Wednesday 1 January 2020

आधार आणि पॅन लिंक करण्यास 31 मार्च 2020 पर्यंत मुदतवाढ

🎆 ज्यांनी अद्याप आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे लिंक केलं नसेल तर त्या सगळ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण केंद्र सरकारने आधार आणि पॅन लिंक करण्याची मुदत 31 मार्च 2020 पर्यंत वाढवली आहे.

🎆 तर सध्याची मुदत 31 डिसेंबर 2019 म्हणजेच उद्या संपणार होती. मात्र आधार-पॅन लिंक करण्याची मुदत मार्च 2020 पर्यंत वाढवली आहे.

🎆 आत्तापर्यंत मुदतवाढ देण्याची ही आठवी वेळ आहे.

🎆 सर्वोच्च न्यायालयाने मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात एक निर्णय दिला होता. ज्यानुसार आधार कार्ड आयकर परतावा भरण्यासाठी आणि पॅन कार्ड हवं असल्यास बंधनकारक आहे.

🎆 1 जुलै 2017 पासून पॅन कार्ड असणाऱ्या प्रत्येक नागरिकाला आधार कार्ड मिळण्याचा अधिकार आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

भारतातील महत्वाचे जलविद्युत प्रकल्प

🔶मचकुंदी प्रकल्प  मुचकुंदी नदीवरील आंध्रप्रदेश व ओरिसा या राज्यांचा संयुक्त प्रकल्प. जलपुत येथे मुचकुंदी नदीवर धारण. मुख्य उद्देश वीजनिर्मि...