Wednesday 1 January 2020

स्टिंग ऑपरेशन राबविणारे "नाशिक आयुक्तालय' एकमेव

🔰हैदराबादच्या घटनेमुळे महिला सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर आला. त्यातूनच शहरात महिलांच्या निर्भया पथकामार्फत "डिकॉय' ऑपरेशन सुरू केले.

🔰असे डिकॉय ऑपरेशन राबविणारे नाशिक पोलिस आयुक्तालय राज्यातीलच नव्हे तर देशातील एकमेव पोलिस आयुक्तालय आहे.

🔰 "जिची छेड काढावी, तीच महिला पोलिस' असली तर असा संदेशच वासनांधापर्यंत पोचणे हाच या "डिकॉय' ऑपरेशनचा मुख्य उद्देश आहे. जे यात सापडले त्यांच्यावर पथकाने विनयभंगाचे गुन्हेच दाखल केले आहेत. 

🔰लैंगिक विकृतीला ठेचून काढण्यासाठीच पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांच्या संकल्पनेतून "डिकॉय ऑपरेशन' (स्टिंग ऑपरेशन) साकारले आहे. 

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 07 मे 2024

◆ दरवर्षी 7 मे रोजी जागतिक ॲथलेटिक्स दिन जगभरात साजरा केला जातो. ◆ भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स नासाच्या स्टारलाइनर मोहिमेअंत...