Wednesday 4 May 2022

लाला लाजपत राय

लाला लाजपत राय !!

Lala Lajpat Rai biography in Marathi language लाला हे भारतीय राजकारणी व लेखक होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी योगदान दिले. ते जहाल मतवादी नेते होते. त्यांना पंजाब केसरी असे म्हणतात. त्यांनी पंजाब नॅशनल बँकेची स्थापना केली. लाला लजपतराय, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल या त्रयीला लाल-बाल-पाल म्हणतात. ज्यांनी आपल्या देहाची पर्वा न करता लोकांच्या जनहितासाठी व देशाला पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी आपल्या देहाची आहुती दिली. त्यांच्याविषयी आपण माहिती पाहूया.

1 जन्म
2 बालपण व शिक्षण
3 वैयक्तिक जीवन
4 आपल्या मागण्यांसाठी त्यांनी केलेला प्रचार
5 स्वतंत्र लढ्यातील क्रांतिकारक कार्य
6 सामाजिक कार्य
7 मृत्यू
जन्म
28 जानेवारी, 1865 रोजी लाला लजपत राय यांचा जन्म पंजाब मधील मोगा जिल्ह्यातील जैन परिवारात झाला. त्यांचे वडील राधाकृष्ण अग्रवाल हे प्राध्यापक आणि प्रसिद्ध उर्दू लेखक होते. लाला लजपतराय यांना लहानपणापासून वाचन-लेखन छंद होता. त्यांनी सरकारी कॉलेजमधून वकिलीची परीक्षा उत्तीर्ण केली आणि व्यवसाय सुरू केला.

बालपण व शिक्षण
1870 च्या दशकात उत्तरार्धात त्यांच्या वडिलांची बदली रेवरी येथे झाली. तेथील सरकारी उच्च माध्यमिक शाळेत लाला लजपतराय यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले. तसेच त्यांच्या आयुष्यात लाला लजपतराय यांचे उदारमतवादी आणि हिंदुत्वावरील विश्वास असणारे त्यांच्या वडीलामुळे आयुष्य सफल झाले. त्यांच्या वडिलांची धार्मिक वृत्ती असल्यामुळे तेही त्यांच्या वडिलांच्या प्रमाणे उदारमतवादी झाले.

1880 मध्ये लजपत राय यांनी कायद्याचा अभ्यास करण्यासाठी लाहोर येथे सरकारी महाविद्यालयात प्रवेश घेतला. तेथेच ते देशभक्त आणि भविष्यातील स्वातंत्र्यसैनिक लाला हंसराज आणि पंडित गुरुदत्त यांच्या संपर्कात आले. लाहोरमध्ये शिकत असताना, स्वामी दयानंद सरस्वतीच्या हिंदू सुधारणा चळवळीचा प्रभाव त्यांच्यावर पडला आणि ते आर्य समाजाचे सदस्य बनले. तसेच लाहोर स्थित आर्य गॅझेटचे संस्थापक व संपादक बनले.

वैयक्तिक जीवन
लाला लजपतराय यांची आई शिख होती. वडिल लाला राधाकिशन हे फार्सी व उर्दू विषयाचे शिक्षक आणि मनाने इस्लामीचे अनुयायी होते. धार्मिक सहिष्णुतेचे वातावरणात वाढत असलेल्या, लाला लजपत राय यांनी मिशन हायस्कूलमधून एलएलबी ही पदवी प्राप्त केली. काही काळात यशस्वी वकील म्हणून त्यांना मान्यता मिळाली. त्यांनी वकिलीचा व्यवसाय सुरू केला.

त्यांचा विवाह विद्यार्थीदशेतच हिसार येथील अग्रवाल कुटुंबातील मुलीशी म्हणजेच राधादेवी यांच्याशी 1877 मध्ये झाला. त्यांना दोन मुलं व पार्वती नावाची मुलगी होती. त्या काळात जातीच्या भिंती तोडून समर्थ होऊन परके इंग्रज सरकारविरुद्ध आवाज उठविणारे आर्य समाजाची पंजाबी, हिंदूवर मोहिनी पडू लागली होती. लालाजींना त्यांचे आकर्षण वाटले आणि ते सक्रिय कार्य समाजवादी झाले. अर्ज विनंत्याने नेमस्त राजकारण चालविणाऱ्या इंग्रजाबद्दल त्यांना सहानुभूती वाटत नव्हती.

आपल्या मागण्यांसाठी त्यांनी केलेला प्रचार
1904 मध्ये पंजाबी नावाचे पुढे विख्यात झालेले पत्र सुरू करून पंजाबचे प्रतिनिधी म्हणून ते काँग्रेस अधिवेशनात गेले. तेथे त्यांचा एवढा प्रभाव पडला की, ब्रिटिश जनतेसमोर इंग्रजा विरुद्ध, उपोषण मांडले. दुःखे व किमान राजकीय मागण्या मांडण्यासाठी सुरेंद्रनाथ बॅनर्जी, मोहम्मद अली, जिन्ना आणि गोपाळकृष्ण गोखले यांच्याबरोबर लालाजीची ही निवड झाली होती. 1905 मध्ये ते इंग्लंडला गेले. परंतु तेथील लोक स्थानिक प्रश्नात एवढी मग्न होती की, लालाजींच्या दौऱ्याचा काहीच उपयोग झाला नाही. उलट परतल्यावर बंगालची फाळणी जाहीर झाली.

स्वतंत्र लढ्यातील क्रांतिकारक कार्य
1886 मध्ये ते वडिलांच्या बदली बरोबर विसारला आले आणि तेथे त्यांनी वकिलीचा व्यवसाय सुरू केला. लजपतराय बार कौन्सिलचे संस्थापक बनले. लहानपणापासून देशाची सेवा करण्याची त्यांची तीव्र इच्छा होती. त्यामुळे देशाचे पारतंत्र्यातून सुटका करण्यासाठी लाला लजपतराय यांनी शपथ घेतली.

त्याच वर्षी त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची हिसार जिल्हा शाखा स्थापन केली. लाला लजपतराय यांनी त्यांच्या सहकार्याने बरोबर आर्य समाजाची स्थापना केली. काँग्रेसच्या अलाहाबाद येथील वार्षिक अधिवेशनात हिसार जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी त्यांची 1888 आणि 1889 मध्ये निवड झाली.

1892 मध्ये उच्च न्यायालयात वकिली करण्यासाठी ते लाहोर येथे गेले. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी भारताचा राजकीय धोरणाला आकार देण्यासाठी ते पत्रकारिता सुद्धा करीत असेल, त्यांनी अनेक वृत्तपत्रांमध्ये नियत नियमितपणे आपले लेखन केले. लाला लजपत राय यांनी शिक्षणासाठी कॉलेज विद्यालय काढले होते.

1947 साली भारताच्या झालेल्या फाळणीनंतर लाहोरमधील या विद्यालयाचे रूपांतर इस्लामिया कॉलेजमध्ये झाले. 1914 मध्ये स्वातंत्र्य लढ्यात योगदान देण्यासाठी लाला लजपत राय यांनी वकील बंद केली. 1914 मध्ये ते ब्रिटनला गेले आणि नंतर 1917 मध्ये अमेरिकेला गेले. ऑक्टोबर 1997 मध्ये त्यांनी न्यूयॉर्क मध्ये भारतीय होमरूल लीगची स्थापना केली. ते 1927 ते 1930 पर्यंत अमेरिकेत होते.

सामाजिक कार्य
सन 1907 साली लालाजींनी पंजाबच्या शेतकऱ्यांचा प्रश्न धसाला लावला. 1857 च्या संग्रामाच्या सुवर्ण जयंतीसाठी ही त्यांनी लोकजागृती सुरू केली. कालवे आखल्यावर मोठ्या प्रमाणावर मोकळी पडलेली जमीन बाहेरच्या शेतकऱ्यांना काही अटींवर देण्यात आली होती.

वीस-पंचवीस वर्षांनंतर त्यांच्यावर नवे निर्बंध लादणारे कॉलनायझेशन बिल पंजाब सरकारने संमत केले. त्याच वेळी तीन जिल्ह्यांतील पाणीपट्टी दिडीने वाढविण्यात आली. लालाजी आणि त्यांचे सहकारी अजितसिंग यांच्या प्रचाराला जनतेने, शेतकऱ्यांनी आणि विशेष म्हणजे पीडित निवृत्त सैनिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला.

10 मे 1907 रोजी हजारो पंजाब्यांना घेऊन लाहोरचा किल्ला सर करून 1857 ची सुवर्णजंयती साजरी करण्याची योजना लालाजींनी आखली होती. अशी ओरड सरकार धार्जिण्या यूरोपीय पत्रांनी सुरू केली. पंजाब सरकारनेही बंडाची आवई उठविली.

मात्र सरकारने वृत्तपत्रांची गळचिपी करणारे काळे बिल व राजद्रोही सभांना बंदी घालण्याचे बिल आणले. मोर्लेने वृत्तपत्रांवर निर्बंध घालण्यास संमती दिली नाही. पण राजद्रोही सभांवर बंदी घालण्यास हरकत घेतली नाही. सभाबंदीचा कायदा झाल्यावर तीनच दिवसांनी लजपतराय आणि अजितसिंग यांची सुटका झाली.

लालाजींना पंजाबचा सिंह म्हणून गौरविण्यात येऊ लागले. त्यांच्या कारावासाच्या काळात त्यांच्या अनेक अनुयायांनी सौम्य धोरण अवलंबून लोटांगणवादी भूमिका घेतली. त्याची दुःखद जाणीव त्यांना सुटकेनंतर झाली. काही शिखांनी तर अजितसिंग हे शीख नव्हतेच, असे पत्रक काढले.

आर्यसमाजी नेत्यांनी आपले राजकारणाशी काहीही कर्तव्य नाही असे वारंवार घोषित केले. त्यामुळे महिन्याभराने भरलेल्या सुरत काँग्रेसचे अध्यक्ष व्हा, असा प्रस्ताव पंजाबबाहेरील जहाल नेत्यांनी मांडला. त्याला लालाजींनी संमती दिली नाही व पुढील वर्षी गदरचे संस्थापक हरदयाळ आणि जहाल नेते खापर्डे व पाल यांच्यासह ते इंग्लंडला गेले. गदर क्रांतीचे प्रत्यक्ष संचालन करणारे लालाजींचे आप्त रामचंद्र पेशत्वरी त्यावेळी कारावासात होते.

नवीन सुधारणा कायदा झाल्यावर लालाजी परत आले. गोखल्यांच्या भारत सेवक समाजाच्या धर्तीवर त्यांनी पंजाबमध्ये पीपल्स सोसायटी काढली. आर्य समाजाच्या दयानंद कॉलेजातील जहाल देशभक्तीचा भर ओसरलेला पाहून राष्ट्रीय कॉलेज काढले.

जालियनवाला बाग हत्याकांडाने व्यथित होऊन 1920 मध्ये लजपतराय परत आले. खिलाफत आंदोलनाला तात्त्विक विरोध असूनही त्यांनी जुळते घेतले. त्या सालाच्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपद सर्वानुमते त्यांना देण्यात आले. सैनिकांत बहिष्काराचा प्रचार करण्यासाठीच्या उच्च समितीवर लालाजींची नियुक्ती झाली.

मृत्यू
1928 मध्ये जेव्हा हे कमिशन भारतात आले तेव्हा त्याचा मोठ्या प्रमाणात विरोध सुरू असताना, लोक रस्त्यावर उतरून आले आणि लाला लजपत राय यांनी सुद्धा सायमन कमिशनच्या विरोधात एक मिरवणूक काढली. त्यांच्या नेतृत्वात सायमन कमिशन बँक इक्बाल जिंदाबाद..! अशा प्रकारची नारे लावून गर्जना आणि विरोध सुरू झाला. तेव्हा इंग्रजांनी आंदोलकांवर जबरदस्त लाठीचार्ज केला.

या लाठीचार्ज दरम्यान लाला लजपतराय यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना डोक्यावर देखील मार बसला होता. त्यामुळे आपल्या शेवटच्या भाषणात ते म्हटले, “माझ्या शरीरावर लागलेला एक घाव ब्रिटिश साम्राज्याच्या मृत्यूचे कारण असेल.” पोलिसांकडून झालेल्या लाठीचार्जमुळे 17 नोव्हेंबर 1928 ला त्यांचा मृत्यू झाला.

त्यांच्या मृत्यूचा बदला भगतसिंग सारख्या देशभक्तांनी अवघ्या एका महिन्यात घेतला. म्हणजे 17 डिसेंबर 1928 ला ब्रिटिश पोलिस अधिकारी सँडर्सची भगतसिंग, चंद्रशेखर आझाद यांनी गोळी मारून हत्या केली.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...