Wednesday 28 August 2019

बालकल्याण निर्देशांकामध्ये  केरळ, तामिळनाडू आणि हिमाचल  प्रदेश  अव्वल

👉भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून ‘चाईल्ड वेल-बीइंग इंडेक्स’ म्हणजेच ‘बालकल्याण निर्देशांक’ जाहीर करण्यात आला आहे.

👉वर्ल्ड व्हिजन इंडिया आणि IFMR लीड या स्वयंसेवी संस्थांनी हा निर्देशांक तयार केला आहे.

👉हा निर्देशांक म्हणजे निरोगी वैयक्तिक विकास, सकारात्मक संबंध आणि संरक्षणात्मक वातावरण या तीन आयामी घटकांच्या माध्यमातून बालकांच्या सर्वांगीण विकासाचे मूल्यमापन करण्यासाठी तयार केलेले एक साधन आहे. 

🌹🌳🌴अहवालातल्या ठळक बाबी🌴🌳🌹

👉आरोग्य, पोषण आणि शिक्षण सुविधांमधल्या अपवादात्मक कामगिरीमुळे केरळ राज्याने अव्वल स्थान मिळवले आहे.

👉केरळच्या पाठोपाठ तामिळनाडू आणि हिमाचल प्रदेश या राज्यांना स्थान मिळाले आहेत.

👉कुपोषण आणि बालकांचा कमी जन्मदर यामुळे मेघालय, झारखंड आणि मध्यप्रदेश यादीत तळाशी आहेत.

👉केंद्रशासित प्रदेशांमध्ये, पुडुचेरीने सर्वाधिक गुण मिळवले आहेत आणि ते अव्वल ठरले. तर दादरा व नगर हवेली कमकुवत कामगिरी दर्शविणारे प्रदेश ठरले.

👉केरळमध्ये बालकांना दर्जेदार शिक्षण दिले जात आहे. तसेच कुपोषण, कमी जन्मदर अश्या मुद्द्यांवर प्रभावी कार्य केलेले आहे. त्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी व स्वच्छता सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

👉झारखंडमध्ये जन्मदर, पोषण आणि पाणी आणि स्वच्छता सुविधांची उपलब्धता अश्या घटकांवर लक्षणीय सुधारणा करण्याची गरज आहे. राज्यात अधिकाधिक बालकांमध्ये खुंटलेली वाढ आणि कमी वजन ह्या समस्या दिसून आल्या आहेत. तसेच राज्यात प्रसूतीगृहांची उपलब्धता कमी आहे. पाच वर्षांची होण्यापूर्वीच मृत्यू होणार्‍या बालकांची संख्या जास्त आहे. राज्यात शाळा सोडण्याचे प्रमाण अधिक आहे.

👉मध्यप्रदेशात जन्मदर, पोषण, बालकांच्या विरुद्ध गुन्हेगारी आणि किशोरवयीन गुन्हे अशा बाबींमध्ये निम्न कामगिरी दिसून आली आहे. राज्यात दरिद्री कुटुंबात राहणार्‍या बालकांची संख्या सर्वाधिक आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 18 एप्रिल 2024

🔖 प्रश्न.1) मा. दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान तर्फे दिला जाणारा दीनानाथ मंगेशकर पुरस्कार संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल कोणाला जाहीर झा...