Tuesday 1 October 2019

चीनकडून काश्मीर प्रश्न संयुक्त राष्ट्रांमध्ये उपस्थित

✍चीनने संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत काश्मीरचा प्रश्न उपस्थित करून हा तंटा संयुक्त राष्ट्र संहिता व सुरक्षा मंडळ ठराव तसेच द्विपक्षीय करारांच्या  मदतीने शांततामय मार्गाने सोडवावा, असा सल्ला दिला आहे.

✍पाकिस्तानचा सर्वकालीन मित्र असलेल्या चीनने संयुक्त राष्ट्रात काश्मीरचा प्रश्न उपस्थित करताना भारताने जम्मू काश्मीरच्या स्थितीत एकतर्फी बदल करू नयेत, असेही म्हटले आहे.

✍चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी यांनी सांगितले,की काश्मीर प्रश्न हा भूतकाळातील काही घटनांमुळे मागे राहिलेला तंटा आहे. हा प्रश्न संयुक्त राष्ट्र संहिता, द्विपक्षीय करार व सुरक्षा मंडळाच्या ठरावांच्या आधारे सोडवावा.

✍जम्मू काश्मीरची स्थिती  बदलणारे कुठलेही निर्णय एकतर्फी घेण्यात येऊ नयेत. भारत व पाकिस्तान यांचा शेजारी देश म्हणून हा प्रश्न प्रभावी मार्गाने हाताळून दोन्ही देशातील संबंध सुरळित व्हावेत अशीच चीनची इच्छा आहे.

✍भारताने पाच ऑगस्ट रोजी जम्मू काश्मीरसाठीचा अनुच्छेद ३७० रद्द करून  विशेष दर्जा रद्द केला होता.

No comments:

Post a Comment

Latest post

भारतीय कर संरचना (Indian Tax Structure)

व्याख्या :- "जनतेच्या कल्याणासाठी शासनाला करावा लागणारा खर्च भागविण्याच्या हेतूने शासनाने लोकांकडून सक्तीने घेतलेली रक्कम म्हणजे कर होय...