Wednesday 8 April 2020

राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा - प्रशांत मोरे, संदीप दिवे अंतिम फेरीत.

🌸छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलात सुरू असलेल्या वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत प्रशांत मोरे आणि संदीप दिवे यांनी अंतिम फेरी गाठली. महिलांमधून माजी विश्वविजेत्या रश्मी कुमारी आणि एस. अपूर्वा यांनी उपांत्य फेरीत विजय नोंदवले.

🌸उपांत्य लढतीत विश्वविजेत्या प्रशांत मोरेने (रिझव्‍‌र्ह बँक) महाराष्ट्राच्या निसार अहमदला २५-०, २५-१६ असे नमवत वर्चस्व दाखवून दिले. अन्य उपांत्य लढतीत एअर इंडियाच्या संदीप दिवेने चुरशीच्या लढतीत महाराष्ट्राच्या अभिजित त्रिपानकरचा २५-०४, २३-२० असा पराभव केला.

🌸महिलांमधून पेट्रोलियम क्रीडा मंडळाच्या रश्मी कुमारीने तिच्याच संघाच्या नाग ज्योतीला चुरशीच्या सामन्यात ०१-२५, २०-१७, २४-१२ असे हरवून अंतिम फेरी गाठली. आंतरराष्ट्रीय फेडरेशन चषक विजेत्या एलआयसीच्या एस. अपूर्वाने बिहारच्या खुशबू राणीचा सरळ दोन सेट्समध्ये १८-८, २३-१६ असा पराभव केला.

No comments:

Post a Comment

Latest post

WORLD AIR QUALITY REPORT 2023

🔶जागतिक हवा गुणवत्ता अहवाल २०२३ • अहवाल जाहीर करणारी संस्था : IQAIR स्वित्झर्लंड (स्थापना 1963) • एकूण देश : 134 ☑️या अहवालानुसार 👇👇 ...