Thursday 28 November 2019

केंद्र सरकारी खात्यांमध्ये ६.८३ लाख जागा रिक्त

🅾केंद्र सरकारच्या विविध खात्यांमध्ये ६.८३ लाख जागा रिक्त आहेत असे लोकसभेत केंद्र सरकारच्या वतीने बुधवारी सांगण्यात आले. केंद्र सरकारमध्ये १ मार्च २०१८ अखेर ३८ लाख ०२ हजार ७७९ जागा होत्या त्यातील ३१लाख १८ हजार ९५६ भरण्यात आल्या आहेत. उर्वरित जागा रिक्त आहेत.

🅾कार्मिक खात्याचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. खात्यांकडून मागणी आल्यानंतर काही नवीन पदे निर्माणही होतात. जर पद दोन किंवा तीन वर्षे भरले गेले नाही तर ते रद्द होते. अशी पदे कार्यात्मक समर्थनानुसार पुन्हा पुनरुज्जीवित करता येतात. रेल्वे खात्यात मात्र पदे आपोआप रद्द होण्याची कुठलीही व्यवस्था नाही.

🅾कर्मचारी निवड आयोगाने २०१९-२० मध्ये १ लाख ०५ हजार ३३८ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. रेल्वे खात्याने २०१७-१८ मध्ये आगामी दोन वर्षांचा विचार करून एक लाख २७ हजार ५७३ पदांची रोजगार अधिसूचना जारी केली होती ती क व वर्ग १ पदे होती.  २०१८-१९ मध्ये याच प्रवर्गातील १ लाख ५६ हजार १३८ पदांसाठी अधिसूचना जारी करण्यात आली होती. टपाल खात्याने १९५२२ पदांसाठी परीक्षा घेतली आहे. कर्मचारी निवड आयोगाच्या माध्यमातून एकूण ४ लाख ०८ हजार ५९१ पदे भरण्याची प्रक्रिया सुरू आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 18 एप्रिल 2024

🔖 प्रश्न.1) मा. दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान तर्फे दिला जाणारा दीनानाथ मंगेशकर पुरस्कार संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल कोणाला जाहीर झा...