Sunday 26 July 2020

"तोमान": इराण देशाचे नवे राष्ट्रीय चलन...▪️

▪️ इराण देशाने त्यांचे अधिकृत राष्ट्रीय चलन बदलण्याचा निर्णय घेतला आहे. इराणने ‘इराणी रियाल’ हे चलन बदलून त्याऐवजी ‘इराणी तोमान’ हे चलन अधिकृत करण्याचा निर्णय घेतला आहे. बदललेल्या चलनानुसार एका तोमानचे मूल्य हे 10 हजार रियाल एवढे असणार आहे.

▪️ 4 मे 2020 रोजी इराणच्या संसदेमध्ये यासंदर्भातला विधेयक मंजूर करण्यात आला आणि राष्ट्रीय चलनामधून चार शून्य हटवण्याच्या प्रस्तावाला मंजूरी मिळाली. केंद्रीय बँक असणाऱ्या सेंट्रल बँक ऑफ इराणला चलन बदलण्यासाठी दोन वर्षांची मुदत देण्यात आली आहे.

▪️संयुक्त राज्ये अमेरिका देशाने इराणबरोबरचा अणुकरार रद्द करण्याबरोबरच इराणवर अनेक आर्थिक निर्बंधही लादले. याच कारणामुळे इराणच्या चलनाचे मूल्य 60 टक्क्यांपर्यंत घसरले आणि रियाल डॉलरच्या तुलनेत एक लक्ष 56 हजार इतका घसरला आहे. इराणी चलनाची किंमत घसरल्याने महागाई वाढली. हीच घसरण रोखण्यासाठीची उपाययोजना म्हणून इरणने चलन बदलण्याचा निर्णय घेतला.

▪️इराण हा मध्यपूर्वेतला एक देश आहे. तेहरान ही राजधानी आहे आणि रियाल हे अधिकृत चलन आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...