21 June 2024

विज्ञान प्रश्न उत्तरे सामान्यज्ञान

◼️ मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात ?

- पांढ-या पेशी

◼️ डायलिसीस उपचार कोणत्या आजारात करतात ?
- मुत्रपिंडाचे आजार

◼️ मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते ?
- मांडीचे हाड

◼️ मानवाच्या शरीरात सर्वात लहान आकाराचे हाड असलेला अवयव कोणता ?
- कान

◼️ वनस्पतींच्या पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते ?
- सुर्यप्रकाश

◼️ विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात ?
- टंगस्टन

◼️ सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागतो ?
- 8 मिनिटे 20 सेकंद

◼️ गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला ?
- न्यूटन

◼️ ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत कोणता ?
- सूर्य

◼️ वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे ?
- नायट्रोजन

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━


जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

 अतिथंड हवामानात पाण्याचे नळ ( पाईप ) का फुटतात ?
पाण्याचे बर्फ होताना ते प्रसरण पावते.

 कात्री ही कोणत्या प्रकारच्या तरफेचे उदाहरण आहे ?
तिस-या.

 नैसर्गिकरित्या सापडणारा सर्वात कठीण पदार्थ कोणता ?
हिरा.

वायुविरहित इलेक्ट्राॅनिक्स गॅस लायटर कोणत्या तत्वावर काम करते ?
फोटो इलेक्ट्रीक इफेक्ट.

 'होमिओपॅथी' चा जनक कोण ?
हायेनमन.

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

यकृत शरीर रचना


👉यकृत उदर पोकळीच्या उजव्या-उजव्या भागामध्ये डायाफ्रामच्या खाली आणि पोट, उजवीकडे मूत्रपिंड आणि आतड्यांच्या वर स्थित आहे.


👉शकूच्या आकाराचे, यकृत हे एक गडद लालसर तपकिरी अवयव असते ज्याचे वजन सुमारे 3 पौंड असते.


यकृतला रक्तपुरवठा करण्यासाठी 2 भिन्न स्त्रोत आहेत ज्यात पुढील गोष्टी आहेत:


🌿हिपॅटिक रक्तवाहिन्यामधून ऑक्सिजनयुक्त रक्त वाहते


🌿हिपॅटिक पोर्टल शिरामधून पौष्टिक समृद्ध रक्त वाहते


🌷यकृत कोणत्याही क्षणी शरीराच्या जवळजवळ एक पिंट (13%) रक्तपुरवठा ठेवतो.


🌷 यकृतमध्ये 2 मुख्य लोब असतात. हे दोन्ही 8 विभागांनी बनलेले आहेत ज्यामध्ये 1000 लोब्यूल (लहान लोबल्स) आहेत. 


🌷ह लोब्यूल्स लहान नलिका (ट्यूब) शी जोडलेले आहेत जे मोठ्या नळ्यांसह जोडतात ज्यामुळे सामान्य हिपॅटिक नलिका तयार होते.


🌷 सामान्य हिपॅटिक नलिका यकृत पेशींनी बनविलेले पित्त पित्तनलिका आणि पक्वाशया (लहान आतड्याचा पहिला भाग) सामान्य पित्त नलिकामार्गे वाहतूक करते.


🌹🌹यकृत कार्य🌹🌹


👉यकृत रक्तातील बहुतेक रासायनिक पातळीचे नियमन करते आणि पित्त नावाच्या उत्पादनास उत्सर्जित करते. हे यकृत पासून कचरा उत्पादने वाहून नेण्यास मदत करते. 


👉पोट आणि आतडे सोडणारे सर्व रक्त यकृतामधून जाते. यकृत या रक्तावर प्रक्रिया करते आणि तोडतो, संतुलित होतो, आणि पोषकद्रव्ये तयार करतो आणि औषधे शरीरात उर्वरित वापरण्यास सोपी किंवा नॉनटॉक्सिक अशा फॉर्ममध्ये चयापचय करते. 


👉यकृत सह 500 हून अधिक महत्त्वपूर्ण कार्ये ओळखली गेली आहेत. काही अधिक सुप्रसिद्ध कार्ये खालीलप्रमाणे:


👉पित्त उत्पादन, पचन दरम्यान कचरा दूर आणि लहान आतडे चरबी तोडण्यास मदत करते


👉रक्ताच्या प्लाझ्मासाठी काही प्रथिने तयार करणे


👉शरीरात चरबी वाहून नेण्यासाठी कोलेस्टेरॉल आणि विशेष प्रथिने तयार करणे


👉सटोरेजसाठी जास्त प्रमाणात ग्लूकोजचे रूपांतर ग्लायकोजेनमध्ये करणे (ग्लायकोजेन नंतर उर्जेसाठी ग्लूकोजमध्ये परत रूपांतरित केले जाऊ शकते) आणि संतुलन आणि आवश्यकतेनुसार ग्लूकोज बनवणे. 


👉अमीनो idsसिडच्या रक्ताच्या पातळीचे नियमन, जे प्रथिने बनवण्याचे ब्लॉक बनवते


👉हिमोग्लोबिनची लोह सामग्री वापरण्यासाठी प्रक्रिया (यकृत लोह साठवते)


👉विषारी अमोनियाचे युरियामध्ये रूपांतरण (युरिया हे प्रथिने चयापचयातील एक शेवटचे उत्पादन आहे आणि मूत्रात उत्सर्जित होते)


👉औषधे आणि इतर विषारी पदार्थांचे रक्त साफ करणे


👉रक्त गोठण्यास नियमित करणे


👉रोगप्रतिकारक घटक बनवून आणि रक्तप्रवाहापासून बॅक्टेरिया काढून संक्रमणांना प्रतिकार करते


👉लाल रक्तपेशींपासून देखील बिलीरुबिनचे क्लीयरन्स. जर बिलीरुबिनचे संचय होत असेल तर त्वचा आणि डोळे पिवळे होतात. 


👉जव्हा यकृत हानिकारक पदार्थांचा नाश करतो तेव्हा त्याची उप-उत्पादने पित्त किंवा रक्तात मिसळतात.


👉 पित्त-उप-उत्पादने आतड्यात प्रवेश करतात आणि मलच्या स्वरूपात शरीर सोडतात. मूत्रपिंडांद्वारे रक्ताद्वारे-उत्पादनांना फिल्टर केले जाते आणि शरीर मूत्र स्वरूपात सोडते.


खनिज संपत्ती :


१. मँगेनीज:- भारतातील मँगेनीजच्या एकूण साठ्यापैकी सुमारे ४०% मँगेनीजचा साठा महाराष्ट्रात आहे. तसेच मँगेनीज उत्पादनात महाराष्ट्राचा भारतात दुसरा क्रमांक लागतो.

जिल्हे - नागपूर, भंडारा, सिंधुदुर्ग.


२. बॉक्साईट- भारतातील बॉक्साईटच्या एकूण उत्पादनापैकी २०% उत्पादन महाराष्ट्रात होते. महाराष्ट्रात जवळ जवळ ८० दशलक्ष टन इतका बॉक्साईटचा साठा आहे. -

जिल्हे - कोल्हापूर, सातारा, सांगली, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.


३. कायनाईट - देशातील कायनाईटच्या एकूण उत्पादनात महाराष्ट्राचा हिस्सा १५% इतका आहे. 

जिल्हा - भंडारा.


४. क्रोमाईट - देशातील एकूण क्रोमाईटच्या साठ्याच्या १०% इतका साठा महाराष्ट्रात आहे.

जिल्हे - भंडारा, सिंधुदुर्ग, नागपूर.


५. डेलोमाईट - देशातील एकूण साठ्यांपैकी ९% डेलोमाईटचा साठा महाराष्ट्रात आहे.

जिल्हे - रत्नागिरी, यवतमाळ.


६. चुनखडी - देशातील एकूण चुनखडीच्या साठ्यापैकी ९% साठे महाराष्ट्रात आहेत.

जिल्हे - यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, अहमदनगर.


७. दगडी कोळसा:- महाराष्ट्रात दगडी कोळशाचा साठा ५,००० दशलक्ष टन आहे. देशाच्या एकूण दगडी कोळशाच्या साठ्याच्या तो ४% इतका आहे.

जिल्हे - नागपूर, चंद्रपूर,


८. लोहखनिज- भारताच्या एकूण लोहखनिज साठ्यांपैकी २% लोहखनिज साठा महाराष्ट्रात आहे. 

जिल्हे - चंद्रपूर, गडचिरोली, गोंदीया, नागपूर, सिंधुदुर्ग.


९. ग्रॅनाईट - गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत सापडतो.


१०.तांबे - नागपूर व यवतमाळ जिल्हयात अत्यल्प प्रमाणात सापडते.


११.अधक - सिंधुदुर्ग जिल्ह्यात सापडते.


१२.टंगस्टन - नागपूर जिल्ह्यात सापडते.


१३.बेसॉल्ट खडक - दक्षिण कोकण व महाराष्ट्राचा अतिपूर्व भाग वगळता महाराष्ट्रात सर्वत्र सापडतो.


महाराष्ट्रातील भूगर्भ रचना :

अ. आर्कियन खडक :

हा अतिप्राचीन खडक पूर्व विदर्भा, चंद्रपुर, भंडारा, गडचिरोली, नांदेड जिल्ह्याचा पूर्वभाग आणि सिंधुदुर्गातील काही तालुक्यांमध्ये आढळतो.

ग्रँनाईट, नीस व शिस्ट प्रकारच्या खडकांपासून बनलेल्या या भुस्तरात लोह खनिजांचे विपुल साठे आहेत.


ब. धारवाड खडक :

या श्रेणीच्या खडकांमध्ये ग्रँन्जुलाईट्स, 

डोलोमाईट, अभ्रक, सिलीमनाईट, हॉर्नब्लेंड, 

शीष्ट, संगमरवर यांसारखी मौल्यवान खनिजे आढळतात.

पूर्व नागपुर, भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्यातही धारवाड श्रेणीचे खडक आढळतात.

पुणे, नागपुर, भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्यातही हा खडक आढळतो.


क. कडप्पा श्रेणींचा खडक :

महाराष्ट्रातील दक्षिण व पूर्व भागात हा खडक आढळतो.

कोल्हापूर जिल्ह्यात या श्रेणीतील खडकात क्वार्टझाईट्स, शेल व चुनखडीचे खडक आहेत.


ड. विंध्ययन खडक :

विंध्ययन श्रेणीतील खडक चंद्रपुर जिल्ह्यातच आढळतात.

हा खडक सुबक बांधकामासाठी उपयुक्त असून दर्जेदार व टिकाऊ असतो.


इ.गोंडवना खडक :

अप्पर पॉलिओझाईक नंतरच्या कालखंडात व्दीपखंडावर अनेक बदल होऊन दख्खनच्या पठारावर स्थानिक पातळीवर हालचाली निर्माण झाल्या.

खोर्‍यांच्या आकाराचा खोलगट भाग निर्माण होऊन तेथे नद्यांनी आणलेल्या गाळाचे संचयन झाले.

कालांतराने त्यात प्राणी, वनस्पतीचे अवशेष व जंगले गाडली गेली व त्याचे दगडी कोळशात रूपांतर झाले.

त्याला 'गोंडवना खडक' असे म्हणतात.

चंद्रपुर, यवतमाळ, गडचिरोली व अमरावती जिल्ह्यात अप्पर गोंडवना खडक आढळतात.

महत्वाचे धातू आणि अधातु व त्याचे उपयोग


1. तांब्याचा उपयोग :

भांडी व विद्युत वाहक तार तयार करण्यासाठी. 


विद्युत विलेपनासाठी व तांब्याचे क्षार तयार करण्याकरिता.

तांब्यापासून तयार करण्यात येणारी संमिश्रे :

संमिश्र -  पितळ

धातू व प्रमाण - तांबे (60 ते 90 %) व जस्त (40 ते 10%)


उपयोग - भांडी तयार करण्याकरिता 


संमिश्र - ब्राँझ

धातू व प्रमाण - तांबे (81 ते 90%) व कथील (19 ते 10%)  


उपयोग - बेअरिंग, जहाजाची बांधणी, पुतळे, नाणी आणि पदके तयार करण्याकरिता 


संमिश्र - जर्मन सिल्व्हर  

धातू व प्रमाण - तांबे (50%), जस्त (25%) व निकेल (25%) 


उपयोग - हे संमिश्र उच्च प्रतीचे विद्युत रोधक आहे, म्हणून त्याचा उपयोग विद्युत रोधक उपकरणे तयार करण्याकरिता केला जातो. 


संमिश्र - बेल मेटल  

धातू व प्रमाण - तांबे (78%) व कथील (22%) 


उपयोग - घंटया, तास तयार करण्याकरिता 


संमिश्र - अॅल्युमिनीयम ब्राँझ

उपयोग - तांबे व अॅल्युमिनीयम भांडी तयार करण्याकरिता 


संमिश्र - गनमेटल  

धातू व प्रमाण - तांबे (88%) कथील (10%) व जस्त (2%) 


उपयोग - बंदुका व बॉयलरचे सुटे भाग व जस्त तयार करण्याकरिता



2. लोखंडाचे प्रकार व उपयोग :

लोखंडाचे तीन प्रकार पडतात. 


ओतीव लोखंड आणि बीड : झोतभट्टीमध्ये लोखंडाची धातुके वितळयानंतर त्यापासून लोहरस तयार होतो. हा लोहरस थंड झाल्यानंतर जे लोखंड तयार होते त्यास ओतीव लोखंड किंवा बीड असे म्हणतात. 


नरम किंवा घडीव लोखंड : ओतीव लोखंडाच्या उपयोग नरम लोखंड तयार करण्याकरिता केला जातो. 


पोलाद : ओतीव लोखंडापासून पोलाद तयार करण्याकरिता बेसिमर भट्टी किंवा विवृत भट्टीचा उपयोग केला जातो. 


लोखंडाचे संमिश्र आणि त्याचे उपयोग :

संमिश्र - स्टेनलेस स्टील

धातू - लोखंड, क्रोमीअम, कार्बन


उपयोग - तीक्ष्ण हत्यारे, भांडी सायकली व स्वयंचलीत वाहनाचे सुटे भाग व निकेल तयार करण्याकरिता 


संमिश्र - टंगस्टन स्टील  

धातू - लोखंड, टंगस्टन व कार्बन


उपयोग - जलद गतीने कापण्यासाठी वापरली जाणारी हत्यारे तयार करण्याकरिता.


संमिश्र - मॅगनीज स्टील

धातू - लोखंड व मॅगनीज 


उपयोग - कठीण खडकाला छिद्रे पाडणारी हत्यारे तयार करण्याकरिता. 


संमिश्र - क्रोमीअम स्टील

धातू - लोखंड व क्रोमीअम


उपयोग - बॉलबेअरिंग, रोलर बेअरिंग स्वयंचलीत वाहनाचे सुटे भाग व खडक फोडण्याकरिता वापरण्यात येणार्‍या यंत्राचा जबडा तयार करण्याकरिता.



3. अॅल्युमिनीअमचा उपयोग :

घरातील भांडी, वमानाचे भाग, फोटोफ्रेम तयार करण्याकरिता 


चॉकलेट, सिगारेट आदि वस्तूच्या आवरणाकरिता 


विद्युत वाहक तारा तयार करण्याकरिता. 


रुपेरी रंग तयार करण्याकरिता. 


अॅल्युमिनीयमपासुन तयार करण्यात येणारी संमिश्रे :

संमिश्र - ड्युरालयुनिम

धातू - अॅल्युमिनीयम, तांबे, मॅग्नेशियम व मॅगनीज 


उपयोग - हवाई वाहने, मोटारीचे साचे आणि आगगाडीचे भाग तयार करण्याकरिता. 


संमिश्र - मॅग्नेलियम

धातू - अॅल्युमिनीयम व मॅग्नेशियम


उपयोग - शास्त्रीय तराजूच्या दांडया, घरघुती उपकरणे व हवाई वाहने तयार करण्याकरिता. 


संमिश्र - अॅल्युमिनीअम ब्राँझ

धातू - तांबे, अॅल्युमिनीयम, लोखंड व कथील अॅल्युमिनीयम, कोबाल्ट.


संमिश्र - अल्किनो

धातू - अॅल्युमिनीयम, कोबाल्ट व निकेल 


उपयोग - विद्युत जनित्राकरिता लागणारे उच्च प्रतीचे चुंबक तयार करण्याकरिता.



4. जस्ताचे उपयोग :

लोखंड व पोलाद गंजू नये म्हणून त्यावर विलेपन करण्याकरिता. 


विद्युत घटामध्ये इलेक्ट्रोड म्हणून उपयोग केला जातो. 


धातूची संमिश्रे तयार करण्याकरिता.



5. पाराचा उपयोग :

हवादाबमापी आणि तापमापीमध्ये पार्‍याचा उपयोग करतात. 


बाष्पदीप तयार करण्याकरिता पार्‍याचा उपयोग करतात. 


आरसे तयार करण्याकरिता केला जातो.



6. सोडीयमचे उपयोग :

सोडीयम बाष्पदीपामध्ये सोडीयमचा उपयोग करतात.


उच्च तापमान दर्शक तापमापीमध्ये त्याचा उपयोग होतो.



7. मॅग्नेशियमचे उपयोग :

क्षणदिप्ती छायाचित्रणामध्ये मॅग्नेशियमचा उपयोग करतात. 


शोभेच्या दारूमध्ये.


धातूची संमिश्रे तयार करण्याकरिता. 


धातूची जोडकामे करण्याकरिता थमाईट मिश्रण तयार करण्यासाठी.



8. चांदीचा उपयोग :

दागिने तयार करण्याकरिता 


चांदी व पारा यापासून तयार झालेल्या मिश्रणाचा उपयोग दातांमधील पोकळी बुजविण्याकरिता केला जातो. 


छायाचित्रण, औषधे आणि अंकनशाई तयार करण्याकरिता. 


विद्युतविलेपन आणि रजत विलेपन तयार करण्याकरिता.



9. सोन्याचे उपयोग :

नाणी व दागिने तयार करण्याकरिता व संवेदनशील विद्युत उपकरणामध्ये विद्युतवाहक म्हणून या धातूचा उपयोग केला जातो.



10. शिशाचा उपयोग :

मुद्रण धातूचे खिळे तयार करण्याकरिता.  


दारूगोळा तयार करण्याकरिता.  


विद्युत घटात इलेक्ट्रोड तयार करण्याकरिता. 


विद्युत परीपथकात वितळतार करण्यास. 


अणुभट्टीतून न्युट्रॉन शोषक म्हणून भिंती तयार करण्याकरिता.    


डाग देण्याचा धातू व सहज


कृत्रिम वायू इंधने :- 


1) कोल गॅस – दगडी कोळशाच्‍या भंजक ऊर्ध्‍वपतनाने हा वायू मिळवितात. इंधन म्‍हणून व प्रकाशासाठी त्‍याचा उपयोग करतात. हा वायू विषारी आहे. यातील घटकांचे प्रमाण – हायड्रोजन (H2) (40% ते 50%) + मिथेन (CH4) (30% ते 35%) + कार्बन मोनॉक्‍साईड (CO) (5% ते 10%) + C2H + C2H2 (2% ते 4%) + नायट्रोजन N2 (6% ते 8%) + कार्बन डायॉक्साईड (1% ते 2%).


इंधन मूल्‍य – 1000 घन फूट (27 घन मीटर) वायूपासून 1000 कॅलरी उष्‍णता मिळते.


2) ऑईल गॅस – हा वायू केरोसीनचे भंजन करून मिळतो. प्रयोगशाळेत व लघुउद्योगात त्‍याचा वापर होतो.


3) पेट्रोल गॅस – पेट्रोलचे भंजन करून मिळवितात. त्‍यात प्रोपेन, ब्‍युटेन, इलिथीन आणि ब्‍युटीलीन यासारखे हायड्रोकार्बन असतात. घरगुती वापरासाठी इंधन म्‍हणून व प्रयोगशाळेत वापरतात.


4) वॉटर गॅस – CO आणि H2 हे याचे प्रमुख घटक आहेत. कार्बन मोनॉक्‍साईड (45%) + हायड्रोजन (45%) + N2 + Co2 + CH4 (10%) या वायूला ‘नील वायू’ असे म्‍हणतात. इंधनमूल्‍य 1000 घनफूट (27 घमी) वायूपासून 3560 कॅलरी उष्‍णता मिळते.


5) प्रोड्यूसर गॅस – CO + N2 यांच्‍या मिश्रणास प्रोड्यूसर गॅस म्‍हणतात. नायट्रोजन (65.3%) + कार्बन मोनॉक्‍साईड (34.7%) इंधनमूल्‍य 1000 घनफूट (27 घमी) वायूपासून 1130 कॅलरी उष्‍णता मिळते. काचनिर्मिती भट्टयांत या गॅसचा उपयोग करतात.

बहमनी साम्राज्य 1347- 1538


 ◾️3 ऑगस्ट 1347 रोजी बहमानी राज्याची स्थापना केली


◾️जफरखान ऊर्फ ⇨हसन गंगू (कार. १३४७-५८) याला दोलताबाद येथे राज्याभिषेक केला (1347). 


◾️तयाने अबुल मुझफ्फर अलाउद्दीन बहमनशाह हे नाव धारण 


◾️फिरिश्ताच्या मते बहमन हा इराणचा प्राचीन राजा असून त्याच्या वंशातील हसन गंगू होता. 


◾️काहींच्या मते हसन गंगूचा मालक ब्राह्मण होता, म्हणून त्याने बहमन हे नाव धारण केले असावे.


◾️चौदाव्या शतकात द. भारतावर दिल्लीच्या मुहंमद तुघलकाचा अमंल होता


◾️हसन गंगूने आपली राजधानी दौलताबादहून गुलबर्ग्यास नेली. 


◾️हसन गंगूने प्रशासकीय व्यवस्थेसाठी राज्याची चार सुभ्यांत विभागणी करून प्रत्येकावर एकेक राज्यपाल नेमला.


🟣अखेर 1538 मध्ये ⇨ बरीदशाही, ⇨ इमादशाही, ⇨निजामशाही, ⇨आदिलशाही आणि ⇨कुतुबशाही


◾️या पाच स्वतंत्र शाह्या निर्माण होऊन बहमनी सत्ता संपुष्टात आली.


◾️अहमदनगर व वऱ्हाड येथील शाह्यांचे संस्थापक मूळचे हिंदू होते.


◾️बहमनी राजांनी तात्त्विक दृष्टया अब्बासो खलीफांचे [→ अब्बासी खिलाफत] वर्चस्व मानले होते.


◾️अथानाशिअस निकीतीन हा रशियन प्रवासी काही वर्षे (1469-74) बीदरला होता. त्याने तेथील वास्तूंबरोबरच दैंनदिन जीवनाची माहितीही लिहिली आहे.


◾️सय्यद अली तबातबा, निजामुद्दीन, फिरिश्ता, अँथानाशिअस न्यिक्यितीन (रशियन प्रवासी), खाफीखान इत्यादींच्या लेखनांतून मिळते.


◾️बहमनी काळात दौलताबाद, गुलबर्गा व बीदर अशा तीन राजधान्या आलटून पालटून होत्या


◾️फारशी भाषेला त्यांच्या दरबारात प्राधान्य मिळाले.


◾️तयांच्या तख्तावर काळी छत्री आणि टक्का या नाण्यांवर खलिफांचा उजवा हात असे


चालू घडामोडी सराव प्रश्न 21 जून 2024

प्रश्न.1) महाराष्ट्रातील मराठवाडा विभागातील कोणत्या देवस्थानाला राज्य सरकारकडून पर्यटन स्थळाचा अ वर्ग दर्जा देण्यात आला ?

उत्तर – राजुरेश्वर गणपती - हे देवस्थान जालना जिल्ह्यात आहे.

प्रश्न.2) भारतीय लष्कराने नुकतीच कोणती देखरेख प्रणाली सुरू केली ?

उत्तर – विद्युत रक्षक

प्रश्न.3) भारतातील पहिला शहरी रोपवे कोणत्या शहरात सुरू होणार ?

उत्तर – वाराणसी

प्रश्न.4) IIT खरगपूरच्या पहिल्या महिला उपसंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ?

उत्तर – रींटू बॅनर्जी

प्रश्न.5) अलीकडेच बातम्यांमध्ये चर्चेत असलेले पेट्रोडॉलर डील कोणाशी संबंधित आहे ?

उत्तर– USA - Saudi Arabia

प्रश्न.6) महाराष्ट्र राज्य दहशत विरोधी पथकाच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली ?

उत्तर– नवल बजाज

प्रश्न.7) अलीकडेच सेंट्रल बँकिंग लंडनच्या प्रकाशनाने 'रिस्क मॅनेजर ऑफ द वर्ष पुरस्कार 2024' कोणाला दिला ?

उत्तर – RBI

प्रश्न.8) नुकतेच भारत सरकारने कोणत्या पूर्व आशियाई देशासोबत पहिली थेट विमानसेवा सुरू केली ?

उत्तर– कोलंबिया

प्रश्न.9) ICC ने जाहीर केलेल्या टी २० अष्टपैलू खेळाडूच्या क्रमवारीत कोणी प्रथम स्थान पटकावले ?

उत्तर – मार्कस स्टॉयनिस

प्रश्न.10) जागतिक निर्वासित दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो ?

उत्तर – 20 जूनला - 2024 ची थीम - "Hope Away From Home: A World Where Refugees Are Always Included"

20 June 2024

भारतात मुस्लिम सत्तेची स्थापना


👉 1. महंमद गझनवी :-

अकराव्या शतकापासून भारतावर तुर्काची आक्रमणे होण्यास सुरुवात झाली. गझनीचा तुर्क सत्ताधीश सबक्तगीन याने भारतावर स्वार्‍या करून पंजापर्यंत प्रांत आपल्या राज्याला जोडला होता. 


👉 सन 998 मध्ये त्याचा मुलगा महंमद हा गझनचा सुलतान झाला. 


👉 तयाने सन 1001 ते 1027 पर्यंत भारतावर सतरा स्वार्‍या केल्या. या स्वार्‍या करतांना राज्य स्थापनेऐवजी भारतातील संपत्ती लुटून नेणे हा त्यांचा मुख्य हेतु होता. 


👉 तयाने मथुरा व सोमनाथचे मंदिर लुटून अमाप संपत्ती गझनीला नेली. 


 2. महंमद घुरी 


👉 महंमद घुरी हा अफगाणिस्तानमधील एक सुलतान होता. महंमद गझनवी स्वार्‍यानंतर दीडशे वर्षांनी त्याने भारतावर आक्रमण केले. 


👉 सन 1992 मध्ये तराईनच्या सुद्धा दिल्लीचा राजा पृथ्वीराज चव्हाण याचा पराभव करून दिल्ली ताब्यात घेतली त्यानंतर कनोजचा राजा जयचंदचा पराभव करून त्याचे राज्य आपल्या ताब्यात घेतले पुढे त्याने बंगाल व बिहारवर आक्रमण करून सत्ता स्थापित केली. 


👉 तयाने जिंकलेल्या प्रदेशाचा राज्यकारभार बघण्याकरिता आपला विश्वासू सरदार कुतूबुद्दीन ऐबकची नियुक्ती केली. 


👉  अशाप्रकारे भारतात मुस्लिम साम्राज्य प्रस्तापित झाले. त्यानंतरच्या काळात दिल्लीच्या गादिवर खालील सत्ताधीश आले.


 3. कुतूबुद्दीन ऐबक (सन 1206 ते 1210) :
 
👉 सन 1206 मध्ये महंमद घुरी मरण पावला. त्यानंतर कुतूबुद्दीन ऐबकने स्वत:ला स्वतंत्र राजा म्हणून घोषित केले. 

👉 याच काळात ऐबकने दिल्लीच्या कुतुबमिनारच्या बांधकामास सुरवात केली. 

👉 सन 1210 मध्ये तो मरण पावला. 

👉 तयाच्या ठिकाणी त्याचा बदायुनचा सुभेदार आणि कुतूबुद्दीन ऐबकचा जावई अल्तमश सत्तेत आला.


👉 4. शमशूद्दीन अल्तमश (सन 1210 ते 1226) :

कुतूबुद्दीन ऐबकच्या मुत्यूनंतर काही सरदारांनी अल्तमशविरुद्ध बंडखोरी केली होती. ती ऐबकने मोडून काढली आणि स्थिरता प्रस्थापित केली. 

👉 बगदादच्या खलीपाने त्यास भारताचा सुलतान म्हणून मान्यता दिली. 

👉 अल्तमश हा दिल्लीचा पहिला सुलतान म्हणून ओळखला जातो. 

👉 अल्तमशला सुलतान म्हणून मान्यता मिळाल्यानंतर त्याने टका नावाचे नाणे सुरू केले होते. त्याने आपल्या हयातीमध्ये कुतूबमिनारचे बांधकाम पूर्ण केले.


👉 5. रझिया सुलतान (सन 1226 ते 1240) :

अल्तमशच्या मृत्यूनंतर त्याची मुलगी रझिया सुलतान दिल्लीच्या राजगादिवर आली. ती प्रजादक्ष आणि कर्तबगार स्त्री होती. 

👉 परंतु, दिल्लीच्या सिंहासनावर एक स्त्री असने हे सरदारांना खपत नव्हते. 

👉 दिल्लीचे सुलतान पद भूषविणारी ती एकमेव पहिली महिला होती. 

👉 सन 1240 मध्ये तिचा वध करण्यात आला.


 6. गियासुद्दून बल्बन (सन 1266 ते 1287) :

👉 रझिया सुलतानच्या मृत्यूनंतर दिल्लीच्या गादीवर काही प्रमाणात अस्थिरता आली होती. सन 1266 मध्ये गियासुद्दीन बल्बन हा दिल्लीचा सुलतान झाला. 

👉 तयाने आपल्या विरोधकाचा बंदोबस्त करून आपली सत्ता मजबूत केली. 

👉 तात्काळ युद्ध करता यावे म्हणून त्याने खडे सैन्य ठेवण्याची प्रथा सुरू केली. यामुळे तास वायव्य सीमेवर मंगोलाचा बंदोबस्त करता आला. 

👉 उर्दू भाषेचा रचयिता आणि प्रसिद्ध कवि या राजाचा दरबारी होता.


👉 8. अल्लाऊदीन खिलजी (सन 1296 ते 1316) :


👉 अल्लाऊद्दीन खिलजी हा महत्वाकांक्षी होता. त्याने अल्पावधीतच संपूर्ण भारत आपल्या नियंत्रणाखाली आणला. 

👉 सम्राट अशोकानंतर संपूर्ण भारतावर सत्ता प्रस्तापित करणारा अल्लाउद्दीन खिलजी हा दूसरा राजा होय. 

👉 अल्लाउद्दीन खिळजीचा साम्राज्य विस्तार :-

👉 सन 1299 मध्ये त्याने गुजरातवर आक्रमण करून गुजरातवर सत्ता प्रस्तापित केली. 

👉 तयानंतरच्या काळात राजपुताना, मेवाड, माळवा व राजस्थानवर ताबा मिळविला. 

👉 सन 1306 मध्ये त्याचा सेनापती मलिक कफुरने दक्षिणेकडे मोहीम काढून दिवगिरी, तेलंगणा, मुदराईवर ताबा मिळविला. 

👉 अशाप्रकारे अल्पावधीतच संपूर्ण भारत नियंत्रणाखाली आणला. 

👉 अल्लाउद्दीन खिलजीच्या काळातील सुधारणा :-

👉 महसूल व्यवस्थेत सुधारणा :-
अल्लाउद्दीन खिलजीने जमिनीची मोजणी करून जमिनीच्या उत्पादकेनुसार शेतसारा निश्चित केला.

👉बाजार नियंत्रण व्यवस्था :-

👉 सन्यास खाद्यन्न आणि आवश्यक गरजेच्या वस्तु योग्य दरात उपलब्ध व्हाव्यात म्हणून त्याने नियंत्रित बाजार व्यवस्था सुरू केली. 

👉 या मालाचे भाव सरकारमार्फत निश्चित केले जात असे. 

👉 तयाकरिता त्याने स्वतंत्र विभाग सुरू केला होता.


👉 9. गियासुद्दीन तूघलक (सन 1320 ते 1325) :

👉 अल्लाउद्दीन खिलजीच्या मुत्यूनंतर त्याचा मुलगा ख्रुस्त्रो खान सत्तेत आला. 

👉 वायव्य सरहद्द प्रांताचा प्रांधिकारी गियासुद्दीन तुघलकने ख्रुस्त्रोखानचा खून करून दिल्लीची सत्ता हस्तगत केली आणि तुघलक वंशाची स्थापना केली.

👉 ह सुख त्याला फार दिवस उपभोगता आले नाही. 

👉 तयाचा मुलगा महंमदबिन तुघलकने कपटाने त्याला ठार करून दिल्लीची सत्ता हस्तगत केली.



👉 10. महंमदबिन तुघलक (सन 1325 ते 1351) :-

👉 महंमदबिन तुघलक हा उतावीळ्या स्वभावाचा आणि व्याहारकी दृष्टीकोणाच्या अभावामुळे त्या राबवितांना त्यास अपयश आले. 

👉 दआबमध्ये करवृद्धी (सन1326) :-
दूआब भारतातील सर्वात सुपीक प्रदेश आहे. या प्रांतातील शेतकर्‍यांवर कराची वाढ केली. 

👉 ही योजना लागू करतांना दूआबमध्ये दुष्काळ पडला आणि अधिकार्‍यांनी जबरदस्तीने कराची वसूली केली. यामुळे दूआबमध्ये बंड झाले. 

👉 दवगिरी भारताची राजधानी (1326) :-
दिल्लीचा बादशहा महंमदबिन तुघलकने आपल्या राज्याच्या केंद्रवरती ठिकाण म्हणून देवगिरीची तुघलक साम्राज्याची राजधानी म्हणून निवड केली.

👉 सन 1326 मध्ये त्याने दिल्लीच्या जनतेसह दिवगिरी येथे आगमन केले. यावेळी देवगिरीचे नांव दौलताबाद असे करण्यात आले. 

👉 परंतु, दौलताबाद येथे साधंनाचा अभाव असल्यामुळे पुन्हा त्याने दिल्लीला प्रस्थान केले. 

👉 या काळात देवगिरीला भारताच्या राजधानीच सन्मान प्राप्त झाला होता.
चलन व्यवस्थेत सुधारणा (सन 1329) :-
महंमदबिन तुघलकने मुद्रापद्धतीत सुधारणा करून तांब्याची मुद्रा प्रचारात आणली आणि सोन्याच्या मुद्रेच्या मोबदल्यात तांब्याची नाणे चलनात आली. 

👉 लोकांनी घरीच टाकसाळ सुरू केला. 

👉 बाजारात तांब्याच्या चलनाचा सुळसूळाट होवून सोन्याची नाणी गायब झाली.


👉 11. फिरोझशहा तुघलक (सन 1351 ते 1388) :-

👉 महंमदबिन तुघलक नंतर त्याचा मुलगा फिरोझशहा तुघलक सुलतान झाला. हा उत्तमप्रशासक होता. त्याने लोककल्याणाची काम सुरू केली यामुळे तो विशेष प्रसिद्धीला आला होता. 

👉 तयाने लोकांना जाचक असलेले कर रद्द करून फिरोझपूर, जौनपूर, हिस्सार व फिरोझाबाद ही नवीन शहरे बसविली सतलज आणि यमुना नदीवर कालवे काढले. 

👉 फिरोजशहा तुघलक नंतर सत्तेत आलेले तुघलक घराण्याचे वारस कमकुवत निघाले. 

👉 सन 1398 मध्ये मध्य आशियाचा सरदार तैमुलंगने भारतावर स्वारी करून प्रचंड लूट केली. या लुटीमधून दिल्ली महंमदबिन तूघलकने सुद्धा सुटली नाही. 

👉 तयानंतर सन 1414 मध्ये तूघलक घराण्याची सत्ता संपूष्ठात आली. 

महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्न संच

1] वाक्यप्रकार ओळखा. - सूर्य मावळला परंतु अंधार पसरला नाही .

उत्तर = संयुक्त वाक्य


2]'मी' देशाची पंतप्रधान झाले तर !' या वाक्याचा प्रकार ओळखा.

उत्तर = उद्गारार्थी


3] लता मंगेशकरांची जुनी गाणी मंत्रमुग्ध करतात - या वाक्यातील ध्वन्यार्थ ओळखा.

उत्तर = मनावर जादू होणे


4] वाक्याच्या क्रियापदाच्या रुपावरुन खालीलपैकी कोणता वाक्याचा प्रकार होत नाही ?

उत्तर = संयुक्तार्थी


5] नियमित व्यायाम केला तर शरीर निरोगी राहतो ? या वाक्याचा प्रकार ओळखा.

उत्तर = मिश्र


6] काय ही गर्दी ! विधानार्थी वाक्य करा.

उत्तर = गर्दी खूप आहे.


7] खालील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. 

वाक्य - 'देवा, सर्वांना सुखी ठेव'

उत्तर = आज्ञार्थ


8] ज्या क्रियापदावरून फक्त काळाचा बोध होतो तर अशा क्रियापदाला कोणते क्रियापद म्हणतात ?

उत्तर = स्वार्थ


9] 'ऊ-आख्यात' वरून क्रियापदाचा कोणता अर्थ ओळखतात ?

उत्तर = आज्ञार्थ


10] ..................ही मांसाहारी वनस्पती आहे.

उत्तर = घटपर्णी


11] मधमाश्यांच्या वसाहतीत................. मधमाशी सर्वात मोठी असते.

उत्तर = राणी


12] गुणसूत्रे ही DNA आणि ................यांनी बनलेली असतात.

उत्तर = प्रथिने


13] स्त्रियांमध्ये ................. तर पुरुषांमध्ये .... असते.

उत्तर = डिंवग्रंथी , वर्षण


14] आपल्याला माहिती असलेल्या पेशींमध्ये .............. अंडे ही सर्वात मोठी पेशी आहे.

उत्तर =शहामृगाचे


15] ...............स्नायू गोलाकार व गुळगुळीत असतात,

उत्तर =अनैच्छिक


16] शरीरातील हाडे.................... एकमेकांना जोडलेली असतात.

उत्तर = अस्थिबंधनाने


17] .................... या जनकपेशींच्या हुबेहूब प्रतिकृती असतात.

उत्तर = कन्यापेशी


18] माणसाच्या पेशींमध्ये............... गुणसूत्रे असतात.

उत्तर = 46


19] लहान आतड्याची लांबी ............. मीटर असते.

उत्तर = सहा


20] सिता 10 वस्तु 15 रू. ला खरेदी करून 12 वस्तु 20 रू ला विकते तर तिला किती रूपये नफा किंवा तोटा होईल.

उत्तर = 11.11%


21] 12 पुस्तके विकल्यानंतर 2 पुस्तकांच्या खरेदीकिंमतीमुवढा नफा होतो. तर शेकडा किती?

उत्तर = 20%


22 ]एका वस्तूची विक्री किंमत ही खरेदी किंमतीच्या निम्मे आहे. तर शेकडा नफा किंवा तोटा किती होईल?

उत्तर = 50%


23]दुकानदाराने पुस्तकाच्या 1000 प्रति 9999 रुपयांना विकल्पानंतर  899 रु. नफा होतो तर, प्रत्येक पुस्तकाची खरेदी किंमत किती?

उत्तर = 9.10 रुपये.


24]40 टक्के नफा घेऊन 40 पुस्तके विकल्यास 40 रूपये फायदा होतो तर खरेदीची किंमत किती?

उत्तर = 100


25] एका वस्तूची किंमत 20 टक्क्यांनी वाढली असता विक्री 20 टक्के कमी होते, तर त्या विक्रेत्यास फायदा की तोटा झाला?

उत्तर = 4 टक्के तोटा


26] 5 रु. ला 2 पेन प्रमाणे 50 रु. ला किती पेन येतील?

उत्तर = 20


27] एक घोडा 9 टक्के तोटा सहन करून 455 रु. विकला तर मूळ किंमत किती?

उत्तर = 500


28] खरेदी रु. 2000, विक्री रु. 2400 आहे, तर शेकडा नफा किती?

उत्तर = 20%


29] एका व्यापाऱ्याने वस्तूची किंमत 20  टक्क्याने वाढविली व नंतर 10  टक्के सूट दिली, तर किती टक्के त्यात नफा झाला ?

उत्तर = 8%


30] 'दीनबंधु' हे साप्ताहिक कोणी सुरू केले?

उत्तर = कृष्णराव भालेकर


31] खालील पैकी कोणता ग्रंथ छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिला नाही ?

उत्तर =शिवभारत


32] महाराष्ट्रात दलित पँथर ची स्थापना किती साली झाली

उत्तर = मे १९७२


33]हैद्राबाद संस्थानातील रझाकार संघटनेचा प्रमुख कोण होता ?

उत्तर =कासीम रझवी


34]खालील पैकी कोणता समाज सुधारक अल्पजीवी ठरला ?

उत्तर = विष्णुबुवा ब्रह्मचारी


35]भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ कोणी लिहिला ?

उत्तर = वि रा शिंदे


36] अहमदनगरची स्थपणा अहमद निझामशहा याने मध्ये केली

उत्तर = 1490


37]स्वामी रामानंद तीर्थ यांचे मूळ नाव काय ?

उत्तर = व्यंकटेश भगवानराव खेडगीकर


38] श्री गुरु गोविंदसिंघजी यांचा जन्म कोठे झाला ?

उत्तर = पाटणा


39] दक्षिण भारतावर सर्वप्रथम कोणत्या राजाने आक्रमण केले ?

उत्तर = अलाउद्दीन खिलजी


40]रेशीम उत्पादनात भारतात _राज्य अग्रेसर आहे .

उत्तर = बिहार


41] अंबाबरवा अभयारण्य समुद्रसपाटीपासून _फूट उंचीवर आहे

उत्तर = 2300


42]गेंडा या प्राण्यासाठी प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान काझीरंगा राज्यात आहे

उत्तर = आसाम


43]गडचिरोली जिल्ह्यात एकूण तालुके किती आहेत ?

उत्तर = 12


44]लाख शेती सुरु करण्यासाठी कोणती झाडे उपयुक्त आहेत ?

उत्तर - १ व २


45]मोडकसागर हे धरण कोणत्या जिल्यात आहे ?

उत्तर - ठाणे


46]महाराष्ट्रात______________ नदी ला सर्वात जास्त उपखोरी आहेत

उत्तर - गोदावरी

खिल्जी घराण्याचा कर्तबगार सुल्तान


🔹अल्लाउद्दीन खिलजी


सुलतान अल्लाउद्दीन खिलजी

अधिकारकाळ- १२९० ते १३१६

राज्याभिषेक- १२९६

राजधानी- दिल्ली

पूर्ण नाव- अल्लाउद्दीन जलालुद्दीन खिलजीलख्नौती (बंगाल)

मृत्यू- १३१६ दिल्ली

पूर्वाधिकारी- जलालुद्दीन फिरोझ खिलजी

उत्तराधिकारी- कुतुबुद्दीन मुबारक शाह

राजघराणे- खिलजी


अल्लाउद्दीन खिलजी (मृत्यू: इ.स. १३१६) इ.स.च्या तेराव्या शतकातील खिलजी घराण्यातील दिल्लीचा सुलतान होता. त्याने इ.स. १२९६ ते इ.स. १३१६ या कालावधीत राज्य केले. तो खिलजी घराण्यातील सर्वात कर्तबगार सुलतान समजला जातो. त्याच्या राजवटीच्या शेवटच्या वर्षांमध्ये त्याचा वजीर मलिक काफूर ह्याने कारभार चालवला.


अल्लाउद्दीन खिलजी हा दिल्लीवर राज्य करणाऱ्या खिलजी घराण्यातला दुसरा सुलतान होता. पहिला सुलतान त्याचा काका जलालुद्दीन खिलजी. अल्लाउद्दीनने गादीवर येण्यापूर्वी जलालुद्दीनची २२ ऑक्टोबर १२९६ला हत्या केली होती.

इग्रजांचे बंगालवर वर्चस्व

🔹 बगाल हा मोगली साम्राज्यातील एक सधन व मोठा प्रांत होता. औरंगजेबाच्या मृत्यूनंतरच्या काळात ठिकठिकाणी सुभेदार जसे स्वतंत्र बनले होते. तसा बंगालचा सुभेदार अलीवर्दीखान हाही स्वतंत्र बनला होता. त्याच्यावर मोगल बादशहाचे नाममात्र वर्चस्व होते. तो १७५६ साली मृत्यू पावल्यावर त्याचा पुत्र सिराजउद्दोला हा बंगालच्या सुभेदारीवर आला. याच्यात कारकिर्दीत बंगालमध्ये इंग्रजांनी बाजी मारून इंग्रजी साम्राज्याचा पाया रचला.


* लवकरच प्लासीच्या रणमैदानावर सिराज उद्दोला लष्कर व इंग्रज यांची गाठ पडली. युद्धाला सुरुवात होताच सेनापती मीर जाफर प्रथम तटस्थ राहिला व नंतर इंग्रजांना जाऊन मिळाला. २३ जून १७५७ पुढे मीर जाफरचा पुत्र मिराण याने पकडून ठार केले. प्लासीच्या विजयानंतर इंग्रजांनी मीर जाफरला बंगालचा नवाब केला.


* मीर कासीम हा बंगालचा नाममात्र सुभेदार बनू इच्छीत नव्हता. इंग्रजांना हि न आवडणारी गोष्ट होती. त्यांनी मीर कासीम विरुद्ध युद्ध पुकारून त्याचा अनेक लढायात पराभव केला १७६३ आणि मीर जाफर यास पुन्हा बंगालचा सुभेदार म्हणून जाहीर केले.


* १ मे मध्ये क्लाइव्ह दुसऱ्यांदा बंगालचा गवर्नर म्हणून आला. त्याने आल्याबरोबर शहा अलम बादशाही व अयोध्येच्या नवाबाशी करार करून त्यांना आपल्या वर्चस्वाखाली आणले. याच वेळी त्याने बादशहापासून बंगालच्या सुभ्याची दिवाणी मिळविली. त्यातूनच बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था निर्माण झाली. त्याच्या जागी त्याचा पुत्र नजमुद्दोला याला इंग्रजांनी बसविले. तोही पूर्णपणे इंग्रजांच्या वर्चस्वाखाली राहिला.


📚दहेरी राज्यव्यवस्था


* १२ आगष्ट १७६५ रोजी मोगल बादशहा शहा आलम याने कंपनीस बंगालच्या दिवाणीचे फर्मान दिले. या फर्मानानुसार कंपनीस बंगालच्या सुभ्यातील महसूल गोळा करण्याचा अधिकार प्राप्त झाला. परंतु सुभ्याच्या राज्यकारभारातली व सुव्यवस्थेची जबाबदारी बंगालच्या सुभेदारावारच राहिली. याचाच अर्थ बंगालवर इंग्रजांचे सर्वार्धाने वर्चस्व झाले.


* १७६९ - ७० मध्ये या वर्षी दुष्काळात १ कोटी माणसे अन्नान्न करून तडफडून मेली. कंपनीच्या अवघ्या तेरा वर्षाच्या कारकिर्दीत शेती बुडाली. शेवटी विलायत सरकारला कंपनीच्या गैरकारभाराची चौकशी करून तिच्यावर बंधने टाकणारा रेग्युलेटिंग अक्ट [१७६९ - ७० ] पास करावा लागला


मजेशीर क्लूप्त्या



1. मुघल सत्तेचे सर्व बादशाह कसे लक्षात ठेवाल.


क्लूप्त्या : BHAJI SABJI FOR MAA SHAB


B = बाबर

H = हुंमायू

A = सम्राट अकबर

J = जहांगीर

S = शहाजहान

A = औरंगजेब

B = बहादुरशहा पहिला

J = जाहांदरशहा

FOR = फारुख्शियार

M = मुहम्मद शाह

A = अहमदशाह

A = आलमगीर

SH = शाह आलम

A = अकबर दुसरा

B = बहादूर शाह जफर

2. हिमाचल पर्वतरांगाच्या दक्षिण उत्तरावर असलेले गीरीस्थानके


क्लूप्त्या : 'शिमा नैनाला घेवून दार्जीलिंग ला गेली'


शि – शिमला

म  – मसुरी

नैना – नैनिताल

दिली – दार्जीलिंग

आभार आमीर सैय्यद

3. क्षेत्रफळाच्या दुष्टीने सर्वात कमी आकाराचे देश कसे लक्षात ठेवाल


क्लूप्त्या : एकदा मला मासे खावेसे वाटले म्हणून मी मोनाच्या घरी गेलो कारण मोना सर्वात चांगले मासे बनवते .मासे खाताना माझ्याकडून मोनासाठी स्तुतिसुमने अचानक बाहेर पडली.

'वा ! मोना तू साली मस्त मासे बनवतेस ग'


va =  वा = Vatican City  ०.४४. स्के किमी. ( युरोप )

mo = मो = Manaco १.९५. स्के किमी, युरोप

na = ना = Nauru २१.१० .स्के. किमी. द. प्रशांत महासागर

tu =  तू = Tuvala  २६.०० स्के किमी. द. प्र . म .

sa = सा = San Marino ६१ .०० स्के किमी युरोप

li = ली = Liechtestein १६०.०० स्के किमी . युरोप

m   = म = Marshall Island १८१.०० स्के किमी. मध्य प्र. म.

st   =स्त = st. Kitts- Nevis. २६९.०० स्के किमी . पूर्व करेबियन

ma = मा = Maldives ,२९८.०० स्के किमी. हिंदी महासागर

se  = से = Seychelles  , 308.00स्के.किमी .हिंदी महासागर

4. भारताची वैमानिकविरहित विमाने लक्षात कशी ठेवाल.


क्लूप्त्या : 'लक्षाने निशाना साधत रुस्तामचे दोन नेत्र फोडले.'


लक्षाने - लक्ष

निशाना- निशांत

रुस्तामचे दोन रुस्तम -१

रुस्तम -२

नेत्र

5. बांगलादेश या देशाला भारताच्या राज्यांच्या लागलेल्या सीमा


क्लूप्त्या : “मैत्री आमिप”


मै = मेघालय

त्री = त्रिपुरा

आ = आसाम

मि = मिझोरम

प =पश्चिम बंगाल.

महादजी शिंदे



पेशवाईतील मुत्सद्दी. इ.स. १७३०-१२ फेब्रुवारी १७९४ रोजी त्यांचे निधन झाले. पुण्यात शिंदे छत्री नामक त्यांचे स्मारक उभारण्यात आले आहे.


महादजी शिंदे यांचे नाव मराठ्यांच्या इतिहासात शिवाजी महाराज, बाजीराव यांच्यानंतर महान सेनानी म्हणून घेतले जाते. इंग्रजांकडून मानाने यांना द् ग्रेट मराठा असे म्हटले जात. पानिपतच्या तिसऱ्या लढाईनंतर यांनी मराठा साम्राज्याला पुन्हा उभारी मिळवून देण्याचे काम केले. पहिल्या इंग्रज मराठा युद्धामध्ये त्यांनी इंग्रजाचा काही लढायांमध्ये निर्णायक पराभव केला व इंग्रजांना तह करण्यास भाग पाडले. त्यामुळे त्यांच्या निधनापर्यंत मराठा साम्राज्याला स्थैर्य लाभले.


सैनिकी कारकीर्द


दक्षिण भारत


महादजी शिंदे वयाच्या दहाव्या वर्षापासूनच रणांगणावर आपले अस्तित्व दाखवण्यास सुरुवात केली होई. १७४० च्या निजामा विरुद्धच्या लढाईत त्यांनी दत्ताजी शिंदे व त्रिंबक किन्नड यांना साथ दिली होती. १७४२ मध्ये बेळूर च्या लढाईत महादजीने भाग घेतला होता या लढाईत मराठ्यांनी निझामच्या सैन्याला परतावून लावले होते.


उत्तर भारत


१७४५ ते १७६१ दरम्यान ( जो मराठ्यांचा राज्य विस्तारातील सुवर्णकाळ मानला जातो) त्या काळात महादजी शिंदे यांनी जवळपास ५० लढायांचे नेतृत्व/ सहभाग घेतला, मालव, राजपुताना, बुंदेलखंड,१७४७, मारवाड १७४७ व हिम्मत नगर १७४८. ब्रिज, दोआब, रोहिलखंड, दिल्ली कुंजपुर तसेच पानिपतच्या तिसऱ्या लढाईत हिररीचा सहभाग होता. यातील महादजीची महत्त्वाच्या लढाया म्हणजे चंद्रावती गंज १७४६, फतेहाबाद १७४६ बडी साद्री


मल्हाराव होळकरांच्या साथीत शिंदे यांनी अनेक राजपूत संस्थाने मराठा साम्राज्याखाली आणली. रतन गढ, लालगढ, बिकानेर, लासवारी, लाखमगढ, कुंभेर, डीग ही मराठा साम्राज्याला जोडली गेली. तसेच जोधपूर व जयपूर ह्या मोठ्या राजपूत राज्यांनी मराठा वर्चस्व मान्य करून टाकले. मथुरा हे मुघल सत्ते खाली होते ते मराठा अख्यारीत आणून व येथील काही हिंदू मंदिरांचा जिर्णोद्धार करण्यात आला व मथुरेला संस्कृत शिक्षण केंद्र म्हणून शिंद्यांचा अधिपत्याखाली तयार झाले. जानेवारी १७५८ मध्ये महादजी यांनी ग्वाहलेर येथे शिंद्यांचे केंद्र म्हणून बनवले.


ग्वालहेरचे शासक


जयाप्पा शिंदे जे शिंदे घराण्याचे प्रमुख होते ते २५ जुलै १७५५ रोजी राजस्थानमधील नागौर येथील लढाईत मारले गेले, त्यानंतर दत्ताजी शिंदे व जनकोजी शिंदे यांच्या कडे शिंदे घराण्याची सुत्रे आली. मराठ्यांच्या वाढत्या लष्करी वर्चस्वाला इस्लामी जिहादाचे उत्तर म्हणून लवकरच उत्तर भारतात अब्दाली विरुद्द मराठे असा मोठा सामना तयार झाला. बुरुडी घाटावरील लढाईत दत्ताजी शिंदेची नजीब कडून क्रुरपणे हत्या झाली. शिंद्यांनी अब्दालीविरुद्दच्या पानिपतच्या तिसऱ्या लढाईत हिररीने सहभाग घेतला होता. या लढाईत जनकोजी शिंदे मारला गेला, तसेच महादजी देखिल लढता लढता घायाळ झाले होते. मराठ्यांनी युद्धात पळ काढल्यानंतर महादजी यांनी यशस्वीपणे माघार घेतली, या लढाईत त्यांचा पाय लुळा पडला तो पुढील जन्मभर तसाच राहिला. पानिपतच्या लढाईनंतर साहजिकच शिंदे घराण्याची सुत्रे महादजी कडे आली. मराठे अब्दाली युद्धातील पराभवानंतर मराठा साम्राज्याचे विकेंद्रीकरण झाले व शिंदे हे स्वतंत्र मराठा सस्थानिक बनले व ग्वाहलेर हे त्यांचे संस्थान बनले.


पानिपतच्या लढाईनंतरची कारकीर्द


पानिपतच्या लढाईतील विनाशानंतर महत्त्वाचे होते की मराठयांचे उत्तर भारतावरील वर्चस्व पुन्हा प्रस्थापीत करणे, १७७० मध्ये महादजीने भरतपूरच्या जाट राजा नवल सिंग याचा पराभव केला व मराठ्यांचे वर्चस्व पुन्हा प्रस्थापित झाले. १७७७ मध्ये पेशव्यांचे कोल्हापूर संस्थानाशी खटके उडाले होते यात महादजीने निर्णायक कामगीरी केली.


पहिले इंग्रज-मराठा युद्ध


1७७३ मध्ये नारायणराव पेशवे याचा खून झाला. व रघुनाथराव स्वयंघोषित पेशवा बनला. बाराभाईच्या कारभारानुसास नारायणरावचा मुलगा सवाई माधवराव पेशवा बनला व रघुनाथरावला पेशवे पदावरुन हटवले या बारभाई मध्ये महादजी व नाना फडणीसांची भूमिका महत्त्वाची होती. रघुनाथरावांना हा निर्णय पटला नाही व त्यांनी इंग्रजांची मदत घेण्याचे ठरवले.


वडगावची लढाई


१७७७ मध्ये नाना फडणीस यांनी कलकत्ता कौन्सिल बरोबर केलेला कराराचा भंग करत फ्रेंचाना पश्चिम किनारपट्टी वर बंदर उभारायची परवानगी दिली. ब्रिटीशांनी प्रत्युतरादाखल मुंबईवरुन सैन्य पाठवले. जानेवारी १७७९ मध्ये ३,९०० ब्रिटीश सैन्य कर्नल एगर्टन च्या नेतृत्वाखाली पुण्यावर चालून गेले. वाटेत रघुनाथरावांचे सैन्यही येउन मिळाले. मराठ्यांच्या सैन्य महादजी शिंदे व् तुकाजी होळकर यांच्या नेतृत्वाखाली होते. ब्रिटीश सैन्याच्या वाटेत असंख्य अडथळे आणून त्यांचा चाल थंडावली व त्यांनी तळेगाव येथे तळ टाकला. महादजींनी वाटेतील सर्व रस्त्यामधील गावातील कुरणे जाळली विहरी विषमय करून टाकल्या, तसेच मुंबईकडून येणारी रसदही पूर्णपणे तोड्न टाकली. ब्रिटीश सैन्याचे अन्नपाण्याहून हाल होउ लागले. ब्रिटीशांनी माघार घेण्याचे ठरवले १२ जानेवारी १७७९ रोजी मध्य रात्री मराठ्यांनी ब्रिटीशांवर आक्रमण केले व सर्व बाबतीत चित करून वडगाव येथे शेवटी ब्रिटीश सैन्य महादजींना शरण आले.


१६ जानेवारी रोजी वडगावचा तह झाला. इस्ट इंडिया कंपनीने १७७३ पासुन मिळवलेला सर्व प्रांत परत करण्यात यावा असे ठरले. यात साष्टी, ठाणे व जवळपास सर्व गुजरात पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आला. महादजीने ब्रिटीशांना युद्दाचा खर्च म्हणून ४१,००० रुपये देखिल वसूल केले. रघुनाथरावाला मराठ्यांच्या हाती देण्यात यावे असे ठरले त्यानुसार १८ जानेवारी १७७९ रोजी रघुनाथराव व त्याचा सैन्याला पकडण्यात आले. तसेच महादजीने सखाराम बापूचा पराभव करून त्याला सिंहगडाच्या तुरुंगात रवानगी केली


सिप्री येथील हार


ब्रिटीश गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टींन यांनी वडगाव चा तह मुंबईच्या अधिकाऱ्यांना यावर सही करण्याची परवानगी नव्हती असा युक्तीवाद करत नामंजूर केला व शमलेले युद्ध पुन्हा सुरु करण्यास आदेश दिले, oकर्नल गोडार्ड यांनी ६००० ची फौज फेब्रुवारी १७७९ मध्ये घेउन अहमदाबाद काबीज केले व १७८० मध्ये भासीं बंगालमधून निघून कॅप्टन पॉपहॅम नी ग्वाहलेर काबीज केले. वॉरन हेस्टींग नी महादजी शिंदेंना अजून नामोहरम करण्यासाठी मेजर केमॅकला पाठवले. महादजी शिंद्यांच्या फौजेला गाठून हैराण केले फेब्रुवारी १७८१ मध्ये ब्रिटीशांनी सिप्री येथे महादजी शिंद्यांच्या सेनेचा पराभव केला. सिप्रीच्या पराभवानंतर देखिल महादजीने आपल्या आघाड्या शाबूत ठेवत ब्रिटीशांना आव्हान दिले. ब्रिटीशांच्या प्रमाणेच महादजीचे सैन्य संख्येने जास्त व ब्रिटीशांच्या शिस्तबद्द सैनिकांप्रमाणेच तुल्यबळ असल्याने महादजीवर पूर्णपणे मात करणे अवघड गेले, तसेच महादजीलाही ब्रिटीशांच्या आधुनिक युद्धतंत्रापुढे त्यांना अजून मात देणे अवघड गेले.


सालबाईचा तह १७ मे १७८२


महादजीच्या इंग्रजांकडून पराभव झाल्या नंतर महादजीने इंग्रजाबरोबर मुत्सदीने तहची बोलणी केली जो सालाबाईचा तह या नावाने ओळखला जातो. या तहानुसार इंग्रजांनी सवाई माधवरावला पेशवा म्हणून मान्यता दयावी व रघुनाथरावला वेतन द्यावे. या तहानुसार शिंद्यांना यमुनेच्या पश्चिमेकडील सर्व प्रांत परत मिळाला व उज्जैन मध्ये माघार घ्यावी लागली.


इंग्रजाशी तहानंतर इंग्रजांशी असलेल्या शस्त्र संधीचा उपयोग महादजीने चांगलाच उपयोग करून घेतला.


सोळा महाजनपदाची प्राचीन आणि आधुनिक नावे


🔸काशी ➾ बनारस

🔹कोसल ➾ लखनौ

🔸मल्ल ➾ गोरखपुर

🔹वत्स ➾ अलाहाबाद

🔸चदी ➾ कानपूर

🔹करू ➾ दिल्ली

🔸पांचाल ➾ रोहिलखंड

🔹गांधार ➾ पेशावर

🔸कबोज ➾ गांधारजवळ

🔹मत्स्य ➾ जयपुर

🔸शरसेन ➾ मथुरा

🔹अश्मक ➾ औरंगाबाद-महाराष्ट्र

🔸अवंती➾ उज्जैन

🔹अग ➾  पूर्व-बिहार

🔸मगध ➾ दक्षिण बिहार

🔹वज्जी ➾ उत्तर बिहार


ब्रिटिशांनाही लुटता न आलेले भारतातील रहस्यमयी खजाने



एक काळ होता जेव्हा भारतातुन सोन्याचा धूर निघायचा असे म्हटले जायचे. हा धूर पाहूनच किंवा त्याच्याबद्दल ऐकूनच अनेक परदेशी लोकांनी भारतात येऊन कधी तलवारीच्या तर कधी बंदुकीच्या जोरावर आपले खजिने लुटले.*

 भारतातला खजिना चोरून आपापल्या देशात श्रीमंती आणि प्रतिष्ठा मिळवली. परंतु आजही भारतात असे अनेक खजिने आहेत जे ब्रिटिशांनाही लुटता आले नाहीत.

त्याकाळचे अनेक राजे, संस्थानिक किंवा शासक आपले खजिने वाचवण्यासाठी त्याबद्दलची माहिती गुप्त ठेवत असत किंवा त्यांच्याबद्दल दंतकथा पसरवत असत. पाहूया त्यापैकी काही गुप्त खजिने आणि दंतकथांबद्दल…


◾️ नादीरशहाचा खजिना 


नादिरशाहने १७३९ मध्ये भारतावर आक्रमण करून दिल्लीवर ताबा मिळवला होता त्यावेळी त्याने संपूर्ण दिल्ली लुटली होती. त्या लुटीमध्ये प्रसिद्ध मयूरसिंहासन आणि कोहिनुर हिऱ्यासोबतच मोठ्या प्रमाणावर सोने, नाणी आणि दागिन्यांचा समावेश होता. तेव्हा युद्धपरिस्थी असल्याने नादिरशहा आपल्या खजिन्यावर लक्ष ठेऊ शकला नाही. परत जाताना त्याच्या सैन्यातील मोठ्या सरदार आणि सैनिकांनी त्या लुटीतला मोठा खजिना लपवून ठेवला होता अशी दंतकथा प्रसिद्ध आहे. हा खजिना अद्याप कुणाला सापडला नाही.


◾️ कष्णा नदीचा खजिना 


आंध्रप्रदेशच्या गुंटूर जिल्ह्यातील कृष्णा नदीचा किनारी प्रदेश बऱ्याच काळापासून हिऱ्यांसाठी प्रसिद्ध होता. एकेकाळी हा प्रदेश गोवळकोंडा राज्यात समाविष्ट होता. जगप्रसिद्ध कोहिनुर हिरा इथल्याच खाणीतून काढण्यात आला होता.


◾️ बिंबीसारचा खजिना


इ.स.पूर्व पाचव्या शतकातील मगधचा राजा (बिहार) बिंबिसार याला मौर्य साम्राज्याचा जनक मानले जाते. अशी दंतकथा प्रसिद्ध आहे की बिहारच्या राजगीर येथे बिंबिसाराचा खजिना लपविण्यात आला होता. एकाच दगडात कोरलेल्या सोनभांडार गुहांमध्ये पुरातन लिपीमध्ये लिहलेले शब्द अद्याप कुणाला वाचता आले नाहीत. असे मानले जाते की त्या लिपीतच खजिन्याशी संबंधित नकाशाचे रहस्य लपले आहेत. ब्रिटिशांनी खजिना शोधण्यासाठी तोफा लावल्या परंतु त्यांनाही खजिना सापडला नाही.

आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवड़गावची पोस्ट,


◾️ जहांगीर बादशहाचा खजिना


मुघल बादशाह जहांगीरला सत्तेतून पायउतार केल्यानंतर तो दिल्लीपासून १५० किमी अंतरावर असणाऱ्या राजस्थानमधील अलवर किल्ल्यात आश्रयाला गेला होता. दंतकथेनुसार जहांगीरने अलवरच्या किल्ल्यात राहायला येताना आणलेली प्रचंड संपत्ती त्याने किल्ल्यात लपवली. ही संपत्ती अद्याप कुणाला सापडली नाही.


◾️शरी मोक्काम्बिका मंदिर खजिना 


कर्नाटकच्या पश्चिम घाटात कोलूर येथे श्री मोक्काम्बिका मंदिर आहे. इथल्या पुजाऱ्यांच्या सांगण्यांनुसार मंदिरात सापाचे खास चिन्ह बनवलेले आहे. आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवड़गावची पोस्ट,प्राचीन काळापासून नागदेवता लपवलेल्या खजिन्याचे रक्षण करतात असे भारतात मानले जाते. या मंदिराच्या तळघरात प्रचंड संपत्ती असल्याचे बोलले जाते. त्यांच्या रक्षणासाठीच सापाचे चिन्ह तिथे कोरण्यात आले आहे. मात्र या संपत्तीचा शोध किंवा किती संपत्ती आहे याचा कुणालाही अंदाज लागला नाही.


◾️ राजा मानसिंहाचा खजिना


जयपूरचा राजा मानसिंह हा मुघल सम्राट अकबराचा सरसेनापती होता. १५८० मध्ये त्याने अफगाणिस्तानवर विजय मिळवला होता. त्यावेळी त्या विजयानंतर मिळालेली लूट मानसिंहाने सरकारदरबारी जमा न करता गुप्त ठिकाणी लपवली होती अशी दंतकथा आहे. या दंतकथेचा किती तथ्य आहे याचा अंदाज यावरून होतो की, आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधींनी हा खजिना शोधण्याचे आदेश दिले होते. पण हा खजिना काय सापडला नाही.


◾️ मीर उस्मान अलीचा खजिना 


हैद्राबादचा शेवटचा निजाम मीर उस्मान अली त्याकाळातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होता. १९३७ मध्ये प्रतिष्ठित अशा टाईम मॅगझीनमध्ये त्यांना जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती सांगितले होते. आपल्या शासनकाळात त्याने भरपूर प्रमाणात संपत्ती गोळा केली होती. अशी दंतकथा प्रसिद्ध आहे की, किंग पॅलेसच्या तळघरात त्याने आपली सगळी संपत्ती लपवली होती. त्यात महागडे हिरे, दागिने, रत्ने समाविष्ट होती. मीर उस्मान अलीच्या मृत्युसोबतच त्याच्या खजिन्याचे रहस्य गडप झाले.

भारतातील महाजनपदे

Mpsc History

भारतातील महाजनपदे:

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

संघटीत राज्यव्यवस्थेचा उद्य :

आर्य लोकांनी भारतात टोळ्यांच्या रूपांने प्रवेश केला. कालांतराने त्यांच्या संघर्ष सुरू झाला. प्रराक्रमी टोळ्यांच्या नेत्यांनी राज्यव्यवस्था निर्माण केली. ही राज्ये जनपदे आणि महाजनपदे म्हणून ओळखली जात असे.

भारतीय वेद, पुराण, रामायण, महाभारत जैन आणि बौद्ध ग्रंथाच्या अभ्यासावरून इसवी सन पूर्व सहाव्या शतकात भारतात अंग (उत्तर बिहार), मगध (दक्षिण बिहार), कोसी (बनारस), कोसल (आयोध्या), विदेह (उत्तर बिहार), मल्य (गोरखपूर), चेंदी (बुंदेलखंड), वस्त (अलाहाबाद), कुरू (दिल्ली व मीरत), पांचाल (बरेली), मस्त्य (जयपूर), अश्मक (गोदावरीचा भाग), अवंती (माळवा), गांधार (अफगाणिस्थान), सुरसेन (मथुरा), कुंभोज (दक्षिण पश्चिम क्षेत्र) असे एकूण सोळा महाजनपदे होती असा उल्लेख मिळतो.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

महाजपदकालीन राज्यव्यवस्था :

महाजनपदकालीन राज्य व्यवस्था ही राजेशाही पद्धतीची होती. राज्यकारभाराच्या प्रक्रियेत राजा हा सर्वात वरच्या स्थानी असला तरी, बहुतांशी निर्णय खालील संस्थांमार्फत घेतले जात असे.

गणपरिषद – ही राज्यातील ज्येष्ठ लोकांची परिषद असे. राज्यातील सर्वोच्च अधिकार व राज्यकारभाराचे अधिकार गणपरिषदेकडे असे.

कार्यकारी मंडळ – राज्याचा दैनंदिन कारभार चालविण्याकरिता कार्यकारी मंडळ असे.
सभासद कार्यकारी मंडळामध्ये प्रस्ताव मांडीत आणि त्यावर बहुमताने निर्णय घेतला जात असे.


❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

पराक्रमी राज्ये :

कालांतराने गणपरिषदेचे महत्व कमी होवून राजेशाहीला महत्व प्राप्त झाले.
या राजेलोकांच्या विस्तारवादी धोरणामुळे काही महाजनपदे विशेष प्रसिद्धीला आली. त्यामध्ये कोसल, वत्स, अवंती आणि मगध विशेष नावारूपास आली.
कोशल – हिमालयाच्या पायथ्याशी नेपाळ आणि उत्तरप्रदेश यामधील भाग म्हणजे कोसल होय.
साकेत ही या राज्याची राजधानी होती.

कोसलचा राजा प्रसेनजित हा गौतम बुद्धाच्या समकालीन होता. या राजाचा मगध साम्राज्याचे पराभव करून कोसल आपल्या राज्यात समाविष्ट केले.
वत्स – अलाहाबाद जवळील प्रदेश हा वत्स राज्याची राजधानी कौशांबी म्हणून ओळखला जात असे. हे शहर त्या काळात तलम रेशमी कापडाकरिता जगप्रसिद्ध होते.

अवंती – आजचे उज्जैन शहर हे अवंतीची राजधानी होती. हे शहर त्या काळात व्यापारी केंद्र म्हणून प्रसिद्धीला आले होते.
मगध – गंगा व शोण नदीच्या खोर्‍यातील परीसरात मगध राज्य पसरले होते.

बिहारमधील राजगृह हे या राज्याची राजधानी होती. या ठिकाणी होवून गेलेल्या पराक्रमी राजे लोकांनी मगध साम्राज्य नावारूपास आणले.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

बिंबिसार :

बिंबिसार हा मगध राज्याचा पहिला पराक्रमी राजा होवून गेला.
त्याने आपल्या विस्तारवादी धोरणामुळे काशी, अंग, मंद्र, अवंती आणि कोसल राजांचा पराभव करून ती राज्ये मगध साम्राज्यात सामील केली.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

अजातशत्रू :

हा राजा गौतम बुद्धाच्या समकालीन, असून त्याने अनेक गणराज्य आपल्या साम्राज्यात सामील करून घेतली.
या राजाने जैन व बौद्ध धर्माला राजाश्रय दिला.
पहिली धर्मपरिषद अजातशत्रूने राजगृह येथे बोलाविली होती.

शिशुनाग :

या राजाने उत्तर भारतातील सर्व गणराज्ये एकत्र करून समर्थशाली मगध साम्राज्य निर्माण केले.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

नंद राजे (इसवी सनपर्व 364 ते 324) :

या काळात मगध राज्यात पराक्रमी नंद घराने नावारूपास आले. या घराण्यातील राजे लोकांनी आपल्या साम्राज्याचा विस्तार तक्षशिला ते हिमालय आणि कर्नाटक पर्यंत केला होता.

या काळात मगध साम्राज्य प्राचीन भारताच्या इतिहासातील पहिले साम्राज्य म्हणून ओळखले जाते.
या घराण्यातील शेवटचा राजा म्हणजे धनानंद होय.
नंद राजांच्या काळातच भारतात परकीयांनी आक्रमण करण्यास सुरुवात केली होती.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

परकीय आक्रमणे :

भारतातील संपत्तीचे वर्णन ऐकूण बर्‍याच परकीय राजांनी भारतावर आक्रमण केले आणि भारतातील संपत्ती लुटून नेली.

प्राचीन काळापासून संपत्तीच्या परकीय राजांनी भारतावर आक्रमण केले आहे.

भारतात पहीले परकीय आक्रमण मगध साम्राज्याच्या उदयाच्या काळात झाले.

इराणचा राजा डार्युश राजाचे आक्रमण :

मगध साम्राज्याच्या उदयाच्या काळात इराणचा सम्राट दार्युश ने वायव्यकडील गांधार व सिंध प्रांतावर आक्रमण करून ते प्रदेश जिंकले.

भारतावर आक्रमण करणारा तो पहिला परकीय होता.
या घटनेमुळे भारत व इराण यांच्यात राजनेतिक संबंध प्रस्तापित होवून व्यापर व कलेच्या क्षेत्रात देवाण घेवाण सुरू झाली.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

अलेक्झांडर उर्फ सिकंदरचे आक्रमण (इसवीसन पूर्व 326) :

ग्रीक राजा सिकंदरने इराणच्या राजाचा पराभव केला. त्यानंतर त्याने भारतावर आक्रमण केले.
सिकंदरने सिंधु नदी ओलांडून गांधार प्रांतात प्रवेश केला. त्यांच्या सेनेने रावी नदीच्या तीरावर असलेल्या पुरू राजाचा पराभव केला.

मगध पर्यत मात्र तो येवू शकला नाही.
भारतातून माघारी जात असतांना इसवी सन पूर्व 323 मध्ये बॉबिलान येथे मरण पावला.
सिकंदरच्या स्वारीमुळे भारत व ग्रीक यांच्या राजनैतिक संबंध प्रस्तापित झाले.

ग्रीकांच्या शिल्पकलेचा भारतीय शिल्पकलेवर प्रभाव पडून त्यामधून गांधार शिल्पकला शैली उदयास आली.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

महाजनपदे आणि त्यांच्या राजधानीची नगरे :



१. काशी - वाराणसी
२. कोसल - श्रावस्ती
३. अंग - चंपा
४. मगध - गिरीव्रज / राजगृह

५. वृज्जी / वज्जी - वैशाली
६. मल्ल / मालव - कुशिनार / कुशीनगर
७. चेदि - शुक्तिमती / सोध्थिवती
८. वंश / वत्स - कौशांबी

९.  कुरु - इंद्रप्रस्थ / इंद्रपट्टण
१०. उत्तर पांचाल - अहिच्छत्र,
       दक्षिण पांचाल -कांपिल्य
११. मत्स्य - विराटनगर
१२. शूरसेन - मथुरा

१३. अश्मक / अस्सक-पोटली / पोतन / पोदन
१४. अवंती - उज्जयिनी आणि महिष्मती
१५.  गांधार - तक्षशिल
१६.  कंबोज - राजपूर

वैदिक काळ आणि महाजनपदे

वैदिक काळ....
वेद हे आर्य धर्माच्या मूलस्थानी आहेत.वेद हे अनादी आहेत म्हणजे काय या प्रश्नाची चर्चा आधुनिक कालखंडात सुरू झाली.विशेषतः वेदांच्या अभ्यासाकडे जेंव्हा पाश्चात्य लोकांना आपले लक्ष वळविले तेंव्हा इतर गोष्टींच्या बरोबरच त्यांनी वेदांच्या कालनिर्णयाकडे चर्चा सुरू केली.

ख्रिस्ती शकापूर्वी १००० वर्षाच्या पलीकडच्या काळात वेदरूपी काव्ये रचली असावीत असे दिसते. वैदिक साहित्य भारताच्या सर्वाधिक प्राचीन साहित्य असल्याचे मानले जाते. वैदिक साहित्याची भाषा संस्कृत आहे. चार वेद म्हणजे वैदिक साहित्याचा मूळ गाभा आहे. या वेदान्च्या ग्रथाना 'संहिता' असे म्हणतात.'विद्' म्हणजे जाणणे आणि 'वेद' म्हणजे 'ज्ञान' असा अर्थ आहे. वेद मौखिक परम्परेने जतन केले गेले.[१७]

आजच्या बिहारमधील नालंदा विद्यापीठ हे जगातील सर्वांत पहिले बौद्धविद्यापीठ मानले जाते .


__________________________________
महाजनपदे .......

गौतम बुद्ध आपल्या शिष्यांना उपदेश करताना

सोळा प्रमुख महाजनपदे

नालंदा विद्यापीठ हे जगातील सर्वांत पहिले विद्यापीठ मानले जाते
वैदिक काळाच्या शेवटच्या काळात ज्यांचा महाभारतात उल्लेख आहे अशी प्राचीन भारताच्या राज्ये महाजनपदे म्हणून उदयास आली. यांचे वेदांमध्ये, बौद्ध व जैन धर्माच्या साहित्यामध्ये प्रामुख्याने उल्लेख आढळतात. मगध,काशी, कोसल, अंग, मल्ल, चेदी, वत्स , कुरु पांचाल, मत्य, शूरसेन, आसक, अवंती, गांधार, कंबोज अशी १६ प्रमुख महाजनपदे साधारपणे इसपूर्व १००० ते ५०० च्या आसपास अस्तित्वात होती. यांचा विस्तार आधुनिक अफगणिस्तानपासून ते बंगालपर्यंत तर दक्षिणेकडे महाराष्ट्रपर्यंत होता व सर्व प्रमुख महाजनपदे ही गंगा नदीच्या खोऱ्यात होती. सिंधू संस्कृती नंतरचे मोठे नागरीकरण या काळात झाले.

या महाजपदांहून वेगळे अशी अनेक लहान सहान राज्ये भारतीय उपखंडात सर्वत्र पसरली होती. बहुतांशी त्यांचे अधिपत्य वांशिक असे तर काही वेळा निवडीप्रमाणे असे. शिकण्याची प्रमुख भाषा संस्कृत होती तर बोलीभाषा अनेक असण्याची शक्यता आहे. उत्तर भारतात प्राकृत ही प्रमुख बोली भाषा बोलली जात होती. मराठी व हिंदी भाषांचे मूळ प्राकृत भाषेत असण्याची शक्यता आहे. लहान सहान राज्ये व जनपदे ही चार प्रमुख महाजनपदांच्या अधिपत्याखाली होती. ती म्हणजे कोसल, अवंती,मगध व वत्स.[१८]

वैदिक काळात हिंदू धर्म असा अस्तित्वात नव्हता,वैदिक पूजा- पाठ पद्धतींवर पुजारी वर्गाचे वर्चस्व होते.वैदिक धर्मातूनच पुढे हिंदू धर्माचा उदय झाला. महाजनपदांच्या काळात भारतीय संस्कृतीतील महत्त्वाचा हिस्सा असणाऱ्या तत्त्वज्ञानाचा विकास झाला, उपनिषदे व इतर वेदोत्तर साहित्यामधून त्याकाळी आलेले प्रचंड मोठे वैचारिक बदल दर्शावतात. द्वैत अद्वैतवाद्, तसेच नास्तिकवाद, पदार्थवाद, अजिविकवाद इत्यादी मतप्रवाह त्याकाळी अस्तित्वात होते, जैन धर्म व बौद्ध धर्माची तात्त्विक बांधणी याच सर्व तत्कालीन ऊहापोहाचा निकाल आहे असे मानतात.हे भारताचे वैचारिक सुवर्णयुग होते असे मानतात.

गौतम बुद्धांना इसपूर्व ५३७ मध्ये आत्मज्ञानाचा साक्षात्कार झाला व ते बुद्ध म्हणून ओळखले जाऊ लागले. याच सुमारास जैनांचे २४ वे तीर्थंकर महावीर यांनाही महानिर्वाण स्थिती प्राप्त झाली. बौद्ध धर्माची व जैन धर्माची सुरुवात झाली.[२०] जैन धर्मियांच्या श्रद्धे प्रमाणे त्यांचीही परंपरा जुनी आहे. वेदांमध्येही काही जैन तीर्थंकरांचा संदर्भ आढळतो[२१]

बुद्ध धर्माची व जैन धर्माच्या शिकवणीत जी साध्या व विरक्त राहणीची शिकवण होती ती जनसामान्यांमध्ये लवकर पसरली. तसेच त्याचा उलटा प्रभाव वैदिक परंपरांवरही पडला, शाकाहार, अहिंसा हे भारतीय संस्कृतीचे महत्त्वाचा भाग बनले. जैन धर्माचा प्रभाव भारतापुरतेच मर्यादित राहिला तर बौद्ध भिक्कूंनी बौद्ध धर्म भारताबाहेरही पसरवण्यास मदत केली.

जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

💐 मासे कोणत्या इंद्रियाद्वारे श्वसन करते ?

🎈कल्ले.


💐 आध्रप्रदेशातील नृत्यशैली कोणती ?

🎈कचिपुडी.


💐 सत्री - पुरूष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला ?

🎈ताराबाई शिंदे.


💐 भारताच्या प्रथम महिला लोकसभा सभापती कोण ?

🎈मीरा कुमार.


💐 महाराष्ट्रातील विमान कारखाना कोठे आहे ?

🎈ओझर मिग.( नाशिक )


💐 महाराष्ट्र राज्याची पूर्व - पश्चिम लांबी किती आहे ?

🎈८०० किमी.


💐 चिल्का हे खारया पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे ?

🎈ओरिसा.


💐 चित्रनगरी हे मराठी चित्रपट निर्मितीचे केंद्र कोठे आहे ?

🎈कोल्हापूर.


💐 ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे ?

🎈बीड.


💐 चदनाचे सर्वांधिक उत्पादन कोठे होते ?

🎈कर्नाटक.



1). नुकतीच बातमीत असलेली "फ्लोर टेस्ट" म्हणजे काय?

उत्तर - विधिमंडळात बहुमत दाखवणे


2). एशियन ट्रॅक सायकलिंग चॅम्पियनशिप 2022 मध्ये कोणत्या देशाने अव्वल स्थान पटकावले आहे?

उत्तर - जपान


3). दरवर्षी आंतरराष्ट्रीय नाविक दिन कधी साजरा केला जातो?

उत्तर - 25 जून


4). भारताने अलीकडेच पृष्ठभागावरून हवेत मारा करणाऱ्या VL-SRSAM क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कोठे केली?

उत्तर - ओडिशा


५). कोणत्या देशाने अलीकडेच फ्रेंच रॉकेटने "GSAT-24" उपग्रह प्रक्षेपित केला आहे?

उत्तर भारत


६). कोणत्या देशाच्या सिनेटने नुकतेच बंदूक नियंत्रण विधेयक मंजूर केले आहे?

उत्तर अमेरीका


7) नुकतेच NITI आयोगाचे नवीन CEO कोण बनले आहे?

उत्तर - परमेश्वरन अय्यर


8). अलीकडे चर्चेत असलेली 'वरदा नदी' ही कोणत्या नदीची उपनदी आहे?

उत्तर - तुंगभद्रा नदी


💐 कजीबी कोणत्या देशाची गुप्तचर संस्था आहे ?

🎈रशिया.


💐 राष्ट्रीय मतदार दिवस कधी साजरा केला जातो ?

🎈२५ जानेवारी.


💐 डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे ?

🎈सोनेगांव. ( नागपूर )


💐 मौर्य वंशाचे शेवटचे राजा कोण होते ?

🎈बहद्रथ.


💐 सयुक्त राष्ट्र संघाचे मुख्यालय कोठे आहे ?

🎈नयूयॉर्क.


💐 दौलताबाद किल्ला कोठे आहे ?

🎈औरंगाबाद.


💐 चीन या देशाचा राष्ट्रीय खेळ कोणता ?

🎈टबल टेनिस.


💐 विवेकसिंधू हा ग्रंथ कोणी लिहिला ?

🎈मकुंदराज.


💐 शरीराचे तापमान मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात ?

🎈थर्मामीटर.


💐 आयझॅक न्यूटन कोणत्या देशाचे शास्त्रज्ञ होते ?

🎈इग्लंड.


💐 हिरोशिमा व नागासाकी ही शहरे कोणत्या देशात आहे ?

🎈जपान.


💐 दिवस व रात्र कोठे समान असतात ?

🎈विषुववृत्त.


💐 जागतिक अन्न व कृषी संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ?

🎈रोम.


💐अलेक्झांडर उर्फ सिंकदर यांच्या गुरूचे नाव काय होते ?

🎈अरिस्टॅटल.


💐 छत्रपती संभाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते ?

🎈सईबाई.


💐 कदारनाथ प्राचीन मंदीर भारतातील कोणत्या राज्यात आहे ? 

🎈उत्तराखंड.


💐 'मेरा भारत महान' हा नारा कोणी दिला ?

🎈राजीव गांधी.


💐 ऑस्कर पुरस्काराची सुरूवात कधी झाली ?

🎈१९२९ मध्ये.


💐 नर्मदा नदी कोठे जाऊन मिळते ?

🎈अरबी समुद्र.


💐 'काॅस्टिक सोडा' याचे शास्त्रीय नाव काय आहे ?

🎈सोडियम हायड्राक्साइड.