भूकवचातील पदार्थ : खडक.

🌸 खडकाची व्याख्या : भूपृष्ठावरील अतिशय कठीण अशा दगडापासून तर अतिशय मृदू अशा बारीक मातीपर्यंत सर्व पदार्थाचा समावेश ‘खडक’ या संज्ञेत होतो.

✍ खडकांचे वर्गीकरण : वेगवेगळ्या आधारभूत तत्त्वांचा वापर करून विविध प्रकारे खडकांचे वर्गीकरण केले जाते. उत्पत्तीनुसार झालेले खडकांचे वर्गीकरण सर्वमान्य आहे.

🌸 खडकांचे उत्पत्तीनुसार वर्गीकरण :

१. अग्निजन्य खडक २. जलजन्य किंवा स्तरीत किंवा गाळाचे खडक ३. रूपांतरित खडक.

१) अग्निजन्य खडक : पृथ्वीची निर्मिती झाली तेव्हा पृथ्वी वायूरूपात होती. त्यानंतर तिचे रूपांतर तप्त अशा द्रवरूपात झाले. कालांतराने पृथ्वीचे कवच थंड होऊन जे कठीण खडक तयार झाले, त्यांना ‘अग्निजन्य खडक’ असे म्हणतात. भूपृष्ठावरील हे खडक अतिशय प्राचीन व सर्वात प्रथम निर्माण झालेले असल्याने त्यांना प्राथमिक खडक असेही म्हणतात. अग्निजन्य खडकांच्या निर्मितीनंतर इतर खडकांची निर्मिती अग्निजन्य खडकांपासून झाली आहे.

✍ लाव्हारस थंड होण्याच्या स्थितीवरून अग्निजन्य खडकांचे प्रकार : पृथ्वीच्या पृष्ठभागावरील तप्त लाव्हारस थंड होऊन भूपृष्ठावरील अग्निजन्य खडक तयार झाले. अंतर्गत भागातही तप्त लाव्हारस थंड होऊन काही अग्निजन्य खडक तयार झाले. लाव्हारस ज्या ठिकाणी व ज्या स्थितीत थंड झाला त्यावरून त्याचे मुख्य दोन प्रकार पडतात- भूपृष्ठावरील अग्निजन्य खडक आणि भुपृष्ठांतर्गत अग्निजन्य खडक.

१) भूपृष्ठावरील अग्निजन्य खडक : भूगर्भातील तप्त लाव्हारस भूपृष्ठाला पडलेल्या भेगांमधून ज्वालामुखीच्या रूपाने पृष्ठभागावर येऊन पसरतो. कालांतराने थंड होऊन त्याचे कठीण अशा खडकांत रूपांतर होते, अशा खडकांना ‘बानिर्मित अग्निजन्य खडक’ किंवा ‘ज्वालामुखी खडक’ म्हणतात.

२) भूपृष्ठांतर्गत अग्निजन्य खडक : बऱ्याच वेळा भूपृष्ठांतर्गत भागातील तप्त लाव्हारस भूपृष्ठावर न येता अंतर्गत भागातच थंड होतो. त्यापासूनही कठीण अशा खडकांची निर्मिती होते. त्यांना ‘अंतर्गत अग्निजन्य खडक’ असे म्हणतात. त्यांची निर्मिती भूपृष्ठापासून बऱ्याच खोलवर होत असल्याने त्यांना ‘पातालिक खडक’ असेही म्हणतात. अंतर्गत भागात लाव्हारस सावकाश थंड होत असल्याने स्फटिकीभवनास जास्त काळ लागतो. म्हणून त्यातील स्फटिक मोठे असतात. भूपृष्ठाची झीज झाल्यावर हे खडक उघडे पडतात. ग्रॅनाइट खडक हे याचे उत्तम उदाहरण आहे. आंध्र प्रदेशात हैद्राबादजवळ, कर्नाटक राज्यात व अबू पर्वतावर हे खडक आढळतात.

🌸 अंतर्गत अग्निजन्य खडकांचे उपप्रकार : अंतर्गत भागात तप्त लाव्हारस वेगवेगळ्या पद्धतीने थंड होऊन अग्निजन्य खडक तयार होतात, त्यावरून त्यांचे अनेक उपप्रकार पडतात

🌸 बॅथोलिक : भूपृष्ठापासून जास्त खोलीवर लाव्हारस थंड होऊन अशा प्रकारचे खडक निर्माण होतात. त्यांचा आकार अवाढव्य व ओबडधोबड असतो. लाव्हारस पृष्ठभागावर न येता अंतर्गत भागातच थंड होत असल्याने हवेशी संबंध येत नाही. सावकाश थंड होत असल्याने त्यातील स्फटिक कण मोठे असतात.

🌸 लॅकोलिथ : भूपृष्ठाच्या खाली परंतु कमी खोलीवर लाव्हारस थंड होऊन खडक तयार झाले तर त्यांना लॅकोलिथ म्हणतात. इतर बाबतीत त्यांचे बॅथोलिक खडकांशी बरेच साधम्र्य असते. यांचा आकार साधारणत: घुमटाकार असून तळाला पसरट व वरील भाग खडबडीत असतो.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी

प्रश्न 1:- ₹6 लाख कोटी मार्केट कॅप ओलांडणारी 8वी कंपनी कोणती आहे? उत्तर :- भारती एअरटेल. प्रश्न 2:- सियाचीनमध्ये तैनात करण्यात आलेल्या भा...