१७ सप्टेंबर २०१९

आता प्लॅटफॉर्म तिकिटावरही करता येणार प्रवास

🔰अनेकदा तिकिटांसाठी लागलेल्या लांब रांगा आपली डोकेदुखी ठरत असतात. परंतु आता रेल्वेने घेतलेला मोठा निर्णय हा प्रवाशांसाठी थोडासा दिलासादायक ठरण्याची शक्यता आहे. रेल्वेच्या नव्या नियमांनुसार आपात्कालिन परिस्थितीत आता प्रवासी प्लॅटफॉर्म तिकिटावरही रेल्वेतून प्रवास करू शकणार आहेत. परंतु यासाठी रेल्वेने एक अट घातली आहे.

🔰प्लॅटफॉर्म तिकिटावरून प्रवास करण्याची मुभा रेल्वे दिली असून यासाठी संबंधित प्रवाशाला गार्ड किंवा टिसीचे परवानगी पत्र घ्यावे लागणार आहे. जर यासाठीही सदर प्रवाशाकडे वेळ नसल्यास ट्रेनमध्ये जाऊन नियमित प्रक्रिया पूर्ण करत प्रवास करू शकता. रेल्वेच्या नियमानुसार हे परवानगी पत्र रेल्वेचे गार्ड, टिसी किंवा अन्य अधिकाऱ्यांकडून घेता येऊ शकते.

🔰तर ट्रेनमध्ये चढल्यानंतर प्रवाशाला याबाबत टिसीला माहिती द्यावी लागेल. त्यानंतर सदर प्रवाशाच्या इच्छित स्थळाचे त्यांच्याकडून तिकिट बनवून घेता येईल. परंतु यासाठी केवळ 250 रूपये दंडाच्या स्वरूपात द्यावे लागणार आहेत. तसेच ज्या श्रेणीतून प्रवास करायचा असेल, त्याच श्रेणीचे शुल्क भरावे लागेल. प्रवाशी ज्या रेल्वे स्थानकावर ट्रेनमध्ये चढला ते बोर्डिंग स्टेशन मानले जाणार आहे. परंतु याद्वारे प्रवसाची मुभा मिळणार असली तरी तिकिटाचे आरक्षण मात्र देण्यात येणार आहे.

🔰तसेच दरम्यान, सध्या प्लॅटफॉर्म तिकिटाची किंमत केवळ 10 रूपये आहे. कोणतीही व्यक्ती जाणूबुजून अथवा फसवण्याच्या बहाण्याने या तिकिटावर प्रवास करत असेल, तर त्याला तुरूंगवारीही होऊ शकते. तसेच यासाठी 1 हजार 260 रूपयांचा दंड किंवा तुरूंगवारी आणि दंड दोन्ही होऊ शकतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

१० चालू घडामोडी २६ एप्रिल २०२५

१. भारत सरकारने अलीकडेच किती नवीन आयुष आरोग्य आणि कल्याण केंद्रांना मान्यता दिली आहे? अ. ३००० बी.५००० सी.७००० डी.१०,००० उत्तर: डी. १०,००० स्...