध्ये. 


   A. अ आणि ब 

   B. केवळ ब 

   C. अ, ब आणि क 

   D. वरील सर्व 


D. वरील सर्व

------------------------------------

३) फ्लुरोसंट लॅम्प मध्ये खालीलपैकी कोणत्या किरणांचा वापर 'फ्लोरोसन्स' ही प्रक्रिया घडवण्यासाठी होतो? 


   A. इन्फ्रा-रेड किरणे 

   B. अति-नील किरणे 

   C. रेडीओ लहरी 

   D. क्ष-किरणे 


B. अति-नील किरणे

---------------------------------------

४) खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? 


अ) विद्युत क्षेत्रामुळे किंवा चुंबकीय क्षेत्रामुळे क्ष-किरणांचे विचलन होते. 

ब) एखाद्या वायुतून जात असताना क्ष-किरण त्या वायूचे आयनन करतात. 


   A. केवळ अ 

   B. केवळ ब 

   C. अ आणि ब दोन्ही 

   D. अ आणि ब दोन्ही नाही 


B. केवळ ब

-------------------------------------

५) अपवर्तनाच्या क्रियेतून पूर्ण अंतर्गत परावर्तन निर्माण होण्यासाठी खालीलपैकी कोणत्या बाबींची आवश्यकता असते? 


अ) प्रकाश घन माध्यमातून विरल माध्यमात जात असावा. 

ब) आपाती कोन क्रांतिक कोनापेक्षा अधिक असावा. 


   A. केवळ अ 

   B. केवळ ब 

   C. अ आणि ब दोन्ही 

   D. अ आणि ब दोन्ही नाही 


C. अ आणि ब दोन्ही

------------------------------------

६) पांढऱ्या प्रकाशाचे त्याच्या घटक रंगात पृथ्थकरण होण्याच्या प्रक्रियेस ....... म्हणतात. 


   A. प्रकाशाचे अपस्करण 

   B. प्रकाशाचे विकिरण 

   C. प्रकाशाचे अपवर्तन 

   D. पूर्ण अंतर्गत परावर्तन 


A. प्रकाशाचे अपस्करण

----------------------------------------

७) खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? 


अ) तांबड्या प्रकाशाचे अपस्करण सर्वात जास्त तर जांभळ्या प्रकाशाचे अपस्करण सर्वात कमी होते.

ब) पावसाळ्यात आकाशात दिसणारे इंद्रधनुष्य प्रकाशाच्या अपस्करनामुळेच दिसते. 


   A. केवळ अ 

   B. केवळ ब 

   C. अ आणि ब दोन्ही 

   D. अ आणि ब दोन्ही नाही 


B. केवळ ब

-------------------------------------

८) खालीलपैकी कोणत्या घटना प्रकाशाचे विकिरण या प्रक्रियेमुळे घडतात? 


अ) दिवसा सर्वत्र उजेड असतो. 

ब) आकाश निळे दिसते.

क) खोल समुद्रात पाणी निळे दिसते.

ड) वाळवंटातील मृगजळ 


   A. अ आणि ब 

   B. फक्त ड 

   C. अ,ब आणि क 

   D. वरील सर्व 


C. अ,ब आणि क

--------------------------------

९) चंद्र क्षितिजावर मोठा दिसण्याचे कारण काय? 


   A. दृष्टिभ्रम 

   B. प्रकाशाचे विकिरण 

   C. प्रकाशाचे अपस्करण 

   D. प्रकाशाचे अपवर्तन 


A. दृष्टिभ्रम

------------------------------------

१०) जोड्या जुळवा. 


    कॅमेऱ्याचे भाग       डोळ्याचे भाग 

अ) शटर                 १) पापणी(eye-Lid)

ब) डायफ्रॅम             २) परीतारिका(Iris)

क) अॅपेरचर            ३) बाहुली(Pupil)

ड) फिल्म               ४) दृष्टीपटल(retina) 


             अ   ब   क   ड 

   A. १    २    ३    ४

   B. २    ३    ४    १

   C. १    २    ४    ३

   D. २    १    ३   ४


A. १ २ ३ ४

राज्यघटना निर्मिती प्रश्नसंच


1)भारतीय राज्यघटनेची संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली?
एन् एम् राॅय(1934)

2)कोणत्या रिपोर्ट मध्ये भारतीय राज्यघटनेचा आराखडा तयार करण्यात आला होता?
नेहरू रिपोर्ट

3)भारतामध्ये घटना समितीची (संविधान सभा) स्थापना कोणत्या समितीच्या शिफारशी नुसार करण्यात आली?
कॅबिनेट मिशन(त्रिमंत्री योजना)

4)त्रिमंत्री योजनेत(कॅबिनेट मिशन) किती सदस्य होते?
1)स्ट्रफर्ड क्रिप्स 2)ए व्ही अलेक्झांडर 3)पॅथिक लाॅरेन्स

5)कॅबिनेट मिशन भारतात कधी आले?
24 मार्च 1946

6)त्रिमंत्री योजना कधी जाहीर करण्यात आली?
16 मे 1946

7)घटना समितीमध्ये सदस्यांची संख्या किती निश्चित करण्यात आली होती?
389

8)घटना समितीसाठी निवडणुका कधी घेण्यात आल्या?
जुलै -आॅगस्ट 1946

9)घटना समितीच्या 389पैकी किती जागांसाठी निवडणुका घेण्यात आल्या होत्या?
296

10)घटना समितीच्या निवडणुकीत सर्वाधिक जागा कोणत्या पक्षाला व किती मिळाल्या?
काँग्रेस 208

11)भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर घटना समितीची  सदस्य संख्या किती झाली?
299

12)घटना समितीमध्ये संस्थानिकांचे किती प्रतिनिधी होते?
70

13)घटना समितीवर सर्वाधिक सदस्य कोणत्या प्रांतातुन निवडुन आले होते?
संयुक्त प्रांत(55)

14)घटना समितीचा एक सदस्य किती लोकसंख्येमागे निवडला गेला?
10 लाख

15)घटना समितीमध्ये किती महिला होत्या?
15

16)घटना समितीचे पहिले अधिवेशन कोठे  भरले होते?
दिल्ली (कौन्सिल चेंबरच्या पुस्तकालयाच्या भवनात)

17)घटना समितीचे पहिले अधिवेशन कधी भरले होते?
9ते23 डिसेंबर 1946

18)घटना समितीच्या पहिल्या अधिवेशनाला किती सदस्य हजर होते?
211

19)घटना समितीचे हंगामी अध्यक्ष कोण होते?
सच्चिदानंद सिन्हा

20)घटना समितीचे हंगामी उपाध्यक्ष कोण होते?
ए के अँथनी

21)घटना समितीचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून कोणाची व कधी निवड करण्यात आली?
राजेंद्र प्रसाद (11 डिसेंबर 1946)

22)घटना समितीचे सल्लागार कोण होते?
बी एन राव

23)घटना समितीचे उपाध्यक्ष कोण होते?
हरेंद्र मुखर्जी

24)घटना समितीचे सचिव कोण होते?
व्हि आर अय्यंगार

25)भारतीय घटना समितीची एकुण किती अधिवेशन झाले.
11

प्रश्नसंच

🔹दिग्दर्शन हे मासिक कोणी सुरु केले?
उत्तर----------- बाळशास्त्री जांभेकर

🔹इंदुप्रकाश वृत्तपत्र कोणी सुरु केले?उत्तर----------- न्या. रानडे

🔹मानवधर्म सभेची स्थापना कोणी केली?
उत्तर ----------- दादोबा पांडुरंग

🔹निष्काम कर्ममठ ची स्थापना कोणी केली?
उत्तर ------------ महर्षी धोंडो केशव कर्वे

🔹महाराष्ट्र केसरी हे वृत्तपत्री कोणी सुरु केले?
उत्तर ------------- लोकमान्य टिळक

🔹आर्य महिला समाज ची स्थापना कोणी केली?
उत्तर ------------- पंडिता रमाबाई

🔹हरिजन हे वृत्तपत्र कोणी सुरु केले?
उत्तर-------------- महात्मा गांधी

🔹भारत सेवक समाज ची स्थापना कोणी केली?
उत्तर ---------------गोपाळ कृष्ण गोखले

🔹गीताई हा ग्रंथ कोणी लिहला?
उत्तर -------------- विनोबा भावे

🔹सेवासदन ची स्थापना कोणी केली?
उत्तर-------------- रमाबाई रानडे

🔹एसेज ऑन इंडीयन इकोनोमीक्स हा ग्रंथ कोणी लिहला?
उत्तर-------------- न्या. रानडे

🔹परमहंस सभेची स्थापना कोणी केली?
उत्तर------------- दादोबा पांडुरंग

🔹दी प्रोब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणी लिहला?
उत्तर------------- डॉ. बाबासाहेब आंबेडकर

🔹सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली?
उत्तर-------------- ग. वा. जोशी

🔹शतपत्रे कोणी लिहली?
उत्तर------------ गोपाल हरी देशमुख (लोकहितवादी)

🔹 ग्रामगीता कोणी लिहली?
उत्तर------------- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
__

23 November 2022

चालू घडामोडी प्रश्नसराव

(०१)  राज्य स्तरावर राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?

उत्तर- मुख्यमंत्री.


(०२)  लक्षद्वीप कोणत्या महासागरात आहे ?

उत्तर- अरबी समुद्र.


(०३)  पारो विमानतळ कोणत्या देशात आहे ?

उत्तर- भूतान.


(०४) कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर- रायगड.


(०५)  रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम कोंठे सुरू झाली ?

उत्तर- महाराष्ट्र.


(०६)  अग्नीपंख हे कोणाचे आत्मचरित्र आहे ?

उत्तर- ए. पी. जे. अब्दुल कलाम.


(०७)  रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली ?

उत्तर- स्वामी विवेकानंद.


(०८)  जागतिक हास्य दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १० जानेवारी.


(०९)  रोमेश पठानिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- हाॅकी.


(१०)  भारतातील प्रथम महिला भारतरत्न कोण आहे ?

उत्तर- इंदीरा गांधी.


(११)  आमचा बाप आणि आम्ही हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- डाॅ. नरेंद्र जाधव.


(१२)  भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वांत लहान राज्य कोणते ?

उत्तर- सिक्किम.


(१३)  जागतिक सामाजिक न्याय दिन कधी साजरा केला जातो ?

उत्तर- २० फेब्रुवारी.


(१४)  अतनू दास हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- तिरंदाजी.


(१५)  भारतातील प्रथम महिला राज्यपाल कोण आहे ?

उत्तर- सरोजनी नायडू.


(१६)  चार नगरातले माझे विश्व हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- जयंत नारळीकर.


(१७)  महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाणी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर- सातारा.


(१८)  जागतिक हवामान दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- २३ मार्च.


(१९)  नरेश कुमार हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- टेनिस.


(२०)  भारताची पहिली महिला लोकसभा अध्यक्ष कोण आहे ?

उत्तर- मीरा कुमार.


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


Q1. राष्ट्रीय महिला दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

उत्तर :-  13 फेब्रुवारी


Q2. भरत कोकिळा हे प्रसिद्ध टोपणनाव कोणाचे आहे?

उत्तर :- सरोजिनी नायडू


Q3. अलीकडेच उत्तराखंडचे ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

उत्तर :- अक्षय कुमार


Q4. सार्वभौम राज्यावर सर्वाधिक काळ राज्य करणारा राजा म्हणून खालीलपैकी कोणी फ्रान्सच्या लुई चौदावा या राजास मागे टाकले आहे?

उत्तर :- राणी एलिझाबेथ दुसरी


Q5. नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (NCERT) चे नवीन संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

उत्तर :- दिनेश प्रसाद सकलानी


Q6. उन्हाळी ऑलिंपिक 2028 चे आयोजन कोणाकडून केले जाणार आहे?

उत्तर :- लॉस एंजेलिस


Q7. कोणत्या बोगद्याला वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डतर्फे ‘10,000 फुटांपेक्षा जास्त असणारा जगातील सर्वात लांब महामार्ग बोगदा ‘ म्हणून अधिकृतपणे प्रमाणित करण्यात आले आहे?

उत्तर :- अटल बोगदा


Q8. नोव्हेंबर 2021 च्या अखेरीस भारत हा जगातील सर्वात मोठा परकीय चलन राखीव असलेला _देश होता?

उत्तर :- चौथा


Q9. ऑस्ट्रेलियन ओपन 2022 मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणाला मिळाले?

उत्तर :- राफेल नदाल


Q10. तोरग्या सण कोणत्या ठिकाणी साजरा केला जातो?

उत्तर :- अरुणाचल प्रदेश

लोकसभा सभागृह

◼️लोकसभा हे जनतेचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह आहे. 


◼️लोकसभा हे संसदेचे कनिष्ठ व लोकप्रिय सभागृह आहे.


◼️कलम 81 मध्ये लोकसभेच्या रचनेची तरतूद देण्यात आली आहे.


◼️लोकसभेची जास्तीत जास्त सदस्य संख्या 552 इतकी आहे. 


◼️सतराव्या लोकसभेत एकुण 545 सदस्य आहेत


◼️330 कलमानुसार लोकसभेतील जागांमध्ये अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जाती यांना आरक्षण देण्यात आले आहे.


◼️लोकसभेत अनुसूचित जातीनां 84 जागा तर अनुसूचित जमातींना 48 जागा राखीव आहेत. 


◼️अनुसूचित जातीच्या सर्वाधिक 17 आरक्षित जागा  उत्तर प्रदेशात राज्यात आहेत. तर अनुसूचित जमातीच्या सर्वाधिक 6 जागा  मध्यप्रदेश राज्यात आहेत.


◼️महाराष्ट्रतून एकुण 48 लोकसभेचे सदस्य निवडू दिले जातात.


◼️महाराष्ट्रात अनुसूचित जातींसाठी एकुण 5 जागा राखीव आहेत.


-अमरावती,रामटेक,शिर्डी,लातुर,सोलापूर


◼️महाराष्ट्रात अनुसूचित जमातींसाठी एकूण 4 जागा राखीव आहेत.


- नंदुरबार, पालघर, दिंडोरी, गडचिरोली-चिमूर 


◼️लोकसभेची मुदत 5 वर्ष असते.


◼️आणीबाणीच्या काळात संसद कायदा करुन जास्तीत जास्त एक वर्ष वाढवू शकते. 


◼️लोकसभेचे सदस्य 18 वर्षावरील प्रौढ मतदाराकडून प्रत्यक्षरित्या निवडून दिले जातात.


◼️कलम 85 नुसार संसदेच्या प्रत्येक सभागृहाची बैठक बोलविण्याचे अधिकार राष्ट्रपतीना आहेत.


◼️कलम 108 नुसार संयुक्त बैठकीची तरतूद करण्यात आली आहे.


◼️आत्तापर्यंत तिन वेळा संयुक्त बैठका पार पडल्या आहेत.


-हुंडा प्रतिबंधक कायदा 1961

-बँकिंग सर्विस बिल 1978

-पोटा कायदा 2002



◼️लोकसभेचे अधिवेशन सुरू होण्यासाठी एकुण सदस्य संख्येच्या 1/10  सदस्य उपस्थित असतिल तरच सभागृहाचे कामकाज चालू शकते. 


◼️लोकसभा सभापती यांची तरतूद कलम 93 मध्ये देण्यात आली आहे.


◼️ सध्याचे लोकसभा सभापती ओम बिर्ला हे आहेत. 


◼️पहिले लोकसभा सभापती गणेश वासुदेव मालवणकर

22 November 2022

भारतीय राज्यघटनेत घेतलेल्या गोष्टी


🔶 भारतीय संविधान अर्थात राज्यघटना हि जगातील सर्वांत मोठी लिखित राज्यघटना मानली जाते. 


🔶 भारतीय राज्यघटनेतील अनेक गोष्टी या इतर देशातील राज्यकारभाराच्या पद्धतीवरून प्रतिबिंबित केलेल्या आहेत. पाहुयात कोणत्या देशाकडून कोणती पद्धत संविधानात समाविष्ट करण्यात आली.


📚 संविधानात घेतलेल्या गोष्टी / देश📚


▪️ मूलभूत हक्क : अमेरिका


▪️ न्यायमंडळाचे स्वातंत्र्य : अमेरिका


▪️ न्यायालय पुनर्विलोकन : अमेरिका


▪️ कायद्याचे अधिराज्य : इंग्लंड


▪️ संसदीय शासन पद्धती : इंग्लंड


▪️ मार्गदर्शक तत्वे : आयर्लंड


▪️ संघराज्य पद्धत : कॅनडा


▪️ शेष अधिकार : कॅनडा'


▪️ सामूहिक जबाबदारीची तत्वे : इग्लंड


▪️ कायदा निर्मिती : इंग्लंड


▪️ लोकसभेचे सभापती पद : इंग्लंड


▪️ संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन : ऑस्ट्रेलिया


महाराष्ट्रातील नद्या व त्यांच्या काठावरिल शहरे

★ परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे ★


◆ गोदावरी : नाशिक, कोपरगाव, पैठण, गंगाखेड, नांदेड

◆ कृष्णा : कराड, सांगली, मिरज, वाई, औदुंबर

◆ भिमा : पंढरपुर

◆ मुळा - मुठा : पुणे

◆ इंद्रायणी : आळंदी, देहु

◆ प्रवरा : नेवासे, संगमनेर

◆ पाझरा : धुळे

◆ कयाधु : हिंगोली

◆ पंचगंगा : कोल्हापुर

◆ धाम : पवनार

◆ नाग : नागपुर

◆ गिरणा : भडगांव

◆ वशिष्ठ : चिपळूण

◆ वर्धा : पुलगाव

◆ सिंधफणा : माजलगांव

◆ वेण्णा : हिंगणघाट

◆ कऱ्हा : जेजूरी

◆ सीना : अहमदनगर

◆ बोरी : अंमळनेर

◆ ईरई : चंद्रपूर

◆ मिठी : मुंबई.

हवामान बदल कामगिरी निर्देशांक 2023 मध्ये भारत 8 व्या क्रमांकावर आहे; डेन्मार्क चौथ्या क्रमांकावर आहे


🖼🏞14 नोव्हेंबर 2022 रोजी, हवामान बदलाचे प्रात्यक्षिक इंडेक्स (CCPI) 2023 जारी करण्यात आला होता.  पर्यावरण स्वयंसेवी संस्था - जर्मनवॉच, न्यूक्लिमेट  संस्था आणि हवामान कृती नेटवर्क (CAN) इंटरनॅशनल द्वारे प्रकाशित. 

 

📉📊भारताने 67.35 गुणांसह आणि 'उच्च' 

कामगिरी रेटिंगसह 63 पैकी 8व्या क्रमांकावर दोन स्थानांनी झेप घेतली. 


📊📉डन्मार्क CCPI 2023 मध्ये उच्च रेटिंगसह अव्वल आहे परंतु एकूणच ते 4 व्या स्थानावर आहे, त्यानंतर स्वीडन आणि चिली अनुक्रमे 5 व्या आणि 6 व्या स्थानावर आहे.


🇮🇳 ह लक्षात घेण्यासारखे आहे की टॉप 10 उत्सर्जकांच्या गटात भारत अव्वल स्थानावर आहे. यानंतर या गटात जर्मनी आणि जपान दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.


❄️🌹डन्मार्क बद्दल:👉


🏙राजधानी - कोपनहेगन

💸चलन-डॅनिश क्रोन

युद्ध अभ्यास 22 ची 18 वी आवृत्ती भारत-अमेरिका संयुक्त सैन्य प्रशिक्षण सराव उत्तराखंडमध्ये सुरू


🌼🎊16 नोव्हेंबर 2022 रोजी, भारत युनायटेड स्टेट्स (यूएस) च्या 18 व्या आवृत्तीचा संयुक्त लष्करी प्रशिक्षण सराव 'युद्ध अभ्यास 22' प्रथमच उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील औली येथे सुरू झाला, ज्याचा उद्देश सैन्यांमध्ये सर्वोत्तम तंत्रज्ञान, सामरिक कौशल्ये आणि ज्ञानाची देवाणघेवाण करण्याच्या उद्देशाने आहे. दोन्ही देशांचे.


💠❄️16 नोव्हेंबर 2022 ते डिसेंबर 2022 दरम्यान होणारा हा 15 दिवसांचा सराव प्रामुख्याने उच्च उंचीवर आणि अत्यंत शीतयुद्धावर केंद्रित आहे.


🌹❣️हायलाइट:👉


💮📯प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून (LAC) सुमारे 100 किमी अंतरावर, LAC वर चीनच्या वाढत्या हस्तक्षेपादरम्यान उत्तराखंडमधील औली येथे उच्च-उंचीवरील नवीन परदेशी प्रशिक्षण नोड (FTN) येथे हा सराव आयोजित केला जाईल.


🤵‍♂ ह FTN केंद्रीय लष्कराचे कमांडर लेफ्टनंट जनरल योगेंद्र डिमरी यांच्या मनाची उपज आहे आणि सर्व सुविधांसह एका वेळी सुमारे 350 परदेशी सैनिकांना सामावून घेऊ शकते.

❣️👉टीप - सरावाची मागील आवृत्ती ऑक्टोबर 2021 मध्ये जॉइंट बेस एल्मडॉर्फ रिचर्डसन, अलास्का (यूएसए) येथे आयोजित करण्यात आली होती.

21 November 2022

भारतातील काही महत्त्वाची नवाश्मयुगीन स्थळे :


१. भारतीय उपखंडाचा वायव्येकडील प्रदेश 

पहिल्या टप्प्यात (इसवी सनापूर्वी सुमारे ७००० ते ६०००) मातीची भांडी बनवायला सुरुवात झाली नव्हती. दुसऱ्या टप्प्यात (इसवी सनापूर्वी सुमारे ६००० ते ४५००) मातीची भांडी बनवायला सुरुवात झाली होती.


२. जम्मू आणि काश्मीर 

काश्मीरमधील बुर्झोम आणि गुफक्राल येथे इसवी सनापूर्वी २५०० च्या सुमारास नवाश्मयुगीन गाव-वसाहतीची सुरुवात झाली.


३. उत्तर प्रदेश 

उत्तर प्रदेशातील चोपनी मांडो, कोलढिवा आणि महागरा येथे इसवी सनापूर्वी ६००० च्या सुमारास नवाश्मयुगीन गाव-वसाहतीची सुरुवात झाली.


४. बिहार 

बिहार येथील चिरांड, सेनुवार यांसारखी स्थळे. येथे इसवी सनापूर्वी २००० च्या सुमारास नवाश्मयुगीन गाव-वसाहतीची सुरुवात झाली. 


५. ईशान्य भारत 

आसाममधील दाओजाली हाडिंग येथील उत्खननात ईशान्य भारतातील नवाश्मयुगाच्या अस्तित्वाचा पुरावा प्रथम उजेडात आला. तेथील गाव वसाहतींची सुरुवात इसवी सनापूर्वी २७०० च्या सुमारास झाली. येथे मिळालेली नवाश्मयुगीन हत्यारे चीनमधील नवाश्मयुगीन हत्यारांशी अधिक साम्य दर्शवणारी आहेत.


६. दक्षिण भारत 

कर्नाटकातील संगणकल्लू, मस्की, ब्रह्मगिरी, टेक्कलकोटा, पिकलीहाळ, हल्लूर, आंध्र प्रदेशातील नागार्जुनकोंडा, तमिळनाडूतील पय्यमपल्ली येथे इसवी सनापूर्वी सुमारे चौथ्या ते तिसऱ्या शतकांत नवाश्मयुगाची सुरुवात झाली.

रक्त दोन प्रमुख घटकांनी बनलेले असते


1)  रक्तद्रव ( Plasma )

2) रक्तकणिका / रक्तपेशी (Blood corpuscles / cells)


🔸 रक्तद्रव (Plasma)


अ.)  रक्तद्रव फिकट पिवळसर रंगाचा, नितळ, काहीसा आम्लारीधर्मी द्रव असतो. यात सुमारे 90 ते 92% पाणी,

6 ते 8% प्रथिने

1 ते 2% असेंद्रिय क्षार

व इतर घटक असतात.


आ.) अल्ब्युमिन - संबंध शरीरभर पाणी विभागण्याचे काम करते.


इ.)  ग्लोब्युलीन्स - संरक्षणाचे काम करतात.


ई) फायब्रिनोजेन व प्रोथ्रोम्बीन रक्त गोठण्याच्या क्रियेत मदत करतात.


उ)  असेंद्रिय आयने - कॅल्शिअम, सोडिअम, पोटॅशिअम हे चेता आणि स्नायू ठेवतात. कार्याचे नियंत्रण


🔸रक्तकणिका / रक्तपेशी (Blood corpuscles / cells)


1. लोहित रक्तपेशी (RBC) 

आकाराने लहान, वर्तुळाकार, केंद्रक नसलेल्या पेशी या पेशीतील हिमोग्लोबीन या घटकामुळे रक्त लाल रंगाचे दिसते. हिमोग्लोबीनमुळे ऑक्सिजन रक्तात विरघळतो. 


• रक्ताच्या प्रत्येक घनमिलीमीटरमध्ये 50-60 लक्ष RBC असतात. RBC ची निर्मिती अस्थिमज्जेत होते व त्या सुमारे 100 ते127 दिवस जगतात.


2. श्वेत रक्तकणिका (पांढऱ्या पेशी) (WBC) 


आकाराने मोठ्या, केंद्रकयुक्त, रंगहीन पेशी रक्ताच्या प्रत्येक घनमिलीमीटरमध्ये 5000-10,000 पांढऱ्या पेशी असतात


🔸 या पेशींचे 5 प्रकार आहेत - 

बेसोफील, इओसिनोफिल, न्यूट्रोफील,

मोनोसाईट्स लिम्फोसाईट्स


• पांढऱ्या पेशींची निर्मिती अस्थिमज्जेत होते.


🔸 कार्य- 

पांढऱ्या पेशी, आपल्या शरीरात सैनिकाचे काम करतात. शरीरात कुठेही रोगजंतूचा शिरकाव झाल्यास त्यावर या पेशी हल्ला करतात. सूक्ष्मजीवांमुळे होणाऱ्या रोगांपासून रक्षण करतात.


3. रक्तपट्टीका (Platelets)


• या अतिशय लहान आणि तबकडीच्या आकारासारख्या असतात. 

• रक्ताच्या एका घनमिलीमीटरमध्ये या सुमारे 2.5 लक्ष ते 4 लक्ष असतात. 


🔸 कार्य - या रक्त गोठवण्याच्या क्रियेमध्ये भाग घेतात.

- CWG 2022 मध्ये भारतीय खेळाडूंनी जिंकलेली पदकं!



➡️ वेटलिफ्टर - मीराबाई चानू 

(🥇सुवर्णपदक)


➡️ वेटलिफ्टर - जेरेमी लालरिनुंगा 

(🥇सुवर्णपदक)


➡️ वेटलिफ्टर - अंचिता शेउली 

(🥇सुवर्णपदक)


🛑 लाॅल बाॅल्स - भारतीय महिला संघ 

(🥇सुवर्णपदक)


🛑 टेबल टेनिस - भारत 

(🥇सुवर्णपदक)


➡️पॅरा पाॅवरलिफ्टींग - सुधीर 

(🥇सुवर्णपदक)


➡️कुस्तीपटू - बजरंग पुनिया 

(🥇सुवर्णपदक)


➡️महिला कुस्तीपटू - साक्षी मलिक 

(🥇सुवर्णपदक)


➡️कुस्तीपटू - दिपक पुनिया

(🥇सुवर्णपदक)


➡️कुस्तीपटू - रवी कुमार दहिया

(🥇 सुवर्णपदक)


➡️महिला कुस्तीपटू - विनेश फोगट

(🥇सुवर्णपदक)


➡️कुस्तीपटू - नवीन 

(🥇सुवर्णपदक)


➡️पॅरा टेबल टेनिस - भाविना पटेल

(🥇सुवर्णपदक)


➡️महिला बॉक्सर - नितू गंगस

(🥇सुवर्णपदक)


➡️बॉक्सर - अमित पंघाल 

(🥇सुवर्णपदक)


➡️ट्रिपल जंप - एल्धोस पाॅल

(🥇सुवर्णपदक)


➡️महिला बॉक्सर - निखत झरिन 

(🥇सुवर्णपदक)


➡️टेबल टेनिस मिश्र दुहेरी गट - शरथ कमल आणि श्रीजा अकुला 

(🥇सुवर्णपदक)



➡️बॅडमिंटन पुरुष एकेरी गट - लक्ष्य सेन

(🥇सुवर्णपदक)


➡️बॅडमिंटन महिला एकेरी गट - पि.व्ही.सिंधू 

(🥇सुवर्णपदक)


➡️टेबल टेनिस पुरुष एकेरी गट - शरथ कमल 

(🥇सुवर्णपदक)


➡️ बॅडमिंटन पुरुष दुहेरी गट - सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी

(🥇सुवर्णपदक)





➡️ वेटलिफ्टर - संकेत सरगर 

(🥈रौप्यपदक)


➡️ वेटलिफ्टर - बिंदीयाराणी देवी 

(🥈रौप्यपदक)


➡️ वेटलिफ्टर - विकास ठाकुर 

(🥈रौप्यपदक)


⭐ ज्युडो - सुशीला देवी 

(🥈रौप्यपदक)


⭐️ज्यूडो - तुलिका मान

(🥈रौप्यपदक)


🏸भारतीय बॅडमिंटन संघ 

(🥈 रौप्यपदक)


➡️लांब उडी - मुरली श्रीशंकर

(🥈रौप्यपदक)


➡️महिला कुस्ती - अंशू मलिक 

(🥈रौप्यपदक)


➡️लाॅन बाॅल्स - भारतीय पुरुष संघ 

(🥈रौप्यपदक)


➡️स्टीपलचेस 3000 मीटर - अविनाश साबळे 

(🥈रौप्यपदक)


➡️10000 मीटर रेस वाॅक प्रियंका गोस्वामी 

(🥈रौप्यपदक)


➡️ट्रिपल जंप - अब्दुला अबूबकर

(🥈रौप्यपदक)


➡️टेबल टेनिस दुहेरी गट - शरथ कमल साथियान ज्ञानसेकरन 

(🥈रौप्यपदक)


➡️भारतीय महिला क्रिकेट संघ 

(🥈रौप्यपदक)


➡️बॉक्सर - सागर अहलावत 

(🥈रौप्यपदक)


➡️भारतीय पुरुष हॉकी संघ - 

(🥈रौप्यपदक)





⭐  ज्युडो - विजय कुमार 

(🥉कांस्यपदक)


➡️उंच उडी - तेजस्वीन शंकर 

(🥉 कांस्यपदक)


➡️ स्क्वाॅश - सौरव घोषाल

(🥉 कास्यंपदक)


➡️ वेटलिफ्टर  - गुरुराज पुजारी 

(🥉कांस्यपदक)


➡️वेटलिफ्टर - गुरदीप सिंह 

(🥉कांस्यपदक)


➡️ वेटलिफ्टर - हरजिंदर कौर 

(🥉कांस्यपदक)


➡️वेटलिफ्टर - लवप्रीत सिंग 

(🥉कांस्यपदक)


➡️कुस्तीपटू - मोहित ग्रेवाल

(🥉कांस्यपदक)


➡️महिला कुस्तीपटू - दिव्या काकरान

(🥉कांस्यपदक)


➡️बॉक्सिंग - जस्मीन लंबोरीया 

(🥉 कांस्यपदक)


➡️महिला कुस्तीपटू - पुजा गेहलोत

(🥉कांस्यपदक)


➡️पॅरा टेबल टेनिस - सोनलबेन पटेल

(🥉कांस्यपदक)


➡️बॉक्सर - रोहित टोकस 

(🥉कांस्यपदक)


➡️कुस्तीपटू - दिपक नेहरा

(🥉कांस्यपदक)


➡️बॉक्सर - मोहम्मद हुसामुद्दीन

(🥉कांस्यपदक)


➡️महिला कुस्तीपटू - पुजा सिहाग

(🥉कांस्यपदक)


➡️हाॅकी - भारतीय महिला संघ 

(🥉कांस्यपदक)


➡️10,000 मीटर रेस वाॅक - संदिप कुमार 

(🥉कांस्यपदक)


➡️महिला भालाफेकपटू - अणू राणी 

(🥉कांस्यपदक,60 मीटर भाला फेकला)


➡️ बॅडमिंटन - किंदाबी श्रीकांत 

(🥉कांस्यपदक)


➡️स्क्वॅश दुहेरी मिश्र गट - सौरव घोषाल आणि दिपिका पल्लीकल 

(🥉कांस्यपदक)


➡️बॅडमिंटन दुहेरी गट - गायत्री पुलेला आणि त्रिशा जाॅली 

(🥉कांस्यपदक)


➡️टेबल टेनिस पुरुष एकेरी गट - ज्ञानशेखर साथीयान 

(🥉कांस्यपदक)


🇮🇳 भारताची आत्तापर्यंतची कामगीरी 

(🥇22 , 🥈 16 , 🥉 23) एकुण 61 पदके.

किंमतवाढ / चलनवाढ 


एखाद्या विशिष्ट कालावधीमध्ये वस्तू आणि सेवांच्या किमतीच्या पातळीत होणारी अनियंत्रित वाढ म्हणजे किंमतवाढ होय. किंमतवाढीमुळे वस्तू व सेवांच्या किमती वाढतात, मात्र चलनाची खरेदीशक्ती कमी होत असते.चलनवाढीत..

चलनाची खरेदीशक्ती कमी होते.

वस्तू व सेवांची मागणी वाढलेली असते.

रोजगार निर्मितीची क्षमता वाढलेली असते. बेरोजगारी कमी होते.

चलनवाढीचा फायदा ऋणकोंना (कर्ज घेणारा) होतो तर धनकोंना ( कर्ज देणारा) नुकसान होते, ऋणको व्यक्ती जेव्हा कर्ज घेतात, तेव्हा चलनाची क्रयशक्ती अधिक असते मात्र तो जेव्हा कर्जाची परतफेड करतो तेव्हा तो धनकोला कमी क्रयशक्ती परत करत असतो.

अर्थसंकल्पाचे प्रकार

समतोल अर्थसंकल्प – जेव्हा सरकारचे अंदाजित उत्पन्न व अंदाजित खर्च दोन्ही सारखे असतात तेव्हा त्या अर्थसंकल्पास समतोल अर्थसंकल्प असे म्हणतात.

शिलकीचा अर्थसंकल्प – जेव्हा सरकारचे अंदाजित उत्पन्न अंदाजित खर्चापेक्षा जास्त असते तेव्हा त्या अर्थसंकल्पास शिलकी अर्थसंकल्प म्हणतात.

तुटीचा अर्थसंकल्प – जेव्हा सरकारच्या अंदाजित उत्पन्नापेक्षा अंदाजित खर्च जास्त असतो, तेव्हा त्या अर्थसंकल्पास तुटीचा अर्थसंकल्प म्हणतात.

पंचायत राज आणि काही महत्वाचे मुद्दे

पंचायत राज– 

महत्वाचे मुद्दे

पंचायत राज– 

संघात्मक शासन पद्धतीमध्ये राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय शासन आणि प्रांतीय स्तरावर राज्य शासन कार्यरत असते. संघराज्य पद्धतीचा तिसरा भाग म्हणजे स्थानिक स्तरावर स्थानिक शासन ही कार्यरत असते.

सार्वजनिक कारभारात स्थानिक जनतेचा सहभाग घेण्याच्या उद्देशाने स्थानिक शासन संस्थांचा उदय झाला.

भारतामध्ये स्थानिक शासनाला स्थानिक स्वराज्य संस्था असे म्हटले जाते. भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था दोन प्रकारच्या आहेत ग्रामीण आणि शहरी.

७३ व्या घटनादुरुस्तीनुसार ग्रामीण स्वराज्य संस्थांना पंचायत या नावाने संबोधले जाते Panchayat Raj. तर ७४ व्या घटना दुरुस्ती कायद्यानुसार शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना नगरपालिका म्हटले आहे. कलम २४३ नुसार पंचायत म्हणजे ग्रामीण भागासाठी ग्राम पातळीवर मधल्या पातळीवर तालुकास्तरीय व जिल्हा पातळीवर जिल्हास्तर स्थापन करण्यात आलेली स्वराज्य संस्था होय.

ऐतिहासिक पार्श्वभूमी–

प्राचीन भारतात ग्रामपंचायती अस्तित्वात होत्या. मुघलांच्या काळापर्यंत खेडी स्वयंपूर्ण होती त्यांचा कारभार पंचायतीच्या माध्यमातून चालत असे. ब्रिटिश काळात स्थानिक स्वायत्तता नष्ट करण्याच्या उद्देशाने व केंद्रीय सत्ता मजबूत करण्याच्या धोरणाने पंचायतींचा ऱ्हास झाला. नंतर १८८२ पासून पंचायतींची पुनर्बांधणी करण्याचा प्रयत्न केला गेला.

घटनात्मक तरतुदी आणि पंचायत राज -

भारतीय राज्यघटनेच्या कलम ४० मध्ये ग्रामपंचायतींच्या स्थापनेबाबत मार्गदर्शक तत्व समाविष्ट करण्यात आलेले आहे.

स्थानिक शासन हा विषय राज्य सूची मध्ये टाकण्यात आलेला आहे. त्यामुळे स्थानिक शासनाबद्दल कायदे करण्याचा अधिकार राज्य विधिमंडळ यांना देण्यात आलेला आहे.

१९९२ मध्ये ७३ वी आणि ७४ वी घटनादुरुस्ती करण्यात आली आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यात आला.

गुलजारी लाल नंदा समिती

कलम ४० नुसार स्थानिक शासन पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी गुलजारी लाल नंदा यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली.  यामध्ये बाबू जगजीवनराम व केशव मालवीय हे देखील या समितीत होते. या समितीने सत्तेचे विकेंद्रीकरण निवडणुकीसाठी प्रौढ मतदान पद्धती ग्रामपंचायतीची पक्षीय राजकारणापासून अलिप्तता या शिफारशी सुचवल्या.

शिमला परिषद १९५४

केंद्रीय आरोग्य मंत्री श्रीमती कौर यांच्या पुढाकाराने १९५४ मध्ये सिमला येथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विकासासाठी परिषद घेण्यात आली.

या परिषदेने ग्रामपंचायतींना गावच्या विकासासाठी शासकीय अनुदान प्रतिनिधित्व ग्रामपंचायतींचा अर्थसंकल्प या महत्त्वाच्या शिफारशी केल्या.

बलवंतराव मेहता समिती १९५७ -

जानेवारी १९५७ मध्ये भारत सरकारने बलवंतराय मेहता यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली. समुदाय विकास कार्यक्रम राष्ट्रीय विस्तार सेवा या योजनांच्या कार्याचे परीक्षण करून उपाययोजना सुचवण्यासाठी ही समिती स्थापन केली होती.

१९५७ मध्ये या समितीने लोकशाही विकेंद्रीकरण यावर भर देणारा आपला अहवाल मांडला.

मेहता समितीच्या शिफारशी -

त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था Panchayat Raj.
ग्रामपंचायतीसाठी प्रत्यक्ष प्रौढ मतदान पद्धती तर पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्यांच्या निवडीसाठी अप्रत्यक्ष मतदान पद्धती सुचवली.

नियोजन विकास कामांची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांवर

पंचायत समिती कार्यकारी संस्था, जिल्हा परिषद सल्लागार, समन्वयक, पर्यवेक्षक संस्था असावी.

जिल्हाधिकारी हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असावा लोकसभा विधानसभा सदस्य हे सदस्य असावेत.

पंचायत समितीला नेमून दिलेल्या महसुलात पैकी ३/४ उत्पन्न ग्रामपंचायतींना मिळावे.

ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा विकास सचिव असावा आठशे कुटुंबिक किंवा चार हजार लोकसंख्येसाठी एक ग्रामसेवक असावा.

न्याय पंचायतीची स्थापना करावी

सदर शिफारशींची अंमलबजावणी

बलवंतराय समितीच्या शिफारशी केंद्र सरकार व राष्ट्रीय विकास परिषदेने जानेवारी १९५८ मध्ये स्वीकारल्या.राजस्थान या राज्याने देशात सर्वप्रथम लोकशाही विकेंद्रीकरणाची पद्धती स्वीकारली. २ ऑक्टोबर १९५९ रोजी राजस्थानमधील नागौर जिल्ह्यात पंचायत राज Panchayat Raj व्यवस्थेचे उद्घाटन पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या हस्ते करण्यात आले. आणि स्थानिक स्वशासन व्यवस्थेचे पंचायत राज असे नामकरण करण्यात आले.

देशपातळीवर पंचायतराज व्यवस्थेमध्ये साम्य नव्हते. काही ठिकाणी द्विस्तरीय काही ठिकाणी त्रिस्तरीय तर पश्चिम बंगालमध्ये ४ स्तरीय पंचायत राज व्यवस्था स्वीकारण्यात आली.

अशोक मेहता समिती १९७७

पंचायत राज संस्थांच्या आढावा घेण्यासाठी अशोक मेहता यांच्या अध्यक्षतेखाली १९७७ मध्ये समिती स्थापन करण्यात आली. या समितीने १३२ शिफारशी केल्या.

जी.व्ही.के. राव समिती १९८५

ग्रामीण विकास व दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रमासाठी प्रशासकीय व्यवस्थेबाबत समिती.

या समितीने विकास प्रक्रियेचे लोकशाहीकरण झाले असल्याचे मत मांडले. या समितीने पंचायत राज व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी विविध शिफारशी मांडल्या. जिल्हा परिषदेला महत्व, जिल्हा विकास आयुक्त हे पद निर्माण करावे, नियमित निवडणुका यासारख्या शिफारशी सुचविल्या.

एल. एम. सिंघवी समिती १९८६

लोकशाही व विकासासाठी पंचायतराज संस्थांच्या मजबुतीकरणासाठी समिती.

पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा देण्याची शिफारस या समितीने केली.ग्रामसभेचे महत्त्व ओळखून या समितीने ग्रामसभेचा उल्लेख अप्रत्यक्ष लोकशाहीचे मूर्तस्वरूप असे केले.

७३ वा घटना दुरुस्ती कायदा १९९२ -

७३ व्या घटना दुरुस्ती कायद्याने भारतीय घटनेत भाग ९ समाविष्ट करण्यात आला. त्याचे शीर्षक पंचायती असे देण्यात आले. कलम २३४ ते २४३ यांचा समावेश केला. ११ वी अनुसुची बनवण्यात आली व त्यामध्ये पंचायतींच्या २९ कार्यात्मक बाबी देण्यात आल्या.

ग्रामसभा -

कलम २४३ ए मध्ये ग्रामसभेचा उल्लेख आहे. ग्रामसभा हे ७३ व्या घटना दुरुस्ती चे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.

ग्रामसभेची व्याख्या पुढीलप्रमाणे करण्यात आलेली आहे ग्रामपातळीवरील पंचायत क्षेत्रातील गावच्या मतदार यादीत ज्यांची नावे नोंदवण्यात आली आहेत अशा व्यक्तींचा मिळून बनलेला निकाय म्हणजे ग्रामसभा होय.

पंचायतींची स्थापना -

प्रत्येक राज्यात त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेचे तरतुद केली आहे. वीस लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या राज्याला मधल्या पातळीवर पंचायत स्थापन करण्याची गरज नाही.

कलम २४३ डी नुसार

पंचायतीमध्ये अनुसूचित जाती जमाती साठी त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जागा राखून ठेवल्या जातील.

या राखीव जागा पैकी १/३ जागा अनुसूचित जाती-जमातींच्या महिलांसाठी आरक्षित असतील.
प्रत्येक पंचायतीमध्ये १/३ जागा महिलांसाठी राखीव असतील.

प्रत्येक पातळीवरील पंचायतीमध्ये अध्यक्ष पदांपैकी किमान १/३ पदे महिलांना आरक्षित असावीत.

पंचायतींचा कालावधी -

पंचायतीचा कालावधी ५ वर्ष असेल. मुदतपूर्व पंचायतीचे विसर्जन झाले असल्यास सहा महिन्याच्या आत निवडणुका घ्याव्यात व नवीन पंचायतीचा कार्यकाल उर्वरित काळासाठी अस्तित्वात राहील.

पंचायतीचे अधिकार व जबाबदाऱ्या -

राज्य विधानमंडळ कायद्याद्वारे पंचायतींना आवश्यक असतील असे अधिकार प्राधिकार देता येतील.

वित्त आयोग -

राज्याचा राज्यपाल पंचायतींच्या आर्थिक स्थितीचे पुनर्विलोकन करण्यासाठी दर पाच वर्षांनी वित्त आयोगाची स्थापना करेल.

पंचायतीच्या निवडणुका -

कलम २४३ के नुसार पंचायतीच्या निवडणुका घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोग स्थापन करण्यात यावा.यामध्ये राज्य निवडणूक आयुक्त चा समावेश असेल याची नेमणूक राज्यपाल मार्फत केली जाईल.