Ads

03 April 2020

विम्बल्डन टेनिस स्पर्धा द्वितीय महायुद्धानंतर प्रथमच रद्द करण्यात आली.

🎯चार ग्रँडस्लॅमपैकी एक असलेली विम्बल्डन टेनिस स्पर्धा या वर्षी रद्द करण्यात आली असून द्वितीय महायुद्धानंतर पहिल्यांदाच म्हणजेच 75 वर्षांनंतर स्पर्धा रद्द करण्याची वेळ आली आहे. पुढील वर्षीची स्पर्धा 28 जून ते 11 जुलै या कालावधीत घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. याविषयीची घोषणा ऑल इंग्लंड क्लबने केली आहे.

🎯जगभरात थैमान घालणाऱ्या कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर या वर्षी नियोजित असलेल्या अनेक स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. विम्बल्डन स्पर्धा 28 जून 2020 पासून सुरू होणार होती.

स्पर्धेविषयी

🎯विम्बल्डन अंतिम स्पर्धा ही टेनिस क्रिडाप्रकारातली सर्वात जुनी (सन 1877 सालापासून) आणि सर्वोच्च मानांकित आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. ही स्पर्धा लंडन (इंग्लंड) येथील ऑल इंग्लंड लॉन टेनिस अँड क्रोकुएट क्लब येथे खेळली जाते. विंबल्डन विजेत्याला ऑल इंग्लंड क्लबचे सभासदपद दिले जाते. विम्बल्डन ग्रास कोर्टवर खेळवले जाणारे एकमेव ग्रँडस्लॅम आहे.

🎯आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघ (ITF) ही जागतिक टेनिस, व्हीलचेयर टेनिस आणि बीच टेनिस स्पर्धांसाठीची प्रशासकीय संस्था आहे. 1913 साली ‘आंतरराष्ट्रीय लॉंन टेनिस महासंघ’ म्हणून संघाची स्थापना झाले आणि त्याचे मुख्यालय लंडन (ब्रिटन) येथे आहे. आज या संघटनेशी 211 राष्ट्रीय टेनिस संघटना आणि सहा क्षेत्रीय संघटना संलग्न आहेत. ऑस्ट्रेलियन ओपन (जानेवारी), फ्रेंच ओपन (मे-जून), विंबल्डन (जून-जुलै) आणि यूएस ओपन (ऑगस्ट-सप्टेंबर) या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धा ITF तर्फे आयोजित केल्या जातात.

​​मिसाइलच्या कारखान्यात इस्रायलने सुरु केली व्हेंटिलेटर्सची निर्मिती.

●करोना व्हायरसच्या संकटाचा सामना करणाऱ्या  इस्रायलने क्षेपणास्त्र उत्पादन निर्मिती केंद्रावर श्वासोश्वासाचे मशीन बनवण्याचे काम सुरु केले आहे. जगातील अन्य देशांप्रमाणे इस्रायल सुद्धा करोना व्हायरसने त्रस्त आहे.

● इस्रायली _एरोस्पेस इंडस्ट्रीजच्या कारखान्यामध्ये पहिल्या *30 व्हेंटिलेटर्सची_ निर्मिती करण्यात आली आहे.

● इस्रायलमध्ये वैद्यकीय साहित्याची निर्मिती करणाऱ्य*ा  _Inovytec ने हे व्हेंटिलेटर्स बनवले आहेत. दर आठवडयाला शंभर व्हेंटिलेटर्स बनवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

● एरोस्पेस इंडस्ट्रीजच्या या *कारखान्यात अमेरिका आणि इस्रायलसाठी ‘अ‍ॅरो’ मिसाइल डिफेन्स सिस्टिम, सॅटलाइटची_ निर्मिती केली जाते.

● तर मागच्यावर्षी इस्रायलने सुद्ध*ा *चंद्रावर लँडिंगचा* प्रयत्न केला होता. त्यासाठी मानवरहीत *यानाची निर्मिती* सुद्धा इथेच करण्यात आली होती.

छत्तीसगढ सरकारचा मोठा निर्णय; आता 1⃣ 4⃣ नाही तर 2⃣ 8⃣ दिवसांचं होम आयसोलेशन.

🔰करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी देशभरात २१ दिवसांचं लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. तर दुसरीकडे सर्व राज्य सरकारदेखील आपापल्या पातळीवर योग्य ती पावलं उचलत आहेत.

🔰यादरम्यान करोनाच्या संशयित रूग्णांबाबत छत्तीसगढ सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. आता करोनाच्या संशयितांना १४ नाही तर २८ दिवसांच्या होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येणार आहे.

🔰दरम्यान, सुकमा जिल्ह्यात तेलंगणहून आलेल्या अनेक गावकऱ्यांना ठेवण्यात आलं आहे. तर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी १०० बेड असलेले आयसोलेशन सेंटर तयार करण्यात आले आहेत.

🔰या ठिकाणी करोनाच्या संशयित रूग्णांना ठेवण्यात आलं आहे, शेजारी राज्यांमध्ये करोनाग्रस्तांची वाढती संख्या पाहता सुकमा जिल्ह्यात आरोग्य विभागाची एक विशेष टीम अलर्ट झाली आहे.

🔰करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे.

🔰तर दुसरीकडे आता छत्तीसगढ सरकारच्या निर्देशाप्रमाणे करोना संशयितांना १४ ऐवजी २८ दिवसांच्या होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, तेलंगण सरकारनंही करोनामुळे ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे.

🔰निझामुद्दीनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या ६ जणांचा मृत्यू करोनामुळे झाल्याची माहिती राज्य सरकारनं दिली आहे.

02 April 2020

इतिहासातील महत्त्वपूर्ण वृत्तपत्रे

१) तत्त्वबोधिनी पत्रिका - रविंद्रनाथ टागोर
२) व्हाईस ऑफ इंडिया - दादाभाई नौरोजी
३) रास्तगोफ्तार - दादाभाई नौरोजी
४) न्यू इंडिया - बिपिनचंद्र पाल
५) न्यू इंडिया - अ‍ॅनी बेझंट
६) यंग इंडिया - महात्मा गांधी
७) इंडियन मिरर - डी. डी. सेन
८) द ईस्ट इंडियन - हेन्री डेरोझियो
९) इंडियन ओपिनियन - महात्मा गांधी
१०) नॅशनल हेरॉल्ड - पंडित नेहरू
११) इंडिपेडन्स - पं. मोतीलाल नेहरू
१२) अल-हिलाल - मौलाना आझाद
१३) अल-बलाघ - मौलाना आझाद
१४) कॉमन विल - अ‍ॅनी बेझंट
१५) भारतमाता - अजित सिंग
१६) हिंदू - सी.सुब्रण्यम अय्यर
१७) सर्चलाईट - डॉ. राजेंद्र प्रसाद
१८) सोमप्रकाश - ईश्वरचंद्र विद्यासागर
१९) पंजाबी पीपल - लाला लजपतराय
२०)  गंभीर इशारा - वि. दा. सावरकर
२१) संवाद कौमुदी - राजा राममोहन राय
२२) बॉम्बे क्रॉनिकल - फिरोजशहा मेहता
२३) बंगाली - सुरेंद्रनाथ बॅनर्जी
२४) बेंगाल हेरॉल्ड - राजा राममोहन रॉय
२५) हिन्दुस्थान रिव्ह्यू - एस. पी. सिन्हा
२६) अखबार-ए-आझम - हरिकृष्ण लाल
२७) हिंदुस्थानी वकील - जी. पी. वर्मा
२८) कॉमरेड - मोहम्मद अली जव्हार
२९) हमदर्द - मोहम्मद अली जव्हार
३०) गदर - लाला हरदयाल
३१) व्हँनगार्ड - एम. एन. रॉय
३२) मिरात-उल्-अखबार - राजा राममोहन राय
३३) उदबोधन - स्वामी विवेकानंद
३४) प्रबुद्ध भारत - डॉ. आंबेडकर
३५) रिव्होल्यूशनरी - सचिन्द्रनाथ सन्याल
३६) किर्ती - संतोषसिह
३७) ब्रह्मबोधिनी - उमेशचंद्र दत्त
३८) सुलभ समाचार - केशवचंद्र सेन
३९) बांग्लाकथा - सुभाषचंद्र बोस
४०) इंडिया - सुब्रण्यम भारती
४१) दी इंडियन स्पेक्टॅटर - बेहरामजी मलबारी
४२) इंडियन फिल्ड - किशोरीचंद मित्र
४३) अबला बांधव - द्वारकानाथ गांगुली
४४) फ्री हिन्दुस्थान -तारकानाथ दास
४५) परिदर्शक - बिपिनचंद्र पाल
४६) जन्मभूमी  - पट्टाभि सितारामय्या
४७) मुंबई समाचार - फरदुनजी
४८) तलवार - विरेंद्रनाथ चटोपाध्याय
४९) लीडर - पं. मदनमोहन मालवीय
५०) पख्तून - खान अब्दुल गफारखान
५१) इंडियन मजलीस - अरविद घोष (केम्ब्रिज)
५२) इंडियन सोशॅलॉजिस्ट - श्यामजी कृष्ण वर्मा (लंडन)
५३) वंदे मातरम् - अरविद घोष (कोलकता)
५४) वंदे मातरम् - लाला लजपतराय (पंजाब)
५५) वदे मातरम् - मादाम कामा (पॅरिस)
५६) नवजीवन समाचार - महात्मा गांधी (गुजराती)
५७) युगांतर - भूपेंद्र दत्त बारिंद्र घोष
५८) संध्या - ब्रह्मबांधव उपाध्याय
५९) अमृतबझार पत्रिका - शिरीषकुमार घोष आणि एम. एल. घोष
६०) वंगभाषी - बाबू जोगेन्द्रनाथ बसू
६१) क्रांती - मिरजेकर, जोगळेकर व घाटे
६२) प्रताप (दैनिक) - गणेश शंकर विद्यार्थी (कानपूर)
६३) मुकनायक - डाॅ. आंबेडकर
६४) बहिष्कृत भारत - डाॅ. आंबेडकर
६५) जनता - डाॅ. आंबेडकर
६६) केसरी - लोकमान्य टिळक
६७) मराठा - लोकमान्य टिळक
६८) हास्य संजीवनी - विरेशलिंगम पंतलु
६९)शालापत्रक - विष्णूशास्त्री चिपळूणकर
७०) प्रभाकर - भाऊ महाजन
७१) धुमकेतू - भाऊ महाजन
७२) ज्ञान दर्शन - भाऊ महाजन
७३) दिनबंधू - कृष्णराव भालेकर
७४) दिग्दर्शन - बाळशास्त्री जांभेकर
७५) प्रगती - त्र्यंबक शंकर शेजवलकर
७६) हरिजन - महात्मा गांधी

सर्वाधिक सामनावीर पुरस्कार मिळवणारे 5 फलंदाज

🏏 क्रिकेट सामन्यात खेळाडूंनी केलेल्या कामगिरीला मोठे महत्त्व असते. साधारण जो खेळाडू त्याच्या संघासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी करतो, त्याला हा पुरस्कार दिला जातो.

🧢 बऱ्याचदा तर विजयी संघाकडून चांगली आणि महत्त्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या खेळाडूला सामनावीर पुरस्कार दिला जातो.

💁‍♂️ पण काही वेळा किंवा खूप क्वचित असे होते की पराभूत होणाऱ्या संघातील एखाद्या खेळाडूला त्याच्या चांगल्या कामगिरीबद्दल सामनावीराचा पुरस्कार दिला जातो.

👍 *पराभुत वनडे सामन्यात सर्वाधिक सामनावीर पुरस्कार मिळवणारे फलंदाज*

● 6 सामनावीर - सचिन तेंडुलकर (200 सामने पराभूत)

● 5 सामनावीर - जावेद मियाँदाद (105 सामने पराभूत)

● 4 सामनावीर - अँडी फ्लॉवर (144 सामने पराभूत)

● 4 सामनावीर - ग्रँड फ्लॉवर (149 सामने पराभूत)

● 4 सामनावीर - ख्रिस गेल (141 सामने पराभूत)

● 4 सामनावीर - इंझमाम उल हक (148 सामने पराभूत)

महत्त्वाच्या संस्था


📌G7 (Group of 7)

☄स्थापना 1975
☄अगोदर हा गट G8 म्हणून ओळखला जात होता, परंतु रशिया बाहेर पडला.
☄सदस्य: फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, UK, USA, कॅनडा

📌BRICS

☄स्थापना: 2006
☄ मुख्यालय :~ शांघाई (चीन)
☄सदस्य: ब्राझिल, रशिया, भारत, चीन, द. आफ्रिका

📌Asian Development Bank (ADB)

☄स्थापना: 19 डिसेंबर 1966
☄मुख्यालय: Mandaluyong, Metro Manila फिलीपीन्स

📌SAARC

☄SAARC : South Asian Association for Regional Cooperation
☄ स्थापना: 16 जानेवारी 1987
☄मुख्यालय: काठमांडू, नेपाळ
☄सदस्य: अफगाणिस्तान, भारत, पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश, मालदीव

📌ASEAN

☄ASEAN : Association of South East Asian Nation
☄स्थापना: 8 ऑगस्ट 1967
☄मुख्यालय: जकार्ता, इंडोनेशिया
☄सदस्य: ब्रुनेई, फिलीपीन्स, लाओस, थायलंड, व्हियतनाम, मलेशिया, इंडोनेशिया, म्यानमार, कंबोडिया, सिंगापूर

📌BIMSTEC

☄BIMSTEC : Bay of Bengal Initiative for Multi Scetoral Technical & Economic Cooperation
☄स्थापना: 6 जून 1997
☄मुख्यालय: ढाका, बांगलादेश
☄सदस्य: बांगलादेश, भारत, म्यानमार, श्रीलंका, नेपाळ, थायलंड, भूटान

📌OPEC

☄OPEC : Organization of Petroleum Exporting Countries
☄स्थापना: 1960
☄मुख्यालय: व्हियन्ना, ऑस्ट्रिया
☄सदस्य संख्या: 13

📌IBSA

☄स्थापना: 6 जून 2003
☄मुख्यालय: Stafford ST, Abbotsford, Victoria
☄सदस्य: भारत, ब्राझिल, द. आफ्रिका

📌SCO

☄SCO : Shanghai Cooperation Organisation
☄ स्थापना :~ 2001
☄मुख्यालय :~  बिजींग (चीन)
☄ सदस्य :~ चीन, रशिया, कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, उज्बेकिस्तान, भारत आणि पाकिस्तान

4 सरकारी बँकांचं कर्ज झालं स्वस्त.

गेल्या काही दिवसांपूर्वीच आरबीआयनं रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेपो रेटमध्ये कपात केली  आहे.

रेपो रेट 75 बेसिस पॉइंटने कमी करून 4.4%  करण्यात आला असून, रिव्हर्स रेपो दरातही 90 बेसिस पॉईंटने कमी करून 4% करण्यात आला आहे.तर कर्जावरील व्याजदर 5.15 टक्क्यांवरून 4.4 टक्क्यांवर आला असून, अल्पमुदतीच्या कर्जावरील व्याजदरात घट करण्यात आली आहे.

1 मार्च रोजी असलेल्या सर्व टर्म लोनचे तीन महिन्यांचे मासिक हप्ते पुढे ढकलण्याचे अधिकार सर्व बँका तसेच नॉनबँकिंग फायनान्स कंपन्या यांना देण्यात आले आहेत.याबाबतचा निर्णय बँका तसेच कंपन्यांवर सोडण्यात आला होता.

या तीन महिन्यांच्या कालावधीसाठी दंडाच्या स्वरूपात व्याज लागणार नाही, असे दास यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर आता चार सरकारी बँकांनी व्याजदर घटवले आहेत.सर्वप्रथम स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय)  व्याजदरात कपात करण्याची घोषणा केली.

त्यानंतर बँक ऑफ इंडिया (बीओआय), बँक ऑफ बडोदा (बीओबी)ने कर्जाचे दर कमी केले. आता आणखी एक सरकारी बँक युनियन बँक ऑफइंडियाने (यूबीआय) कर्जाच्या व्याजदरात मोठी कपात करण्याची घोषणा केली आहे.

तसेच युनियन बँक ऑफ इंडियाने आपल्या रेपो दराशी संबंधित कर्जाचे व्याजदर 0.75 टक्क्यांनी कमी केले. कर्जाचे दर कमी झाल्याने आता या बँकांकडून गृह कर्ज किंवा वाहन कर्ज घेणे स्वस्त होईल.

भारतीय प्राधान्य क्रमाने  प्रोटोकॉलची सूची

👉(महत्त्वाच्या पदांवर पदानुक्रम) ज्यात कार्यकर्ते आणि अधिकारी भारत सरकारच्या त्यांच्या पद व कार्यालयानुसार सूचीबद्ध आहेत. 

👉भारताच्या राष्ट्राध्यक्षकार्यालया मार्फत भारताच्या राष्ट्राध्यक्षांनी हे आदेश स्थापन केले आहे आणि ते गृह मंत्रालयाने चालू ठेवले आहे . 

👉याचा उपयोग केवळ औपचारिक  प्रोटोकॉल दर्शविण्यासाठी केला जातो आणि त्याची कायदेशीर स्थिती नाही; 

👉हे संविधानानुसार भारताच्या राष्ट्रपती पदाच्या अग्रेषणाची श्रेणी किंवा शक्ती विभक्त करण्याचा सह-समान दर्जा दर्शवत नाही.

👉हे भारत सरकारच्या दैनंदिन कामकाजासाठी लागू नाही.

 ✅भारताचे प्राधान्यक्रम रँक व्यक्ती

1)राष्ट्रपती ( रामनाथ कोविंद )

2)उपाध्यक्ष ( व्यंकय्या नायडू )

3)पंतप्रधान ( नरेंद्र मोदी )

4)राज्यांचे राज्यपाल (आपापल्या राज्यांमध्ये)

5)माजी राष्ट्रपती ( प्रतिभा पाटील , प्रणव मुखर्जी )

5 ए)उप पंतप्रधान 

6)मुख्य न्यायाधीश.

👉लोकसभेचे सभापती

7)युनियनचे कॅबिनेट मंत्री

👉राज्यांचे मुख्यमंत्री (त्यांच्या संबंधित राज्यांमध्ये)

👉नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष ( आता अस्तित्वात नाही ) 

👉माजी पंतप्रधान ( एच.डी. देवेगौडा , मनमोहन सिंग )

👉राज्यसभा  विरोधी पक्षनेते आणि 

👉लोकसभेतील विरोधी पक्षनेते

7 अ )भारतरत्न धारक ( अमर्त्य सेन , लता मंगेशकर , सीएनआर राव , सचिन तेंडुलकर )

8)राजदूत असाधारण आणि पूर्णवेळ आणि राष्ट्रकुल देशांचे उच्चायुक्त हे भारतास मान्यताप्राप्त

👉राज्यांचे मुख्यमंत्री (जेव्हा त्यांच्या संबंधित राज्यांतील बाहेर)

👉राज्यांचे गव्हर्नर (जेव्हा आपापल्या राज्यांचे बाहेरील)

9)सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश

9ए)केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष

👉मुख्य निवडणूक आयुक्त

👉नियंत्रक आणि महालेखाकार.

10)राज्यसभेचे उपाध्यक्ष

👉राज्यांचे उपमुख्यमंत्री

👉लोकसभाचे उपाध्यक्ष 

👉नियोजन आयोगाचे सदस्य ( आता अस्तित्वात नाही ) 

👉केंद्रीय राज्यांचे मंत्री

11)केंद्रशासित प्रदेशांचे लेफ्टनंट्स गव्हर्नर (त्यांच्या केंद्रशासित प्रदेशांत)

👉ऍटर्नी जनरल

👉कॅबिनेट सचिव 

12)पूर्ण सामान्य किंवा समकक्ष रँकचे पद धारण करणार्या कर्मचार्यांची प्रमुख

👉सेना प्रमुख .

👉एअर चीफ ऑफ एअर स्टाफ.

👉नौदल स्टाफचे प्रमुख.

13)अभूतपूर्व असामान्य आणि  भारतातील मान्यताप्राप्त मंत्री.

14)उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायाधीश.

👉राज्य विधानमंडळाचे अध्यक्ष आणि वक्त्यांचे(त्यांच्या संबंधित राज्यांमध्ये).

15)केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री  (त्यांच्या केंद्रशासित प्रदेशांत).

इतिहासप्रसिद्ध वक्तव्ये


🌺" वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी " - भारतमंत्री मोर्ले

🌺 'सूक्ष्म अल्पसंख्यांक वर्ग' असे कॉंग्रेसचे वर्णन - लॉर्ड डफरीन

🌺"हिंदी लोक हिंदुस्थानात जगतील परंतु आम्हाला हिंदुस्थानावर जगायचे आहे" - भारतमंत्री बर्कनहेड

🌺स्वामी दयानंदाच्या आर्य समाजाचे " लढाऊ हिंदू धर्म" असे वर्णन- भगिनी निवेदिता

🌺राजा राममोहन राय यांच्या सतीविरोधी लढ्याबद्दल 'मानवतावादी आणि मानवजातीचा सेवक' असीप्रशांश – बेंथम

🌺"मुर्शिदाबाद हे शहर लंडन शहराइतकेच धनसंपन्न होते" - लॉर्ड क्लाइव्ह

🌺"प्रत्येक वर्षाला कॉंग्रेसचे होणारे तीन दिवसाचे अधिवेशन म्हणजे एक प्रकारचा तमाशाच आहे."अश्विनीकुमार दत्त.

🌺" भुंकत राहणारे परंतु चावा घेण्यास कचरणारे श्वान किंवा दात नसलेला कागदी वाघ." असे कॉंग्रेसचेवर्णन - अश्विनीकुमार दत्त.

🌺" कॉंग्रेस हि एक महान रोगाने पछाडलेली संघटना आहे" - अरविंद घोष

🌺" आम्ही आमच्या जोरावर भारताला जिंकून घेतले आहे आणि स्वतःच्या जोरावर तो आमच्या ताब्यात ठेऊ" - लॉर्ड एल्गिन

🌺" टिळकांना कारावासाची शिक्षा दिल्याबद्दल संपूर्ण राष्ट्र रडत आहे "- सुरेंद्रनाथ बनर्जी

🌺" बंगालच्या विभाजनाची घोषणा आमच्यावर बॉम्ब गोळ्याप्रमाणे कोसळली. बंगालची फाळणी म्हणजेआमच्या अस्मितेला हेतुपुरस्पर सरकारने दिलेला धका आहे." - सुरेंद्रनाथ बनर्जी

🌺" कोणतेही हक्क आपणास भिक मागून मिळत नसतात ते तीव्र आंदोलन करून राज्यकर्त्यांकडून हिसकूनघेतले पाहिजेत." – लाला लजपतराय

🌺‘कर्झनची तुलना औरंगजेबशी’ – गोखले

🌺' रॅडची(Rand) तुलना अफजलखानाशी ' - लोकमान्य टिळक

🌺" आम्हाला न्याय हवा आहे भिक नको" - दादाभाई नौरोजी

🌺"बिपिनचंद्र पाल व अरविंद घोष हे बंगालचे नेते कॉंग्रेसला पुढे खेचण्याचा प्रयत्न करीत होते तरफिरोजशाह मेहता व दिनशा वाच्छा कॉंग्रसला मागे खेचत होते."- आचार्य जावडेकर
  
🌺 "लखनौच्या करारातूनच पाकिस्तानच्या मागणीची पायाभरणी झाली" - डॉ. मुजुमदार

· 

🌺  " कोणत्याही परिणामांचा थोडाही
 विचार न केलेला करार म्हणजे लखनौ 
करार." - गारेट ब्रिटीशइतिहासकार.

🌺" अनी बेझंट यांना स्थानबद्ध करून सरकारने अनेक बेझंट निर्माण केले आहेत." - लॉर्ड मॉनटेग्यु

·
🌺क्रांतीकारकांना 'वाट चुकलेले तरुण' असे अनी बेझंट यांनी संबोधले.

🌺"गांधीजी राष्ट्रीय आंदोलन मोठ्या जोमाने सुरु करतात, काही काळ या आंदोलनाचे नेतृत्व कुशल रीतीनेसांभाळतात; परंतु शेवटी आंदोलन यशस्वी होत असतानाच आपल्या ध्येयाचा विचार न करता ते मधूनचपळ काढतात." - चित्तरंजन दास.

विज्ञान :- द्रव्य

द्रव्य :  सर्व वस्तु द्रव्यांच्या बनलेल्या असतात. ज्याला वस्तुमान असते व जे जागा व्यापले त्याला ‘द्रव्य’ म्हणतात.

★ द्रव्याच्या भौतिक स्थितीवर आधारित स्थायू, द्रव व वायु हे प्रकार आहेत तर रसायनिक घटनेवर आधारित मूलद्रव्य, संयुग व मिश्रण हे प्रकार आहेत.

★ अयनायू (plasma) ही द्रव्याची चौथी अवस्था अतिउच्च तापमानाला असते.

★ अनेक स्थायूंचा आकार बाह्य बल लावल्यावर सुद्धा कायम असतो. ठराविक आकार व आकारमान असणार्याआ स्थायूंच्या या गुणधर्माला दृढता (rigidity) असे म्हणतात.

★ लॅव्हाझिएने ऑक्सीजनचा शोध व नामकरण केले.

★ लोह व गंधक तापल्यावर एक नवा पदार्थ तयार होतो. त्याचे नाव आयर्न स्ल्फाईड असे आहे.

★ दूध हे पाणी, दुग्धशर्करा, स्निग्ध पदार्थ, प्रथिने व इतर काही नैसर्गिक पदार्थाचे मिश्रण आहे.

★ मूलद्रव्याचे वर्गीकरण धातू, अधातू व धातुसदृश असे केले जाते.

★ सुमारे ऐंशी मूलद्रव्ये धातू आहेत.

★ सिलिकॉन, सेलेनियम, अर्सेनिक ही धातूसदृशांची काही उदाहरणे आहेत.

★ ऑक्सीजन, नायट्रोजन, हायड्रोजन हे वायु धातूंच्या टाक्यामध्ये ठासून भरता येतात.

★ स्थायूंमध्ये आंतररेंविय बल अतिशय प्रभावी असते.

★ द्रवांमधील आंतररेंविय बल मध्यम असते तर वायूंमध्ये आंतर रेंविय बल क्षीण असते.

★ अलीकडील काळात विज्ञानमध्ये रासायनिक पदार्थ या ऐवजी ‘पदार्थ’ हा शब्द प्रयोग करतात.

★ आधुनिक रसायनशास्त्राचा जनक लॅव्हाझिए याने मूलद्रव्याची व्याख्या मांडली.

★ दोन किंवा अधिक मूलद्रव्याच्या रासायनिक संयोगाने बनवलेल्या पदार्थ म्हणजे संयुग.

★ लॅव्हाझिएने ऑक्सीजनचा शोध व नामकरण केले.

★ लोह व गंधक तापल्यावर एक नवा पदार्थ तयार होतो. त्याचे नाव आयर्न स्ल्फाईड असे आहे.

★ दूध हे पाणी, दुग्धशर्करा, स्निग्ध पदार्थ, प्रथिने व इतर काही नैसर्गिक पदार्थाचे मिश्रण आहे.

★ मूलद्रव्याचे वर्गीकरण धातू, अधातू व धातुसदृश असे केले जाते.

★ सुमारे ऐंशी मूलद्रव्ये धातू आहेत.

★ सिलिकॉन, सेलेनियम, अर्सेनिक ही धातूसदृशांची काही उदाहरणे आहेत.

★ लॅव्हाझिएने ऑक्सीजनचा शोध व नामकरण केले. #Invention

★ लोह व गंधक तापल्यावर एक नवा पदार्थ तयार होतो. त्याचे नाव आयर्न स्ल्फाईड असे आहे.

★ दूध हे पाणी, दुग्धशर्करा, स्निग्ध पदार्थ, प्रथिने व इतर काही नैसर्गिक पदार्थाचे मिश्रण आहे.

★ मूलद्रव्याचे वर्गीकरण धातू, अधातू व धातुसदृश असे केले जाते.

★ सुमारे ऐंशी मूलद्रव्ये धातू आहेत.

★ सिलिकॉन, सेलेनियम, अर्सेनिक ही धातूसदृशांची काही उदाहरणे आहेत.

चालू घडामोडी प्रश्नसंच

हे नवनियुक्त मुख्य दक्षता आयुक्त आहेत.
(A) के. व्ही. चौधरी
(B) शरद कुमार
(C) संजय कोठारी✅
(D) प्रदीप कुमार

कोणत्या राज्यात ‘शाश्वत विकास ध्येये (SDG) परिषद 2020’ आयोजित केली जाणार आहे?
(A) त्रिपुरा
(B) मिझोरम
(C) मणीपूर
(D) आसाम✅

कोणते आसाम राज्याचे पहिले "कचरा विरहित गाव" ठरले?
(A) गुवाहाटी
(B) सिलचर
(C) तेजपूर
(D) तिताबोर✅

‘जागतिक सामाजिक न्याय दिन 2020’ याची संकल्पना काय होती?
(A) क्लोजिंग द इनइक्वलिटीज गॅप टु अचिव्ह सोशल जस्टिस✅
(B) क्लोजिंग द जेंडर इनइक्वलिटीज टु अचिव्ह सोशल जस्टिस
(C) क्लोजिंग द इकनॉमिक इनइक्वलिटीज टु अचिव्ह सोशल जस्टिस
(D) क्लोजिंग द इनइक्वलिटीज टु अचिव्ह सोशल जस्टिस

कोणत्या व्यक्तीने ‘2020 ESPN फिमेल स्पोर्टसपर्सन ऑफ द ईयर’ पुरस्कार पटकवले?
(A) सायना नेहवाल
(B) पी. व्ही. सिंधू✅
(C) अश्विनी पोनप्पा
(D) ज्वाला गुट्टा

‘आस्कदिशा’ चॅटबॉट याच्या संदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या:

1. भारतीय रेल्वेनी ऑक्टोबर 2019 या महिन्यात ‘आस्कदिशा’ चॅटबॉट सेवा सादर केली.

2. ‘आस्कदिशा’ चॅटबॉट हे प्रारंभी हिंदी भाषेत सुरू करण्यात आले.

दिलेल्यापैकी अचूक विधान ओळखा:

(A) केवळ (1)
(B) केवळ (2)
(C) (1) आणि (2) दोन्ही
(D) ना (1), ना (2)✅

_ या शहरात ‘इंडियन नेव्हल सिम्फॉनिक ऑर्केस्ट्रा 2020’ हा संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
(A) भुवनेश्वर
(B) नवी दिल्ली✅
(C) भोपाळ
(D) चेन्नई

____ या संस्थेच्या वतीने ‘5जी हॅकाथॉन’ या कार्यक्रमाची घोषणा केली.
(A) गूगल इंडिया
(B) विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय
(C) दूरसंचार विभाग✅
(D) भारत सरकारच्या सहकार्याने मायक्रोसॉफ्ट

कोणत्या व्यक्तीने दक्षिणी नौदल कमांडचे चीफ स्टाफ ऑफिसर (ट्रेनिंग) या पदाची जबाबदारी स्वीकारली?
(A) अँटनी जॉर्ज✅
(B) अजित कुमार पी.
(C) अतुल कुमार जैन
(D) अनिल कुमार चावला

_ या शहरात ‘राष्ट्रीय सेंद्रिय खाद्यपदार्थ महोत्सव’चे उद्घाटन झाले.
(A) भोपाळ
(B) हैदराबाद
(C) नवी दिल्ली✅
(D) लखनऊ

कोणत्या राज्य सरकारने ‘थाई मांगूर’ माशांचे प्रजनन केंद्रे बंद करण्याचा निर्णय घेतला?
(A) तामिळनाडू
(B) पश्चिम बंगाल
(C) आसाम
(D) महाराष्ट्र✅

_ हा क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपात 100 सामने खेळणारा पहिला खेळाडू ठरला.
(A) रोहित शर्मा
(B) विराट कोहली
(C) रॉस टेलर✅
(D) महेंद्र सिंग धोनी

विद्यार्थ्यांना पाणी पिण्यास प्रोत्साहित करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने शाळेच्या तासात कमीतकमी तीन वेळा घंटा वाजवण्याचा अनोखा उपक्रम राबवित आहे?
(A) उत्तरप्रदेश
(B) दिल्ली
(C) कर्नाटक
(D) महाराष्ट्र✅

फेब्रुवारी 2020 या महिन्यात _ ही कंपनी ‘निफ्टी नेक्स्ट 50 इंडेक्स’ यामध्ये नोंदवली गेली.
(A) महिंद्रा इन्फोटेक
(B) लार्सन अँड टुब्रो इन्फोटेक (L&T)✅✅
(C) ट्रायकन इन्फोटेक
(D) यापैकी नाही

_ या शहरात प्रथम ‘खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स’ ही स्पर्धा होत आहे.
(A) भुवनेश्वर✅✅✅✅
(B) नवी दिल्ली
(C) कोलकाता
(D) चेन्नई