Monday 9 December 2019

जगातील सर्वात तरुण पंतप्रधान

☘️ फिनलंडच्या पंतप्रधानपदी साना मरिन (वय 34) यांची निवड झाली आहे. त्या देशाच्या इतिहासातील व जगातीलही सर्वांत कमी वयाच्या पंतप्रधान ठरल्या आहेत.

🍀 फिनलंडच्या सत्ताधारी सोशल डेमॉक्रॅटिक पक्षाने मरिन यांची पंतप्रधानपदी निवड झाल्याची घोषणा केली. या आधी त्या परिवहनमंत्री होत्या. 

🍀 मरिन या फिनलंडच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान आहेत.

🍀 माजी पंतप्रधान ऍन्टी रिने यांनी 3 डिसेंबर रोजी पदाचा राजीनामा दिल्यानंतर काल नव्या पंतप्रधानांची निवड झाली.

🍀 "सेंटर पार्टी' पक्षाचे नेते इस्को अहओ हे 1991 फिनलंडच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले होते.

🍀 त्या वेळी ते 36 वर्षांचे होते.

🍀 मरिन या त्यांच्यापेक्षा दोन वर्षांनी लहान आहेत.

🍀 जगातील सर्वांत कमी युक्रेनचे 35 वर्षांचे पंतप्रधान ओलेस्की हॉंचारुक हे जगातील सर्वांत कमी वयाचे पंतप्रधान आहेत. त्यांनी 21 ऑगस्ट 2019 रोजी देशाचे नेतृत्व स्वीकारले होते.

No comments:

Post a Comment

Latest post

हिमालयातील 8000 मी.उंचीपेक्षा जास्त उंची असणारी शिखरे..

-----------------======---------------------- शिखर               उंची(मी)             स्थान ---------------------------------------------...