31 March 2020

अमेरिका-चीनमधील ‘कोरोनावॉर’: नवीन विश्वरचनेच्या निर्मितीचे संकेत 

- डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक

डोनाल्ड ट्रम्प यांनी 2016 मध्ये राष्ट्राध्यक्षपदाची धुरा सांभाळली तेव्हापासून अमेरिका आणि चीन यांच्यातील संघर्ष सातत्याने पुढे येत गेला. गेल्या काही महिन्यांत हा संघर्ष शिगेला पोहोचला. दोन्ही राष्ट्रांमध्ये जवळपास दोन वर्षे व्यापारयुद्धही सुरु होते. या व्यापारयुद्धातही दोनही देशांचे संबंध कमालीचे तणावपूर्ण झाले होते. हा तणाव काही आठवड्यांपूर्वी निवळल्यामुळे संपूर्ण जगानेच सुटकेचा निःश्‍वास टाकला होता. परंतु कोरोना कोविड १९ या विषाणूच्या महामारीचा उद्रेक झाला आणि त्याची जबरदस्त झळ अमेरिकेलाही बसल्यामुळे दोन्ही देशांतील संबंध पुन्हा विकोपाला जाण्याइतपत ताणले जाऊ लागले आहेत. 
चीनच्या वुहानमधून उगम पावलेल्या कोरोनाने अमेरिकेत अक्षरशः कहर केला आहे. आजघडीला इटली, स्पेन, अमेरिका, इंग्लंड ही या विषाणूची केंद्रे बनली आहेत. अमेरिकेतील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. या विषाणूजन्य आजारामुळे मरणार्‍यांची संख्या हजाराच्या घरात पोहोचली आहे. त्यामुळे संपूर्ण अमेरिका, तेथील समाजजीवन आणि अर्थकारण संकटात सापडले आहे. त्यामुळेच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता चीनवर उघड आरोप करायला सुरूवात केली आहे. जोपर्यंत हा विषाणू चीनपुरता मर्यादित होता, तोपर्यंत ट्रम्प यांनीही त्याला ङ्गार महत्त्व दिलेले नव्हते, किंबहुना हा फ्लूचा प्रकार आहे, त्याचा फारसा परिणाम अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर होणार नाही, अशा स्वरूपाची वक्तव्ये ट्रम्प यांच्याकडून केली गेली. पण जसजसा कोरोना विषाणूचा प्रसार हा वाढू लागला आणि जेव्हा त्याचा प्रसार अमेरिकेत वाढायला लागला, अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ लागले त्यावेळेला डोनाल्ड ट्रम्प यांना राष्ट्रीय आणीबाणी घोषित करावी लागली. अमेरिकेचा शेअऱ बाजार गडगडला. नंतर ट्रम्प यांच्या असेही लक्षात आले की केवळ अर्थव्यवस्थाच नाही तर कोरोनाच्या विळख्यामध्ये अमेरिकेतील बहुतांश राज्ये आली आहेत. मग मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकार परिषदांमध्ये उघडपणे चीनला लक्ष्य करायला सुरुवात केली. चीनने जगाला संकटात टाकले आहे, असा आरोप त्यांनी जाहीरपणाने केला. त्यांनी कोरोना विषाणूला चायना व्हायरस किंवा वुहान व्हायरस असे म्हटले. ट्रम्प यांच्या या वक्तव्याचे तीव्र पडसाद चीनमध्ये उमटले. चीनने लागलीच त्यावर प्रत्युत्तर देण्यास सुरूवात केली. हा विषाणू चीनकडून आलेला नसून उलट अमेरिकेच्या लष्कराने याचा प्रसार केला आहे, असा गंभीर आरोप चीनकडून करण्यात आला. एवढेच नव्हे तर चीनमधील सरकारी प्रसारमाध्यमांनी जागतिक पातळीवर एक अजेंडा ठरवला, ज्यामध्ये काही मुद्द्यांवर भर देण्यात आला. त्यातील पहिला मुद्दा म्हणजे ,या विषाणूचा जन्म चीनमध्ये झालेला नसून तो अमेरिका पुरस्कृत विषाणू आहे. दुसरा मुद्दा म्हणजे कोरोना नियंत्रणात आणण्यासाठीच्या लढ्यात चीनमधल्या साम्यवादी शासनाला आणि राष्ट्रप्रमुख शी जिनपिंग यांनी केलेल्या सर्व कारवाईला कमालीचे यश मिळाले आहे. परंतु पाश्‍चिमात्य देश विशेषतः अमेरिका या विषाणूवर नियंत्रण मिळवू शकत नाहीये. त्याचप्रमाणे अमेरिकेने चीनवरून जाणारे विमान बंद केले आहे, त्यावरही चीनने विरोध दर्शवला आहे. 
या दोन्ही राष्ट्रांकडून परस्परांवर होणार्‍या आरोपांची तीव्रता वाढली आहे. ट्रम्प यांनी अमेरिकेत कोरोनाचा प्रसार वाढू लागल्यानंतर युरोपातून येणारी सर्व विमाने थांबवली आहेत. केवळ अमेरिकाच नव्हे आज सर्वच देश दुसर्‍या देशाला मदत करण्याच्या मनस्थितीत नाहीत. अशा परिस्थितीत चीनने युरोपला मदतीचा हात देऊ केला. चीनकडून युरोपला मोठ्या प्रमाणावर औषधे, मास्क, सॅनिटायझर यांचा पुरवठा केला जात आहे. चीनने आपल्या प्रपोगंडा

मशीनचा वापर करत जगाला हे दाखवायला सुरूवात केली की आमच्यावर एवढे मोठे संकट असूनही आम्ही सर्व जगाला सगळ्या गोष्टी पुरवतो आहोत. या प्रपोगोंडा गेममध्ये चीनला यश मिळाले आहे. आज जगाच्या मदतीसाठी चीन सरसावतो आहे असे चित्र निर्माण झाले आहे. दुसरीकडे, जागतिक महासत्ता असणारा अमेरिका मात्र स्वतःच्या गोष्टींमध्येच गुंतला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात चीनचे महत्त्व वाढते आहे. 
चीनने सांगितले कोरोना विषाणू संसर्गावर आम्ही पूर्णपणे नियंत्रण मिळवले आहे, असा दावा केला आहे. आमच्याकडील उद्योगधंदे हळूहळू सुरू होत आहेत, असेही चीन सांगत आहे. परंतू कोरोनाचा प्रसार अजून किती काळ होत राहील, याबाबत कोणालाच काही सांगता येत नाहीये. त्यामुळे कोरोना विषाणूचा झटका अमेरिका आणि युरोपला जबरदस्त बसणार आहे. साहजिकच अशा स्थितीमध्ये येत्या काळात आंतरराष्ट्रीय राजकारण हे चीनकेंद्रीत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. 
आज संपूर्ण अमेरिकेत भीतीचे वातावरण आहे. ह्या वातावरणामागे आर्थिक असुरक्षितता हे महत्त्वाचे कारण आहे. कदाचित अमेरिकेला या परिस्थितीची क

ल्पना असावी. १९९३ पासून म्हणजे गेल्या तीस वर्षात कोक आणि ड्रॅगन हे एकत्र जाऊ शकतात अशा पद्धतीची मान्यता संपूर्ण अमेरिकेत होती. कोक म्हणजे अमेरिका आणि ड्रॅगन म्हणजे चीन. आपण चीनबरोबर शत्रुत्व करण्यापेक्षा किंवा त्याला शत्रु मानण्याऐवजी जर दोघांनी एकत्रित काम केले तर कदाचित दोन्ही देशांचा ङ्गायदा होईल, अशी मांडणी करण्यात आली आणि त्यानुसार पुढील गोष्टी घडत गेल्या. खूप अमेरिकन कंपन्या या चीनी कंपन्यांकडून मिळणार्‍या कच्चा मालावर विसंबून होत्या. आजघडीला अमेरिकेतील औषध निर्मिती उद्योग पूर्णपणे चीनकडून जो कच्चा माल दिला जातो, (ङ्गार्मास्युटिकल्स इनग्रेडियंटस) त्यावर अवलंबून आहे. हा माल चीनकडून मिळत नाही तोपर्यंत अमेरिकेत औषधनिर्मिती होऊ शकत नाही इतकी गंभीर परिस्थिती आहे. म्हणजे अमेरिकेत निर्माण होणारी प्रतिजैविके किंवा अँटीबायोटिक्स आजघडीला १०० टक्के चीनच बनवतोय. त्यामुळे चीनच्या एका सरकारी अधिकार्‍यांने असे वक्तव्य केले होते की आम्ही अमेरिकेचा औषधपुरवठा बंद केला तर अख्खा अमेरिका कोरोना विषाणूमुळे उद्धवस्त होईल. हे वक्तव्य अत्यंत स्ङ्गोटक होते. 
सध्या अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदासाठीच्या सार्वत्रिक निवडणुकांचे वातावरण असल्याने या सगळ्याला पक्षीय राजकारणाचे रूप दिले जात आहे. यावरुन संपूर्ण अमेरिकेत ङ्गूट पडताना दिसतेय. काही जण राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे संशयाने पाहू लागले आहेत. विशेष म्हणजे चीनला डोनाल्ड ट्रम्प हे पुढील राष्ट्राध्यक्ष म्हणून नको आहेत. त्यामुळे चीनने त्यांच्यावरील आरोप अधिक तीव्र करायला सुरूवात केली आहे. आता दोन्ही देशामधील आरोप-प्रत्यारोपाचे युद्ध आता प्रपोगंडा युद्धाचे रूप घेते आहे. शीतयुद्धाच्या काळात जसे अमेरिका आणि सोव्हिएत रशिया यांच्यातील प्रपोगंडा मशिनरी होती ती परस्परांच्या विरोधात असे आरोप प्रत्यारोप करणे, पुरावे सादर करणे, दावे प्रतिदावे करणे अशाच प्रकार आता चीन आणि अमेरिकेच्या बाबतीत सुरू झाला आहे. यास कोरोना विषाणू हे नवीन कारण मिळाले आहे. सत्तेची नवी समीकरणे पुढे येत आहेत. दुसर्‍या महायुद्धानंतर अमेरिका आणि युरोप हे सातत्याने एक होते, त्यातही पश्‍चिम युरोप. तर अमेरिकेने नाटोसारखी लष्करी संघटना काढली होती. ही संघटना अमेरिकेच्या नेतृत्वाखाली होती. दुसर्‍या महायुद्धात युरोपचे जे प्रचंड आर्थिक नुकसान झाले होते, ते भरून काढण्यासाठी अमेरिकेने मार्शल प्लान, ट्रूमन यांसारख्या काही महत्त्वाच्या आर्थिक मदतीच्या योजना राबवल्या होत्या. याच्या अंतर्गत युरोपला मोठ्या प्रमाणावर मदत केली गेली. पण आजच्या परिप्रेक्ष्यात हाच युरोप अमेरिकेपासून दूर जाताना दिसतो आहे.
अर्थात याला कारण डोनाल्ड ट्रम्प हेच आहेत. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प निवडून आल्यानंतरच युरोप आणि अमेरिकेत खटके उडायला सुरूवात झाली. आता तर या मतभेदाने कळस गाठला आहे. अमेरिका ङ्गर्स्ट या ट्रम्प यांच्या धोरणामुळे या मतभेदांना सुरूवात झाली होती. कोरोना विषाणू संसर्गामुळे अमेरिकेच्या हाती कोलित

मिळाल्यासारखे झाले आहे. ट्रम्प यांनी युरोपशी व्यवहारच पूर्णपणे बंद केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी युरोपातून अमेरिकेला येणारी विमाने बंद केली तेव्हा युरोपने त्याचा निषेध करत ‘याची आवश्यकता नव्हती’ असे वक्तव्य केले. या नाराजीमुळेच युरोप अमेरिकेपासून दूर जात असताना चीनने हुशारीने ही संधी साधली आहे. आज चीन युरोपच्या जवळ येत चालला आहे. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय समुदायातील १९३ देशांापैकी अमेरिकेचा अपवाद वगळता कोणीही चीनवर टीका करत नाहीये. एवढेच नव्हे तर चीन जे आरोप अमेरिकेवर करतो आहे त्याला रशिया आणि इराण यांचे समर्थन मिळते आहे. त्यामुळे एकीकडे युरोप, चीन, रशिया, इराण यांसारखे पूर्वी वैचारिक विरोधक असलेले देश एकत्र येताना दिसताहेत आणि अमेरिका मात्र आंतरराष्ट्रीय राजकारणात एकटा पडताना दिसतो आहे.
मागील काळात अमेरिकेने मोठ्या आंतरराष्ट्रीय संस्था संघटनांना, बहुराष्ट्रीय संस्था संघटनांना मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत करायची आणि अशी मदत केल्यानंतर त्यांना आपल्या हितसंबंधांना वापरून घ्यायचे अशी एक प्रकारची रणनीती आखली होती. तोच प्रकार आता चीन करतो आहे. चीनची अर्थव्यवस्था मोठी असल्याने, जगभरात त्यांचे अब्जावधी रूपयांचे प्रकल्प सुरू आहेत. चीनने आंतरराष्ट्रीय संस्था संघटनांना मोठी आर्थिक मदत करायला सुरूवात केली आहे. विशेषतः जागतिक आरोग्य संघटनाही चीनची बाजू उचलून धरते आहे. या संपूर्ण संघर्षामुळे एक नवी विश्‍वरचना आकाराला येण्याची दाट शक्यता आहे. याला कोरोनापश्‍चातची विश्‍वरचना म्हणता येईल. या रचनेमध्ये अमेरिका हा बर्‍यापैकी बाजूला पडलेला असेल आणि अमेरिकेच्या बाजूला जाण्याने एक पोकळी निर्माण होणार आहे ती पोकळी चीन भरून काढण्याची शक्यता आहे. त्यामुळे एक वेगळेच चीनकेंद्रीत जग कदाचित पहायला मिळू शकते. 

General Knowledge

▪ कोणत्या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळतात.
उत्तर : औरंगाबाद

▪ भारतीय पठारी प्रदेशाने किती क्षेत्र व्यापले आहे?
उत्तर : 12 लोक चौ.कि.मी.

▪ पोलो खेळाचा उगम कोणत्या राज्यात झाला?
उत्तर : मणिपूर

▪ झाबुआ हा आदिवासी भाग कोणत्या राज्यात आहे?
उत्तर : मध्य प्रदेश

▪ कोणत्या राज्यात रबराची सार्वधिक लागवड होते?
उत्तर : केरळ

▪ मेळघाट हे वाघासाठी सुप्रसिद्ध जंगल कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर : अमरावती

▪ महाराष्ट्रात कोणत्या नदीची लांबी सर्वात कमी आहे?
उत्तर : नर्मदा

▪ नर्मदा नदीच्या दक्षिण भागात असेलेले भारतातील सर्वात मोठे पठार कोणते?
उत्तर : दख्खनचे पठार 

▪ भारताच्या कोणत्या राज्याची राजधानी सात वन्य टेकड्यावर आहे?
उत्तर : तिरुवनंतपूरम

▪ कोणत्या राज्यात देशातील पहिले गायीचे अभयारण्य स्थापण्यात येणार आहे?
उत्तर : मध्ये प्रदेश

१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध

 हे १० मे १८५७ रोजी मीरत येथील लष्करछावणीतील बंडापासून सुरू झाले व लवकरच ते उत्तर व मध्य भारतातील अनेक ठिकाणी पसरले. हा लढा १८५७चे स्वातंत्र्यसमर, पहिला भारतीय स्वातंत्र्यलढा, शिपाई बंडाळी (इंग्लिश: Sepoy mutiny) अशा इतर नावांनीही ओळखला जातो.जवळपास वर्षभर चाललेल्या या युद्धात इंग्रजांचा विजय झाला पण या बंडामुळे भारतीय स्वातंत्र्यचळवळीला प्रारंभ झाला व ९० वर्षानंतर १९४७ साली भारत स्वतंत्र झाला.

१० मे १८५७ रोजी दिल्लीपासून ४० मैलांच्या अंतरावर मेरठ छावणीमध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतीय सैनिकांनी बंड पुकारले व बघता बघता उत्तर पुर्व व मध्य भारतात पसरले. १० मेला सुरु झालेले बंड २० जुन १८५८ रोजी ग्वाल्हेर कंपनीच्या ताब्यात पडल्यानंतरच थांबले. बंडखोर शिपायांनी मेरठ काबीज केले व लागोलाग दिल्लीवर जबरदस्त हल्ला चढवून दिल्लीत बसलेले कंपनीच्या अधिकाऱ्यांना व ब्रिटिश सैन्याला चिरडले व ८१ वर्षांच्या बहादूरशहा दुसरा यास हिंदुस्थानचा बादशहा घोषित केले. अवधचा मोठा भुभाग देखील शिपायांच्या ताब्याखाली आला व ब्रिटिश सैन्य घाबरले. तरी कंपनीने कुमक मागवून जुलै १८५७ मध्ये कानपूर व दिल्लीवर पुन्हा कंपनी शासन लागू केले. पण झाशी, अवध आणि लखनऊतील विद्रोह दडपण्यासाठी कंपनीला खुप वेळ लागला.

१ नोव्हेंबर १८५८ ला विद्रोह दडपल्यानंतर ब्रिटिश संसदेने संपुर्ण हिंदुस्थानचा कारभार राणी व्हिक्टोरियाकडे दिला व देशातील कंपनी राज संपुष्टात आले.

🟤 उठावाची कारणे  🟤

बंगाल प्रांत काबीज केल्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीने आपले साम्राज्यवादी धोरण पुढे नेत अनेक प्रदेश भारतीयांकडून जिंकले व रयतेवर जुलूमी शासन लादले.

कंपनीच्या सैन्यातील एकाच पदावर असलेल्या ब्रिटिश व भारतीय सैनिकांमध्ये भेद केला जात असे. ब्रिटिश सैनिकाला भारतीय सैनिकापेक्षा अधिक सोयीसुविधा व पगार दिला जात असे.

कंपनी सरकारने भारतीयांना नीळ,अफू अशी नगदी पीके घेण्यास सक्ती केली. भारतीयांकडून ही पीके ते स्वस्तात विकत घेत व चीनमधे जाऊन मोठ्या नफ्याने विकत. शेतकरी,कामगारांकडून मोठ्या प्रमाणात करवसुली केली जात असे.

१८५७ च्या सुरुवातीला सरकारने ईनफिल्ड नावाच्या नव्या बंदुका आणल्या. त्या बंदुकांची काडतुसे गुळगुळीत होण्यासाठी गायीच्या वा डुक्कराच्या चरबीत बुडवलेली असत. गाय हिंदूना पवित्र तर डुक्कर मुसलमानांना निषिद्ध असते. बंदुकीत भरण्यापूर्वी अशी काडतुसे ओठात धरून उघडावी लागत. त्यासाठी ती काडतुसे तोंडात घालण्याची जबरदस्ती केल्याने भारतीय सैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता.

या व अशा कारणांमुळे शिपायांनी बंड पुकारण्याचे ठरवले. ही कारणे केवळ निमित्तमात्र होती. खरे कारण भारतीयांना देश ईस्ट इंडिया कंपनीपासून मुक्त करायचा होता, हे आहे.

🟤१८५७चे स्वातंत्र्यसमर  : पुस्तक  🟤

वि.दा. सावरकरांनी ‘१८५७चे स्वातंत्र्यसमर’ हा अद्वितीय मराठी ग्रंथ लिहिला, त्यावेळी त्यांचे वय फक्त २५ होते. दुर्दैवाने ग्रंथाची हस्तलिखित प्रत इंग्रजांनी जप्त केली. सावरकरांनी केवळ आठबवणीतून हा ग्रथ परत सिद्ध केला, पण यावेळी तो इंग्रजीत लिहिला. तो यथावकाश प्रसिद्ध झाला. पुढे सावरकरांनी या मराठी ग्रंथाची आधीच लिहिलेली एक कच्ची प्रत त्यांचे स्नेही गोव्यातील डॉ. कुटिन्हो यांच्याकडे मिळाली. कुटिन्हो ख्रिश्चन आणि त्यातही गोव्यातले, त्यामुळे त्यांच्याकडे प्रत असल्याचा इंग्रजांना संशयही आला नाही. ह्या मराठी प्रतीवरून बाळाराव सावरकरांनी ‘१८५७चे स्वातंत्र्यसमर’ हा मराठी ग्रंथ प्रकाशित करवला.

आचार्य अत्रे यांनी जेव्हा हा ग्रंथ वाचला तेव्हा त्यांनी ‘नवयुग’मध्ये लिहिले, ’वाचकहो, मला खून चढला आहे. हा खून हर्षाचा आहे. हा दिव्य आनंदाचा खून मला वीर सावरकर यांचा ‘अठराशे सत्तावनचे स्वातंत्र्यसमर’ हा ग्रंथ वाचून चढला आहे. हा ग्रंथ नाही, जिवंत ज्वालामुखी आहे. हा भडकलेला वणवा आहे. आरामखुर्चीवर पडल्या पडल्या किंवा अंथरुणावर लोळत वाचण्यासारखा हा ग्रंथ नाही. मी आजवर अनेक ग्रंथ वाचले, मात्र असा ग्रंथ मी कधी पाहिला नाही, वाचला नाही. जुलमी साम्राज्यशाहीचा विध्वंस करण्याचे सामर्थ्य या एका ग्रंथात आहे.’

🟤१८५७ च्या उठावाचे स्वरूप 🟤

इ.स. १८५७ च्या या उठावाच्या स्वरूपाविषयी निरनिराळ्या इतिहासकारांनी वेगवेगळी मते मांडली आहेत. ईस्ट इंडिया कंपनीने भारतीय प्रदेश आपल्या नियंत्रणाखाली आणण्यात यश मिळविले असले तरी प्रारंभीच्या काळापासूनच कंपनीला भारतीयाचा विरोध सहन करावा लागत होता. इंग्रजांच्या वसाहतवादी धोरणामुळे व भारतीयाचे आर्थिक शोषण करण्याच्या त्यांच्या नीतीमुळे ब्रिटिशाविरुद्ध भारतीय समाजात असंतोष निर्माण झाला होता. या असंतोषातूनच ठीकठिकाणी बंड व उठाव घडून आले होते . तथापि , या उठावाना स्थानिक स्वरूप असल्याने हे उठाव इंग्र्जी सत्तेपुढे फार मोठे आव्हान उभे करू शकले नाहीत. इ.स. १८५७ च्या उठावाचे स्वरूप मात्र वेगळे व वैशिष्टपूर्ण होते . या उठावाची व्याप्ती मोठी असल्याने ब्रिटिशापुढे हा उठाव एक आव्हान ठरले. भारतातील इंग्र्जी सत्ता नष्ट करण्याचा भारतीय जनतेने केलाला हा मोठ्या प्रमाणावरील एक प्रयत्न होता. या उठावाच्या रूपाने भारतीय समाजाच्या मनात इंग्र्जी सत्तेविषयी असलेला असंतोष उफाळून आला. हा उठाव अयशस्वी ठरला असला तरी भारतीय समाजमनात ब्रिटिश सत्तेविरुद्ध असलेल्या असंतोषाचे प्रगट झालेले ते एक रौद् स्वरूप होते. या उठावाच्या स्वरूपाविषयी इतिहासकारांनी पुढीलप्रमाणे वेगवेगळी मते मांडली आहेत.

१) ब्रिटिश इतिहासकारांच्या मते इ.स. १८५७ चा उठाव म्हणजे ' शिपायांचे बंड ' होते .

सर जाॅन लॉरेन्स, जॉन सिली , पी. इ. रॉबट॔स् या इंग्र्ज इतिहासकारांनी या उठावाला ' शिपायांचे बंड ' म्हटलेले आहे. त्यांच्या मते, या उठावामागे सैन्यातील काही असंतुष्ट शिपायांचा वैयक्तीक स्वार्थ होता. उठावामध्ये राष्ट्रभक्तीची भावना नव्हती.

प्रा. न. र. फाटक या प्रसिद्ध भारतीय विचारवंतानेही या उठावाल, ' १८५७ ची शिपाईगर्दी ' असे म्हटले आहे.

शहीद भगतसिंग आणि गांधीजी

भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना जी फाशी झाली ती कायदेमंडळात बाँब फ़ेकला म्हणून नाही, तर सौंडर्सच्या हत्येच्या आरोपाखाली त्यांना फाशी देण्यात आली. ही हत्या १७ डिसेंबर, १९२८ रोजी झाली होती. त्यावर खटला चालवण्यात आला आणि त्याच्या अखेरीस २३ मार्च, १९३१ रोजी फासावर लटकविण्यात आले. .

महात्मा गांधींनी या संदर्भात लक्ष घालावे अशी त्यांना विनंती करण्यात आली. भगतसिंग व त्यांच्या सहकाऱ्यांची फाशीच्या शिक्षेतून सुटका व्हावी म्हणून १९ मार्च रोजी गांधींनी दिल्ली येथे व्हॉइसरॉय लॉर्ड आयर्विन यांची भेट घेतली. पण गांधींच्या रदबदलीचा काही उपयोग झाला नाही. परंतु या रदबदलीची बातमी पंजाबच्या तत्कालीन गव्हर्नरला मिळाली. ही रदबदली कदाचित यशस्वी होईल असे त्यांना वाटले. त्यामुळे २४ मार्च हा फाशीचा दिवस ठरला असूनही, आदल्या दिवशी रात्रीच लाहोरच्या तुरुंगात त्यांना फाशी देण्याचा कार्यक्रम उरकून घेण्यात आला. मुख्य म्हणजे २३ मार्च रोजीच गांधी यांनी आयर्विन यांना पत्र लिहून भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांची फाशीची शिक्षा रद्द करण्याविषयीचे कळकळीचे आवाहन केले. पण त्याचा काही परिणाम झाला नाही.

कालांतराने बीबीसीवर दिलेल्या मुलाखतीत आयर्विन यांनी आपल्या ताठरपणाचे समर्थन केले - "कायद्याची अंमलबजावणी करणे हे माझे कर्तव्य होते. मी भगतसिंगांसंबंधीचे कागदपत्र पाहिले व न्यायाची अंमलबजावणी करण्यात ढवळाढवळ न करण्याचे ठरवले."

भगतसिंगांचा मार्ग जरी गांधीजींना पसंत नव्हता तरी त्यांच्याबद्दल गांधीजींना प्रचंड आदर होता. त्यांच्या फाशीनंतर ’यंग इंडिया’मध्ये लेख लिहून गांधीजींनी त्यांच्या हौतात्म्याला आदरांजली वाहली

वनांबद्दल सर्व माहिती

1 ) उष्ण कटिबंधीय सदाहरित वने

- 200 सेंमी किंवा त्या पेक्षा जास्त असणाऱ्या प्रदेशात
- जांभा मृदेच्या भागात ही वने आढळतात
- वर्षभर हिरवी दिसतत् म्हणून त्यांना सदाहरित वने म्हणतात
- वृक्षाची उंची 45 ते 60 मी दरम्यान

-भरपूर पाऊस ,आद्रतेचे जास्त प्रमाण व जमिनी मध्ये "ह्युमसचे" मुबलक प्रमाण असल्याने घनदाट वनस्पतींचे आच्छादन पहावयास मिळते

- घनदाट अरण्य मध्ये कमी उंचीच्या वनस्पतीची वाढ होते.

- महाराष्ट्र मध्ये सिधुदुर्ग भगत सावंतवाडी, महाबळेश्वर, पाचगणी, माथेरान, अमरावती- गाविलगड गड, गडचिरोली, चंद्रपूर

- उष्ण कटिबंधीय सदाहरित अरण्यामध्ये वृक्षाचे प्रकार : पांढरा, सिडार, फणस, नागचंपा, कावसी, जांभूळ,वेत,तेलताड,तसेच बांबू आई कळक 

- त्या घनदाट अरण्यामधेय कमी उंचीच्या वनस्पतींहीदेखील वाढ होते

* आर्थिक महत्व :

-आर्थिकदृष्ट्या मर्यादित प्रमाणात उपयोग होतो,त्याचे मुख्य कारण या वनस्पतीपासुन तयार होणारे लाकूड अतिशय
कठीण असल्याने ते "टिंबर" म्हणून वापरण्यास योग्य असत नाही.

- वृक्षाचे वनसंवर्धन होणे अत्यंत गरजेचे आहे कारण त्याच्या साह्याने मृदसंधारण होते

- भूमिगत पाण्याची पातळी वाढते आणि मूळ वनस्पती तोडल्यानंतर त्या ठिकाणी त्याच प्रकारच्या वनस्पतींची निर्मिती होत नाही कमी प्रतीच्या वनस्पती येऊ लागतात

2) उष्ण कटिबंधीय निमसदाहरित अरण्ये:

- वार्षिक पर्जन्य 200 सेंमी पेक्षा कमी असणाऱ्या प्रदेशात

-पश्चिम किनारपट्टीवर कोकणामध्ये त्याचा एक सलग भाग पाहायला मिळतो 

- सदाहरित आणि पानझडी वने  यांच्या संक्रमण अवस्थेत ही अरण्ये आहेत

- सह्याद्री पर्वताच्या पश्चिम भागात घाटमाथ्यावरही काही वनस्पती आढळतात

- आंबोली, लोणावळा, इगतपुरी, या परिसरात निमसदाहरित अरण्ये आढळतात

-ह्याची उंची सदाहरित अरण्यापेक्षा कमी उंचीचे असतात

- वृक्षाची पाने गळण्याचा हंगाम वेगळा असतो यामुळे वर्षभरात सर्वसाधारण स्वरूपात हिरवीगार वने असतात

- वृक्षाचे प्रकार : निमसदाहरित अरण्यात किंडल,रानफणस,नाना, कदंब, शिसम, बिबळा,आईनं, नाना, वावळी ही वृक्ष आढळतात

- बांबूची वने कमी प्रमाणत आहेत

- निमसदाहरित वने कोकण व सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर आहेत

3) उपउष्णकटिबंधीय सदाहरित वने

-सहयाद्रीच्या पर्वतावर 250 सेंमी पेक्षा जास्त पाऊस असणाऱ्या प्रदेशात ही अरण्ये आहेत.

- पाचगणी, महाबळेश्वर, माथेरान व भीमाशंकर च्या परिसरात उपउष्णसदाहरित वने आढळतात

- उत्तर महाराष्ट्र गाविलगड टेकड्यावरही वने आढळतात

- सह्याद्रीच्या पर्वतामधील वर व पाचगणी, महाबळेश्वर, माथेरान व भीमाशंकर च्या परिसरात पावसाचे भरपूर प्रमाण तुलनात्मक दृष्ट्या मध्यम स्वरूपाचे तापमान, दीर्घकाळ पाऊस आणि आद्रता या सर्व घटकामुळे उप उष्ण सदाहरीत वृक्ष आढळतात

- जांभा जमिनीचाही प्रभाव वनस्पतीच्या वितरणावर झालेला आहे

-अरण्यात ह्या वृक्षाची फार मोठ्या प्रमाणात तोड करण्यात आली असून त्यांचे लहान पट्टे राहिलेलं आहेत

- वृक्षचे प्रकार:

जांभळा, अंजन, हिरडा, आंबा, बेहडा, कारवी

आर्थिक महत्व:

- महाबळेश्वर च्या परिसरात "जावळीच्या खोऱ्यात" शिवकाळात अति घनदाट  वनस्पती होत्या त्यानंतर त्यांची मोठ्या प्रमाणात तोड झाली

- हिरडा वृक्षाचे लाकूड चांगले मजबूत असते

- या वनस्पतीचा लाकडाचा उपयोग शेतीच्या अवजारे तयार करण्यासाठी आणि घरबांधणी साठी होतो

- मधूमक्षिपालन हा एक महत्वाचा लघुउद्योगधंदा आहे

4) उष्ण कटिबंधीय आद्रपानझडी वने- उष्ण कटिबंधीय मान्सून अरण्ये:

-महाराष्ट्रात ही अरण्ये चंद्रपूर व गडचिरोली जिह्याच्या पूर्व भागात चिरोल व नवेगाव टेकड्यावर आहेत तो परिसर "अलपल्ली अरण्ये" म्हणून ओळखला जातो

- याशिवाय भंडारा व गोंदिया जिल्ह्याच्या काही भागात, सातपुडा पर्वतरांगेत गाविलगड टेकड्या(मेळघाट) यांचाही समावेश

- उत्तर कोकणात ठाणे पालघर

- सह्याद्रीच्या पर्वतातील घाटमाथा ओल्डल्यानंतर "पर्जन्यछायेचा प्रदेश" या शिवाय सह्याद्री पर्वतापासून निघणाऱ्या शंभू महादेव डोंगररांगा , हरिश्चंद्राबाला घाट आणि सातमाळा डोंगररंगाच्या पश्चिम भागात आद्रपानझडी अरण्ये पहावयास मिलतात

- कोल्हापूर नाशिक ठाणे पालघर धुळे नंदुरबार जिह्यात पानझडी अरण्ये आहेत

- वृक्षाचे स्वरूप:

-वार्षिक पाऊस 120 ते 160 सेंमी असून  तो प्रामुख्याने पावसाळयात जून ते सप्टेंबर या चार महिन्याच्या काळात नैत्रुत्य मान्सून वाऱ्यापासून पडतो आणि वर्षातील बाकीचे आठ महिने जवळ जवळ कोरडे असतात

- पाण्याचा पुरवठा वनस्पतींना वर्षभर पुरेसा असत नाही म्हणजेच वर्षातील  बाराही महिने वनस्पती हिरव्यागार राहण्या
इतपत जमिनी ओल्या राहत नाही विशेषतः उन्हाळयात जडत उष्णतेमुळे  जमिनीत ओलावा वनस्पती ना पुरत राहावा म्हणून अनेक वनस्पती ची पाने गळून पडतात. त्यामुळे या पर्णहीन वनस्पती पुन्हा पावसाळयात सुरू होईपर्यंत कशीतरी तग धरून शकतात म्हणून ह्यांना पानझडी अरण्ये (उष्ण कटिबंधीय आद्रपानझडी वने- उष्ण कटिबंधीय मान्सून अरण्ये:) म्हणतात

-या अरण्ये मध्ये घनदाट वृक्षाचे मध्यम स्वरूपाचे असते

- वृक्षाची उंची  30 ते 40  मीटर एवढी असते

- वृक्षाचे प्रकार:

- उष्ण कटिबंधीय आद्रपानझडी वने अरण्यात मुख्य वनस्पती सागवान आहे
- आईन, हिरडा, सिरस, शिसम, कुसुम,आवळा, किंडल,लेंडी, येरुल, बिबळा ही वृक्ष आढळतात

- बांबूची वने मिळतात.

* आर्थिक महत्व:

- सर्वात महत्वाचं वृक्ष म्हणजे सागवान

- चंदनाची वृक्ष अधून मधुन आढळतात

- चंद्रपूर व गडचिरोली  जिह्यात " आल्लापल्ली अरण्यातील" वृक्षची भारतातील प्रसिद्ध वृक्षाची गणना केली जाते

5) उष्ण कटिबंधीय रुक्ष पानझडी अरण्ये:

- सातपुडा पर्वतरांगा आणि अजिठ डोंगररांग उष्ण कटिबंधीय रुक्ष पानझडी अरण्ये आढळतात

- घटमाथ्याच्या पूर्वेस पायथ्यालागत असणाऱ्या कमी उंचीच्या टेकड्यावरही ही अरण्ये पाहाव्यास मिळतात

-विदर्भाच्या डोंगररांळ भाग उष्ण कटिबंधीय रुक्ष पानझडी अरण्ये व्यापलेला आहे

- वृक्षाचे स्वरूप :

- वार्षिक पर्जन्य  80 ते 120 सेंमी असणाऱ्या प्रदेशात रुक्ष पानझडी अरण्ये आढळतात

- उष्ण कटिबंधीय रुक्ष पानझडी वृक्ष उंच असतात
-काही ठिकाणी कमी उंचीचे सुद्धा आढळतात
- पावसाळ्यात फक्त वनस्पती हिरव्यागार दिसतात
- कोरड्या हवामानात पाण्याच्या अभावामुळे बसरेसचे वृक्ष पर्णहीन  आढळतात

- वृक्षाचे प्रकार :

-सागवान,धावडा, शिसम, तेंदू पळस,बीजसाल लेंडी, हेडी, बेल, खैर, अंजन वैगरे

आर्थिक महत्व:

- उष्ण कटिबंधीय रुक्ष पानझडी अरण्ये मध्ये अनेक वनस्पती चा उपयोग टिंबर म्हणून केला जातो

- इंधन म्हणून लाकडाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो

- खैरसारख्या वनस्पतीच्या उवयोग "कात" निर्माण करण्यासाठी केला जातो

- उष्ण कटिबंधीय रुक्ष पानझडी अरण्ये मध्ये मानवाचे अतिक्रमण मोठ्या प्रमाणात झालेले आहे, बरीचशी जमीन पिकाच्या लागवडीखाली आणण्यात आली आहे

6) उष्ण कटिबंधीय काटेरी अरण्ये

- "दख्खनच्या पठारावर" "मध्य महाराष्ट्र नद्यांच्या खोऱ्यात" च्या लागवडी च्या परिसरात असणाऱ्या डोंगररांग व कमी उंचीच्या पठारावर  काटेरी झाडे आढळतात

- पुणे, सातारा, सांगली , अहमदनगरच्या पूर्व भागात , सोलापूर मराठवाडा विदर्भ भगत काटेरी वनस्पती आढळतात

: वृक्षाचे स्वरूप:

वार्षिक पर्जन्य 80 सेंमी पेक्षा कमी असणाऱ्या प्रदेशात ही अरण्ये आढळतात

- कोरड्या हवामानात जुळवून घेणाऱ्या काटेरी वनस्पतींचे प्रमाण जास्त आहे

-वृक्षाचे प्रकार:

बाभूळ, खैर, हिवर
-निबं झाड अनेक ठिकाणी सापडतात
- तारवड्यासारख्या झउडुओचा उपयोग टॅनिग साठी केला जातो