ॲन्सन, सर विल्यम रेनेल आणि ॲलिबाय

ॲन्सन, सर विल्यम रेनेल
>कायदा>ॲन्सन, सर विल्यम रेनेल
ॲन्सन, सर विल्यम रेनेल : (१४ नोव्हेंबर १८४३ – ४ जून १९१४). प्रसिद्ध इंग्‍लिश संविधानतज्ञ व विधिवेत्ता. ईटन व ऑक्सफर्ड येथे शिक्षण घेतल्यानंतर त्याने काही दिवस वकिली केली. १८७४ मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठात इंग्‍लिश कायद्याचा अधिव्याख्याता म्हणून त्याची नेमणूक झाली. तेथे स्वतंत्र विधिशाखा सुरू करण्यास त्याचेच प्रयत्‍न प्रामुख्याने कारणीभूत झाले. विद्यापीठाचे कुलगुरुपद व इतरही मानाच्या जागा त्याने भूषविल्या. पार्लमेंटमध्ये ‘युनियनिस्ट’ म्हणून तो १८९९ ला निवडून आला. १९०३ चा प्रख्यात शैक्षणिक कायदा करण्याचे व तो अमलात आणण्याचे श्रेय त्यालाच द्यावे लागेल. ब्रिटिश म्युझियमचा विश्वस्त बनण्याचाही त्यास मान मिळाला. संविधान व कराराच्या कायद्यावरील त्याची पुस्तके आजही प्रमाणभूत मानण्यात येतात.

____________________________

ॲलिबाय


ॲलिबाय: आरोपीस उपलब्ध असलेला एक बचाव. गुन्ह्याच्या वेळी अन्यत्र उपस्थिती असा या संज्ञेचा अर्थ आहे. फिर्यादीने जर आरोपीवर एका विशिष्ट स्थळी व विशिष्ट वेळी एखादा गुन्हा केल्याचा आरोप केला, तर त्या ठिकाणी त्या वेळी आपण नव्हतो, हा आरोपीचा एक उत्कृष्ट बचाव होय. गुन्हास्थळी आरोपीची अनुपस्थिती पुराव्याने सिद्ध झाली, तर आरोपी निर्दोषी ठरतो. पण यासाठी चांगला व सबळ पुरावा द्यावयास पाहिजे. कारण या बाबतीत पुराव्याचा भार आरोपीवर असतो. आरोपीने दिलेल्या पुराव्याने उपस्थितीबद्दल जरी संशय उत्पन्न झाला, तरी त्या संशयाचा फायदा आरोपीस मिळतो.


No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

 Q.1) इन्फोसिस पुरस्कार 2023 मध्ये भौतिकशास्त्र श्रेणीतील पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? ✅ प्रो. मुकुंद थट्टाई Q.2) पहिल्या ‘लाईफटाईम डिस्ट...