३१ ऑक्टोबर २०१९

‘पोलादी पुरुष’ सरदार वल्लभभाई पटेल

भारताचे लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांची आज 144 वी जयंती.

देशभरात त्यांच्या जयंतीचे औचित्य साधत खास कार्यक्रमाचं आयोयन करण्यात आले आहे. यंदा देखील त्यांचा जन्मदिन राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. त्यांच्या जीवनातील काही खास गोष्टी...

● पटेलांचे व्यक्तिमत्त्व वैशिष्ट्यपूर्ण असेच होते. चाणक्याची मुत्सद्दी नीती त्यांच्याजवळ होती. आपल्या कामावर त्यांची प्रचंड निष्ठा होती. त्यांच्याकडे उत्तम संघटनकौशल्य होते. ते खंबीर प्रशासक होते.

● स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री आणि पहिले उपपंतप्रधान म्हणून देखील जगाला त्यांची ओळख आहे.

● पटेल यांना देशाच्या स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात ‘पोलादी पुरुष’ म्हणून आदराने गौरविले गेले आहे.

● एक निष्णात वकील म्हणून त्यांचा अल्पावधीतच लौकिक झाला. याचबरोबरच त्यांनी अहमदाबाद पालिकेची निवडणूक लढवत राजकारण प्रवेश केला.

● महात्मा गांधी यांनी हजारो शेतकऱ्यांसह सत्याग्रहाची चळवळ सुरू करत याचे नेतृत्व त्यांनी सरदार पटेल यांच्याकडे सोपविले. यातूनच सरदार पटेल यांचे नेतृत्व भारतीय स्वातंत्र्य चळवळीत उदयास आले.

● तत्कालीन सरकारमध्ये ते गृहमंत्री होते. गृहमंत्री या नात्याने त्यांनी भारत–पाक फाळणीच्या चर्चेमध्ये निर्णायक भूमिका बजावली होती.

● भारत देशाला एकसंध ठेवण्यात मोलाची कामगिरी करणार्‍या या गुजरातच्या सुपुत्राला भारतीय स्त्रियांनी 'सरदार' अशी उपाधी बहाल केली आहे.

● 31 ऑक्टोंबर 1875 रोजी जन्मलेल्या पटेलांनी भारतमातेच्या कल्याणासाठीच आयुष्य खर्ची केली. 15 डिसेंबर 1950 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

प्रमुख नद्या आणि त्यांच्या उपनद्या

══════════════════════ ❀【गंगा】 1. गोमती 2. घाघरा 3. गंगा 4. कोसी 5. यमुना 6. पुत्र 7. रामगंगा ❀【यमुना】 1. चंबळ 2. सिंध 3. बेटवा 4. केन 5. टन...