Thursday 29 August 2019

पाकिस्तानने केली 'गझनवी' क्षेपणास्त्राची चाचणी


📌 भारताने जम्मू आणि काश्मीरमधून कलम ३७० हटविल्यानंतर खवळलेल्या पाकिस्तानने बलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी करत भारताला इशारा देण्याचा प्रयत्न केला आहे.

📌 पाकिस्तानी लष्कराच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानातील कराचीजवळ सोनमियानी प्रक्षेपण चाचणी केंद्रावरून गझनवी क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली.

📌 काश्मीर मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावरून समर्थन न मिळाल्याने पाकिस्तानने यापूर्वीच बलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी करण्याची धमकी दिली होती. 

📌कराची हवाईमार्ग बंद करून दिले होते संकेत पाकिस्तानच्या नागरी उड्डयन प्राधिकरणाने बुधवारी कराची विमानतळावरील सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणांचे ३ मार्ग बंद केले होते.

📌पाकिस्तानच्या नागरी उड्डाण प्राधिकरणाने 'नोटीस टू एअरमेन' (NOTAM) जारी करत बंदरांनाही सतर्क राहण्याचा सल्ला दिला होता.

📌 यानंतरच पाकिस्तान क्षेपणास्त्राची चाचणी करू शकतो अशी शंका उपस्थित करण्यात येत होती. 

📌भारतीय विमानांसाठी पाकने बंद केले हवाई क्षेत्र भारतीय विमान वाहतुकीसाठी पाकिस्तानातील हवाई क्षेत्राच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यावर पाकिस्तान विचार करत असल्याचे पाक सरकारने जाहीर केले होते.

📌 वैमानिकांसाठीही दिले होते निर्देश भारतीय विमानांना हवाईबंदी घालताना पाकिस्तानने कराची ओलांडण्यासाठी वैमानिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा अशी पाकिस्तानने केली होती.

📌 चार दिवसांच्या ही बंदी १ सप्टेंबरपर्यंत असेल असे प्राधिकरणाने 'नोटीस टू एअरमेन'मध्ये म्हटले होते.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment

Latest post

महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना (1939-1947)

🟢 1939 📌 लिनलिथगो विधान (1939)   ✦ ब्रिटन फक्त युद्धात आक्रमकतेचा प्रतिकार करत आहे   ✦ 1935 च्या कायद्यात सर्वसहमतीनंतर बदल केले जातील   ✦...