Wednesday 1 January 2020

नवी दिल्लीमध्ये उभी राहणार नवी संसद

🎆 भारतीय संसदेची नवीन इमारत अनेक अर्थांने खास असणार आहे.

🎆 नवीन इमारतीचा आकार त्रिकोणी असणार आहे.

🎆 या इमारतीला तीन मोठे मिनार असणार आहेत. इतकचं नाही नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार या इमारतीच्या तळाशी सर्व मंत्रालयाच्या कार्यालयांना जोडणारी शटल सेवाही असणार आहे.

🎆 याशिवाय पंतप्रधानांसाठी नवीन निवासस्थान बंधण्याचीही तयार करण्यात येत आहे.

🎆 पंतप्रधानांच्या नव्या निवासस्थान दिल्लीतील महत्वाच्या परिसरात म्हणजेच सेंट्रल व्हिस्टा मध्ये असणार असून हे घर बांधण्याचे कंत्राट एका गुजराती कंपनीला मिळाले आहे.

🎆 नव्या योजनेनुसार राष्ट्रपती भवनानंतर पंतप्रधानांचे निवासस्थान असेल.

🎆 त्यानंतर उप-राष्ट्रपतींचे निवासस्थान असेल.

🎆 नवीन संसद भवन हे अत्याधुनिक असेल अशीही माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

🎆 नवीन संसदेच्या इमारतीमध्ये तीन मीनार असतील. हे तीन मिनार लोकशाहीच्या तीन स्तंभांचे प्रतिक असतील.

🎆 नवीन संसद भवनाची रचना भारताची विविधता दाखवणारी असेल.

🎆 संसद भवनाच्या खिडक्या या भारतामधील विविधता दाखवतील असं या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

🎆 संसदेचे ७५ वे अधिवेशन नवीन इमारतीमध्ये आयोजित करण्याच्या दृष्टीने या प्रकल्पाचे काम करण्यात येणार आहे.

🎆 नवीन संसदेची इमारत ही सध्याच्या संसदेच्या जवळच असेल. यामध्ये ९०० ते एक हजार लोकप्रतिनिधींची आसनक्षमता असणारी लोकसभा, राज्यसभा आणि सेंट्रल हॉलप्रमाणे संयुक्त सभागृह असेल.

🎆 या इमारतीमध्ये सर्व खासदारांची कार्यालयेही असतील.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 07 मे 2024

◆ दरवर्षी 7 मे रोजी जागतिक ॲथलेटिक्स दिन जगभरात साजरा केला जातो. ◆ भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स नासाच्या स्टारलाइनर मोहिमेअंत...