14 September 2025

ऑपरेशन्स

 ⭕️ 1.'ऑपरेशन सिंधू'

भारताने इराणमधील भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी 'ऑपरेशन सिंधू' सुरू केले आहे.

🔹 या ऑपरेशन अंतर्गत, इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणले जात आहे.

🔹 भारतीय हवाई दलाची विमाने भारतीयांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी तैनात करण्यात आली आहेत.


⭕️ महत्त्वाची इतर ऑपरेशन्स

2.ऑपरेशन सिंदूर (2025)

🔹 पाकिस्तानात भारतीय हवाई दलाने केलेला हवाई हल्ला.


3.ऑपरेशन गंगा (2022)

🔹 युक्रेनमधून अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची सुरक्षित सुटका.


4.ऑपरेशन देवी शक्ती (2021)

🔹 अफगाणिस्तानातून भारतीय नागरिक व काही परदेशी नागरिकांची सुटका.


5.ऑपरेशन कावेरी (2023)

🔹 आफ्रिकेतील सुदान मधून भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी राबवलेले अभियान.


📌 विशेष टीप :

भारत सरकारने मागील दशकभरात विविध संघर्षग्रस्त व संकटग्रस्त देशांतून नागरिकांची सुटका करण्यासाठी अशा प्रकारची मानवीय मदत व आपत्कालीन बचाव ऑपरेशन्स मोठ्या प्रमाणात यशस्वीरित्या पार पाडली आहेत.

13 September 2025

महाराष्ट्राची लोकसंख्या - 2011:



♦️👉2011 सालाच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या 11 कोटी 23 लाख 74 हजार 333 (112,374,333) इतकी आहे.


यामध्ये पुरुषांची लोकसंख्या 5 कोटी 82 लाख 43 हजार 056 (58,243,056) तर महिलांची लोकसंख्या 5 कोटी 41 लाख 31 हजार 277 (54,131,277) आहे.


II. लोकसंख्येचा दशकीय वाढ - 2011:


2001 ते 2011 दरम्यान महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या वाढीचा दर 9.20% इतका आहे.


2001 साली राज्याची एकूण लोकसंख्या 9 कोटी 68 लाख 78 हजार 627 होती.


2011 साली ती 11 कोटी 23 लाख 74 हजार 333 इतकी झाली आहे.


III. महाराष्ट्र लोकसंख्या घनता - 2011:


2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या घनता (दर चौरस किलोमीटर) 365 आहे.


राष्ट्रीय सरासरी घनता 382 आहे.


IV. साक्षरतेचा दर:


महाराष्ट्राचा साक्षरतेचा दर 82.34% आहे.


पुरुष साक्षरतेचा दर 89.82%, तर महिलांचा साक्षरतेचा दर 75.48% आहे.


महाराष्ट्रातील प्रमुख घाट



1. थळ (कसारा) घाट - मुंबई-नाशिक


2. बोर घाट - पुणे-मुंबई


3. माळशेज घाट - ठाणे-अहमदनगर


4. दिवे घाट - पुणे-बारामती


5. ऑट्रम घाट/कन्नड घाट - धुळे-औरंगाबाद


6. काज्रत व खंबाटकी घाट - पुणे-सातारा


7. प्रसरणी घाट - वाई-महाबळेश्वर


8. शिरसाट घाट - नाशिक-जव्हार


9. भीमाशंकर घाट - पनवेल-नारायणगाव (मंचरमार्गे)


10. वरंधा घाट - महाड-पुणे


11. कशेडी घाट - महाड-खेड-डापोली


12. चांदनापुरी घाट - नाशिक-पुणे


13. शिरसाट घाट - नाशिक-जव्हार

12 September 2025

विज्ञान 15 प्रश्न

🟤. संतृप्त हायड्रोकार्बन मधील दोन कार्बन अणूंमध्ये............असतो.

A. एकेरी बंध

B. दुहेरी बंध

C. तिहरी बंध ✔️

D. आयनिक बंध


🟣. ..................हा सूर्याच्या सगळ्यात जवळ आणि आपल्या सूर्यामालेतील सगळ्यात लहान ग्रह आहे.

A. शुक्र

B. बुध✔️

C. मंगळ

D. पृथ्वी


🔴. एलपीजी मध्ये .......घटक असतात.

A. मिथेन आणि इथेन

B. मिथेन आणि ब्युटेन

C. ब्युटेन आणि प्रोपेन ✔️

D. हायड्रोजन आणि मिथेन


🔵. MKS पद्धतीत दाबाचे एकक.........असते.

A. न्युटन

B. पासकल ✔️

C. डाइन

D. वॅट


🟡. ..................किरणांना वस्तूमान नसते.

A. अल्फा

B. बीटा

C. गॅमा ✔️

D. क्ष


🔵 दंतक्षय रोखण्यासाठी पुढीलपैकी कोणते खनिजद्रव्य महत्तवाचे ठरते ?

A. सोडियम

B. आयोडिन

C. लोह

D. फ्लोरिन ✔️


🟢. पुढीलपैकी कोणते जीवनसत्तव भाज्यांतून मिळत नाही ?

A. ब जीवनसत्त्व

B. क जीवनसत्त्व

C. ड जीवनसत्त्व ✔️

D. इ जीवनसत्त्व


🟣. आईच्या दुधात पुढीलपैकी कशाचा अभाव असतो ?

A. क जीवनसत्त्व व सोडियम

B. प्रथिने व लोह

C. सोडियम व प्रथिने

D. लोह व क जीवनसत्त्व ✔️


⚫️. जास्ता चोथा असलेले अन्नघटक पुढीलपैकी कोणते ?

A. सफरचंद व तूप

B. काकडी व सफरचंद ✔️

C. अंडी व केळी

D. केळी व दूध


🟡. आतड्यातील जीवानून मुळे पुढीलपैकी कोणते जीवनसत्त्व तयार होते ?

A. ब-1 जीवनसत्त्व

B. ब-4जीवनसत्त्व

C. ड जीवनसत्त्व

D. के जीवनसत्त्व ✔️


🟢. पुढीलपैकी कोणत्या घटकात कर्बोदक आढळत नाहीत ?

A. पालक

B. लोणी

C. चीज

D. मासे ✔️


🔵. अफू मध्ये खालीलपैकी कोणते द्रव्य प्रधान असते ?

A. कॅफिन

B. टॅनिन

C. मॉर्फिन ✔️

D. निकोटीन


🟤 पुढीलपैकी कोणता अन्नघटक ब-12 जीवनसत्त्वाचा प्रमुख स्रोत आहे ?

A. मासा ✔️

B. सफरचंद

C. कलिंगड

D. काजू


⚪️. हुंगण्याचे बधिरकारी साधन म्हणून पुढीलपैकी कोणत्या पदार्थाचा वापर केला जातो ?

A. नायट्रोजन

B. नायट्रोजन पेरॉक्साईड

C. अमोनिया

D. नायट्रस ऑक्साईड ✔️


🟢. वातावरणातील कोणता थर हा दाट असून तो एकून वातावरणाच्या 85 % इतका व्यापलेला आहे ?

A. मिसोस्फियर

B. थर्मोस्फियर

C. ट्रोपोस्फियर ✔️

D. सेट्रॅटोस्फियर



1️⃣खालीलपैकी भरपूर प्रमाणात ‘अ’ जीवनसत्वे देणारा पदार्थ………

1} सफरचंद

2} गाजर✅✅✅

3} केळी

4} संत्र


📖📖📖📖📖📖📖📖📖


2️⃣खालीलपैकी कोणता रोग ‘ड’ जीवनसत्त्वाच्या अभावी?

1} स्कर्व्ही

2} बेरीबेरी

3} मुडदूस✅✅✅

4} राताधळेपण


📖📖📖📖📖📖📖📖📖


3️⃣पथ्वीवरील वातावरणाची उंची सुमारे ……..कि.मी.इतकी आहे.

1} २००

2} ३५०

3} ५००

4} ७५०✅✅✅


📖📖📖📖📖📖📖📖📖


4️⃣जव्हा मनुष्य उपग्रहाद्वारे पृथ्वीभोवती फिरतो,तेव्हा त्याचे वजन……….

1} वाढते

2} कमी होते

3} पूर्वीइतकेच राहते

4} शून्य होते✅✅✅


📖📖📖📖📖📖📖📖📖


5️⃣कार्बनचे जास्तीत जास्त शुद्ध स्वरूप……..

1} दगडी कोळसा

2} कोक

3} चारकोल

4} हिरा✅✅✅


📖📖📖📖📖📖📖📖📖


6️⃣जनावरांना तोंडाचे आणि पायांचे रोग मुख्यतः ………..मुळे होतात.

1} जीवाणू (bacteria)

2} विषाणू (virus)✅✅✅

3} कवक (fungi)

4} बुरशी


📖📖📖📖📖📖📖📖📖


7️⃣लसीकरणाने पुढीलपैकी कोणता विकार नियंत्रित करता येत नाही?

1} देवी

2} मधुमेह✅✅✅

3} पोलिओ

4} डांग्या खोकल


📖📖📖📖📖📖📖📖📖


8️⃣……..या किरणांना वस्तुमान नसते.

1} अल्फा

2} ‘क्ष’

3} ग्यामा✅✅✅

4} बीटा


📖📖📖📖📖📖📖📖📖


9️⃣खालीलपैकी कोणता रोग  'अ’ जीवनसत्त्वाच्या अभावी होतो?

1} रंगाधळेपण

2} स्कर्व्ही

3} बेरीबेरी

4} यापैकी नाही✅✅✅


📖📖📖📖📖📖📖📖📖


🔟हिवतापावरील प्रभावी ऑंषध……..

1} पेनेसिलीन

2} प्रायमाक्वीन✅✅✅

3} सल्फोन

4} टेरामायसीन


📖📖📖📖📖📖📖📖📖


1️⃣1️⃣निष्क्रिय वायू हे………..

1} पाण्यामध्ये विरघळतात

2} स्थिर नसतात

3} रासायनिक क्रिया करू न शकणारे✅✅✅

4} रासायनिक क्रियेसाठी जास्त क्रियाशील


📖📖📖📖📖📖📖📖📖


1️⃣2️⃣…….हे मानवनिर्मित मूलद्रव्य आहे.

1} प्लुटोनिअम✅✅✅

2} U -२३५

3} थोरीअम

4} रेडीअम


📖📖📖📖📖📖📖📖📖


1️⃣3️⃣खालीलपैकी कोणते खत रोपांना समतोल आहार पुरवते?

1} युरिया

2} नायट्रेट

3} अमोनिअम सल्फेट

4} कंपोस्ट✅✅✅


📖📖📖📖📖📖📖📖📖


1️⃣4️⃣आतड्यातील जिवाणूमुळे पुढीलपैकी कोणते जीवनसत्त्व तयार होते?

1} ‘ब-१’ जीवनसत्त्व

2} ‘ब-४’ जीवनसत्त्व

3} ‘ड ‘ जीवनसत्त्व

4} ‘के ‘ जीवनसत्त्व✅✅✅


📖📖📖📖📖📖📖📖📖


1️⃣5️⃣जी.एस.आर’ हे उपकरण कशाच्या मापनासाठी वापरतात.

1} मेंदूचे स्पंदन

2} हृदयाचे स्पंदन

3} डोळ्यांची क्षमता✅✅✅

4} हाडांची ठिसूळता


📖📖📖📖📖📖📖📖📖


1️⃣6️⃣किती तीव्रता असलेल्या ध्वनीच्या सततच्या संपर्कामुळे कायमचा बहिरेपणा येऊ शकतो?

1} १०० डी.बी.च्या वर✅✅✅

2} ११० डी.बी.च्या वर

3} १४० डी.बी.च्या वर

4} १६० डी.बी.च्या वर


📖📖📖📖📖📖📖📖📖


1️⃣7️⃣डोळ्याच्या कर्करोगाच्या उपचारासाठी भाभा अणुसंशोधन केंद्राने कोणता प्रकाश स्त्रोत तयार केला?

1} आयोडीन-१२५✅✅✅

2} अल्बम-३०

3} ल्युथिनिअरम-१७७

4} सेसिअम-१३७


📖📖📖📖📖📖📖📖📖


1️⃣8️⃣आधुनिक जैवतंत्रज्ञान …………. पातळीवर कार्य करते.

1} अवअणू

2} अणू

3} रेणू✅✅✅

4} पदार्थ


📖📖📖📖📖📖📖📖📖


1️⃣9️⃣मानव पालेभाज्यांतील सेल्युलोज पचवू शकत नाही,कारण……….हे विकर त्याच्या जठरात नसते.

1} सेल्युलेज✅✅✅

2} पेप्सीन

3} सेल्युलीन

4} सेल्युपेज


📖📖📖📖📖📖📖📖📖


2️⃣0️⃣इमारतीमधील विजेवर चालणाऱ्या पाळण्यातून वर जाताना व्यक्तीचे वजन…

1} कमी होते✅✅✅

2} वाढते

3} सारखेच राहते

4} शून्य होते


📖📖📖📖📖📖📖📖📖


2️⃣1️⃣पदार्थाच्या एका ग्रॅम-मोलमधील रेणूंची संख्या ……… इतकी असते.

1} M

2} N✅✅✅

3} A

4} XB


📖📖📖📖📖📖📖📖📖


2️⃣2️⃣सौरऊर्जा _ स्वरुपात असते.

1} प्रकाश प्रारणांच्या

2} विद्धुत चुंबकीय प्रारणांच्या✅✅✅

3} अल्फा प्रारणांच्या

4} गामा प्रारणांच्या


📖📖📖📖📖📖📖📖📖


2️⃣3️⃣अहरित वनस्पती ____ असतात.

1} स्वयंपोषी

2}  परपोषी✅✅✅

3} मांसाहारी

4} अभक्ष


📖📖📖📖📖📖📖📖📖


2️⃣4️⃣किण्वन हा _ चा प्रकार आहे.

1} ऑक्सिश्वसन

2} विनॉक्सिश्वसन✅✅✅

3} प्रकाशसंश्लेषण

4} ज्वलन


📖📖📖📖📖📖📖📖📖


2️⃣5️⃣परकाश संश्लेषनात ___ प्रकाशउर्जा ग्रहण केली जाती.

1} हरितद्रव्यामुळे✅✅✅

2} झथोफिलमुळे

3} कॅरोटीनमुळे

4} मग्नेशिंअममुळ


खनिजद्रव्य व त्याचे उपयोग

 शरीरातील प्रक्रियेचे नियंत्रण व संरक्षण करण्याकरिता शरीराला खनिजाची गरज असते.

 आपल्या शरीराची निगा राखण्यामध्ये खालील खनिजे महत्वाचे आहेत.


 खनिज - फॉस्फरस 

 उपयोग - दातांच्या आणि हाडांच्या विकासासाठी.

 अभावी होणारे परिणाम – हायपो-फॉस्फटेमिया - यात रक्तातील फॉस्फरस चे प्रमाण कमी होते. त्यामुळे ऊर्जानिर्मिती वर परिणाम होतो. तसेच हाडे ठिसुळ होतात, चयापचय क्रियेत अडथळे निर्माण होतात अशक्तपणा, स्नायूंचे कुपोषण, रक्तक्षय  इ परिणाम.

 अतिसेवनाने होणारे परिणाम – हायपर-फॉस्फटेमिया - यात रक्तातील फॉस्फरस चे प्रमाण वाढते. त्यामुळे अतिअवटुता तसेच वृक्कनाश होऊ शकतो.

 स्रोत - शेंगा, काजू, बदाम, घेवडा, गाजर, अळंबी, मांस, मासे, ब्रेड, तांदूळ, अंडी, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, तसेच हिरव्या पालेभाज्या.


 खनिज – पोटॅशियम 

 उपयोग – चेतापेशीच्या पोषणाकरिता

 अभावी होणारे परिणाम – हायपो-कॅलेमिया यामुळे रक्तातील पोटॅशियम चे प्रमाण कमी होते, स्नायूंना अशक्तपणा, पॅरालिसिस, चेतापेशीवर परिणाम होतो

 अतिसेवनाने होणारे परिणाम – हायपर-कॅलेमिया - रक्तातील पोटॅशियम चे प्रमाण वाढते. त्यामुळे स्नायूंना अशक्तपणा, नाडीचे ठोके वाढणे, हृदयविकार, अडीसन्सचा रोग इ. परिणाम आढळतात.

 स्त्रोत – सुकी फळे, कडधान्ये, बटाटे, केळी, पपई, तीळ, घेवडा, तृणधान्ये, सोयाबीन, पालक, रताळ, हळद इ.


 खनिज – कॅल्शियम 

 उपयोग – हाडे, दात, रक्त, मज्जातंतू व हृदय यांच्या पोषणाकरिता

 अभावी होणारे परिणाम – हाडे कामकूवत व नरम होतात. कॅल्शियमच्या अभावी ऑस्टीओमॅलेशिया हा विकार होतो.

 स्त्रोत – तीळ व पालेभाज्या


 खनिज – लोह 

 उपयोग – रक्त संवर्धन व हिमोग्लोबिनच्या पोषणाकरिता, ऑक्सीजन व हिमोग्लोबीन याचा संयोग घडवून आणते व प्रतिरोध संस्थेला मदत करते.

 अभावी होणारे परिणाम – लोहाच्या कमतरतेचा परिणाम हिमोग्लोबिनवर होतो. लोहाच्या अभावी रक्तक्षय व पंडूरोग होतो.  

 स्त्रोत – मांस, मासे, अंडी, सी फूड, यकृत, सोयाबीन, सुका मेवा, गूळ-शेंगदाणे, घेवडा, पालक, खजूर, मनुके, तीळ, हळद, हिरव्या पालेभाज्या व मेथीची भाजी


 खनिज – तांबे 

 उपयोग – हिमोग्लोबिनचे संवर्धन करणे
1"
 अभावी होणारे परिणाम – तांब्याच्या आभावी हिमोग्लोबिनची निर्मिती होत नाही.

 स्त्रोत – पालेभाज्या


 खनिज – सल्फर 

 उपयोग – प्रथिनांची निर्मिती करणे अस्थी व नखे यांचे आरोग्य

 अभावी होणारे परिणाम – केस, हाडे कमकूवत होतात


 खनिज – फ्लोरिन 

 उपयोग – दातांचे रक्षण करण्याकरिता,

 अभावी होणारे परिणाम – याच्या अभावी दंतक्षय होतो.


 खनिज – सोडीयम 

 उपयोग – रक्तामधील आम्ल व अल्क यांचा समतोल साधला जातो.

 अभावी होणारे परिणाम – रक्तदाबावर परिणाम होतो.  

स्रोत - मीठ


 खनिज – आयोडीन 

 उपयोग – थायराईड ग्रथीच्या पोषणाकरिता

 अभावी होणारे परिणाम – गलगंड नावाचा आजार होतो.

 स्रोत - आयोडिनयुक्त मीठ


 खनिज - मॅग्नेशियम 

 उपयोग : ATP रेणूच्या निर्मितीमध्येतसेच हाडांच्या विकासासाठी

 अभावी होणारे परिणाम – हायपो-मॅग्नेशिया - यामध्ये अशक्तपणा, स्नायूंना पेटके, हृदयाच्या कार्यात अडथळा, चिडचिड, अतिताण, धनुर्वात इ परिणाम

 स्रोत - सोयाबीन, कोकोआ, शेंगदाणे, पालक, टोमॅटो, घेवडा, अद्रक, लवंग, पालेभाज्या इ.

अतिमहत्त्वाची माहिती


🔑भारतीय अवकाश संशोधन संस्था🔑

(Indian space research organisation ISRO)

स्थापना : 15 ऑगस्ट 1969

इस्रोचे मुख्यालय :  बंग‌ळूरू

श्रीहरीकोटा आंध्र प्रदेश अंतरिक्षित उपग्रह प्रक्षेपित केंद्र

भारताने 1975 मध्ये  सोवियत युनियन च्या मदतीने पहिला "आर्यभट्ट "उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले

भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट आहे प्रक्षेपण 1975 मध्ये करण्यात आला..

थूबा इक्विटोरियल लाँच सेंटर केरळ राज्यामध्ये आहे...

नाग रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र आहे


🔑संरक्षण संशोधन व विकास संस्था (डीआरडीओ)🔑

स्थापना:  1958

उद्देश भारताला संरक्षणाची साधने उपकरणे बनवण्याबाबतीत स्वावलंबी बनवणे.

भारतीय क्षेपणास्त्राचे व ""मिसाईल मॅनचे जनक""  डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांना म्हटले जाते.


🔑ONGC 🔑

ऑइल अँड नॅचरल गॅस कमिशन

स्थापना 1956

उद्देश:  खनिज तेल व नैसर्गिक वायू याचा शोध घेणे

दिग्गोई खनिज तेल केंद्र आसाम राज्यात आहे.

अंकलेश्वर खनिज तेल केंद्र गुजरात येथे आहे.



🔑कोकण रेल्वे🔑

स्थापना :1998

कोकण रेल्वे महाराष्ट्र ,गोवा ,कर्नाटक, केरळ (चार) राज्यातून प्रवास करते..

कोकण रेल्वे वरील सर्वात मोठा बोगदा (कारबुडे) हा असून लांबी (6.5 किमी) आहे..

कोकण रेल्वे वरील सर्वात उंच पूल (पानवल) हा असून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे .



🔑भारतीय अणुऊर्जा आयोग🔑

स्थापना: 10 डिसेंबर 1948

तत्कालीन भारताचे पंतप्रधान पंडित नेहरू हे होते.

अनुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष डॉक्टर होमी भाभा हे होते

अणुऊर्जा आयोगाने 1956 मध्ये भारतातील पहिली अणुभट्टी ""अप्सरा"" कार्यान्वित केली.

Combine & राज्यसेवा 2024 पूर्व: विज्ञान विषय A to Z strategy

विज्ञान विषयाची तयारी करताना लक्षात घ्यायला हवे की हा सर्वात जास्त input द्यावा लागणारा आणि सर्वात कमी output असणार विषय आहे. Combine पूर्व 23 मधील प्रश्न बघता आयोग या विषयातील काही प्रश्न बरेच अवघड विचारताना दिसतो.बरेच जण घाबरून गेले आणि त्यामुळे पेपर चे पुढील सोप्पे प्रश्न पण चुकले.पेपर च्या त्या एक तासात आपली मानसिकता स्थिर ठेवण प्रचंड गरजेचं आहे.त्यामुळे किती जरी अवघड प्रश्न आले तर घाबरायच कारण नाही, इतके अवघड प्रश्न कोणालाच येत नसतात हे लक्षात घ्या.आता तयारी विषयी बोलुयात.एक Basic तयारी करून average गुण तरी या विषयात आपल्याला मिळवता आले पाहिजे.विज्ञान या विषया वर पूर्व परीक्षेत 15 प्रश्न विचारले जातात.त्यातील काही प्रश्न हे विचित्र परंतु काही प्रश्न हे ठरलेल्या topics वर विचारले जातात.PYQ च analysis केल तर आपल्याला कळेल की शेवटी दिलेल्या topics वर भर दिला तर नक्कीच आपण यात साधारण गुण सहज मिळवू शकतो.


👉ज्यांना खूप कमी वेळात जास्त गुण घ्यायचे असतील तर त्यांनी विज्ञानाचे फक्त स्टेट बोर्ड 6 वी ते 10 वी केले आणि त्याजोडीला PYQ analysis+ PYQ info तोंड पाठ जरी केली तरी पुरेस आहे.संयुक्त पूर्व 23 मध्ये आलेला जर्मन सिल्व्हर चा प्रश्न PYQ होता आणि त्यात 3-4 प्रश्न स्टेट बोर्ड मधून आलेले दिसतात.


👉गट ब मुख्य पेपर-2 आणि गट क मुख्य पेपर-2 मध्ये विचारलेल्या विज्ञानाच्या प्रश्नांचे Analysis ही नक्की करा.संयुक्त पूर्व 23 पेक्षा त्या प्रश्नांची काठिण्य पातळी ही कमी होती.या 2 पेपर मध्ये प्राणी वर्गिकरणावर 4-5 प्रश्न आलेले दिसतात.

✅जीवशास्त्र | Biology:


1.प्राण्याचे वर्गीकरण

2.वनस्पती वर्गीकरण

3. ग्रंथी संप्रेरके आणि विकरे

4. पोषण द्रव्ये

5. रोग लक्षणे आणि चिन्हे (यात जीवाणूजन्य, विषाणूजन्य,कवके,असंसर्ग जन्य यांचा अभ्यास)


✅रसायनशास्त्र | Chemistry 


1. अणू आणि त्याची रचना

2. आवर्तसारणी 

3. मूलद्रव्यांचे वर्गीकरण

4. खनिजे आणि धातुके

5. किरणत्सारीता आणि आण्विक रसायनशास्त्र

6. कार्बनी संयुगे


✅भौतिशास्त्र | Physics 


1.प्रकाश

2.ध्वनी

3.विद्युत धारा

4.ऊर्जा,कार्य व शक्ती

5. गती आणि बल

6. प्रकाश,भिंग,आरसे

7.किरणोत्सारीता 


👉Science चे स्टेट बोर्ड मधील One liner Problems ही चांगले करा.त्यात जे फक्त फॉर्म्युला टाकून एक दोन स्टेप मध्ये सोडवायचे छोटे छोटे problems आहेत बऱ्याचदा तेच आलेले दिसतात.


👉विज्ञान विषय अभ्यासताना मुलभूत संकल्पना समजून घेऊन अभ्यास केला तरच तो विषय समजून गुण येतात.या साठी अभ्यास करताना जी संकल्पना समजली नाही ती youtube वर search करून Video स्वरूपात बघितली तर चांगली लक्षात राहील (उदा.Cell structure).YT वर बऱ्याच channel वर वरील सर्व topics मोफत उपलब्ध आहे. त्याचा अभ्यास करताना नक्कीच फायदा होईल.


🚨सर्वात महत्वाचे........❌

👉बरेच जण मला msg करतात की सर विज्ञानात गुण मिळत नाही,खूप टेन्शन आलंय.जेव्हा त्यांच्याशी बोलणं होत तेव्हा प्रत्यक्षात अस जाणवत की त्यांना मुळात गणितात 8-10 गुण असतात,Polity मध्ये 7-8 गुण असतात. लक्षात घ्या विज्ञान तुमची लीड किती असणारे? हे ठरवणार नाही. ते गणित बुध्दिमत्ता आणि polity ठरवणार आहे.संयुक्त पूर्व 23 मध्ये पूर्व गणित one liner होत.मुलांनी त्यात 18-19 गुण पण घेतले आहेत.

विज्ञानात कमी गुण मिळतात म्हणून आता त्यात PHD च करतो अस ही काही जन ठरवतात.परंतु तस करू नका.त्यात किती जरी अभ्यास केला तरी अमुक अमुक गुण मिळतीलच हे सांगता येत नाही. विज्ञानाचा अभ्यास करण्यापूर्वी स्वतः ला 2 प्रश्न विचारा.

1. मला गणित बुद्धिमातेत किमान 15 पेक्षा जास्त गुण मिळणार आहेत ना? इतका आत्मविश्र्वास आलंय ना?

2. मला Polity मध्ये 12+ गुण मिळणार आहेत ना?


या 2 प्रश्नाची उत्तरे नकारात्मक असतील तर पहिले 2 विषय focus करा. कारण ते predictable आहेत आणि input output ratio ही खूप high आहे.


👉विज्ञानाला घाबरायच काही कारण नाही...

Combine पूर्व 23 ला बरेच जण प्रश्न बघून घाबरून गेले.मुळात त्याच कारण हे आहे की आपल्याला पैकीच्या पैकी गुण मिळवायची मानसिकता.वर सांगितल्या प्रमाणे कमीत कमी वेळात अभ्यास करून Avg गुण मिळवायचे ध्येय ठरवा.जास्त टेन्शन घेऊ नका.

बाकी गणित,polity,Geo,Eco,His आहेच score करायला.💯


MPSC Combine Syllabus 2025

1) इतिहास – आधुनिक भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास.

2) भूगोल – महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश- रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे, इत्यादी.

3) अर्थव्यवस्था –

  • भारतीय अर्थव्यवस्था – राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्रय व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीति, इत्यादी.
  • शासकीय अर्थव्यवस्था – अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण, इत्यादी.

4) चालू घडामोडी – जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील.

5) राज्यशास्त्र

6) सामान्य विज्ञान – भौतिकशास्त्र (Physics), रसायनशास्त्र (Chemistry), प्राणिशास्त्र (Zoology), वनस्पतीशास्त्र (Botany), आरोग्यशास्त्र (Hygiene).

7) अंकगणित – बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश अपूर्णांक व टक्केवारी इत्यादी

8) बुध्दिमापन चाचणी – उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करु शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न.

MPSC Group B & Group C Combine Mains Syllabus 2023

MPSC Combine Mains : Paper 1

पेपर क्रमांक – 1 (मराठी, इंग्रजी या विषयामध्ये खालील घटक/ उपघटकांचा समावेश असेल.)

1) मराठी : सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे.

2) इंग्रजी : Common Vocabulary, Sentence structure, Grammar, use of Idioms and phrases & their meaning and comprehension of passage.

MPSC Combine Mains : Paper 2

पेपर क्रमांक – 2 (सामान्य क्षमता चाचणी या विषयामध्ये खालील घटक/ उपघटकांचा समावेश असेल.)

1) सामान्य बुध्दिमापन व आकलन : उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करु शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न.

2) चालू घडामोडी : जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील.

3) अंकगणित व सांख्यिकी

4) माहितीचा अधिकार अधिनियम 2005 (as updated) व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015

5) भारतीय संघ राज्यव्यवस्था, भारतीय राज्यघटना, स्थानिक स्वराज्य संस्था, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ व विधीमंडळ इत्यादी :

घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्वे, घटनेची महत्वाची कलमे / ठळक वैशिष्ट्ये, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्ये, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे- शिक्षण, युनीफॉर्म सिव्हील कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रीमंडळ कर्तव्ये, अधिकार व कार्य, राज्य विधीमंडळ विधानसभा, विधानपरिषद व त्यांचे सदस्य, अधिकार, कार्य व कर्तव्ये, विधी समित्या इत्यादी

6) आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास :

सामाजिक व आर्थिक जागृती (१८८५-१९४७), महत्वाच्या व्यक्तींचे कार्य, समाज सुधारकांचे कार्य, स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे, शिक्षणाचा परिणाम स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी, राष्ट्रीय चळवळी

7) भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल :

महाराष्ट्राचा व भारताचा प्राकृतिक (Physical) भूगोल, मुख्य प्राकृतिक (Physiographic) विभाग, हवामान शास्त्र (Climate), पर्जन्यमान व तापमान, पर्जन्यातील विभागवार बदल, नद्या, पर्वत व पठार, विविध भुरूपे, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती- वने व खनिजे, मानवी व सामाजिक भूगोल, लोकसंख्या, लोकसंख्येचे स्थानांतर (Migration of Population) व त्याचे उगम (Source) आणि इष्टस्थानावरील (Destination) परिणाम, ग्रामीण वस्त्या व तांडे, झोपडपट्ट्या व त्यांचे प्रश्न.

पर्यावरण – मानवी विकास व पर्यावरण, पर्यावरणपूरक विकास, नैसर्गिक साधनसंपत्तीचे संधारण विशेषतः वनसंधारण, विविध प्रकारची प्रदूषणे व पर्यावरणीय आपत्ती, पर्यावरण संवर्धनात कार्यरत असलेल्या राज्य / राष्ट्र/ जागतिक पातळीवरील संघटना / संस्था इत्यादी.

8) सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान :

  • अ) भौतिकशास्त्र (Physics)
  • ब) रसायनशास्त्र (Chemistry)
  • क) प्राणीशास्त्र (Zoology)
  • ड) वनस्पतीशास्त्र (Botany)
  • इ) दूर संवेदन, हवाई व ड्रोन छायाचित्रण, भौगोलिक माहिती प्रणाली व त्याचे उपयोजन (Remote Sensing, | Aerial and drone photography, Geographic Information System (GIS) and it’s application etc.)
  • फ) माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान (Information and communication technology.)

9) अर्थव्यवस्था व नियोजन, विकास विषयक अर्थशास्त्र :

समग्रलक्षी अर्थशास्त्र

  • १.१ समग्रलक्षी अर्थशास्त्र
  • १.२ वृद्धी आणि विकास
  • १.३ सार्वजनिक वित्त
  • १.४ आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल

भारतीय अर्थव्यवस्था

  • २.१ भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्थेची आव्हाने व आर्थिक सुधारणा
  • २.२ भारतीय शेती व ग्रामीण विकास
  • २.३ सहकार
  • २.४ मौद्रिक व वित्तीय क्षेत्र
  • २.५ सार्वजनिक वित्त आणि वित्तीय संस्था
  • २.६ उद्योग व सेवा क्षेत्र
  • २.७ पायाभूत सुविधा विकास
  • २.८ आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवल
  • २.९ महाराष्ट्राची अर्थव्यवस्था

रासायनिक गुणधर्मानुसार अग्निजन्य खडकांचे प्रकार :



🔘आम्लधर्मीय खडक : 

आम्लधर्मीय अग्निजन्य खडकात सिलिकाचे प्रमाण ८० टक्क्य़ांपर्यंत असते. अ‍ॅल्युमिनियम, मॅग्नेशियम व चुना यांचे प्रमाण २० टक्क्य़ांपर्यंत असते. हे खडक वजनाने हलके असून त्यांचा रंग फिकट पिवळा असतो. घट्ट लाव्हारसापासून त्याची निर्मिती होत असल्याने या खडकांची उंची जास्त, पण विस्तार कमी असतो. ग्रॅनाइट हे या प्रकारच्या खडकांचे उत्तम उदाहरण आहे.


🔘अल्कधर्मीय खडक : 

या प्रकारच्या अग्निजन्य खडकात ४०% सिलिका व ४०% मॅग्नेशियमचे प्रमाण असते. आयर्न ऑक्साइड व इतर पदार्थ २०% असतात. या खडकाचा रंग काळा असून त्याची झीज लवकर होते. बेसॉल्ट हे याचे उदाहरण आहे. पातळ लाव्हारसापासून हे खडक तयार होत असल्याने भूपृष्ठावर दूरवर पसरलेले असतात.


🔶अग्निजन्य खडकांचे गुणधर्म :

* अग्निजन्य खडकातील स्फटिक गोलाकार नसतात. निरनिराळ्या आकारांचे स्फटिक अनियमित स्वरूपाचे, एकसंध झालेले असतात.

* हे खडक अवाढव्य असून कठीण असतात. त्यांच्यामध्ये थर आढळत नाहीत, परंतु जोड असतात.

* या खडकांमध्ये छिद्र नसते. त्यात पाणी मुरत नाही.

* अग्निजन्य खडकांमध्ये प्राण्यांचे किंवा वनस्पतींचे अवशेष सापडत नाहीत, परंतु अनेक प्रकारची खनिजे आढळतात.

वनांचे प्रकार


🔸भारतीय वनांचे पुढीलप्रमाणे पाच प्रकारांत वर्गीकरण केले जाते.

1)उष्णप्रदेशीय सदाहरित वने:

--250 से.मी पेक्षा अधिक पावसाच्या भागात सदाहरित वने आढळतात.

◾️प्रमुख वृक्ष:महोगणी,रोजवूड,बिशपवुड,रबर,आंबा,जांभूळ,शिसव, साल,हिरडा,बांबू,वेत.

🔺उपयोग:इमारती,जहाज बांधणी इत्यादीसाठी.



2)उष्ण परदेशीय पानझडी वने:

--'मोसमी वने' या नावेही ओळखली जाणारी हि वने 200 से.मी.पर्यंत पाऊस असणाऱ्या मधप्रदेश,बिहार,ओरिसा,महाराष्ट्र या राज्यात आढळतात.

▪️उष्ण कोरड्या हवेत बाष्पीभवन टाळण्यासाठी हे वृक्ष पाने गाळतात.

◾️प्रमुख वृक्ष:साल,साग,पळस, सिसंम, खैर,अर्जुन,मोह,पिंपळ,अंजन,धावडा,चंदन,किंजल,कुंभी,बांबू.

🔸उपयोग: जहाजबांधणी,रेल्वे डबे,खेळणी इत्यादींसाठी.


3)उष्ण प्रदेशीय काटेरी वने व झुडपे:

--50 ते 75 से.मी.पावसाच्या प्रदेशात कच्छ, सौराष्ट्र,राजस्थान,पंजाब,हरियाणा,आणि महाराष्ट्रातील कमी पावसाच्या प्रदेशात हि वने आढळतात.

◾️प्रमुख वृक्ष: बाभूळ,सालाई, निवडुंग,हिवर, बोर,केतकी,नागफणी,यासारखी काटेरि झुडपे या वनात आढळतात.


4)पर्वतीय वने:

--120से.मी. पेक्षा अधिक पावसाच्या काश्मीर,उत्तराखंड,हिमाचल प्रदेश या राज्यांच्या उंच पर्वतीय भागात हि वने आढळतात.

🔸प्रमुख वृक्ष: पाइन,ओक,चेस्टनट, स्पृस,देवदार,फर, पोपलेर, बर्रच, मॅपल.

🔸उपयोग: लाकूड मऊ व वजनाने हलके असल्याने त्यापासून आग्कड्या, कागदाचा लगदा,कलाकुसरीच्या वस्तू बनविल्या जातात.


5)समुद्रकाठची वने: 

--किनाऱ्यावरील त्रिभुज प्रदेशात हि वने दाटीवाटीने आढळतात.

--पश्चिम बंगालमधील सुंदरबन,ओडिशा,आंध्रप्रदेश,तामिळनाडू,या राज्यांच्या किनारी प्रदेशात हे वृक्ष वाढतात.

🔸उपयोग:

1)बिहार,ओडिशा,मध्य प्रदेश या राज्यातू  लाखेचे उत्पादन होते.

2)लाखेचा उपयोग औषधे,रंग,ग्रोमोफोन रेकॉर्ड ,बांगड्यानिर्मिती अशा अनेक उदोगात केला जातो.

3)बाभळीची साल कातडी कमावण्यासाठी व औषधे बनविण्यासाठी उपयुक्त असते.




          🌷वन्य प्राणी🌷


➡️आसाम,केरळ,कर्नाटकच्या जंगलात हत्ती आढळतात.

➡️कच्छच्या रन: चिंकारा,काळवीट,जंगली गाढव,उंट.

➡️राजस्थानचे वाळवंट: लाल कोल्हा,जंगली मांजर.

➡️राजस्थानच्या मैदानात भारतीय रानकोंबडा, खरुची,गिधाड,गरुड,बहिरी ससाणा,मोर हे पक्षी आढळतात.

➡️पश्चिम बंगाल व आसाममध्ये - एकशिंगी गेंडा.

➡️सौराष्ट्रातील जुनागड गिरच्या रानात: सिंह.

➡️प.बंगालमधील सुंदरबानंत : वाघ हे प्राणी आढळतात.


नसर्गिक साधनसंपत्ती वने, प्राणी, खनिजे, शेती

♍️जग : वनसंपत्ती♍️ 

💠 उष्ण कटिबंधीय वने - यात सदाहरित वने व मॉन्सून वने हे दोन प्रकार पडतात. विषुववृत्तीय सदाहरित वने - या पट्ट्यात भरपूर पाऊस व अधिक तापमान असल्यामुळे या वाणांच्या वाढीस अनुकूल वातावरण आहे. या वनात रबर, महोगनी, सिकोना, या सारखे वृक्ष आढळतात. प्रमुख देश - काँगो, मलेशिया, इंडोनेशिया, ब्राझील.


💠 मान्सून वने - २०० सेमीच्या अधिक पावसाच्या क्षेत्रात ही वने आढळतात. १०० ते २०० सेमी पावसाच्या पाणयात प्रदेशात पानझडी वने आढळतात. या वनात साग, साल, शिसव, खैर, आंबा, जांभूळ, पळस, बाभूळ ही वने आढळतात. प्रमुख देश भारत, म्यानमार, श्रीलंका, थायलंड आहेत.


💠 समतीतोष्ण उष्ण कटिबंधीय पानझडी वने - या वनातील झाडांची पाने हिवाळ्यात झडतात. या वनात ओक, एल्म्स, वोलनट, पॉप्युलर, ओलिव्ह. प्रमुख देश - अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, इटली, रशिया.


💠 सचिपर्णी किंवा तैगा वने - विस्तृत प्रदेशात अणुकुचीदार, तेलगट, व मऊ पानांचे सूचिपर्णी वृक्ष आढळतात. पाईन, स्प्रूस, फर वगैरे. प्रमुख देश रशिया, फिनलँड, अमेरिका, कॅनडा.


♍️जग : पशुसंपत्ती ♍️

💠 समशीतोष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेश - ऊत्तर अमेरिका प्रेअरी प्रदेश, दक्षिण अमेरिका पंपास, आफ्रिका - व्हेल्ड.


💠 उष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेश - ब्राझीलचा डोंगराळ भाग, दक्षिण अमेरिकेतील ओरिनोको नदीचे खोरे, आफ्रिकेतील झैरे खोरे.


💠 परमुख मास उत्पादक प्रदेश - अमेरिका, कॅनडा, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया.


💠 परमुख दूध उत्पादक प्रदेश - न्यूझीलंड, डेन्मार्क, हॉलंड, फ्रान्स, जर्मनी, स्वीडन, भारत, अमेरिका,


💠परमुख लोकर उत्पादक देश - चीन, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, रशिया.


💠परमुख रेशीम उत्पादक देश - चीन, भारत


♍️जग : खनिजे व ऊर्जासाधने ♍️

💠 लोह - चीन, रशिया, ब्राझील, अमेरिका, भारत, व इतर देश.


💠मगनीज - रशियन राष्ट्रकुल, गाबाँ, ब्राझील, दक्षिण आफ्रिका, भारत, ऑस्ट्रलिया, व इतर देश.


💠 बॉक्सइट - ऑस्ट्रेलिया, गिनी, भारत, जमैका, ब्राझील, व इतर देश.


💠 जस्त - जपान, कॅनडा, चीन, रशिया, जर्मनी, व इतर देश.


💠 तांबे - अमेरिका, चिली, जपान, चीन, रशियन राष्ट्रकुल, जर्मनी


💠 चांदी - मेक्सिको, अमेरिका, पेरू, कॅनडा, रशिया.


💠 सोने - दक्षिण आफ्रिका, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, रशिया, कॅनडा, चीन, पेरू, घाणा, ग्वाटेमाला


💠 कथिल - चीन, ब्राझील, मलेशिया, थायलंड, व इतर देश.


💠निकेल - रशिया, कॅनडा, जपान, नॉर्वे, ऑस्ट्रेलिया.


💠 करोमियम - दक्षिण आफ्रिका, रशिया, भारत, झिम्बॉम्बे, फिनलँड.


💠शिसे - रशिया, अमेरिका, चीन, ऑस्ट्रेलिया, जपान, व इतर देश


💠 गधक - अमेरिका, कॅनडा, रशिया, पोलंड.


💠 खनिज तेल - सौदी अरेबिया, अमेरिका, रशिया, इराण, मेक्सिको, चीन, कुवैत, इराक, व्हेनेझुएला, रूमानिया, इंडोनेशिया, एकवाडोर.


💠 नसर्गिक वायू - रशिया, अमेरिका, कॅनडा, ग्रेट ब्रिटन, नेदरलँड्स.


💠 दगडी कोळसा - चीन, अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया, रशिया, दक्षिण आफ्रिका, व इतर देश.


💠 हिरे - काँगो, नामिबिया, लेसोथो, अंगोला, बोस्टवाना, दक्षिण आफ्रिका, रशिया, ऑस्ट्रेलिया, कॅनडा.


♍️जग : शेती ♍️

💠गहू - चीन, भारत, अमेरिका, फ्रान्स, रशिया, कॅनडा, व इतर देश


💠 तांदूळ - चीन, भारत, इंडोनेशिया, बांग्लादेश, व्हिएतनाम, इतर देश


💠मका - अमेरिका, चीन, ब्राझील, फ्रान्स, मेक्सिको, भारत, इतर देश


💠जवारी - अमेरिका, भारत, नयजीरिया, चीन, मेक्सिको, भारत, सुदान.


💠 बाजरी - भारत, नयजीरिया, चीन, नाइजर, बुर्किना, फासो.


💠 डाळी - भारत, चीन, ब्राझील, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया,


💠सोयाबीन - अमेरिका, ब्राझील, चीन.


💠 भईमूग - चीन, भारत, नयजीरिया, अमेरिका, इंडोनेशिया.


💠खोबरे - फिलिपिन्स, भारत, इंडोनेशिया,


💠 पामतेल - मलेशिया, इंडोनेशिया, व्हिएतनाम, मेक्सिको, व इतर देश.


💠 बटाटे - चीन, रशिया, अमेरिका, पोलंड, युक्रेन, भारत.


💠 सफरचंदे - चीन, अमेरिका, फ्रान्स, टर्की, इराण, भारत,


💠 चहा - भारत, चीन, केनिया, श्रीलंका, इंडोनेशिया,


💠 कॉफी - ब्राझील, युगांडा, कोलंबिया,


💠कशर - स्पेन, भारत, इराण.


💠 कोको बिया - आयव्हरी कोस्ट, घाणा, इंडोनेशिया, ब्राझील, नयजीरिया,


💠 कापूस - अमेरिका, चीन, भारत, पाकिस्तान, उझबेकिस्तान.


💠 ताग - भारत, बांग्लादेश, चीन, थायलंड.


💠 तबाखू - चीन, अमेरिका, भारत, ब्राझील,


💠 रबर - थायलंड, इंडोनेशिया, मलेशिया, भारत, चीन.


💠 ऊस - भारत, ब्राझील, चीन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया.


💠 फले - नेदरलँड्स, भारत, इझ्रायल, ब्राझील.


11 September 2025

चालू घडामोडी :- 10 सप्टेंबर 2025


◆ बहुपक्षीय लष्करी सराव ZAPAD 2025 रशियातील निझनी येथे आयोजित करण्यात आला होता.

◆ छत्तीसगड सरकारने आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनच्या मदतीने सर्व जिल्हा कारागृहांमधील कैद्यांसाठी योग आणि सुधारणा उपक्रम सुरू केले आहेत.

◆ केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी बेंगळुरू येथे 2025 च्या अंतराळावरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केले.

◆ 2025 च्या आंतरराष्ट्रीय अंतराळ परिषदेचा विषय "जागतिक प्रगतीसाठी जागेचा वापर: नवोन्मेष, धोरण आणि विकास" आहे.

◆ युनायटेड किंग्डम इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्सिंग ब्रिज (UKIIFB) हा लंडन शहर आणि भारतातील नीती आयोग संस्थेचा संयुक्त उपक्रम आहे.

◆ CAFA (मध्य आशियाई फुटबॉल असोसिएशन) नेशन्स कप 2025 मध्ये भारताने ओमान देशाला हरवून कांस्यपदक जिंकले.

◆ भारतीय लष्कराच्या पश्चिम कमांडकडून 'ऑपरेशन राहत' अंतर्गत पंजाब, हिमाचल प्रदेश आणि जम्मू आणि काश्मीरमधील पूरग्रस्त भागात मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.

◆ दरवर्षी 10 सप्टेंबर दिवशी जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन साजरा केला जातो.

◆ जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन 2024 ते 2026 पर्यंतची थीम "आत्महत्येवरील कथन बदलणे" आहे.

◆ इंजिनिअर्स इंडिया लिमिटेडने (EIL) आसाममधील नुमालीगढ येथे भारतातील पहिल्या बांबू-आधारित बायोरिफायनरी प्रकल्पाचे यांत्रिक कार्य यशस्वीरित्या पूर्ण केले आहे.

◆ महाराष्ट्राने सप्टेंबर 2025 मध्ये स्टार्टअप, उद्योजकता आणि नवोन्मेष धोरण सुरू केले आहे.

◆ केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांनी दुबईतील 28 व्या युनिव्हर्सल पोस्टल काँग्रेसमध्ये UPI-UPU इंटिग्रेशन प्रोजेक्ट लाँच केला.

◆ बिहार सरकारच्या कला, संस्कृती आणि युवा विभागाने मुख्यमंत्री गुरु-शिष्य परंपरा योजना सुरू केली आहे.

◆ केरळमधील पलक्कड येथील अनिवासी भारतीय उद्योगपती युनुस अहमद यांना कॅमल इंटरनॅशनल अवॉर्ड 2025 मिळाला आहे. [ते मिडल ईस्ट डॉटस्पेस कोवर्किंगचे कार्यकारी संचालक आहेत.]

 माहिती संकलन :- Avinash Chumble

10 September 2025

भारतातील प्रमुख नद्यांची खोरी आणि त्यांचे प्रमाण (%)

➤ खाली दिलेल्या नद्यांच्या खोरीचे क्षेत्रफळ भारतीय उपखंडाच्या एकूण भूप्रदेशात किती टक्के आहे, हे स्पष्टपणे दिले आहे:


➤ प्रमुख नद्या व त्यांच्या खोरीचे क्षेत्रफळ (प्रमाण टक्केवारीत):

➊ गंगा – २६.३%

➋ सिंधू – १०% (फक्त भारतातील भाग)

➌ गोदावरी – १०%

➍ कृष्णा – ८%

➎ ब्रह्मपुत्रा – ५.८% (फक्त भारतातील भाग)

➏ महानदी – ४%

➐ नर्मदा – ३.१%

➑ कावेरी – २.५%

➒ तापी – २.१३%

➓ पेन्नार – १.७%

⓫ माही – १.१%

⓬ साबरमती – ०.७%


🔹 टीप: वरील टक्केवारी भारतातील एकूण जलप्रवाही क्षेत्राच्या आधारावर आहे.

चालू घडामोडी


💠 भारताची हायड्रोजनवर चालणारी ट्रेन 🚂

नुकतीच याची यशस्वी चाचणी झाली

♦️ मार्ग – जींद ते सोनीपत (हरियाणा) – 89 किमी

♦️ हायड्रोजन ट्रेन तंत्रज्ञान वापरणारा भारत हा पाचवा देश (जर्मनी, फ्रान्स, स्वीडन, चीन नंतर)

♦️ इंजिन पॉवर – 1200 हॉर्सपॉवर (जगातील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन ट्रेन)

♦️ प्रवासी क्षमता – 2600 प्रवासी, 10 कोच

♦️ वेग – जास्तीत जास्त 110 किमी/तास

♦️ सरकारने 2024-25 पर्यंत 35 हायड्रोजन गाड्या विकसित करण्यासाठी 2800 कोटी रुपये वाटप केले


💠 भुवनेश्वर – पहिले भारतीय शहर : एकात्मिक उष्णता व शीतकरण कृती योजना 🌡️❄️

IHCAP - Integrated Heat and Cooling Action Plan सुरू

♦️ भुवनेश्वर महानगरपालिका (BMC) + iFOREST यांच्या संयुक्त विद्यमाने

♦️ उद्देश – वाढत्या उष्णतेच्या ताणाला आणि शीतकरणाच्या मागणीला तोंड देणे

♦️ सिंगापूर-ETH सेंटर (SEC) चा सहभाग


💠 ISRO चे दुसरे प्रक्षेपण संकुल 🚀

ठिकाण – कुलशेखरपट्टिनम, तुतीकोरिन जिल्हा (तमिळनाडू)

♦️ भारताचे दुसरे प्रक्षेपण केंद्र (पहिले – सतीश धवन स्पेस सेंटर, श्रीहरीकोटा, आंध्रप्रदेश)

♦️ बांधकाम पूर्णता – डिसेंबर 2026

♦️ एकूण जागा – 2300 एकर

♦️ मुख्य वापर – स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल (SSLV)

♦️ पायाभरणी – 28 फेब्रुवारी 2024

♦️ अंदाजे किंमत – ₹950 कोटी


💠 भारतीय पुरुष हॉकी संघाचा एशिया कप विजय 🏑

ठिकाण – राजगीर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, बिहार (29 ऑगस्ट – 7 सप्टेंबर)

♦️ विजेता – भारत (4-1 ने दक्षिण कोरिया वर मात)

♦️ उपविजेता – दक्षिण कोरिया, एकूण संघ – 8

♦️ भारताचा कर्णधार – हरमनप्रीत सिंह

♦️ प्लेयर ऑफ द मॅच – दिलप्रीत सिंग

♦️ भारताने 8 वर्षांनी हा कप जिंकला (मागील विजय: 2003, 2007, 2017, 2025)

♦️ 2026 हॉकी विश्वचषकासाठी थेट प्रवेश मिळवला

♦️ एकूण 39 गोल करून सर्वाधिक गोल करणारा संघ


💠 उपाध्यक्ष निवडणूक  🗳️

भारताचे उपराष्ट्रपती – दुसरे सर्वोच्च घटनात्मक पद, राज्यसभेचे पदसिद्ध सभापती

♦️ निवडणूक – लोकसभा व राज्यसभेतील सर्व सदस्यांकडून, गुप्त मतदान पद्धतीने

♦️ कार्यकाळ – 5 वर्षे

♦️ इतिहासात 4 वेळा बिनविरोध निवड झालेले उपराष्ट्रपती – 

✔️डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन (1952, 1957)

✔️मोहम्मद हिदायतुल्ला (1979)

✔️शंकर दयाल शर्मा (1987)


♦️ दोनदा निवडून आलेले उपराष्ट्रपती –

✔️डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

✔️डॉ. हमीद अन्सारी


♦️ महिला उमेदवार (दोघी पराभूत) –

✔️नजमा हेपतुल्ला

✔️मार्गारिट अल्वा


♦️ पहिले उपराष्ट्रपती – डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन (1952–1962)

नुकतीच प्रकाशित महत्त्वाची पुस्तके


🔹 The Great Conciliator – संजय चोप्रा


🔹 Leo: The Untold Story of Chennai Super Kings – पी.एस. रमन


🔹 March of Glory – के. अरुमुगम आणि एरोल डी’क्रूझ


🔹 The New Icon: Savarkar and the Facts – अरुण शौरी


🔹 I Am ? – गोपीचंद पी. हिंदुजा


🔹 दियासलाई – कैलाश सत्यार्थी (आत्मचरित्र)


🔹 How India Scaled Mount G-20 – अमिताभ कांत


🔹 India – 5,000 Years of History on the Subcontinent – ऑड्रे ट्रश्के


🔹 Woman! Life! FREEDOM! – चौरा मकारेमी


🔹 India’s Finance Ministers – ए.के. भट्टाचार्य


🔹 The Conscience Network – सुगत श्रीनिवासराजू


🔹 Confessions of a Shakespeare Addict

महत्त्वाच्या नवीन नियुक्ती व नेमणुका 2025


🔷 इग्लंड आणि वेल्समधील सर्वात कमी वयाची सॉलिसिटर ➤ कृशांगी मेश्राम


🔷 बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष ➤ अजय सिंग


🔷 टाटा सन्स संचालक ➤ नोएल एन टाटा


🔷 चलनविषयक धोरण समितीचे पदसिद्ध सदस्य ➤ इंद्रनील भट्टाचार्य


🔷 पंतप्रधान मोदींचे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ➤ अनिश दयाल सिंग


🔷 FSSAI चे नवीन CEO ➤ रजित पुन्हाणी


🔷 IMF च्या कार्यकारी संचालक ➤ उर्जित पटेल


🔷 विक्रम साराभाई अंतराळ केंद्र संचालक ➤ डॉ. ए. राजराजन


🔷 BARC (ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल) इंडियाचे नवीन अध्यक्ष ➤ गौरव बॅनर्जी


🔷 क्षमता निर्माण आयोग अध्यक्ष ➤ एस. राधा चौहान


🔷 NCC संचालनालय महाराष्ट्राचे अतिरिक्त महासंचालक ➤ विवेक त्यागी


🔷 दिल्ली पोलीस आयुक्त ➤ सतीश गोलचा

चालू घडामोडी :- 09 सप्टेंबर 2025



◆ 152 मतांनी विजयी होत सी.पी. राधाकृष्णन हे भारताचे 15 वे उपराष्ट्रपती बनले आहेत.

◆ 102 वर्षीय कोकिची अकुझावा हे जपान देशाचे सर्वोच्च आणि प्रतिष्ठित शिखर माउंट फुजी चढणारे सर्वात वयस्कर व्यक्ती ठरले आहेत.

◆ ‘Mother Mary Comes to Me’ हे पुस्तक अरुंधती रॉय यांनी लिहिले आहे.

◆ 2025 च्या यूएस ओपनमध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद कार्लोस अल्काराज ने जिंकले आहे. 

◆ दरवर्षी जागतिक फिजिओथेरपी दिन 8 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो.

◆ जागतिक फिजिओथेरपी दिन 2025 ची थीम "निरोगी वृद्धत्व" आहे

◆ भूपेंद्र गुप्ता यांची राष्ट्रीय जलविद्युत ऊर्जा महामंडळ (NHPC) च्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (CMD) पदी नियुक्ती झाली आहे.

◆ भारताने पुरुष हॉकी आशिया कप 2025 चे विजेतेपद जिंकले आहे. [अंतिम सामना बिहारमधील राजगीर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये झाला]

◆ 28वी आशियाई टेबल टेनिस टीम चॅम्पियनशिप ही ओडिशा राज्यातील भुवनेश्वर येथे 11 ते 15 ऑक्टोबर 2025 दरम्यान आयोजित केली जाईल.

◆ 82 वा व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2025 या काळात व्हेनिस, इटली येथे पार पडला. [आयोजक :
ला बिएनाले डी व्हेनेझिया]

◆ 82 व्या व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील प्रमुख विजेत्यांमध्ये जिम जार्मशच्या 'फादर मदर सिस्टर ब्रदर' या चित्रपटाला गोल्डन लायन (सर्वोच्च पुरस्कार) मिळाला आहे.

◆ अनुपर्णा रॉय यांनी व्हेनिस चित्रपट महोत्सवाच्या Orizzonti विभागात 'सॉन्ग्स ऑफ फॉरगॉटन ट्रीज' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार जिंकला आणि त्या या पुरस्काराच्या पहिल्या भारतीय महिला चित्रपट निर्मात्या ठरल्या आहेत. 

◆ उल्लास कार्यक्रमांतर्गत भारतातील चौथे पूर्ण साक्षर राज्य हिमाचल प्रदेश बनले आहे.
━━━━━━༺༻━━━━━━

08 September 2025

यूपीएससी अभ्यासक्रम मराठी मध्ये

 नमस्कार मित्रानो आज आपण या लेखात ( UPSC syllabus ) यूपीएससी अभ्यासक्रम बघणार आहोत. तसेच या लेखात आयएएस पूर्व परीक्षा अभ्यासक्रम, आयएएस मुख्य परीक्षा अभ्यासक्रम तसेच यूपीएससी मुलाखत या सर्व घटकांची माहिती समजून घेण्याचा प्रयत्न करू.


यूपीएससी परीक्षा अभ्यासक्रम:

 देशात यूपीएससी द्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये IAS ची परीक्षा हि सर्वोच्य स्थानी मानली जाते. आज आपण या मधील IAS च्या अभ्यासक्रमाबद्दल जाणून घेऊया. सध्याच्या वेळेला आणि भूतकाळाला जोडणारा यूपीएससी अभ्यासक्रमाचा उच्च स्तर म्हणजे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय काठीण्य पातळी असलेला अभ्यासक्रम आहे. Upsc.gov.in वर जाहीर केलेल्या यूपीएससीच्या अधिकृत अधिसूचने मध्ये यूपीएससी अभ्यासक्रमाचा उल्लेख केलेला आहे. यूपीएससी चा अभ्यासक्रम हा IAS च्या तयारीचा मूळ आणि IAS परीक्षेत निवडलेला पहिला घटक आहे. UPSC परीक्षेतील प्रत्येक गोष्ट आपण UPSC च्या अभ्यासक्रमामधून आपण समजून घेऊ शकतो. यूपीएससी चा अभ्यासक्रम समजून घेणे ही आयएएस परीक्षेत यशस्वी होण्याची पहिली पायरी आहे. उमेदवारांना हे समजून घेणे आवश्यक आहे की सध्याची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्ताची घटना ही सामान्य अध्ययन अभ्यासक्रमाच्या मूलभूत विषयांशी निगडीत आहे आणि सध्याच्या घडामोडींच्या सहाय्याने उमेदवार या प्रकरणाची प्रासंगिकता समजून घेऊ शकतात.

IAS प्रिलिम्स आणि IAS मुख्य परीक्षेसाठी दरवर्षी यूपीएससीच्या अधिसूचनेमध्ये आयएएस अभ्यासक्रम अधिसूचित केला जातो.IAS तयारीचा पहिला आवश्यक घटक म्हणजे IAS अभ्यासक्रमाची आपणास स्पष्ट समज असणे आवशक आहे. IAS प्रिलिम्स अभ्यासक्रम आणि IAS मुख्य अभ्यासक्रमाचा स्वतंत्रपणे यूपीएससी अधिसूचनेमध्ये उल्लेख केला आहे. परंतु IAS मुख्य परीक्षा अभ्यासक्रम म्हणजे IAS प्रिलिम्स अभ्यासक्रमाचा विस्तृत विस्तार आहे. उमेदवारने IAS अभ्यासक्रमाची खोली समजून घेणे आवश्यक आहे. यूपीएससी अभ्यासक्रम समजण्यासाठी मागील वर्षाचे प्रश्नपत्रिका टॉर्च म्हणून काम करतात. याशिवाय आयएएस च्या तयारीच्या मार्गावर राहण्यासाठी उमेदवारांना दररोजच्या चालू घडामोडींचा आभ्यास करणे आवश्यक आहे.

IAS टॉपर्स केलेल्या उमेदवारांचे योग्य विश्लेषण आणि IAS च्या मागील प्रश्नपत्रिकां मधून आयएएस तयारीला दिशा प्रदान करते. परीक्षेची खोली समजून घेण्यासाठी आणि त्यांचा अभ्यास नेहमीच आयएएस अभ्यासक्रमाच्या विषयाशी संबंधित ठेवण्यासाठी उमेदवारांना यूपीएससी अभ्यासक्रम अंतर्भूत करणे आवश्यक आहे. यूपीएससी चा अभ्यासक्रम IAS च्या तयारीची मर्यादा ठरवते. यूपीएससी मध्ये IAS अभ्यासक्रम वेगळ्या अस्तित्वात नसतो, ही त्यांची गतिशीलता आहे जी IAS परीक्षा अधिक जटिल बनवते. यूपीएससी परीक्षेत IAS अभ्यासक्रमात नमूद केलेले सर्व विषय IAS बनू पाहणारया परीक्षार्थींना, तसेच सामान्य माणसाला समजून घेण्याची मागणी करतात.


आयएएस अभ्यासक्रम 2022 – पूर्व परीक्षा

पेपरप्रश्न आणि वेळमार्क
सामान्य अध्ययन पेपर – ११०० प्रश्न200
सामान्य अध्ययन पेपर – २ (CSAT – Qualifying only)८० प्रश्न200 ( या मार्कांचा विचार केला जात नाही )
एकूण200




IAS – आयएएस पूर्व परीक्षा अभ्यासक्रम

आयएएस पूर्व परीक्षा अभ्यासक्रम 2022 – सामान्य अध्ययन पेपर १

  • राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्त्व असणार्‍या सध्याच्या घटना.
  • भारत आणि भारतीय राष्ट्रीय चळवळीचा इतिहास.
  • भारतीय आणि जागतिक भूगोल – भौतिक, सामाजिक, भारत आणि जगाचा आर्थिक भूगोल.
  • भारतीय राज्य व राज्यशास्त्र-राज्यघटना, राजकीय व्यवस्था, पंचायत राज, सार्वजनिक धोरण, मुलभूत हक्कांचे प्रश्न इ.
  • आर्थिक आणि सामाजिक विकास, टिकाऊ विकास, गरीबी, लोकसंख्याशास्त्र, सामाजिक क्षेत्रातील पुढाकार इ.
  • पर्यावरणीय विषय, जैव-विविधता आणि हवामान बदल – या विषयावर विषय विशेषतेची आवश्यकता नाही.
  • सामान्य विज्ञान.

प्रीलिम्स परीक्षेसाठी यूपीएससीने आयएएस अभ्यासक्रमातील चालू घडामोडींना अव्वल स्थान दिले आहे हे लक्षात घेणे महत्वाचे आहे. आपण असे म्हणू शकतो की आयएएस तयारीच्या दिशेने निर्णय घेण्यामध्ये हा एक घटक महत्वाचा आहे. आयएएसच्या इच्छुकांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्व असलेल्या सद्य घटनांचा विचार करून सर्व विषयांचा अभ्यास केला पाहिजे.

इतर सर्व विषय आयएएसच्या पूर्वपरीक्षा परीक्षेसाठी तितकेच महत्वाचे आहेत, परंतु उमेदवाराने आयएएसच्या तयारीत असंबद्ध विषय सोडण्याची सवय विकसित केली पाहिजे. भारतीय राजकारण हा असा एक विषय आहे जिथे उमेदवार नेत्यांच्या राजकीय विधानांबद्दल वाचण्यात वेळ वाया घालवतात. परंतु ही सवय मर्यादित ठेवण्याची आणि केवळ घटनात्मक कार्या पुरती मर्यादीत ठेवण्याची सूचना देते.


आयएएस प्रिलिम्स अभ्यासक्रम 2022 – सामान्य अध्ययन पेपर -2 (CSAT)

  • आकलन.
  • संवाद कौशल्यासह परस्पर वैयक्तिक कौशल्ये.
  • तार्किक तर्क आणि विश्लेषणात्मक क्षमता.
  • निर्णय घेणे आणि समस्या सोडवणे.
  • सामान्य मानसिक क्षमता.
  • मूलभूत संख्या (संख्या आणि त्यांचे संबंध, परिमाण च्या ऑर्डर इ.) (दहावी ची पातळी), डेटा स्पष्टीकरण (चार्ट, आलेख, सारण्या इ. – (दहावी ची पातळी)

IAS – आयएएस मुख्य परीक्षा अभ्यासक्रम

आयएएस मुख्य परीक्षा ही वर्णनात्मक ( पारंपारिक ) पेपर-आधारित परीक्षा आहे. ज्यात उमेदवारांना प्रश्नांसाठी लांब उत्तरे लिहिण्याची आवश्यकता असते. सामान्य अध्ययनच्या पेपर व्यतिरिक्त, एक निबंध पेपर आहे ज्यामध्ये उमेदवारांना दोन निबंध लिहिणे आवश्यक आहे.

आयएएस मुख्य परीक्षा विषय व त्यांचे गुण खाली दिले आहेत.

पेपरपेपर चे नावमार्क
घटनेच्या आठव्या परिशिष्टात समाविष्ट केलेल्या भाषांमधून उमेदवाराने
निवडलेल्या भारतीय भाषेपैकी एक भाषा. (केवळ पात्रता )
३०० (केवळ पात्रता)
इंग्रजी (केवळ पात्रता)३०० (केवळ पात्रता)
निबंध लेखन२५०
सामान्य अध्ययन पेपर – १२५०
सामान्य अध्ययन पेपर – २२५०
सामान्य अध्ययन पेपर – ३२५०
सामान्य अध्ययन पेपर – ४२५०
पर्यायी – विषय पेपर १२५०
पर्यायी – विषय पेपर २२५०
आयएएस मुख्य (लेखी)१७५०
आयएएस मुलाखत२७५
एकूण२०२५
UPSC syllabus in Marathi PDF

नावाप्रमाणेच आयएएस मुख्य परीक्षा ही उमेदवारांची सुध्दा मुख्य परीक्षा आहे. आयएएस निवड केवळ आयएएस मुख्य (लेखी) आणि आयएएस मुख्य (मुलाखत) मध्ये मिळालेल्या गुणांवर आधारित आहे. यूपीएससी अधिकृत अधिसूचनेमध्ये आयएएस अभ्यासक्रम विषयाची यादी वेळोवेळी प्रदान करते. यूपीएससी अभ्यासक्रम पेपरनिहाय स्वरुपात देण्यात आला आहे आणि उमेदवारांना त्याच पद्धतीने आयएएस परीक्षेची तयारी करणे आवश्यक आहे.

आयएएस अभ्यासक्रम – निबंध पेपर

यूपीएससीच्या अधिसूचनेत आयएएस निबंध पेपर अभ्यासक्रमाचा उल्लेख नाही. अधिकृत अधिसूचनेमध्ये फक्त एक विस्तृत रूपरेषा प्रदान केली गेली आहे. परंतु उमेदवारांकडून मिळालेल्या अपेक्षेचा उल्लेख अधिसूचनेत करण्यात आला आहे. “त्यांच्या कल्पना सुव्यवस्थित पद्धतीने मांडण्यासाठी आणि संक्षिप्तपणे लिहिण्यासाठी त्यांनी निबंधाच्या विषयाशी जूळून जाणे अपेक्षित आहे.

यूपीएससी ने नेहमीच तत्वज्ञान, लोक प्रशासन आणि आंतरराष्ट्रीय परिस्थिती यावर विषय दिला आहे. या निबंधातून उमेदवारांच्या जागतिक दृष्टिकोनाची चाचणी घेतली जाते. उमेदवाराने गुंतलेली समस्या कशी पाहिली आणि त्या समस्येचे निराकरण कसे सुचविले यावर या विषयातील यश अवलंबून असते.

आयएएस अभ्यासक्रम – सामान्य अध्ययन पेपर  


इंडियन हेरिटेज अँड कल्चर, हिस्ट्री अँड भूगोल ऑफ द वर्ल्ड सोसायटी.

  • भारतीय संस्कृती प्राचीन ते आधुनिक काळापर्यंत, कला, साहित्य आणि आर्किटेक्चरच्या मुख्य पैलूंचा समावेश.
  • आधुनिक भारतीय इतिहास अठराव्या शतकाच्या मध्य काळा पासून आजपर्यंतच्या महत्त्वपूर्ण घटना, व्यक्तिमत्त्व, आणि मुद्दे.
  • स्वातंत्र्य चळवळ – त्याचे विविध टप्पे आणि देशातील विविध भागातील महत्त्वपूर्ण योगदानकर्ते / योगदान.
  • देशातील स्वातंत्र्योत्तर एकत्रीकरण आणि पुनर्रचना.
  • जगाच्या इतिहासामध्ये औद्योगिक क्रांती, महायुद्धे, राष्ट्रीय सीमांची पुनर्रचना, वसाहतवाद, विस्तारवाद, साम्यवाद, भांडवलशाही, समाजवाद इत्यादी घटनांचा समावेश आहे.
  • भारतीय समाजातील विविध वैशिष्ट्ये आणि विविधता.
  • महिलाची भूमिका आणि महिलांची संघटना, लोकसंख्या आणि संबंधित समस्या, दारिद्र्य आणि विकासात्मक समस्या, शहरीकरण, त्यांच्या समस्या आणि त्यांचे उपाय.
  • भारतीय समाजावर जागतिकीकरणाचे परिणाम.
  • सामाजिक सशक्तीकरण, जातीयवाद, प्रादेशिकता आणि धर्मनिरपेक्षता.
  • जगाच्या भौतिक भूगोलातील ठळक वैशिष्ट्ये.
  • जगभरातील प्रमुख नैसर्गिक संसाधनांचे वितरण (दक्षिण आशिया आणि भारतीय उपखंड यांचा समावेश असलेले ) जगातील विविध भागात (भारतासह) प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय क्षेत्रातील उद्योगांच्या स्थानासाठी जबाबदार घटक.
  • भूकंप, सुनामी, ज्वालामुखीय, चक्रीवादळ इत्यादी, भौगोलिक वैशिष्ट्ये आणि त्यांचे भौगोलिक वैशिष्ट्यांमधील बदल, वनस्पती आणि जीव-जंतु आणि अशा बदलांचा परिणाम यासारख्या महत्त्वपूर्ण भौगोलिक घटना.

सामान्य अध्ययन पेपर – 

शासन, राज्यघटना, राजकारण, सामाजिक न्याय आणि आंतरराष्ट्रीय संबंध.

  • भारतीय राज्यघटना – ऐतिहासिक अधोरेखित, उत्क्रांती, वैशिष्ट्ये, दुरुस्ती, महत्त्वपूर्ण तरतुदी आणि मूलभूत रचना.
  • संघ आणि राज्ये यांची कार्ये आणि जबाबदारया, फेडरल स्ट्रक्चरशी संबंधित मुद्दे आणि आव्हाने, स्थानिक पातळीवरील अधिकार आणि वित्तपुरवठा आणि त्यातील आव्हाने.
  • विवाद निराकरण यंत्रणा यांचे विविध अवयव आणि संस्था यांच्यात शक्तींचे पृथक्करण.
  • लैंगिक संतुलन प्रतिबिंबित करणारे एक कार्यबल असण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे आणि महिला उमेदवारांना प्रोत्साहित केले जाते.
  • भारतीय घटनात्मक योजनेची इतर देशांच्या घटनेशी तुलना.
  • संसद व राज्य विधिमंडळ – रचना, कार्यप्रणाली, व्यवसायाचे आचरण, अधिकार व सुविधा व त्याद्वारे उद्भवणारे प्रश्न.
  • कार्यकारी आणि न्यायपालिकेची रचना, संघटना आणि कार्य-सरकारची मंत्रालये आणि विभाग, दबाव गट आणि औपचारिक / अनौपचारिक संघटना आणि त्यांची लोकसभेमधील भूमिका.
  • लोकप्रतिनिधी कायद्याची ठळक वैशिष्ट्ये.
  • विविध घटनात्मक पदाची कार्ये, अधिकार, कार्ये व जबाबदारया, विविध नेमणुका. वैधानिक, नियामक आणि विविध अर्ध-न्यायिक संस्था.
  • सरकारची धोरणे आणि विविध क्षेत्रातील विकासासाठी हस्तक्षेप आणि त्यांच्या अंमलबजावणीमुळे उद्भवणारे मुद्दे.
  • विकास प्रक्रिया आणि विकास उद्योग – स्वयंसेवी संस्था, बचत गट, विविध गट आणि संघटना, देणगीदार, धर्मादाय संस्था, संस्था आणि इतर भागधारकांची भूमिका.
  • केंद्र व राज्ये यांनी असुरक्षित लोकसंख्ये साठी कल्याणकारी योजना आणि या योजनांची कामगिरी, या असुरक्षित विभागांच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्या सुधारणेसाठी यंत्रणा, कायदे, संस्था स्थापन केले आहेत.
  • आरोग्य, शिक्षण, मानव संसाधन संबंधित सामाजिक क्षेत्र / सेवांच्या विकास आणि व्यवस्थापनाशी संबंधित मुद्दे.
  • दारिद्र्य आणि उपासमारीशी संबंधित मुद्दे.
  • शासन, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व, ई-गव्हर्नन्स अप्लिकेशन्स, मॉडेल्स, यश, मर्यादा आणि संभाव्यतेचे महत्त्वपूर्ण पैलू. नागरिकांची सनद, पारदर्शकता आणि जबाबदारी आणि संस्थात्मक आणि इतर उपाय.
  • लोकशाहीमध्ये नागरी सेवांची भूमिका.
  • भारत आणि त्याचे शेजारी राष्ट्रांशी संबंध.
  • द्विपक्षीय, प्रादेशिक आणि जागतिक गटबाजी, आणि भारत किंवा भारताच्या हितावर परिणाम करणारे करार.
  • विकसनशील देशांच्या राजकारणाचा आणि भारताच्या हितावर आधारित राजकारणाचा प्रभाव, भारतीय डायस्पोरा.
  • महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संस्था, आणि त्यांची रचना.

सामान्य अध्ययन पेपर – ३

  • तंत्रज्ञान, आर्थिक विकास, जैवविविधता, पर्यावरण, सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापन.
  • भारतीय अर्थव्यवस्था आणि नियोजन, गतिशीलता, संसाधनांचा विकास, विकास आणि रोजगाराशी संबंधित मुद्दे.
  • समावेशक वाढ आणि त्यातून उद्भवणारे मुद्दे.
  • सरकारी बजेट.
  • देशातील विविध भागात मुख्य पीक-पीक पद्धती, विविध प्रकारचे सिंचन आणि सिंचन प्रणाली, साठवण, शेती उत्पादनांचे वाहतूक आणि विपणन मुद्दे व संबंधित अडचणी, शेतकर्‍यांच्या मदतीसाठी ई-तंत्रज्ञान.
  • प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष शेती अनुदान आणि किमान आधारभूत किंमतींशी संबंधित मुद्दे. सार्वजनिक वितरण प्रणाली- उद्दीष्टे, कामकाज, मर्यादा, सुधार, बफर साठा आणि अन्न सुरक्षा, तंत्रज्ञान मोहिम, पशु संगोपन अर्थशास्त्र.
  • भारतातील अन्न प्रक्रिया आणि संबंधित उद्योग- व्याप्ती आणि महत्त्व, स्थान, अपस्ट्रीम आणि डाउनस्ट्रीम आवश्यकता, पुरवठा साखळी व्यवस्थापन.
  • भारतातील जमीन सुधारना.
  • अर्थव्यवस्थेवर उदारीकरणाचे परिणाम, औद्योगिक धोरणात बदल आणि औद्योगिक विकासावर त्यांचे परिणाम.
  • पायाभूत सुविधा: ऊर्जा, बंदरे, रस्ते, विमानतळ, रेल्वे इ.
  • गुंतवणूक मॉडेल.
  • विज्ञान आणि तंत्रज्ञान- घडामोडी आणि त्यांचे अनुप्रयोग आणि दैनंदिन जीवनातील प्रभाव.
  • विज्ञान आणि तंत्रज्ञानातील भारतीयांची उपलब्धि; तंत्रज्ञानाचे स्वदेशीकरण आणि नवीन तंत्रज्ञान विकसित करणे.
  • आयटी, स्पेस, कॉम्प्यूटर्स, रोबोटिक्स, नॅनो-टेक्नॉलॉजी, बायो-टेक्नॉलॉजी आणि बौद्धिक मालमत्ता हक्कांशी संबंधित विषयांमध्ये जागरूकता.
  • संवर्धन, पर्यावरण प्रदूषण आणि र्‍हास, पर्यावरणाचा प्रभाव मूल्यांकन.
  • आपत्ती व आपत्ती व्यवस्थापन
  • विकास आणि अतिरेकी प्रसार यांच्यात दुवा.
  • अंतर्गत सुरक्षेसाठी आव्हाने निर्माण करण्यात बाह्य राज्य आणि राज्य-नसलेल्या इतर घटकांची भूमिका.
  • संप्रेषण नेटवर्कद्वारे अंतर्गत सुरक्षेसाठी आव्हाने, अंतर्गत सुरक्षा आव्हानांमध्ये मीडिया आणि सोशल नेटवर्किंग साइट्सची भूमिका, सायबर सुरक्षाच्या मूलभूत गोष्टी, मनी लॉन्ड्रिंग आणि त्याचे प्रतिबंध.
  • सुरक्षा आव्हाने आणि सीमाभागातील त्यांचे व्यवस्थापन – दहशतवादासह संघटित गुन्ह्यांचा दुवा.
  • विविध सुरक्षा दले आणि एजन्सी आणि त्यांचा आदेश.

सामान्य अध्ययन पेपर – ४

नीतिशास्त्र, अखंडता आणि योग्यता या पेपरमध्ये उमेदवारांची वृत्ती आणि त्यांची अखंडता, सार्वजनिक जीवनातील संभाव्यता आणि त्याच्या समस्येचे निराकरण करण्याच्या दृष्टिकोनातून विविध प्रश्नांशी संबंधित असलेल्या समस्यांविषयी आणि समाजाशी वागताना होणारया संघर्षांबद्दलच्या प्रश्नांचा अभ्यास यात समावेश असेल. त्यासोबत खालील विस्तृत क्षेत्रे कव्हर केली जातील.

  • नीतिशास्त्र आणि मानवी इंटरफेस: मानवतेच्या नीतीमत्तेचे सार, निर्धारक आणि परिणाम, नैतिकतेचे परिमाण, नीतिशास्त्र – खाजगी आणि सार्वजनिक संबंधांमध्ये. मानवी मूल्ये – महान नेते, सुधारक आणि प्रशासकांचे जीवन आणि शिकवण्यांचे धडे, मूल्यमापन करण्यामध्ये कौटुंबिक समाज आणि शैक्षणिक संस्थांची भूमिका.
  • वृत्ती: सामग्री, रचना, कार्य त्याचा प्रभाव आणि विचार आणि वर्तन यांच्याशी संबंध, नैतिक आणि राजकीय दृष्टीकोन, सामाजिक प्रभाव आणि मन वळवणे.
  • नागरी सेवा, सचोटी, निःपक्षपातीपणा आणि वस्तुनिष्ठता, सार्वजनिक सेवेचे समर्पण, दुर्बल घटकांबद्दल सहानुभूती, सहिष्णुता आणि करुणेसाठी योग्यता आणि मूलभूत मूल्ये.
  • भावनिक बुद्धिमत्ता-संकल्पना आणि प्रशासन आणि कारभारामध्ये त्यांची उपयुक्तता आणि अनुप्रयोग.
  • भारत आणि जगातील नैतिक विचारवंतांचे आणि तत्वज्ञांचे योगदान.
  • सार्वजनिक / नागरी सेवेची मूल्ये आणि सार्वजनिक प्रशासनात नीतिशास्त्र. स्थिती आणि समस्या, सरकारी व खाजगी संस्थांमधील नैतिक चिंता व कोंडी, नैतिक मार्गदर्शनाचे स्रोत म्हणून कायदे, नियम, नियम आणि विवेक, जबाबदारी आणि नैतिक कारभार. प्रशासनात नैतिक आणि नैतिक मूल्यांचे बळकटीकरण, आंतरराष्ट्रीय संबंध आणि निधीमधील नैतिक मुद्दे, कॉर्पोरेट गव्हर्नन्स.
  • कारभाराची शक्यता: सार्वजनिक सेवेची संकल्पना, शासन आणि संभाव्यतेचा तात्विक आधार, सरकारमधील माहिती सामायिकरण आणि पारदर्शकता, माहितीचा अधिकार, संहिता.
  • नीतिशास्त्र, आचारसंहिता, नागरिकांची सनद, कार्यसंस्कृती, सेवा वितरणाची गुणवत्ता, सार्वजनिक निधीचा उपयोग, भ्रष्टाचाराची आव्हाने.
  • वरील मुद्द्यांवरील केस स्टडीज.

UPSC मध्ये पर्यायी विषय कोणते असतात?

पर्यायी – विषय पेपर १


आयएएस मुख्य परीक्षेत 25 पर्यायी विषय आहेत आणि त्यातील फक्त एक विषय उमेदवार निवडू शकतो. पर्यायी विषयाला एकून १७५० पैकी ५०० गुण आहेत. हे एकूण ३० % च्या आसपास आहे. म्हणून उमेदवारांना पर्यायी विषयांची काळजीपूर्वक निवड करण्याची सूचना देण्यात आली आहे कारण ते आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करू शकते किंवा तोडू शकते.

खाली आयएएस मुख्य वैकल्पिक विषयांची अधिकृत यादी आहे. उमेदवार पर्यायी विषय म्हणून कोणत्याही एका विषयाची निवड करू शकतात.


शेतीपशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय विज्ञानमानववंशशास्त्र
वनस्पतिशास्त्ररसायनशास्त्रसिव्हिल अभियांत्रिकी
वाणिज्य आणि लेखाअर्थशास्त्रविद्युत अभियांत्रिकी
भूगोलइतिहासभूशास्त्र
कायदाव्यवस्थापनगणित
वैद्यकीय विज्ञानयांत्रिकी अभियांत्रिकीतत्वज्ञान
भौतिकशास्त्रराज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंधमानसशास्त्र
सार्वजनिक प्रशासनसमाजशास्त्रसांख्यिकी
प्राणीशास्त्र




पर्यायी – विषय पेपर 

उमेदवार त्यांच्या वैकल्पिक विषय म्हणून पुढीलपैकी कोणत्याही भाषेचे साहित्य निवडू शकतात.

आसामीबंगालीडोगरी
बोडोहिंदीगुजराती
काश्मिरीकन्नडकोंकणी
मैथिलीमल्याळममणिपुरी
नेपाळीमराठीपंजाबी
संस्कृतओडियासंथाली
तामिळउर्दूतेलगू
सिंधीइंग्रजी

अधिक माहिती साठी या संकेत स्थळाला भेट देऊ शकता . संघ लोक सेवा आयोग

आपणास  हा लेख कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. जर आपणास इतर कोणत्याही विषया बद्दल माहिती हवी असेल तर आपण कमेंट करू शकता. जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी त्या विषयावर लेख उपलब्ध करून देऊ.