Tuesday 1 October 2019

10 महिन्याच्या बाळाच्या आईने मोडला उसेन बोल्टचा विक्रम


✍अमेरिकेच्या एलिसन फेलिक्स हिने जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत उसेन बोल्टला मागे टाकत नवा इतिहास रचला.

✍फेलिक्सने दोहा येथे सुरू असलेल्या स्पर्धेत 4 गुणिले 400 मीटर मिश्र रिले प्रकारात आपल्या संघाला सुवर्णपदक जिंकवून दिले आणि स्टार धावपटू उसेन बोल्टचा विक्रम मोडीत काढला.

✍तर महत्वाची बाब म्हणजे केवळ 10 महिन्यांचे बाळ असलेल्या मातेने हा दमदार पराक्रम करून दाखवला आहे.

✍तसेच 10 महिन्यांपूर्वी फेलिक्सने एका गोंडस बाळाला जन्म दिला. सहा वेळा ऑलिम्पिक विजेत्या फेलिक्सने गेल्या वर्षी मुलाला जन्म दिला आणि त्यानंतर प्रथमच मैदानावर उतरली. त्यामुळे तिचा हा विक्रम अधिकच खास मानला जातो आहे.

✍फेलिक्सने 4 गुणिले 400 मिश्र रिले स्पर्धेत सुवर्णपदकावर नाव कोरले. त्याचसोबत तिचे जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत हे 12 वे सुवर्णपदक  ठरले.

✍एखाद्या जागतिक स्पर्धेत एवढी सुवर्णपदके जिंकणारी फेलिक्स पहिलीचं धावपटू खेळाडू ठरली.

✍यापूर्वी हा विक्रम उसेन बोल्ट याच्या नावावर होता. त्याच्या नावावर आतापर्यंत 11 सुवर्णपदके आहेत. तो 2017 मध्ये अखेरचा स्पर्धेत उतरला होता. पण त्याचा हा विक्रम फेलिक्सने मोडला.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 08 मे 2024

◆ ‘जागतिक रेडक्रॉस दिन’ दरवर्षी 8 मे रोजी साजरा केला जातो. ◆ व्लादिमीर पुतिन हे पाचव्यांदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. ◆ ‘बॉर्डर रो...