Tuesday 1 March 2022

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) खालीलपैकी कोणती दोन नामे तिन्ही लिंगामध्ये आढळते.

   अ) हरीण      ब) पोर      क) नेत्र      ड) मूल
   1) अ आणि ब      2) क आणि ड   
   3) ब आणि ड      4) अ आणि क

उत्तर :- 3

2) पर्यायी उत्तरांत ‘चतुर्थी विभक्तीचे अपादन कारकार्थ’ असलेले वाक्य कोणते ?

   1) मी नदीच्या काठाने गेलो    2) तो घरातून बाहेर पडला
   3) तू रामाला पुस्तक दे      4) तो दिवसाचा चालतो

उत्तर :- 3

3) तू जबाबदारीने काम केले नाहीस – पुढील पर्यायातून होकारार्थी वाक्य निवडा.

   1) तू जबाबदारीने काम करतोस    2) तू बेजबाबदाराने काम केलेस
   3) तू जबाबदारी ओळखली नाहीस    4) तू जबाबदारीने काम करणारा आहेस

उत्तर :- 2

4) ‘माझ्या नणंदेच्या सासूने तिला उभ्या वर्षात एकदाही माहेरी पाठविली नाही’ या वाक्यातील विधेय ओळखा.

   1) नणंद      2) उभ्या वर्षात एकदाही माहेरी
   3) पाठविली नाही    4) सासूने

उत्तर :- 3

5) कर्मणीप्रयोगात कर्ता
........................... विभक्तीत असतो.

   1) तृतीया    2) प्रथमा     
   3) चतुर्थी    4) पंचमी  

उत्तर :- 1

6) ‘गडी गायरानात गुरे घेऊन गेला आहे.’ वरील अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारात येतो?

   1) सामासिक शब्द    2) अभ्यस्त शब्द   
   3) तत्सम शब्द      4) तद्भव शब्द

उत्तर :- 1

7) योग्य विरामचिन्हे दिलेले वाक्य ओळखा..

   1) सोड, मला ! तो जोराने ओरडला      2) ‘सोड मला’, तो जोराने ओरडला
   3) “सोड मला !” तो जोराने ओरडला    4) “सोड मला”, तो जोराने ओरडला

उत्तर :- 2

8) देशी शब्द शोधा.

   1) धडधड    2) धोंडा     
   3) धाक    4) धोरण

उत्तर :- 2

9) ‘अभिधा शक्तीचे’ उदाहरण असलेले वाक्य पर्यायी उत्तरांतील कोणते आहे ?

   1) काय गाढव आहे !        2) मला फार भूक लागली
   3) शेजारच्या गावी आम्ही नदीवरून जातो    4) ‘मुलांनो, आता दिवे लागणीची वेळ झाली.’

उत्तर :- 2

10) ‘अचूक’ या शब्दाला समानार्थी पर्यायी शब्द शोधा.
   1) अगम्य    2) नेमका     
   3) अचानक    4) नीट

उत्तर :- 2

No comments:

Post a Comment

Latest post

काकोरी कट घटना

( काकोरी ट्रेन लुट म्हणूनही ओळखली जाते) ही ब्रिटिश वसाहतवादी शासनाविरुद्धच्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्त्वपूर्ण घटना होती.  - दिना...