Wednesday 4 May 2022

भारतीय-उत्कीर्ण-लेखसंग्रह-योजना

भारतीय-उत्कीर्ण-लेखसंग्रह-योजना

भारतीय-उत्कीर्ण-लेखसंग्रह

ह्या योजनेचे इंग्रजी नाव आहे कॉर्पस् इन्स्क्रिप्शनम् इंडिकॅरम. ह्या योजनेची सुरुवात इ.स. १८७८ साली झाली. ह्या योजनेचे फलित म्हणजे आजवर ह्या योजनेद्वारे प्रसिद्ध झालेले सात खंड आणि तदनुषगांने भारतातल्या काही प्राचीन राजघराण्यांच्या पुराभिलेखांचे सुसूत्र एकत्रीकरण. प्राचीन भारतीय इतिहासलेखनाच्या दृष्टीने पुराभिलेखांना अन्यन्यसाधारण महत्त्व आहे. हे लेखन कठीण अशा पदार्थावर अणकुचीदार साधन वापरून कोरून केले जात असे त्यामुळे या लेखांस कोरीव लेख वा उत्कीर्ण लेख असेही म्हटले जाते.

पार्श्वभूमी
संपादन करा
सन १७७४ मध्ये कोलकत्यास वॉरेन हेस्टिंगच्या अध्यक्षतेखाली एशियाटिक सोसायटीची स्थापना झाली.[१] इतिहास, इतिहासपूर्वकाळ ह्यांचे आधुनिक शास्त्रांच्या सहाय्याने संशोधन, संकलन आणि लेखन करण्यासाठी स्थापन झालेली भारतातील ही पहिलीच संस्था होती. 'एशियाटिक रिसर्चेस' हे या सोसायटीचे नियतकालिक होते. त्याचा पहिला अंक सन १७७८ मध्ये प्रसिद्ध झाला. भारतातून प्रसिद्ध होणारे संशाेधनपर असे हे पहिलेच नियतकालिक. त्यानंतर इंडियन अ‌‌ण्टिक्वेरी, एपिग्राफिया इंडिया, इंडियन हिस्टॉरिकल क्वॉर्टर्ली, रॉयल एशियाटिक सोसायटीच्या मुंबई शाखेचे नियतकालिक अशी काही पुरातत्त्व या विषयाशी निगडित नियतकालिके नियमित प्रकाशित होऊ लागली.

योजनेचे सूतोवाच
संपादन करा
पुढे सन १८३७ मध्ये प्राचीन-भारतीय-लिपिशास्त्रज्ञ जेम्स प्रिन्सेप यांनी भारतीय उपखंडातून त्याकाळापर्यंत उजेडात आलेल्या साऱ्या कोरीव लेखांच्या एकत्रीकरणाविषयी एक सूचना केली.[१] त्यानूसार प्राचीन भारतीय राजवंशांच्या कोरीव लेखांचे संपादन आणि प्रकाशन 'कॉर्पस् इन्स्क्रिप्शनम् इंडिकॅरम' (भारतीय उत्कीर्ण लेखसंग्रह) या ग्रंथमालेद्वारे करण्याचे स्वातंत्र्यपूर्वकाळातील भारतीय पुरातत्त्व विभागाने ठरविले. मात्र ही योजना सुरू होऊन त्या योजनेतील पहिला ग्रंथ प्रकाशित होण्यास मात्र सन १८८८ उजाडावे लागले.

सुरुवात
संपादन करा
या ग्रंथमालेतला, पहिला ग्रंथ 'इन्स्क्रिप्शन्स ऑफ अशोक (अशोकाचे कोरीव लेख)' १८८८ मध्ये प्रसिद्ध झाला. या ग्रंथाच्या पहिल्या आवृत्तीचे संपादन 'जनरल अलेक्झांडर कनिंगहॅम' यांनी केले होते. पुढे सन १९२५मध्ये द्वितीयावृत्तीचे संपादन 'हुल्श' यांनी केले होते. भारतीय पुरातत्त्वखात्याच्या संकेतस्थळावर उपलब्ध असणाऱ्या माहितीनुसार या द्वितीयावृत्तीचे सन १९९१ मध्ये पुनर्मुद्रणही झालेले आहे.

दुसरा ग्रंथ दोन भागांत प्रसिद्ध झाला. सन १९२२ मध्ये या भागाच्या संपादनाची  एकत्रित जबाबदारी अनुक्रमे प्रा. रॅपसन् आणि प्रा.हेन्रिक लुडेर् यांच्यावर टाकण्यात आली. पहिला भाग 'खरोष्टी इन्स्क्रिप्शन्सचा (खरोष्टी कोरीव लेख)'. हा भाग प्रा. रॅपसन् यांच्याकडे होता. मात्र इतर जबाबदाऱ्यांमुळे त्यांनी आपल्या पदाचाच राजीनामा दिला. पुढे ही जबाबदारी प्रा. स्टेन कोनो यांच्यावर टाकण्यात आली.[१] प्रा. कोनो यांनी तयार केलेला हा ग्रंथ साधारण सन १९२८-२९ च्या दरम्यान खरोष्टी इन्स्क्रिप्शन्स हा भाग प्रसिद्ध झाला असावा (नेमक्या काळाची माहिती मिळाली नाही). याचेही सन १९९१ मध्ये पुनर्मुद्रणही झालेले आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫

❇️ दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्षपदी सिरिल रामाफोसा यांची निवड ◾️त्यांना ही दुसऱ्या वेळी अध्यक्ष पद भेटले ◾️आता पन तेच अध्यक्ष आहेत ❇️ नुकतीच नि...