14 December 2019

चालू घडामोडी प्रश्नसंच

📍 ताज्या “क्लायमेट चेंज परफॉरमन्स इंडेक्स” यामध्ये भारत कोणत्या क्रमांकावर आहे?

(A) प्रथम
(B) 10 वा
(C) 30 वा
(D) 9 वा✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 दरवर्षी _ या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय पर्वत दिन’ साजरा केला जातो.

(A) 10 नोव्हेंबर
(B) 11 डिसेंबर✅✅
(C) 11 ऑक्टोबर
(D) 12 नोव्हेंबर

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 लोकसभेत मंजूर झालेल्या ‘नागरिकत्व (दुरुस्ती) विधेयक 2019’ अंतर्गत कोणते राज्य ‘इनर लाईन परमीट’ नियमाखाली आणले जाणार?

(A) आसाम
(B) मणीपूर✅✅
(C) त्रिपुरा
(D) मेघालय

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 दरवर्षी ___ या दिवशी ‘UNICEF दिन’ साजरा केला जातो.

(A) 7 डिसेंबर
(B) 11 डिसेंबर✅✅
(C) 9 ऑक्टोबर
(D) 11 ऑक्टोबर

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 “डिफेएक्सपो” नावाचा 11 वा द्वैवार्षिक कार्यक्रम ____ येथे आयोजित केला जाणार आहे.

(A) नवी दिल्ली
(B) लखनऊ✅✅
(C) मुंबई
(D) चेन्नई

© संकलन - राम कवले & तुषार शिरगीरे
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

९३ व्या मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन ना. धों. महानोर यांच्या हस्ते

◾️उस्मानाबाद येथे होणाऱ्या ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन रानकवी पद्मश्री ना. धों. महानोर यांच्या हस्ते  होईल, अशी माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष नितीन तावडे यांनी  शुक्रवारी दिली.

◾️उस्मानाबादकरांच्या विनंतीचा मान राखून त्यांनी संमेलनाच्या उद्घाटनाला येण्याचे मान्य केले आहे.

◾️ त्यांच्या सहवासामुळे साहित्य क्षेत्रातील प्रतिभेला आणि नवोदित लेखक, कवींना ऊर्जा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

◾️अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी इतर भाषांतील प्रतिभावंत लेखकांना  निमंत्रित करण्याची मागच्या काही वर्षांतील परंपरा नाकारून यंदा मराठी लेखकाच्याच हस्ते संमेलनाचे उद्घाटन होईल व हा मान  ना.धों. महानोर यांना मिळेल, असे वृत्त लोकसत्ताने शुक्रवारच्या अंकात प्रसिद्ध केले होते.

◾️ अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन १०, ११, १२ जानेवारी २०२०  रोजी उस्मानाबाद येथे होत आहे.

◾️या संमेलनाची आयोजक संस्था असलेल्या मराठवाडा साहित्य परिषद उस्मानाबाद शाखेच्या वतीने जय्यत तयारी सुरू आहे.

◾️ संमेलनाध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची यापूर्वीच एकमताने निवड झालेली आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

जगातील १०० प्रभावी महिलांत सीतारामन

✍ फोर्ब्सच्या यादीत अँगेला मर्केल प्रथम स्थानावर

◾️फोर्ब्स नियतकालिकाच्या शंभर शक्तिशाली- प्रभावी महिलांच्या यादीत भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन  यांचा समावेश करण्यात आला आहे. 

◾️या शंभर महिलांत जर्मनीच्या चॅन्सेलर अँगेला मर्केल पहिल्या क्रमांकावर आहेत.

◾️यादीतील इतर भारतीय महिलांमध्ये एचसीएल कॉर्पोरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व कार्यकारी संचालक
📌रोशनी नादर मल्होत्रा व

◾️बायोकॉनच्या संस्थापक
📌किरण शॉ मजुमदार यांचा समावेश आहे.

◾️फोर्ब्सची २०१९ची यादी ‘दी वर्ल्डस् १०० मोस्ट पॉवरफुल विमेन’ या नावाने प्रसिद्ध झाली असून त्यात मर्केल (वय ६५) प्रथम क्रमांकावर आहेत.

◾️युरोपियन मध्यवर्ती बँकेच्या प्रमुख ख्रिस्तिना लॅगार्ड या दुसऱ्या क्रमांकावर, तर

◾️ अमेरिकी प्रतिनिधिगृहाच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

◾️बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना २९ व्या क्रमांकावर आहेत.

◾️सीतारामन  ३४ व्या क्रमांकावर असून📌 त्या भारताच्या पहिल्या महिला अर्थमंत्री आहेत.

◾️यापूर्वी इंदिरा गांधी यांनी अगदी कमी काळ अर्थमंत्रीपद सांभाळले होते.

◾️फोर्ब्सच्या या यादीत गेट्स फाउंडेशनच्या मेलिंडा गेटस, आयबीएमच्या गिनी रोमेटी, फेसबुकच्या  शेरील सँडबर्ग, न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अरडर्न, इव्हान्का ट्रम्प, गायक रिहान व बियॉन्स तसेच टेलर स्विफ्ट, टेनिस पटू सेरेना विल्यम्स, हवामान कार्यकर्ती  ग्रेटा थनबर्ग यांचाही समावेश आहे.

महाराष्ट्राची प्राकृतिक रचना व हवामान

महाराष्ट्राचे प्राकृतिकदृष्टय़ा तीन प्रमुख विभाग- कोकण किनारपट्टी, पश्चिम घाट व महाराष्ट्र पठार इ.

सह्य़ाद्री पर्वताचा प्रस्तरभंग होऊन किनारपट्टी तयार झाली.

कोकण किनारपट्टीची उत्तर-दक्षिण लांबी ७२० कि.मी. तर रुंदी ४० ते ८० कि.मी. आहे.

उत्तरेकडील दमणगंगा नदीपासून दक्षिणेकडील तेरेखोल खाडीपर्यंतचा प्रदेश कोकणपट्टीत मोडतो.

कोकणामध्ये सखल प्रदेशाची उंची पश्चिमेकडील पूर्वेकडून वाढत जाते.

महाराष्ट्रात सह्य़ाद्री पर्वताची लांबी ४४० कि.मी. आहे.

सह्य़ाद्री पर्वतास ‘पश्चिम घाट’ असेसुद्धा म्हणतात.

उत्तरेस तापी नदीपासून दक्षिणेस कन्याकुमारीपर्यंत सह्य़ाद्री पसरलेला आहे.

सह्य़ाद्री पर्वताची सरासरी उंची १२०० ते १३०० मीटर आहे.

महाराष्ट्राचा ९० टक्के भूभाग दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे.

महाराष्ट्राचे हवामान उष्ण कटिबंधीय मोसमी प्रकारचे आहे.

महाराष्ट्रातील पठारी भागाचे हवामान विषम व कोरडे आहे.

कोकणपट्टीचे हवामान दमट व सम प्रकारचे आहे.

अरबी समुद्रातून येणाऱ्या नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून महाराष्ट्रात पाऊस पडतो.

सह्य़ाद्री पर्वताच्या पश्चिम उतारावर प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो.

सह्य़ाद्री पर्वताच्या पूर्वेकडील पठारास महाराष्ट्र

पठार किंवा दख्खन पठार असे म्हणतात.

शंभू महादेव डोंगररांगामुळे भीमा व कृष्णा नद्यांची खोरी वेगळी झाली.

हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगामुळे गोदावरी व भीमा नद्यांची खोरी वेगळी झाली.

सातमाला अजिंठा डोंगररांगांमुळे गोदावरी व तापी नद्यांची खोरी वेगळी झाली.

ब्रिटनच्या पंतप्रधानपदी पुन्हा बोरिस जॉन्सन


ब्रिटनच्या सार्वत्रिक निवडणुकीत हुजूर पक्षाने दणदणीत विजय मिळवला आहे. ब्रिटनचे विद्यमान पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या नेतृत्त्वात हुजूर पक्षाने बहुमताचा ३२६ हा आकडाही पार केला. १९८० च्या दशकात मार्ग्रेट थॅचर यांच्या काळातील विजयानंतर हुजूर पक्षासाठी हा सर्वात मोठा विजय मानला जातो. भारतीय वेळेनुसार शुक्रवारी सकाळी ११ वाजता हाऊस ऑफ कॉमन्सच्या एकूण ६५० जागांपैकी ६४२ जागांचे निकाल जाहीर झाले होते.

🎯_ ब्रिटन: भारतीय वंशाच्या १५ उमेदवारांचा विजय

ब्रिटनच्या सर्वसाधारण निवडणुकांमध्ये पंतप्रधान बोरिस जॉनसन यांच्या हुजूर पक्षाने (कन्झर्वेटिव्ह पार्टी) जोरदार विजय मिळवत बहुमताच्या ३२६ या जादुई आकड्याचा टप्पा पार केला आहे. या निवडणुकीत मुख्य प्रतिस्पर्धी असणाऱ्या हुजूर आणि मजूर या दोन्ही पक्षांमधून भारतीय वंशाचे तब्बल १५ उमेदवार जिंकून आले आहेत. या १५ पैकी १२ खासदारांनी आपली जागा कायम राखली आहे तर अन्य नव्याने निवडून आले आहेत.

ब्राझील सोबतच्या  सामाजिक सुरक्षा करारास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी

👉11 डिसेंबर 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारताला ब्राझील सोबत सामाजिक सुरक्षा विषयक करारावर स्वाक्षरी करण्यास मंजूरी दिली आहे.

✅कराराविषयी

👉अल्प कालावधीसाठी परदेशात काम करणाऱ्या भारतीय व्यवसायिक / कुशल कामगारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आणि भारतीय कंपन्यांची स्पर्धात्मकता वाढविण्यासाठी भारत इतर देशांसोबत द्विपक्षीय सामाजिक सुरक्षा करार करीत आहे.

✅या प्रकाराच्या कराराचे तीन फायदे असतात, ते म्हणजे -

1.कामगारांद्वारे (असंबद्धता) दुहेरी सामाजिक सुरक्षा योगदान देण्याचे टाळले जाते.

2.फायद्याचे सुलभ विप्रेषण (निर्यातक्षमता) होते.

3.लाभांमधली तुट टाळण्यासाठी (दोन देशांमध्ये) योगदानाचा कालावधी एकत्रित केला जातो म्हणजेच संपूर्ण केला जातो.

👉या कराराद्वारे परदेशात काम करणाऱ्या भारतीय नागरिकांना अपंगत्व विमा लाभदेखील देण्यात येणार आहे. आजपर्यंत भारताने 18 देशांसोबत असे करार केले आहेत.

✅ब्राझील देश

👉ब्राझील हा दक्षिण अमेरिका उपखंडातला सर्वात मोठा देश आहे. ब्राझीलच्या पूर्वेस अटलांटिक महासागर; उत्तरेस व्हेनेझुएला, सुरीनाम, गयाना; वायव्येस कोलंबिया, पश्चिमेस बोलीव्हिया व पेरू; नैर्ऋत्येस अर्जेन्टिना व पेराग्वे; तर दक्षिणेस उरुग्वे हे देश आहेत.

👉ब्राझीलिया हे ब्राझीलचे राजधानी शहर आहे. ब्राझीलियाई रिआल हे राष्ट्रीय चलन आहे. पोर्तुगीज ही इथली अधिकृत भाषा आहे.

‘ही’ तीन राज्ये लागू करणार नाहीत नागरिकत्व कायदा, केंद्र सरकारला स्पष्ट नकार

🔺 नागरिकत्व दुरूस्ती विधेयकावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली आहे

◾️नागरिकत्व कायद्यावरुन आसाममध्ये तीव्र आंदोलन सुरु असून हजारो नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. गुवाहाटीत हजारो नागरिक संचारबंदीचा भंग करुन रस्त्यावर उतरले असून पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोन जण ठार झाले आहेत. राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवेवरील बंदी ४८ तासांसाठी वाढवण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईशान्येतील नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यास कटिबद्ध असल्याचं स्पष्ट करत आंदोलकांना शांततेचं आवाहन केलं. दरम्यान, नागरिकत्व कायद्याला तीन राज्यांनी विरोध केला आहे. पश्चिम बंगाल, केरळनंतर आता पंजाबनेही राज्यात विधेयकांचा अंमलबजावणी केली जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी हे विधेयक भारताच्या धर्मनिरपेक्षतेवर हल्ला करत असल्याचं म्हटलं आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या कार्यालयातून गुरुवारी ही घोषणा करण्यात आली. हा कायदा भारताच्या धर्मनिरपेक्षतेवर हल्ला करणारं असून, ते लागू केलं जाणार नाही असं कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे. याआधी केरळ आणि पश्चिम बंगालने कायदा लागू केलं जाणार नाही असं स्पष्ट केलं आहे.

ANI

Punjab Chief Minister's Office: Terming the Citizenship Amendment Bill (CAB) as a direct assault on India’s secular character, Punjab Chief Minister Captain Amarinder Singh today said his government would not allow the legislation to be implemented in his state. (File pic)


७:१७ म.उ. - १२ डिसें, २०१९

📘केरळ आणि पश्चिम बंगालने दिला आहे नकार

केरळेच मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी सांगितलं आहे की, “राज्यात नागरिकत्व कायदा स्वीकारला जाणार नाही. हा कायदा संविधानाच्या विरोधात असून केंद्र सरकार धर्माच्या आधारे फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे”. तर दुसरीकडे पश्चिम बंगालमधील तृणमूल सरकारमधील मंत्री डेरेक ओब्रायन यांनी केंद्र सरकारवर आरोप करत राज्यात एनआरसी आणि नागरिकत्व कायदा दोन्ही लागू करणार नसल्याचं सांगितलं आहे.

नागरिकत्व दुरूस्ती विधेयकावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे आता याचं कायद्यात रूपांतर झालं आहे. गुरूवारी रात्री राष्ट्रपतींनी या विधेयकावर स्वाक्षरी केली. नागरिकत्व दुरुस्ती विधेयक बुधवारी राज्यसभेतही आठ तासांच्या चर्चेनंतर मंजूर करण्यात आलं. विधेयकाच्या बाजूनं १२५ तर, विरोधात १०५ मतं पडली.

धार्मिक छळाला कंटाळून पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या देशांतून ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत भारतात आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी व ख्रिस्ती समुदायाच्या लोकांना बेकायदा स्थलांतरित मानले जाणार नाही आणि त्यांना भारतीय नागरिकत्व दिले जाईल, अशी तरतूद नागरिकत्व (दुरुस्ती) विधेयक २०१९ मध्ये करण्यात आली आहे.

🔻या दुरूस्तीचा कोणाला फायदा नाही ?

श्रीलंकेतील तामिळ, म्यानमारमधील मुस्लीम तसेच, पाकिस्तानातील मुस्लिमांतील अन्य समुदायातील व्यक्तींना या विधेयकाचा लाभ मिळणार नाही.

🇮🇳देशातील कोणत्या भागाला असणार नाही हे लागू?

ही दुरुस्ती घटनेच्या सहाव्या अनुसूचित समाविष्ट केलेल्या आसाम, मेघालय, मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यांतील आदिवासी भागांना, तसेच बंगाल ईस्टर्न फ्रंटियर रेग्युलेशन, १८७३ मध्ये अधिसूचित केलेल्या भागांना लागू असणार नाही.

🔺कोणत्या अटींमध्ये करण्यात आलेत बदल?

सध्या कोणत्याही परदेशी व्यक्तीला भारताचं नागरिकत्व मिळवण्यासाठी भारतामध्ये कमीत कमी ११ वर्ष राहणं आवश्यक आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकामध्ये ही अट शिथिल करून ती सहा वर्ष करण्यात आली आहे. यासाठी भारतीय नागरिकत्व कायदा, १९५५ मध्ये काही बदल करण्यात आलेत. ज्यामुळे भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज करणाऱ्यांना कायदेशीररीत्या सोयीचं पडेल.

13 December 2019

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) ‘दास’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा.

   1) दाशी    2) दासी      3) माळीण    4) मादी

उत्तर :- 2

2) पुढीलपैकी अनेकवचनी नाम ओळखा.

   अ) शहारे    ब) हाल      क) केळे      ड) रताळे.

   1) अ आणि ब    2) अ आणि ड    3) अ, क आणि ड    4) फक्त ड

उत्तर :- 1

3) ‘कुत्रा’ या नामाचे सामान्यरूप काय होईल ?

   1) कुत्र्या    2) कुत्री      3) कुत्रे      4) कुत्रि

उत्तर :- 1

4) मराठीत एकूण किती विभक्ती मानल्या आहेत ?

   1) सात    2) नऊ      3) आठ      4) दहा

उत्तर :- 3

5) विध्यर्थी वाक्य कोणते ते ओळखा.

   1) जर ढग दाटले तर पाऊस पडेल      2) पाऊस पडेल
   3) पाऊस पडला असता तर बरे झाले असते    4) पाऊस पडण्याची शक्यता आहे का ?

उत्तर :-2

6) एक विशाल मंदिर तयार झाले. या वाक्यातील अधोरेखित शब्द ................. आहेत.

   1) उद्देश्य    2) विधेय      3) उद्देश्यविस्तार    4) विधेयविस्तार

उत्तर :- 3

7) ‘राजा प्रधानाला बोलावतो’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.

   1) कर्तरी    2) कर्मणी    3) भावे      4) कर्मकर्तरी

उत्तर :- 1

8) ‘नवरात्र’ या सामासिक शब्दाचा विग्रह कसा होईल ?

   1) नौ रात्रीचा समूह  2) नव रात्रींचा समूह  3) नऊ रात्रींचा समूह  4) नवरात्रौत्सव

उत्तर :- 3

9) रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.
    “वाक्य व त्याचा अर्थ पूर्ण झाला म्हणजे ................ येतो.”

   1) अर्धविराम    2) अपूर्णविराम    3) स्वल्पविराम    4) पूर्णविराम.

उत्तर :- 4

10) ‘पाठीवरी वेणी नच, नागीणच काळी’ – या वाक्यातील अलंकार ओळखा.

   1) व्यतिरेक    2) अपन्हुती    3) उत्प्रेक्षा    4) यमक

उत्तर :- 2

पोलीस भरती प्रश्नसंच

1)पर्यावरणीय कृती योजनेअंतर्गत भारतातील चार कोरल रिफ भागांमध्ये येत नाही असे ठिकाण कोणते  ?

👉खंबात खाडी

2) मगर पार्क आणि रिसर्च केंद्र कोठे आहे ?

👉 तमिळनाडू

3)बंदीपूर राष्ट्रीय उद्यान कोठे आहे ?

👉 कर्नाटक

4) पृथ्वीच्या कोणत्या भागामध्ये सूर्यप्रकाशातील अतिनील किरण उत्सर्ग शोषले जातात ?

👉 ओझोन चा थर

5) बांगलादेश कोणत्या वर्षी वेगळा देश म्हणून अस्तित्वात आला ?

👉 1971

6)भारतातील कोणत्या राज्याला सर्वात लांब समुद्रकिनारा लाभलेला आहे ?

👉गुजरात

7)भारताच्या मुख्य प्रदेशाचा दक्षिणेचा बिंदू कोणता  ?

👉केप कमोरिन

8) भारतातील कोणत्या शहरात सुप्रसिद्ध हँगिंग गार्डन आहे ?

👉मुंबई

9)कोणत्या शहरात जवळ एलिफंटा लेणी आहेत ?

👉 मुंबई

10) कोणत्या प्रसिद्ध शहरांमध्ये सुप्रसिद्ध जहांगीर आर्ट गॅलरी आहे ?

👉मुंबई

11)कोणत्या भारतीय स्मारकाने एकमेकांजवळ बांधलेल्या तीन धार्मिक मंदिरे जैन बौद्ध व हिंदू यांच्या रूपाने धार्मिक सामंजस्य सिद्ध केले आहे ?

👉 एलोरा लेणी

12) भारतातील कोणत्या शहरात हुमायु चा मकबरा आहे ?

👉दिल्ली

13)कोणत्या शहरात हजार पिलर मंदिर आहे  ?

👉वरंगळ

14)महाराष्ट्रातील प्रसिद्ध आदिवासी व्यक्तिचित्रे कोणत्या नावाने ओळखले जातात ?

👉 वारली

15)पश्चिम मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे ?

👉जबलपूर

16) लाख उत्पादनात भारतातील आघाडीवर कोणते राज्य आहे ?

👉 छत्तीसगढ

17) संजय गांधी राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी स्थित आहे ?

👉 मुंबई

आंध्र प्रदेश :बलात्काऱ्यांना २१ दिवसांमध्ये फाशीच्या शिक्षेची तरतूद

महिलांच्या सुरक्षेसाठी आंध्र प्रदेश सरकार नवा कायदा आणण्याच्या तयारीत आहे.

नव्या कायद्याअंतर्गत बलात्काराचा आरोप सिद्ध होणाऱ्या आरोपीला २१ दिवसांमध्ये फाशीची शिक्षा देण्यात येणार आहे

बुधवारी आंध्र प्रदेशच्या मंत्रिमंडळानं या विधेयकाला मंजुरी दिली.

एफआयआर दाखल केल्यानंतर २१ दिवसांमध्ये ट्रायल पूर्ण करून फाशीची शिक्षाही देण्यात येणार असल्याची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे.

आंध्र प्रदेशच्या विधानसभेत आता हे विधेयक मांडण्यात येणार आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४ मध्ये दुरूस्ती करून नवं ३५४ (ई) हे कलम तयार करण्यात आलं आहे.

भारतीय कायद्यामध्ये बलात्काराच्या आरोपात दोष सिद्ध झाल्यानंतर फाशीच्या शिक्षेची तरतूद नाही.

हे विधेयक मंजुर झाल्यानंतर बलात्काराच्या गुन्ह्याखाली फाशीची शिक्षा देणारे आंध्र प्रदेश हे पहिले राज्य ठरणार आहे.

हा कायदा आंध्र प्रदेश गुन्हे कायद्यात सुधारणा असेल. तसंच याला ‘आंध्र प्रदेश दिशा कायदा’ असं नाव देण्यात आलं आहे.

याव्यतिरिक्त आणखी एका कायद्याच्या मसुद्याला मंजुरी देण्यात आली आहे. महिला आणि बालकांवर होणाऱ्या अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये खटला चालवण्यासाठी विशेष न्यायालयाची स्थापनाही करण्यात येणार आहे.

२१ दिवसांमध्ये मिळणार शिक्षा

प्रस्तावित ‘आंध्र प्रदेश दिशा कायदा’अंतर्गत बलात्काराचा आरोप सिद्ध होणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

या अंतर्गत ७ दिवसांमध्ये तपास आणि १४ दिवसांमध्ये न्यायालयात खटला चालवण्याची तरतूद करण्यात आली आहे.

तसंच या २१ दिवसांमध्ये आरोपीला शिक्षाही ठोठावण्याची तरतूद करण्यात आली आहे.

सध्याच्या कायद्यांतर्गत खटला चालवण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी मिळतो.

या प्रकरणांसाठी १३ जिल्ह्यांमध्ये विशेष न्यायालयांची स्थापना करण्यात येणार आहे.

या न्यायालयांमध्ये बलात्कार, लैंगिक छळ, अॅसिड हल्ले आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांवर, बालकांवर होणारे अत्याचार यावरील खटले चालवले जाणार आहे.

चालु घडामोडी वन लाइनर्स, 12 डिसेंबर 2019.

🔶 12 डिसेंबर: आंतरराष्ट्रीय तटस्थ दिन

🔶 12 डिसेंबर: आंतरराष्ट्रीय युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज डे

🔶 थीम 2019: "वचन ठेवा"

🔶जगातील गरीबांपैकी 28% लोकांचे घर: मानव विकास निर्देशांक 2019

🔶 मंगत प्रभात लोढा हे भारताचे सर्वात रिअल इस्टेट टायकून म्हणून नावे आहेत

🔶 जयपूरचे आयआयएचएमआर विद्यापीठ स्वच्छ कॅम्पस क्रमवारीत 2019

🔶 अल्बर्टो फर्नांडिज यांनी अर्जेंटिनाचे नवीन अध्यक्ष म्हणून शपथ घेतली

🔶 भारती एअरटेलने 'एअरटेल वाय-फाय कॉलिंग' सेवा सुरू केली

🔶कॅथरीन ब्रंट 150 एकदिवसीय विकेट्स घेणारी पहिली इंग्लिश महिला बनली

🔶 बियान्का अँड्रिसकूने कॅनडाचा अ‍ॅथलीट ऑफ द इयर अवॉर्ड जिंकला

🔶 मेगन रॅपिनो स्पोर्ट्स इलस्ट्रेटेडचा स्पोर्ट्सपर्सन ऑफ द ईयर अवॉर्ड

🔶 'हँड इन हँड 2019' भारत-चीन संयुक्त सैन्य सराव मेघालयात सुरू झाला

🔶 गोविरहित मुलांसाठी भारतातील सर्वाधिक लोकसंख्या दुसर्‍या क्रमांकावर आहे

🔶 श्रीलंका सरकारने सुरेश साल्ले यांना राज्य गुप्तचर सेवा प्रमुख म्हणून नियुक्त केले.

🔶 फिनलँडची सन्ना मारिन (34) जगातील सर्वात तरुण पंतप्रधान होण्यासाठी

🔶20 वी जिओस्मार्ट इंडिया परिषद 2019 हैदराबादमध्ये आयोजित

🔶 2018 मध्ये जागतिक स्तरावर शस्त्रास्त्र विक्रीत सुमारे 5% वाढ झाली: एसआयपीआरआय

🔶 2018  मध्ये अमेरिकेच्या शस्त्रास्त्र उत्पादनामध्ये अव्वल स्थान

🔶 2018 मध्ये रशिया शस्त्रास्त्र उत्पादनात द्वितीय क्रमांक: एसआयपीआरआय

🔶2018 मध्ये शस्त्रास्त्र उत्पादनात युनायटेड किंगडम तिसर्‍या क्रमांकावरः एसआयपीआरआय

🔶2018 मध्ये फ्रान्सने शस्त्रास्त्र उत्पादनात चौथ्या क्रमांकावर: एसआयपीआरआय

🔶 2018 मध्ये शस्त्रास्त्र उत्पादनात भारताचा दहावा क्रमांक: एसआयपीआरआय

🔶कार्यकर्ते दावी कोपेनावा यांना योग्य रोजीरोटी पुरस्कार  प्रदान

🔶 ग्रेटा थुनबर्गला राइट लाइव्हहुअलि अवॉर्ड २०१ With प्रदान करण्यात आला

🔶 गुओ जियानमेईला राइट लाइव्हहुअलि अवॉर्ड २०१ With प्रदान करण्यात आला

🔶 अमीनाटू हैदरला उजव्या रोजीरोटी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

🔶 व्ही विश्वनाथन यांना धनलक्ष्मी बँकेच्या अतिरिक्त संचालकपदी नियुक्ती

🔶 वसीम जाफर 150 रणजी सामने खेळणारा पहिला क्रिकेटर ठरला

🔶 गुलू मीरचंदानी बॅग्स सीईमा लाइफटाइम अचिव्हमेंट पुरस्कार

🔶 हिमाचल प्रदेश मंत्रिमंडळाने यमुनाचे पाणी विकायला होकार दिला

🔶 दिल्ली सहाव्या हिंद महासागर संवाद आणि दिल्ली संवाद इलेव्हनचे आयोजन करेल

🔶 तिसरा भारत-ऑस्ट्रेलिया सचिव-स्तर 2 + 2 संवाद नवी दिल्ली येथे आयोजित

🔶 मेरीम-वेबस्टर नावे 'ते' वर्ड ऑफ द इयर 2019 म्हणून

🔶 दुखापतग्रस्त धवनची वनडे मालिका वि

🔶 अमेरिकेचे माजी फेडरल रिझर्व्ह चेअरमन पॉल वोल्कर यांचे निधन

🔶 सुनील शेट्टी यांनी अँटी-डोपिंग ब्रँड अ‍ॅम्बेसेडर नाडावर स्वाक्षरी केली

🔶 इथिओपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना नोबेल शांतता पुरस्कार 2019 प्राप्त झाला

🔶 उच्च हवामान कामगिरीसह भारत पहिल्या 10 देशांमध्ये आहे

🔶 आयसीएसएसआर चे अध्यक्ष ब्रज बिहारी कुमार यांचे निधन

🔶 भारताच्या आर. प्रग्नानंधाने लंडन चेस क्लासिक जिंकला

  🔶नेपाळमधील काठमांडू येथे 13 वा दक्षिण आशियाई खेळांचे आयोजन

13 13 व्या दक्षिण आशियाई स्पर्धेत भारताने एकूण 312 पदके जिंकली

🔶 नागरिकत्व (दुरुस्ती) विधेयक, राज्यसभेमध्ये 2019 सक्षम

🔶 बलात्कार प्रकरणांकरिता ओडिशा 45 फास्ट-ट्रॅक न्यायालये स्थापन करणार आहे

🔶 ग्रेटाथुनबर्गने टाइम मासिकाचे 2019 वर्षातील व्यक्ती म्हणून घोषित केले.