Ads

14 December 2021

भारताची अर्थव्यवस्था

भारतीय अर्थव्यवस्था ही अमेरिकन डॉलरच्या विनिमयाच्या दरात मोजल्यास जगातील १२ व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. भारताचे वार्षिक सकल उत्पन्न (Gross domestic product) १,०८९ अब्ज डॉलर एवढे आहे (२००७) क्रयशक्तीच्या समानतेचा (Purchasing power parity अथवा संक्षिप्तरूपात PPP) निष्कर्ष लावला तर भारताच्या अर्थव्यवस्थेचा जगात तिसरा क्रमांक लागतो. जगातील सर्वात वेगात वाढणाऱ्या प्रमूख अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा चीनपाठोपाठ दुसरा क्रमांक आहे. भारताचा आर्थिक विकासदर २००६-०७ ह्या आर्थिक वर्षात ९.४% एवढा होता. परंतु, अतिशय मोठ्या लोकसंख्येमुळे भारताचे वार्षिक दरडोई उत्पन्न मात्र ९६१ डॉलर एवढेच आहे, तर PPP वर आधारित वार्षिक दरडोई उत्पन्न ४,१८२ डॉलर एवढे आहे जागतिक बँक भारताची "अल्प-आय असणारी अर्थव्यवस्था" अशी गटवारी करते  भारताच्या अर्थव्यवस्थेत खूपच वैविध्य दिसून येते. शेती, हस्तव्यवसाय, कापडगिरण्या, उद्योगधंदे, उत्पादन आणि विविध प्रकारच्या सेवा अशा अनेक गोष्टींचा समावेश त्यात होतो. भारतात काम करणाऱ्या लोकांपैकी दोन-तृतियांश लोकांचा उदरनिर्वाह अजूनही शेती अथवा शेतीशी संबंधित उद्योगांवर चालतो, परंतु अर्थव्यवस्थेत विविध प्रकारच्या सेवांचाही वाढता वाटा आहे आणि अलिकडे सेवांवर आधारित व्यवसायही अर्थव्यवस्थेत अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. अलिकडील काही वर्षात भारतातील संगणक तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे तसेच उच्चशिक्षित आणि इंग्रजी बोलू शकणाऱ्या वाढत्या तरूण पिढीमुळे भारत हळूहळू सर्व जगाला बाह्यस्रोताच्या (outsourcing) सेवा पुरवणारा देश म्हणून भूमिका बजावायला लागला आहे. भारत हा अति-कुशल तंत्रज्ञ पुरवणारा जगातील सर्वात मोठा निर्यातक आहे. याचबरोबर उत्पादन, औषधनिर्माण, जैवतंत्रज्ञान, अतिसूक्ष्मतंत्रज्ञान, दूरसंचार, जहाजनिर्माण, विमाननिर्माण, आणि पर्यटन ह्या क्षेत्रांमधील भारताची क्षमताही वेगाने वाढताना दिसत आहे.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या बऱ्याचशा काळात भारतामध्ये समाजवादी अर्थव्यवस्थेचा मार्ग अवलंबण्यात आला. भारतात सुरुवातीस खाजगी क्षेत्राच्या अर्थव्यवस्थेतील सहभागावर, परदेशांशी व्यापारावर, आणि इतर देशांकडून भारतात होणाऱ्या थेट गुंतवणुकीवर कडक बंधने होती. मात्र, १९९० च्या दशकाच्या सुरुवातीपासून भारताने हळूहळू परकीय गुंतवणुकीवरील आणि व्यापारावरील नियंत्रण कमी करून, आपली अर्थव्यवस्था आर्थिक सुधारांद्वारे खुली करायला सुरुवात केली आहे. मात्र, राजकारणातील मतभेद आणि भिन्न विचारधारांमुळे, सरकारी उद्योगांचे खाजगीकरण आणि विशिष्ट क्षेत्रांमधील खाजगी आणि परकीय सहभागाला मार्ग खुला करणे अशा आर्थिक सुधारांमधील काही महत्त्वाच्या गोष्टी मंद गतीने पुढे सरकत आहेत.

अतिशय वेगात वाढणारी लोकसंख्या आणि वाढती आर्थिक आणि सामाजिक विषमता हे भारतापुढील महत्त्वाचे प्रश्न आहेत. गरीबी हाही गंभीर प्रश्न आहे, मात्र स्वातंत्रप्राप्तीनंतर गरीबीचे प्रमाण बरेच घटत असल्याचे दिसते. अधिकृत चाचणीनुसार २००४-०५ मध्ये भारतातील २७% लोक दारिद्र्यरेषेच्या खाली होते.दारिद्र्य कमी करण्यासाठी त्यांच्या अडचणी दूर करण्याची गरज आहे.

अर्थशास्त्र प्रश्नमालिका

1. वैकल्पिक खर्च हे या नावानेही ओळखले जातात:
सांडवण खर्च
मुद्रा खर्च
पर्यायी खर्च
बाह्य

* उत्तर - पर्यायी खर्च

2. जर वस्तूच्या उत्पादनात ऋण वाह्यता असतील तर खाजगी बाजार:
वस्तूच्या खूपच जास्त मात्रांचे उत्पादन खूपच कमी किंमतीला करतील 
वस्तूच्या खूपच जास्त मात्रांचे उत्पादन खूपच जास्त किंमतीला करतील
खूपच कमी मात्राचे उत्पादन खूपच जास्त किंमतीला करतील
खूपच कमी मात्राचे उत्पादन खूपच कमी किंमतीला करतील

*उत्तर - वस्तूच्या खूपच जास्त मात्रांचे उत्पादन खूपच कमी किंमतीला करतील 

3. जेव्हा β2 हा ३ पेक्षा जास्त असतो तेव्हा वक्र हा असा असतो
मेसोकुर्टिक 
प्लेटिकुर्टिक
डेमीकुर्टिक
लेप्टोकुर्टिक

* उत्तर - लेप्टोकुर्टिक

4. अवमूल्यन या कारणासाठी केले जाते:
निर्यातील चालना देण्यासाठी 
आर्थिक वृद्धीदर वाढविण्यासाठी
देशीय चलनाला जास्त किंमत देण्यासाठी
वाह्य अडचणींवर मात करण्यासाठी

* उत्तर - निर्यातील चालना देण्यासाठी 

5. खालीलपैकी कोणत्या वस्तूची मागणी अधिक लवचीक असते?
ज्या वस्तूला पर्यायी वस्तू नसतात 
ज्या वस्तूला जवळचे पर्याय असतात
ज्या वस्तूवर उत्पन्नाचा थोडा भाग खर्च केला जातो
ज्या वस्तूचा उपभोग लांबणीवर टाकता येत नाही

* उत्तर - ज्या वस्तूला जवळचे पर्याय असतात

6. भारतीय वस्त्रांची सर्वात जास्त आयात ........ या देशाकडून होते.
इटली
जर्मनी
सिंगापूर
अमेरिका

* उत्तर - अमेरिका

7. ‘अतिरिक्त क्षमता’ आणि विक्री खर्च हे कोणत्या बाजारातील उघोगसंस्थांचा गुणविशेष आहे?
मक्तेदारी 
पूर्ण स्पर्धा
मक्तेदारीयुक्त स्पर्धा
शुद्ध स्पर्धा

* उत्तर - मक्तेदारीयुक्त स्पर्धा

8. वायदा बाजार आयोग खालीलपैकी कोणता बाजार (Market) स्वतंत्रपंणे नियंत्रित करतो?
म्युच्युअल फड 
वस्तू विनिमय
भागभांडवल बाजार
परकीय चलन बाजार

* उत्तर - वस्तू विनिमय

9. निगम कराचा आधार हा असतो
कंपनीची एकूण उलाढाल
लाभांशा वितरणानंतर शिल्लक रहिलेला नफा
लाभांशा वितरणाआधीचा नफा
कंपनीने समुपयोजित केलेले भांडवले

* उत्तर - लाभांशा वितरणाआधीचा नफा

10.
(i) किंमत बदलाचा उत्पन्न परिणाम नेहमीच धन असती
(ii) किंमत बदलाचा पर्यायता परिणाम नेहमीच किंमत बदलाच्या विरुद्ध दिशेने जाणारा (ऋण) असतो
विधान (i) सत्य पण (ii) नाही 
विधान (ii) सत्य पण (i) नाही
विधान (i) आणि (ii) दोन्ही सत्य
विधान (i) आणि (ii) दोन्ही सत्य

* उत्तर - विधान (ii) सत्य पण (i) नाही
----------------------------------------------------------

योजनेचे नाव :- माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजना

◆योजनेचा उद्देश◆
१) लिंग निवडीस प्रतिबंध करून बालिकेचा जन्मदर वाढविणे. २) मुलींच्या जीवनमानाच्या सुरक्षेबद्दल खात्री देणे. ३) बालिकेला समान दर्जा व शैक्षणिक प्रोत्साहनाकरिता समाजात कायमस्वरूपी सामूहिक चळवळ निर्माण करणे. ४) मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे.

◆लाभाचा तपशील◆
१) दिनांक १ ऑगस्ट नंतर जन्माला आलेल्या तुमच्या मुलीच्या नावे रुपये ५० हजार बँकेत मुदत ठेव योजनेमध्ये गुंतवण्यात येईल. २) दिनांक १ ऑगस्ट आधी जन्माला आलेली १ मुलगी आणि १ ऑगस्ट नंतर जन्माला आलेली १ मुलगी अशा दोघींच्या नावे प्रत्येकी २५ हजार याप्रमाणे एकूण ५० हजार रुपयांच्या मुदत ठेवीची बँकेत गुंतवणूक केली जाईल. ३) गुंतवलेल्या रकमेवर मिळणारे व्याज मुलीला वयाच्या ६ वर्षी काढता येईल. ह्या मुद्दलाची पुन्हा गुंतवणूक करून पुन्हा ६ वर्षानंतर म्हणजेच मुलीच्या १२ व्या वर्षी पुन्हा व्याज काढता येईल. त्याच वेळी पुन्हा ह्या मुद्दलाची गुंतवणूक केल्यास मुलीच्या १८ व्या वर्षी ६ वर्षात जमा झालेले व्याज + मुद्दलाची गुंतवलेली रक्कम काढता येईल.

◆आवश्यक कागदपत्रे◆

●अधिवास प्रमाणपत्र- आई किंवा वडिलांचे
●आधार कार्ड
●उत्पन्नाचा दाखला
●कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केली असल्याबाबतचे प्रमाणपत्र
●बँक पासबुक
●मुलीचे जन्म प्रमाणपत्र
●शिधापत्रिका
●सावित्रीबाई फुले योजनेचा लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र

◆संपर्क◆
१) बाल विकास प्रकल्प अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बाल कल्याण)२) जवळच्या अंगणवाडी केंद्रातील सेविका

नरसिंघम समिती

भारतीय अर्थव्यवस्थेच्या 1991 च्या आर्थिक संकटानंतर जून 1991 मध्ये समितीची स्थापना केली.

भारतीय अर्थव्यवस्थेच्या १९९१ च्या आर्थिक संकटाच्या नंतर, जून  1991  मध्ये नरसिंहम समिती किंवा वित्तीय क्षेत्रीय सुधार समितीची स्थापना एम. नरसिम्हाम यांच्या अध्यक्षतेखाली केली गेली , ज्याने डिसेंबर 1991 मध्ये आपल्या शिफारसी सादर केल्या. नरसिंहम समितीची स्थापना 1998 मध्ये दुसर्‍या वर्षी झाली.

नरसिंहम समितीच्या शिफारशींमुळे भारतातील बँकिंग क्षमता वाढविण्यात मदत झाली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसाठी व्यापक स्वायत्ततेचा प्रस्ताव आहे. मोठ्या भारतीय बँकांच्या विलीनीकरणाची समितीने शिफारसही केली होती. त्याच समितीने नवीन खासगी बँका सुरू करण्याचे सुचविले, त्या आधारे सरकारने 1993 मध्ये परवानगी दिली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या देखरेखीखाली बँकेच्या मंडळाला राजकीय हस्तक्षेपापासून मुक्त ठेवण्याचा सल्लाही नरसिंहम समितीला देण्यात आला.

1991 च्या नरसिंहम समितीच्या शिफारशी

आर्थिक व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी एम. नरसिंहम यांनी1991 मध्ये खालील शिफारसी केल्या.

१. या समितीने तरलतेचे प्रमाण कमी करण्याची शिफारस केली. पुढील पाच वर्षांत कायदेशीर तरलता प्रमाण (एसएलआर) .5.38.5 टक्क्यांवरून २ percent टक्के करण्यात आला.

२. या समितीने निर्देशित कर्ज कार्यक्रम रद्द करण्याची शिफारस केली.

This. या समितीच्या मते व्याज दर बाजार दलांनी निश्चित केले पाहिजेत. व्याजदराच्या निर्धारणात रिझर्व्ह बँकेने हस्तक्षेप करू नये.

This. या समितीने बँकांची लेखा प्रणाली सुधारण्याबाबतही सांगितले.

This. या समितीने बँकांच्या कर्जाची वेळेवर पुनर्प्राप्ती करण्यासाठी विशेष न्यायाधिकरण स्थापनेवर जोर दिला.

Nara. नरसिंहम समितीने बँकांच्या पुनर्रचनेवरही भर दिला. या समितीनुसार or किंवा banks आंतरराष्ट्रीय बँका, or किंवा १० राष्ट्रीय बँका आणि काही स्थानिक बँका आणि काही ग्रामीण बँका एका देशाच्या आत असाव्यात.

Branch. या समितीने शाखा परवाना रद्द करण्याची शिफारस केली.

Nara. नरसिंहम समितीने आपल्या देशात परकीय बँकिंगला प्रोत्साहन देण्याची शिफारस केली.

This. या समितीने बँकांवरील दुहेरी नियंत्रण रद्द करण्याची शिफारस केली.

यापूर्वी वित्त मंत्रालय आणि रिझर्व्ह बँकेचे बँकांकडून नियंत्रण होते. केवळ रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखाली बँकांचे नियंत्रण करावे, अशी सूचना नरसिंहम समितीने केली.

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

१)  खालील विधाने विचारात घ्या : (STI Pri 2016)
अ) जागतिक अर्थ परिषदेने (WEF) जाहीर केलेल्या जगातील राहण्यायोग्य ६० सर्वोत्तम देशांच्या प्रारंभिक यादीमध्ये भारताचा २२ वा क्रमांक आहे.
ब) सदरहू यादी ही स्थिरता, सांस्कृतिक प्रभाव, उद्योजकता, आर्थिक प्रभाव आणि जीवनशैली यावर आधारित तयार करण्यात येते.
क) या यादीमध्ये स्विडनला सर्वोच्च देण्यात आले आहे.
ड) या यादीमध्ये जर्मनीचा दुसरा क्रमांक आहे.
वरीलपैकी कोणते/ ती विधान/ने बरोबर आहे.
१) फक्त अ
२) अ आणि ब
३) ब आणि क
४) क आणि ड

२) २०१० पासून मानवी विकास निर्देशांक (HDI)ची व्याख्या ही प्रत्येक पैलूतील यश मापन करणाऱ्या सामान्य निर्देशांकाचे --- अशी केली जाते.. (STI Pre - 2016)
१) गणित मध्य  २) भूमितीय मध्य
३) मध्यक मूल्य  ४) बहुलक मूल्य

३) यू.एन.डी.पी.च्या २०१३ अहवालात प्रसिद्ध झालेल्य मानव विकास निर्देशांकानूसार (HDI) पुढील देशाची उतरत्या क्रमाने मांडणी करा. (STI Pre. 2015)

अ) द. कोरीया         ब) जपान        क) अमेरिका        ड) नावे

पर्यायी उत्तरे -
१) अ,ब,क,ड २)क,ड,ब,अ
३) ब,अ,क,ड ४)ड,क,ब,अ

४)  मानव विकास निर्देशांक हा ---- वर आधारित आहेत. (STIMains 2015)

१) दरडोई उत्पन्न
२) दरडोई उत्पन्न, सरासरी आयुमर्यादा आणि प्रौढ साक्षरता
३) सरासरी आयुमर्यादा, प्रौढ साक्षता आणि संयुक्त प्रवेशदर
४) सरासरी आयुमर्यादा, प्रौढ साक्षरता संयुक्त प्रवेश दर
आणि वास्तव स्थुल राष्ट्रीय उत्पादन

५) महाराष्ट्र मानव विकास कार्यक्रम विषयक विधाने लक्षात घ्या व अचुक उत्तर द्या? (Tax Assit. 2015)
अ) महाराष्ट्रातील अतिमागास जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक उंचावण्यासाठी हा कार्यक्रम सुरु करण्यात आला.
ब) महाराष्ट्र शासनाने जून २०१५ मध्ये महाराष्ट्र मानव विकास मिशनची स्थापना केली.
क) महाराष्ट्र मानव विकास अहवालानुसार महाराष्ट्रातील १२ अतिमागास जिल्ह्यासाठी ह्या कार्यक्रमांचा प्रारंभ केला.
ड) या अंतर्गत मानव विकासासाठी तालुका हा घटक मानण्यात आला..
इ) या अंतर्गत मानव विकासासाठी जिल्हा हा घटक निर्धारित करण्यात आला.
पर्यायी उत्तरे
१) अ,ब,क,इ अचुक; तर ड चूक
२) अ,क,इ अचुक; तर ब,ड चूक
३) अ,क,ड अचुक; तर ब,इ चूक
४) वरील सर्व अचुक

उत्तरे :- प्रश्न १ - २, प्रश्न २ - २, प्रश्न ३-  ४, प्रश्न ४ - २, प्रश्न ५ - ३.

1) पिकाची पाण्याची गरज काढताना सर्वाधिक पीक गुणांक कोणत्या वाढीच्या अवस्थेत असतो ?
   1) प्रजोत्पादन अवस्था    2) रोप अवस्था
   3) जोमदार शाखीय अवस्था  4) पक्वता अवस्था
उत्तर :- 1

2) पाण्याची धूप रोखण्याकरिता कृषीविद्या विषयक कोणकोणत्या उपाय योजना आहेत ?
   अ) पिकाची निवड व जमिनीची मशागत      ब) पट्टा पेर आणि जमिनीवरचे अच्छदान
   क) समतल बांधबंधीस्‍ती आणि वनस्पतीजन्य अडथळे    ड) वरीलपैकी कोणतेही नाही
   1) अ आणि ब फक्त    2) ब आणि क फक्त   
   3) अ आणि क फक्त    4) ड फक्त
उत्तर :- 1

3) ज्या प्रक्रियेमध्ये पावसाचे पाणी तळे, जलाशयामध्ये गोळा करून साठविले जाते आणि ते पिकांना जेव्हा पाहिजे तेव्हा पुरवणी
     सिंचन म्हणून दिले जाते त्यास .......................... असे म्हणतात.
   1) पाऊस संचयन    2) पाणी संचयन   
   3) संरक्षित सिंचन    4) सिंचन
उत्तर :- 2

4) दोन भिन्न अवस्थांमधील आकर्षणास .......................... असे म्हणतात.
   1) अधेझ्न (Adhesion)      2) कोहीझन (Cohesion)   
   3) प्रतिसारण (Repulsion)    4) वरीलपैकी एकही नाही
उत्तर :- 1

5) कमी दर्जाचे / प्रतिचे पाणी सिंचनाच्या ................... या पध्दतीमध्ये वापरले जाऊ शकते.
   1) तुषार सिंचन      2) ठिबक सिंचन   
   3) सरी – वरंबा पध्दत    4) मोकाट पध्दत
उत्तर :- 2

13 December 2021

महाराष्ट्रातील नवीन जिल्हयांची निर्मिती


*·        सिंधुदुर्ग----------------1 मे 1981 ला रत्नागिरी जिल्ह्यातून विभाजन
*·        जालना-----------------1 मे 1981 ला औरंगाबाद जिल्ह्यातून विभाजन
*·        लातूर-------------------16 ऑगस्ट 1982 ला उस्मानाबाद जिल्ह्यातून विभाजन
*·        गडचिरोली--------------26 ऑगस्ट 1982 ला चंद्रपुर जिल्ह्यातून विभाजन
*·        मुंबई उपनगर---------1990 ला बृहन्मुबई मधून विभाजन
*·        वाशिम-----------------1 जुलै 1998 ला अकोला जिल्ह्यातून विभाजन
*·        नंदुरबार----------------1 जुलै 1998 ला धुळे जिल्ह्यातून विभाजन
*·        हिंगोली----------------1 मे 1999 ला परभणी जिल्ह्यातून विभाजन
*·        गोंदिया----------------1 मे 1999 ला भंडारा जिल्ह्यातून विभाजन
*·        पालघर-----------------2 जून 2014 ला ठाणे जिल्ह्यातून विभाजन

जाणून घ्या :- ट्रेन व स्टेशनचे प्रकार

● *पॅसेंजर ट्रेन* : जी ट्रेन स्टेशनवर थांबते तिला पॅसेंजर ट्रेन म्हणतात.

● *एक्सप्रेस ट्रेन* : जी ट्रेन प्रमुख स्टेशनवर थांबते आणि तिचा वेग जास्त असतो तिला एक्सप्रेस ट्रेन म्हणतात.

● *मेल ट्रेन* : जी ट्रेन विशेष करून डाक सामुग्री घेवून जाते तिला मेल ट्रेन म्हणतात.

● *सुपरफास्ट ट्रेन* : या गाडीची गती तासी 100 कि.मी. पेक्षा जास्त असते म्हणून तिला सुपर फास्ट ट्रेन म्हणतात.

● *गुडस ट्रेन* : ही ट्रेन सामान किंवा वस्तु वाहून नेते. मालगाडीच्या डब्याला वॅगन आणि प्रवासी डब्याला कोच म्हणतात.

● *बुलेट ट्रेन* : या ट्रेनची गती सर्वात जास्त असते. ही ट्रेन विद्युत चुंबकीय बलच्या आधारे चालते.

● *मोनो ट्रेन* : ही ट्रेन पृथ्वीच्यावर अर्थात आकाशात रोप-वे सारखी चालते.

● *जनता एक्सप्रेस* : या ट्रेनमध्ये फक्त व्दितीय श्रेणीचे डब्बे असते.

● *अप ट्रेन* : जी ट्रेन मुख्यालयापसून निर्धारित स्टेशनपर्यंत जाते या प्रकाराला अप ट्रेन म्हणतात.

● *डाउन ट्रेन* : जी ट्रेन मुख्यालयाकडे निर्धारित स्टेशनपासून परत येते या गाडीला डाउन ट्रेन म्हणतात.

💁‍♂️ असे आहेत रेल्वे स्टेशनचे प्रकार :

1. *वे साईड स्टेशन* : यावरुन एकाच दिशेने गाड्या जाणे-येणे करतात.

2. *जंक्शन स्टेशन* : यावरुन वेगवेगळ्या दिशेने गाड्या (मार्ग) जातात.

3. *टर्मिनल स्टेशन* : हे स्टेशन शेवटचे असते.

4. *भूमिगत स्टेशन* : हे स्टेशन जमिनीच्या खाली असते.

Mpsc pre exam samples questions

1) एल्फिन्स्टनने सुरू केलेली जमीन महसुल निश्चितीची पद्धत म्हणजे ____ यांचा समन्वय होता.

A. मक्ता, रयतवारी, कायमधारा

B. रयतवारी, महालवारी, मौजेवारी

C. मौजेवारी, कायमधारा, रयतवारी✍️

D. मक्ता, मौजेवारी, महालवारी.

________________

2) पुढीलपैकी कोणते पुस्तक प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहीले नाही ?

A. वक्तृत्त्व - कला आणि साधना

B. आमच्या आठवणी✍️

C. दगलबाज शिवाजी

D. माझी जीवन गाथा.

________________

3) होमरूल चळवळी बद्दल पुढीलपैकी काय खरे नाही ?

A. खापर्डेनी अमरावतीला होमरूल लीगची शाखा सुरू केली.

B. अमरावती होमरूल लीगचे खापर्ड अध्यक्ष होते.

C. यवतमाळ होमरूल लीगचे अध्यक्ष महादेव अणे होते✍️

D. नागपूरच्या परिसरात मुंजेनी होमरूल लीगच्या शाखा स्थापन केल्या.

________________

4) ते लहूजींचे शिष्य होते.
लहूजींना त्यांचा अभिमान होता.

ते लहूजींकडून मल्लविद्या, तलवार चालवणे, दांडपट्टा, बंदूक चालविणे इत्यादी शिकले.

त्यांचा कल सामाजिक सुधारणांकडे होता.

ते कोण?

A. जोतीबा फुले✍️

B. यशवंत फुले

C. मेघाजी लोखंडे

D. नारायण लोखंडे.

________________

5) खालील व्यक्तींपैकी कोणी फग्र्युसन महाविद्यालयात गणिताचे अध्यापन केले होते ?

(a) बी.जी. टिळक
(b) जी.के. गोखले

(c) धों.के. कर्वे

पर्यायी उत्तरे :

A. (a), (b) फक्त

B. (b), (c) फक्त

C. (a), (c) फक्त

D. (a), (b), (c). ✍️

________________

6) पंडित नेहरूंनी लिहिलेल्या पुस्तकांची कालक्रमानुसार मांडणी करा.
(a) : ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्टरी

(b) द डिस्कवरी ऑफ इंडिया

(c) अँन ऑटोबायोग्राफी

पर्यायी उत्तरे :

A. (a), (b), (c)

B. (b), (c), (a)

C. (c), (a), (b)

D. (a), (c), (b). ✍️

________________

7) 'रयत शिक्षण संस्थेचे' _ हे उद्दिष्ट नव्हते.

A. मागासलेल्या जातीत शिक्षणाची अभिरुची निर्माण करणे.

B. मुलाना स्वावलंबी, उद्योगी व शीलवान बनविणे.

C. मागासलेल्या जातीतील गरीब विद्यार्थांना मोफत शिक्षण देणे.

D. समाजाच्या उद्धारासाठी निस्वार्थी स्त्रि-पुरुषांचे संघ निर्माण करणे.✍️

__________________

8) 1942 च्या भूमिगत क्रांतीकारकांचे नेतृत्व केल्या बद्दल दैनिक ट्रिब्यूनने '1942 ची झाँशीची राणी' म्हणून कोणाचा सन्मान केला होता?

A. सुचेता कृपलानी

B. मृदूला साराभाई

C. अरुणा असफ अली✍️

D. लीलाताई पाटील.

________________

9) _ यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे महाराष्ट्र सविनय कायदेभंगाची समिती स्थापन झाली होती.

A. शंकरराव देव✍️

B. जमनालाल बजाज

C. के.एफ्. नरिमन

D. किशोरलाल मश्रूवाला.

________________

10) महात्मा गांधींच्या भारतातील प्रारंभीच्या आंदोलनांचा कालक्रम लावा.

A. अहमदाबाद, चंपारण, खेड़ा

B. खेडा, अहमदाबाद, चंपारण

C. चंपारण, अहमदाबाद, खेड़ा ✍️

D. चंपारण, खेडा, अहमदाबाद.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या मंत्रीच्या हस्ते डिजिटल शिक्षणाविषयी “प्रज्ञाता” या नावाने मार्गदर्शक तत्त्वांची एक यादी जाहीर करण्यात आली?

(A) रमेश पोखरियाल ‘निशंक’✅✅
(B) रजनीश कुमार
(C) स्मृती इराणी
(D) प्रकाश जावडेकर

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

____________ या देशाच्या वतीने ‘कोरोशुअर’ या नावाखाली जगातला सर्वात स्वस्त ठरलेला ‘कोविड-19 निदान संच’ विकसित करण्यात आला आहे.

(A) भारत✅✅
(B) संयुक्त राज्ये अमेरिका
(C) ग्रेटब्रिटन
(D) चीन

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या व्यक्तीला 2020 सालासाठी "इन्फ्रा बिझिनेस लीडर ऑफ द इयर”चा पुरस्कार देण्यात आला?

(A) सत्य नदेला
(B) टीम कूक
(C) रीड हेस्टिंग
(D) वेद प्रकाश दुडेजा✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या व्यक्तीला आशियाई विकास बँक (ADB) यामध्ये खासगी क्षेत्रातील कामकाज आणि सार्वजनिक-खासगी भागीदारी विभागाचे नवीन उपाध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले?

(A) अबीर लवासा
(B) नागेंद्र सिंग
(C) अशोक लवासा✅✅
(D) सुशील चंद्र

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोरोना साथीच्या काळात, कोणत्या देशाने इंग्लंडविरुद्धचा पहिला कसोटी सामना जिंकला?

(A) वेस्ट इंडीज✅✅
(B) ऑस्ट्रेलिया
(C) श्रीलंका
(D) पाकिस्तान

पहिले वृत्तपत्र म्हणून बाळशास्त्री जांभेकरांचे "दर्पण' पत्र ओळखले जाते.



🅾वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी, 1832च्या प्रारंभी त्यांनी मुंबईतून हे वृत्तपत्र सुरू केले. पितामह दादाभाई नौरोजी यांच्यासारख्या थोर पुरुषांचे ते गुरू होत. न्या. ना. ग. चंदावरकरांनी त्यांचा पश्‍चिम भारतातील "आद्य ऋषी' असा त्यांचा सार्थ गौरव केला होता.

🅾"दर्पण'चा पहिला अंक शुक्रवार, दि. 6 जानेवारी 1832 रोजी प्रसिद्ध झाला. पहिले काही महिने हे पत्र पाक्षिकच होते. 4 मे 1832च्या अंकापासून ते साप्ताहिक स्वरूपात निघू लागले. हे वृत्तपत्र आठ पानी होते व त्यात पानातील दोन स्तंभांपैकी डावीकडच्या स्तंभात इंग्रजी मजकूर व समोर उजवीकडील स्तंभात त्याचे मराठी भाषांतर असे. गंमत म्हणजे दर्पणच्या अंकाला "कागद' असे म्हटले जात असे.

🅾 तसा उल्लेख खुद्द बाळशास्त्री करीत असत. त्या काळी कोणत्याही वृत्तपत्राचा खप 300-400 प्रती याच्या पुढे नसे. वर्षभरातच दर्पणने 300ची मजल गाठली होती. हे पत्र सुमारे साडेआठ वर्षे चालले. 26 जून 1840 रोजी शेवटचा अंक प्रसिद्ध होऊन ते बंद पडले.

🅾"दर्पण'ची ओळख आद्य मराठी पत्र अशी असली, तरी त्याच्या अगोदर एक मराठी वृत्तपत्र अस्तित्वात असल्याचा पुरावा मिळतो. त्या वृत्तपत्राचे नाव "मुंबापूर वर्तमान' असे होते. रविवार, दि. 20 जुलै 1828 रोजी त्याचा पहिला अंक प्रसिद्ध झाला होता.

🅾 या पत्राच्या पहिल्या अंकात प्रसिद्ध झालेला एक "विक्षिप्त' यांचा लेख "बॉम्बे गॅझेट' या मुंबईतील इंग्रजी पत्राने आपल्या 23 जुलै 1828 च्या अंकात प्रसिद्ध केला होता. लंडन येथे निघणाऱ्या "एशियाटिक जर्नल ऍण्ड मंथली रजिस्टर (फॉर इंडिया ऍण्ड इट्‌स डिपेन्डन्सीज)' या मासिकाच्या फेब्रुवारी 1829च्या अंकात "महरट्टा न्यूजपेपर' या मथळ्याच्या वृत्तात "मुंबापूर वर्तमान' या पत्राचा उल्लेख होता.

🅾हे वृत्त "दी बॉम्बे गॅझेट' या पत्राच्या 23 जुलै 1828 च्या अंकावरून घेतल्याचाही उल्लेख एशियाटिक जर्नलमध्ये होता. "बॉम्बे गॅझेट' मध्ये 9 जुलै 1828च्या अंकात या पत्राची इंग्रजी व मराठी जाहिरातही प्रसिद्ध झाली होती. परंतु या पत्राचे चालक, संपादक, प्रकाशक कोण होते, ते किती काळ चालले याची काहीच माहिती उपलब्ध नाही. एक मात्र खरे की ते 20 जुलै 1828 रोजी सुरू झाले. यावरून "मुंबई वर्तमान' हेच मराठीतील आद्य वृत्तपत्र असे म्हणता येईल.

🅾पण त्यातही एक गोची अशी, की "बॉम्बे गॅझेट'च्या प्रास्ताविकात "एक नवीन मराठी वर्तमान पत्र' असा उल्लेख आहे. याचा अर्थ त्यापूर्वी एखादे पत्र निघत होते की काय, अशी शंका "मराठी वृत्तपत्रांचा इतिहास'कर्ते रा. के. लेले यांनी व्यक्त केली आहे.

🅾परंतु कालानुक्रमे "दर्पण' हे पहिले मराठी वृत्तपत्र म्हणता आले नाही, तरी मराठी वृत्तपत्राचा पाया घालून त्याची थोर परंपरा सुरू करण्याचा मान "दर्पण'कडेच जातो, असा लेले यांचा अभिप्राय आहे.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

बंगालमध्ये र्लॉड क्लाईव्ह पुरस्कृत दुहेरी राज्यव्यवस्था -

🔸बंगालच्या नबाबने फेब्रुवारी 1765 मध्ये निजामतीचे (लष्करी, फौजदारी, न्यायनिवाडा) अधिकार कंपनीकडे दिले.

🔹16 ऑगस्ट 1765 मध्ये अलाहाबादच्या तहानुसार सम्राट शहाआलमने बंगाल, बिहार, ओरिसाचे दिवाणीचे (कर, वसूल, करणे) अधिकार कंपनीला दिले.

🔸त्यामुळे कंपनीच्या हाती निजामती आणि दिवाणीचे आकार केंदि्रत झाले. पंरतू प्रत्यक्षात सुपूर्ण राजकीय सज्ञ्ल्त्;ाा कंपनीने स्वत:कडे घेतली नाही कारण ब्रिटिश संसदेचे कंपनीवरील नियंत्रण व हस्तक्षेपाची आणि अंतर्गत बाहय शत्रु यांची कंपनीला भीती वाटत होती.

🔸भारतीय शासनपध्दतीची माहिती असणारा प्रशिक्षित कर्मचारी वर्ग नव्हता, म्हणून र्लॉड क्लाईव्हने दुहेरी राज्यव्यवस्था सुरु केली कंपनीने दिवाणी करवसुली व न्यायदान अधिकार नबाबाकडे ठेवला व्यापार सैन्य, परराष्ट्र, व्यवहार आणि खजिना इ. महत्वाची कार्ये कंपनीने स्वत:कडे ठेवली अशा प्रकारे नबाब आणि कंपनी यांच्यात सज्ञ्ल्त्;ाा विभागली गेली म्हणूनच तिला दुहेरी राज्यव्यस्था असे म्हणतात.

🔹या कार्यासाठी बंगालच्या नबाबला 53 लाख रुपयांची पेन्शन देण्यात आली. 1765-1772 या काळात बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात होती.

🔹या व्यवस्थेमुळे गोंधळ व भाषांतरांवरूनरष्टाचार निर्माण झाल्याने 1772 मध्ये वॉरन हेस्टिंग्जने बंद केली.