केरळ, कर्नाटकमध्ये मोठ्या प्रमाणात आयसीसचे दहशतवादी : संयुक्त राष्ट्र अहवाल

💠केरळ आणि कर्नाटकमध्ये आयसीसच्या दहशतवाद्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असू शकते, असा इशारा संयुक्त राष्ट्रसंघाच्या एका अहवालात देण्यात आला आहे. तसंच भारतीय उपखंडात अल कायदा ही दहशतवादी संघटना हल्ल्याचा कट रचत आहे. तसंच या क्षेत्रात भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि म्यानमारचे १५० ते २०० दहशतवादी असल्याचंही त्यात नमूद करण्यात आलं आहे. पीटीआयनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

💠'अॅनालिटिकल सपोर्ट अँड सँक्शन्स मॉनिटरिंग टीम'चा २६ वा अहवाल प्रकाशित करण्यात आला. भारतीय उपखंडात अल-कायदा (क्यूआयएस) तालिबानच्या मदतीनं निमरूज, हेलमंद आणि कंधारमधून आपल्या कारवाया करत असल्याचं या अहवालात सांगण्यात आलं आहे. "या संघटनेत भारत, बांगलादेश, पाकिस्तान आणि म्यानमारमधील १०० ते १५० दहशतवादी आहेत. क्यूआयएसचा म्होरक्या हा ओसामा महमूद आहे. त्यानं आसिम उमर याची जागा घेतली आहे. तसंच तो आसिम उमारच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठीही कट रचत आहे," असंही अहवालात नमूद केलं आहे.

💠"१० मे २०१९ रोजी जाहीर करण्यात आलेल्या आयएसआयएलचे (हिंद विलय) १८० ते २०० सदस्य आहेत, असं एका सभासद देशाकडून सांगण्यात आलं. केरळ आणि कर्नाटकमध्ये आयएसआयएलच्या दहशतवाद्यांची मोठी संख्या आहे," असंही अहवालात नमूद करण्यात आलं आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात आयसीसनं भारतात नवा प्रांत स्थापित करण्याचा दावा केला होता. तसंच काश्मीरमधील दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये झालेल्या चकमकीनंतर ही संघटनेनं ही घोषणा केली होती.

💠यापूर्वी या दशतवादी संघटनेनं आपल्या नव्या शाखेचं नाव अरबी नाव 'विलायह ऑफ हिंद' असल्याचं अमाक या वृत्तसंस्थेद्वारे सांगितलं होतं. परंतु जम्मू काश्मीरच्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं हा दावा फेटाळला होता. यापूर्वी, काश्मीरमध्ये आयसीसचे हल्ले त्याच्या तथाकथित खोरासन प्रांत शाखेशी जोडले गेले होते. ज्याची स्थापना २०१५ मध्ये करण्यात आली होती आणि अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि आसपासच्या प्रदेश हे त्यांचं लक्ष्य होतं.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी प्रश्नसंच

1.कोणत्या आशियाई देशाने लिथियम आणि ग्रेफाइटसह 20 गंभीर खनिज ब्लॉक्सचा ई-लिलाव सुरू केला आहे? [अ] श्रीलंका [ब] इंडोनेशिया [क] भारत [डी] बांगल...