Wednesday 8 April 2020

ईशान्य राज्यांमध्ये पायाभूत सुविधांचा विकास.


 
🦋2014-15 पासून आतापर्यंत ईशान्य प्रदेश विकास मंत्रालय आणि एनईसीने ईशान्य राज्यांच्या विकासासाठी विविध योजनांच्या अंतर्गत 8640.08 कोटी रुपयांच्या 549 प्रकल्पांना मंजुरी दिली.

🦋याकाळात एकूण 667 प्रकल्प पूर्ण झाले. यामध्ये याकाळात मंजुरी मिळालेल्या 32 प्रकल्पांचा समावेश होता. उर्वरित प्रकल्प अंमलबजावणीच्या विविध टप्प्यांमध्ये आहेत.

🦋केंद्रीय ईशान्य प्रदेश विकास राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार), पंतप्रधान कार्यालय, कार्मिक सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन, अणु ऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

♾♾आयुष्मान भारत योजनेअंतर्गत वेलनेस सेंटर♾♾

🚦आयुष्मान भारत हेल्थ ॲन्ड वेलनेस सेंटर अंतर्गत दीड लाख उपआरोग्य केंद्रे आणि प्राथमिक आरोग्य केंद्राचे डिसेंबर 2022 पर्यंत हेल्थ ॲन्ड वेलनेस सेंटरमधे रुपांतर करण्यात येत आहे.

🚦2018-19 या वित्तीय वर्षापर्यंत 40,000 हेल्थ ॲन्ड वेलनेस सेंटरना परवानगी द्यायचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात 62,000 पेक्षा जास्त मंजूऱ्या देण्यात आल्या.

🚦राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रांचे हेल्थ ॲन्ड वेलनेस सेंटरमधे रुपांतर करण्यासह ही केंद्रे बळकट करण्यासाठी तंत्रविषयक आणि वित्तीय सहाय्यता पुरवली जाते. आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी राज्यसभेत लेखी उत्तराद्वारे ही माहिती दिली.

No comments:

Post a Comment

Latest post

WORLD AIR QUALITY REPORT 2023

🔶जागतिक हवा गुणवत्ता अहवाल २०२३ • अहवाल जाहीर करणारी संस्था : IQAIR स्वित्झर्लंड (स्थापना 1963) • एकूण देश : 134 ☑️या अहवालानुसार 👇👇 ...