Sunday 26 July 2020

पूर्व लडाखमधून सैन्य पूर्णपणे मागे घेण्यास भारत-चीनची मान्यता.

⭐️पूर्व लडाखमधील वादग्रस्त ठिकाणांहून सैन्य लवकरात लवकर आणि पूर्णपणे माघारी घेण्याचे शुक्रवारी भारत आणि चीनने मान्य केले. द्विपक्षीय संबंधांमध्ये र्सवकष सुधारणा होण्यासाठी सीमेवरील भागात शांतता प्रस्थापित होणे गरजेचे आहे, या बाबतही दोन्ही देशांचे मतैक्य झाले.

⭐️भारत आणि चीन यांच्यात नव्याने ऑनलाइन राजनैतिक चर्चा झाली त्यामध्ये लडाखमधील स्थितीचा आढावा घेण्यात आला. कमांडर स्तरावर १४ जुलै रोजी झालेल्या चर्चेनंतर सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया अपेक्षेनुसार होत नसल्याचे लक्षात आल्याच्या पार्श्वभूमीवर नव्याने चर्चा करण्यात आली.

⭐️दोन्ही देशांचे सैन्य पूर्णपणे मागे घेण्याबाबतची रणनीती ठरविण्यासाठी चर्चेची आणखी एक फेरी लवकरच आयोजित करण्याचे शुक्रवारी झालेल्या चर्चेत दोन्ही देशांनी मान्य केले, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्यात ५ जुलै रोजी दूरध्वनीवरून तणाव कमी करण्यासंदर्भात जवळपास अडीच तास चर्चा झाली. त्यानंतर ६ जुलैपासून सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया सुरू झाली. कमांडरांच्या बैठकीत जो समझोता झाला त्याची प्रामाणिकपणे अंमलबजावणी करणे गरजेचे असल्याचे दोन्ही देशांनी शुक्रवारी झालेल्या चर्चेत मान्य केले.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 27 मार्च 2024

◆ भारत सरकारने हिंसाचारग्रस्त हैतीमध्ये अडकलेल्या भारतीयांना शेजारच्या डोमिनिकन रिपब्लिकमध्ये स्थलांतरित करण्यासाठी 'ऑपरेशन इंद्रावती&#...