Friday 11 October 2019

सागरी माहिती सामायिक करण्यास भारताचे IFC-IOR केंद्र कार्यरत

भारतीय नौदलाच्या ‘इन्फॉर्मेशन फ्यूजन सेंटर – इंडियन ओशन रीजन (IFC-IOR)’ या विभागाने हिंद महासागरातून होणार्‍या सागरी क्रियाकलापांविषयीची माहिती सामायिक करण्यास सुरुवात केली आहे.

‘गोवा मेरीटाईम कॉन्क्लेव्ह 2019’ या परिषदेच्या समारोपीय कार्यक्रमात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी IOR क्षेत्रातल्या देशांना या सुविधेचा उपयोग करून घेण्याविषयी प्रस्ताव मांडला.

डिसेंबर 2018 मध्ये गुरुग्राम (गुडगाव) येथे भारतीय नौदलाच्या ‘इन्फॉर्मेशन फ्यूजन सेंटर – इंडियन ओशन रीजन (IFC-IOR)’ या विभागाचे उद्घाटन करण्यात आले होते.

भागीदार देश आणि बहुराष्ट्रीय संस्थांच्या सहयोगाने सागरासंबंधी जागृती वाढविण्यास आणि विशेषकरून व्यवसायिक मालवाहू जहाजांसंबंधी माहिती सामायिक करण्याच्या उद्देशाने हे केंद्र उघडण्यात आले. हे केंद्र आपत्ती निवारणासाठी देखील कार्य करीत आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

Important points

❇️ सध्या बदललेली नावे लक्षात ठेवा ◾️औरंगाबाद जिल्हा -  छत्रपती संभाजीनगर जिल्हा ◾️उस्मानाबाद जिल्हा -धाराशिव जिल्हा ◾️अहमदनगर जिल्हा - अह...