Monday 16 September 2019

भारताच्या सहकार्याचे अमेरिकेकडून कौतुक

🔰वॉशिंग्टन : इराणकडून तेल खरेदी न करण्याच्या मुद्दय़ावर भारताकडून मिळत असलेल्या सहकार्याबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने भारताचे कौतुक केले आहे. भारत हा अमेरिकेचा चांगला मित्र असून त्यांच्याकडून मिळणाऱ्या सहकार्याबद्दल आम्ही समाधानी आहोत, असे व्हाइट हाऊसने स्पष्ट केले आहे.

🔰इराण आणि भारताचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध आहेत, मात्र अमेरिकेला सहकार्य करण्यासाठी भारताने इराणकडून तेल आयात मोठय़ा प्रमाणात कमी केली आहे. इराणवर आर्थिक निर्बंध लादून अमेरिकेने अन्य सहकारी देशांना इराणकडून तेलाची आयात बंद करण्यास सांगितले होते. सुरुवातीला अमेरिकेने भारतासह अन्य देशांना इराणकडून तेल खरेदीची सवलत दिली होती. मात्र सहा महिन्यांनंतर ही सवलत बंद करण्यात आली होती.

🔰इराणच्या आण्विक कारवायांना आळा घालण्यासाठी अमेरिकेने २०१५च्या आण्विक करारातून माघार घेतली. त्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव कमालीचा वाढला आहे.  इराणच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसेल, असे निर्बंध अमेरिकेने लादले आहेत. त्यामुळे उभय देशांत मोठा तणाव निर्माण झाला आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

काकोरी कट घटना

( काकोरी ट्रेन लुट म्हणूनही ओळखली जाते) ही ब्रिटिश वसाहतवादी शासनाविरुद्धच्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्त्वपूर्ण घटना होती.  - दिना...