होमरूल चळवळ

* होमरूल म्हणजे आपल्या देशाचा कारभार करण्याचा आपणास अधिकार प्राप्त करून घेणे. 

* इंग्लंडच्या जोडखातून मुक्त होऊन स्वराज्याचे अधिकार प्राप्त करून घेण्यासाठी होमरुलची चळवळ प्रथम "आयर्लंडमध्ये" सुरु झाली. 

* डॉ. अनी बेझंट या विदुषीने तिचा प्रथम विचार मांडला. 

* बेझंट ह्या जन्माने आयरिश होत्या, २५ सप्टेंबर १९१५ साली होमरूल लीग [ स्वराज्य संघ ] याची स्थापना करण्यात आली. 

* त्यांनी धार्मिक थिओसोफ़िकल सोसायटी हा संप्रदाय स्थापन केला. 

* २ जानेवारी 1916 रोजी मद्रास प्रांतात 'कॉमन विल' हे वृत्तपत्र स्थापन केले. 

* इंग्लंडचा दौरा करून डॉ अनी बेझंट हिंदुस्तानात परतल्यानंतर त्यांनी मद्रासेत 'न्यू इंडिया' नावाचे एक आणखी वृत्तपत्र काढून आपले विचार सुरु केले.

📚लो. टिळकांची होमरूल चळवळ

* हिंदुस्तानासाठी स्वराज्य मागणे व त्यासाठी चळवळ उभारणे, हि त्यावेळी जहाल विचारसरणीच होती. 

* बेझंट बाईच्या होमरूल चळवळीच्या अगोदरच त्यांनी १८ एप्रिल १९१६ रोजी त्यांना महाराष्ट्रात होमरूल चळवळ स्थापन केली होती. व जोसेफ बॉप्टिस्टा हे या लीग चे अध्यक्ष होते. 

* न. चि. केळकर हे तिचे सचिव होते.

📚होमरूल चळवळीचे परदेशातील कार्य

* हिंदुस्त्नातील चळवळीचे कार्य हे परदेशातही उमटले. 

* मद्रास हाय कोर्टाचे न्यायाधीश सर सुब्र्म्ह्न्यम अय्यर हे मद्रास प्रांतातील होमरूल लीगचे अध्यक्ष होते. 

* ईंग्लंड व अमेरिकेतही होमरूल या संघटनेचे वृत्त या देशातील वृत्तपत्रानीही घेण्यास सुरवात केली.

📚होमरूल चळवळीचे कार्याचे परीक्षण

* राष्ट्रसभेच्या धोरणात बदल 

* पाश्चात्य देशात हिंदी स्वराज्याबद्दल सहानुभूती 

* मॉन्टेग्यू साहेबाची  इतिहास प्रसिद्ध घोषणा ( ऑगस्ट घोषणा )

📚होमरूल चळवळीचे उदिष्टे

* ब्रिटीश साम्राज्याअंतर्गत स्वराज्य ताबडतोब प्राप्त करणे

* देशातील लोकमत जागृत करून ते संघटीत करणे

* इंग्रजांच्या जुलुमी धोरणाचा परिचय सामान्य जनतेला करून देणे

* स्वराज्य मिळून देण्यासाठी देशातील सर्व साधनसामुग्रीचा वापर करणे

* इंग्रज प्रशासनाकडून भरीव राजकीय सुधारणा प्राप्त करणे.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

 Q.1) इन्फोसिस पुरस्कार 2023 मध्ये भौतिकशास्त्र श्रेणीतील पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? ✅ प्रो. मुकुंद थट्टाई Q.2) पहिल्या ‘लाईफटाईम डिस्ट...