Friday 19 July 2019

चालु घडामोडी वन लाईनर्स , १४ जुलै २०१९ .

चालु घडामोडी वन लाईनर्स ,
१४ जुलै २०१९ .

● सिमोना हालेपने विम्बल्डन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले

● विम्बल्डन स्पर्धेचे विजेतेपद पटकावणारी सिमोना हालेप पहिली रोमानियन महिला ठरली आहे

● आज रॉजर फेडरर आणि नोव्हाक जोकोव्हिच विम्बल्डन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या विजेतेपदासाठी झुंजणार

● आज २०१९ आयसीसी विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना न्यझीलंड व इंग्लंड या संघा दरम्यान होणार आहे

● अमेरिकेतील फेडरल ट्रेड कमिशनने डेटा लिक प्रकरणी फेसबुकला ५ अब्ज डॉलर्सचा दंड ठोठावला

● क्लांदो स्मृती अॅथलेटिक्स स्पर्धा झेक प्रजासत्ताक येथे आयोजित करण्यात आली

● क्लांदो स्मृती अॅथलेटिक्स स्पर्धेत हिमा दासने २०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक पटकावले

● क्लांदो स्मृती अॅथलेटिक्स स्पर्धेत मोहम्मद अनसने ४०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक पटकावले

● राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुरुषांच्या १०९ किलो वजनी गटात प्रदीप सिंहने सुवर्णपदक पटकावले

● राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुरुषांच्या (कनिष्ठ) ९६ किलो वजनी गटात कल्याण सिंहने रौप्यपदक पटकावले

● राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुरुषांच्या (वरीष्ठ) ९६ किलो वजनी गटात विकास ठाकूरने रौप्यपदक पटकावले

● काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली

● इंटरकॉँटिनेंटल फुटबॉल चषक स्पर्धेत दक्षिण कोरीयाने भारताला ५-२ ने पराभूत केले

● पहिला आंतर-संसदीय क्रिकेट विश्वचषक इंग्लंडमध्ये आयोजित करण्यात आला होता

● पाकिस्तान संघाने पहिल्या आंतर-संसदीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले

● किरण मोरे यांची अमेरिका क्रिकेट संघाच्या अंतरिम प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली

● भारत - पाकिस्तान दरम्यान करतारपुर कॉरिडॉरवरील बैठक आज वाघा बाॅर्डरवर संपन्न झाली

● आयएसएफएफ ज्युनियर नेमबाजी वर्ल्ड कप स्पर्धा जर्मनीत आयोजित करण्यात आली

● आयएसएफएफ ज्युनियर नेमबाजी वर्ल्ड कप स्पर्धेत उधयवीर सिधुने २५ मीटर पिस्तुल प्रकारात सुवर्णपदक पटकावले

● आयएसएफएफ ज्युनियर नेमबाजी वर्ल्ड कप स्पर्धेत आदर्श सिंहने २५ मीटर पिस्तुल प्रकारात सुवर्णपदक पटकावले

● आयएसएफएफ ज्युनियर नेमबाजी वर्ल्ड कप स्पर्धेत अनिश भानवालाने २५ मीटर पिस्तुल प्रकारात सुवर्णपदक पटकावले

● यासार डोगु कुस्ती स्पर्धेत विनेश फोगाटने ५३ कीलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले

● आंतरराष्ट्रीय पोलिस प्रदर्शन १९-२० जुलै रोजी दिल्लीत आयोजित करण्यात येणार आहे

● इकॉनॉमिक टाइम्सने डॉ. एल तोमर यांना प्रेरणादायक डॉक्टर ऑफ इंडिया पुरस्काराने सन्मानित केले

● पाकिस्तानमध्ये बाबा गुरू नानक आंतरराष्ट्रीय विद्यापीठ उभारण्यात येणार आहे

● महिला व बाल विकास मंत्रालयाने महिलांच्या पुनर्वसनासाठी " स्वधार गृह " योजना सुरु केली

● चीनची स्पेस लॅब १९ जुलै रोजी वातावरणात पुन्हा प्रवेश करणार

● केंद्र सरकारने " स्वच्छ ग्राम दर्पन " मोबाइल अॅपचे अनावरण केले

● क्रिकेटपटू सोमेंद्रनाथ कुंडू यांचे नुकतेच निधन झाले , ते वर्षांचे होते

● कॉटिफ कप फुटबॉल स्पर्धा जुलै महिन्याच्या अखेरीस स्पेनमध्ये आयोजित करण्यात येणार

● गिटानस नौसेदा यांची लिथुआनियाचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली

● अमेरिकेचे कामगार सचिव अलेक्झांडर अकोस्टा यांनी राजीनामा दिला

● भारत - युके संयुक्त आर्थिक व्यापार समितीची बैठक लंडनमध्ये आयोजित करण्यात आली

● १२ जुलै रोजी पश्चिम बंगाल सरकारने " सेव वाॅटर " दिवस साजरा केला

● व्हिएतनामच्या होई अन शहराने २०१९ जगातील अव्वल शहरांच्या यादीत प्रथम क्रमांक पटकावला

● भारतातील उदयपुर शहराने २०१९ जगातील अव्वल शहरांच्या यादीत १० वा क्रमांक पटकावला

● केंद्रीय मंत्रिमंडळाने अनियमित ठेव योजनांवर बंदीसाठी विधेयक मंजूर केले

● २०२५ मध्ये भारत जपानला मागे टाकत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल : आयएचएस मार्किट

● जागतिक बँकेने बांगलादेशला पाणी पुरवठा व स्वच्छतेसाठी १०० मिलियन डॉलर्सचे कर्ज मंजूर केले

● जागतिक बँकेने अर्जेंटिनाच्या अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी ५०० मिलियन डॉलर्सचे कर्ज मंजूर केले

● मध्य प्रदेश सरकारने विद्युत अपवादांबद्दल तक्रारीसाठी " UPAY " अॅपचे अनावरण केले

● भारताचे परकीय चलन भांडवल २.२३२ बिलियन डॉलर्सने वाढून ४२९.९११ बिलियन डॉलर्सवर पोहचले

● कबड्डी टीम पटना पायरेट्सने नीतु चंद्रा यांची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली

● पाकिस्तानने त्यांच्या हवाई क्षेत्रात भारतीय विमानांसाठी घातलेली बंदी २६ जुलैपर्यंत वाढवली .

No comments:

Post a Comment

Latest post

महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना (1939-1947)

🟢 1939 📌 लिनलिथगो विधान (1939)   ✦ ब्रिटन फक्त युद्धात आक्रमकतेचा प्रतिकार करत आहे   ✦ 1935 च्या कायद्यात सर्वसहमतीनंतर बदल केले जातील   ✦...