Wednesday 1 January 2020

शाश्वत विकास उद्दिष्ट निर्देशांकात पुन्हा केरळ अव्वल

🎆 निती आयोगाच्या शाश्वत विकास उद्दिष्ट निर्देशांकात 2019 मध्ये पुन्हा केरळच पहिल्या क्रमांकावर आले असून या शाश्वत विकास उद्दिष्ट पूर्ती योजनेत राज्ये व केंद्रशासित प्रदेशांची सामाजिक, आर्थिक, पर्यावरण क्षेत्रातील कामगिरी तपासली जात असते.

🎆 तर एसडीजी इंडिया निर्देशांक 2019 अहवाल जाहीर करण्यात आला असून त्यात उत्तर प्रदेश, ओदिशा, सिक्कीम या राज्यांनी बरीच प्रगती केल्याचे दिसून आले.

🎆 तसेच गुजरातमध्ये 2018 च्या क्रमवारी तुलनेत काही प्रगती झाली नाही.

🎆 केरळने पहिला क्रमांक कायम राखला असून 70 गुण प्राप्त केले. चंडीगड केंद्रशासित प्रदेशात प्रथम क्रमांकावर असून त्याला 70 गुण मिळाले.

🎆 हिमाचल प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर असून आंध्र, तामिळनाडू, तेलंगणा यांनी संयुक्तपणे तिसरा क्रमांक पटकावला.

🎆 बिहार, झारखंड, अरुणाचल प्रदेश यांची कामगिरी खराब झाली आहे.

🎆 निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी हा अहवाल जारी करताना सांगितले की, संयुक्त राष्ट्रांची शाश्वत विकास उद्दिष्टे 2030 पर्यंत साध्य करताना त्यात भारताची मोठी भूमिका असणार आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 07 मे 2024

◆ दरवर्षी 7 मे रोजी जागतिक ॲथलेटिक्स दिन जगभरात साजरा केला जातो. ◆ भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स नासाच्या स्टारलाइनर मोहिमेअंत...