Sunday 16 February 2020

विकसनशील देशांच्या यादीतून ट्रम्प यांनी काढलं भारताला बाहेर.

🎯अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प येत्या 24 फेब्रुवारीला भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. मात्र या दौऱ्याआधी यूएस प्रशासनाने भारताला मोठा झटका दिला आहे. त्यामुळे भारताच्या निर्यातीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

🎯अमेरिका-भारत यांच्यातील व्यापाराच्या दृष्टीकोनातून ही बाब महत्वपूर्ण मानली जात आहे.तर अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधींनी विकसनशील देशांच्या यादीतून भारताला बाहेर काढलं आहे.

🎯त्यामुळे भारताच्या निर्यात करावर अमेरिका सूट देणार नाही. या यादीत असणाऱ्यांना देशांना निर्यात करात सूट दिली जाते, या देशामुळे अमेरिकेच्या उद्योगांवर कोणता परिणाम होत नाही असं मानलं जातं. या यादीत ब्राझील, इंडोनेशिया, हॉंगकॉंग, दक्षिण अफ्रिका अशा देशांचा समावेश आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

Important Lakes in India

🔹डल झील :- जम्मू-कश्मीर 🔹वुलर झील :- जम्मू-कश्मीर 🔹बैरीनाग झील :- जम्मू-कश्मीर 🔹मानस बल झील :- जम्मू-कश्मीर 🔹नागिन झील :- जम्मू-कश...