Friday 27 December 2019

कोपरगावच्या दोन तरूणींची न्यायाधीशपदी निवड..

◾️कोपरगाव : येथील सामाजिक माहिती अधिकार कार्यकर्ते संजय भास्करराव काळे यांची कन्या अश्विनी ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या दिवाणी न्यायाधीश परीक्षेत राज्यात नवव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली असून त्याबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. 

◾️संवत्सर गावची ही कन्या आता मुंबई येथे प्रशिक्षण घेतल्यानंतर जिल्हा स्तरावर न्यायाधीश होणार आहे. कोपरगावची प्रियंका काजळे ही देखील दिवाणी न्यायाधीश परीक्षेत उत्तीर्ण झाली आहे.

◾️राज्यात दिवाणी न्यायाधीश परीक्षेत १९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत त्यात अश्विनी काळे ही ९ व्याय स्थानावर राहिली आहे. तिने यापूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एलएलएम  परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवला होता.

◾️तिचे प्राथमिक शिक्षण जंगली महाराज आश्रम, अकरावी बारावी सद्गुरू गंगागिरी महाराज महाविद्यालय कोपरगाव तर कायदेविषयक शिक्षण मराठवाडा मित्र मंडळ शिवाजी शिक्षण महाविद्यालय, पुणे येथे झाले.   तिला प्राध्यापक गणेश शिरसाठ , अक्षय  ईनामके, वडील संजय काळे, आई माधुरी काळे,  भाऊ  अजिंक्य काळे यांचे मार्गदर्शन लाभले.

◾️कान्हेगावची कन्या प्रियंका मच्छिंद्र काजळे दिवाणी न्यायाधीश (क.स्तर) प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होऊन कान्हेगाव बरोबर कोपरगाव वकील संघाचे नाव राज्यातउज्ज्वल  केले.

◾️ मच्छिंद्र जयराम काजळे व सुशीला काजळे या शेतकरी दामपत्यांची ही लेक असून कायद्याच्या परीक्षेत वयाच्या २८ व्या वर्षी प्रथम प्रयत्नात यशस्वी ठरली आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

वाचा :- इतिहास प्रसिद्ध वक्तव्ये

◾️” वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी ” – भारतमंत्री मोर्ले ◾️‘सूक्ष्म अल्पसंख्यांक वर्ग’ असे कॉंग्रेसचे वर्णन – लॉर्ड डफरीन ◾️...