Ads

04 May 2022

भारतीय-उत्कीर्ण-लेखसंग्रह-योजना

भारतीय-उत्कीर्ण-लेखसंग्रह-योजना

भारतीय-उत्कीर्ण-लेखसंग्रह

ह्या योजनेचे इंग्रजी नाव आहे कॉर्पस् इन्स्क्रिप्शनम् इंडिकॅरम. ह्या योजनेची सुरुवात इ.स. १८७८ साली झाली. ह्या योजनेचे फलित म्हणजे आजवर ह्या योजनेद्वारे प्रसिद्ध झालेले सात खंड आणि तदनुषगांने भारतातल्या काही प्राचीन राजघराण्यांच्या पुराभिलेखांचे सुसूत्र एकत्रीकरण. प्राचीन भारतीय इतिहासलेखनाच्या दृष्टीने पुराभिलेखांना अन्यन्यसाधारण महत्त्व आहे. हे लेखन कठीण अशा पदार्थावर अणकुचीदार साधन वापरून कोरून केले जात असे त्यामुळे या लेखांस कोरीव लेख वा उत्कीर्ण लेख असेही म्हटले जाते.

पार्श्वभूमी
संपादन करा
सन १७७४ मध्ये कोलकत्यास वॉरेन हेस्टिंगच्या अध्यक्षतेखाली एशियाटिक सोसायटीची स्थापना झाली.[१] इतिहास, इतिहासपूर्वकाळ ह्यांचे आधुनिक शास्त्रांच्या सहाय्याने संशोधन, संकलन आणि लेखन करण्यासाठी स्थापन झालेली भारतातील ही पहिलीच संस्था होती. 'एशियाटिक रिसर्चेस' हे या सोसायटीचे नियतकालिक होते. त्याचा पहिला अंक सन १७७८ मध्ये प्रसिद्ध झाला. भारतातून प्रसिद्ध होणारे संशाेधनपर असे हे पहिलेच नियतकालिक. त्यानंतर इंडियन अ‌‌ण्टिक्वेरी, एपिग्राफिया इंडिया, इंडियन हिस्टॉरिकल क्वॉर्टर्ली, रॉयल एशियाटिक सोसायटीच्या मुंबई शाखेचे नियतकालिक अशी काही पुरातत्त्व या विषयाशी निगडित नियतकालिके नियमित प्रकाशित होऊ लागली.

योजनेचे सूतोवाच
संपादन करा
पुढे सन १८३७ मध्ये प्राचीन-भारतीय-लिपिशास्त्रज्ञ जेम्स प्रिन्सेप यांनी भारतीय उपखंडातून त्याकाळापर्यंत उजेडात आलेल्या साऱ्या कोरीव लेखांच्या एकत्रीकरणाविषयी एक सूचना केली.[१] त्यानूसार प्राचीन भारतीय राजवंशांच्या कोरीव लेखांचे संपादन आणि प्रकाशन 'कॉर्पस् इन्स्क्रिप्शनम् इंडिकॅरम' (भारतीय उत्कीर्ण लेखसंग्रह) या ग्रंथमालेद्वारे करण्याचे स्वातंत्र्यपूर्वकाळातील भारतीय पुरातत्त्व विभागाने ठरविले. मात्र ही योजना सुरू होऊन त्या योजनेतील पहिला ग्रंथ प्रकाशित होण्यास मात्र सन १८८८ उजाडावे लागले.

सुरुवात
संपादन करा
या ग्रंथमालेतला, पहिला ग्रंथ 'इन्स्क्रिप्शन्स ऑफ अशोक (अशोकाचे कोरीव लेख)' १८८८ मध्ये प्रसिद्ध झाला. या ग्रंथाच्या पहिल्या आवृत्तीचे संपादन 'जनरल अलेक्झांडर कनिंगहॅम' यांनी केले होते. पुढे सन १९२५मध्ये द्वितीयावृत्तीचे संपादन 'हुल्श' यांनी केले होते. भारतीय पुरातत्त्वखात्याच्या संकेतस्थळावर उपलब्ध असणाऱ्या माहितीनुसार या द्वितीयावृत्तीचे सन १९९१ मध्ये पुनर्मुद्रणही झालेले आहे.

दुसरा ग्रंथ दोन भागांत प्रसिद्ध झाला. सन १९२२ मध्ये या भागाच्या संपादनाची  एकत्रित जबाबदारी अनुक्रमे प्रा. रॅपसन् आणि प्रा.हेन्रिक लुडेर् यांच्यावर टाकण्यात आली. पहिला भाग 'खरोष्टी इन्स्क्रिप्शन्सचा (खरोष्टी कोरीव लेख)'. हा भाग प्रा. रॅपसन् यांच्याकडे होता. मात्र इतर जबाबदाऱ्यांमुळे त्यांनी आपल्या पदाचाच राजीनामा दिला. पुढे ही जबाबदारी प्रा. स्टेन कोनो यांच्यावर टाकण्यात आली.[१] प्रा. कोनो यांनी तयार केलेला हा ग्रंथ साधारण सन १९२८-२९ च्या दरम्यान खरोष्टी इन्स्क्रिप्शन्स हा भाग प्रसिद्ध झाला असावा (नेमक्या काळाची माहिती मिळाली नाही). याचेही सन १९९१ मध्ये पुनर्मुद्रणही झालेले आहे.

इतिहासाच्या अभ्यासाची साधने

इतिहासाच्या अभ्यासाची साधने

भूतकाळाविषयीची माहिती ज्यातून मिळू शकते अशा साधनांना इतिहासाच्या अभ्यासाची साधने म्हणता येते. भूतकाळाविषयी माहिती देणारी अशी साधने विविध स्वरूपाची असतात. त्यांचे वर्गीकरण विविध निकष लावून करण्यात येते. भूतकाळात घडलेल्या घटनांची कालक्रमानुसार शास्त्रशुद्ध आणि पद्धतशीर दिलेली माहिती म्हणजे इतिहास होय व्यक्ती समाज स्थळ आणि काळ हे चार घटक इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. इतिहास हा विश्वसनीय पुराव्यांवर आधारित असतो या पुराव्यांना इतिहासाची साधने असे म्हणतात. साधनांचे भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने असे वर्गीकरण करता येते. त्याचप्रमाणे इतिहासात साधनांचे मुल्यमापन देखील केले जाते. ज्या ऐतिहासिक घटनेचा अभ्यास करायचा असतो तिच्याशी संबंधित अशा अनेक बाबींचा विचार करावा लागतो. त्यासाठी ऐतिहासिक साधनांचा आधार घेतला जातो, ही साधने तपासून घेणे गरजेचे असते.त्याचा अस्सलपणा तपासावा लागतो. या साधनांचा तारतम्याने व चिकित्सकपणे वापर करणे आवश्‍यक असते.

डावीकडे, शिवछत्रपतींचे २२ सप्टें १६७८ रोजीचे पत्र, मोडी प्रत
उजवीकडे, त्याचे देवनागरी लिप्यंतर
शिवछत्रपतींचे २२ सप्टें १६७८ रोजीच्या पत्राची मूळ मोडी प्रत व त्याचे देवनागरी लिप्यंतर. मराठेशाहीच्या अभ्यासात अशी मोडी लिपीतील पत्रे प्राथमिक साधनांमध्ये मोडतात व त्यांचे अभ्यासाच्या दृष्टीने महत्व जास्त समजले जाते.
भौतिक स्वरूपावर आधारित वर्गीकरण
संपादन करा
पुरातत्त्वीय साधने
उत्कीर्ण लेख
पुराणवस्तू
नाणी
अभिलेख
विविध दस्तऐवज
पत्रव्यवहार
प्रतिमा: काष्ट, धातु आणि दगड यापासून बनविलेल्या प्रतिमा
कोरीव लेख : १)शिलालेख २)स्तंभालेख ३)ताम्रपट
इतिहासाची प्रमाण साधने
संपादन करा
कागदपत्रांचा आधार
शासकीय आदेश व कागदपत्रे
राजाने काढलेली फर्माने
आज्ञापत्रे,
करारनामे,
तहनामे
आपापसातील पत्रव्यवहार
पोलीस व न्यायखात्याचे अहवाल
प्रत्यक्ष सहभागी व्यक्तीचा पत्रव्यवहार
शासकीय इतिवृत्ते
पुरातत्त्वीय साधने
(१) प्राचीन वास्तूंचे अवशेष (२) मातीची खापरे (३) बौद्ध विहार( लेण्या) (४) अलंकार (५) मंदिर (६) मूर्ती (७) शिलालेख (८) ताम्रपट (९) नाणी (१०) अभिलेख(११) प्राण्यांची हाडे(12) जळालेले धान्य (१३)मानवी हाडे.

इतिहास भूतकाळातील घटना

इतिहास
भूतकाळातील घटना

इतिहास म्हणजे भूतकाळात घडलेल्या घटनांची क्रमब्ध व सूसंगत रितीने मांडणी होय. इतिहास ह्या शब्दाची व्युत्पत्ती इतिहास = 'इति+ह+आस' हे असे घडले अशी सांगण्यात येते आहे{{|आपटे|१९५७-१९५९}}. व्युत्पत्तीद्वारे दिसून येणाऱ्या अर्थाचा विचार केला तर इतिहास म्हणजे केवळ भूतकाळात काय घडले ह्याची नोंद इतकाच अर्थ निघतो. परंतु ह्या शब्दाला इतर अर्थही कालौघात लगडलेले आढळतात. आधुनिक काळात केवळ पूर्ववृत्ताचे निवेदन इतकाच अर्थ ह्या संज्ञेला राहिला नसून ते निवेदन साधार, वास्तव असणेही त्यात गृहीत धरलेले असते. जो इतिहास विसरतो त्याला इतिहास विसरतो.

प्रसिद्ध इतिहासकार ई. एच. कार यांच्यामते भूतकाळ व वर्तमानकाळ यातील न संपणारा संवाद म्हणजे इतिहास होय टायम बी यांनी म्हटल्याप्रमाणे सर्व संस्कृतींचा अभ्यास म्हणजे इतिहास होय इतिहासामध्ये संस्कृतीचा उदय असतो अभ्यासला जातो असं टाईमबी म्हणतात इतिहास ही स्वतंत्रपणे अभ्यासाची एक शाखा आहे या शाखेमध्ये शास्त्रीय आधारावर इतिहासाचा अभ्यास आणि संशोधन केले जाते मानवी संस्कृतीचा उदय आणि अस्त म्हणजे इतिहास असे टाईमबी म्हणतात इतिहासाचे प्रकार खालीलप्रमाणे :

१) भूतकाळातील घटनाचे ज्ञान करून देणारे ज्ञान

२) इतिहासाची शास्त्रीय पद्धत

३) इतिहास आणि आपला भूतकाळ

४) भूतकाळ आणि भविष्यकाळ

प्राचीन साहित्यात इतिहास
संपादन करा

पुराणकथा या एकेकाळचा इतिहास आहेत.
राजशेखर आपल्या काव्यमीमांसेत लिहितात–‘सच द्विविधा परक्रिया पुराकल्पाभ्याम् |’त्याचा अर्थ असा–परक्रिया व पुराकल्प अशी इतिहासाची द्विविध गती आहे/होय.भारतीय साहित्यामध्ये इतिहासाला वेदाच्या बरोबरीने महत्त्व दिलेले आहे. ऋग्वेदसंहितेत इतिहास सयुक्त मंत्राचा संग्रह आहे. तसेच नारद लिखित छांदोग्योपनिषद या ग्रंथात इतिहास-पुराणाला पंचम वेद म्हटले आहे. संस्कृत वाङ्‌मयामध्ये कथेच्या रूपाने इतिहास आलेला आढळतो. कौटिल्य याने केलेल्या व्याख्येप्रमाणे इतिहासात पुराणे, इतिवृत्त, आख्यायिका, उदाहरण, धर्मशास्त्र व अर्थशास्त्र इतक्या विषयांचा समावेश होतो.

धर्मार्थकाममोक्षाणा उपदेशसमन्वितम्| पुरावृत्त कथायुक्तं इतिहासं प्रचक्षते||{ श्रीधर स्वामी कृत विष्णू पुराण टीका}

अनेक शिलालेख हे महत्त्वाचे असतात

आधुनिक व्याख्या
संपादन करा
हॅपाल्ड यांच्या मते 'इतिहास' हा अनुभवांचा नंदादीप होय.' इतिहास म्हणजे मानवजातीच्या जीवनप्रवाहाचा अभ्यास असेही म्हणता येते. इतिहासाचे प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक असे कालखंड असू शकतात. इतिहासाच्या कोणत्याही कालखंडाचा अभ्यास म्हणजे त्या कालखंडाच्या राजकीय, सामाजिक, आíथक, प्रशासकीय, सांस्कृतिक, धार्मिक बाजूंचा अभ्यास असतो.या शिवाय या सर्वांचा एकमेकांशी असलेला संबंध आणि परिणाम यांचा अभ्यास याचाही अंतर्भाव इतिहासात होतो. इतिहास या विषयाचे आकलन करून घेताना प्राचीन व मध्ययुगीन इतिहासाच्या इतर घटकांची आवश्यक किमान माहिती व संस्कृतीचा सखोल अभ्यास असा दृष्टिकोन असावा लागतो.इतिहासातून माणूस नक्कीच काहीतरी शिकू शकतो असा दावा केला आहे.

इतिहासकार अनंत सदाशिव अळतेकर

अनंत सदाशिव अळतेकर

अनंत सदाशिव अळतेकर (३० ऑगस्ट, इ.स. १८९८ - २५ नोव्हेंबर, इ.स. १९५९) हे प्राचीन भारतीय इतिहास, शिलालेख, ताम्रपट, नाणी यांचे अभ्यासक व इतिहासकार होते. त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कागल या गावी झाला.[१] संस्कृत व इतिहास विषयाचे व्यासंगी अभ्यासक असलेल्या आळतेकर यांनी बनारस हिंदू विद्यापीठात व पाटणा विद्यापीठात इतिहासाचे प्राध्यापक म्हणून काम केले इतिहासाच्या क्षेत्रातील मौलिक संशोधन आणि त्यांना काशी प्रसाद जयस्वाल रिसर्च इन्स्टिट्यूटचे संचालक पद मिळाले शिलालेख ताम्रपट पुरावशेष नानी यांचा त्यांनी विशेष असा अभ्यास केला सर्वांगिन चिकित्सक संशोधन वस्तुनिष्ठ दृष्टिकोन ही त्यांच्या लिखाणाची वैशिष्ट्ये होती शिक्षण क्षेत्रात पाश्चात्त्यांच्या तुलनेत प्राचीन भारत मागासलेला होता हा समज त्यांनी एज्युकेशन इन इंडिया या ग्रंथाद्वारे दूर केला भारतामध्ये संपन्न उच्च दर्जाची विद्यापीठे होती परदेशी विद्यार्थी देखील येथे विद्यार्जनासाठी साठी येत असल्याचे त्यांनी नमूद केले प्राचीन काळातील स्त्री जीवनाचा अभ्यास करून प्राचीन काळी स्त्रियांना समाजात वरचा दर्जा होता, मध्ययुगात धार्मिक रूढी कर्मकांड व परंपरा अंधश्रद्धा यांचे स्तोम निर्माण झाल्यानंतर स्त्रियांचा दर्जा घसरत गेला असं प्रतिपादन त्यांनी केलं. मनुस्मृती शुक्रनीति अर्थशास्त्र बौद्ध वांड्ग्मय याचा सूक्ष्म अभ्यास करून भारतामध्ये गणराज्य व प्रतिनिधी राज्य होती. राजसत्तेचे वेगवेगळे सिद्धांत प्रचलित होते हे त्यांनी सिद्ध करण्याचा प्रयत्न केला महाभारताच्या व्यासपर्व तील राजनीतीचा विचार त्यांनी उलगडून दाखवला. शालिवाहन शक, सवंत्सर यावर लेख लिहून कालगणनेत सुस्पष्टता आणली. इतिहास लेखनात शास्त्रीय दृष्टिकोन व साधनांचे चिकित्सक परीक्षण यावर त्यांनी भर दिला.

कारकीर्द
संपादन करा
पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून त्यांनी इ.स. १९१९ साली बी.ए. व इ.स. १९२२ साली एम.ए. केले. बनारस हिंदु विद्यापीठात प्राचीन भारतीय इतिहास व संस्कृती या विषयाचे प्राध्यापक म्हणून त्यांनी अध्यापन केले. त्यानंतर इ.स. १९४९ साली ते पाटणा विद्यापीठात प्राचीन भारतीय इतिहास विभागाचे प्रमुख झाले. नंतर पाटण्यातच के.पी. जयस्वाल संशोधन संस्थेचे संचालक म्हणूनही त्यांनी काम केले. अळतेकरांनी बहुतेक ग्रंथलेखन इंग्रजीत केलेले आहे. या ग्रंथांतून भारतीय इतिहासातील वेगवेगळ्या कालखंडांची सांगोपांग माहिती मिळते. त्यांच्या काही ग्रंथांचे मराठीतूनही अनुवाद झालेले आहेत. 'प्राचीन भारतीय शिक्षणपद्धती' या ग्रंथातून वेदकालापासून ते इ.स. १२०० पर्यंतच्या कालातील भारतीय शिक्षणपद्धतीविषयीचे चिकित्सापूर्ण विवेचन अळतेकरांनी केलेले आहे.[२] 'प्राचीन भारतातील स्त्रियांचे सामाजिक स्थान व परिस्थिती' या ग्रंथातून प्राचीन साहित्य, शिलालेख, शिल्पे, प्रवासवृत्ते इत्यादी साधनांच्या आधारे भारतातील स्त्रियांचे शिक्षण, विवाह, घटस्फोट, सतीची चाल, स्त्रियांची वेशभूषा याबाबतची माहिती त्यांनी दिलेली आहे. इ.स. १९४० पासून इ.स. १९५४ पर्यंत त्यांनी भारतीय नाणक परिषदेच्या ज्ञानपत्रिकेचे संपादनही केले. इ.स. १९५८ साली वैशालीजवळ पुरातत्त्वीय उत्खनन करत असताना अळतेकरांना गौतम बुद्धांचे काही पुरावशेष मिळाले. हे अवशेष म्हणजे गौतम बुद्धांच्या अस्थि असल्याचे मानले जाते जे सध्या पाटणा वस्तुसंग्रहालयात ठेवण्यात आलेले आहेत.[३]

लेखन
संपादन करा
'गुजरात आणि काठेवाडमधील मुख्य नगरांचा इतिहास'
'पश्चिम भारतातील ग्रामसंस्थांचा इतिहास' (इ.स. १९२७)
'राष्ट्रकूट आणि त्यांचा काळ' (डी.लिट्. साठी लिहिलेला प्रबंध)
'प्राचीन भारतीय शिक्षणपद्धती' (इ.स. १९३४)
'शिलाहारांचा इतिहास' (इ.स. १९३५)
'बनारसचा इतिहास' (इ.स. १९३७)
'प्राचीन भारतातील स्त्रियांचे सामाजिक स्थान व परिस्थिती' (इ.स. १९३८)
'द एज ऑफ द वाकाटकाज ॲंड द गुप्ताज' (इ.स. १९४६)
'स्टेट ॲन्ड गव्हर्नमेंट एन्शन्ट इंडिया'
'कॅटलॉग ऑफ द गुप्त गोल्ड कॉइन्स इन द बयाना होर्ड' (इ.स. १९५६)
'कॉर्पस ऑफ गुप्त कॉइन्स'.

प्राचीन भारताची रूपरेषा

प्राचीन भारताची रूपरेषा
निःसंदिग्धीकरण पृष्ठ

खाली प्राचीन भारताच्या रूपरेषेसंदर्भात थोडक्यात माहिती दिली आहे:

प्राचीन भारत - पूर्व एेतिहासिक काळापासून, मध्यवर्ती भारताच्या सुरुवातीपर्यंतचा भारत. हा काळ साधारणपणे, गुप्त साम्राजाच्या अंतापर्यंत समजला जातो.

प्राचीन भारताचा भूगोल
संपादन करा
प्राचीन भारतात आजचे भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान (काही भाग), बांग्लादेश, नेपाळ, भूतान व ब्रह्मदेश या देशांचा समावेश होता.

प्राचीन भारताचा सामान्य इतिहास
संपादन करा
भारतीय इतिहासाचे कालावधीकरण
संपादन करा
सविस्तर कालावधीकरण खालील प्रमाणे आहे :

भारतीय पूर्व-इतिहास,सिंधु संस्कृतीचा काळ (१७५० ख्रिस्तापूर्वी)
लोह काळ व वैदिक काळ( १७५० - ६०० ख्रिस्तापूर्वी)
'दुसरे शहरीकरण' (६०० - २०० ख्रिस्तापूर्वी)
शास्त्रीय काळ (२०० ख्रिस्तपूर्व - १२०० ख्रिस्तानंतर); जैन व बौद्ध धर्म. 'शास्त्रीय काळ' हा १०० ते १००० ख्रिस्तपूर्व आहे व तो 'शास्त्रीय हिंदु' धर्म फुलण्याच्या काळासोबत जुळतो. तसेच ह्या काळात, महायान - बौद्ध धर्माचा उदय व अस्त होतो.
मायकल्सच्या मते हा काळ, ५०० शास्त्रीय - २०० शास्त्रीय : हा "संन्यासी सुधारणा"चा काळ आहे. तसेच २०० ख्रिस्तपूर्वी - ११०० ख्रिस्तानंतर हा शास्त्रीय हिंदू धर्माचा काळ आहे, कारण ह्या काळात वैदिक धर्माचे हिंदू धर्मात रूपांतर झाले.
म्युएस हा बदलाचा काळ बराच मोठा म्हणून अोळखतो. तो ८०० ख्रिस्तपूर्वी - २०० ख्रिस्तपूर्वी या काळाला शास्त्रीय काळ म्हणतो. म्युएसच्यानुसार, हिंदु धर्माच्या काही ठळक गोष्टी, जसे कर्म, पुनर्जन्म, 'वैयक्तिक बोध व रूपांतर', ज्या वैदिक काळात नव्हत्या, त्या या काळात जन्माला आल्या.
पूर्व शास्त्रीय काळ ( २०० ख्रिस्तपूर्वी - ३२० ख्रिस्तानंतर)
"सुवर्ण काळ" (गुप्त साम्राज्य) (३२० - ६५० ख्रिस्तानंतर)
नवशास्त्रीय काळ (६५० - १२०० ख्रिस्तानंतर)
मध्यकाळ(१२०० - १५०० ख्रिस्तानंतर)
पूर्व आधुनिक काळ (१५०० - १८५०)
आधुनिक काळ (ब्रिटिश राज व स्वातंत्र्य) (१८५० पासून)
भारताचा पूर्वेतिहास
संपादन करा
नियतकालिक भारत
भिर्रांना संस्कृती (७५७० - ६२०० ख्रिस्तपूर्वी)
मेह्रगड संस्कृती(७००० - २५०० ख्रिस्तपूर्वी)
कांस्य काळ
सिंध दरी संस्कृती (३३०० - १३०० ख्रिस्तपूर्वी)
आहार - बनस संस्कृती (३००० - १५०० ख्रिस्तपूर्वी)
लोहकाळ (१२०० - २७२ ख्रिस्तपूर्वी)
संपादन करा
भारतातील लोहकाळ (१२००  – २७२ ख्रिस्तपूर्वी)
वैदिक संस्कृती(१५०० – ५०० ख्रिस्तपूर्वी)
काळा व लाल वस्तुकाळ (१३०० - १००० ख्रिस्तपूर्वी) (१२०० - ६०० ख्रिस्तपूर्वी)
उत्तर काळे वस्तुकाळ (७०० – २०० ख्रिस्तपूर्वी)
भारतीय लोहकाळ राज्ये (७०० - ३०० ख्रिस्तपूर्वी)
पांड्य साम्राज्य (६०० ख्रिस्तपूर्वी - १६५० ख्रिस्तानंतर)
दुसरे शहरीकरण
नंद साम्राज्य (ख्रिस्तपूर्वी ४२५–३२५ )
मौर्य साम्राज्य (ख्रिस्तपूर्वी ३२१ - १८४ )
संगम काळ (३०० ख्रिस्तपूर्वी - ३०० ख्रिस्तानंतर)
पांड्य साम्राज्य (ख्रिस्तपूर्वी ६०० ते १६५० ख्रिस्तानंतर)
चेरा साम्राज्य (ख्रिस्तपूर्वी ३०० ते ११०२ ख्रिस्तानंतर)
चोल साम्राज्य (३०० ख्रिस्तपूर्वी - १२७९ ख्रिस्तानंतर)
पल्लव साम्राज्य (२५० ख्रिस्तपूर्वी - ८०० ख्रिस्तानंतर)
महा-मेघ-वाहन साम्राज्य (२५० ख्रिस्तपूर्वी - ५वे शतक ख्रिस्तानंतर)
सातवाहन साम्राज्य (२३० ख्रिस्तपूर्वी - २२० ख्रिस्तानंतर)
भारतीय - सायथी साम्राज्य(२०० ख्रिस्तपूर्वी - ४०० ख्रिस्तानंतर)
कुनिंदा साम्राज्य (३रे शतक ख्रिस्तपूर्वी - ४थे शतक ख्रिस्तानंतर)
शुंग साम्राज्य (१८५ - ७३ ख्रिस्तपूर्वी)
भारतीय - ग्रीक साम्राज्य (१८० ख्रिस्तपूर्वी - १० ख्रिस्तानंतर)
कानवा साम्राज्य (७५ - २६ ख्रिस्तपूर्वी)
कुशन साम्राज्य (३० - ३७५ ख्रिस्तानंतर)
शास्त्रीय काळ
संपादन करा
भारताचे मध्य साम्राज्य
गुरजारा - प्रतिहार साम्राज्य
वाकाटक साम्राज्य
चोल साम्राज्य
पाल साम्राज्य
गुप्त साम्राज्य (२८० – ५५०)
कदंब राजघराणे (३४५ - १०००)
बनवासी
हलासी
हंगल
मध्य काळ (५०० - १५००)
संपादन करा
बदामी चालुक्य (५४७-७४२)
एेहोळे
बदामी
पत्तदकल
महाकुट
राष्ट्रकुट साम्राज्य(७४२–९८२)
एलोरा
कैलास मंदीर
पूर्व चालुक्य
पश्चिम चालुक्य (९८३ - ११८५)
चौलुक्य (९४४ - १२४४)
कल्याणीचे कालचुरी
देवगिरीचे सेऊना यादव
होयसळ साम्राज्य (१११४-१३४२)
विजयनगर साम्राज्य (१३३६ - १५६५)हंपी
प्राचीन भारतातील संस्कृती
संपादन करा
कला
संपादन करा
संगीत
कर्नाटकी संगीत
हिंदुस्तानी संगीत
प्राचीन भारतातील भाषा
संपादन करा
वैदिक संस्कृत
प्रोटो - द्रविडी
लिपी
तमील ब्राह्मी
पल्लव लिपी
गुप्त लिपी
धर्म
संपादन करा
हिंदु धर्म
विदेशी जमाती
एेतिहासिक वैदिक धर्म
वेद
वैदिक पुराण
वैदिक पूजा पाठ
बौद्ध धर्म
विज्ञान व तंत्रज्ञान
संपादन करा
विज्ञान व तंत्रज्ञान
भारतीय गणित
भारतीय खगोलशास्त्र
भारतीय मार्शल आर्ट्स
मल्ल-युद्ध
कलारीपयात्तु
प्राचीन भारतीय वैद्यकशास्त्र
सिद्ध वैद्यकशास्त्र
आयुर्वेद
वास्तुकला
द्रविडी वास्तुकला
मुघल वास्तुकला
प्राचीन भारताशी संबंधित संघटना
संपादन करा
प्राचीन भारतीय प्रदर्शन असलेले संग्रहालय
संपादन करा
भारत
गोवा राज्य संग्रहालय
शासकीय संग्रहालय, बेंगळुरु
कुच संग्रहालय
राष्ट्रीय संग्रहालय, दिल्ली
पटना संग्रहालय
यूनाइटेड किंगडम
ब्रिटीश संग्रहालय.

महाराष्ट्रातील नद्या व त्यांच्या काठावरिल शहरे

🌊 महाराष्ट्रातील नद्या व त्यांच्या काठावरिल शहरे🏬

❇️ परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे ❇️

🔸 कृष्णा : कराड, सांगली, मिरज, वाई, औदुंबर

🔸 भिमा : पंढरपुर

🔸 मिठी : मुंबई.

🔸 मुळा - मुठा : पुणे

🔸 इंद्रायणी : आळंदी, देहु

🔸 प्रवरा : नेवासे, संगमनेर

🔸 पाझरा : धुळे

🔸 कयाधु : हिंगोली

🔸 पंचगंगा : कोल्हापुर

🔸 धाम : पवनार

🔸 नाग : नागपुर

🔸 गिरणा : भडगांव

🔸 वशिष्ठ : चिपळूण

🔸 वर्धा : पुलगाव

🔸 ईरई : चंद्रपूर

🔸 वेण्णा : हिंगणघाट

🔸 कऱ्हा : जेजूरी

🔸 सीना : अहमदनगर

🔸 बोरी : अंमळनेर

🔸 सिंधफणा : माजलगांव

🔸 गोदावरी : नाशिक, कोपरगाव, पैठण, गंगाखेड, नांदेड

===========================

===========================

जगातील पहिले 'डार्ट मिशन' लाँच

.  🟠 जगातील पहिले 'डार्ट मिशन' लाँच 🟠

🔸नाव : DART (Double Asteroid Redirection Test)

🔹ऑपरेटर : नासा  / एपीएल

🔸मिशन प्रकार : ग्रह संरक्षण मोहीम

🔹मिशन कालावधी : 11 महिने, 3 दिवस आणि 5 तास (नियोजित)

🔸निर्माता : अप्लाईड फिजिक्स प्रयोगशाळा, जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठ

🔹लाँच तारीख : २४ नोव्हेंबर २०२१

🔸रॉकेट : फाल्कन 9 ब्लॉक 5 

🔹लाँच ठिकाण : वॅन्डनबर्ग 

🔸कंत्राटदार : SpaceX

🔹प्रभाव तारीख : 26 सप्टेंबर 2022 (नियोजित)

------------------------------------------------------------

जीवनसत्त्व

❇️ जीवनसत्त्व अ - रेटिनॉल

❇️ जीवनसत्त्व ब १ - थायमिन

❇️ जीवनसत्त्व ब २ - रायबोफ्लोविन

❇️ जीवनसत्त्व ब ३ - नायसिन

❇️ जीवनसत्त्व ब ५ - पेंटोथेनिक ऍसिड

❇️ जीवनसत्त्व ब ६ - पायरीडॉक्झिन

❇️ जीवनसत्त्व ब ७ - बायोटिन

❇️ जीवनसत्त्व ब ९ - फॉलीक ऍसिड

❇️ जीवनसत्त्व ब १२ - सायनोकोबालमीन

❇️ जीवनसत्त्व क - अस्कॉर्बीक ऍसिड

❇️ जीवनसत्त्व ड - कॅल्सीफेरॉल

❇️ जीवनसत्त्व ई - टोकोफेरॉल

❇️ जीवनसत्त्व के - फायलोक्विनोन

व्यापारी वारे / पूर्वीय वारे

🌬व्यापारी वारे / पूर्वीय वारे 🌬

❇️ उत्तर व दक्षिण गोलार्धात २५ ते ३५ अंश अक्षवृत्तांदरम्यान कर्क व मकरवृत्तीय हवेच्या जास्त दाबाचे पट्टे आहेत.

❇️ येथून विषुववृत्ताजवळील ० ते ५ अंश उत्तर व दक्षिणदरम्यान असणाऱ्या कमी दाबाच्या पट्टय़ाकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना 'व्यापारी वारे' असे म्हणतात.

❇️ व्यापारी वारे १० अंश ते २५ अंश अक्षवृत्तांच्या दरम्यान वाहत असतात.

❇️ पूर्वीच्या काळी व्यापारासाठी या वाऱ्यांचा उपयोग होत असे, म्हणून यांना 'व्यापारी वारे' असे म्हणतात.

❇️ पृथ्वीच्या परिवलनामुळे हे वारे फेरेलच्या नियमानुसार आपल्या दिशेपासून विचलित होऊन साधारणपणे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात, म्हणून यांना 'पूर्वीय वारे' असे म्हणतात.

===========================

भेडा घाट व व्यापारी वाऱ्यांची वैशिष्टये आणि व्यापारी वाऱ्यांचे दोन उपप्रकार

❇️ भेडा घाट ❇️

❇️ आग्रा येथील ताजमहाल हा संगमरवर या खडकाने बांधलेला आहे. हा रूपांतरित खडक आहे. हा दगड राजस्थानमधील मकराना येथील खाणीतून आणला गेला होता.

❇️ मध्य प्रदेशात भेडाघाट येथील नर्मदा नदीच्या पात्रातून मध्य नावेने प्रवास करताना या नदीचे तट संगमरवर खडकाचे असल्याचे लक्षात येते. सूर्योदय, सूर्यास्तावेळी आणि पौर्णिमेच्या रात्री हे तट उजळून निघतात. हे दृष्य फार मनोवेधक असते.

===========================
महाराष्ट्र व भारताचा भूगोल:
🌬 व्यापारी वाऱ्यांची वैशिष्टये 🌬

❇️ हे वारे वर्षभर नियमितपणे वाहतात. सागरी प्रदेशातून हे वारे नियमितपणे व वेगाने वाहतात

❇️ खंडांतर्गत प्रदेशात हे वारे त्या मानाने संथगतीने वाहतात.

❇️ व्यापारी वाऱ्यांचा वेग ताशी सुमारे १६ ते २४ कि.मी. असतो.

❇️ व्यापारी वारे उष्ण प्रदेशाकडून वाहतात, म्हणून हे उष्ण असतात

===============================

🌬 व्यापारी वाऱ्यांचे दोन उपप्रकार  🌬

1] उत्तर गोलार्धातील ईशान्य व्यापारी वारे

                उत्तर गोलार्धात हे वारे ईशान्येकडून नर्गन्येकडे वाहत असल्याने यांना 'ईशान्य व्यापारी वारे असे म्हणतात.

2] दक्षिण गोलार्धातील आग्रेय व्यापारी वारे

          दक्षिण गोलार्धात हे वारे आग्नेयेकडून वायव्येकडे वाहत असल्याने यांना 'आग्नेय व्यापारी वारे' असे म्हणतात.

===========================