Tuesday 17 September 2019

पाकचा अंतराळवीर २०२२पर्यंत अवकाशात

◾️ 'चीनच्या मदतीने पाकिस्तान २०२२पर्यंत पहिला अंतराळवीर अवकाशात पाठविणार आहे,' अशी माहिती विज्ञान आणि तंत्रज्ञानमंत्री चौधरी फावद हुसेन यांनी दिली.

◾️'अंतराळवीराची निवडप्रक्रिया २०२०मध्ये सुरू होईल. सुरुवातीला ५० जणांची निवड केली जाईल.

◾️ २०२२पर्यंत त्यातील सर्वोत्कृष्ट २५ जणांची निवड होईल.

◾️अंतिमत: त्यातील एक जण प्रत्यक्षात अंतराळात जाईल. अंतराळवीराची निवड करण्यामध्ये पाकिस्तानचे हवाई दल महत्त्वाची भूमिका बजावेल,' असे फावद यांनी सांगितले.

◾️ते म्हणाले, 'या क्षेत्रात भारताबरोबर सहकार्य महत्त्वाचे ठरेल.

◾️ सोव्हिएत संघराज्याने १९६३मध्ये पहिल्यांदा अवकाशात रॉकेट सोडल्यानंतर आशियामध्ये तसे करणारा पाकिस्तान हा दुसरा देश होता.

◾️ गेल्या वर्षी चीनच्या लाँच पॅडवरून पाकिस्तानने दोन देशी बनावटीचे उपग्रह अवकाशात सोडले आहेत.'

No comments:

Post a Comment

Latest post

काकोरी कट घटना

( काकोरी ट्रेन लुट म्हणूनही ओळखली जाते) ही ब्रिटिश वसाहतवादी शासनाविरुद्धच्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्त्वपूर्ण घटना होती.  - दिना...