Thursday 12 December 2019

RISAT-2BR1 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

- भारतीय अवकाश संशोधन संस्था (ISRO) श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश तळावरुन अर्थ इमेजिंग सॅटलाइट रिसॅट-२ बीआर १ चे प्रक्षेपण केले.
- पीएसएलव्ही रॉकेटद्वारे हे प्रक्षेपण करण्यात आले. पीएसएलव्ही हा भारताचा अत्यंत भरवशाचा उपग्रह प्रक्षेपक आहे. पीएसएलव्हीची ही ५० वी मोहीम होती.

● RISAT-2BR1

- रडार इमेजिंग अर्थ ऑब्जर्व्हेशन सॅटेलाइट आहे.
- या उपग्रहाचे वजन ६२८ किलो आहे.
- RISAT-2B मालिकेतील हा दुसरा उपग्रह आहे.
- RISAT-2 ची जागा घेण्यासाठी या वर्षाच्या सुरुवातीला पहिल्या RISAT-2B उपग्रहाचे प्रक्षेपण झाले होते.
- रिसॅट उपग्रहांची मालिका असून प्रामुख्याने हेरगिरीसाठी या उपग्रहांचा उपयोग करण्यात येणार आहे.
- या उपग्रहामुळे  सीमावर्ती भागातील सुरक्षा अधिक बळकट होईल. शत्रुच्या हालचाली या उपग्रहाच्या नजरेतून सुटण्याची शक्यता अत्यंत धुसर आहे.
- सीमेवरील चीन आणि पाकिस्तानच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवता येईल.

- RISAT-2BR1 या उपग्रहासोबत इस्रोने अन्य देशांच्या आणखी नऊ उपग्रहांचे प्रक्षेपण केले. यातले सहा उपग्रह अमेरिकेचे तर, इस्रायल, इटली आणि जापानचा प्रत्येकी एक उपग्रह आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

....𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫 ....

◾️2024 विस्डेन क्रिकेटर्स ऑफ द इयर रिपोर्ट प्रकाशित ◾️रिपोर्ट नुसार जगातील सर्वाधिक आघाडीचे क्रिकेटपटू ⭐️पुरुष : पॅट कमिन्स (Australia) ...